सकाळ गुरुवार २९ मे २००८ पान ३
हिंदु मुलांनी मुस्लिम, ख्रिश्चन मुलिंशी विवाह करावा- आचार्य धर्मेन्द्र महाराज...
अन्य धर्मीय लोक हिंदु मुलींना फूस लावून त्यांच्याशी विवाह करतात. त्यामुले हिंदुंची लोकसंख्या कमी होत आहे. हे एक षडयंत्र आसुण, ते जनिवपुर्वक मुस्लिम व अन्य धर्मातील लोक करीत आहेत. त्यामुले आता हिंदु मुलांनी देखील मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील आणि इटली, आमेरिका, यूरोप या राष्ट्रातिल मुलिंसमावेत विवाह करून "हिंदु तितुका मेळ वावा" हे तंत्र आत्मसात करावे; तरच हिंदुंची संख्या वाढेल, असे आवाहन यांनी केले...
ते वीर सावरकर यांच्या जयंती उत्सावानिमित्त बोलत होते...
काय मित्रहो कशि वटलि बातमि ?? आपल्या प्रितिक्रिया नोदवा...
(शुध्द्लेखनाच्या चुका माफ असाव्यात, क्लास घेनार का सर ??)
प्रतिक्रिया
30 May 2008 - 2:20 am | शितल
मला वाटते हि॑दु धर्म हा ज्याला हवा आणि त्याला त्या धर्मा बद्दल आदर असल्या॑न्यानीच स्विकारावा,
मला वाटते, हि॑दु स्त्री जरी पर जातीय पुरूषाशी लग्न केले तरी तीच्या मनात आपण हि॑दु आहोत ही भावना मरे पर्य॑त असतेच
मारून मुटकुन काही करता येत नाही तर हि॑दु धर्म आणि इतर धर्मात काहीच अ॑तर उरणार नाही.
(कोणाच्याही भावना दुखावण्याचा इथे माझा इरादा नाही.)
30 May 2008 - 2:45 am | मन
एकच विचारायचं आहे:-
"डोकं आहे का ठिकाणावर"?
आपलाच,
मनोबा
30 May 2008 - 3:20 am | विकास
...त्यामुले आता हिंदु मुलांनी देखील मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील आणि इटली, आमेरिका, यूरोप या राष्ट्रातिल मुलिंसमावेत विवाह करून......
युरोप हे राष्ट्र नाही... :-)
बाकी दुवा दिला नसल्याने बातमी मुळातून वाचण्यासाठी म्हणून सकाळच्या संकेतस्थळावर गेलो तर ती बातमी दिसली नाही पण खालील मथळा पाहीला:
आवडत नसल्याने बायकोने नवऱ्याला जाळले
मग मी दोन मथळे (आपल्या आणि मी वाचलेल्याबातम्यांचे) मथळे/मतितार्थ एकत्र वाचले:
हिंदु मुलांनी मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील आणि इटली, आमेरिका, यूरोप या राष्ट्रातिल मुलिंसमावेत विवाह करावेत
आवडत नसल्याने बायकोने नवऱ्याला जाळले
आणि एकदम भय वाटले :SS
- जर हिंदू बायको असे करत असेल तर... हिंदू मेळवण्यापेक्षा स्वतःला वाचवण्यासाठी तरी आत्ताच्या पिढीने याचा जरूर विचार करावा असे महाराजांनी सांगावे असे वाटले. फक्त राष्ट्र आणि खंड यातील फरक लक्षात ठेवून शोध चालू ठेवा म्हणजे झाले. ;)
1 Jun 2008 - 3:17 am | भडकमकर मास्तर
मग मी दोन मथळे (आपल्या आणि मी वाचलेल्याबातम्यांचे) मथळे/मतितार्थ एकत्र वाचले:
हिंदु मुलांनी मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील आणि इटली, आमेरिका, यूरोप या राष्ट्रातिल मुलिंसमावेत विवाह करावेत
आवडत नसल्याने बायकोने नवऱ्याला जाळले
:)) :)) :))
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
30 May 2008 - 6:58 am | फटू
तुमचं स्वत:चं काय मत आहे ??? :D
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
30 May 2008 - 9:39 am | अरुण मनोहर
तीन गोष्टींचा खुलासा मूळ लेखकाला किंवा सो कौल्ड "धर्मेन्द्र महाराजा"कडून अपेक्षीत आहे. म्हणजे मामला समजायला मदत होईल.
१) धर्मेन्द्र महाराज फिलमी आहेत का?
२) >>>हिंदु मुलांनी मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील...........मुलिंसमावेत विवाह करावेत लग्नानंतर मुलींचा धर्म हिंदू करणे सक्तीचे आहे की नाही किंवा विपर्यासाने मुलानेच लग्नानंतर धर्म बदलला तर कसे? ह्याविषयी काही प्रकाश पडेल का?
३) >>>आपल्या प्रितिक्रिया नोदवा... ह्यामधे फक्त प्रितिक्रिया चीच अपेक्षा आहे अथवा इतर क्रीया पण चालतील?
>>>> आप कहना क्या चाहते है?
30 May 2008 - 3:17 pm | विकास्_मी मराठी
िव्कास०१५४
>>>आपल्या प्रितिक्रिया नोदवा... ह्यामधे फक्त प्रितिक्रिया चीच अपेक्षा आहे अथवा इतर क्रीया पण चालतील?
>>>> आप कहना क्या चाहते है? :W
30 May 2008 - 3:43 pm | आंबोळी
गेले काही दिवस मिसळपाववर कथा,लेख,कविता असल्या कश्याचाही संबंध नसलेले , फालतू व जातीय विद्वेश पसरवणारे टॉपिक येत आहेत. नविन आलेल्या सभासदाना ऑरकुट वरील मुक्तपीठ आणि तत्सम कमुनिट्या आणि मिसळपाव यामधील फरक कळालेला नसावा. त्यामुळे मिसळपावचे ऑरकुटीकरण होत चाललय असे वाटते.
तात्या वेळीच लक्ष घालून व असल्या टॉपिकच्या नावे कंदील लाउन नितांत सुंदर मिसळपावचे विद्रुपीकरण थांबवा ही विनंती.
1 Jun 2008 - 12:28 am | विसोबा खेचर
आंबोळी,
तुझ्या प्रामाणिक भावनांबद्दल खरंच आभारी आहे, परंतु एकदम एखाद्या गोष्टीला कंदील लावून चालत नाही. काही गोष्टींचं निरिक्षण करावं लागतं!
आपला,
(सरपंचाच्या काटेरी खुर्चीवर बसलेला) तात्या.
असो, तरीही तुझा तो कंदील मात्र तेवढा पाठवून दे बाबा एकदा कधितरी! असावा जवळ, कधीही उपयोगी पडेल! :)
आपला,
(भुताटकीचा कंदील प्रेमी) तात्या समंध.
