नमस्कार मंड्ळी, या भागात फक्त फोटोच आहेत, बहुतेक उरलेले सगळे अर्थात काही वगळुन, ट्रिपला आलेल्या मेंबरांच्या विनंती वजा आदेशाला मान देउन सर्व मान्य फोटो टाकत आहे, सर्व प्रकारच्या फोटोसाठी सदर सदस्यांना व्यनि करावेत ही विनंती.
नाय तर काय हि लोकं यायची नाय ओ, कोकण ट्रिपला पुढच्या महिन्यात...
हे फोटो सगळ्यांनीच काढलेले आहेत..
जबराट फ्रेम
त्यातच अजुन एक
आणि अजुन भरपुर
अजुन एक जबराट मॅक्रो..
पत्थराच्या छातीवर उमललेला गालिचा...
नभ उतरु आलं
धेनु घेउन जाय ....
निसर्गातले डोंगर अन माणसानं बांधलेले सिमेंटचे बंधारे सगळ्यांनाच व्यापुन उरलेली हिरवाई
म्या राजाय इतं,
नानाच्या अंगठ्याच्या कड्यावरचा सोनेरी काठ
अजुन एक वॉलपेपर साठी..
आणि या नंतर मस्ती आणि मजा
नको न्याहा़ळु नितळ काया....
इथं पाण्याला ओढ बेकार होती, एका मोठ्या दगडाला अडकलो म्हणुन हे लिहु शकतोय नाहीतर मला भेटायला दवाखान्यातच यावं लागलं असतं..
ह्याला अन मालोजीला धुवुन काढायचा राहिला, म्होरच्या टायमाला
असो, एवढा गोंधळ घालुन एक गागल तोडुन अन एकाचा चष्मा हरवुन, अन दोघा तिघांच्या हाता पायाला जखमा घेउन परत, पुन्हा त्या खराब रस्त्यावरुन
वाटेत जुन्नरला बटाटेवडे व चहा घेतला, अंधारायला लागलं होतं, विनोदच्या भावानं सकाळी पाठवलेला मेसेज आम्हाला आता मि़ळाला होता, पण आता आमच्या डोक्यात वाईनरीला जायचं होतं, नारायणगावच्या पुढं ५-१० किमिला असलेल्या वायनरीमध्ये पोहोचलो पणं आम्हाला थोडा उशिर झाला असल्यानं वायनरी पाहता आली नाही, मग तिथल्या हाटेलात हे पाहिलं अन हे पिलं,
हा ड्रम बहुधा रिकामा होता, आता सवयीनं काही च्यालेंज आहे का चार ड्र्म द्रव प्यायचं वैग्रे चवकशी केली, तसं काहि नाही तिथं.
आमच्या माहिति अधिका-यांनी पुरवलेल्या माहितीनुसार बाटलीतल्या वाईनमध्ये सिओ२ तयार होण्यासाठी त्या खमध्याला ९२११.३२४ अंशात अशा प्रकारे ठेवतात की आंतरराष्ट्रीय परांचलन गतीने प्रत्येक सेकंदाला त्या बाटलीत सुमारे एक दशांश सुपरिय अनंत सिओ२ तयार होतो.
या थोड्या सरळ आहेत म्हणजे यात सिओ२ तयार झालेला असावा
आमच्यासाठी बाटलीची काच उत्तम क्वालिटिची आहे अन वरच्या स्टिकरचे पिरिंट पण छान आहे, आत काय का असेना
ही खरंतर नंतर घेतली होती, आधी ही खालची
अन हे प्रत्येकाचे सेपरेट स्टाइलचे गिलास,
ही थोडी कलाकारी
सापड्लं हे त्या वायनरीचं नाव
जेवणात स्टार्टरच जास्त घेतले होते अन शेवटी हैदराबादी बिर्यानी, खिचडी खाउन ट्रिपला न आलेल्यांना शिव्या घालुन लास्ट फोटो काढुन परत निघालो.
