मुला मुलींची नावे

नर्मदेतला गोटा's picture
नर्मदेतला गोटा in जनातलं, मनातलं
18 Dec 2011 - 12:29 am

'नावात काय आहे' असं म्हणू दे कोणी

पण नाव ही माणसाची आयुष्यभराची ओळख असते. ते ठेवताना काय विचार असतो ठेवणार्‍यांचा ?

अनेक जण असेही असतात ज्यांना आपले नाव आवडत नाही. काही जणांना ते खूप आवडते.

तसं मुलांची नावे काय असावीत याचा काही कायदा नाही पण वैशिष्ट्ये पहायला मिळतात

पहिल्या मुलाचं नाव ज्या अक्षरावरून वरून असेल त्याच प्रकारे पुढच्यांचीही असावीत हा नियम नाही पण तो पहायला मिळतो

पहिल्या मुलीचे नाव शलाका तर मग पुढे शर्वरी, शर्वाणी असेही पहायला मिळते.

आमच्याकडे एक साहित्यिक होते त्यांच्या मुलांची नावे
कविता, अभंग, मुक्तछंद अशी होती.

एक सरकारी अधिकारी होते मुलांची नावे योजना, प्रगती नि विकास.

कोल्हापूरकडे गेलं की नावं जरा भारदस्त संग्रामसिंह, विजयसिंह, समशेरसिंह अशी

इतर ठिकाणी अगदी नेत्यांच्या मुलांची नावेही अमित, अजित, सचिन, विजय

मग त्याला काहीतरी जोडून वजनदारपणा आणण्याचा प्रयत्न होतो
उदा: अमितभाऊ, अजित अण्णा, विजय अप्पा इ.

महाराष्ट्राबाहेर आन्ध्रात मुलाच्या नावावरून बनवलेली मुलींची नावे पहायला मिळतात

प्रदीपा, सिरीषा(शिरीषा), प्रवीणा, जयन्ती

नावावरूनही एखाद्याचा प्रांत थोड्याफार प्रमाणात सांगता येइल

रवी श्रीनिवास - आंध्र
विनोद - केरळ
मंजुनाथ, कोट्रेश - कर्नाटक

असो

जुळ्यां मुलांची नावेही सारखवट ठेवावीत असा कायदा नाही पण

उदाहरणे पहायला मिळतात ती अशी

अमित-अजित, विजय-विनय, श्रीराम-श्रीरंग
संगीता-सुनीता, विजया-विनया, अक्षता-अस्मिता

हिंदी मराठी सिनेमात
सचिन सुप्रिया, सचिन सारीका जोडी गाजत होती

तीच नावं अनेक बहिणभावांनाही मिळालेली दिसतात

आई वडिलांच्या नावातली अक्षरे वापरूनही काही मुलांची नावे तयार होतात

समीर + मानसी = रमा
विजय + सुचित्रा = सुजय

पण मुलगी झाली तर काय 'विचित्रा' ठेवणार का

त्या त्या भागाचा राकटपणा किंवा नाजूकपणाही नावात दिसून येतो

म्हणजे

पंजाबात परकाश, बलविंदर, परविन्दर, हरप्रीत या. नावावरून सांगता येत नाही
हे नाव मुलाचं की मुलीचं.

मुलींची नावं मुलांसारखीच फक्त पुढे कौर लावलेले असते

हरप्रीत कौर वगैरे

या उलट

गुजराथी मारवाडी नावे कधी धृष्टद्युम्न, प्रद्युम्न, विश्वंभर अशी फारशी पहायला मिळणार नाहीत
शक्यतो जोडाक्षरे टाळली जातात त्यामुळे नितीन, सचिन, समीर, सुनील अशी साधी सोपी सुटसुटीत
नावे पाहायला मिळतात.

नावातही एक नजाकत जपली जाते.

गंमत म्हणजे पंजाब्यांच्यापेक्षा वेगळा प्रकार आढळतो. तिकडे मुली देखील मुलांची नावे धारण करतात

इकडे मुलांची नावे शीतल, सेजल, सोनल

त्यामुळे नुसत्या नावावरून जराही संशय येणार नाही की हा मुलगा आहे म्हणून

काही नावं एखाद्या काळात फारच प्रचलित होतात
पूर्वी जितेन्द्र, मनोज, दिलीप ही हीरोंची नावे प्रचारात होती

पुण्या मुंबईतील मराठी घरात काही नावे फार पॉप्युलर होती
अभिजीत, मंदार, संतोष

म्हणजे रस्त्याने जातान सहज मंदार म्हणून हाक मारावी तर १० जण ओ देतील
बर एका मुलाचं नाव मंदार असेल तर धाकट्याचे केदार असावं असा नियमही असावा

सध्या अभिषेक, ऐश्वर्या, आर्या या नावांची चलती आहे

अभिषेक च्या सिनेमाला नाही पण नावाला उठाव आहे.

