रक्तगंध

प्रचेतस's picture
प्रचेतस in जे न देखे रवी...
13 Oct 2011 - 10:12 pm

आमचा हा विडंबनाचा चुकार टुकार प्रयत्न
प्रेरणा -स्पा यांची ग्रहण ही कथा आणि गणेशा यांची स्पर्शगंध ही कविता.

हे विडंबन रचण्यात ५०फक्त यांचे मोठे योगदान आहे, त्यांचे खास आभार.

रक्तगंधाने बुजलेल्या वाटेवरती
तो स्पर्श बोचरा होता
सुरकुतल्या कोरड्या कातडीत मात्र
रक्तनिर्झर खळाळत होता

हलक्याच कुटील चाव्याने
तो कुशीवर वळताच
त्या हिरव्या डोळ्यांच्या मागे
देह वेदनेत बुडाला होता

तशातच आकाशात रात्रीने
सोडला काळिमा अभद्र
कौलारु खोल्यांमधुनी अजुनी
तो रात्री भटकत होता

जळमटलेल्या काळोख्या रात्री
एक चांदणी धुरकट होती
नशीबाच्या पटावरती माझ्या
काळी मांजरं खेळत होती.

भयानककरुणअद्भुतरसकविताविडंबन

प्रतिक्रिया

पैसा's picture

13 Oct 2011 - 10:20 pm | पैसा

भयानक विडंबन आहे! मिसळ छान जमली पण.

(स्वगतः हर्षद सक्तीच्या विश्रांतीचा फार छान उपयोग करतो आहे आणखी काही जणाना अशी सक्तीची विश्रांती मिळो ही "भयंकर"सदिच्छा व्यक्त करून मी काढता पाय घेते! ;) !

सूड's picture

13 Oct 2011 - 11:05 pm | सूड

चारोळ्या लिहीता येत नाही म्हणता म्हणता सारा सुका मेवा ( कविता बीभत्स, भय रसाची असली तरी ही उपमा देतोय) पेरल्यागत केलं की !!

जबरा !!!

सहकार तत्वावर झक्कास काव्यरचना चालू आहे मंडळी. :)

किसन शिंदे's picture

14 Oct 2011 - 8:41 am | किसन शिंदे

हाहाहा...ठोठोठो...

मांजरीचे विडंबन करू नका रे..नायतर ती गंगी येईल तिच्या सगळ्या गँगला घेऊन...मग तुमचाही होईल 'हर्षद बोरकर'.

:D :D

बाबो ....

वल्ली सेठ.... एकदम कविता वेग्रे....

काय खर नाय ..
हर्षद पण पेटलाय :)

मस्तच जमली आहे,.
एक स्वतंत्र कविता म्हणून सहज खपून जाईल ..

भयरसातली कविता पहिल्यांदाच वाचली रे बाबा
तुफान ,...

अ‍ॅकदम 'भोयोंकर भीषण सुंदोर' कॉबिता....

वल्लीने केलेल्या कवितेला नमन. एक गद्य अन एक पद्य एकत्र करुन कविता लिहिणं हि सोपि गोष्ट नाहि,
आणि यात माझे योगदान फक्त व्याकरणाच्या चुका सुधारण्याएवढेच आहे,

@ स्पा, तु हि कथा मालिका मोठि कर, मग त्याचि टिव्ही सिरियल नायतर फिल्म बनवु, अन हि कविता त्याला टायटल साँग म्हणुन वापरु.

कसं आहे ' अबी नाल मिलाय ना तो घोडा ढुंढनेको जातेय, क्या बराबर है ना ?

>>स्पा, तु हि कथा मालिका मोठि कर, मग त्याचि टिव्ही सिरियल नायतर फिल्म बनवु, अन हि कविता त्याला टायटल साँग म्हणुन वापरु.
अगदी !! त्यात स्पाचे डोळे पण हिरवे आहेत. इच्छाधारी मांजर करुया त्याला. :D

इच्छाधारी मांजर करुया त्याला.

