दोन प्रसंग

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
21 Oct 2011 - 10:28 am

प्रसंग १:

स्थळ: एका हाफिसातील क्यांटिन

कर्मचारी१: काय रे कशी होती तुझी दिल्ली व्हिजिट?
कर्मचारी२: अरे मस्त! फ्यामिलीला घेऊन गेलो होतो. काम फक्त २ दिवस होतं. बाकी २ दिवस दिल्ली त भटकलो
क१: वा! आता मेट्रोमुळे भटकणं सोपंही झालंय नाही
क२: हो यार! बर्‍याच वर्षांपूर्वी स्वतःच वाहन नसल्याने तिथल्या रिक्षावाल्यांना इतके पैसे दिले होते की त्यात नवी रिक्षा आली असती
दोघे: हा हा हा
क१: अरे त्या ट्रीपचा वेगळा अलाऊंस असतो ना?
क२: हो तर म्हणून तर जातो. शिवाय फ्यामिली घेऊन गेलं की त्यांनाही दोन-चार दिवस विरंगुळा असतो
क१: मग फ्यामिलीचा खरच तुच करतोस?
क२: म्हणजे ऑफीशियली मीच करतो पण कसंय ऑफीस रहायला जागा देते माझ्या एकट्यासठी त्यात आपलीच बायको-पोरं राहतात. शिवाय ४ दिवसांचा जेवणाचा खर्च बिलं दाखवून मिळतो तेव्हा तसं बघितलं तर फ्यामिलीचा खर्च कंपनीच करते ;). शिवाय कंपनीची गाडी शहरभर भटकायला असतेच.
क१: अरे, हा भ्रष्टाचार नाही का? तु मारे भ्रष्टाचार आंदोलनाच्या टोप्या घालून मिरवत होतास आणि असा वागतोस?
क२: छ्या! मी काहि कंपनीकडून जास्तीचे पैसे घेत नाहिये, मी फक्त मिळणार्‍या पैशात-व्यवस्थेत कुटुंबाचीही सोय करतोय. हे फक्त सेविंग झालं
क१: अरे त्यांच्या जेवणाची बिलं तुझ्या जेवणाची असल्याचे सांगुन पैसे घेणे, कंपनीच्या कामाच्या सुविधेसाठी दिलेल्या गाडीतून बायका-पोरांना पर्यटनस्थळी पाठवणे यात काहीच चुकीचं नाही?
क२: अरे इतना तो चलता है रे!!

========

प्रसंग २:

स्थळ: एका नेत्याचे हाफिस

नेता: अरे त्या दिल्ली दौर्‍याचं तिकीट आलं का?
कार्यकर्ता: हो आलं ना!
नेता:ज्या मंडळाने आपल्याला बोलावलं आहे त्यांच्याकडून विमान खर्च मागवला आहेस ना?
कार्यकर्ता: अहो नाहि मागवला. तुम्हाला विमानभाडं माफ असतं ना?
नेता: अरे पण ते त्यांना कुठे माहितीये? भ्रष्टाचार निर्मुलन यासारख्या महत्त्वाच्या विषयासाठी मोठा जमाव जमवू शकताहेत ते तेव्हा संस्थेकडे पैसाही बराच असणार. अश्यावेळी विमानखर्च मागायचा. हवंतर विमानाचं तिकीट दाखवू म्हणावं.
कार्यकर्ता: (ओशाळून पुटपुटतो) भ्रष्टाचारावरच्या व्याख्यानालाच असं!
नेता: आज बोललास पुन्हा बोलू नकोस. अरे हा काही भ्रष्टाचार नाही. आणि हे मिळणारे पैसे काही माझ्या खिशात जाणार नाहीयेत. हा खर्च मी माझ्यावर केला असता तर याला भ्रष्टाचार म्हणता आला असता मात्र हे सेविंग आहे. हे पैसे आपल्या पार्टी फंडात जाणार आहेत. आपला पक्ष इतके सामाजिक कार्यक्रम राबवतो त्याला पैसे लागतात. मला उद्या मोठे पद हवे तर अश्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे फरक पडू शकतो. तेव्हा पक्षाला शक्य तित्की आर्थिक मदत केली पाहिजे. हे पैसे माझ्यासाठी नव्हेत पक्षासठी आहेत तेव्हा हा भ्रष्टाचार नव्हे!
कार्यकर्ता: .... (आता नेत्यापुढे काय बोलणार काहिच बोलत नाही)

=====

समाजजीवनमानविरंगुळा

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

21 Oct 2011 - 10:40 am | मराठी_माणूस

किरण बेदि ?

किसन शिंदे's picture

21 Oct 2011 - 10:49 am | किसन शिंदे

सध्याच्या घडामोडींवर आधारीत दिसतयं!!

कुंदन's picture

21 Oct 2011 - 10:55 am | कुंदन

प्रसंग १ आवडला.
कंपनी ८ तास काम करण्याचे पैसे देते, पण बर्‍याचदा आपण त्यापेक्षा बरेच जास्त काम करतोच ना.
अर्थात हे काम करणार्‍यांना लागु आहे , पाट्या टाकणार्‍यांना नव्हे.

कंपनी ८ तास काम करण्याचे पैसे देते, पण बर्‍याचदा आपण त्यापेक्षा बरेच जास्त काम करतोच ना.

मला वाटल की ओव्हर्टाईम मिळत असेल तुला. ;)

कुंदनशी सहमत !
ज्या पटीने एक आयटी हमाल कंपनीला कमवुन देतो त्याच्या तुलनेत त्याचा पगार फारच कमी असतो...कामाचे दिवस/तास काही फिक्स नाही. वैयक्तीक आयुष्याचे ३-१३ वाजतात.
आयटी हमाल हे हायपर टेंशन्/डिप्रशन चे बळी होतात,हार्ट अ‍ॅटॅक्,ब्रेन हॅमरेज नी यमाच्या भेटीला जाणार्‍यांची संख्या वाढते आहे. :( हलीच माझ्या ओळखीतले एक गॄहस्थ ब्रेन हॅमरेज होउन गेले आणि मागे छोटी मुलगी,बायको आणि आई-वडीलांना ठेवुन गेले. :(
कंपनी एखादे इंटर्नल सर्क्युलर पाठवुन कर्मचार्‍यांना सुचीत करते की वाढत्या कामाच्या दबावामुळे लोकांमधे उच्च रक्तदाब्,हार्ट रिलेटेड त्रास वाढत असल्याने नविन वैद्यकीय सेवा अमूक अमूक ठिकाणी करण्यात आली आहे तरी कर्मचार्‍यांनी त्याचा लाभ घ्यावा.
मला स्वतःला आलेले अनुभव तर बेक्कार आहेत... :(
आयटी वाले भले तेलात,ग्रीस मधे हात बुडवुन काम करत नसतील्,पण त्यांच्या मेंदुचा वापर कंपनी कडुन अश्या प्रकारे केला जातो की,शारीरीक थकावटी पेक्षा मानसिक थकावटीनेच त्याची लेवल होते.
वरील सर्व बाबी लक्षात घेतल्या तर प्रसंग एक मधे जे वर्तन दर्शवले आहे त्यात काही वावगे वाटत नाही.

पाषाणभेद's picture

21 Oct 2011 - 11:57 am | पाषाणभेद

मदनबाणाशी ∞% सहमत
आयटी ला कामगार कायदा लागू केलाच पाहिजे.

