सेल मांडीयेला
सेल मांडीयेला,...............थैल्या घेउन हाती
धावती ग्राहक भाई रे
विचार विवेक,................गेला पालटूनी

एकमेका सांगतील घेई रे

धावती ग्राहक भाई रे..........................|धृ|
होतो गाजा फार,................खर्चती तत्पर
कापले पार ह्यांचे खिसे रे
फुका गेती माल,.................पडला बेकार

गीफ्टला समजुनी फ्री जणू रे
सेल मांडीयेला,...............थैल्या घेउन हाती
धावती ग्राहक भाई रे..........................|धृ|
गरज आवशकता,.................विसरुनी जाती
सेल पहाता ढीगाने घेती
खिसा खाली होता,.................कार्ड परजती

प्लास्टीकला पाझर फुटती रे

दिवाळीचा सेल,.................नववर्षी सेल
सेल फेकतो मायाजाल रे
ओपनींग सेल,..................क्लोजींगलाही सेल

क्लोज करवितो क्रेडीट अकौन्ट रे
सेल मांडीयेला,...............थैल्या घेउन हाती
धावती ग्राहक भाई रे
विचार विवेक,................गेला पालटूनी
विचार विवेक,................गेला पालटूनी
एकमेका सांगतील घेई रे
सेल मांडीयेला,...............थैल्या घेउन हाती
धावती ग्राहक भाई रे
प्रतिक्रिया
30 May 2008 - 7:31 am | विसोबा खेचर
मस्त विडंबन...!
प्लास्टीकला पाझर फुटती रे
ही ओळ सर्वाधिक आवडली! :)
तात्या.
30 May 2008 - 7:35 am | आजानुकर्ण
विचार विवेक,................गेला पालटूनी
विचार विवेक,................गेला पालटूनी
एकमेका सांगतील घेई रे
लै भारी
आपला,
(हसरा) आजानुकर्ण
30 May 2008 - 8:36 am | फटू
विचार विवेक,................गेला पालटूनी
विचार विवेक,................गेला पालटूनी
एकमेका सांगतील घेई रे
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
30 May 2008 - 9:05 am | अमोल केळकर
सेल मांडीयेला,...............थैल्या घेउन हाती
धावती ग्राहक भाई रे
एकदम भारी
केळकर
30 May 2008 - 10:42 pm | वरदा
ओपनींग सेल,..................क्लोजींगलाही सेल
क्लोज करवितो क्रेडीट अकौन्ट रे
झक्कास...
31 May 2008 - 1:56 am | बेसनलाडू
मजेशीर विडंबन. आवडले.
(आस्वादक)बेसनलाडू
31 May 2008 - 1:32 pm | जादू
सेल मांडीयेला,...............थैल्या घेउन हाती
धावती ग्राहक भाई रे..........................|धृ|
फारच छान
31 May 2008 - 3:41 pm | निखिल.मनोहर
खिसा खाली होता,.................कार्ड परजती
खिसा खाली होता,.................कार्ड परजती
प्लास्टीकला पाझर फुटती रे
झकास केलय विडन्बन... :))
31 May 2008 - 3:53 pm | चेतन
गरज आवशकता,.................विसरुनी जाती
सेल पहाता ढीगाने घेती
विडंबन आवडले
चेतन
1 Jun 2008 - 9:39 am | अरुण मनोहर
विसोबा खेचर, आजानुकर्ण, पुन्हा सतिश गावडे , केळकर, वरदा, बेसनलाडू, जादू , निखिल.मनोहर, चेतन इत्यादी रसीकांनी दिलेल्या प्रोत्साहनासाठी, तसेच कविता वाचलेल्या सर्व वाचकांचे आभार. लोभ असावा.
2 Jun 2008 - 11:43 am | रामदास
मला पण आवडली आहे कविता.
2 Jun 2008 - 2:26 pm | स्वाती दिनेश
खिसा खाली होता,.................कार्ड परजती
प्लास्टीकला पाझर फुटती रे
मजेशीर.. आवडले.
स्वाती
3 Jun 2008 - 7:32 am | अरुण मनोहर
रामदासजी, स्वाती दिनेश
नो प्रॉब्लेम. मिपावर खूप काळ पर्यंत सेल जारी रहातो. दुकानातला सेल सोडून इकडे हजेरी लावून कौतुक केल्याने चांगले वाटले.
3 Jun 2008 - 5:34 pm | नाखु
छान विडम्बन
मिसळीने नादावला स्वादाने खुळावला