आता खेळाडूंनाही मिळणार 'भारतरत्न पुरस्कार'
'सचिनचा भारतरत्नचा मार्ग मोकळा'
वाचून कुणालाही आनंद होइल अशी बातमी आहे.
नीट विचार केला पाहिजे. एका सचिनसाठी ही नियमांची मोडतोड आहे का !
सध्या सरकार कठीण परिस्थितीतून जाते आहे. काही ज्येष्ठ मंत्री
करोडो पैसे खाण्यामुळे अडचणीत आले आहेत.(करोडो पैसे यावर भंपक वाद नको)
एकूणच जनतेमधे रोष आहे.
त्यामुळे जनतेला खूष करण्यासाठी तर हा खटाटोप नव्हे ना असा विचार मनात येतो.
याची दुसरी बाजू 'आजवर खेळाडू यामधे समाविष्ट का नव्हते' याचाही विचार झाला पाहिजे.
'भारतरत्न' पुरस्कार अशा व्यक्तीला दिला जातो ज्या व्यक्तीचा देशाच्या उभारणीमध्ये
प्रगतीमधे मोठा वाटा आहे.
आजवरच्या यादीवर नजर टाकली तर हे सहज पटण्यासारखे आहे.
खेळाच्या क्षेत्रात काम करणार्या व्यक्तीला खेलरत्न दिला जातो.
भारतीय चित्रपटाच्या क्षेत्रात भरीव काम करणार्या कलाकाराला 'दादासाहेब फाळके पुरस्कार' दिला जातो.
पण आपल्या क्षेत्राचे कुंपण ओलांडून या लोकांचे देशासाठी नेमके योगदान काय असाही एक प्रश्न डोकावतो
भारतरत्नच्या बाबतीत सचिन, शाहरुख, सलमान यांचे योगदान सारखेच
सचिनला दिले तर मग शाहरुख, सलमान यांना का नको असाही एक प्रश्न पडतो.
सचिन क्रिकेट खेळतो तेव्हा सारा भारत आपली कामेधामे सोडून त्याचा खेळ बघायला बसतो
सचिनच्या षटकारावर आकाशात देवसुद्धा डोलतो. क्षणभर म्हणूया सचिन देवच आहे पण तो क्रिकेटपुरता. त्याच्यापलिकडे काय...
त्यालाही अधिक पैसा देणारा प्रायोजक हवा असतो, टॅक्स कसा वाचवावा
काय पळवाटा शोधाव्या असा प्रश्न त्यालाही पडतो.
त्यामुळे
स्वतः गरीब राहून समाजाला श्रीमंत करणारे 'महर्षि' जेव्हा भारतरत्नच्या पंक्तीत जाऊन बसतात तेव्हा भारतीय मनाला खरा आनंद होतो
धन्यवाद !
प्रतिक्रिया
17 Dec 2011 - 9:40 pm | पक पक पक
यंदा भारतरत्न किताबावर अण्णा हजारे दावा लावतील ह्या भितीनेच कदाचित .................?
17 Dec 2011 - 9:53 pm | विश्वनाथ मेहेंदळे
हा तर्क काही खास पटला नाही. भारत रत्न वार्षिक अवार्ड आहे का ? विकीपीडीया प्रमाणे १९९९ साली दोन विजेते दिसत आहेत. आणि अण्णांना मिळायचे असेल तर ते पुढे पण मिळेल. प्रत्येक गोष्टीत conspiracy शोधायची खरच गरज आहे का ?
17 Dec 2011 - 10:19 pm | पक पक पक
तर्क वगैरे काहि नाहि हो...कुणाला किती डोक्यावर बसवायच ?खेळा साठी देण्यात येणारे पुरस्कार द्या खेळाडुंना ,भारतरत्न पुरस्कारा बाबत म्हणाल तर फक्त सचिनच का येतो समोर खेळाडू म्हणुन?
23 Dec 2011 - 11:41 am | llपुण्याचे पेशवेll
http://www.firstpost.com/living/awards-for-amartya-bharat-ratna-for-sach...
17 Dec 2011 - 9:46 pm | पैसा
भारतरत्नच्या यादीत काही वर्षांनी मॅच फिक्सिंगमधे सापडलेले लोक दिसले तरी आश्चर्य वाटायला नको. क्रिकेट ही सध्या सगळ्यात मोठी पैशांची उलाढाल होणारी 'इंडस्ट्री' असावी. त्यापुढे भारताच्या उभारणीसाठी काम करणारे उद्योगपती ते काय!