आणखी एकः आयटीत काम करणार्‍या कामगारांची/ हमालांची कोणतीही संघटना नाही. मलातरी अजून एकाही आयटी कंपनीत असली संघटना सापडली/ दिसली नाही.
कामगार संघटना या बाबतीत लक्ष देतील काय? येथे तर त्यांना चांगले पैसेही मिळतील त्याचबरोबर हमालांचेही कल्याण होईल.

परदेशात काय परिस्थिती आहे?
एकुणच आयटीचे दुष्परिणाम दिसत आहेत.

मदनबाण's picture

21 Oct 2011 - 3:14 pm | मदनबाण

आयटी ला कामगार कायदा लागू केलाच पाहिजे.
अगदी ! अगदी ! :)

आणखी एकः आयटीत काम करणार्‍या कामगारांची/ हमालांची कोणतीही संघटना नाही. मलातरी अजून एकाही आयटी कंपनीत असली संघटना सापडली/ दिसली नाही.
कामगार संघटना या बाबतीत लक्ष देतील काय? येथे तर त्यांना चांगले पैसेही मिळतील त्याचबरोबर हमालांचेही कल्याण होईल.

आयटी वाल्यांची युनियन झालीच पाहिजे,या मताचा मी आहे.ज्या दिवशी हिंदुस्थानात तशी व्यवस्था होईल त्या दिवसा पासुन तिथल्या कर्मचार्यांची ( आयटीतल्या) कश्या प्रकारे पिळवणुक केली जाते यावर लख्ख उजेड पडेल.

एक अनुभव :--- माझे आणि माझ्या जुन्या प्रोजेक्टच्या क्लायंटशी माझे उत्तम संबंध होते,त्यांच्या टिम मधला एक सदस्य तर माझा पक्का मित्र झाला होता...आणि अजुनही आहे. मी ऑनसाईटवर असताना त्याच्याशी ओळख झाली नंतर मैत्री. त्याचे लग्न झाले त्याचे फोटो,बायको प्रग्नंट आहे व अमूक अमूक महिना चालु आहेत्,जुळी झाली त्यांचे फोटो असा इपत्र व्यव्हार होता त्याचा माझ्याशी ! एक दिवस त्याला क्लायंट ने एका झटक्यात काढले.! मला फार वाईट वाटले...पुन्हा एका चांगल्या मित्राला गमावले.
काही दिवसांनी क्लायंटची माणसे केटी ट्रान्स्फर साठी इकडे हिंदुस्थानात आली,मी त्यांना माझ्या त्या मित्राच्या बाबतीत असे का घडले ते ? असे विचारले. ते म्हणाले की त्याने अमेरिकेत एका माणसाला कामच्या निमित्त्याने फोन केला होता...मग त्याला टेप ऐकायला आली इकडे जाण्यासाठी अमुक नंबर दाबा,तिकडे जाण्यासाठी तमूक नंबर दाबा,असे त्याच्या बरोबर ३-४ वेळा झाले. हा भाऊ वैतागला ! तो पटकन बोलला मी आत्ता पर्यंत पाहिलेली सगळ्यात डब्बा फोन सिस्टीम आहे...झालं ते फोन मधे रेकॉर्ड झालं आणि त्याची नोकरी गेली. :( पदरी नुकतीच दोन जुळी मुलं असताना त्याची नोकरी गेली ! मग क्लायंट मंडळींनी मला सांगितले की त्याला कोणतेही लेखी कारण न-देता काढले जर तो आमच्या देशातल्या आयटी युनियनचा सभासद असता तर त्याला सहज कंपनीला कोर्टात खेचता आले असते...
तो आणि मी अजुन linkedin थ्रू संपर्कात आहोत. आता तो एका नामवंत अ‍ॅन्टीव्ह्यायरस कंपनीत कामाला आहे. :)

कुंदन's picture

21 Oct 2011 - 3:19 pm | कुंदन

मालक,
वेगळा धागा टाका यासाठी आता.

आत्मशून्य's picture

21 Oct 2011 - 4:06 pm | आत्मशून्य

हेच म्हणतो, इथं धागा कशावर आहे आणी हे चाललयं काय... हॅ हा हा हा.

मग टाका की राव ! कोणी थांबवलय ! ;)
कुंदन धागे वाचण्या बरोबर खरडवही सुद्धा वाचत जा स्वत:ची ! ;)

पाषाणभेद's picture

21 Oct 2011 - 4:18 pm | पाषाणभेद

>>> जर तो आमच्या देशातल्या आयटी युनियनचा सभासद असता तर त्याला सहज कंपनीला कोर्टात खेचता आले असते<<<<<

म्हणजे इतर देशात आयटी युनियन असते/ आहे?

जास्त प्रकाश टाका. लागलाच तर वेगळा धागा काढा. फारच ज्वलंत, जिवनमरणाचा प्रश्न आहे हा.

सभासद
(अखिल भारतीय आयटी अधिकारी, कामगार, चालक, मालक संघटना - नियोजीत)

मदनबाण's picture

21 Oct 2011 - 4:35 pm | मदनबाण

म्हणुनच मी तो अनुभव इथे लिहला...
जालावर आयटी युनियन गुगलुन पहा ना जरा...

मराठी_माणूस's picture

21 Oct 2011 - 12:16 pm | मराठी_माणूस

समजा आयटी कंपनीने एका ऐवजी ४ माणसे लावुन एकावरचा कामाचा भार कमी केला आणि पगार विभागुन चौघाना दिला तर ते चालेल का ?

मदनबाण's picture

21 Oct 2011 - 12:19 pm | मदनबाण

कंपनीने एका ऐवजी ४ माणसे लावुन एकावरचा कामाचा भार कमी केला आणि पगार विभागुन चौघाना दिला तर ते चालेल का ?
याच्या बरोबर उलटेच होते प्रत्यक्षात ! ;)

मराठी_माणूस's picture

21 Oct 2011 - 2:35 pm | मराठी_माणूस

बरोबर.

कळिचा मुद्दा हाच आहे. प्रॉफिटॅबिलिटि जास्त दाखवण्या साठी कमी माणसे प्रोजेक्ट वर घेतली जातात. एकावर जास्त भार टाकला जातो, त्याला थोडे जास्त पैसे दिले जातात (हा एक चलन तफावती व्यतरीक्त आयटी मधे जास्त पैसे मिळणारा फॅक्टर).
म्हणजे अजुन काही लोकाना जॉब मिळू शकला असता , पण ते होत नाही.
अजुन एक गंमत म्हणजे बेंच वरची मंडळी काम नसल्याने वैतागलेली असतात आणि प्रोजेक्ट वरची अती कामाने.

प्रॉफिटॅबिलिटि जास्त दाखवण्या साठी कमी माणसे प्रोजेक्ट वर घेतली जातात. एकावर जास्त भार टाकला जातो,
अगदी बरोबर !
त्याला थोडे जास्त पैसे दिले जातात
जरुरी नाही... काम करा बस्स्स्स... पर्फोमन्स दाखवालात की पाहु,करीयर प्लान इं. तर चक्क शेंडीलावायचा प्रकार असतो.अर्थात हा अनुभव प्रत्येकालाच येईल असेही नाही,पण ही गोष्ट सर्रास पहायला मिळते.
पेपर टाकल्या शिवाय आणि तुमच्या शिवाय त्यांच अडणार असेल तरच वाढीव पैसे मिळतात ! नाही तर... तेच, काम करा बस्स्स्स.
अजुन एक गंमत म्हणजे बेंच वरची मंडळी काम नसल्याने वैतागलेली असतात आणि प्रोजेक्ट वरची अती कामाने.
शंभर % सहमत ;) जसे बदली कामवाली ची सोय बायका करतात ना,म्हणजे ५ दिवस तू नाही आहेस तर जरा दुसरी बाई घेउन ये...तसेच मॅनेजमेंटवाले करतात ! फक्त आपण बदली हमाल म्हणायचे एव्हढच ! बेंचवर बसण्यासारखे टॉर्चर दुसरे काही नसावे ! सगळी फ्लोअर वरची टाळकी कामात व्यस्त आणि बेंचवर बसलेल्या टाळक्याच काम म्हणजे इतर टाळक्यांना काम करत पाहणं किंवा मॉनिटवर मिपा उघडण्याचे प्रयत्न करणं ! ;)
(सध्याचा बदली कम बेंची हमाल) ;)

आत्मशून्य's picture

21 Oct 2011 - 4:19 pm | आत्मशून्य

अजुन एक गंमत म्हणजे बेंच वरची मंडळी काम नसल्याने वैतागलेली असतात आणि प्रोजेक्ट वरची अती कामाने.