अभिनव बिन्द्राने सुवर्ण जिंकलं त्यावर्षी 'अभिनव' नावची लाट येऊन गेली

आताशा मुलगी झाली तर 'गार्गी' सोडून दुसरं नाव ठेवायला परवानगी नाही असे ऐकायला मिळते.
त्यामुळे मुलगी झाली म्हणण्याऐवजी आम्हाला 'गार्गी' झाली असे म्हणण्याची प्रथा रुढ होते आहे

त्यामुळ

मुलीचे नाव काय ठेवणार याऐवजी गार्गीचे नाव काय ठेवणार
असाही संवादही पुण्यामुम्बईत कानी पडू लागला आहे

भाषाजीवनमानआस्वाद

प्रतिक्रिया

आनन्दिता's picture

18 Apr 2014 - 12:04 am | आनन्दिता

सेम हिअर ... माझ्या एका टिम मेट चं नाव सा मा... आधी वाटलं एखादी चीनी सुबक ठेंगणी असेल.. पण प्रत्यक्षात तो एक गोलमटोल बाबा निघाला...

त्याला ओ सा मा अशी हाक मारावी अनावर हुक्की यायची... पण .... :(

अत्रुप्त आत्मा's picture

13 May 2014 - 9:04 pm | अत्रुप्त आत्मा

@त्याला ओ सा मा http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif

दिव्यश्री's picture

17 Apr 2014 - 4:26 pm | दिव्यश्री

तेच की . हे मी लिहील नाही . पण त्या शब्दाचा अर्थ माहिती आहे . माझ्या जावेने तिच्या मुलाचे नाव शोएयन्तेन ठेवलं आहे . आजपर्यंत हजार वेळा मला हा प्रश्न पडला कि या मुलाला स्वतःचा नाव व्यवस्थित कधी सांगता येईल . आता तो २-२.६ वर्षाचा आहे .

तो मुलगा शाळेत त्याचं नाव 'शो-अँड-टेल' असं सांगेल!

अत्रुप्त आत्मा's picture

17 Apr 2014 - 7:37 pm | अत्रुप्त आत्मा

@तर्पण??? >>> :D हे बरय..मंजे पोरं खेळता खेळता जिन्या/बिन्यावरनं घरंगळलं..तर बाकिच्यांनी "तर्पयामी.तर्पयामी" असे ओ रडावे! =))

स्लेश्मा/ श्लेष्मा ह्या शब्दाचा अर्थ शेंबूड / नाकातील स्त्राव असा होतो हे कुठेतरी वाचल्याचे आठवते

_मनश्री_'s picture

17 Apr 2014 - 7:49 pm | _मनश्री_

श्लेष्मा म्हणजे कफ

Prajakta२१'s picture

20 Apr 2014 - 9:20 pm | Prajakta२१

दुरुस्तीसाठी धन्यवाद

अनुप ढेरे's picture

17 Apr 2014 - 8:09 pm | अनुप ढेरे

एका महाभागाने स्वतःच्या मुलीचं नाव रासलीला ठेवल्याचं ऐकल आहे.

शिद's picture

17 Apr 2014 - 8:12 pm | शिद

रासलीला

कहर...!!!

नवरात्रीचा पराक्रम का काय? =))

मधुरा देशपांडे's picture

17 Apr 2014 - 8:53 pm | मधुरा देशपांडे

काय काय नावे असू शकतात.
एका मित्राकडे एकदा गप्पा मारत असताना तो बायकोसमोर म्हणाला, अगं ती ती होती ना प्रेयसी माझी मैत्रीण, तिचे पण असेच काहीतरी अमुक तमुक…शिक्षण तत्सम विषय…
मैत्रीण हा शब्द ऐके पर्यंत आम्ही फक्त 'माझी प्रेयसी' हे एवढे ऐकून सगळे अवाक होऊन बघत होतो की बायकोसमोर प्रेयसी चा विषय आणि तेही अजून चारचौघात. आणि बायको यावर शांत. नंतर हा उलगडा झाला की या मुलीचे नाव आहे प्रेयसी. हहपुवा झाली प्रेयसी हे नाव ऐकून.