असो. सचिनने स्वतःच आपल्याला भारतरत्न मिळावे अशी इच्छा एकदा व्यक्त केली होती, त्याला आता भारत्रत्न मिळण्यासाठी शुभेच्छा!
17 Dec 2011 - 11:07 pm | अशोक पतिल
काहीहि असो पण सचीन, भारतरत्ना साठी सर्वोत्तम निवड आहे. त्याचा सारखा समर्पित, शालिन दुसरा खेळाडू कदाचितच असेल.
18 Dec 2011 - 8:30 pm | चिंतामणी
खेळाडुंसाठी खेलरत्न पुरस्कार आहेच.
द्यायचा झालाच तर मरणोत्तर मे. ध्यानचंद आणि खाशाबा जाधव यांना द्यावा.
या पुरस्कारासाठी वर्तमानात विश्वनाथन आनंद हा सचीनपेक्षा जास्त योग्य खेळाडु आहे.
(क्रिकेट किती देशात खेळतात आणि बुध्दिबळ किती देशात खेळतात याची माहिती घ्या.)
17 Dec 2011 - 11:11 pm | मराठी_माणूस
'भारतरत्न' पुरस्कार अशा व्यक्तीला दिला जातो ज्या व्यक्तीचा देशाच्या उभारणीमध्ये
प्रगतीमधे मोठा वाटा आहे.
सहमत
19 Dec 2011 - 2:36 pm | परिकथेतील राजकुमार
काय सांगताय काय ? च्यायला ! ऐकावे ते नवलच.
आम्ही का नाही, इतिहासात हा 'भारतरत्न' पुरस्कार एकदा 'खान अब्दुल गफार खान' ह्यांना आणि एकदा 'नेल्सन मंडेलांना' दिल्याचे अभ्यासले होते बॉ.
ह्यावेळी हा पुरस्कार ज्युलिअस असांजे ह्यांना द्यावा अशी मागणी आम्ही करत आहोत. (ह्या पुरस्काराने खुश होऊन ते काळ्या पैशेवाल्यांची यादी जाहिर करणार नाहीत आणि एका दगडात दोन पक्षी देखील मारले जातील.)
भारतीय व्यक्ती हवी असल्यास आम्ही विजय मल्ल्यांचे नाव सूचवतो.
धन्यवाद.
19 Dec 2011 - 2:45 pm | जे.पी.मॉर्गन
असं असेल तर एम एस सुब्बलक्ष्मी, पं. रविशंकर, उ. बिस्मिल्लाह खान, लता मंगेशकर आणि पं. भीमसेन जोशी ह्यांचा "देशाच्या उभारणीमघ्ये आणि प्रगतीमध्ये" काय वाटा आहे ते पण कळूद्या !
जे पी
19 Dec 2011 - 9:33 pm | विजुभाऊ
इतिहासात हा 'भारतरत्न' पुरस्कार एकदा 'खान अब्दुल गफार खान' ह्यांना
खान अब्दुल गफारखान यानी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. अफगाण सरहद्दीवर त्यानी स्वातंत्रासाठी मोठी जनजागृती केली होती. ते स्वतः फाळणीच्या विरोधात होते.
त्यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान प रा काकानी लक्षात घ्यावे आणि मगच सरहद्द गांधी खान अब्दुल गफारखान यांच्याबद्दल काही वावगे बोलावे.
श्री श्री श्री रा रा परा यानी एम जी आर याना भारतरत्न मिळाला त्याबद्दल काही लिहीले असते तर ते मान्य केले असते इतिहासाबद्दलची अपूरी माहिती यामुळे अशी चूक्ल झाली असावी. पण ती क्षम्य मात्र नाही.
17 Dec 2011 - 11:19 pm | पक पक पक
असहमत आहे.
17 Dec 2011 - 11:28 pm | फारएन्ड
यातून का वगळले होते याची माहिती मिळाली नाही. काही खास कारण नसावे.
सचिनला जरूर द्यावे पण रिटायर झाल्यावर. खेळाडूंना देणे सुरू करताना हॉकीपटू ध्यानचंद यांना पहिले घोषित व्हावे हे जास्त उचित आहे.