नाही हो काम नाही म्हणून कोणी वैतागत नसतं ( शेवटी ते आपण आहोत).. करीअरची लागते, सॅलरी हाइक्स मनाप्रमाणे नाही, वाइट काळात पिंकस्लीपची भिती म्हणून बेंच नको असतो, काम नाही म्हणून कंटाळणारा जॉब सोडून निघूनही गेलेला असतो.

पाषाणभेद's picture

21 Oct 2011 - 12:26 pm | पाषाणभेद

हा प्रश्न अप्रस्तूत आहे. असलेच प्रश्न तुम्ही इतर इंडस्ट्रीजमध्येही लावू शकतात. पण मग एकाच लेथ मशिनवर एकाच जॉबवर एकाचवेळी दोन मशिनीष्ट काम करू शकतात काय?

कुंदन's picture

21 Oct 2011 - 11:10 pm | कुंदन

गंप्पा शेठ,
प्रॉडक्शन सपोर्ट मध्ये २४*७ सपोर्ट देताना मी ओव्हर्टाईम शिवाय काम करावे अशी अपेक्षा तुम्ही ठेवु शकत नाही.
आहेत "प्रॉडक्शन सपोर्"" साठी २-३ जागा मोकळ्या आहे का कोणी उमेद्वार , कळवा असेल तर.

To err is development , to fix it is prod support, to provide on call support is baby sitting :-)

मन१'s picture

21 Oct 2011 - 10:55 am | मन१

प्रतिसाद वगैरे.

आपला तो सदाचार दुसर्‍यचा भ्रष्टाचार. :)

क्लिंटन's picture

21 Oct 2011 - 11:30 am | क्लिंटन

हा प्रकार किरण बेदींशी संबंधित आहे हे सध्याच्या घडामोडी बघता लक्षात येतेच. (अर्थात या दोन अनुभवांचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध आढळल्यास तो योगायोग समजावा असे डिस्क्लेमर नसेल तर :) )

एकंदरित टिम अण्णाचे दिवस सध्या बरे दिसत नाहीत. अण्णांचे उपोषण चालू असताना मी एक प्रश्न मिपावर विचारला होता की अरविंद केजरीवाल हे आर.टी.आय चळवळीतले. म्हणजे सरकारी कामकाजात पारदर्शकता असावी असा आग्रह धरणारे. त्यांच्या एन.जी.ओ ला पैसा कुठून येतो, त्या संस्थेची फायनान्शियल स्टेटमेन्ट त्या संस्थेच्या संकेतस्थळावर का नाहीत?जर का ते सरकारी कामकाजात पारदर्शकता असावी असा आग्रह धरत असतील तर त्यांच्याकडूनही तशाच पारदर्शी व्यवहाराची अपेक्षा केली तर काय चुकले?तर त्यावर "केजरीवालांवर असे काही करायचे बंधन नाही" अशा स्वरूपाचे उत्तर इथेच मिळाले होते. आता या प्रश्नी पण असेच उत्तर मिळणार का?

आता किरण बेदींच्या प्रकाराला काय म्हणावे? की त्या टिम अण्णाच्या सदस्या असल्यामुळे वाटेल ते करायला (आणि प्रशांत भूषण टिम अण्णाचे सदस्य असल्यामुळे वाटेल ते बरळायला) स्वतंत्र आहेत आणि त्यांना विरोध करणे म्हणजे भ्रष्टाचाराला समर्थन देणे ही हाकाटी करायला हे परत मोकळे?

स्वतः अण्णांविषयी, त्यांच्या कार्याविषयी, त्यांच्या तळमळीविषयी आदरच आहे.पण त्यांच्या आजूबाजूला वावरत असलेल्यांनी असे सगळे प्रकार केल्यामुळे टिम अण्णांची क्रेडिबिलिटीच धोक्यात आली आहे!!

टिम अण्णांची क्रेडिबिलिटीच धोक्यात आली आहे!!

खरंतर, जरा त्यातल्या त्यात बरी, दगडापेक्षा विट मऊ अशी माणसं एकत्र येउन टिम अण्णा तयार झालेली आहे / होती, आता होतंय काय, एकदा का क्वार्टर फायनल पार केली कि प्रत्येक टिम मेंबर स्वताचाच ढोल वाजवत आहे किंवा बाकीच्या टिम आपल्या पद्धतिनं मेंबरना एकटे एकटे गाठुन व्यवस्थित फिक्स करत आहेत, किंवा अशी परिस्थिती निर्माण करत आहेत की फायनलला फक्त एकटे अण्णांचे वैयक्तिक सचिवच उरतील बैठकीला नाहितर राळेगण सिद्धीचे सरपंच. '

अगदी कुणीच उरलं नाहीतर् मिपावरचे अण्णा समर्थक जातिल ही भाबडी आशा आहेच.

वसईचे किल्लेदार's picture

21 Oct 2011 - 12:05 pm | वसईचे किल्लेदार

आजच वाचनात आलेला लेख

मदनबाण's picture

21 Oct 2011 - 12:07 pm | मदनबाण

टिम आण्णांच्या सदस्यांचे कच्चे दुवे शोधण्याची तयारी जोरात आहे हे या सर्व प्रकारातुन दिसुन येते !
इतकी तयारी भ्रष्टाचारी लोकां विरोधात केली असती तर आज अण्णा आंदोलन उभे राहिली असते काय ? ;)
इथे मनमोहन सिंग म्हणतात माझ्याकडे भ्रष्टाचार संपवण्यासाठी जादुची छडी नाही,तेच आता म्हणत आहेत की काही वर्षातच भ्रष्टाचाराला आळा घातला जाईल ! वा रे वा... जादुची कांडी त्यांना गावली वाट्ट आता ?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Oct 2011 - 1:18 pm | विश्वनाथ मेहेंदळे

बेदींचे म्हणणे खरे मानले तर, बेदींच्या प्रसंगात आणि वरील प्रसंगात काही फरक आहेत. एक म्हणजे, त्या असे करत आहेत याची कल्पना त्यांनी संबंधित संस्थेला दिली होती. या खेरीज काही वेळा जर संस्था गरीब असेल तर त्या स्वखर्चाने प्रवास करत.

दुसरे म्हणजे अनेकदा आस्थापने आणि संस्था या प्रवास खर्च देतात तो on actuals नसतो. उदाहरणार्थ, आम्ही तुम्हाला ट्रेन चे फर्स्ट क्लास चे भाडे देणार. मग तुम्ही विमानाने या किंवा चालत या, आम्हाला फरक पडत नाही, अशा प्रकारचे. तसे असेल तर फर्स्ट क्लास चे भाडे घेऊन सेकंड क्लास ने प्रवास करणे भ्रष्टाचार कसे काय ठरते ?