आता फोटोखाली नावं टाकावीत एवढे अनोळखी नाही कुणी यात. आणि हो महत्वाचं राहिलं हे सगळं फक्त ७५० /- प्रत्येकी मध्ये साध्य करु शकलो.
अन एंडला दोन फोटो मिंटी अन धनाजीच्या गाडीचे,
असो, नेहमीप्रमाणे या ट्रिपमध्ये पण पुढच्या ट्रिपची घोषणा केली गेली, नवरात्र ते दिवाळी या दरम्यान कोकणात जायचं ठरवत आहोत, या नेहमीच्या मेंबरांना सोडुन कुणी येणार असेल तर मला किंवा वल्लीला व्यनि करा, माहिती कळवली जाईल. ट्रिप शक्यतो ८,९ च्या शनिवार व रविवार असेल, शुक्रुवारी मुक्कामाला जाउन रविवार संध्याकाळी परत येणे असा बेत आहे.
माझं म्हणाल तर या वर्षीच्या १२ उत्तरीकहाण्यांपैकी ही ७ वी कहाणी सुफल संपुर्ण.
प्रतिक्रिया
21 Sep 2011 - 11:31 pm | इंटरनेटस्नेही
मस्त मस्त! वाईनचे एवढे फोटो पाहुन प्रचंड जळजळ झालेली आहे. कुठे फेडाल ही पापं?
22 Sep 2011 - 9:43 am | मी-सौरभ
वाईन सोड रे ईंट्या...
पाण्यातल्या मासोळ्यांचे फोटो तर लै भारी आलेत.
पण ते ईथे टाकता येण्यासारखे नाहीत ;)
22 Sep 2011 - 10:04 am | सुहास झेले
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र... प्रायव्हेट धागा काढता येईल का त्यासाठी ;-) :D
22 Sep 2011 - 11:38 am | मालोजीराव
हेच म्हणतो ...'२१ वर्षांवरील फक्त ' असा धागा वेग्रे काढता आला तर पहा ;)
22 Sep 2011 - 12:10 am | प्रभो
झकास!!
22 Sep 2011 - 12:11 am | सुहास झेले
चिअर्स !! :)
22 Sep 2011 - 12:16 am | पाषाणभेद
मस्त फोटो सफर झाली
22 Sep 2011 - 8:02 am | स्पा
रापचिक फोटो
फुलांचे तर अप्रतिम आलेत..
चायचं वाय्नारीत.. वप्या फुल टर्राट्ट पाडलेल दिसतंय :D
22 Sep 2011 - 8:38 am | धन्या
मस्तच रे पन्नास.
तसा वयाच्या तेविसाव्या वर्षांपर्यंत मी खेडयातच वाढलो. भातशेती, गाई - म्हशी, गावाच्या बाजूने वाहणारी काळ नदी या सार्यांच्या अंगाखांद्यावर खेळत लहानाचा मोठा झालो. पुढे यथावकाश खेडं सुटलं, आकाशात भरार्या मारल्या. परंतू पायाखालची माती मात्र सुटली नाही. त्यामुळे डोंगर दर्यांनी, नदी नाल्यांनी साद घातली की माझ्याही नकळत मी त्या हाकेला ओ देदतो...
असो. एका सुंदर दिवसासाठी आमच्या मिपाकर मित्रांचे आभार.
आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन कार्यकर्त्यांचे "खास" फोटो इथे न डकवल्याबद्दल तुमचेही खास आभार. अर्थात असे फोटो डकवायचे असे ठरवले असते तर "आमच्याबरोबर" तुम्हीही सुटला नसतात हे विनम्रपणे सांगू ईच्छितो ;)
22 Sep 2011 - 10:36 am | ५० फक्त
' अर्थात असे फोटो डकवायचे असे ठरवले असते तर "आमच्याबरोबर" तुम्हीही सुटला नसतात हे विनम्रपणे सांगू ईच्छितो''
मी आधीच सुटलेला आहे, म्हणुन तर ते फोटो टाकलेले नाहीत, मुख्य कारण हेच आहे, तुमचं उगा निमित्त आहे.