सचिनच्या लोकप्रियतेशी एक अमिताभ सोडला तर इतर कोणत्याही अभिनेत्याची तुलना होऊ शकत नाही. भारतात इतका पब्लिक सपोर्ट इतर कोणालाच नाही.
20 Dec 2011 - 12:24 pm | मैत्र
+११११
अमिताभला अजून पद्म विभूषणही देण्यात आलेले नाही. वय वर्षे ६८.. इतर काही सांगण्याची गरज नाही..
18 Dec 2011 - 9:45 am | ५० फक्त
अजिबात देउ नये, पैशापेक्षा देश अन खेळ मोठा न मानणा-या कोणत्याही खेळाडुला भारत रत्न काय कोणताच पुरस्कार दिला जाउ नये, काही दिवसापुर्वी विरेंद्र सहवागच्या धाग्यावर सैनिक आणि खेळाडु अशी तुलना केली गेली होती, मग या न्यायाने कै. रमण लांबा यास मरणोत्तर परमवीर चक्र द्या अशी मागणी करता येईल.
सचिनच काय किंवा इतर कोणीही खेळाडु भारतरत्न देण्याच्या लायकिचे नाहीत, अगदी प्राचीन काळापासुन खेळ हे कोणत्याही समाजाच्या किंवा राज्याच्या किंवा देशाच्या प्रगतीचे आधार नाहीत, सगळ्यांनी आपली नित्य कामे धामे उरकल्यानंतर केली जाणारी करमणुक आहे, आणि ती सुद्धा जी विकली जाते, विकत घेतली जाते. सचिन बद्द्लच बोलायचं झालं तर गेल्या काही वर्षात क्रिकेट्चं पुर्ण जगच फिक्सिंगच्या भानगडीतुन जातंय, ह्याची त्या बिचा-या सोज्वळ सात्विक सच्चुला काही कल्पनाच नाही असा दावा जर कोणी करत असेल तर त्या मुर्खपणाला शतशः नमन. या सगळ्या फिक्सिंग घोटाळ्याचा तो एक मुक साक्षिदार आहे आणि गुन्हा घडत असताना तो घडु नये याबद्दल काही न करणे म्हणजेच गुन्ह्याला मदत करणे असते.
'''भारतरत्न' पुरस्कार अशा व्यक्तीला दिला जातो ज्या व्यक्तीचा देशाच्या उभारणीमध्ये प्रगतीमधे मोठा वाटा आहे.'' या एकाच स्टेटमेंटवर सचिन काय किंवा इतर कोणत्याही खेळाडुची भारतरत्न मिळण्यासाठीची लायकी निसंशय आणि संपुर्णपणे सिद्ध करुन दाखवावी,
पण अगदी हट्टाने यादीच करायची असेल तर, वर म्हणल्याप्रमाणे मा. ध्यानचंद, गीत सेठी, विश्वनाथन आनंद, बायचंग भुटिया, धनराज पिल्ले, लिअँडर पेस, महेश भुपती, कपिल देव, सुनिल गावसकर, दारासिंग, खाशाबा जाधव , अशी बरीच आणि मोठ मोठी नावं सचिनच्या आधी आहेत.
का उगी त्या पुरस्काराची किंमत कमी करताय, अजुन बरेच आहेत त्याच्या गुणवत्तेचे त्यांना राहु द्या तो.
18 Dec 2011 - 10:31 am | मिसळलेला काव्यप्रेमी
वाक्यावाक्याशी बाडीस!!
भारतरत्न काही खिरापत नव्हे. आणि एकूण घडामोडी पाहता ते आता खिरापत होणार हे नक्की!! :(
18 Dec 2011 - 11:10 am | पाषाणभेद
भारत देश एक मोठ्ठी चालणारी यष्टी आहे अन त्यात आपण सगळे बसलेलो आहोत, दुर्दैवानं त्या यष्टीला डायवर नाही!
18 Dec 2011 - 1:48 pm | शिल्पा ब
ये तो ट्रेलर हय पिच्चर तो अबी बाकी हय.
बाकी +१
18 Dec 2011 - 2:00 pm | सोत्रि
बास हेच लिहायला आलो होतो.
ज्यांनी कर वाचवण्यासाठी सरकारकडे याचना केली होती आणि तो कर द्यायची कुवत असुनसुद्धा दानत नसलेल्यांचा 'भारतरत्न' म्हणून सत्कार करण्याचा विचार करणे हाच मुळात मुर्खपणा आहे.
