आर्यांचे मुळस्थान कोणते? : डॉ. आंबेडकर

पंकज's picture
पंकज in जनातलं, मनातलं
31 May 2008 - 7:44 pm

आर्यांचे मुळस्थान कोणते? याबद्दल बरेच वाद आहेत. एका चर्चेमध्ये नुकताच त्याचा उल्लेख झाला. जगातील अनेक विचारवंतांनी त्याबद्दल मते मांडली आहेत. भारतातील एक विचारवंत डॉ. भि. रा. आंबेडकर यांनी आर्यांच्या मुळस्थानाबद्दल १९४६ साली मते मांडली.

आंबेडकरांनी आर्यवंशाबद्दल व आर्यांच्या मुळस्थानाबद्दल प्रचलीत असलेल्या सिध्दांताचा या लेखामध्ये अभ्यास केलेला आहे. ते पुढिलप्रमाणे..

आर्य वंशाबद्दल बरेच मतभेद आहेत परंतू काहि अंगाबद्दल पुर्ण एकमत आहे ते येणेप्रमाणे: -

१. ज्यांनी वैदिक वांङमय तयार केले ते लोक आर्य वंशाचे होते.
२. हे लोक मुळचे भारताबाहेरचे. त्यांनी भारतावर स्वारी केली.
३. मुळ रहिवाशी दास व दस्यू या नावाने ओळखले जात. त्यांचा वंश व आर्यांचा वंश यात फरक होता.
४. आर्यांचा रंग गोरा होता. दास व दस्यू यांचा रंग काळा होता
५. आर्यांनी दास व दस्यू यांना जिंकून अंकित केले.

आर्यवंश या नावाच एक वंश अस्तित्वात होता, या पायावर सिध्दांताची उभारणी केलेली आहे, या मुद्दाचा प्रथम विचार करणे जरूर आहे.
हा आर्यवंश म्हणजे काय? यासंदर्भात आंबेडकरांनी 'वंश' आणि 'लोक' यांच्यात भेद करून आर्यवंशासंदर्भात वंश म्हणजे काय? याचा अभ्यास केला.

वंश म्हणजे काय? आनुवंशिकपण मिळालेले काही विशिष्ट मुणधर्म ज्यांच्यामध्ये दिसून येतात, अशा लोकांचा समाज, अशी "वंश" शब्दाची व्याखा करता येइल. शरीराच्या कातडीचा रंग आणि बांधा हवा व प्रदेश यावर अवलंबून असतात, त्यामुळे डोक्याचा आकार म्हणजे डोक्याची लांबी, रुंदी आणि उंची यांचे सर्वसाधारण प्रमाण लोकांचा वंश कोणता आहे, हे ठामपणे ठरविण्यास उपयोउगी पडते., असे मानवशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ समजतात.

प्रो. रिप्ले वंशशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यांच्या मते युरोपियन लोक तीन वंशाचे आहेत.
१. ट्युटॉनिक (लांब डोके)
२. आल्पाईन (सेल्टिक) (गोल डोके)
३. मेडिटॅरिनीयन (लांब डोके)

शारीरीक दृष्टीने पाहिले तर आर्य वंश अस्तित्वात आहे, असे वाटते का? या विषयावर दोन प्रकारची मते आहेत.
१. आर्य वंशातील लोकांची डोकी लांब असतात असे वर्णन मानववंशशास्त्रज्ञ करतात. परंतु हे वर्णन पुरेसे दिसत नाही. कारण लांब डोक्याचे दुसर्यारही वंशात आहेत. प्रो. रिप्ले यांच्या प्रमाणे युरोपातील दोन वंशाचे लोक लांब डोक्याचे आहेत. त्यापैकी कोणता वंश हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
२. प्रो. मॅक्स मुल्लर, प्रो. बेनफे यांनी आर्यांसंदर्भात भाषाशास्त्राचा आधार घेतला आहे. आर्य लोकांचे मुळस्थान शोधून काढावयाचे तर ते मानववंशाची प्राथमिक भाषा असेल तीवरून शोधून काढावे लागेल, असे मत प्रो. बेनफे यांनी माडंलेले आहे. ग्रिक व वैदिक वांङमयात आर्य व इतर शब्दांच्या जवळपास जाणार्‍या शब्दांवरून सर्वसाधारणपणे एक भाषा बोलणार्‍या लोकांचा वंश वा विशिष्ट प्रकारचे अवयव असणार्‍या लोकांचा वंश या दोन्ही अर्थांनी प्रो. मॅक्स मुल्लर यांनी आर्यांचे अस्तित्व मान्य केले आहे.

