ट्रेक टु नाणेघाट छे, ब्रेक टु नेचर

५० फक्त's picture
५० फक्त in कलादालन
21 Sep 2011 - 7:32 am

' येथे शुद्ध कॉटनच्या अंडरवेअर मिळतील, इलॅस्टिक आणि नाडीवाल्या'

रविवारी सकाळी, फुगेवाडीच्या अशोका चहावाल्याकडे चहा पिताना वाचलेली ही जाहिरात आजची ट्रिप परचन्ड आनंददायी होणार याची खात्री देणारं होतं, मालोजीराव (हे नाव नविन सभासदाला प्रोतसाहन देण्यासाठी आधी घेत आहे, याची नोंद घेणेत यावी), धनाजीराव( झगे आणि पराठेवाले), वपाडाव(भावी जयपाल), अन्या दातार(अजुन तरी आवसे-पुनवे बद्दल भिती न घालणार आयाय्टिय्न) आणि मी, बरोबर ठरलेल्या वेळेच्या २५ मिनिटं नंतर या स्पॉटला होतो. थोडं पुढं जाउन एक कच्कन टर्न मारला आणि पिएम्टिच्या जागेत गाड्या लावल्या, पुन्हा एकदा अशोका मधाला चहा पिण्याचं आमंत्रण टाळून वल्ली (द डायरेकटर) आणि सासुसौरभ ( माहिति अधिकारी) यांना घेउन निघालो, वाटेन चाकण मधुन किसन (ह्यांना नावं देणं शक्य नाही, लै वरपर्यंत वळखी आहेत ह्यांच्या) यांना घेणं आम्ही विसरलो, पण प्लॅन बी नुसार धनाजीरावांनी उचललं आणि थेट सायबर कॅफेत आलो,

छे छे रिटर्न नाय मारला मंचरवरुन सदाशिवपेठेत, हा सायबर कॅफे मंचर मधला, अजुन एक मिपासदस्य सायबर कॅफे मालक असल्याचा अभिमान वाटला , हे श्री. विनोद बाणखेले आणि त्यांच्या सायबर कॅफे,

आपल्याकडे सायबर कॅफेत मित्र आल्यावर खाउ पिउ घालायची प्रंप्रा आहे, त्यानुसार विनोद आम्हाला हाटेल विसावा मध्ये मिसळपाव खायला घेउन गेला,

कुठल्यातरी वड्या ह्या अजुन एक ट्रेडमार्क होत आहेत कट्ट्याच्या याची नोंद घेण्यात यावी.

या आदरातिथ्याबद्दल श्री. विनोद यांचे अतिशय आभार आणि मिसळ, बटाटेवडे आणि चहा, सगळंच लई भारी होतं. मनापासुन धन्यवाद.

तिथुन पुढं निघालो, नारायणगावातुन लेफ्ट मारुन जुन्नर मार्गे थेट कुकडेश्वराच्या देवळात आलो, या प्रवासातले अन तिथले काही फोटो, माहितीसाठी श्री. वल्लींना संपर्क करावा,

चावंड किल्ला

हे कुकडेश्वराचं मंदिर, पुरातत्व खात्यानं सरकारी पद्धतीनं जमेल तेवढी वाट लावलेली आहे,

श्री कुकडेश्वर

गाभा-यातली ज्योत श्रद्धा समर्पण सगळं शिकवुन जात होती.

देउळ अन मागचा डोंगर यांना घेउन ट्रिक फोटोग्राफि करायचा एक प्रयत्न.

हे बाहेरचे दोन वेताळ, यांना बघुन एखाद्या आयडिची आठवणं आल्यास आम्ही जबाबदार नाही

बाजुनं वाहणा-या पाण्यात उतरुन काढलेले काही फोटो

तिथुन पुढं निघालो, नाणेघाटाच्या दिशेनं, रस्ता प्रचंड खराब, तरीही व्यवस्थित नाणेघाटापर्यंत पोहोचलो.

