मुला मुलींची नावे

नर्मदेतला गोटा's picture
नर्मदेतला गोटा in जनातलं, मनातलं
18 Dec 2011 - 12:29 am

'नावात काय आहे' असं म्हणू दे कोणी

पण नाव ही माणसाची आयुष्यभराची ओळख असते. ते ठेवताना काय विचार असतो ठेवणार्‍यांचा ?

अनेक जण असेही असतात ज्यांना आपले नाव आवडत नाही. काही जणांना ते खूप आवडते.

तसं मुलांची नावे काय असावीत याचा काही कायदा नाही पण वैशिष्ट्ये पहायला मिळतात

पहिल्या मुलाचं नाव ज्या अक्षरावरून वरून असेल त्याच प्रकारे पुढच्यांचीही असावीत हा नियम नाही पण तो पहायला मिळतो

पहिल्या मुलीचे नाव शलाका तर मग पुढे शर्वरी, शर्वाणी असेही पहायला मिळते.

आमच्याकडे एक साहित्यिक होते त्यांच्या मुलांची नावे
कविता, अभंग, मुक्तछंद अशी होती.

एक सरकारी अधिकारी होते मुलांची नावे योजना, प्रगती नि विकास.

कोल्हापूरकडे गेलं की नावं जरा भारदस्त संग्रामसिंह, विजयसिंह, समशेरसिंह अशी

इतर ठिकाणी अगदी नेत्यांच्या मुलांची नावेही अमित, अजित, सचिन, विजय

मग त्याला काहीतरी जोडून वजनदारपणा आणण्याचा प्रयत्न होतो
उदा: अमितभाऊ, अजित अण्णा, विजय अप्पा इ.

महाराष्ट्राबाहेर आन्ध्रात मुलाच्या नावावरून बनवलेली मुलींची नावे पहायला मिळतात

प्रदीपा, सिरीषा(शिरीषा), प्रवीणा, जयन्ती

नावावरूनही एखाद्याचा प्रांत थोड्याफार प्रमाणात सांगता येइल

रवी श्रीनिवास - आंध्र
विनोद - केरळ
मंजुनाथ, कोट्रेश - कर्नाटक

असो

जुळ्यां मुलांची नावेही सारखवट ठेवावीत असा कायदा नाही पण

उदाहरणे पहायला मिळतात ती अशी

अमित-अजित, विजय-विनय, श्रीराम-श्रीरंग
संगीता-सुनीता, विजया-विनया, अक्षता-अस्मिता

हिंदी मराठी सिनेमात
सचिन सुप्रिया, सचिन सारीका जोडी गाजत होती

तीच नावं अनेक बहिणभावांनाही मिळालेली दिसतात

आई वडिलांच्या नावातली अक्षरे वापरूनही काही मुलांची नावे तयार होतात

समीर + मानसी = रमा
विजय + सुचित्रा = सुजय

पण मुलगी झाली तर काय 'विचित्रा' ठेवणार का

त्या त्या भागाचा राकटपणा किंवा नाजूकपणाही नावात दिसून येतो

म्हणजे

पंजाबात परकाश, बलविंदर, परविन्दर, हरप्रीत या. नावावरून सांगता येत नाही
हे नाव मुलाचं की मुलीचं.

मुलींची नावं मुलांसारखीच फक्त पुढे कौर लावलेले असते

हरप्रीत कौर वगैरे

या उलट

गुजराथी मारवाडी नावे कधी धृष्टद्युम्न, प्रद्युम्न, विश्वंभर अशी फारशी पहायला मिळणार नाहीत
शक्यतो जोडाक्षरे टाळली जातात त्यामुळे नितीन, सचिन, समीर, सुनील अशी साधी सोपी सुटसुटीत
नावे पाहायला मिळतात.

नावातही एक नजाकत जपली जाते.

गंमत म्हणजे पंजाब्यांच्यापेक्षा वेगळा प्रकार आढळतो. तिकडे मुली देखील मुलांची नावे धारण करतात

इकडे मुलांची नावे शीतल, सेजल, सोनल

त्यामुळे नुसत्या नावावरून जराही संशय येणार नाही की हा मुलगा आहे म्हणून

काही नावं एखाद्या काळात फारच प्रचलित होतात
पूर्वी जितेन्द्र, मनोज, दिलीप ही हीरोंची नावे प्रचारात होती

पुण्या मुंबईतील मराठी घरात काही नावे फार पॉप्युलर होती
अभिजीत, मंदार, संतोष

म्हणजे रस्त्याने जातान सहज मंदार म्हणून हाक मारावी तर १० जण ओ देतील
बर एका मुलाचं नाव मंदार असेल तर धाकट्याचे केदार असावं असा नियमही असावा

सध्या अभिषेक, ऐश्वर्या, आर्या या नावांची चलती आहे

अभिषेक च्या सिनेमाला नाही पण नावाला उठाव आहे.