- ('मला भारतरत्न का मिळू नये' असा विचार करणारा) सोकाजी
18 Dec 2011 - 9:43 pm | पक पक पक
सोकाजिराव आयकर भरतात्,ते एकटेच नाहि तर सर्व मिपाकर आयकार भरत असावेत. त्या मुळे सर्व मिपा सद्स्यांना सामुदायिक भारतरत्न पुरस्कार का मिळु नये ?कारण आयकर भरुन आपणही देशाच्या उभारणीला हातभार लावतोच कि....
19 Dec 2011 - 12:35 pm | मृत्युन्जय
चुकीचा प्रतिवाद. करच्युकव्यांना भारतरत्न देउ नये असे म्हणताहेत ते. कर भरणार्यांना द्यावाच असे नाही.
उद्या दाऊदला भारतरत्न देउ नये असे कोणी म्हणाले तर ९५% भारतीय खुनी / दहशतवादी नाहीत म्हणुन त्यांना द्यावे असा त्याचा अर्थ होत नाही. (दाउद आणि सचिनची तुलना करत नाही आहे. गैरसमज नकोत. मी फक्त एक उदाहरण दिले)
19 Dec 2011 - 6:18 pm | पक पक पक
करच्युकव्यांना भारतरत्न देउ नये असे म्हणताहेत ते. कर भरणार्यांना द्यावाच असे नाही.
अहो साहेब सोकाजिराव यांनी विचारल आहे कि त्यांना भारतरत्न का मिळु नये ? निट वाचा न जरा......
20 Dec 2011 - 1:06 pm | मृत्युन्जय
त्यांना का मिळु नये हा प्रश्न त्यांनी ते कर भरतात म्हणुन मिळावा या अर्थाने विचारलेले नाही तर भारतरत्न मिळण्यासाठी काय निकष असावेत आणी मग त्यांना तो का मिळ्य नये या अर्थाने विचारले आहे.
18 Dec 2011 - 2:25 pm | दादा कोंडके
क्रिकेट आणि बॉलिवूड या शिवाय देशात खूप महत्वाचे प्रश्न आहेत.
18 Dec 2011 - 10:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सचिन क्रिकेटमधील देव असल्यामुळे आपण देवाविरुद्ध काहीही बोलणार नाही. देवाविरुद्ध बोललं की संकेतस्थळावर लै प्रॉब्लेम निर्माण होतात. पण, आता खेळाडूंनाही भारतरत्न देणार आहेत असे म्हणतात त्यामुळे तुम्हाला आनंद झाला काय असं कोणी आपल्याला विचारलं तर आपण आनंद झाला नाही असे स्पष्ट सांगू.
-दिलीप बिरुटे
18 Dec 2011 - 11:30 am | प्रभाकर पेठकर
कोणालाही 'भारतरत्न' देण्याआधी नेमका आयकर भरला आहे का? ह्याचा तपास व्हावा.
खेळाडूंच्या मिळकतीवर 'सेवा कर' आकारला जातो का? कारण तेही आम जनतेचे मनोरंजन करण्याची सेवा करीत असतात.
'भारतरत्न' पुरस्कार देताना फक्त अव्यावसायिक कतृत्त्वाचाच विचार व्हावा असेही वाटते.
बाकी, माझ्या वाटण्याला सरकारदरबारी कोणी धूप घालीत नाहीत ह्याची मला कल्पना आहे.
18 Dec 2011 - 2:11 pm | कपिलमुनी
मेरी कोम ही सचिन पेक्षा नक्कीच अधिक पात्र आहे ..
पण सध्या ओरडेल तेच खपायचे दिवस आहेत..मीडिया सचिनचा जयघोष करणार ..राजकारणी बळी पडणार..
पण रीटायरमेंट घेतल्याशिवाय पुरस्कार देवु नये..
18 Dec 2011 - 4:06 pm | अमित
आज जर भारतरत्न दिले आणी उद्याच्या एखाद्या मॅच मधे 'भारतरत्न' फेल गेले तर हो?
थांबा की जरा....
18 Dec 2011 - 11:41 pm | ५० फक्त
प्रचंड आवडलेला प्रतिसाद.