गवि's picture

21 Oct 2011 - 1:27 pm | गवि

प्रत्येक शब्दाशी सहमत.

ठरलेल्या मानधनाचा भाग म्हणून जाण्यायेण्याचा अमुक दर्जाचा प्रवासखर्च किंवा अरेंजमेंट दिली जाते.
(उदा. कार, फर्स्टक्लास, बिजनेस क्लास जे काही ठरीव असेल ते)

त्याउपर कोणी कसा प्रवास करावा याचं काही बंधन नाही. खोटी तिकिटे बिझनेस क्लासची प्रोड्युस करुन सबमिट करुन पैसे उकळणे शक्य नाही. अशा चिरगुट ट्रिक्ससाठी एअरलाईन खोटी तिकिटे देणार नाही.

तिकिटे दाखवून रि-एम्बर्समेंट असा प्रकार नसताना दिलेल्या अलावन्स (मानधनाचा भाग) यातून कमी लेव्हलच्या क्लासने प्रवास करुन पैसे वाचवले आणि ते संस्थेला दिले (किंवा फॉर दॅट मॅटर नाही दिले) तर "भ्रष्टाचार" कसला झाला?

किरण बेदींवर असे आरोप करणे म्हणजे अक्षरशः केविलवाणा प्रयत्न आहे. मटा वगैरे तर रोज टीम अण्णाची सुपारी घेतल्यासारखे चिखल उडवत आहेत.. मुद्दाम राळ उडवली जात आहे हे स्पष्ट दिसेल इतपत प्रकार चाललाय.

काय बोलावे..

प्रसंग २ थोडा मसाला टाकलेला आणि चुकीचा वाटला विषेशतः
कार्यकर्ता: अहो नाहि मागवला. तुम्हाला विमानभाडं माफ असतं ना?
नेता: अरे पण ते त्यांना कुठे माहितीये? भ्रष्टाचार निर्मुलन यासारख्या महत्त्वाच्या विषयासाठी मोठा जमाव जमवू शकताहेत ते तेव्हा संस्थेकडे पैसाही बराच असणार. अश्यावेळी विमानखर्च मागायचा. हवंतर विमानाचं तिकीट दाखवू म्हणावं.

हा प्रसंग तेव्हढा सुट होत नाही.

बेदींनी "President’s Gallantry Meda" च्या 75% discounts सवलतीखाली प्रवास केला आणि तोही Economy क्लासनी आणि त्यांना Entitilement बिझनेस क्लासची आहे.

जर समोरच्या कंपनीला ही अट मान्य नसेल तर ते तक्रार करु शकतात. जर त्यांनी खोटी तिकीटे दाखवली असतील तर तो नक्कीच अपराध आहे.

माझ्यामते जर त्यांनी ही गोष्ट आधिच समोरच्याला सांगितली असेल तर हे चुक नाही. Reembursment कायदा काय सांगतो याबद्दल जाणकारांनी अधिक माहिती द्यावी

पण ही नक्की कॉग्रेसचीच खेळी आहे.

अवांतरः मीपावरील दिवींचे काय मत आहे ते ऐकुया
अतिअवांतरः मौनव्रत लवकर सोडल काय ;)

शाहिर's picture

21 Oct 2011 - 3:20 pm | शाहिर

हा सरकार विरुद्ध अण्णा टीम असा लढा आहे ..

आंदोलनाच्या वेळेस यांनी सरकार वर आसुड ओढले ...सरकारला कात्रीमधे पकडला..
आता सरकार ही तेच करते आहे ...

दोन दिले तर दोन घ्यायची पण तयारी हवी ..

बाकी जनता सुज्ञ आहेच

नितिन थत्ते's picture

21 Oct 2011 - 3:30 pm | नितिन थत्ते

१. सीझर्स वाईफ मस्ट बी अबाऊ सस्पिशन.
२. अण्णा टीम "हिट विकेट" होत आहे.

सीझर्स वाईफ मस्ट बी अबाऊ सस्पिशन

प्रचलित वाक्प्रचार म्हणून ठीक पण सनसनी निर्माण करण्यासाठी कोणी सीझरच्या बायकोलाच निवडून टार्गेट करायचे आणि वरवर ऐकून सर्वजणांनी ते मान्य करायचे आणि मग त्यालाच थेट "सस्पिशन" म्हणायचे.

त्यावर जाऊन तिच्यावर सस्पिशन तरी का रेज झाले म्हणून तिला दोषी ठरवायचे. वा. छान..

अगदी हेही ठीक मानू.. पण ते "सस्पिशन" एखाद्या आर्थिक घोटाळ्याचे किंवा संदिग्ध तरी असावे.
प्रवासभत्ता अलाऊड आहे त्याहून कमी क्लासने प्रवास केला तोही नॉन रिएम्बर्समेंट बेसिसवर.. यात काडीचाही भ्रष्टाचार नसताना आहे असं म्हणायच?..

शिवाय

आपण हे केलेच नाही असा खोटा आवही बेदींनी आणला नाही. मी हे केलं आणि त्यात चूक नाही हेही सरळ शब्दात बोलल्या. तरीही सस्पिशन म्हणत रहायचे?

नितिन थत्ते's picture

21 Oct 2011 - 3:56 pm | नितिन थत्ते

>>प्रचलित वाक्प्रचार म्हणून ठीक

वाक्प्रचार म्हणूनच वापरला आहे*. अन्यथा बेदी यांनी स्वतःच ते मान्य केले असल्याने आता सस्पिशनसुद्धा म्हणण्याची काहीच गरज नाही. :)

बाकी त्या 'त्यात काही चूक नाही' म्हणाल्या म्हणजे त्यात काही चूक नाही असे समजण्याचे कारण नाही. आता चूक की बरोबर हे सामान्य नियमांनीच ठरेल.

आपण आपल्या नोकरीच्या ठिकाणी असं करून 'त्यात काही चूक नाही' असं आपल्या एम्प्लॉयरला सांगून पहा बरं. मग चूक आहे की नाही ते कळेल.

नो पर्सनल गेन चा दावा (पक्षासाठी देणग्या घेतल्या, पक्षासाठी झटणार्‍या कार्यकर्त्यांना पेट्रोलपंप वाटले वगैरे) तर अंतुले यांच्यापासून अनेक लोकांनी आजवर केला आहे. पण तो कधीही मान्य झालेला नाही.

*वाक्प्रचार म्हणून वापरला आहे आणि त्यामागच्या विचारसरणीशी सहमत नाही अशी दुरुस्ती प्रतिसादात करायला आलो होतो परंतु तेवढ्यात आपण उपप्रतिसाद दिल्याने इथे खुलासा करतो.

(खुलासेवार) नितिन थत्ते

खुलासा पटला.

राहता राहिले एक विधानः

आपण आपल्या नोकरीच्या ठिकाणी असं करून 'त्यात काही चूक नाही' असं आपल्या एम्प्लॉयरला सांगून पहा बरं. मग चूक आहे की नाही ते कळेल.

हाच तर ढळढळीत फरक आहे ना. मला ऑफिसतर्फे रिएम्बर्समेंट बेसिसवर (तिकिटे सादर केलीत की आणि तरच) जितका केलात तितकाच प्रवासखर्च मिळतो (आणि सामान्यतः सर्व एम्प्लॉयीजना) तेव्हा अशा पद्धतीत न केलेल्या प्रवासाचे किंवा वरच्या दर्जाचे खोटे तिकिट प्रोड्यूस करुन खर्च केलेल्यापेक्षा जास्त पैसे मागायचे हा भ्रष्टाचार झाला. तरीही अशा केसमधे मी मला एन्टायटलमेंट नसलेल्या वरच्या क्लासचे तिकिट काढून फरक माझ्या खिशातून भरु शकतो.