अभिनव बिन्द्राने सुवर्ण जिंकलं त्यावर्षी 'अभिनव' नावची लाट येऊन गेली

आताशा मुलगी झाली तर 'गार्गी' सोडून दुसरं नाव ठेवायला परवानगी नाही असे ऐकायला मिळते.
त्यामुळे मुलगी झाली म्हणण्याऐवजी आम्हाला 'गार्गी' झाली असे म्हणण्याची प्रथा रुढ होते आहे

त्यामुळ

मुलीचे नाव काय ठेवणार याऐवजी गार्गीचे नाव काय ठेवणार
असाही संवादही पुण्यामुम्बईत कानी पडू लागला आहे

भाषाजीवनमानआस्वाद

प्रतिक्रिया

चिंतामणी's picture

18 Dec 2011 - 8:27 am | चिंतामणी

काय नाव ठेवायचे ठरवले आहे??????? :) :-) :smile:

जोशी 'ले''s picture

18 Dec 2011 - 9:38 am | जोशी 'ले'

+
मस्त

श्रीरंग_जोशी's picture

18 Dec 2011 - 12:54 pm | श्रीरंग_जोशी

गेल्या १५ - १६ वर्षांपासून महाराष्ट्रात मुलग्यांसाठी अथर्व हे नाव फार प्रचलित झाले आहे. दर १० मुलग्यांमध्ये १ किंवा दोघांचे नाव अथर्व असावे असा अलिखित नियम झालेला आहे.

कवितानागेश's picture

18 Dec 2011 - 1:04 pm | कवितानागेश

हल्ली मुलीचे नाव 'कोलावेरी' ठेवतायत म्हणे! ;)

चिरोटा's picture

18 Dec 2011 - 1:12 pm | चिरोटा

खरे आहे. अथर्व सारखेच व्योम,वेदांत,अर्जुन ही लोकप्रिय आहेत. मध्यंतरी मुलींमध्ये श्रेया हे नाव प्रचलित होते. एका पुणेकराने आपल्या जुळ्या मुली-मुलाचे नाव अनुक्रमे थेंब्,ठिपका अशी ठेवल्याचे ऐकले होते.

पक पक पक's picture

18 Dec 2011 - 9:49 pm | पक पक पक

बर तिळ झाल नाहि ते ,नाहि तर ओघळ होताच....

चिंतामणी's picture

18 Dec 2011 - 11:47 pm | चिंतामणी

=))=))=))=))=))=))=))=))

=))=))=))=))=))=))=))=))

=))=))=))=))=))=))=))=))

पक पक पक's picture

19 Dec 2011 - 6:14 pm | पक पक पक

ह्येका काय म्हनायचा भाउ ? फवारा कि शिंतोडा....?

पाषाणभेद's picture

18 Dec 2011 - 1:53 pm | पाषाणभेद

स्लेष्मा नाव कसंय?
आमच्या काळात खंडोजी, येसाजी, रायाजी, बाजी असली नावे मुलांची तर तारा, मंदोदरी, अनुसूया असली नावे मुलींची असायची. आताच्या काळात काय चाल्लेय कुणास ठावूक?
- पाषाणभेदजी
(अवांतर: मिपा बदलत आहे काय? जास्त सिरेस होते आहे काय? )

तुम्च्या काळात पोवाडे गायले जायचे आता बदनाम मुन्नि , आणि शिला ह्या बायांची गाणी म्हणलि जातात......

किचेन's picture

18 Dec 2011 - 3:28 pm | किचेन

माझ्या लहानपणी आमच्या शेजारी(डावीकडे १ आणि उजवीकडे २),समोर,समोरच्यांच्या शेजारी आणि घरातही (तीर्थरूप) राजेंद्र.जवळपास हे सगळे राजेंद्र एकाच वयाचे होते.जर कोणी वर जायचा कंटाळा नको म्हणून खालून हाक मारली तर चाहोबाजून 'ओ' ऐकायला यायचा, पण ज्या राजेंद्रला आपण हाक मारतोय तो काही यायचा नाही.
आत्ता मुलांमध्ये आर्य किवा आर्यन(आर्यनचा अर्थ काय हो?) तर मुलींमध्ये सई हे नाव फार जोरात आहे.कोठेही कार्यक्रमाला जा ४-५ छोट्या छोट्या सया असतातच.

चिगो's picture

23 Dec 2011 - 1:24 pm | चिगो

माझ्या माहीतीप्रमाणे हे सूर्याच्या एका मुलाचे नाव आहे..
माझ्या आईवडीलांनी आम्हां भावंडाची जी नावे ठेवलीत ती मला लै आवडतात..
"शंतनू, अनिकेत आणि चिन्मय".. माझं नाव बोलायला तर आमच्या गावातल्या लै लोकांना त्रास व्हायचा. (का, कोण जाणे?) एका सरकारी माणसाने कुठल्याशा कागदपत्रात हे नाव "चिंध भाई" असं लिवलं होतं.. ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Dec 2011 - 4:03 pm | अत्रुप्त आत्मा

अत्ता गेली काही दशकं धार्मिक अभिमानाची जी भरती आलेली आहे...त्यात मुला मुलींना धार्मिक वस्तू,साधनांची नावं देण्याचं भयंकर फॅड आलय---उदा- 'यज्ञोपवित(जानवं),सृवा(यज्ञातली १पळी),समिधा(यज्ञात आहुती देण्याची वस्तू), प्रणीता( यज्ञा भोवती पाणी शिंपडण्याची वाटी)...अशी नावं ठेवण्याचा परिणाम काय होतो यावरुन वि.आ.बुवा यांचा १तुफ्फान विनोदी लेख अठवला...त्यातल्याच कल्पनेचा आधार घेतला तर पुढे काय गंमत उडु शकेल ते पहा-