हे नाणेघाटाच्या बाजुचे जुन्या इमारतींचे अवशेष आणि खाली आहे तो प्रसिद्ध जकात गोळा करण्याचा रांजण

ही घाटाची सुरुवात अन घाटातल्या गुहांचे काही फोटो

या गुहांमधल्या ब्राम्ही लिपितल्या शिलालेखांबद्दल जयंत कुलकर्णी यांनी लिहिलेलं आहे, वल्ली लिहिणार आहे आणि मला ब्राम्ही मध्ये प्रगाढ अज्ञान आहे, त्यामुळं जास्त लिहित नाहि.

नाणेघाटातुन दिसणारं तळकोकण,

घाटातुन वर येउन, बाजुच्या नागफणीवर किंवा नानाच्या अंगठ्यावर जाउन आले, म्हणजे मी , सासुसौ व मालोजी गेलो नव्हतो, काय आहे, बिस्किटं, बाकरवड्या आणि किसनच्या बहिणीनं दिलेला डब्यातला खाउ खाउन पुन्हा कष्ट करायची माझी तरी अजिबात तयारी नव्हती.

मग वल्ली आणि धनाजीनं नागफणीवरुन काढलेले अन आम्ही खाली बसुन काढलेले फोटो

हा किसनचा खास किसन स्टैलचा फोटो, (संदर्भ, स्पावड्याचा सज्जनगड धागा / किसनची खव)

हा आकाशात घुसत जाणारा नानाचा अंगठा - हॅट्स ऑफ टु वल्ली फोटोसाठी.

आता पहिला भाग इथंच थांबवतो, पण पुढ्च्या भागाचे दोन टिझर टाकुन अन पेश्शल टु गणेशा आणि आत्म्शुन्य, वुई मिस यु अ लॉट आणि बॅड्ली.

वरच्या फोटोचे प्रताधिकार व वापर हक्क विशिष्ट आय्डिंकडे सुरक्षित ठेवण्यात आलेले आहेत याची नोंद घेण्यात यावी.

विसु - फोटो लई झालेत अन बघाया खुप वेळ लागेल म्हणुन रिपोर्ट दोन भागात टाकणार आहे, पुढच्या भागात लिहिण्यासारखं फारसं काही नाही, पण फोटोस विल स्पिक..

हे ठिकाण

प्रतिक्रिया

सूड's picture

21 Sep 2011 - 7:46 am | सूड

>>कुठल्यातरी वड्या ह्या अजुन एक ट्रेडमार्क होत आहेत कट्ट्याच्या याची नोंद घेण्यात यावी.
हांऽऽऽ, म्हणजे अन्या दातारान् परत नारळाच्या वड्या आणलंन् का काय ??
असो, यायचं कॅन्सल झाल्यादिवसापासून रोज एकेक चमचा इनो घेत आहे. आज डोस वाढवावा म्हणतो.

प्राजु's picture

21 Sep 2011 - 8:08 am | प्राजु

छान आले आहेत सगळे फोटो.

चायला... जबरा मज्जा केली तुम्ही
:)

सगळे फोटू कडक
पुढचा भाग लवकर टाक रे

ते वेताळ अंमळ डेंजर हैत र

त्र्यंबकेश्वर+ब्रम्हगिरी यावर पर्याय म्हणून झालेला नाणेघाटाचा ट्रेक जबराच...:) वल्ली आणी मालोजीराव यांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे नाणेघाटाचा इतिहास कळण्यात मदत झाली.. त्याबरोबरच वेळेअभावी शिवनेरीला जाण्याची दुसर्‍यांदा संधी हुकली याचे शल्यही मनाला खुप टोचतेय.. :(

आणी हो जाता जाता..

एवढ्या आपुलकिने आदरातिथ्य केल्याबद्दल विनोद बाणखेले यांचे मनापासुन आभार.

प्रचेतस's picture

21 Sep 2011 - 10:13 am | प्रचेतस

शिवनेरीला जाण्याची दुसर्‍यांदा संधी हुकली याचे शल्यही मनाला खुप टोचतेय.

जास्त टोचणी नको लावून घेवूस रे, जाउयात की एखाद्या रविवारी खास शिवनेरीलाच.