भारतातल्या सारखीच परदेशातही माणसं विचित्र (माझ्या दृष्टीने) नावं ठेवतात. जसे:
१. सिडनी
२. पॅरिस अशी शहरांवरून ठेवलेली नावं
(आपल्या कडे आळंदी असं नाव असतं म्हणे.. कोणी उद्या मुंबई, नालासोपारा ठेवेल!)
आणी देशाच्या नावावरून सुद्धा नावं ठेवली जातात. जसे:
१. कॅमेरून
२. इंडिया
३. एशिया
४. केनया
वगैरे.

सुबोध खरे's picture

17 Apr 2014 - 11:12 pm | सुबोध खरे

माझ्या मैत्रिणीच्या भावाचे नाव "श्रीवर्धन"लेले आहे.
माजी पंत प्रधान श्री पी व्ही नरसिंह राव यांच्या नातीचे नाव झांसी रेड्डी असे आहे.( ती माझी विद्यार्थिनी होती रेडीयोलोजीची )

खटपट्या's picture

17 Apr 2014 - 9:24 pm | खटपट्या

यावरून एक विनोद आठवला -

एकदा हवालदार एका मुलाला ट्राफिक सिग्नल तोडल्याबद्दल पकडतो.

हवालदार - पावती फाडावी लागेल
मुलगा - ठीक आहे
हवालदार - नाव सांग
मुलगा - प्रद्युम्न दुष्टद्युम्न
हवालदार - ठीक आहे आता सोडून देतो पुढच्या वेळेला सोडणार नाही.

आरव हे नाव नॉर्थिंडीयनांकडे ऐकले आहे. एका भारतीय हाटेलात छोटा मुलगा हातात स्यालडमधील काहीतरी तुकडा घेऊन चघळत इकडे तिकडे फिरत होता. आईवडीलही लक्श ठेवून होते. तो एकाएकी गडबडला व ममाऽऽऽ असे रडक्या आवाजात ओरडला. त्यावर त्याची दिल्लीकर असावी अशी आई "आरव बेटा यहाँ आओ." म्हणाल्याने वैताग आला. मला ते नाव अज्याबात आवडत नाही. एवढ्यात आरव हे नाव तीन ते चार वेळा वेगवेगळ्या ठिकाणी ऐकले आहे. तसे मुलींमधील सोनम हे नाव आवडत नाही. बाकी रासलिला, श्लेष्मा नावे चालतील पण आरव आणि सोनम नकोत. सिनेनट्/नट्या यांच्याकडून उधारीवर नावे ठेवणार्‍या आईवडीलांना नावांचे अर्थ माहित असतील असे नाही.

आरोही's picture

17 Apr 2014 - 10:39 pm | आरोही

रेवाक्का अग एका हॉलीवूड अभिनेत्री ने तीच्य मुलीचे नाव नॉर्थ वेस्ट असे ठेवले आहे...तर एकीने ब्लू हार्पर असे काही तरी आहे ...

सेरेपी's picture

18 Apr 2014 - 1:30 am | सेरेपी

एका हॉलीवूड अभिनेत्री ने तीच्य मुलीचे नाव नॉर्थ वेस्ट असे ठेवले आहे >> किम कर्दाशियन. ती अभिनेत्री नाहिये. ती नुसतीच 'फेमस' आहे. त्या मुलीच्या वडीलांचं आडनाव वेस्ट आहे (कान्ये वेस्ट)
एकीने ब्लू हार्पर असे काही तरी आहे ...>> बियोन्सेच्या मुलीचं नाव ब्लू आयव्ही कार्टर आहे.

आता हे सगळं मला माहीत कारण बातम्या वाचायला गेलं की याच 'बातम्या' आधी दिसतात.

आरोही's picture

17 Apr 2014 - 10:43 pm | आरोही

Cricket Pearl Silverstein हे हि एकीच्या मुलीचे नाव आहे ..

माझ्या वर्गातील मित्राचे नाव "तीर्थंकर" घोष असे आहे आणि त्याच्या वडिलांचे नाव "दीपंकर" घोष. मी त्याला म्हटले कि तुझ्या मुलाचे नाव "भयंकर" ठेव. यावर तो चिडला आणि तीन दिवस माझ्याशी बोलला नाही.

पैसा's picture

17 Apr 2014 - 11:57 pm | पैसा

=))

बाबा पाटील's picture

18 Apr 2014 - 11:25 am | बाबा पाटील

ओळखीतल्या दोन जुळ्या भावंडांची नावे भयानक आणी भयंकर. अशी होती आणी खरच चार पाच वर्षाची ती पोर नावाला जागणारी होती.