वैदिक वांङमय चाळून पाहिले असता 'अर्य' व 'आर्य' हे दोन शब्द ऋगवेदांत सापडतात, 'अर्य' हा शब्द ऋग्वेदांत ८८ ठिकाणी वापरलेला आहे. (१) शत्रु , (२) सभ्य माणुस, (३) भारताचे नाव आणि (४) मालक, वैश्य किंवा रहिवाशी, अशा निरनिराळ्या अर्थांनी हा शब्द वापरलेला आहे.

"आर्य" हा शब्द ऋग्वेदांत ३१ ठिकाणी वापरलेला आहे. परंतु तो आर्य वंश या अर्थाने एकाही ठिकाणी वापरलेला नाही. वर केलेल्या विवेचनावरून असे स्पष्ट होते की, 'अर्य' व 'आर्य' हे दोन शब्द ऋगवेदांत वंशवाचक या अर्थाने मुळीच वापरलेले नाहित.
ग्रीक व हिंदी लोकांनी सिंहाला जे नाव दिले आहे त्या नावाचे आर्यांच्या मातृभाषेतील एकाही शब्दाशी साम्य जुळत नाही.

कॉकेशस पर्वताचा प्रदेश आर्यांचा मुळ प्रदेश आहे असे मत मांडणार्‍या विद्वानांचा दुसरा पक्ष आहे. कॉकेशियन लोक विशेष चेहर्‍याचे व बांध्याचे आहेत असे कोणी समजू नये. त्यांच्यात डोळ्यात भरण्यासारखे काहि नाही, निरनिराळ्या भाषा बोलनारे, अनेक धर्म पाळनारे, भिन्न -भिन्न चालीरीती पाळणारे लोक आहेत. ते एका प्रकारचे लोक नाहित तर ते अनेक लोकांची खिचडी आहे. अशा प्रकारचा प्रदेश आर्यांचे मुळस्थान कसा असू शकेल? उलटअंशी या प्रदेशात अनेक लोक येऊन राहिले व मेले त्यांच्याबरोबर त्यांच्या भाषा रितीभाती मातीत गाडल्या गेल्या.

नैसर्गिक दृष्ये, अलौकिक कथा व दंतकथा यांची जी वर्णने वैदिक वांड्मयात पाहावयास मिळतात ती उत्तर ध्रुवाजवळच्या नैसर्गिक दृष्याशी हुबेहुब हजुळतात. यावरून श्री. टिळकांनी आर्क्टिक प्रदेश हाच आर्यांचा मुळ प्रदेश असला पाहिजे असा निष्कर्ष काढला.

श्री. टिळकांचा सिध्दांत मौलिक खरा, तथापि त्यात एक न्यून आहे. ते म्हणजे वैदिक आर्यांचे आवडते जानवर घोडा. हे जानवर आर्यांचे आयुष्य व धर्म यांच्याशी जाम जखडलेले आहे. अश्वमेध यज्ञातील घोड्यांशी संभोग करण्याकरीता राज्यांच्या राण्यामध्ये नेहमी चुरस चालु असे. (यजुर्वेद आणि माधवाचार्याचे भाष्य) या गोष्टीवरूनच असे दिसते की, घोड्याला वैदिक आर्य लोकात अत्यंत महत्व प्राप्त झालेले होते. परंतु आर्क्टिक प्रदेशात घोडे होते का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी मिळाले तर आर्यांचे मुळस्थान आर्क्टिक प्रदेशात होते, हा सिध्दांत लंगडा पडतो.