पण

मला जर फिक्स अलाउन्स असेल आणि त्यातून मी प्रवास, जेवण भागवावे अशी पद्धत असेल आणि या भत्त्यात मी बिझनेस क्लासने प्रवास करणार आणि ताजला खाणार असं गृहीत धरुन तितकी माझी एन्टायटलमेंट असेल (पर्क)

आणि तरीही समजा मी रेल्वेने गेलो (विमान तिकीट न मिळाल्यास, किंवा मिळत असूनही मुद्दाम पैसे वाचवायला किंवा मला भीती वाटते म्हणून किंवा कोणत्याही अन्य उद्देशाने पण दिलेल्या असाईनमेंटला उशीर न करता..).. आणि तिथे पोचल्यावर ताज ऐवजी सत्कार उडपी हाटेलात जेवलो..

तर मी भ्रष्टाचार केला. कंपनीला फसवले असं म्हणता येईल का?

किंवा जास्त योग्य उदाहरण घेऊ.

समजा क्ष हा सितारिस्ट, गझलगायक, संतूरवादक किंवा तत्सम आहे. क्षला कार्यक्रमाला बोलावणे करताना येताजाता बिझनेस क्लासचे "क्ष"चे आणि सतारीचे हवाई तिकीट, उतरल्यावर हॉलिडे इनमधे आयोजकांच्या वतीने दोन दिवस मुक्काम आणि १ लाख मानधन असे मिळून रक्कम देण्यात किंवा कबूल करण्यात आली आहे. अशा वेळी "क्ष"ने त्याच बिजनेस क्लासने प्रवास केला पाहिजे अन्यथा पैसे कमी घेतले पाहिजेत.. नपेक्षा तो भ्रष्टाचार.. किंवा या कलाकाराची कंपनीतर्फे फिरणार्‍या एम्प्लॉयीशी अशावेळी तुलना हे चूक आहे असं वाटतं.
................

पंगाशेटची प्रचंड आठवण येत आहे..

..........................

मन१'s picture

21 Oct 2011 - 4:57 pm | मन१

अपेक्षित लोकांचे अपेक्षित प्रतिसाद न येते तरच नवल.
अपेक्षेप्रमाणे बेदींच्या क्डच्या बाजूशी मी सहमत आहे.
मी यु के मध्ये असताना काहीही न विचारता एक ठराविक रक्कम allowance म्हणून मिळायची.
अर्थातच माझं अगदि पोटभर शाकाहारी जेवण(भरपूर ताजी फळे व सुकामेवा धरून) व साधारण राहणीसुद्धा दिलेल्या रकमेच्या निम्म्यात आटपायची. बहुतांश न पिणार्‍यांची हीच स्थिती होती. बरीच बचत व्हायची.
हे माझ्या कंपनीच्या व्हाईस प्रेसिडँटला सुद्धा ठावूक आहे, HR मंडळिंनासुद्धा. "माझे पैसे वाचले" असे मी एका वेगळ्या चर्चेदरम्यान कंपनीच्या all hands meet मध्ये (सर्वसाधारण सभेत) जाहिर बोलल्यावरही मला कुणीही "वाचलेले पैसे परत कर" अशी मागणी केली नाही. बहुतांश कंपन्यात हीच स्थिती आहे. इथे भ्रष्टाचाराचा मुद्दा निराधार ठरावा.
(आम्हाला एकरकमी भत्ता दिला गेलाय; कुठल्याही बिले व पावत्यांच्या बदल्यात नव्हे.)
मला १०० रुपये देण्यात येत असतील आणि मी १०च रुपयात भागवले तर ते माझे कसब ठरते, हरामखोरी नाही.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Oct 2011 - 5:32 pm | विश्वनाथ मेहेंदळे

तरीही बेदीच दोषी आहेत. त्या चक्क काँग्रेसच्या संतांवर आळ घेतात..
स्वतः कडे बघा म्हणावे. स्वतः भ्रष्टाचारात बरबटलेल्या आहेत ते दिसत नाही का?
होय की नाही हो थत्ते चाचा ??

नितिन थत्ते's picture

21 Oct 2011 - 5:52 pm | नितिन थत्ते

काँग्रेसचे लोक संत आहेत असा दावा मी कधीही केल्याचं स्मरत नाही. तेव्हा माझ्या नावावर नाही त्या गोष्टी खपवू नयेत.

परंतु भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातल्या बिनीच्या शिलेदारांसाठी भ्रष्टाचाराची व्याख्या बदलू नये असा आग्रह आहे. आणि तो खर्च रिईम्बर्समेंटच्या स्वरूपात नव्हता असा बचाव करू नका.
कॉमन पार्लन्समध्ये बेदी यांच्या कृतीला भ्रष्टाचारच म्हणतात.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

22 Oct 2011 - 12:20 am | विश्वनाथ मेहेंदळे

काँग्रेसचे लोक संत आहेत असा दावा तुम्ही केलात असा दावा मी कधीही केल्याचं स्मरत नाही. तेव्हा तुम्हीही माझ्या नावावर नाही त्या गोष्टी खपवू नयेत. (आम्हाला काय जमत नाही का ?? ;-) )

ऋषिकेश's picture

21 Oct 2011 - 5:30 pm | ऋषिकेश

जितका केलात तितकाच प्रवासखर्च मिळतो (आणि सामान्यतः सर्व एम्प्लॉयीजना) तेव्हा अशा पद्धतीत न केलेल्या प्रवासाचे किंवा वरच्या दर्जाचे खोटे तिकिट प्रोड्यूस करुन खर्च केलेल्यापेक्षा जास्त पैसे मागायचे हा भ्रष्टाचार झाला.

सहमत आहे.
* अवांतरः इंडीयन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार किरण बेदीं यांना झालेले पेमेंट हा रीएम्बर्समेंट या प्रकारातील होता. शिवाय एका प्रसंगी न केलेल्या विमान प्रवासाचा इन्वॉईस (बिल) तयार करून समबिट केले आहे. असो. :)

अवांतरः इंडीयन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार किरण बेदीं यांना झालेले पेमेंट हा रीएम्बर्समेंट या प्रकारातील होता. शिवाय एका प्रसंगी न केलेल्या विमान प्रवासाचा इन्वॉईस (बिल) तयार करून समबिट केले आहे. असो

अहो हे अवांतर नाही. हा तर खूप ठळक मुद्दा आहे. हे असं खरंच असेल तर ते खचितच चूक आहे. माझी आत्तापर्यंतची माहिती "मानधन" या प्रकाराची होती.

खोटी तिकिटे बनवली असतील तर ते भ्रष्ट वागणेच आहे आणि मी वरील सर्व विधाने मागे घेईन.

विकास's picture

21 Oct 2011 - 7:20 pm | विकास

अहो हे अवांतर नाही. हा तर खूप ठळक मुद्दा आहे. हे असं खरंच असेल तर ते खचितच चूक आहे. माझी आत्तापर्यंतची माहिती "मानधन" या प्रकाराची होती.

असेच म्हणतो!

करड्या अक्षरातल्या प्रकाराची लिंक द्यावी

ईथे असे काही आढळले नाही

चेतन

अवांतरः अपशब्दाची व्याख्या माणसाप्रमाणे (कींवा कंपुनुसार) बदलते.