बाकी लेले आडनावाच्या लोकांनी नाव ठेवताना फार म्हणजे फारच जागरूक राहायला हवं नाही तर पुरू समीर लेले (पु.स.लेले), सुधीर कमलाकर लेले (सु.क.लेले) बिच्चारी पोरांना शाळेत जाम त्रास होईल.

पैसा's picture

17 Apr 2014 - 11:58 pm | पैसा

यावरून बरेच भयंकर जोक्स ऐकले होते!

रेवती's picture

18 Apr 2014 - 12:12 am | रेवती

मी पण.

आनन्दिता's picture

18 Apr 2014 - 12:36 am | आनन्दिता

पुण्यात माझ्या ओळखीतल्या नॉर्थ इंडीयन जोड्प्याने मुली चं नाव " शीवी" ठेवलंय... अर्थ कायतर शिवा पासुन जन्मलेली..
मी त्यांना पोरगी शाळेत जायच्या वयाची व्ह्यायच्या आत महाराष्ट्रातुन शिफ्ट होण्याचं मनावर घ्या असा फुकटचा सल्ला दिला होता.. =))

एका सिंधी मैत्रिणीनी मलेश ठेवलेलं नाव. मग बदलून मल्लेश केलं.

एकाने त्याच्या मुलीचं आरती नाव ठेवलं पण तिला आर्टी म्हणतात म्हणून बदललं, तर दुसर्‍याने अरविंद असं मुलाचं ठेवलेलं नाव एरविंड या अपभ्रंशामुळे बदललं.

_मनश्री_'s picture

18 Apr 2014 - 11:59 am | _मनश्री_

आमच्या गावी एका बहिण आणि भावाच नाव लाडू आणि जिलबी अस आहे

इरसाल's picture

18 Apr 2014 - 12:31 pm | इरसाल

म्हणजे बुळबुळीत.

आनंदराव's picture

18 Apr 2014 - 1:26 pm | आनंदराव

थोडेसे अवांतर
माझ्या ओळखीतल्या एकाने त्याच्या लग्नात त्याच्या बायकोचे नाव बदलून " द्रौपदी" ठेवले .
आता बोला.

दिव्यश्री's picture

20 Apr 2014 - 8:07 pm | दिव्यश्री

अहिल्या द्रौपदी सीता |
तारा मंदोदरी तथा ||
पंचकन्या स्मरे नित्यं |
महा पातकं नाशनम ||

जशी जनक राजाची जानकी तशीच द्रौपदी म्हणजे द्रुपद राजाची मुलगी .
द्रौपदी हि आद्य पतिव्रतांपैकी एक आहे .

मला खरच कळल नाही तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ?

नर्मदेतला गोटा's picture

12 May 2014 - 12:37 pm | नर्मदेतला गोटा

दोन बहिणींची नावे ऐकली
देवश्री आणि तेजश्री

हे असं नावाच्या शेवटी श्री आलं की
डहाणूकर कॉलनीत गेल्यासारखं वाटतं

कुठल्याशा पुस्तकात वाचले होते मधे.. अमेरीकास्थित साऊथ इंडियन कुटुंबाने त्यांच्या मुलाचे नाव साईबाबा ठेवले.
हाक मारताना नुसती 'बाबा' म्हणायला लागले. त्या पोराच्या गोर्‍या मित्रांनी बाबाचे बॉब केले आणि बॉब म्हणजे रॉबर्ट.
अशाप्रकारे साईबाबाचा रॉबर्ट झाला :):)

मालविका's picture

12 May 2014 - 1:51 pm | मालविका

माझ्या भाच्याचि नावे: मालविका आनि अवन्तिका मला खुप अवडतात.शिवाय इथे एक नाव आइकल शैलि.

नर्मदेतला गोटा's picture

12 May 2014 - 3:09 pm | नर्मदेतला गोटा

तूमचे आणि भाचीचे दोघींचेही नाव मालविका
गम्मत आहे नाही !

अरे वा! हा धागा पुन्हा वर आला का!
माझा मुलगा नुकताच एका मुलाबद्दल बोलताना "तो नै का बाईक राईड करणारा प्रीम" असे म्हणत होता. त्यावर मी "तो भारतीय मुलगा नां, मग प्रीम काय म्हणतोस, प्रेम म्हण ना!" असे म्हणताच याने हसायला सुरुवात केली. ते नाव प्रेम आहे व त्याचा अर्थ हामेरिकनांना कळू नये म्हणून सगळा आटापिटा चालला होता त्या मुलाचा व त्याने बाकीच्या भारतीय मुलांना त्यात सामिल करून घेतले होते. आता या वयात या नावाचा अर्थ मुले वेगळाच लावणार. एका दिप्ती नावाच्या मुलीला डीप टी म्हणतातच, काय करणार?