प्रचेतस's picture

21 Sep 2011 - 9:29 am | प्रचेतस

एकदम मस्त वृत्तांत.
पुणे, नारायणगाव इथे अगदी कडकडीत ऊन असताना जुन्नर मागे सोडल्यावर वातावरणाने रंग बदलायला सुरुवात केली आणि आम्ही आता सह्याद्रीच्या गाभ्यात शिरत आहोत याची हळूहळू जाणीव व्हायला लागली. आतापर्यंत ठेंगणे दिसणारे डोंगर आता पर्वतरूप धारण करू लागले. जुन्नरच्या अलीकडच्या मानमोडी डोंगरावर खोदलेले तीन लेणी समूह लक्ष्य वेधून घेत होते, शिवनेरीला नमस्कर करून पुढे निघालो. आपटाळे मागे टाकल्यावर तर पूर्ण पावसाळी वातावरण होते. सगळीकडे हिरवेगार झाले होते, फुलांचा मौसम आता नुकताच कुठे बहरायला लागला होता, हिरवीगार भातखाचरं चांगलीच तरारलेली होती. डोंगरांवर मधूनच कोवळ्या उनाची तिरीप पडून ते चमकून उठत. तेव्हा दिसणारे दृश्य तर अविस्मरणीय असेच.
निसर्गाचा मनमुराद आस्वाद घेतघेतच नाणेघाटात पोहोचलो. नाणेघाटातील सातवाहनांची सुप्रसिद्ध खोदीव गुहा व त्यातील शिलालेख डोळे भरून पाहिले. नंतर गेलो ते थेट नानाच्या अंगठ्यावर. तिथून दिसणारा जीवधन व वानरलिंगी सुळका, सह्याद्रीच्या तुटलेल्या कातळभिंती, धाकोबाचे रोमांचकारी शिखर, भैरवगडाची डाईक रचनेतून तयार झालेली उभी कातळभिंत, वर्‍हाडाचे सुळके सगळेच कसे जबरदस्त दिसत होते. रौंद्र सौंदर्य म्हणतात ते हेच. उन्हाळ्यात पितवस्त्र पांघरलेला कमालीचा राकट सह्याद्री पावसाळ्यात मात्र हिरवा साज सजवून हळूवार झाला होता.

नाणेघाट सोडला मग परत जुन्नरला येउन एस्टी स्टँडच्या समोर असलेल्या समर्थच्या टपरीवजा हाटेलात ३ नंबर असे नाव असलेला कडक चहा प्रत्येकाने दोन दोन कप रिचवला आणि पुढे मार्गस्थ झालो. तो वृत्तांत पुढे येईलच.

मृत्युन्जय's picture

21 Sep 2011 - 10:10 am | मृत्युन्जय

निषेध आधी व्यक्त करुन झालेला आहेच. येउ न शकल्याबद्दल चिडचिड तर होतेच आहे. पण वरील फोटो खाण्याच्या मध्येमध्ये केलेला ट्रेक उत्कृष्ट झाल्याचा पुरावा आहेत. ;) पुट्रेआकशु.

सुंदर.. फोटो, वर्णन आणि ठिकाणही.. असेच भटकून आम्हाला नवनवीन ठिकाणांचं दर्शन घडवत रहा..

लगे रहो..

प्यारे१'s picture

21 Sep 2011 - 10:33 am | प्यारे१

मस्त रे गँग....

मंचरचे बाणखेले फारच अगत्यशील दिसतात.
चौकातला आजीकडचा चहा नाही पाजला का रे लोकांना? मस्त असतो.
सुलतानपूरची नदी पण भारी आहे. असो.

आम्ही जनतेला दिलेल्या शुभेच्छा उपयोगी पडल्या म्हणायच्या.
बाकी आमची सज्जनगड वारी पण खूपच छान झाली. बरेच बरे वाटले.

चौकातला आजीकडचा चहा सध्या आज्जी नाहि बनवत ,
त्यांचा मुलगा नाहितर कामाला असलेलि मुले करतात चहा, अर्थात ते देखील चांगला चहा बनवतात.
आज्जी ने बनवलेला चहा मला पन खुप आवडायचा, आणि ति आज्जी माझी खरोखरची आज्जी आहे, माझ्या आजोबांची चुलत बहीण आहे.
तुम्ही याल तेव्हा जाउयात चहा घ्यायला आपण चौकात...