प्रसंग १)या चौघांच खेळताना भंडण झालं तर-
समिधा- ए सृवे त्या यज्ञोपविताला हिसडा दे ग एक जोरात,चिटर मेला...
यज्ञो- ए सृवडे मला नको ओढू...
सृवा- मी स्वतःहुन नै कै ओढत, त्या सम्दीनी सांगितलन मला,,,जळकी मेली
समिधा- प्रणीतेनी डोळा मारला म्हणुन ढकलली मी तुला कळ्ळं ! आणी मला जळकी का म्हणतेस गं सृवडे कुसके!
प्रणीता-मग तू समिधा एस ना,जळणारच शेवटी... इ.इ.

प्रसंग २)हे चौघं विचित्रावस्थेत सापडले तर -इतर त्यांचं वृत्तांकन कसं करतील?
१मुलगा- ओ काका--- तुमचं 'यज्ञोपवित' गटारात पडलय पिऊन ,उचला त्याला...च्यायला आंम्हाला त्रास फुकट..!
१आज्जीबै-अगं वनिते तुझ्या या तिन्ही कार्ट्यांचं कै खरं नै गंssss... मेल्या तिघी गच्चीत गोंधळ घालतायत... सृवेनी काडी पेटवली,त्यावर समिधेनी शिगरेट पेटवलीन,नी प्रणिता नी त्या आळीपाळीनं झुरके मारतायत वरं ... वगैरे वगैरे

जमीर इब्राहीम 'आझाद''s picture

18 Dec 2011 - 7:04 pm | जमीर इब्राहीम 'आझाद'

अत्रुप्त आत्मा,
लय म्हन्जे ....
लय म्हन्जे .....
लय म्हन्जे लयच भारी..!

:-)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Dec 2011 - 9:53 pm | अत्रुप्त आत्मा

जमीर इब्राहीम 'आझाद',
खुप म्हन्जे....
खुप म्हन्जे....
खुप म्हन्जे खुपच धन्यवाद...!

:-)

पाषाणभेद's picture

19 Dec 2011 - 8:06 am | पाषाणभेद

प्रसंग २) म्हणजे अआच्या जुन्या आठवणी समजायच्या काय?
:-)

अत्रुप्त आत्मा's picture

19 Dec 2011 - 8:34 am | अत्रुप्त आत्मा

@-२) म्हणजे अआच्या जुन्या आठवणी समजायच्या काय?<<<
>>>''म्हणजे इईच्या आठवणींमधले जुने समज'' असं समजा हवंतर...काय!? ;-)

पक पक पक's picture

18 Dec 2011 - 4:49 pm | पक पक पक

ओवि अशा प्रकाराचे एक नाव इतक्यात ऐकले आहे.....जर मुलगा झाला तर त्याचे नाव पोवाडा,भजन असेही ठेवतील काहि लोकं,मुलीचे नाव विणा तर मग मुलाचे नाव काय तंबोरा,ढोल्,तबला,ताशा असे ठेवणार का..?

आत्मशून्य's picture

18 Dec 2011 - 7:56 pm | आत्मशून्य

फार पुर्विच एक व्यंगचित्र आठवलं.. चिंटुच्या वयाचा बॅट हातात घेतलेला एक मुलगा त्याच्या मित्राला सांगत असतो पुर्वि मला बाबा सुनील म्हणायचे, नंतर सचिन म्हणु लागले, सध्या विनोद म्हणतात.... (तेव्हां विनोद कांबळी नूकताच फोर्मात आला होता)

आमच्या मुलीचे नाव गार्गी ठेवले. ! :)

केळ्या's picture

18 Dec 2011 - 9:16 pm | केळ्या

एका मित्राचे नाव अनंत,बायको अपेक्षा आणि मुलगी झाल्यावर पूर्ती....
बघा कसे वाटते!

शुचि's picture

17 Apr 2014 - 12:59 am | शुचि

=)) =)) हाहाहा कसली हसतीये :)

JAGOMOHANPYARE's picture

18 Dec 2011 - 10:27 pm | JAGOMOHANPYARE

माझ्या सुयोग नावाच्या मित्राला प्रतिक्षा नावाची बायको मिळाली.

'प्रतिक्षा' केली की 'सुयोग' भेटतो! :)

श्रीरंग_जोशी's picture

18 Dec 2011 - 10:44 pm | श्रीरंग_जोशी

धमाल चित्रपटातील एक दृश्य
श्रीपेरुम्बदूर चिन्नास्वामी मुथ्थुस्वामी वेणुगोपाल अय्यर

डॉ.श्रीराम दिवटे's picture

19 Dec 2011 - 9:42 am | डॉ.श्रीराम दिवटे

उत्तम लेख लिहिला आहे. दिवस गेल्यानंतर दांपत्य नावातच फार अडकतात.
एखाद्या सुकुमाराचे नाव ठेवले जाते,
मोठा होऊन गुंड झाल्यावर तो इतरांना नावे ठेवतो!!!