अत्रुप्त आत्मा's picture

14 May 2014 - 1:29 pm | अत्रुप्त आत्मा

डीप टी >>> =))

नर्मदेतला गोटा's picture

6 Sep 2014 - 7:58 pm | नर्मदेतला गोटा

सध्या परदेशस्थ भारतीयांमधे 'ध्रूव' नाव फार लोकप्रिय झाले आहे

माझ्या एक मित्राला मुलाचं नाव 'ध' वरून ठेवायला सांगितलं होतं तेंव्हा मित्रांनी त्याला सुचवलेली काही नावं - धैर्यधर, धुरंधर, धुवाधार, धपाधप... शेवटी त्याने ध्रुव नाव ठेवलं :)
माझा ऑनसाईट म्यानेजर भारतीय आहे - आंध्र चा. त्याचं नाव कोंडा. तो अमेरिकेत आहे आणि मुलीचं नाव त्याने तिथलं ठेवायचं ठरवलं आणि ऍना ठेवलं तर - जबरदस्त नाव होईल - ऍना कोंडा :)
टीम मध्ये एक आरती आहे आणि तिचा लग्न झाला चंदन बरोबर. त्यावेळी पब्लिक बोललं होतं आता यांच्या पोरा पोरींची नावं पूजा, अभिषेक, अर्चना, उदबत्ती, अगरबत्ती अशी ठेवली पाहिजेत :)

ऑफिसमधल्या एकाने त्याच्या मुलीचे नाव शिवोन ठेवलयम shivon means god is gracious अस म्हणतोय तो.

पल्लवी शर्मा's picture

16 May 2014 - 3:50 pm | पल्लवी शर्मा

ऑफिसमधल्या एका मुलीचे नाव तमिळसेल्वि आहे. आई-वडिलाना तमिळ भाषेचा खूप अभिमान आहे म्हणून.
हे कारण सान्गितले.

बहिरुपी's picture

16 May 2014 - 5:41 pm | बहिरुपी

माझ्या ओळखीत एकचे नाव अन्वित आहे. अर्थ 'प्रमुख', 'नेता' असा आहे.

प्रमुख? कशा अर्थी? कारण शब्दश: अन्वित म्हणजे ज्याचा (कशाशीतरी) अन्वय झालेला आहे असा...?

बहिरुपी's picture

10 Sep 2014 - 8:00 pm | बहिरुपी

जरा गुगलुन बघीतल तर अर्थ लिडर असा दाखवला आहे.
हि लिंक. http://babynames.merschat.com/index.cgi?function=View&bn_key=90250

नर्मदेतला गोटा's picture

30 May 2014 - 10:40 pm | नर्मदेतला गोटा

आता नरेंद्र नाव ठेवण्याची लाट येइल

टवाळ कार्टा's picture

6 Sep 2014 - 11:13 pm | टवाळ कार्टा

कैच्याकै लॉजिक

भुमिती,त्रिज्या,व्यास,परीघ...........
गणित विषय पक्का होईल.

रवीराज's picture

8 Sep 2014 - 2:55 am | रवीराज

मुलाचे नाव स्वराज ठेवले तेव्हा एका मैत्रिणीने फुकटचा सल्ला दिला - "आता मुलीचे नाव हिंदवी ठेव"....
मैत्रिण होती म्हणुन हसण्यावारी नेले.

टवाळ कार्टा's picture

8 Sep 2014 - 8:01 am | टवाळ कार्टा

मैत्रिण होती म्हणुन हसण्यावारी नेले

मैत्रीण नसती तर???

भिंगरी's picture

8 Sep 2014 - 10:31 am | भिंगरी

माझ्य चुलत बहिणीच्या बंगल्याचे नाव, स्वराज्य आहे
आणि मुलीचे नाव हिंदवी आहे.

रवीराज's picture

8 Sep 2014 - 3:19 pm | रवीराज

तर???
हिंदवी स्वराज्यावर आक्रमण समजुन लढाईच केली असती.
(हेपण हसण्यावारीच म्हणतोय)

नर्मदेतला गोटा's picture

2 Feb 2017 - 6:58 pm | नर्मदेतला गोटा

असतील तुम्ही म्हणताय तशी नावे
नविन समजलेलं नाव हृदित्य राजवाडे

नर्मदेतला गोटा's picture

23 Apr 2017 - 9:24 am | नर्मदेतला गोटा

सध्या शर्व शाल्व अशी काही नावे ऐकायला मिळतात