:)
30 May 2008 - 4:51 pm | वैभव
तात्या आम्बोळी चा कन्दिल मागवुन घ्या....
आणी आचार्य धर्मेन्द्र महाराजाच्या दारात ...............
30 May 2008 - 4:55 pm | राजे (not verified)
फालतू !!!!!
~X(
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
30 May 2008 - 6:18 pm | मयुरयेलपले
प्रतिक्रिया पाहिल्या ...
आसले भोन्दु बाबा काहिहि विधाने देतात आणि, सकाळ सारख्या पेपर मधे बातमि छापलि जाते या बद्दल आच्छर्य.. एवढच
बातमि २८ मे च्या सकाळ पेपर मधिल आहे.. (माफि असावि)
युरोप हे राष्ट्र नाही...
मुळ बातमि तशिच उतरविलि आहे... त्यात राष्ट्र असा उल्लेख आहे ..
>>>आपल्या प्रितिक्रिया नोदवा... ह्यामधे फक्त प्रितिक्रिया चीच अपेक्षा आहे अथवा इतर क्रीया पण चालतील?
>>>> आप कहना क्या चाहते है?
मला प्रतिक्रिया म्हणायच होत.. मराठि स्पेलिन्ग मिशटेक(माफि असावि)
गेले काही दिवस मिसळपाववर कथा,लेख,कविता असल्या कश्याचाही संबंध नसलेले , फालतू व जातीय विद्वेश पसरवणारे टॉपिक येत आहेत.
कथा,लेख,कविता ... या शिवाय काहिहि लिहु शकत नाहि का???
फालतू असु शकतो......
माफ करा या मागे जातीय विद्वेश पसरवने हा हेतु नव्हता... तरिहि आपले मन दुखावले आसल्यस जाहिर माफि..
मिसळपावचे ऑरकुटीकरण होत चाललय
आसे न होवु देन्याचि आम्हि नविन सभासद १००% खात्रि देतो...
आपला मयुर
31 May 2008 - 11:59 am | राजे (not verified)
"फालतू "
हा शब्द तुम्हाला अथवा तुमच्या लेखाला उद्देशुन नाही आहे तो आहे "त्या" महाराजाला "बुवाला" लेकाचा काही ही सांगतो व सकाळ त्याला प्रसिध्दी देतो.... म्हणून तो महाराज व तो सकाळ "माझ्या नजरेने फालतू आहेत"
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
31 May 2008 - 10:20 pm | चिन्या१९८५
धर्मेंद्र महाराजांनी म्हटलेले फार चुकिचे आहे असे वाटत नाही.त्यांनी सक्तीच्या धर्मांतराबद्द्ल कुठे म्हटलेय्???हिंदु धर्माबद्दल परदेशात व भारतातही अनेक चुकिच्या गोष्टी पसरवल्या जातात. ख्रिश्चन मिशिनरीज यात आघाडीवर आहेत. हिंदु धर्म सैतानाकडुन आलेला आहे वगैरे. ज्या वेळी हिंदु मुले परदेशी स्त्रीयांशी लग्न करतील तेंव्हा त्या लोकांनाही आपल्या धर्माची खरी शिकवण कळायला लागेल. त्यांना होणारी मुलेही हिंदु धर्माबद्दल जाणु लागतील्.पारसी लोकांचा धर्माचा अंत जवळ यायला लागला आहे कारण त्यांनी फक्त पारसींशीच विवाह करायचा असा अलिखित नियम केलेला आहे. पारसी लोकांमधे याबद्दल खुप मंथन चालु आहे की मरणार्यांची संख्या जास्त आणि जन्माला येणर्यांची संख्या खुप कमी आहे. हिंदु धर्माला सध्या तशी परिस्थिती नाही पण येत्या काही शतकांमधे तशी परिस्थिती येउ शकते. शिवाय हिंदु मुलींनी मुस्लिमांशी लग्न केल्यास चालते पण इतर धर्मियांनी हिंदु मुलांशी लग्न केल्यास तुम्हा लोकांना का चालत नाही??धर्मेंद्र महाराज हे विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी आहेत त्यामुळे लगेच 'भोंदु बाबा' वगैरे म्हणु नये. युरोप हा देश नाही वगैरे लिहिलेय्.सकाळ अशा अनेक चुका करतो. आजच्या सकाळमधे 'औरंगाबाद येथील निशांत तोतला याने एप्रिल २००८ मध्ये झालेल्या आयआयटी-जेईई परीक्षेत देशातून सेंकड रॅंक (दुसरा क्रमांक) मिळविली आह' अशी बातमी आहे.
1 Jun 2008 - 12:12 am | मन
त्यांनी सक्तीच्या धर्मांतराबद्द्ल कुठे म्हटलेय्???
आम्ही कुठं सक्तिच्या धर्मातराचं बोलुन र्हाय्लेत असं म्हटलय?
आमचं म्हणण आहे की मुळातच जी गोष्ट त्यांनी सांगितलीये, ती न पटण्यासारखी आहे.
हिंदु धर्माबद्दल परदेशात व भारतातही अनेक चुकिच्या गोष्टी पसरवल्या जातात. ख्रिश्चन मिशिनरीज यात आघाडीवर आहेत. हिंदु धर्म सैतानाकडुन आलेला आहे वगैरे. ज्या वेळी हिंदु मुले परदेशी स्त्रीयांशी लग्न करतील तेंव्हा त्या लोकांनाही आपल्या धर्माची खरी शिकवण कळायला लागेल. त्यांना होणारी मुलेही हिंदु धर्माबद्दल जाणु लागतील्.
स्वामी विवेकानंदांनी हेच केलं होतं काय?
योगी अरविंदांनी हेच केलं का?
योगी महेश ह्यांनी हेच केलं का?
नै, या सगळ्यांमुळेच परदेशात हिंदु धर्माचं नाव बर्यापैकी बरयं ,म्हणुन म्हटलं.
(येक शंका, च्यामारी त्या तुमच्या धर्मेंद्र म्हाराजानं स्वतः केलय का हो लग्न?(केलं असेल तर हिंदु की मुस्लिम?))
पारसी लोकांचा धर्माचा अंत जवळ यायला लागला आहे कारण त्यांनी फक्त पारसींशीच विवाह करायचा असा अलिखित नियम केलेला आहे. पारसी लोकांमधे याबद्दल खुप मंथन चालु आहे की मरणार्यांची संख्या जास्त आणि जन्माला येणर्यांची संख्या खुप कमी आहे.
बास की राव आता.
तुमीच बोल्ले ह्ये.तुमी जो काय तथाकथित धर्माचा अंत वगैरे म्हणताय, तो कशानं होतोय?
लोकसंख्या कमी होण्यानं.ती कमी का होतेय?
जननदर(जनन म्हंजी जन्म) कमी र्हायल्यानं.
सम्जा केलं जरी काही लोकांनी मुस्लिम अन् ख्रिश्चन मुलिंशी लग्न, तर त्या खुप खुप जास्त अपत्य देत बसणारेत का?