19 Dec 2011 - 8:21 am | फारएन्ड
विनोद कळाला :), पण जिवंत असताना दिलेल्या प्रत्येक पुरस्काराबाबत हे लागू आहे. ७१ साली इंदिरा गांधींना दिले, तेव्हा सर्वांचाच पाठिंबा मिळाला असेल. पण मग १९७५ च्या पुढे जे झाले त्यापेक्षा एका मॅच मधे फेल जाणे काहीच नाही :)
19 Dec 2011 - 9:25 am | चिंतामणी
७१ साली इंदिरा गांधींना दिले.
कोणी दिले???
केंद्रसरकार शिफारस करणार आणि जाहीर करणार.
इंदिरा गांधीं स्वतःच पंतप्रधान होत्या त्यावेळी.
18 Dec 2011 - 4:25 pm | विजय_आंग्रे
सचिनला भारतरत्न अरे....वा
:beer:
:beer:
18 Dec 2011 - 7:03 pm | पक पक पक
हा भाउ अशी काहि सोय होणार असेल तर सचिनला भारतरत्नच काय नोबेल पारितोषिक द्यायला पण काहि हरकत नाहि आमचि...आपल्याला काय खुषी हो या गम हरदम पियो रम.....
18 Dec 2011 - 8:25 pm | चिंतामणी
जनतेला खूष करण्यासाठी तर हा खटाटोप नव्हे ना असा विचार मनात येतो.
'भारतरत्न' पुरस्कार अशा व्यक्तीला दिला जातो ज्या व्यक्तीचा देशाच्या उभारणीमध्ये
प्रगतीमधे मोठा वाटा आहे.
खेळाच्या क्षेत्रात काम करणार्या व्यक्तीला खेलरत्न दिला जातो.
भारतीय चित्रपटाच्या क्षेत्रात भरीव काम करणार्या कलाकाराला 'दादासाहेब फाळके पुरस्कार' दिला जातो.
पण आपल्या क्षेत्राचे कुंपण ओलांडून या लोकांचे देशासाठी नेमके योगदान काय असाही एक प्रश्न डोकावतो
क्षणभर म्हणूया सचिन देवच आहे पण तो क्रिकेटपुरता.
सहमत.
19 Dec 2011 - 12:05 am | आत्मशून्य
बहुतांश मिपाकर या पुरस्काराला पात्र आहेत हे मात्र आपलं प्रांजळ मत आहे.. याबाबतही मार्ग अजुन मोकळा कर्ता यील काय ?
19 Dec 2011 - 8:04 am | पाषाणभेद
प्रिंस राहूल यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहीजे अशी मागणी आम्ही "चार्मिंग प्रिंस राहूल फॅन क्लब (काँ. प्रणित)" करतो आहोत. त्यांनी गरीबांच्या घरात जेवण घेतले, लोकलने प्रवास केला. अशा कष्टांचे काही पुरस्कारात रुपांतर व्ह्यायला हवे.
काही बिग अभिनेत्यांचेही नावं या पुरस्कारासाठी सुचवल्या गेल्याचे कानावर आले आहे. तशा परिस्थितीत हेलनजी, राखी (सावंत)जी, मल्लीकाजी, ऐश्वर्याजी, प्राणजी, राजेशजी, दिलीपजी, देवजी, अक्षयजी, सुनीलजी, जितेंद्रजी, विद्याजी, सिक्लजी, एकताजी आदिंनाही या पुरस्कारापासून वंचित करू नये. रजनीजींचे नाव मुद्दाम घेतले नाही. त्यांना विश्वरत्न पुरस्कारासाठी मानांकित केले आहे.
19 Dec 2011 - 12:14 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
पाभेंचा प्रतिसाद, सुप्पर लाईक करण्यात आला गेला आहे. :D
19 Dec 2011 - 1:23 pm | मैत्र
भारतरत्न ही एकच बाब त्या मानाने स्वच्छ राहिलेली आहे...तेवढी तरी राहू द्या. खेळाडूंना द्यायला सुरुवात केली की सगळा क्रीडा खात्याचा भ्रष्टाचार या वाटेला येईल...
तसेही यापूर्वी पुष्कळ विनोद सरकारने केले आहेत --
राजीव गांधी, मोरारजी देसाई आणि वल्लभभाई पटेल यांना एकाच वर्षी भारतरत्न देणे... म्हणजे ज्येष्ठता , काम याचा काही संदर्भच नाही..