<<< आहट सारख्या मालिकेतला कुठलाही मांत्रिक >>> आपण कोण करणारे न करणारे सुड्स?
कदाचित कोणी हिरवी इच्छाधारी मांजरच स्पावड्याचं मानव रुप घेऊन मिपावर ... आता उरलो प्रतिसादापुरता म्हणत असेल.
अत्रुप्त आत्मा आहेच. आता हे पण. मिपाची 'सर्वरशांती' केली पाहिजे.<<< आहट सारख्या मालिकेतला कुठलाही मांत्रिक >>>

काय? ;)

>>आता उरलो प्रतिसादापुरता म्हणत असेल.
रत्नांग्रीची मांजर असेल तर कदाचित आता उरले 'पति'सादापुरती म्हणेल. :D

@ ५० फक्त : मांजर काय नि बोका काय लोकं घाबरतील असं काही केल्याशी मतलब. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

15 Oct 2011 - 11:07 pm | अत्रुप्त आत्मा

रत्नांग्रीची मांजर असेल तर कदाचित आता उरले 'पति'सादापुरती म्हणेल. :bigsmile:

खपलो....फाट फुट फट्याक....

५० फक्त's picture

14 Oct 2011 - 10:35 am | ५० फक्त

मांजर का बोका ?

बोका, बोकाच.
ठाकुर्लीचा हिरवट (डोळ्यांचा)बोका. :)

अत्रुप्त आत्मा's picture

15 Oct 2011 - 11:15 pm | अत्रुप्त आत्मा

@ठाकुर्लीचा हिरवट (डोळ्यांचा)बोका. .... या बोक्याला एकाच वेळी बय्राच मांजरींची दुसय्रांना घाबरवावे कसे या विषयावर शिकवणी घेतांना आंम्ही पाहीले आहे... अं..अं..अं.. कुठलं गाव बरं ते परवा गेलो होतो आंम्ही ते?...
हां ... चोळगाव चोळगाव म्हणे,,, बरोबर ना हो वल्लीदादा...? ;-)

प्रचेतस's picture

15 Oct 2011 - 11:28 pm | प्रचेतस

चोळगाव नाही हो भटजीबुवा, चोळेगाव ते.

मी ऋचा's picture

15 Oct 2011 - 1:05 pm | मी ऋचा

>>@ स्पा, तु हि कथा मालिका मोठि कर, मग त्याचि टिव्ही सिरियल नायतर फिल्म बनवु, अन हि कविता त्याला टायटल साँग म्हणुन वापरु.

तिकडे डेटाथेफ्ट केल्यापासून याला सारखे "बिन्नेस" च्याच कल्पना सुचू राहिल्या की काय?

प्रागऐतिहासिव,पारचीन व आधुनिक मराठी साहित्या वि शवाच्या अखंद फिरत राहणा-या ग्रह गोलांच्या अतिलंबित अन परप्रचंलित गतीमुळे दोन दोलायमान प्रबुद्ध विनयशोल परमाणु जेंव्हा एकमेकांना असामाईक प्रत्यजैवसाद्यमजअणु प्रलयमध्यक्षेत्रात आवाजाच्या गतिच्या एक सप्तमांश गतीने इंधन अधिभारित निर्वात पोकळीत भेटतात, तेंव्हा अशी समाज रचनेच्या उत्तुंग अंधश्रद्धेला मुळापासुन हलविणारी एखादी रचना निरमा ण होते, त्याल तुम्हि व्यापार म्हणता. आज आपणसुद्धा एक सशक्त प्रतिदोलायमान अतिमाणु असल्याची शंका आली.
.
.
.
.
.
.
.
.
.
सदर प्रतिसाद ज्याला समजेल त्याला माझ्याकडुन एक लिटर अतिशय दुर्मिळ आणि किंमती असे डायहायड्रोजन मोनोऑक्साईड देण्यात येईल.

प्रचेतस's picture

15 Oct 2011 - 5:12 pm | प्रचेतस

_/\__/\__/\_

अत्रुप्त आत्मा's picture

15 Oct 2011 - 5:53 pm | अत्रुप्त आत्मा

@सदर प्रतिसाद ज्याला समजेल त्याला माझ्याकडुन एक लिटर अतिशय दुर्मिळ आणि किंमती असे डायहायड्रोजन मोनोऑक्साईड देण्यात येईल.