म्हणजे मी काय म्हणतोय ते कळलं का? समस्या, लोकसंख्या वाढ न होणे आसेल, तर त्याचं मूळ आहे, कमी मुलं
पैदा होण्यात. मग बायको आणि नवरा कुठल्या का धर्माचे असेनात.(त्यांचे धर्म बदलल्यानं असा कुठला फरक पडेल?)
आंतर जातीय विवाह संकेत स्थळ
शिवाय हिंदु मुलींनी मुस्लिमांशी लग्न केल्यास चालते पण इतर धर्मियांनी हिंदु मुलांशी लग्न केल्यास तुम्हा लोकांना का चालत नाही??
कोण म्हणलं चालत नाही आमाला?
मी इतकच म्हणतोय, की आपल्याला सुयोग्य अशी एखादी स्त्री पाहुन तिच्यासोबत जन्म काढायचा,
की कुणाला तरी धडा शिकवण्यासाठी ,कमी दाखवण्यासाठी(पक्षी:- मुस्लिमांना कमी दाखवायला)
एखाद्या परधर्मियाशी लग्न करायचं, आणि मग सुडाचा आनंद मिळवायचा.
व्वा! लग्नाचा वापर सुडाचं साधन म्हणुन करायचा? विकृत टाळकं आहे त्या म्हाराजाचं.
ह्यासुडा""सुडा"पोटी झालेल्या विवाहातुन कुणीतरी सुखी राहील का राव?
अहो ओळखा आता तरी. नव्वदीच्या दशकात ह्या रांडेच्यांनी कुठले पोरकट प्रश्न राष्ट्रिय समस्या म्हणुन उभे केले,
पुढे सत्ता आल्यावर आधिच्या ४० वर्षात पुर्विच्या राज्यकर्त्यांनी केलं नसेल तितकं वाट्टोळं केलं काय,
आणि भेकडपणाचं प्रदर्शन करुन ऐन वेळेस देशाची जाहीर नाचक्की केली काय
सगळच अगम्य.
हे लोक विरोधक होते, तेव्हा मी ही ह्यांचा बर्यापैकी समर्थक होतो.पण सुदैवानं ह्यांना सत्ता मिळाली,आणि
आमचा भ्रमाचा भोपळा फुटला.बरच झालं ते.
अहो,कुणीही कुठल्याही धर्मातील जोडीदाराशी विवाह करायला ना करणारा मी कोण?
जुळले दोघांचे सूर, तर जात्-धर्म वगैरे बंधनं कशी येतील?
पण त्याऐवजी त्याच्या म्हणण्यात आहे तो "धडा शिकवण्याचा, बदला घेण्याचा" सूर.
"त्यांच्या" लोकसंख्या वाढिचं इतकं भय असेल , तर हातात सत्ता असताना समान नागरी कायदा
का नाही पुढं रेटलात?
खंबीर पणानं सरकार चालवुन, संघटन करुन का नाही चीन सारखी "घरटी एक्/दोन मूल" अशी योजना राबवता आली?
याचं कारणच मुळी हे आहे की हे आहेतच घोटाळ्याचे. ह्यांना आपल्यासारख्या आम जनतेला पेटवुन, भडकवुन
"तिथं" पोचायचय. मग आपल्याला "फसवुन" तिचा गैरवापर करायचाय.
बस्स. इतकच. हिंदु धर्म संरक्शण वगैरे सब झूट. ह्यांना ते करायच नाहिये.
धर्मेंद्र महाराज हे विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी आहेत त्यामुळे लगेच 'भोंदु बाबा' वगैरे म्हणु नये.
कबुल. भोंदु म्हटलेलो नाही. म्हणणार नाही.
समजा त्या बाबाला एक पुत्र आहे आणि एक पुत्री.
पुत्री म्हणाली की मला ख्रिश्चन्/मुस्लिम मुलगा आवडलाय, त्याच्याशी लग्न करते.
तो करु देइल? माझ्या अंदाजानुसार तरी नाही करु देणार.
तेच जर त्याचा मुलगा बोलला की माझी आयुष्याची साथिदार ख्रिश्चन्/मुस्लिम असणार आहे, तर तो आनंदानं राजी होइल.
म्हणजे काय, तो करतोय सेक्शुअल डिस्क्रिमिनशन्.लिंगावर आधारीत भेद्-भाव.
म्हणजे,मुलाला आपला साथिदार निवडण्याचा पुर्ण अधिकार्.पण मुलिला नाही!
थुत् त्या भेद्-भावावर.
भेदभावालाही आमचा विरोध आहेच.
अवांतरः-
www.pratibimb.info हे आपण पाहिलत का? हे आंतर जातिय विवाहासाठी मॅट्रिमोनीअल प्रकारचं संकेतस्थळ आहे.
असच आंतर धर्मिय विवाहासाठी काही असेल, तर मी खुशाल त्यावरही स्वतःची नोंदणी करेन.
आपलाच,
मनोबा
1 Jun 2008 - 8:22 am | फटू
तुमचे सगळे मुद्दे एकदम रास्त आहेत...
लग्नाचा वापर सुडाचं साधन म्हणुन करायला प्रव्रुत्त करणारा तो म्हाराज विक्रुत मनोव्रुत्तीचाच असला पाहिजे...
बाकी तेव्हढं कुठल्याही जाती आणि धर्माच्या मुलीशी लग्न करण्याचं आपल्याला तरी नाही जमणार बाबा... आपल्याला पोरगी मराठीच हवी...
(भले मग त्यामुळे आमच्या धर्माचं काही नुकसान झालं तरी चालेल... :D )
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
1 Jun 2008 - 2:06 pm | चिन्या१९८५
मन्,तुमच्या लेखनात मुद्दे कमी आणि भाजप द्वेशच जास्त भरला आहे.तुम्ही दोन इश्यु इथे सुरु केले आहेत्.एक म्हणजे भाजप आणि दुसर म्हणजे मुळ विषय .दोन्हींची उत्तरे देतो.
१)मुळ विषय-विवेकानंद्,अरविंद यांच्या बोलण्यावर तुम्ही का जाताय्??त्यांच्याबद्दल मी कुठे लिहिलय्???हिंदु धर्माबद्दल परदेशात चांगले बोलले जाते,लिहिले जाते हे तुमचे अज्ञान आहे. मी स्वतः ख्रिश्चन मिशिनरीजनी हिंदु धर्माबद्दल द्वेशभावनेने तद्दम चुकिची माहिती देणारी पुस्तके वाचली आहेत. १-२ पुस्तके तर माझ्याजवळ मी सांभाळुन ठेवली आहेत. अनेक परदेशी मिशिनरीज हिंदु धर्माबद्दल चुकीची माहीती पसरवत असतात. हिंदु धर्माबद्दल जर परदेशात चांगले बोलले जात असेल तर त्याबद्दल विवेकानंद ,अरविंद्,श्री श्री रवी शंकर व इतर अनेक हिंदु धर्मगुरु व त्यांच्या शिष्यांचे आभार मानायला पाहीजे. पण ख्रिश्चन मिशिनरीज त्यांचे हिंदु धर्माला मलीन करण्याचे काम करत असतात. अर्थातच सर्व मिशिनरी संस्था तशा नाहीत्.पण ज्या तसे करतात त्यांचीही संख्या कमी नाही.