22 Sep 2011 - 10:48 pm | मालोजीराव
फोटू न डकवल्यामुळे पन्नास आणि धनाजीराव यांनी सुटकेचा निश्वास टाकलेला आहे.
(संदर्भ : निश्वास टाकल्याचा आवाज वारज्याहून कात्रज पर्यंत पोचला गेलेला आहे )
- मालोजीराव
22 Sep 2011 - 8:47 am | प्रचेतस
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर धबधबांच्या स्वरूपात उगम पावणार्या या निर्झरांना पावसाळ्यात कमालीचे अवखळ स्वरूप प्राप्त होते. सदस्यांनी या खळाळत्या पाण्यात डुंबण्याचा पुरेपूर आनंद लुटला. इतके भिजून झाल्यावर वप्या तर बेक्कार कुडकुडायला लागलं. मग जुन्नरच्या चहाशिवाय पर्याय नव्हता.
नारायणगावची वायनरीचे हाटेल लै भारी. पब्लिक वाईनचा आस्वाद घेण्यात मग्न होतं आणि आम्ही दोघं तिघं वाफाळत्या सूपचा ;). तिथं मस्त दोनेक तास घालवून परत निघालो ते १२ वाजेपर्यंत पुण्यात पोहोचलो.
आणि हो, ५० फक्त यांनी गाडी सुरेख चालवलीच पण धनाजीरांचा मात्र रात्री गाडी चालवण्याचा पहिलाच अनुभव होता आणि त्यात ते पूर्णपणे यशस्वीही झाले त्याबद्दल त्यांचे खास अभिनंदन आणि विशेष धन्यवाद.
26 Sep 2011 - 7:11 pm | मी-सौरभ
आम्हा प्रवाशांकडून आभारपूर्वक चांगला डायवर हे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात यील...
22 Sep 2011 - 10:03 am | वपाडाव
ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ए ए ए ए
ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ए ए ए ए
ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ए ए ए ए
22 Sep 2011 - 10:55 am | धन्या
शाजीजमे जाऊंगा, पराठा खाऊंगा, पतियाळा लस्सी मैं पिऊंगा रे
ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ए ए ए ए
22 Sep 2011 - 10:11 am | गवि
उत्तम. ती जोई वाईन.. गोड पण मस्त..
भेटूया का यंदाच्या पुणे वाईन फेस्टिवल मधे ?
पाण्यात डुंबण्याची मजा अफलातून आहे. जाम मजा केलीत राव.. फोटोही जबरी आलेत..
24 Sep 2011 - 11:02 am | सोत्रि
अगदी नक्की!
पन्नास आणि गवि, व्यनी आणि फोनाफोनी करून ठरवुयात.
- (फेस्टिव्ह) सोकाजी
26 Sep 2011 - 7:06 pm | मी-सौरभ
णोमिणेशण...
22 Sep 2011 - 10:36 am | प्यारे१
कर लेको ऐश.....!
आमच्या नावाने थोडे तीर्थ दक्षिण दिशेला शिंपडले की नाही?
22 Sep 2011 - 10:49 am | ५० फक्त
छे हो प्यारे, राहुन गेलं आता तुम्हाला एकदा घेउन जाउ अन काय शिंपडायचं का बुडवायचं ते करुन घेउ.
------------------------------------
एखाद्या सटवीच्या जोरावर सगळ्या भुतांमधलं सगळं कळतं असं वाटुन मतप्रदर्शन करणा-यांना आम्ही हायवेवर सुद्धा मारत नाही ...!!!
22 Sep 2011 - 10:52 am | धन्या
हे प्यारेच्या सहीचं विडंबन समजायचं की...
