टॉक्डॉक् टॉक्डॉक् आला दौडत
अबलख माझा घोडा -
आई बाबा आजी आजोबा
सरका रस्ता सोडा !
दोनच पायांच्या घोड्याची
घरभर भरभर घाई
पटपट झुरळे दूर पांगती
खुषीत येते आई !
हातांचा हा लगाम धरुनी
वेगाला मी आवरतो
ऐटित मागे पुढे डोलुनी
घर-मैदानी वावरतो !
घोडोबा मी घरी लाडका
खेळायाला पुढे पुढे -
शंभर टक्के परीक्षेत गुण
अभ्यासातहि सदा पुढे !
तबेल्यात बेजार हा घोडा
आठवड्यातले दिवस सहा -
चंगळ घोड्याची रविवारी
हैराण हे घरदार पहा !!
प्रतिक्रिया
15 Oct 2011 - 1:04 am | अनामिक
बालगीत तसं वाचायला चांगलं वाटलं तरी "पटपट झुरळे दूर पांगती" वाचून किती ते अस्वच्छं घर असेल असं वाटून गेलं!
15 Oct 2011 - 4:41 am | प्रकाश१११
छान सुचलीय कविता .आवडली.
15 Oct 2011 - 4:41 am | प्रकाश१११
छान सुचलीय कविता .आवडली.
15 Oct 2011 - 7:03 am | शिल्पा ब
मला कविता समजत नाहीत म्हणुन उगाच मी त्यांच्या वाटेला जात नै...पण शिर्षक वाचुन आले अन मस्त बालगीत एंजॉय केले.. :)
बाकी अबलख म्हंजे काय?
15 Oct 2011 - 10:15 am | ५० फक्त
मस्त बालगित आहे, धन्यवाद.
15 Oct 2011 - 12:44 pm | किसन शिंदे
मस्त आहे बालगीत...
आवडलंय. रिंगा रिंगा रोजेसच्या जमान्यात माझ्या पुतण्याला ऐकवेन हे बालगीत.
15 Oct 2011 - 8:04 pm | प्रभाकर पेठकर
पटपट झुरळे दूर पांगती
'झुरळे' ऐवजी 'सगळे' असा शब्दप्रयोग केला तर?
16 Oct 2011 - 10:15 am | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त आहे.
16 Oct 2011 - 11:01 am | तिमा
आशय चांगला व हलकाफुलका पण मीटरमधे बसत नाही असे वाटते.
16 Oct 2011 - 3:01 pm | अविनाशकुलकर्णी
बाकी अबलख म्हंजे काय?
शनी महात्म्यात उल्लेख आहे
17 Oct 2011 - 1:09 pm | विजुभाऊ
झुरळे पांगवायला पेस्ट कंट्रोल ऐवजी घोडा घोडा मोठ्यानी देखील खेळले तर फार उपयोगी ठरेल ;)
17 Oct 2011 - 1:16 pm | नावातकायआहे
_ _/\_ _
18 Oct 2011 - 1:28 am | अगोचर
माझ्या प्राथमिक शाळेतिल आठवणी प्रमाणे अबलख म्हणजे दोन रंग असलेला (उदा. पांढरा आणि चॉकलेटी किंवा पांढरा आणि काळा). विज्ञानाच्या भाषेत क्रॉस ब्रीड, दोन जातींचे गुणधर्म असल्यामुळे चांगला समजला जातो.
18 Oct 2011 - 8:10 am | पाषाणभेद
आपण आमचे बालकवी आहात.