वैशाली माने's picture

19 Dec 2011 - 3:25 pm | वैशाली माने

माझ्या मुलाचे नावः श्रिरत्न आहे. कसे वाटते??

अर्थात तशी माझ्या दिरांची इच्छा होती. त्यांच्या मुलाचे नाव श्रिरत्न असावे.पण तसे होउ शकले नाही.
आम्ही त्याला "श्रि " म्हणतो.

सोत्रि's picture

19 Dec 2011 - 6:26 pm | सोत्रि

ह्या धाग्यामुळे जस्ट शेअर करावेसे वाटले म्हणून:

माझ्या मुलांची नावे आहेत १. अद्वैत २. आदित्य

मी आणि माझी बायको 'अद्वैत' आहोत.
त्याची खुण म्हणजे माझा मोठा मुलगा म्हणून त्याचे नाव अद्वैत.
त्या अद्वैतावस्थेतून जे तेज निर्माण झाले ते म्हणजे माझा धाकटा मुलगा म्हणून त्याचे नाव आदित्य. :)

- (नावे ठेवणारा) सोकाजी

विश्वनाथ मेहेंदळे's picture

24 Dec 2011 - 4:13 pm | विश्वनाथ मेहेंदळे

हात्तिच्या मारी....
मला वाटले तुमच्या मुलांची नावे क्युबा लीब्रे, ग्रासहॉपर, स्लीपरी निपल, स्क्रूड्रायवर, माई-टाई अशी काहीशी असतील
इथे "सेक्स ऑन द बीच" आणि अजुन काही नावे जाणीवपूर्वक टाळली आहेत याची नोंद घ्यावी. ;-)

योगी९००'s picture

19 Dec 2011 - 6:36 pm | योगी९००

एकेकाळी म्हणजे ८/९ वर्षापुर्वी अथर्व आणि सार्थक ही नावे मुलांमध्ये आणि आर्या हे नाव मुलींमध्ये फार ठेवले जात होते..

माझ्या नात्यातल्या/मित्रांच्या मुलांमध्ये ६ अथर्व ४ सार्थक आणि ३ आर्या आहेत.

(आम्ही म्हणून कटाक्षाने ही नावे टाळली...)

नर्मदेतला गोटा's picture

2 Feb 2017 - 6:37 pm | नर्मदेतला गोटा

कुठली ठेवली तेही कळू द्या ना !

माझ्या एका मित्राने त्याच्या, बायकोच्या आणि आडनावाचं आद्याक्षर घेउन मुलाच नाव ठवलं
बायकोच नाव: प्रतिभा संतोष नार्वेकर (Pratibha Santosh Narvekar )

प्रसंन्ना (Prasanna)

आवांतर : स्वत:च्या मुलीचं नाव शोधताना बराच रिसर्च करावा लागला. ;)

अन्या दातार's picture

19 Dec 2011 - 7:32 pm | अन्या दातार

आद्याक्षरे घेऊन लोक स्वत:चे आयडीपण घेतात असे ऐकलंय

अवांतरः कधी कधी ती भावी जोडीदाराची पण असू शकतात. ;)

पुष्करिणी's picture

19 Dec 2011 - 8:05 pm | पुष्करिणी

ऐश्वर्या, रिया, खुशी , वेदांत, आर्यन यांचा सुळसुळाट आहे सध्या आमच्या आजूबाजूला

अतिशय अभ्यासपूर्ण आणि वाचनीय लेख. असे ' दर्जेदार' लेख पुन्हा सुरु झाले याचा आनंद वाटला.

इंटरनेटस्नेही's picture

20 Dec 2011 - 1:28 am | इंटरनेटस्नेही

हेच म्हणतो. अश्या प्रकारचे दर्जेदार लेखन हा मिपाचा युएसपी आहे.
-
मिपावरचा आद्य दर्जेदार लेखक, इंटेश्वर कुलकर्णी. ;)

माझ्या एका मित्राने मुलांची नावं 'दौहित्र' आणि 'द्वैपायन' अशी ठेवली आहेत !!!! गणपतीची नावं ही !

एका मैत्रिणीने मुलीचं नाव 'नीवा' ठेवलंय. म्हणजे काय माहीत नाही.

रियान या नावाचा अर्थ माहीत नाही. पण ओळखीत दोन रियान आहेत.

अन्या दातार's picture

20 Dec 2011 - 12:51 pm | अन्या दातार

ते दोन रियान मुले आहेत कि मुली?
जर मुले असतील तर कदाचित चेतन भगतच्या 5 Point Someone मधील Ryan या पात्रावरुन घेतले असल्याची शक्यता वाटते.

माझ्या मुलीचे नाव मी 'स्विनी' ठेवले आहे. जवळजवळ महीनाभर मी शोधाशोध करुन हे नाव ठरवले. पण मला या नावाबद्दल अगदी भिन्न प्रतिक्रिया मिळतात. काहीजणांना नाव खूप आवडते तर काहींना अजिबात आवडत नाही

शाहिर's picture

20 Dec 2011 - 6:30 pm | शाहिर

मंजे ?
मन स्विनी
तेज स्विनी
पण नुसतच स्विनी?