पारसीचा मुद्दा- अहो फक्त जननाने काही होत नसत्.शिवाय मी स्वत: तिथे लिहिलय की हा प्रश्न आत्ता इतका मोठा नसला तरी येणार्या शतकात मोठा बनणार आहे. ख्रिश्चन मिशिनरीजनी भारतात त्यांची मुळे भारतात घट्ट रोवली आहेत. ते लोक हिंदुंना ख्रिश्चन बनवणे अतिशय मोठ्या प्रमाणात बनवत आहेत. गरीबीचा फायदा घेउन ,अशिक्षिततेचा फायदा घेउन ते हिंदुंचे धर्मांतर करतात. 'मिशिनरीज ऑफ इंडीया' हे अरुण शौरी यांचे पुस्तक वाचा. केरळात ख्रिश्चन धर्म प्रचंड आहे.तमीळ लोकांबरोबर मी गेले ५ वर्ष रहातोय. त्यांच्यामधेही ख्रिश्चन मिशिनरीजनी केलेल्या खोट्या प्रचाराचा मोठा प्रभाव आहे. नॉर्थ-इस्ट ख्रिश्चनमय झालाय. माझ्या मणिपुरच्या एका मित्राने सांगितले की त्यांच्याकडे एका मिशिनरीने एक मोठी इमारत बांधली व लोकांना सांगितले की ख्रिश्चन बना आणि या इमारतीची मालकी तुमची. घर्,फ्लॅट्स देउन ,उपचार देउन मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवुन आणाले गेले ,हे सगळे बेकायदेशिर असुनही. कारण प्सुडोसेक्युलर्सना अल्पसंख्यांकांनी काहीही केले तरी चालते. तर अशा पध्दतीने हिंदुंची संख्या रोडावतेय. नुसते जनन वाढवुन उपयोग नाही. या लोकांना थांबवणे अथवा अन्य धर्मियांनाही आपल्या धर्मात प्रवेश करु देणे आवश्यक आहे. यासाठी धर्मेंद्र यांनी एक उपाय सुचवला आहे.ज्यात फारशी चुक आहे असे मला वाटत नाही.
**की कुणाला तरी धडा शिकवण्यासाठी ,कमी दाखवण्यासाठी(पक्षी:- मुस्लिमांना कमी दाखवायला)
एखाद्या परधर्मियाशी लग्न करायचं, आणि मग सुडाचा आनंद मिळवायचा.**
हे तुमच डोक आहे. धर्मेंद्र यांनी तसे म्हटले नाहीये.सुडासाठी लग्न करायला कोणीही सांगितल नाहीये. तुम्हाला परधर्मिय मुलीशी लग्न करायचे असल्यास तुम्ही करा असे लिहिलेय. आपल्या समाजात असे कोणी केल्यास लगेच त्याला विरोध होतो.आता सतिश नाही काय म्हणत की आपल्याच जातीच्या,धर्माच्या मुलीशी लग्न करणार ते!!बरीच जोडपी प्रेम असुनही फक्त जात्,धर्म बघुन एकमेकांशी लग्न करीत नाहीत. धर्मेंद्र यांचे म्हणने आहे की लग्न करा. झालाच तर हिंदु धर्माला याचा फायदाच होईल.
२) आता भाजप-नव्वदीच्या दशकात कोणाते पोरके प्रश्न राष्ट्रिय म्हणुन उपस्थित केले???राममंदीर्????हा पोरकट प्रश्न आहे???हिंदुंच्या देवाचे एक मंदीर होते.ते पाडुन एका धर्मांदाने मशिद बांधली. त्याच्या जागी पुन्हा मंदीर आताच्या काळात बांधावे ही मागणी करणे पोरकट आहे???मुसलमान जर हिंदुंना बांधव मानतात तर त्यांनी स्वतःच सद्भावनेनी ती जागा हिंदुंना का नाही दिली??रस्ते बांधणी,सरकारचे निरनिराळे प्रकल्प इत्यादींसाठी कितीतरी मशिदी,मंदीरे मुळ जागेवरून हटवली जातात. मग हिंदुंनी २-३ महत्वाच्या मंदीरांची मागणी केली तर ती मुस्लिमांनी मान्य का नाही केली??आणि हे जर पोरकट आहे तर कुठल्यातरी हॉलंडमधे अल्लाचे एक कार्टुन छापले जाते.त्यासाठी जगातील सर्व मुस्लिम तीव्र आंदोलने करतात. याला तुम्ही काय म्हणाल???
कितीतरी आंतरराष्ट्रिय दबाव असुन वाजपेयींनी पोखरणची चाचणी घेतली. याला तुमच्यात भेकडपणा म्हणत असावेत.चीनची ती एक मुलाची संकल्पना बर्यापैकी अमानुषपणे अमलात आणली गेली. लोकशाहीच्या राष्ट्रात तशी योजना आणन्यात काही अर्थ आहे का???
भेदभावाला तुमचा विरोध असेल तर सेक्युलॅरीस्ट करत असलेल्या भेदभावालाही विरोध करा.हुसेनला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्या म्हणनारे अल्लाच्या कार्टुन्सना कडाडुन विरोध करतात्,इमामाने कार्टुनविरोधी घेतलेल्या भुमिकेचे समर्थन करतात.तस्लिमा नसरीनलाही त्रास देतात्,सलमान रश्दीच्या पुस्तकावर बंदी आणतात्.का???नसरीन्,रश्दी यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही काय्??हा भेदभाव तुम्हाला चलतो कारण हुसेनने हिंदुंवर हल्ले केलेले असतात व रश्दीने मुस्लिमांवर.
1 Jun 2008 - 2:11 pm | राजे (not verified)
टाळ्या !!!!
=D> =D> =D>
मुद्दे पटले असे म्हणू शकत नाही पण तुमची लिहण्याची कळकळ व विषय माहीतीचा आवाका पाहून आनंद झाला.. अजून ह्या विषयी लिहावे ही विनंती.
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
1 Jun 2008 - 3:16 pm | मन
मन्,तुमच्या लेखनात मुद्दे कमी आणि भाजप द्वेशच जास्त भरला आहे.तुम्ही दोन इश्यु इथे सुरु केले आहेत्.एक म्हणजे भाजप आणि दुसर म्हणजे मुळ विषय .
मी एकुणच राअजकारण्यांवरुन विश्वास उडुन गेलेला तरुण आहे.
राजकारणी पक्षात भाजपाही येतो, त्याला मी काय करु.