22 Sep 2011 - 11:46 am | प्यारे१
>>>>एखाद्या सटवीच्या जोरावर सगळ्या भुतांमधलं सगळं कळतं असं वाटुन मतप्रदर्शन करणा-यांना आम्ही हायवेवर सुद्धा मारत नाही ...!!!
आयचा घो, बसवला टेम्पोत! काय रे हे?
बाकी आमची स्वाक्षरी आम्ही आता, 'विचारजंत म्हणज सामान्यतः लोक काय म्हणतात ते पाहून मगच त्याच्याविरोधी मत मांडण्याची खाज असलेली जमात' अशी करण्याचा शिरेस विचार करत आहोत. काय म्हणता?
22 Sep 2011 - 12:25 pm | गणेशा
पाण्यात येथेच्छ डुंबण्याची मजा काही ओरच ,,,
त्यात काल कढड्यावरील फोटो पाहुन माझी रायगड भेटा ही आठवली..
I missed a lot .
23 Sep 2011 - 10:02 am | अन्या दातार
>>पाण्यात येथेच्छ डुंबण्याची मजा काही ओरच ,,,
म्हणूनच आम्ही तुला लै म्हंजे लैच मिस केले. पण काय करणार, तु तुझ्या 'मिस'मध्ये बिज्जी होतास ना ;)
22 Sep 2011 - 8:58 pm | प्रास
दोन्ही धाग्यांना सामायिक प्रतिक्रिया देतोय.
कसली भारी मज्जा केलीत राव! फोटो आणि त्यांचं शब्दांकन, एकदम लाजबाब!!
एका चांगल्या ट्रेकची मस्त फलनिष्पत्ती झालेली दिसतेय.
लगे रहो भैय्यालोक!!! :-)
23 Sep 2011 - 10:47 am | दीप्स
मस्तच आहेत फोटो. (फक्त वाईन सोडली तर...)
24 Sep 2011 - 11:05 am | सोत्रि
मला तर ब्वॉ फक्त वाइनचेच फोटो खुप्प खुप्प आवडले ;)
- (वाइनने फाइन होणारा) सोकाजी
23 Sep 2011 - 4:24 pm | पियुशा
जबराट !
:)
24 Sep 2011 - 11:09 am | सोत्रि
50 फक्त ह्यांचा तीव्र आणि त्रिवार निषेध!
वायनरीला भेट देणार हे आधिच ठरले होते तरी ह्या ट्रीपबद्दल मला न कळवण्याबद्दल जाहीर निषेध!
:(
- (वाइन ऐवजी इनो घ्यावा लागलेला) सोकाजी
24 Sep 2011 - 10:17 pm | ५० फक्त
ओ तिर वाईन निषेध कसला करताय, दपारचं जेवाया मिळालं नाही आणि जे पिणारे होते ते फार पिणार नाय म्हणाले, तेंवा डोक्यात आलं की उगा कुठंतरी इथं तिथं बसण्यापेक्षा इथं जावं, आधी तर शैक्ष्णिक सहल करणार होत्तो, वाईन बनवणेचा कार्खाना पाहणे पण ते बंद झालं होतं ते पाचाला बंद होत्तंय.
पुन्हा कदी जायचं बोला, मस्तपैकी सकाळीच जाउ, जरा फिरा फिरी करुन तीनलाच येउन बसु इथं, हा फक्त न पिणारा डायवर पाहिजे नाय्तर रिक्षावाला, वाट बगणारा.
26 Sep 2011 - 7:09 pm | मी-सौरभ
तू आहेस की न पिणारा डायवर :)
24 Sep 2011 - 11:18 pm | आत्मशून्य
असो, मला उधारीवर दूकानदाराने इनो देणे बंद केले आहे हीच काय ती या धाग्याची वैयक्तीक पातळीवर फलश्रूती म्हणता येइल....
(इनोसाठी इ.एम.आय. भरायला लागलेला) - आत्मशून्य