हो, नुसतंच स्विनी. गुगलवर अर्थ बघा या नावाचा.

शाहिर's picture

20 Dec 2011 - 6:50 pm | शाहिर

meaning of swini असा सर्च केला

पहिली लिंक

http://wiki.answers.com/Q/What_is_the_meaning_of_marathi_word_swini आली
त्यात जे अभिप्रेत आहे तेच म्हणायचे आहे का ?

http://www.wordaz.com/swini.html कि या मधे काही आहे ?

तुम्ही नाव ठेवलतं म्हणून तुम्हाला विचारला तर गूगल करा म्हणे..

गूगल ने १० पर्याय सांगितले तर त्या मधला कुठला समजायचा ??

गणपा's picture

20 Dec 2011 - 8:04 pm | गणपा

तुम्ही नाव ठेवलतं म्हणून तुम्हाला विचारला तर गूगल करा म्हणे..

गूगल ने १० पर्याय सांगितले तर त्या मधला कुठला समजायचा ??

=))

अन्या दातार's picture

20 Dec 2011 - 8:07 pm | अन्या दातार

सोप्पय. जो पर्याय तुम्हाला आवडेल अथवा चांगला वाटेल तो पर्याय निवडायचा. त्याच अर्थाने ठेवले असेल नाव असं समजायचं. हाकानाका
दरवेळेस मुळाशी जाऊन कशाला दुसर्‍याची मते विचारायची? ;)

नर्मदेतला गोटा's picture

23 Dec 2011 - 12:05 am | नर्मदेतला गोटा

अथर्व आणि पार्थ हे राहीलं होतं.

एक पार्थो कुलकर्णी नावाचा छोटा मुलगाही पाहिला होता

वपाडाव's picture

23 Dec 2011 - 2:10 pm | वपाडाव

मी पाचवीत असताना माझ्या कॉलनीत ८-१० शुभम जन्माला आले.....
तसेच गुजरातेत, माझ्या मित्राच्या बायकोचे नाव विलास असे ऐकले होते....
काही मराठी नावे जे मुले अन मुली दोहोंमध्ये आढळतात
प्रितम, स्नेहल, किरण, शीतल

शाहिर's picture

23 Dec 2011 - 6:23 pm | शाहिर

मगधीरा मधलं हे नाव आवडला आहे...

किसन शिंदे's picture

24 Dec 2011 - 3:12 pm | किसन शिंदे

२००० साली कहो ना प्यार है रिली झाल्यानंतर बर्‍याच नवजात बालकांची नाव रितिक, रितेश, ह्रितिक अशी ठेवण्यात आली होती.

नर्मदेतला गोटा's picture

16 Apr 2014 - 1:00 pm | नर्मदेतला गोटा

आणिक एक ऑब्झर्वेशन
'ओवी' नाव असेल तर आडनाव कुलकर्णीच असलं पाहीजे

वामन देशमुख's picture

17 Apr 2014 - 2:33 pm | वामन देशमुख

अवो नाय वो,
मला एक वोवी द्येसमुक म्हाईत हाय... आन त्यी मईच मुल्गी हाय! काय म्हंता?

योगी९००'s picture

16 Apr 2014 - 2:52 pm | योगी९००

नैवेद्य नाव कसे वाटते...? अजून तरी ऐकले नाही...

जनरली मुलांची नावे 'अ'कारान्त असतात. म्हणजे शेवटी 'अ' असते.. (योगे, विजसुनी वगैरे..) व मुलींची नावे 'आ' किंवा 'ई" कारान्त असतात. (क्षमा, स्मिता, दामिनी, पल्लवी,)..

याला काही अपवाद आहेत का..?
उदा : मुलांची नावे - अश्वत्थामा - आकारान्त.. (दक्षिण भारतीय नावे मणी, मुथ्थू वगैरे ईकारान्त)
मुलींची नावे - सुमन्,विमल, कमल - अकारान्त

>>जनरली मुलांची नावे 'अ'कारान्त असतात. म्हणजे शेवटी 'अ' असते..याला काही अपवाद आहेत का..?

येस !! इ अम ओने ओफ थे अपवाद्स!!

हल्लीची नावे मुलींची :अरीयाना,इशायना,अलीना ,सनाया
अर्णव हे सुध्धा मध्ये खूप प्रसिद्ध झालेले नाव ...

पैसा's picture

17 Apr 2014 - 12:52 pm | पैसा

अर्णव तरी ठीक आहे. अलीना हे माझ्या माहितीत ख्रिश्चन नाव आहे. मात्र लीना च्या विरुद्धार्थी अलीना असं म्हणता येईल एखादेवेळी. पण अरीयाना, इशायना, सनाया ही नावं ऐकायला बरी वाटली तरी या शब्दांना काही अर्थ आहे असं वाटत नाही.

तुमचा अभिषेक's picture

16 Apr 2014 - 3:01 pm | तुमचा अभिषेक

सध्या अभिषेक, ऐश्वर्या, आर्या या नावांची चलती आहे

अभिषेक च्या सिनेमाला नाही पण नावाला उठाव आहे.