आर्यांनी भारतावर स्वारी केली मूळच्या रानटी रहिवाशांवर स्वार्‍या करून त्यांना जिंकले.
ऋग्वेदात या मुद्याला यत्किंचितही पुरावा मिळत नाही. याबाबतीत श्री. पी. टी. श्रीनिवास अय्यांगर यांचे मत (Life in Ancient India in the age of the Mantras, pp. 11-12) :- "आर्य, दास व दस्यु हे शब्द ज्या मंत्रांमध्ये वापरलेले आहेत त्यात ते वंशवाचक नव्हे तर पंथवाचक या अर्थाने वापरलेले आहेत. ऋग्वेदातील मंत्राची शब्दसंख्या १,५३,९७२ आहे. त्यात आर्य शब्द फक्त ३३ वेळा वापरण्यात आलेला आहे. जर आर्यांनी मूळ रहिवाश्यांचा पराभव केला असेल तर आत्मश्लाधापर अनेक वेळा आर्य शब्दाचा उल्लेख केला असता"
आर्यांचा मुळ प्रदेश भारताबाहेर होता याला वैदिक वांङ्मयात पुरावा मिळत नाही. वैदिक वांङ्मयात सात नद्यांचा उल्लेख "माझी गंगा, माझी यमुना, माझी सरस्वती" अशा शब्दांनी केलेला आहे. परका माणूस नद्यांना इतक्या प्रेमळ व जिव्हाळ्याचा शब्दांनी कधी संबोधेल काय? मात्र तो जर पुष्कळ काळ नद्यांच्या सहवासात राहिला असेल तरच त्याला आपुलकी वाटू लागेल.

आर्यांचे मुळस्थान भारताबाहेरचे आहे याला वैदिक वांङ्मयात पुरावा मिळत नाही उलटपक्षी, वैदिक आर्यांचे मुळस्थान भारतच असावे याचेच पुरावे जास्त मिळतात.

क्रमश: (बराच मोठा लेख आहे. जसा वेळ मिळेल तसे इतर भाग टाकण्याच प्रयत्न करेल. )

इतिहासमत

प्रतिक्रिया

चिन्या१९८५'s picture

31 May 2008 - 10:28 pm | चिन्या१९८५

आर्य बाहेरचे होते ही थिअरी बर्‍यापैकी चुकिची आहे. खालील लिंक्स पहा-
http://video.google.com/videoplay?docid=7678538942425297587

लेख- http://www.archaeologyonline.net/artifacts/scientific-verif-vedas.html

मन's picture

1 Jun 2008 - 1:00 am | मन

माझ्या वाचण्यात जी काय माहिती आली त्यानुसार मलाही तेच पटतं("बाहेरुन" वगैरे कुणी काही आक्रमण केलेलं नाही.)

याबाबतीत पुढले भाग वाचायला आवडतील,
काही नवीन मुद्दे, नवीन गोष्टी , नवीन दृष्टिकोन असल्यास तेही जाणुन घ्यायला आवडेल.
येउ द्यात मग ते ही लवकर.

आपलाच,
मनोबा

विकास's picture

1 Jun 2008 - 8:24 am | विकास

लेख माहीतीपूर्ण आहे. फक्त तो आंबेडकरांनी लिहीला आहे का तुम्ही ते नीटसे स्प्ष्ट झाले नाही. कारण लेख चालू झाल्यावर पण, "यासंदर्भात आंबेडकरांनी 'वंश' आणि 'लोक' यांच्यात भेद करून आर्यवंशासंदर्भात वंश म्हणजे काय? याचा अभ्यास केला"" असे वाक्य आहे, म्हणून हा प्रश्न.

धन्यवाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jun 2008 - 9:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण आहे, अधिक वाचायला आवडेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजे's picture

1 Jun 2008 - 12:07 pm | राजे (not verified)

आर्य आकाशातून पडले अथवा जमीनीतून आले... येथेच राहत होते.. अथवा बाहेरुन आले.... हे माहित झाल्यावर काय फरक पडणार आहे हे कोणी समजावून सांगेल का मला ?

स्वगत : हे माहीत नाही आहे ते माहीती करुन घेणे कधी कधी त्रासदायक ठरते... तर कधी वरदान !