साष् --^-- टांग नमन

मी-सौरभ's picture

15 Oct 2011 - 11:31 pm | मी-सौरभ

_/\_

मी ऋचा's picture

17 Oct 2011 - 11:25 am | मी ऋचा

[] माझी शरण चिट्ठी स्वीकार करा गुरूदेव!

चौकटराजा's picture

17 Mar 2012 - 10:57 am | चौकटराजा

अफ्जफ्जकज्फ्क्स्द्ज्र्तितिरेर्त्च्व्क्ष्व्म्क्ष्व्,फ्ग्द्फ्क्ग्रोतेइर्प्तोएतिएओर्त्क्द्फ्ल्ग्क्द्फ्ग्क्द्ग्ल्केओतिरोतेइतोफ्स्द्फ्क्स्ल्फ्क्स्फ्ल

वरील लिपी ही रोमन कालीन मौर्य घराण्याची आहे. त्यावर गांधी घराण्याचा प्रभाव दिसत आहे . वा काही शब्द हे किराणा गायकीचे दिसतात.
नेपाळी संतकवि जॉग मुब खे यांचाही ही लिपी बनविण्यात यात हात आहे. आपले संतकवि मानदेव ( यांचे मूळ नाव वेगळे होते पण पंजाबात मान आडनावाच्या गायकाशी यांची घन मैत्री झाली व त्याना आपल्या गायक मित्राचे नाव मिळाले ) हे पंजाबातून पुढे पिंडारी मागे तिबेटी गेले
त्यावेळी त्यानी व तिबेटी संतकवि जॉग मुब खे यानी मिळून एक वरील लिपीत काव्य केले. आपले इंडी वल्ली यानी लीलया त्याचे डिकोडिंग
हपिसच्या वेळात केले. पण मूळ काव्य हे लक्ष्मी प्यारे, हुस्नलाल भगतराम, शंकर जय या शैलीचे असल्याने एकाने टंकायचे दुसर्याने भंकायचे
असे ठरले. इति लेखनसीमा.

गणेशा's picture

14 Oct 2011 - 10:20 am | गणेशा

विडंबन ते ही करुन भयानक ..

प्रत्येक कडव्यात मस्त मजा आणली आहे, वाचताना मजा आली भारी..

जळमटलेल्या काळोख्या रात्री
एक चांदणी धुरकट होती
नशीबाच्या पटावरती माझ्या
काळी मांजरं खेळत होती.

एकदम भारीच ...

सुरकुतलेली कोरडी कातडी, कुटील चावा, अभद्र काळीमा जळमटलेला काळोख

असले उच्चतम विशेषणे वापरुन तुम्ही खुप्च मजा आणली राव ..

अवांतर : ५० फक्य यांच्या गाडीबरोबर आता वल्ली पण म्हंटल्यावर मेजवाणी उत्कॄष्ट होणारच

अंधार, धुर, आडवी मांजर काही खर नाही.

गंधाने बुचलेल्या (नेल्पॉलीशच्या)बाटलीवरती
तो स्पर्श बोचरा होता
सुरकुतल्या कोरड्या कातडीत मात्र
रक्तनिर्झर खळाळत होता

हलक्याच कुटील चाव्याने
तो कुशीवर वळताच
त्या पिंगट डोळ्यांच्या मागे
देह वेदनेत बुडाला होता

तशातच आकाशात रात्रीने
सोडला काळिमा अभद्र
खोल्यांच्या गल्यांमधुनी अजुनी
तो रात्री (नव्या सावजांच्या शोधात)भटकत होता

जळमटलेल्या काळोख्या रात्री
एक चांदणी धुरकट होती
नशीबाच्या पटावरती त्याच्या
Pussycat खेळत होती.

प्रचेतस's picture

14 Oct 2011 - 1:49 pm | प्रचेतस

मस्त रे आशू.
१ नंबर.

अपल्या प्रतिभेची खोली पाहुन आंम्हास असे वाटुन ह्रायले आहे की,,,आपल्या आत-'म' नावाचं शून्य दडलेलं आहे ... ज्यातुन अशी ख-मंगं निर्मिती होऊ शकते... ;-)

अवांतर- 'म' फॉर महात्मा...