सध्या नाही हो, अगदी माझ्या जमान्यापासून. तसे अभिषेक बच्चन आणि माझ्या वयात फारसा फरक नसावा. कारण माझ्या आईच्या माहेरचे बिग बी अमिताभचे मोठेच फॅन. त्याने आपल्या मुलाचे नाव अभिषेक ठेवलेय असे समजताच माझेही नाव अभिषेक ठेवण्यात आले. पण चांगलेय नाव. हां आता काही जण त्याचा अभ्या किंवा लाडात येऊन अबड्या करतात, पण चलता है..

मी मात्र माझ्या मुलीचे नाव आराध्य ठेवण्याचे टाळले. तसे सुचवूनही झाले होते.

मार्मिक गोडसे's picture

16 Apr 2014 - 4:23 pm | मार्मिक गोडसे

माझ्या भाच्याचे नाव 'शिर्षक' भाचीचे 'प्राप्ती' पत्निचे 'दर्शिका'... नविन बंगल्याच्या नावाच्या शोधात आहे... सुचते का एखादे नविन नाव तुम्हाला?.... प्लीज 'सावली', 'कृपा', 'वीला'...इ. अशा प्रकारची नावे नको.

नाविन्याची आवड या सदराखाली अनेकदा नामकरण केले जाते आणि मग त्या पोराला किंवा पोरीला आयुष्यभर आपल्या नावाचा अर्थ दुनियेला सांगत बसावा लागतो.

मराठी नावंपुढे राव आणि भाऊ शोभते तसे गुजराथी नावांपुढे भाई.. हितेशभाई, रितेशभाई या ऐवजी हितेशराव, रितेशराव म्हणून चालणार नाही..

तशी प्रत्येक काळात काही नावे नव्याने जोर धरतात. पालकही फारसा विचार न करता पुढे आपल्या दिवट्याला राव वगैरे संबोधले जाऊ शकते अशी शंकाही मनात न आणता काहीतरी काव्यात्मक नाव ठेवतात आणि पुढे गोची होते.

आमच्या पिढीमधे विजय, विकास, विलास, प्रकाश अशी सुटसुटीत नावे ठेवणार्‍या पालकांचे कौतुक आज करावेसे वाटते. आता हे सगळे विजयराव, प्रकाशराव, विलासराव म्हणून मिरवतात...

आमचेच नाव मंदार ठेवायचा अट्टाहास कुणी केला माहीत नाही पण मंदारराव हे काही जमत नाही हे मात्र नक्की.

यसवायजी's picture

16 Apr 2014 - 5:00 pm | यसवायजी

एकाचं नाव होतं 'सहज'. म्हटलं काय पुढच्या पोरांची नावं 'उगाच' आणी 'मुद्दाम' ठेवणार??
हल्ली 'आरव' नाव ठेवतात. मला फक्त कोंबडं आरवतं एवढच माहित होतं.

बॅटमॅन's picture

16 Apr 2014 - 5:04 pm | बॅटमॅन

=))

कैच्याकै नावं अस्तेत राव, एकदा एका पोरीचं नाव दशमी ठेवल्यावरचा किस्सा जालावरच वाचलेला. म्ह. एक आज्जीबै म्हंटात की इवागं हुडगीऔरदु येन गोत्तागिल्लवा, हुडगी हेसर दशमी इडतारं मत्तेनु भक्री इडिबौदु काणसतदं =))

अर्थात "आज दशमी नाव ठेवलंय, उद्या काय भाकरी नाव ठेवतील" =))

एक्ष्प्लनतिओन निनसलवागी इल्ला इदु बेरे हेळबारदु. बाकी मंदिसलवागि.

तळटीप- आध्यात्मिक लोकांनी हा व्हिडीओ पाहू नये.

सूड's picture

12 May 2014 - 3:56 pm | सूड

झालं ह्यांचं सुरु...छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे ढिशक्यांव ढिशक्यांव ढिशक्यांव *dash1*

बॅटमॅन's picture

12 May 2014 - 5:11 pm | बॅटमॅन

*mosking*

बाकी आरव च्या बाबतीत सहमत !!

मुलाचं नाव ठेवावं की नाही हे ठाऊक नाही मात्र आरव म्हणजे अरण्य.
>>> चला कल्पतरुंचे 'आरव'

मार्मिक गोडसे's picture

16 Apr 2014 - 5:07 pm | मार्मिक गोडसे

दूरदर्शनवर एका कार्यक्रमाच्या नामावलीत 'आमदार निवास' हे नाव असे.

अजुन काही सध्याची प्रचलित नावे :

काव्या , सान्वी , अनिका , रिया , ईशिता
अर्णव , आर्यन , ईशान , आयुष

ओळखीतल्या मुलांची काही थोडी वेगळी चांगली नावे-

कुशाग्र , अगस्त्य , आदितेय , अद्वितीय , विद्वत, सोहम
तरुषी / तरुशी , भार्गवी , मोतिका , सिया , आर्षीया, संघमित्रा, निलांगी, स्वराली

एका ओळखीतल्या कृष्णभक्ताने मुलाचे नाव वृन्दावन असे ठेवले आहे. आणि एका मित्राने त्याच्या मुलाचे नाव किन्नर ठेवले आहे.