बोर्डोलोई १९५० मध्ये गेले. भारतरत्न १९९९ मध्ये ..
बाबासाहेबांना भारतरत्न दिले १९९० मध्ये. -- मला वाटतंय ते जनता दल सरकारमुळे मिळालं असावं..
पद्मश्री तर आल्या गेल्याला मिळतं. अक्षय कुमार, करीना, सैफ आणी हृदयनाथ यांना बरोबर पद्मश्री मिळालेलं पाहून ड्वाळे पाणावले होते...
किमान भारतरत्नची 'गरिमा' टिकून राहावी अशी इच्छा आहे...
19 Dec 2011 - 2:04 pm | फारएन्ड
खेळाडूंना देण्यास सुरूवात केल्याने त्याची लेव्हल उतरेल असे का वाटते तुम्हाला? जोपर्यंत त्या क्षेत्रातील दिग्गजांना दिले जात आहे तोपर्यंत मूळ हेतूस धक्का लागत नाही.
तुमच्या विनोदांबद्दल सहमत - आंबेडकरांच्या आधी एमजी रामचन्द्रन यांना, व पटेलांच्या आधी राजीव गांधींना (माझ्या माहितीप्रमाणे एका वर्षी तीन जणांना देता येत असून) दिले गेले होते.
बाकी कलाक्षेत्रातील भीमसेन जोशी, लता, सुब्बालक्ष्मी इत्यादींनाही दिलेले आहे. आता फक्त कला आणि क्रीडा मधे एवढा भेदभाव का असा प्रश्न आहे.
सचिनच्या आधी ध्यानचंद यांना देण्याचे औचित्य आहेच. बाकी बरेचसे खेळाडू त्यांच्या नंतरचे आहेत. खुद्द सचिनलाही निवृत्त झाल्यावरच द्यावे हे माझे मत आहे.
19 Dec 2011 - 2:17 pm | मैत्र
खेळाडूंना देण्यास हरकत नाही. पण भारतरत्न हा खूप मोठा पुरस्कार आहे.
खाशाबा जाधव सुद्धा मानकरी ठरणार नाहीत ..
सचिन / कपिल एवढं खूप मोठं योगदान असेल तरच हा पुरस्कार द्यावा. इतर उत्तम खेळाडूंना खेलरत्न देऊन झालेलं आहे किंवा भविष्यात दिलं जाईल.. ध्यानचंद यांच्याव्यतिरिक्त कोणी मानकरी व्हावं असं वाटत नाही.
अर्थात पूर्वीचे सर्व राजकीय विजेते तेवढे थोर होते का नाही हा वादाचा मुद्दा आहे -- उदा. गुलझारिलाल नंदा, काही माजी राष्ट्रपती वगैरे.. स्व. राजीवजींबद्दल मला वैयक्तिक आदर आहे. खूप उत्तम कामे त्यांनी केली. पण भारतरत्न मिळावं इतकं मोठं कर्तृत्व होतं का ? म्हणजे बाबासाहेब / वल्लभभाई आणी राजीवजी यांच काम याची तुलना होऊ शकते का? तेवढं मोठं त्यांचं योगदान होतं का?
जर राजकीय बाजूला असं घडू शकतं तर क्रीडा खात्याचा इतिहास फार काही रिलायबल नाही त्यामुळे कलेबरोबर क्रीडा आल्यावर लेव्हल राहिल का अशी शंका वाटते.. भीमसेन जोशी, लता, सुब्बलक्ष्मी, बिस्मिल्ला खान यांच्या तोडीचं क्रीडा क्षेत्रात कोण आहे?
19 Dec 2011 - 2:43 pm | अन्या दातार
या धाग्यावर काही बोलायचे नाही असं ठरवले होते. पण हा प्रतिसाद बघितल्यावर रहावले नाही.
माझ्या काही बेसिक (बावळट) शंका आहेत. जाणकारांनी निरसन करावे.
१. क्रीडा प्रकाराने राष्ट्र उभारणी होत नसेल तर कला प्रकाराने तरी ती कशी काय बरे होते?