ऋषिकेश's picture

21 Oct 2011 - 6:35 pm | ऋषिकेश

तुम्हीच दिलेल्या दुव्यात हे वाक्य आहे:
Reimbursement cheques for these fares were credited to India Vision Foundation, the NGO headed by Bedi.

तुमच्याच दुव्यावर पाक क्रं. २ पासून उदा आहे
September 29, 2011: Bedi flew Delhi-Hyderabad on Air India (AI 560), then Hyderabad-Chennai (AI 546), in Economy class. The next day, she took a flight back to Delhi (AI 539).

Total fare paid: Rs 17,134.
Invoice generated for: Rs 73,117 (payment is pending).

While Bedi flew Delhi-Hyderabad, onward to Chennai and back to Delhi, the fares being claimed are for Delhi-Hyderabad-Delhi (Economy) and Delhi-Chennai-Delhi (Business class).

अजून दुवे शोधाल तर अजुनही मिळतील. बाकी हे ताजं वाचा. एकाच प्रवाससाठी दोघांकडून प्रशाची मागणी केली होती. (नशिब हे रोखलं गेलं)

चेतन's picture

21 Oct 2011 - 7:25 pm | चेतन

ते ही वाचलं होतं पण जर हैद्राबाद दिल्ली हा रिटर्न प्रवास म्हणत असाल तर तुम्ही म्हणताय तसं ते सरळ नाही आहे.

एक उदाहरण देतो.

समजा एका भारतीय व्याख्यात्याला कोणी दुबई मध्ये बोलवले आणि नंतर अमेरीकेत बोलवले तर त्यांच्या मानधनानुसार तो पहिल्यासाठी तो दिल्ली-दुबई/दुबई-दिल्ली आणि दुसर्‍यासाठी दिल्ली-न्युयॉर्क/न्युयॉर्क-दिल्ली मागु शकतो का? माझ्या मते हो.

दुसरी बातमी वाचली होती. (माझ्यामते हे चुकीचे आहे). पण जर उदाहरणच द्यायचे झाले तर. समजा दोन वेगवेगळ्या संस्थाकरिता एकाच ठीकाणासाठी प्रवास भत्ता कसा आकारला जातो? जर त्यांनी दोन्हीकडुन मागणि केली तर ते कायद्याने चुक आहे की बरोबर? (माझ्यामते हे morally चुकीचे आहे).

असो...

चेतन

क्लिंटन's picture

21 Oct 2011 - 4:09 pm | क्लिंटन

अण्णा टीम "हिट विकेट" होत आहे.

अहो ही "हिट विकेट" ही पण कॉग्रेसचीच खेळी आहे हे कसे विसरलात तुम्ही? :)

(मला कॉग्रेस पक्षाविषयी अजिबात सहानुभूती नाही आणि भ्रष्टाचारालाही थोडाही पाठिंबा नाही.तरीही टिमच्या सदस्यांनी केलेल्या प्रकारांमुळे लोकांचा पाठिंबा कमी होत आहे असे दिसले तर त्याचा दोष कॉग्रेस पक्षावर टाकायचा हे पण योग्य नाही)

व किरण बेदीं डेस्कटॉपला जो वॉलपेपर लावतात त्या बद्दल ते मूळ छायाचित्रकाराची परवानगी घेत नाहीत या कृतीबद्दल त्यांना भर चौकात चाबकाने फटके मारायची शिक्षा झालीच पाहीजे या बद्दल उपोषण करून व आंदोलन करूया.

दादा कोंडके's picture

21 Oct 2011 - 5:14 pm | दादा कोंडके

किंवा गेलाबाजार, कोणतीही पावती न घेता रस्त्यावरच्या फळविक्रेत्याकडुन फळं घेउन काळा पैसा तयार होण्याला हातभार लावल्याबद्दल त्यांना जन्मठेप तरी झाली पाहिजे!

विकास's picture

21 Oct 2011 - 5:30 pm | विकास

या चर्चेतील पहीला प्रतिसाद पाहीला आणि वाटलं ऋषिकेशने तर्कक्रीडा टाकली होती का? ;)

असो. दोन्ही प्रसंगाबाबत एक समान मुद्दा, माझ्या अनुभवावरून: जर कंपनीने अथवा आमंत्रकाने lump sum पैसे सांगितलेले असले तर ते कसे वापरले याने फरक पडत नाही. उ.दा. भारतात मी काम करत असताना मला प्रवास करायला लागायचा तेंव्हा फर्स्ट क्लास, कार/टॅक्सी, आणि इतर गोष्टींसाठी ठरावीक डेली अलाउन्स असायचा. रिसिट्सचा प्रश्न नाही. (अर्थात मी तिथे कामाला गेलो होतो का ते कंपनीला कळायचेच. ;) ). इथे अमेरीकेत मला इथले सरकार राजधानीतील काही मिटींग्जना बोलावते. त्या संदर्भात देखील काही खर्च हा रीसिट्स दाखवून करावा लागतो, म्हणजे विमानाचे / हॉटेल स्टेच्या पावत्या द्याव्या लागतात. पण रोजच्या खाण्यासाठीचे पैसे ठरलेले असतात तितके तुम्ही खा अथवा नका खाऊ, मिळतातच.

आता असेच जर चर्चेतील दोन्ही प्रसंगात झाले असले तर काहीच हरकत नाही असे वाटते. मात्र तसे नसले तर अर्थातच आक्षेपार्ह आहे.

आता तर्कक्रिडेतील उत्तरासंदर्भातः :-) किरण बेदींनी कुठलेही आढेवेढे न घेता पब्लीकली "हो मी तसे करते..." म्हणत सांगितल्याने मला त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेल असे वाटते. पण प्रसंग २ मधे ही माहिती सांगितली गेलेली दिसली नाही. शिवाय बेदींबद्दल अप्रत्यक्ष आहे कारण बेदींचा अजून तरी काही पक्ष नाही. पण अशामुळे त्यांचा पक्ष आहे असे वाटू शकेल.. (माहिती संपूर्ण न देता अर्धीच देत त्यातून ओपिनिन तयार करणे हा देखील भ्रष्टाचार असतो का? ;) )

बाकी वर क्लिंटन यांनी आणलेल्या मुद्यासंदर्भातः जेंव्हा नॉनप्रॉफिट्स पब्लीकचा पैसा वापरतो तेंव्हा तो कायद्याप्रमाणे जाहीर करावाच पण कायदा नसला तरी तसा जाहीर करणे यात नैतिकता वाढते आणि तसे वागावे देखील. मात्र केजरीवाल अथवा अण्णांच्या डिफेन्स मधे नाही तर वास्तव म्हणून यातील नैतिकतेने अधिक जाहीर करण्यासंदर्भाबाबत (कायद्याने जाहीर करणे आवश्यक असल्यास त्याला हे लागू नाही) - बर्‍याचदा डोनर्सना आपली नावे सांगायची नसतात. त्याचे कारण प्रत्येक वेळेस (डाव्या हाताचे उजव्या हाताला कळू नये असे) उदात्त देखील नसते अथवा काळ्याचा पांढरा पैसा करणे वगैरे सारखे काळेबेरे देखील नसते. फक्त अजून पब्लीक, पैशासाठी मागे लागू नये इतकाच उद्देश असतो. हे मी अगदी अमेरीकेत देखील भारतीयांमध्ये पाहीले आहे. त्यात केवळ अगदी खूप मोठी नावेच नाही तर जे प्रथितयश संस्थेसाठी मदत करतात त्यांच्या बाबतीत देखील होताना पाहीलेले आहे. त्यांचा देखील आमची नावे लावू नका, फोटो काढू नका असा आग्रह असतो...