मी काही, भारताबाहेर जन्मलेल्या व्यक्तिला पंत्-प्रधान करा सं म्हणत नाहिये. त्या व्यक्तिच्या भाटांनाही
(शक्य असल्यास) मी जोडेच हाणतो.
मी आहे जन्-सामान्यांचं मन.
कुणा एकाच पक्षस कडुन किंवा त्याच्या विरोधात आम्ही नसतो.
१)मुळ विषय-विवेकानंद्,अरविंद यांच्या बोलण्यावर तुम्ही का जाताय्??त्यांच्याबद्दल मी कुठे लिहिलय्???हिंदु धर्माबद्दल परदेशात चांगले बोलले जाते,लिहिले जाते हे तुमचे अज्ञान आहे. मी स्वतः ख्रिश्चन मिशिनरीजनी हिंदु धर्माबद्दल द्वेशभावनेने तद्दम चुकिची माहिती देणारी पुस्तके वाचली आहेत. १-२ पुस्तके तर माझ्याजवळ मी सांभाळुन ठेवली आहेत. अनेक परदेशी मिशिनरीज हिंदु धर्माबद्दल चुकीची माहीती पसरवत असतात. हिंदु धर्माबद्दल जर परदेशात चांगले बोलले जात असेल तर त्याबद्दल विवेकानंद ,अरविंद्,श्री श्री रवी शंकर व इतर अनेक हिंदु धर्मगुरु व त्यांच्या शिष्यांचे आभार मानायला पाहीजे. पण ख्रिश्चन मिशिनरीज त्यांचे हिंदु धर्माला मलीन करण्याचे काम करत असतात. अर्थातच सर्व मिशिनरी संस्था तशा नाहीत्.पण ज्या तसे करतात त्यांचीही संख्या कमी नाही.
नुसते विवेकानंदांचे आभार मानुन कसं चालेल? करा ना त्यांच्या सारखं काय तरी.(नै, धर्म रक्षणाची फार कळकळ हाय म्हनुन मनायलो.)
पारसीचा मुद्दा- अहो फक्त जननाने काही होत नसत्.
मग कशानं होतं बुवा? अहो, १९२१ साली २० कोटी असलेली लोकसंख्या आज १२० कोटिंच्या घरात गेली ती जननामुळ्च की!
असं काय करता राव.
शिवाय मी स्वत: तिथे लिहिलय की हा प्रश्न आत्ता इतका मोठा नसला तरी येणार्या शतकात मोठा बनणार आहे. ख्रिश्चन मिशिनरीजनी भारतात त्यांची मुळे भारतात घट्ट रोवली आहेत. ते लोक हिंदुंना ख्रिश्चन बनवणे अतिशय मोठ्या प्रमाणात बनवत आहेत. गरीबीचा फायदा घेउन ,अशिक्षिततेचा फायदा घेउन ते हिंदुंचे धर्मांतर करतात. 'मिशिनरीज ऑफ इंडीया' हे अरुण शौरी यांचे पुस्तक वाचा. केरळात ख्रिश्चन धर्म प्रचंड आहे.तमीळ लोकांबरोबर मी गेले ५ वर्ष रहातोय. त्यांच्यामधेही ख्रिश्चन मिशिनरीजनी केलेल्या खोट्या प्रचाराचा मोठा प्रभाव आहे. नॉर्थ-इस्ट ख्रिश्चनमय झालाय. माझ्या मणिपुरच्या एका मित्राने सांगितले की त्यांच्याकडे एका मिशिनरीने एक मोठी इमारत बांधली व लोकांना सांगितले की ख्रिश्चन बना आणि या इमारतीची मालकी तुमची. घर्,फ्लॅट्स देउन ,उपचार देउन मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवुन आणाले गेले ,हे सगळे बेकायदेशिर असुनही. कारण प्सुडोसेक्युलर्सना अल्पसंख्यांकांनी काहीही केले तरी चालते. तर अशा पध्दतीने हिंदुंची संख्या रोडावतेय.
पुन्हा तेच. असं होत असावं. ठीक आहे.
पण एक हिंदु गरीब उपाशी मरतोय,, त्याला कुणीच""हिंदु " म्हणुन खायला देत नाहिये.
पण त्याच ऐअवजी एक जण म्हणतो की गळ्यात क्रॉस अडकवुन फीर. तुला देइन खायला.
आणि तो क्रॉस अडाकवुन घेतो.आणि मग आम्ही हिंदु बोंब मारणार ह्यानं धर्मांतर केलं म्हणून.
म्हणजे, त्याला खायला आम्ही देणार नाही. इतर कुणी दिलं तर आमम्हाला पोटशुळ उठणार.
काय चुकलं त्याचं?अहो, तुम्ही द्या ना त्याला भाकरी, कशाला जाइल तो दुसर्याकडं मग?
नुसते जनन वाढवुन उपयोग नाही. या लोकांना थांबवणे अथवा अन्य धर्मियांनाही आपल्या धर्मात प्रवेश करु देणे आवश्यक आहे. यासाठी धर्मेंद्र यांनी एक उपाय सुचवला आहे.ज्यात फारशी चुक आहे असे मला वाटत नाही.
एक सांगा, एखाद्या हिंदु मुलीला आवडला ख्रिश्चन पोरगा, तर तुम्ही लग्न करु देताय का तिला त्याच्याशी ?
हा सरळ सरळ लिंग्-भेद आहे.
सुडासाठी लग्न करायला कोणीही सांगितल नाहीये. तुम्हाला परधर्मिय मुलीशी लग्न करायचे असल्यास तुम्ही करा असे लिहिलेय.
त्ये तर आता बी करुच की. आवडली पोरगी तर जरुर करु. धर्म्-वंश-जात काय बी न पाहता करु.
(भाषा पाहिनच बहुतेक, संवाद साधण्यासाठी एक तरी कॉमन भाषा यायला हवी.)
आपल्या समाजात असे कोणी केल्यास लगेच त्याला विरोध होतो.आता सतिश नाही काय म्हणत की आपल्याच जातीच्या,धर्माच्या मुलीशी लग्न करणार ते!!बरीच जोडपी प्रेम असुनही फक्त जात्,धर्म बघुन एकमेकांशी लग्न करीत नाहीत. धर्मेंद्र यांचे म्हणने आहे की लग्न करा. झालाच तर हिंदु धर्माला याचा फायदाच होईल.
हिंदु मुलीनं मुस्लिम मुलाशी लग्न केलं तर तुमच्या तथाकथित हिंदु धर्माचा फायदा होइल का?
ते आधी सांगा. मूळ शंकेला बगल नका देउ राव.
२) आता भाजप-नव्वदीच्या दशकात कोणाते पोरके प्रश्न राष्ट्रिय म्हणुन उपस्थित केले???राममंदीर्????हा पोरकट प्रश्न आहे???हिंदुंच्या देवाचे एक मंदीर होते.ते पाडुन एका धर्मांदाने मशिद बांधली. त्याच्या जागी पुन्हा मंदीर आताच्या काळात बांधावे ही मागणी करणे पोरकट आहे???