२. जर कलाकारांना फाळके पुरस्कार (जो भारतात सिने कलाकारांना दिला जाणारा सर्वोच्च समजला जातो) दिला जात असेल तर सिनेकलाकारांना भारतरत्न का दिला जावा? त्यांच्या वाटणिचा सर्वोच्च पुरस्कार त्यांना मिळतोच की
३.क्रीडा खात्याचा कारभार विश्वासार्ह नाही असं जे म्हणतात, तर कला खात्याबद्दल त्यांची भावना अत्यंत पवित्र आहे असे समजावे का? उद्या (खरंतर उद्या कशाला, आजही) कला खात्यात घोळ होणार नाही/होत नाही असे तुम्ही छातीठोकपणे म्हणू शकता काय?
भीमसेन जोशी, लता, सुब्बलक्ष्मी, बिस्मिल्ला खान यांच्या तोडीचं क्रीडा क्षेत्रात कोण आहे?
ही तुलना अनाठायी नाही का? तुलना एकाच क्षेत्राशी संबंधितांमध्ये होऊ शकते. भिन्न क्षेत्रातील व्यक्तींचे गुणावलोकन कशावरुन करायचे?
आज खेळाडूंचे Stats उपलब्ध आहेत म्हणून तुलना केली जाऊ लागली आहे. गायकांची तुलना कशी करावी? त्यांनी केलेल्या मैफिलींवरुन? नक्की बेस काय आहे याचा?
सचिनच्या शतकाची प्रतिक्षा आज प्रत्येक भारतीय करतो. तो खेळायला आला की बहुसंख्य लोक टीव्हीला चिकटून बसतात. कुछ तो बात है उसमे.
(सचिनला भारतरत्न मिळाला तर आनंदीच होईल असा) अन्या
20 Dec 2011 - 12:18 pm | मैत्र
गावसकरला पद्मभूषण देण्यात आलं आहे आणि कपिलदेवलाही ... कपिल हा Wisden Indian Cricketer of the Century ने भूषविला गेला आहे आणि गावसकर गेली काही वर्षे उत्तम काम करतो आहे. हे दोघेही ICC Cricket Hall of Fame मध्ये आहेत. त्यांना अजून पद्म विभूषण ही देण्यात आलेलं नाही आणि शक्यताही कमी आहे.
सचिन अतिशय आवडतो आणि त्याचे रेकॉर्डस हे जगात सर्वोत्तम आहेत म्हणून क्रीडा क्षेत्र भारत रत्न पुरस्कारात समाविष्ट करावं हा वादाचा मुद्दा आहे.
सचिनला २००८ मध्ये पद्म विभूषण देण्यात आलं आहे जो भारताचा दुसरा सर्वोच्च सन्मान आहे आणि सचिन व्यतिरिक्त क्रीडा क्षेत्रात फक्त विश्वनाथन आनंदला देण्यात आला आहे त्याच्या एकच वर्ष आधी २००७ मध्ये. मग आता रिटायरमेंटच्या आधीच संविधानात बदल करुन त्याला भारत रत्न देण्याची घाई करण्याची गरज नाही.
ही तुलना अनाठायी नाही का? तुलना एकाच क्षेत्राशी संबंधितांमध्ये होऊ शकते. भिन्न क्षेत्रातील व्यक्तींचे गुणावलोकन कशावरुन करायचे?
आज खेळाडूंचे Stats उपलब्ध आहेत म्हणून तुलना केली जाऊ लागली आहे. गायकांची तुलना कशी करावी? त्यांनी केलेल्या मैफिलींवरुन? नक्की बेस काय आहे याचा?
सचिन उत्तम आहे की नाही हा चर्चेचा मुद्दा नाहीये. आणि त्यामुळे इंग्लिश पद्धतिने प्रत्येक चेंडूचा हिशोब ठेवण्याचे रेकॉर्ड्स आणि जागतिक दर्जाच्या कलाकारांच्या मैफलींची संख्या इतकं सैल आणि अयोग्य तुलनात्मक मोजमाप वापरणं हेच चर्चा करण्याच्या पातळीचं नाही. त्यावर काहीही टिप्पणी करण्याची इच्छा नाही. http://www.misalpav.com/node/20128#comment-360355 हा प्रतिसाद सगळ्यात योग्य आहे या बाबतीत.
