लावणी: लग्नाचं वय माझं झालं

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
22 Sep 2011 - 3:42 am

लावणी: लग्नाचं वय माझं झालं

नक्षीदार कुयरी पदरावरची.........
हळद कुंकवानं भरलेली
सोळा सिनगाराचा साज लेवूनी...
ऐन्यापुढे उभी मी राहीली

पुढ्यात तुमच्या जवळ आले माळून मी मरवा
लग्नाचं वय माझं झालं; आता तारीख ती ठरवा ||धृ||

मुसमुसलेली ज्वानी माझी कळीदार ती काया
हाताला हात लावा अन पारखून घ्या तिला राया
अंग माझं सोन्यावानी तिस हजारी की हो झालं!
चांदीवानी चमचम करूनी उजळून ते आलं
तुमच्या मिठीत घ्या या रुप्याच्या रुपाला
लग्नाचं वय माझं झालं; आता तारीख ती ठरवा ||१||

पावसाळ्यामदी मोरलांडोरी पान्यामधी भिजती
झाडावरती राघू मैना घरट्यामधी लपती
आणि किती गोष्टी सांगू; गोड गोष्टीत रंगत आणाया
थंडी वाजूनी आले जवळी अंगी उबारा घ्यायला
जावू नका दुर आसं; गोड घासानं तोंड माझं भरवा
लग्नाचं वय माझं झालं; आता तारीख ती ठरवा ||२||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२२/०९/२०११

शृंगारप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

22 Sep 2011 - 5:20 am | प्रकाश१११

अरे वा ..!!लई झक्कास ..!!

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2011 - 8:36 am | अत्रुप्त आत्मा

अरं व्वा..!लै झ्याक ... काय 'भेदकपाषाण' साहेब,सध्या लावणी ऑन फायर का?...लै कडक कडक टाकताय सद्ध्या :-)

अवांतर-मिपावर लावणी मोहोत्सव जाहीर करावा.. ;-) अशी मी संपादकांना कळकळीची विनंती करीत आहे... :-)

गणेशा's picture

22 Sep 2011 - 1:01 pm | गणेशा

अप्रतिम ...
मस्त वाटाले वाचुन...
२ दा वाचली लावणी.. एकदम कडक.

.
.
.
.
फक्त
तुमच्या मुठीत घ्या.... ऐवजी तुमच्या मिठीत घ्या मस्त वाटले असते.

शाहिर's picture

22 Sep 2011 - 1:30 pm | शाहिर

बरीच जण शिट्ट्या वाजवत आहे ...
टोप्या , फेटे उडवत आहेत ..
पाटील मिशांना पीळ देत मान डोलावत आहे..

---------------------------------------------------
लावणी एकदम फक्कड जमली आहे

उदय के'सागर's picture

22 Sep 2011 - 1:52 pm | उदय के'सागर

लई भारी !!!

(अहो पाषाणभेद, तुम्हाला मी एक पत्रं पाठ्वलं आहे तुमच्या जीमेल वर(pashanbhed@gmail.com), तुमचा काही प्रतिसाद नाही त्यावर म्हणुन इथे पुन्हा नमुद करावे वाटले)