च्यामारी, इथं बेरोजगारी वाढलिये, पाण्याची अनुपलब्धी वाढलिये.
जमीन नापिक व्हायलिये. हेच नाही, इतरही अनेक भयानक, थेट माझ्या जीवन्-मरणाशी संबंधित प्रश्न मला सतावताहेत.
उद्या खायला मिळेल की नाही, ते कळत नाहिये.
आणी तुम्ही म्ह्णताय, त्या अयोध्येत १० बाय १५ च्या जागेत घुमट उभारायचा का शिखर यावरुन मी हातात लाठ्या काठ्या घ्यायच्या?
च्यामारी, काय का असेना तिथं. सम्जा तुमी बांधलं तिथं मंदिर पण कर्जापायी त्याच दिवशी माह्या भावानं
दिला जीव, तर मी खुश होउ की नाराज?
अहो, जनतेचे प्रश्न काय, तुमी करताय काय, बघा के राव.
तो प्रश्न तुमी प्रायोरिटी वन वर घेताच कसे?तुमची पुर्ण राजकिय शक्ती तुम्ही मिर्जीव इमारत बांधण्यात खर्च करताय,
पण एक अमुल्य जीव तुम्ही वाचवत नाही, त्याच राजकिय इच्छाशक्तिचा वापर करुन.
मुसलमान जर हिंदुंना बांधव मानतात तर त्यांनी स्वतःच सद्भावनेनी ती जागा हिंदुंना का नाही दिली??रस्ते बांधणी,सरकारचे निरनिराळे प्रकल्प इत्यादींसाठी कितीतरी मशिदी,मंदीरे मुळ जागेवरून हटवली जातात. मग हिंदुंनी २-३ महत्वाच्या मंदीरांची मागणी केली तर ती मुस्लिमांनी मान्य का नाही केली??आणि हे जर पोरकट आहे तर कुठल्यातरी हॉलंडमधे अल्लाचे एक कार्टुन छापले जाते.त्यासाठी जगातील सर्व मुस्लिम तीव्र आंदोलने करतात. याला तुम्ही काय म्हणाल???
विषयांतर भयाने उत्तर देण्याचं टाळतोय. सवडीनं व्य नि करुयात.
कितीतरी आंतरराष्ट्रिय दबाव असुन वाजपेयींनी पोखरणची चाचणी घेतली.
ती काही त्यांनी स्वतःच्या हातानं बाँब फेकला(गावठी बाँब सारखा) आणि घेतली चाचणी
इतकं सोप्प नाहिये.त्यासाठी मगील कित्येक दशकं अथ्क प्रयत्न सुरु होते वैज्ञानिकांचे.
त्यांच्या मेहनतीतुन तो तयार झाला. ह्यांना तो बाँब फोडुन दाखिवला, पण म्हणून
सगळच श्रेय ह्ये कसे काय लाटुन घेउ शकतात?
याला तुमच्यात भेकडपणा म्हणत असावेत.
कंदाहार विमान प्रकरणात नाचक्की, कारगिलच्या वेळेस दुर्बल राजकिय शक्तीचं दर्श्न करुन अनावश्यक पणे
अनेक सैनिकांची बहुमोल अशी आयुष्य बेचिराख झाली.(कारगिलम्ध्ये मनुष्य हानी प्रचंड प्रमाणात वाचवता येउ शकत होती,
गरज होती ती फक्त खंबीर पणाची.
असं बहुतांश सैनिक अधिकार्यांचं म्हण्णं आहे, जे वतः तिथं लढलेत.)
सैनिक मरत होते, हे रांडेचे त्याच्या टालुचं लोणी ,हो श्ब्दशः प्रेताच्या टाळुचं लोणी खात व्हते.
( शवपेटी घोटाळा,तेहलका प्रकरण किती किती म्हणुन नावं घेउ.)
भेदभावाला तुमचा विरोध असेल तर सेक्युलॅरीस्ट करत असलेल्या भेदभावालाही विरोध करा.
मी कुठल्याच भेदभावाला पाठिंबा देत नाहिये.
"मॅडम"चा प्रतिनिधी तर अजिबातच नाहिये.
तरी झालच विषयांतर.
आधी त्या माझ्या शंकेचं उत्तर द्या जमलं तर.
हुसेनला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्या म्हणनारे अल्लाच्या कार्टुन्सना कडाडुन विरोध करतात्,इमामाने कार्टुनविरोधी घेतलेल्या भुमिकेचे समर्थन करतात.तस्लिमा नसरीनलाही त्रास देतात्,सलमान रश्दीच्या पुस्तकावर बंदी आणतात्.का???नसरीन्,रश्दी यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही काय्??हा भेदभाव तुम्हाला चलतो कारण हुसेनने हिंदुंवर हल्ले केलेले असतात व रश्दीने मुस्लिमांवर.
विषयांतर होइल.
असो. ह्याविषयावरचा माझा शेवटचा प्रतिसाद .
कारण भाजप, त्याची सरकारमधील कामगिरी, राममंदीर,एम एफ हुसेन
ह्यातल्या प्रत्येक मुद्द्यावर स्वतंत्र चर्चा टाकली तर ठीक.सगळं इथच बसवायचा प्रयत्न केल्यान अनावश्यक विस्तार होतोय
आणी चर्चा भरकटती आहे असं वाटतं.
मूळ चर्चेत माझे मुद्दे (चर्चेशी सुसंगत) दोनच:-
एकः- धर्माचा प्रभाव विवेकानंदांच्या मार्गानं वाढवता येणार नाही का?
दोनः- सम्जा त्या आचार्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहेत वगैरे....
दोन्हीची उत्तर मिळाली तर बरं होइल.
आपलाच,
मनोबा
1 Jun 2008 - 2:38 pm | मदनबाण
ख्रिश्चन मिशिनरीजनी भारतात त्यांची मुळे भारतात घट्ट रोवली आहेत. ते लोक हिंदुंना ख्रिश्चन बनवणे अतिशय मोठ्या प्रमाणात बनवत आहेत. गरीबीचा फायदा घेउन ,अशिक्षिततेचा फायदा घेउन ते हिंदुंचे धर्मांतर करतात. 'मिशिनरीज ऑफ इंडीया' हे अरुण शौरी यांचे पुस्तक वाचा. केरळात ख्रिश्चन धर्म प्रचंड आहे.तमीळ लोकांबरोबर मी गेले ५ वर्ष रहातोय. त्यांच्यामधेही ख्रिश्चन मिशिनरीजनी केलेल्या खोट्या प्रचाराचा मोठा प्रभाव आहे. नॉर्थ-इस्ट ख्रिश्चनमय झालाय. माझ्या मणिपुरच्या एका मित्राने सांगितले की त्यांच्याकडे एका मिशिनरीने एक मोठी इमारत बांधली व लोकांना सांगितले की ख्रिश्चन बना आणि या इमारतीची मालकी तुमची. घर्,फ्लॅट्स देउन ,उपचार देउन मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवुन आणाले गेले ,हे सगळे बेकायदेशिर असुनही.