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

"यासंदर्भात आंबेडकरांनी 'वंश' आणि 'लोक' यांच्यात भेद करून आर्यवंशासंदर्भात वंश म्हणजे काय? याचा अभ्यास केला"

मुळ लेख आंबेडकरांनीच लिहिला आहे. मात्र तो बराच मोठा आहे. प्रत्येक मुद्याचे स्पष्टिकरन करताना मुळ लेखात वैदिक वांङ्मयात तसेच जागतीक इतिहासातील बरेच संदर्भ दिलेले आहेत, ते संदर्भ टाळताना अनावधानाने वरील वाक्य आलेले आहे. मात्र वरील वाक्याची काहिही गरज नव्हती. ते वाक्य माझ्या चुकीने आलेले आहे.

आम्हाघरीधन's picture

30 Jun 2008 - 2:53 pm | आम्हाघरीधन

आर्यांचे मुळस्थान कोणते? याबद्दल बरेच वाद आहेत. एका चर्चेमध्ये नुकताच त्याचा उल्लेख झाला. जगातील अनेक विचारवंतांनी त्याबद्दल मते मांडली आहेत. भारतातील एक विचारवंत डॉ. भि. रा. आंबेडकर यांनी आर्यांच्या मुळस्थानाबद्दल १९४६ साली मते मांडली.

आंबेडकरांनी आर्यवंशाबद्दल व आर्यांच्या मुळस्थानाबद्दल प्रचलीत असलेल्या सिध्दांताचा या लेखामध्ये अभ्यास केलेला आहे. ते पुढिलप्रमाणे..

आर्य वंशाबद्दल बरेच मतभेद आहेत परंतू काहि अंगाबद्दल पुर्ण एकमत आहे ते येणेप्रमाणे: -

१. ज्यांनी वैदिक वांङमय तयार केले ते लोक आर्य वंशाचे होते.
२. हे लोक मुळचे भारताबाहेरचे. त्यांनी भारतावर स्वारी केली.
३. मुळ रहिवाशी दास व दस्यू या नावाने ओळखले जात. त्यांचा वंश व आर्यांचा वंश यात फरक होता.
४. आर्यांचा रंग गोरा होता. दास व दस्यू यांचा रंग काळा होता
५. आर्यांनी दास व दस्यू यांना जिंकून अंकित केले.

आर्यवंश या नावाच एक वंश अस्तित्वात होता, या पायावर सिध्दांताची उभारणी केलेली आहे, या मुद्दाचा प्रथम विचार करणे जरूर आहे.
हा आर्यवंश म्हणजे काय? यासंदर्भात आंबेडकरांनी 'वंश' आणि 'लोक' यांच्यात भेद करून आर्यवंशासंदर्भात वंश म्हणजे काय? याचा अभ्यास केला.

मित्रा पन्कज वरिल वाक्ये सत्य प्रमाणच आहेत. आर्य भारताबाहेरुनच आलेले आहेत हे वरिल वाक्यान्वरुनच सिद्ध आहे.
असो, आता ते स्वतः भारतीय आहेत असे मानायला हरकत नसावी किमान पक्षी त्यान्नी तसे मानावे.

अभिरत भिरभि-या's picture

30 Jun 2008 - 3:15 pm | अभिरत भिरभि-या

आर्यांचा रंग गोरा होता. दास व दस्यू यांचा रंग काळा होता

असो, आता ते स्वतः भारतीय आहेत असे मानायला हरकत नसावी किमान पक्षी त्यान्नी तसे मानावे.

म्हणजे कोण आतापर्यंत स्वत:ला परके समजत होते ? आणि आर्य म्हणजे उच्चवर्णिय (मुख्यत्वे ब्राह्मण) म्हणाल तर रंगाने काळे पण जातीने ब्राह्मण असे लोक महाराष्ट्रात वा दक्षिण भारतात खूप दिसतात याउलट निम्नवर्णिय ( खालच्या जातीचे) असूनही रंगाने गोरे असलेल्याची उदाहरणेही आहेत.