आत्मशून्य's picture

15 Oct 2011 - 10:43 pm | आत्मशून्य

प्रतिभेची खोली ?

प्रतिभा नावाचे कोणीच परीचीत नसल्याने आपण कोणाच्या खोली बद्दल बोलत आहात याबाबत संपूर्ण अंधार आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Oct 2011 - 11:25 pm | अत्रुप्त आत्मा

प्रतिभा नावाचे कोणीच परीचीत नसल्याने.... ह्हे... तुमच्या त्या प्रतिभेला येवढ्या लवकर विसरलात...? का परिचयच झाला नव्हता नीट..? ;-)

कोणाच्या खोली बद्दल बोलत आहात याबाबत संपूर्ण अंधार आहे. :-D

तुमचा जो अंधार आहे,,,त्याची खोली कीती आहे..? हे मला नीट ठाऊक आहे हो ;-) जाऊ दे अता यापुढे ''तळ'' गाठण्याची माझी विच्छा नाही... ह्ही ह्ही ह्ही

मी-सौरभ's picture

15 Oct 2011 - 11:33 pm | मी-सौरभ

तुम्हाला बरी ती प्रतिभा माहित आहे ;)

प्रचेतस's picture

15 Oct 2011 - 11:40 pm | प्रचेतस

आम्हाला पूर्वी दूरदर्शनवर 'प्रतिभा आणि प्रतिमा' कार्यक्रम लागायचा तो माहित आहे ब्वा.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Oct 2011 - 7:52 am | अत्रुप्त आत्मा

@तुम्हाला बरी ती प्रतिभा माहित आहे ... या प्रति--सादा मुळे आमच्याही प्रतिभेला बहर आला...त्यात एक उषासूक्त अठवलय...जिज्ञासूंनी पहा बर जुळतय का ते?

हम को जो ताने देते है,हम खोयें है इन रंगरलियोंम मै।
हमने उनको भी छुप छुप के,आते देखा इन गलीयों मै
;-)

श्यामल's picture

14 Oct 2011 - 6:26 pm | श्यामल

मस्तच कविता !

ज्ञानराम's picture

15 Oct 2011 - 3:28 pm | ज्ञानराम

भन्नाट........!

ज्ञानराम's picture

15 Oct 2011 - 3:28 pm | ज्ञानराम

भन्नाट........!

मीनाक्षी देवरुखकर's picture

17 Oct 2011 - 11:36 am | मीनाक्षी देवरुखकर

छनाच कविता ,जाम अवद्लि

सांजसंध्या's picture

17 Mar 2012 - 9:02 am | सांजसंध्या

कविता आवडली :)

नारायण धारपांच्या कथांवर आधारीत अनोळखी दिशा नावाची एक मालिका स्टार प्रवाह वर सुरू आहे. त्याचं शीर्षकगीत म्हणून एकदम फिट्ट आहे !

नारायण धारपांच्या कथांवर आधारीत अनोळखी दिशा नावाची एक मालिका स्टार प्रवाह वर सुरू आहे. त्याचं शीर्षकगीत म्हणून एकदम फिट्ट आहे !

पण त्या मालिकेला आधीच एक शिर्षकगीत असेल ना?

स्पा's picture

17 Mar 2012 - 9:25 am | स्पा

वल्लीची जुनी कविता वर आणल्याबद्दल मनापासून धन्यवाद सांज्संध्याजी.. तुम्ही खर्या फ्यान ...

-- तृप्त आत्मा (स्पा)

अत्रुप्त आत्मा's picture

17 Mar 2012 - 9:40 am | अत्रुप्त आत्मा

हल्लीचीच जुनाट प्रति-क्रीया वर आणल्याबद्दल मनापासून धन्यवाद स-पाजी.. तुम्ही खरे छताला लटकलेले फ्यान ... ;-)

अत्रुप्त आहे हा-(पहा) :-p

स्पा---आत्मा ;-)

चौकटराजा's picture

17 Mar 2012 - 11:01 am | चौकटराजा

ह्म्म , मनी गोड हुरहूर लावणारी कविता-
आपला काउंट ड्राक्युला .