चला छतावर
पुनवची रात आज आली तुमी आला
चला राया चला छतावरती झोपायला ||धृ||
चांदणं पडलंय ह्या रातीचं पाहू
लुकलुक तार्यांनी शेज ती सजवू
वरतीच राहू दोघं तिसरं न्हायी कुनी पहायला
चला राया चला छतावरती झोपायला ||१||
हातामधी सरळ धरा अत्तरदानी
हळूच खाली सोडा मच्छरदानी
इश्काच्या मैदानी उडवा तुमच्या जोरदार तोफेला
चला राया चला छतावरती झोपायला ||२||
पाटंला थोडी थंडी गुलाबी पडल
अंगावर पांघरून म्हणून तुमाला ओढल
तुमीबी जवळ ओढा मला, होईल उबार्याला
चला राया चला छतावरती झोपायला ||३||
गाठ चोळीची आत्ताच तटली
साडी अंगाची का हो फिटली?
थोडं सबूरीनं घ्यावं वेळ द्या मला सजायला
चला राया चला छतावरती झोपायला ||४||
- पाषाणभेद
प्रतिक्रिया
24 Oct 2011 - 9:44 am | प्रचेतस
पाभे फुल फॉर्मात.
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.:)
24 Oct 2011 - 9:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> पाभे फुल फॉर्मात.
हेच म्हणतो. मिपावरचे शाहीर पाभे लैच फार्मात आहे :)
-दिलीप बिरुटे
24 Oct 2011 - 9:57 am | मदनबाण
बाब्बो... ;)
दफोराव मस्तच ! ;)
24 Oct 2011 - 11:46 am | प्रकाश१११
पाषाणभेदा -झक्कास ..!!
चांदणं पडलंय ह्या रातीचं पाहू
लुकलुक तार्यांनी शेज ती सजवू
वरतीच राहू दोघं तिसरं न्हायी कुनी पहायला
चला राया चला छतावरती झोपायला ||१||
मस्त आवडली...!!
24 Oct 2011 - 3:27 pm | मोहनराव
लई भारी!!
24 Oct 2011 - 5:37 pm | ज्ञानराम
मस्त जमली आहे लावणी..
24 Oct 2011 - 8:31 pm | गणेशा
लय भारी राव !