थोडक्यात हे y=mx+c इतके साधे समिकरण नाही. टिम अण्णांचे काय होते असे जर विचाराल तर काही नाही असेच म्हणेन. अगदी ते चुकले असले तरी काही होणार नाही असेच म्हणेन. इतके वर्षे भ्रष्ट लोकांची नावे जाहीर होऊनही त्यांच्यात फरक पडला नाही अथवा त्यांच्या निवडून येताना काही फरक पडला नाही, मग अण्णांनीच काय घोडे मारले आहे? :-)

त्याही पुढे माझ्यामते त्यांच्यामुळे भ्रष्टाचाराकडे गांभिर्याने लक्ष दिले गेले, जरा पब्लीक जागे झाले ("जागृती", हा मोठा शब्द आहे म्हणून टाळतो). माझ्यामते त्यांचे ७०-८०% काम झाले आहे. आता त्यांनी जर तीच शस्त्रे वापरत अतिरेक केला तर त्यांना या बेदी-भूषण प्रकरणापेक्षाही महागात पडेल असे वाटते...

असो. बाकी एकदा टिळक फंडावर पण चर्चा करायची का? ;)

आमची नावे लावू नका, फोटो काढू नका असा आग्रह असतो...
अगदी सहमत. अजून नवे लोक मागे लागू नये हीच इच्छा असते.

भास्कर केन्डे's picture

21 Oct 2011 - 8:40 pm | भास्कर केन्डे

टीम अण्णावरील हजारो रुपयांच्या कथित भ्रष्टाचारावर सुद्धा २-जी सारख्या हजारो-करोडो रुपयांच्या हमखास भ्रष्टाचारा इतकीच प्रभावी चर्चा होत आहे हे खरे तर टीम अण्णा विरोधकांचे यश आहे. त्यांचे अभिनंदन! :)

२-जी सारख्या भयंकर मोठ्या प्रमाणातल्या भ्रष्टाचारांना आणि त्यातील खूप शक्तिशाली व्यक्तिंना धोबीपछाड करणारे सुब्रमन्यन स्वामी आणि टीम अण्णांचे शत्रू एकच असावेत असा अंदाज बांधायला खूप वाव आहे. टीम अण्णांपेक्षा जास्त काळ या लढ्यात असणारे आणी कोर्टातही विरोधकांना भारी पडणारे सुब्रमन्यन स्वामी मात्र टीम अण्णांपेक्षा या अशा प्रकराणांमध्ये खूप कमी वेळा गोवले गेले आहेत. विचार करत आहे कि याचे कारण त्यांची विभिन्न कार्यपद्धती असेल की मुळातच टीम अण्णा या खेळात कच्ची आहे.

जाणकारांनी खुलासा करावा ही विनंती.

मन१'s picture

21 Oct 2011 - 10:42 pm | मन१

मोजका आणि थोडक्यात मार्मिक प्रतिसाद.
इथेच वरती एक डेस्क्टोप्-वॉलपेपर, बिन्पावती भाजी घेणे वगैरेचे प्रतिसादही लै भारी.

५० फक्त's picture

22 Oct 2011 - 5:36 am | ५० फक्त

+१००० टु भास्कर,

वरचा श्रि. क्लिंटन यांच्या प्रतिसादातील एक वाक्य व त्याचं मी केलेलं यथाबुद्धी एक्स्टेंशन पुन्हा देतो आहे,

'स्वतः अण्णांविषयी, त्यांच्या कार्याविषयी, त्यांच्या तळमळीविषयी आदरच आहे.पण त्यांच्या आजूबाजूला वावरत असलेल्यांनी असे सगळे प्रकार केल्यामुळे टिम अण्णांची क्रेडिबिलिटीच धोक्यात आली आहे!!

---------

खरंतर, जरा त्यातल्या त्यात बरी, दगडापेक्षा विट मऊ अशी माणसं एकत्र येउन टिम अण्णा तयार झालेली आहे / होती, आता होतंय काय, एकदा का क्वार्टर फायनल पार केली कि प्रत्येक टिम मेंबर स्वताचाच ढोल वाजवत आहे किंवा बाकीच्या टिम आपल्या पद्धतिनं मेंबरना एकटे एकटे गाठुन व्यवस्थित फिक्स करत आहेत, किंवा अशी परिस्थिती निर्माण करत आहेत की फायनलला फक्त एकटे अण्णांचे वैयक्तिक सचिवच उरतील बैठकीला नाहितर राळेगण सिद्धीचे सरपंच. ''

जसं हिंदि पिक्चर मध्ये शक्यतो सनि देवल वगैरे हिरो असताना तो साधा इन्स्पेक्टर असतो अन जेंव्हा तो अन्यायाविरुद्ध पेटुन उठतो, तेंव्हा त्याचा डिआजि वगैरे त्याला समजावुन सांगतो की तु या कायद्याच्या सिस्टिमच्या बाहेर जाउ शकत नाही वगैरे, तसं टिम अण्णाला सांगण्याची गरज आहे, नुसतं उपोषणं करुन क्रांती होत नसते, आणि सत्त्ताधारी यंत्रणेनं स्वताहुन स्वताच्या गळ्याला फास लावुन घेण्याची तयारी करणं ही एक प्रकारची क्रांतीच असते. क्रांती ही नेहमी रक्तरंजितच असावी लागते. इतर वेळी तो फक्त बनाव असतो. सामान्य जनतेला बनवण्यासाठी बहुधा सत्ताधारी यंत्रणेनंच राबवलेला.

निवांत पोपट's picture

21 Oct 2011 - 9:19 pm | निवांत पोपट

भ्रष्टाचाराच्या कृतीमध्ये स्वार्थ गृहीत असतो. आणि अनैतिक कृतीमध्ये कर्त्याचा हेतू आणि पश्चातबुध्दी महत्वाची असते.
किरण बेदी ह्यांचा हेतू शुध्द दिसतो आणि त्यांना पश्चातापाच्या भावनेचा स्पर्श ही झालेला दिसत नाही. तेंव्हा त्यांच्या कृतीला अनैतिक मानले जाऊ नये.तसेच त्यांच्या कृतीमध्ये कोणताही स्वार्थ दिसत नाही तेंव्हा त्यांच्या कृतीला भ्रष्टाचाराच्या पंक्तीत ही बसवले जाउ नये.

ऊलट स्टेटस चा प्रश्न न करता त्यांनी जे केले आहे त्याला त्याग असे म्हणायला हरकत नसावी. अनुकरण करावे अश्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात.ही पण त्यातलीच एक.

आशु जोग's picture

22 Oct 2011 - 12:08 am | आशु जोग

धागा कढणार्‍या ॠशिकेश यांच्याशी प्रचंड सहमत----------------------

किरण बेदी, केजरीवाल आणि अण्णा हजारे हे लोकच प्रचंड भ्रष्ट आहेत

या लोकांनी करोडोंचा घपला करून देश भिकेला लावला
याच तिघांकडे कायम सत्ता होती, त्यांनी तिचा दुरुपयोग केला.

मेडिया वापरून विरोधकांवर गलिच्छ भाषेत हमेशा टीका केली
किरण बेदी या आपल्या कारकीर्दीत सतत राजकीय दबावाला बळी पडत.

अण्णांचे ग्रामसुधार आणि पाणी नियोजनाचे ज्ञान शून्य आहे

केजरीवाल स्वराज्याचे सुराज्य वगैरे गोष्टी करतात, ते देशासाठी अति घातक आहे.