गोडसेजी , घरासाठी : सृष्टी , गोकुळ , इन्द्रधनु ,निरंजन (pure या अर्थी ), शान्ति , परम , अनमोल , दर्पण , वसंत
बाकी तुमची आवड , घरा संदर्भात , कुटुंबीयांसंदर्भात तुमचे विचार, भावना समजल्यास नाव सुचवणे सोपे जाईल

पैसा's picture

17 Apr 2014 - 12:47 pm | पैसा

किन्नर?

नाय म्हणजे त्याचा उद्देश चांगला असेल, पण या संबोधनाला जो अर्थ चिकटलाय तो पहाता.... हम्म...

मला आहुत हे मुलाचे नाव फार आवडते. कधी ऐकले नाही कोणाचे पण तरीही.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Apr 2014 - 3:26 pm | अत्रुप्त आत्मा

@आहुत हे मुलाचे नाव फार आवडते.>>> आ'हुत- मंजे काय म्हायत्यै का??? :D
यज्ञात टाकण्यासाठी निवडलेला(पदार्थ)! =)) जो अजुन हुत-झालेला नाही..पण लवकरच होणार-आहे..असा!

अर्थ माहित न करून घेता "ठेवलेल्या" नावांची अवस्था..असा नविन लेख पाडावा काय??? =))
कॉलिंग- खाटुकमॅन!!! :D

गुर्जी आहुती शब्दाचा अर्थ मला माहीत आहे. पण कार्तिकस्वामीचे एक नाव आहे - आहुत. त्यामुळे मला ते आवडते.

शुचि's picture

17 Apr 2014 - 7:37 pm | शुचि

हे बघा -

गंगासुतश्शरोद्भूत आहूतः पावकात्मजः |
जॄम्भः प्रजॄम्भः उज्जॄम्भः कमलासन संस्तुतः ||६||

अत्रुप्त आत्मा's picture

17 Apr 2014 - 7:56 pm | अत्रुप्त आत्मा

ठिक आहे..पण तो ही जो "आहूत" आहे ना,तो "पावकात्मज" आहे. पावक हे अग्निला विशिष्ट वेळी देण्यात येणारं एक उपमानच आहे. मंजे फिरून गाडी परत भोपळे चौकातच!
असो...माझं म्हणणं एव्हढच आहे,की कोणतंही नाव ठेवताना ते फक्त ऐकायला छान वाटतं,म्हणून ठेऊ नये..आणि विशेषतः संस्कृतीतली नावं निवडताना,त्यातला शब्दार्थ/मतितार्थ/आणि संस्कृतीत दडलेला अर्थही (आधी) पहावा. एव्हढच माझं म्हणणं आहे. :)

होय मान्य आहे की अग्नीशी संबंधीतच वर्णन/नाव आहे. कार्तिकस्वामीच्या प्रेमापोटी ते नाव आवडते इतकेच :)

अत्रुप्त आत्मा's picture

17 Apr 2014 - 8:04 pm | अत्रुप्त आत्मा

:)

माझ्या मित्राचे नाव त्याच्या वडिलांनी "सम्राट" असे ठेवले आहे. कारण वडिलांचे नाव अशोक आहे. आणि आडनाव कांबळे.
संपूर्ण नाव - सम्राट अशोक कांबळे.

Rose Mary Marlo असे पण एक नाव आहे

अव्यक्त's picture

17 Apr 2014 - 4:49 am | अव्यक्त

मी माझ्या भावाच्या मुलाचे नाव "शौनक" ठेवले आहे… शौनक हे ऋषी होवून गेले त्याचप्रमाणे शौनक अभिषेकी हे शास्त्रीय गायक तसेच गानसूर्य जितेंद्र अभिषेकी यांचे पुत्र म्हणून प्रसिद्ध आहेत... एवडेच नाम महात्म्य आहे काय ? ह्या व्यतिरिक्त शौनक चे जास्तीत जास्त अर्थ कोणाला माहित असतील तर इत्थे उधृत करावे…. जेणे करून ज्ञानात भर पडेल… धन्यवाद....

प्रमोद देर्देकर's picture

17 Apr 2014 - 10:22 am | प्रमोद देर्देकर

@ पकपकपक :- ओघळवरुन हहपुवा लागली.

लोक कय कैच्याकै अर्थ माहिती नसताना सुध्दा नावे ठेवुन मोकळी होतात. काही नावे उगाचंच जसे नवरर्‍याने लग्नानंतर त्याच्या नावा प्रमाणे असावे म्हणुन (विनोद्=विनोदिनी) ओढौन ताणुन बनवलेली असतात.
कोणी आपल्या मुलाचे नाव पार्थिव कसे ठेवु शकतो.