बाकी आलेल्या सर्व मिपाकरांना भेटुन खरोखर खुप खुप आनंद झाला,
मिपा वर जसा दंगा चालतो तसाच दंगा करत आम्ही मिसळ्पाव चा आनंद घेतला.
न आलेल्या बर्याच मिपाकरांना आम्ही सर्वांनी मीस केले.

मी-सौरभ's picture

21 Sep 2011 - 3:32 pm | मी-सौरभ

आमी बी फॅण झालोय तुमच्या गावाचे...
आज्जीचा चा प्यायला लवकरच दौरा काढण्यात यील...

विनोद बाणखेलेंबरोबरच आणखी एका मिपाकराचा उल्लेख करण्याचा नजरचुकीने राहून गेला. ते म्हणजे पप्पू.

विनोद बाणखेलेंबरोबरच पप्पूंचेही मंचर येथील आदरातिथ्याबद्दल खास आभार.

मालोजीराव's picture

21 Sep 2011 - 10:59 am | मालोजीराव

णोन्द घेणेत आली आहे, सविस्तर प्रतिसाद चीटकवण्यात येईल !

- मालोजीराव

सुहास झेले's picture

21 Sep 2011 - 11:09 am | सुहास झेले

छान आले आहेत फटू, पुढला भाग लवकर टाका :) :)

इंटरनेटस्नेही's picture

21 Sep 2011 - 1:03 pm | इंटरनेटस्नेही

मस्त! दोन पेग इनो घेण्यात आले आहे.

अरेच्चा हेही पेग मध्ये मिळतं का ??
स्वगतः मी इथे पेग वैगरेंसारखे अर्वाच्य शब्द वापरले, हे माझ्या घरी नाही ना सांगणार कुणी ??

-सोंगट्या

अन्या दातार's picture

23 Sep 2011 - 10:16 am | अन्या दातार

स्वगत वाचून फुटलो!!!!
हा कदाचित स.पे.तल्या मस्तानीचा परिणाम असावा ;)

अन्या दातार's picture

21 Sep 2011 - 1:20 pm | अन्या दातार

"काय वर्णावी महती" असा ट्रेक झाला. त्यामुळेच यंदा एकाहून अधिक धाग्यात वृत्तांत टंकण्याची वेळ आलीये. हे कार्य ५० फक्तच करु जाणे!

विनोद बाणखेले यांनी खिलवलेली मिसळ जब्बराच होती. पार पंखा होऊन र्‍हायलो ब्वा मी.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Sep 2011 - 2:12 pm | अत्रुप्त आत्मा

वाहव्वा सॉल्लीड धुमाकुळ केला ना राव तुंम्ही...आम्हाला सालं ह्ये धंद्याच्या दिसात कुट्ट कुट्ट म्हणुन यायला जमत न्हाय..अश्या ठीकाणी(फोटोतुन)मनानी जाउ म्हटलं तरी जमत न्हाय... :-( तनानीच जायला हवं,तर मन जाइल...काय करणार..? नाविलाज नाविलाज नाविलाज.... :-( :-( :-(

जाउंद्या... ट्रीप नेहमी परमानेच ''दंगा'' झाली ना...ह्यातच आंम्ही आल्यासारखे झालो.... :-) :-) :-)

नंदन's picture

21 Sep 2011 - 3:55 pm | नंदन

मस्त आलेत फोटू. दुसरा भागही येऊद्या लवकर.

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Sep 2011 - 4:20 pm | बिपिन कार्यकर्ते

अप्रतिम!

sarita jadhav's picture

21 Sep 2011 - 7:27 pm | sarita jadhav

झकास फोटो

प्रभो's picture

21 Sep 2011 - 8:21 pm | प्रभो

मस्त रे!!

पैसा's picture

22 Sep 2011 - 9:04 pm | पैसा

फोटो छान आणि वर्णन खुसखुशीत!