तुलनेचा मुद्दा एवढाच की सचिनला पुरस्कार देताना जो पायंडा पडतो आहे तो योग्य आहे का? सचिनला जर समजा दिलं तर कोण आहे या दर्जाचं. गावसकर कपिलचं उदाहरण देण्याचं कारण त्यांना अजून पद्म विभूषण ही दिलेलं नाही. इतर कोणी या जवळपासही नाहीत. बहुतेक पुरस्कार प्राप्त व्यक्तींना मरणोत्तर किंवा त्यांच्या कारकीर्दीच्या अगदी शेवटी त्यांचे एकूण योगदान म्हणून हा पुरस्कार दिला गेला आहे.
http://india.gov.in/myindia/myindia_frame.php?id=12 सरकारप्रमाणे कला, साहित्य आणि शास्त्र आणि पब्लिक सर्व्हिस हे विभाग आहेत त्यामुळे क्रीडा विभागाचा समावेश करण्यात हरकत नसावीच हेही तितकंच खरं.
आणि हो कला खातंच काय इतर कशाबद्दलही आपण सामान्य नागरिक काहीही खात्रिशीर पणे सांगू शकत नाही. पण क्रीडा खात्याचा इतिहास सर्वश्रूत आहे म्हणून एकासाठी कायदा बदलावा का हा मुद्दा येतो किंवा शंका येते.
आणि लता मंगेशकर आणि एम जी आर वगळता इतर कोणा सिनेकलाकारांना भारत रत्न दिलेले नाही.
(सचिनला योग्य वेळी भारत रत्न मिळाल्यास अधिक आनंदी) मैत्र
19 Dec 2011 - 2:15 pm | गवि
सचिनला आधीच जे काही स्थान लोकांकडून मिळालं आहे ते भारतरत्नच्याही वरचं आहे असं धाडसी वाटेलसं विधान करु इच्छितो.. सेम अॅप्लाईज टू लतादिदी.. भारतरत्न मिळाल्याने त्यांना अधिकचे काही मिळालेसे वाटू नये अशी उंची त्यांनी ऑलरेडी मिळवली होती.
(बाकी भारतरत्न "एसेमेस्"संख्येवरुन देण्याची पद्धत येण्याआधी मी इथून उचलला गेलो असीन तर सुदैव.. )
19 Dec 2011 - 2:58 pm | जे.पी.मॉर्गन
वरती प्रत्येकानंच आपली मतं मांडली आहेत. राष्ट्र उभारणी काय, अजून काही "जास्त पात्र" खेळाडू काय, खिरापत काय, करचुकवेगिरी काय.. एक ना दोन. पण गवि तुमचा प्रतिसाद सगळ्यांत आवडला. कशाला उगाच ह्यांना ह्या पुरस्काराच्या भानगडीत ओढायचं? सैफ खानला पण पद्मश्री मिळते आणि हृदयनाथ मंगेशकरांना पण. पण म्हणून आपण दोघांना एका रांगेत बसवू का? "पंडिता: एव जानन्ति सिंह-शूकरयो: बलम |"
कोण किती पाण्यात आहे आपल्याला माहिती आहे की. पुरस्कारांचं काय कौतुक? तसंही त्यांची इभ्रत राहिलिये कुठं?
जे पी
19 Dec 2011 - 3:27 pm | फारएन्ड
या पोस्टशी व जेपी मॉर्गनच्या पोस्टशीही.
21 Dec 2011 - 11:18 pm | आशु जोग
>>असं असेल तर एम एस सुब्बलक्ष्मी, पं. रविशंकर, उ. बिस्मिल्लाह खान, लता मंगेशकर आणि पं. भीमसेन जोशी ह्यांचा "देशाच्या उभारणीमघ्ये आणि प्रगतीमध्ये" काय वाटा आहे ते पण कळूद्या ! <<
हा खरोखर योग्य प्रश्न आहे.
22 Dec 2011 - 12:30 am | विकास
सचिन आवडतो हे खरेच... पण जागतीक पातळीवर एकट्याच्या हिंमतीवर देशाचे प्रतिनिधित्व करून अनेक पदके आणि गेल्या ऑलिंपिक्समध्ये सुवर्णपदक आणून देणारा अभिनव बिंद्रा देखील विसरू नये असे वाटले. (पुढची तुलना सचीनशी आहे असे नाही, पण) ऑलिंपिक्स मधे गोल्ड मेडल मिळाल्यावर स्वत:च्या ब्लॉगवर The day after!!!!!!!!!!!!!!!!!! असे आनंदाच्या भरात (नशेत नाही!) त्याने जे काही लिहीले आहे ते वाचावे :
असो...