मराठ्यांमध्ये १९८०/९० च्या दशकात संतोष, राजु , संदिप ही नावे जास्त प्रचलित होती. माझ्या पुर्वीच्या एका कंपनीत ७ संतोष, ३ राजु होते. बाकी योगी ९०० यांनी सांगितल्या प्रमाणे अथर्व, सार्थक आणि आर्या त्याच्या जोडीला सोहम ही हल्लीची कॉमन नावे दुरदर्शनवरिल मालिकांमुळे जास्त प्रचलित झालेली पाहायला मिळतात.
नावापुढे "अ" विसर्ग लागला की त्याचा अर्थ बदलतो तरी सुध्दा ती नावे कशी काय ठेवतात कोण जाणे
जसे अनामिका = म्हणजे ज्या गोष्टीला काही नाव नाही असा सर्व साधारण अर्थ.

नावाच्या बाबतीत गुजाराती लोक काही वैशीष्ठेपुर्ण नावे ठेवतात.
त्यावरुन एक किस्सा:-
एका गुज्जुने आपल्या मुलीचे नांव इच्छा ठेवले होते. एके दिवशी तो घरी कामावरुन लवकर आला.
त्याला वाटले आलोच आहोत तर मुलीला जरा स्कुटरवरुन फिरवुन आणु म्हणुन घराच्या फाटकापाशीच गाडी उभी करुन बायकोला मोठ्याने विचारतो " अजी सांभळ (म्हणजे ऐक), इच्छा छे? ती परसदारी काम करत होती तिथुनच जोरात ओरडली "नथी, इच्छा नथी"
आणि सारा मोहल्ला जोरात हसला.

दिव्यश्री's picture

17 Apr 2014 - 12:57 pm | दिव्यश्री

माझ्या माहितीत एकीचे नाव आहे लिपी :)

वामन देशमुख's picture

17 Apr 2014 - 2:35 pm | वामन देशमुख

माझ्या माहितीत एकीचे नाव आहे लिपिका!

चांगले आहे मग... तिच्या भावी पतिचे नाव 'अंक' ठेवा.

अंक + लिपी = अंकलिपी.

दिव्यश्री's picture

17 Apr 2014 - 4:03 pm | दिव्यश्री

नाय ओ आल्रेडी लगीन झालंय . मला वाटत ती गुज्जू आहे . हतच हाय फारिनला म्हून म्हायती मला . ;) :D

अत्रुप्त आत्मा's picture

17 Apr 2014 - 7:35 pm | अत्रुप्त आत्मा

@तिच्या भावी पतिचे नाव 'अंक' ठेवा.>>> नको..नको..अंक नको.त्यापेक्षा याचे नाव लिपिक, असे ठेवा. :D
मंजे मग लिपिका+लिपिक = अहवाल! =))

लिपिका+लिपिक = अहवाल!

=)) =)) =))

मुलगा झाला की तो लगेच ज्यु.लिपिक होईल!

माधुरी विनायक's picture

17 Apr 2014 - 3:44 pm | माधुरी विनायक

नाम महिमा अगाध आहे... परिचयातल्या एका मुलाचं नाव तर्पण... तर्पण???

मदनबाण's picture

17 Apr 2014 - 3:56 pm | मदनबाण

आई {स्मिता}+ बाबा {अनिल} :- मुलाचे नाव {स्मिनिल}

आमच्या शाळेत एकदा बाईंनी एका मुला विचारले होते, नक्की तुझे नाव "प्रणय" आहे का ? की प्रणव ? तो म्हणाला प्रणय. त्यावर त्या म्हण्याल्या होत्या स्त्री-पुरुषांच्या प्रेम संबंधाला प्रणय म्हणतात.{आमचं बालमन लगेच मॉडिफाय झालं बघा ! ;) }

दिव्यश्री's picture

17 Apr 2014 - 3:58 pm | दिव्यश्री

आत्ताच वाचाल मधुजा . आवडल . :)

तर्पण??? >>> ??????????????????

प्यारे१'s picture

17 Apr 2014 - 4:15 pm | प्यारे१

समिधा असतंय खरं. पण तर्पण? अरेरे.

माणूस मेल्यावर त्याच्या (शक्यतो) मुलानं करंगळीशेजारच्या बोटात गवताची काडी अंगठीसारखी गुंडाळून उजव्या (की डाव्या) हाताच्या अंगठ्यावरुन पिंडावर पाणी सोडण्याला तर्पण म्हणतात.

मदनबाण's picture

17 Apr 2014 - 4:24 pm | मदनबाण

कैच्या कै नावं ठेवतात तिच्यामारी ! मानव हे नाव सुद्धा मला काही तितकेसे आवडले नव्हते. हा मानव मग ह्याचे आई-बाबा काय आदिमानव का ?
माझ्या एका जुन्या चीनी क्लायंट साईडच्या एका बै चे नाव होते :- मेरी मा. ;)

जाता जाता :- जर तुम्हाला अल्टिमेट नाव आणि आजच्या काळात पटकन सहज न ऐकायला मिळणार नाव असेल तर चांदोबा वाचा. ;)

भरपुर अवांतर :- मी माझ्या पिल्लाला प्रेमाने "कोको" हाक मारतो. {कोको:- कोवळे कोकरु} :)

दिव्यश्री's picture

17 Apr 2014 - 4:28 pm | दिव्यश्री

आदिमानव का ? >>> :D