हा धोका मात्र फार वाढत चाललेला आहे,,,आणि हे सर्व फार मोठ्या प्रमाण चालले आहे,,,गरीब,भोळ्या हिंदू जनतेला मोठया प्रमाणात धर्मांतरीत केले जात आहेत..
प्रत्येक वाहिन्यांवर सकाळी हेच लोक जोरजोरात आपले भाषण देतात्...(झी मराठी वर पण !!!!!)..
मोठ्या प्रमाणात या कार्यासाठी विदेशी फंड पुरवला जात आहे !!!!!
ही बाटवा बाटवी रोखली गेलीच पाहिजे..... नाही तर गळ्यात क्रॉस घालणार्यांची संख्या वाढायला वेळ लागणार नाही !!!!!
हॉलंडमधे अल्लाचे एक कार्टुन छापले जाते.त्यासाठी जगातील सर्व मुस्लिम तीव्र आंदोलने करतात. याला तुम्ही काय म्हणाल???
कट्टरपणा जो हिंदूंकडे आहे ?????
हुसेनला अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्या म्हणनारे अल्लाच्या कार्टुन्सना कडाडुन विरोध करतात्,इमामाने कार्टुनविरोधी घेतलेल्या भुमिकेचे समर्थन करतात.
ह्या गोष्टीच समर्थन करणार्यांच्या आया,बहीणींना या यवनांनी उचलुन नेले तरी ते त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यच म्हणतील काय ?????.....
सर्व एकजात षंढ आहेत.....
सीता माईचे नग्न चित्र काढणारा हा तथाकथीत चित्रकार अल्लाचे असे चित्र काढण्यास धजावेल काय ?
कुठे जातात मग राम नाम घेणारे????? तुम्ही नक्की हिंदूच ना ? आणि हा हिंदूस्थानच ना ???????????
अशा चित्रकाराची तर जाहीर धिंड काढावयास हवी,,,,,
गर्व से बोलो हम हिंदू है अशा नुसत्या घोषणा देऊन आता चालायचे नाही......
(रामभक्त)
मदनबाण>>>>>
1 Jun 2008 - 4:20 pm | चिन्या१९८५
**नुसते विवेकानंदांचे आभार मानुन कसं चालेल? करा ना त्यांच्या सारखं काय त**
त्यांच्याइतक जमल नाही तरी माझ्यापरीने मी प्रयत्न करीन.
**अहो, १९२१ साली २० कोटी असलेली लोकसंख्या आज १२० कोटिंच्या घरात गेली ती जननामुळ्च **
समजा १० जोडपी आहेत त्यांना प्रत्येकी एक मुल झाले. याप्रमाणे १० हिंदु जन्मले. आता समजा या १० पैकी ६ जणांनी धर्म बदलला.तर हिंदु जन्मले ४ आणि ख्रिश्चन जन्मले ६.झाले ना हिंदु कमी. समजा यानंतर ६ अहिंदुनी हिंदु धर्मात प्रवेश केला. त्यांना मुल झाले की हिनंदुन्ची संख्या परत १० होते. सोपी गोष्ट आहे पण तुम्हाला समजत नाही. पारश्यांचे प्रजनन कमी का झाले????कारण जेंव्हा देशात लोकसंख्या वाढत होती त्यावेळी पारशी फक्त १-२ मुलांना जन्म देत होता.आता इतरांची संख्या वाढली पण पारशांची त्याप्रमाणात नाही वाढली. त्यांनी जर फक्त पारशीशीच विवाह करावा असा अलिखित नियम सोडुन इतर धर्मियांशी विवाह केला असता तर त्यांच्या धर्मियांचे प्रजनन वाढले असते ना!!!
**पण एक हिंदु गरीब उपाशी मरतोय,, त्याला कुणीच""हिंदु " म्हणुन खायला देत नाहिये.
पण त्याच ऐअवजी एक जण म्हणतो की गळ्यात क्रॉस अडकवुन फीर. तुला देइन खायला.**
अहो पण हे बेकायदेशीर आहे!!!!!!!आम्ही हिंदु गरीब आहोत म्हणुन आमच्यावर परदेशातील ख्रिश्चनांनी पैशाच्या जोरावर राज्य करण्यासारखेच आहे हे. फ्क्त पैशावर धर्मांतर करणे सुप्रिम कोर्टाने बेकायदेशीर ठरवले आहे.आता समजा उद्या अमेरीका म्हणाली की तुमच्या भुकेल्यांना आम्ही खायला देतो पण त्याबदल्यात तुमच्या सैन्याचा ताबा आमच्याकडे द्या तर ते चालेल का तुम्हाला???पैशाच्या जोरावर काहीही चालते का???
**एखाद्या हिंदु मुलीला आवडला ख्रिश्चन पोरगा, तर तुम्ही लग्न करु देताय का तिला त्याच्याश**
माझी वैयक्तीक रीत्या त्याला काही हरकत नाही.पण जनरली हे दिसुन येते की जर हिंदु मुलीने मुस्लिम मुलाशी लग्न केले तर मुस्लिम तिला धर्मांतर करायला लावतो.सक्तीचे धर्मांतर तिथे होते पण तुम्ही प्सुडोसेक्युलॅरीस्ट तिथे मुग गिळुन बसता.मुस्लिम हे करतो कारण एक हिंदु मुलगी धर्मांतर करुन मुस्लिम बनवली तर ते त्याच्यासाठी खुप पुण्याच काम असत आणि ते केल्यासाठी अल्लाकडुन त्याला 'विशेष वागणुक्(फेव्हर)' मिळतो.
**त्ये तर आता बी करुच की. आवडली पोरगी तर जरुर करु. धर्म्-वंश-जात काय बी न पाहता क**
तुम्ही कराल हो पण अनेक लोक घरचे, समाज याला घाबरुन करत नाहीत.
**च्यामारी, इथं बेरोजगारी वाढलिये, पाण्याची अनुपलब्धी वाढलिये.जमीन नापिक व्हायलिये.**
मग याला भाजपनी कुठे विरोध केलाय. बघा गुजरातची डेव्हलपमेंट.या पाण्याच्या,बेरोजगारीच्या,शेतीच्या,विकासाच्या,विजेच्या समस्या कशा व्यवस्थित सॉल्व होत आहेत.महागाईविरोधात भाजपने राष्ट्रव्यापी आंदोलन केल होत त्याला तुम्ही प्रतिसाद दिला का???जेंव्हा भाजप असे मुद्दे घेते तेंव्हा तुम्ही दुर्लक्ष करता. रामजन्मभुमिचे मुद्दे घेतले की लगेच आरडाओरडा करता.