पण मनिमोहन टीममधील देशभक्तांनी कायम देशाची काळाजीच वाहिली आहे.

सत्ताधारी असलेल्या अण्णांच्या टीमने मनिमोहनच्या टीममधील

ए राजा, महात्मा चिदंबरम, कलमाडी, दयानिधी या गरीबीत राहून देशसेवा करणार्‍या
लोकांवर अन्याय आणि अत्याचारच केले आहेत

ए राजा, कलमाडी, कनिमोळी असे लोक आहेत म्हणून देश निश्चीतच प्रगतीपथावर आहे

हुप्प्या's picture

22 Oct 2011 - 6:44 am | हुप्प्या

एखाद्याच्या घरात सांडपाणी तुंबून घरभर गुडघ्यापर्यंत गलिच्छ पाणी साठलेले असावे आणि दुसर्‍याच्या बाकी स्वच्छ घरात एखादा कागदाचा कपटा पडलेला असावा. आणि मग कुण्या बुद्धीमान माणसाने, हीही घाण आणि तीही घाण त्यामुळे दोन्ही घरे सारखीच घाणेरडी आहेत असा दावा करावा असे वाटते आहे. असो.

अर्थातच वरील रुपकात टीम अण्णा == तुम्बलेले घर
काँग्रेस == कागदाचा बारकासा कपटा पडलेले स्वच्छ घर हे वेगळे सांगायला नको!

नितिन थत्ते's picture

22 Oct 2011 - 7:45 am | नितिन थत्ते

प्रथम कपटा* पडला आहे हे (तुम्ही) मान्य केल्याबद्दल अभिनंदन (बेदींनी कपटा आहे हे कधीच मान्य केलं आहे).

*कपटा म्हटले की त्यात अस्वच्छतेची भावना येत नाही. म्हणून आम्ही कपटा न म्हणता टॉयलेटमध्ये न जाता रस्त्यावरच शू केली आहे (आणि बर्‍याच वेळा रस्त्यावरच शू केली जाते) इतपत म्हणू इच्छितो.

आमच्या घरात मोरी/संडास तुंबला आहे आणि तुम्ही रस्त्यावरच शू करता अशा परिस्थितीत कोणी कोणाला बोल लावू नये.

मग जेव्हा रत्यावर बर्‍याचदा शू करणारी व्यक्ती मोरी तुंबलेल्यांना जाहीरपणे "काय अस्वच्छ लोक आहेत हो हे !!! यांना या वस्तीतून हाकलायला पाहिजे" असे सारखेसारखे म्हणते तेव्हा मोरी तुंबलेलेच नव्हे तर ज्यांना हे सांगितले जाते ते इतर लोकही "अहो पण तुम्ही पण रस्त्यावर शू करता ना?" असे म्हणणे स्वाभाविक आहे.

तेव्हा "फक्त शूच तर केली आहे" असे म्हणून गलिच्छपणाचा आरोप टाळता येणार नाही.

या किश्शातला अजून वाईट भाग म्हणजे दिवाणखान्यात शू करणारी व्यक्ती मोरी तुंबलेल्यांच्या गलिच्छपणाबाबत ज्यांच्यासमोर तक्रार करत असते तेही आपापल्या घरात आणि इथे तिथे पान खाऊन थुंकणे वगैरे प्रकार करतच असतात. तरीसुद्धा एरवी तेही लोक मोरी तुंबलेल्यांबद्दल नाके मुरडत असतात. फरक इतकाच झाला की स्वच्छतेचे धडे देणारी व्यक्ती स्वतः पण रस्त्यावर शू* करते हे सर्वांना कळून आले.

*गटार/मोरी तुंबणे हा शब्दप्रयोग एका बाजूने झाला म्हणून त्याला समांतर शब्दप्रयोग करावा लागला अन्यथा बेदी यांच्याबद्दल शब्दशः असे म्हणण्याचा कोणताही हेतू नाही.

एरवी रस्त्यावर शू करणे हे चालूनच जाते. पण स्वच्छतेवर भाषणे देणारी व्यक्ती मात्र रस्त्यावर (एकदाही) शू करणाचा अधिकार गमावून बसते. आणि प्रमाणाची तुलना करणे व्यर्थ आहे.

बेदी यांच्या मुलीच्या मेडिकल कॉलेजातील प्रवेशाबाबत काही प्रवाद ऐकले होते. आत्ता त्या विषयी आठवत नाही.

राजेश घासकडवी's picture

23 Oct 2011 - 8:13 am | राजेश घासकडवी

तत्त्वतः सारखंच म्हणून त्यातल्या कपटा पडलेल्यांना आठ दिवसांचा तुरुंगवास द्या आणि घरात सांडपाणी तुंबून असणाऱ्यांना दोन आठवडे तुरुंगवास द्या. हाकानाका....

ऋषिकेश's picture

24 Oct 2011 - 8:53 am | ऋषिकेश

हीही घाण आणि तीही घाण त्यामुळे दोन्ही घरे सारखीच घाणेरडी आहेत असा दावा करावा असे वाटते आहे

<खुलासा सुरु> वरील लेखन केवळ वर ठळक केलेला भाग दाखवण्यासाठी आहे. अधोरेखीत वाक्य माझ्यापुरते तरी चुकीचे आहे. < / खुलासा संपला>

बाकी स्वच्छता अभियानाच्या नेत्याने (त्यातही असा नेता जो अस्वच्छता पसरवणार्‍यांविरुद्ध सर्वात मोठ्या आवाजात बोलतोय) एकदा जरी भर रस्त्यात थुंकले तर ते जास्त चुकीचे 'वाटते'. वर थत्तेचाचा म्हणाले त्यानुसार 'सीझरची बायको संशयापासूनही कोसो दुर असावी'

आशु जोग's picture

23 Oct 2011 - 10:08 pm | आशु जोग

एक ऑब्सर्व केलेली गोष्ट

अण्णांवर टीका करणार्‍यांचा एक भाव असतो "आम्ही बघा कसा इतरांपेक्षा वेगळा विचार करतो"
बहुधा हे लोक जास्त शिकलेले, बौद्धिक काम करणारे
किंवा आपली फाल्तु गोष्टही सजवून सांगण्यातपटाईत
असतात.

'जो तो बुद्धिच सांगतो' अस कुणीसं म्हणून ठेवलय

नितिन थत्ते's picture

24 Oct 2011 - 8:43 am | नितिन थत्ते

>>किंवा आपली फाल्तु गोष्टही सजवून सांगण्यातपटाईत

बर्‍याचदा एखादी गोष्ट गैरसोयीची असली की ती फाल्तु आहे असे म्हणून बाजूस सारता येते.

बाकी अशा प्रकारे विचार न करणारे लोक हे कमी शिकलेले, बौद्धिक काम न करणारे असतात असं तुम्ही सुचवत आहात का?

नरेश_'s picture

24 Oct 2011 - 1:59 pm | नरेश_

प्रकाटाआ.
सर्वांना निरामय दिवाळीच्या शुभेच्छा!!!!

किरण बेदी जास्तीचे पैसे परत करणार असे http://ibnlive.in.com/news/kiran-bedi-to-return-excess-fare-charged-to-n... या बातमीत म्हटले आहे.

काल NDTV च्या मुलाखतीतही त्यांनी स्वतःच्या संस्थेच्या पैसे स्वीकारण्याच्या पद्धतीत बदल केल्याचे सांगितले आहे. आधीच्या पद्धतीत काहि चुका असल्याचे त्यांनी जवळजवळ मान्य केलेले दिसते (जे स्वागतार्ह वाटते).