**त्यासाठी मगील कित्येक दशकं अथ्क प्रयत्न सुरु होते वैज्ञानिकां**
हास्यास्पद विधान आहे हे. अहो नरसिंह रावांच्या काळातच ती चाचणी होणार होती. जागतीक दबावाला बळी पडुन राव यांनी ती रोखली. शास्त्रज्ञांची इतक्या दशकांची मेहनत वाजपेयींना आंतरराष्ट्रिय दबावापेक्षा जास्त महत्वाची वाटली.त्याचे सगळे श्रेय भाजपने घेतलेच नाही पण चाचणी घडवण्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती लागते ती त्यांनी दाखवली.कंदाहारमधे ३-४ अतिरेक्यांपेक्षा १६० भारतीयांचा जीव मलातरी जास्त महत्वाचा वाटतो. अफगाणिस्तानात कमांडो कारवाई करणे शक्य नव्हते कारण अफगाणिस्तानच्या लष्कराने विमानाला वेढा दिला होता व भारताला लष्करी कारवाई करु दिली जाणार नाही हेही स्पष्ट सांगितले होते.कारगिलमधे सैनिकहानी रोखण्याचे काम लष्कराचे होते. त्यांना कारवाई करण्याची पुर्ण सुट देण्यात आली होती.तेहेलका प्रकरणात भाजपपेक्षा लष्करी खरेदीची सिस्टीमच चुकिची हे दिसुन आले.पण ही सिस्टीम भाजपने मोडुन काढली नाही व शवपेटी प्रकरण दुर्दैवी होते पण तरीही भाजपने चांगले शासन दिले होते.
**एकः- धर्माचा प्रभाव विवेकानंदांच्या मार्गानं वाढवता येणार नाही क**
त्याला कोणी विरोध केलाय्???धर्मेंद्रांनीही त्याला विरोध केलेला नाहीये.त्यांनी त्या मार्गाबरोबर अजुनही एक मार्ग फक्त सुचवलाय.
राजे ,तुम्ही टाळ्या मला दिल्यात का अजुन कोणाला??आणि त्या खर्या दिल्यात का उपहासानी???
मदनबाण, तुमची विषण्णता समजु शकतो
1 Jun 2008 - 4:26 pm | राजे (not verified)
भाऊ,
आम्ही टाळ्या तुमच्या लेखनाला दिल्या होत्या.
व पुन्हा टाळ्या !
जे लेखन आवडले व पटले त्याबद्दल होत्या त्या टाळ्या व ह्या देखील !
उपहासाने मी टाळ्या वाजवत नाही... सरळ मुद्दाच हाती घेतो ;)
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
1 Jun 2008 - 8:42 pm | मन
सक्तीचे धर्मांतर तिथे होते पण तुम्ही प्सुडोसेक्युलॅरीस्ट तिथे मुग गिळुन बसता.
हा जो सूर आहे चर्चेचा तो एका विशिष्ट फिलॉसोफीचा आहे,एक खास "इझम" आहे.
आपण केवळ त्यांचे विचार पुनुरुक्त करताय.
तुम्ही म्हणताय त्या प्रकारचा कुठलाच "इझम" म्या अल्पमतीच्या डोक्यात मावत नाही, स्वतंत्र विचार करु लागल्यावर.
याप्रकारे कुठल्याच एका विचारसरणीच्या आहारी जाणं पटत नाही.(भाजप चा कार्य कर्ता होणं तर मुळीच नाही.)
शिवाय भाजप चं अमुक चांगलं, प्सुडोसेक्युलॅरीस्ट(म्हंजे ते ४-५ दशक सरकार चालवणारे भामटे) चं अमुक वाइट
किंवा याउलट म्हंजे भाजप चं अमुक वाइट, त्या पुर्वीच्या लोकांचं तमुक चांगलं
अशा प्रकारच्या चर्चेचा उबग आलाय्.कारण दोन्ही बाजु आम जनतेला कसं ओरबाडुन खातात ते
सगळ्यांनाच माहितिये. त्यातल्या कुणाला तरी एकाला डोक्यावर घेउन त्याचं तत्वज्ञान ओरडत फिरणं
म्हणजे जाणीव पुर्वक डोळ्यावर कातडं ओढुन घेण्यासारखं आहे.
मला त्यांच्या विरोधात काही बोलायचं नाहीये.(ते चावुन चोथा झालयं.)
आणि त्यांच्या बाजुनही नाही.(तेही अर्थातच चोथा झालेलं.)
मला "अमुक एका पक्षाचा कार्यकर्ता"(किंवा नेता!) व्हायला नाही आवडणार.
त्यामुळं मी या विषयावर अधिक प्रतिसाद देणार नाही.
वरती आंबोळी म्हणल्याप्रमाण ह्या अशा विषयांवर चर्चाच व्हायला नकोत.
आणी मुख्य म्हणजे कुणी त्या टाकल्या तरी त्यावर मी प्रतिसाद देउन मी चुक केली असच वाटतय.
ह्याहुन अधिक मी अधिक सांगण्यास असमर्थ.
आपलाच,
मनोबा
1 Jun 2008 - 9:14 pm | चिन्या१९८५
धन्यवाद राजे!!!!!!
मनोबा,तुम्ही निरुत्तर झालेला आहात त्यामुळे येथुन पळ काढता आहात. मुळात चर्चा धर्मेंद्र यांच्या मुद्द्यावरुन ,राजकारणावर तुम्ही घसरवली.तिथेही चालेनासे झाल्यावर आता सुरच बदललात.
1 Jun 2008 - 9:43 pm | मयुरयेलपले
अन्य धर्मीय लोक हिंदु मुलींना फूस लावून त्यांच्याशी विवाह करतात. त्यामुळे हिंदुंची लोकसंख्या कमी होत आहे. हे एक षडयंत्र आसुण, ते जनिवपुर्वक मुस्लिम व अन्य धर्मातील लोक करीत आहेत.
हे विधान जाहिररित्या करुन त्यांनि काय मिळवल??? फक्त अन्य धर्मीयांचा रोश आणि नविन वादाला तोंड ...
त्यामुळे आता हिंदु मुलांनी देखील मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील आणि इटली, आमेरिका, यूरोप या राष्ट्रातिल मुलिंसमावेत विवाह करून "हिंदु तितुका मेळवावा" हे तंत्र आत्मसात करावे; तरच हिंदुंची संख्या वाढेल, असे आवाहन यांनी केले...
जर आपण एखद्या वादाच निराकरन करु शकत नाहि... तर असे आवाहन करण्याचा त्याना हक्क नाहि...
आज पर्यंत आपण सर्व धर्म समभाव असे म्हणत आलो आणि आज हे काय??? वाद झाल्यास ते सोडवणार आहेत का?? कोणि आज पर्यन्त आसा केल नाहि... आग लावणे आणि पोळ्या भाजणे हेच त्यांच काम...
आपला मयुर
1 Jun 2008 - 9:46 pm | मन
अगदि मान्य.
आपलाच,
मनोबा
1 Jun 2008 - 11:32 pm | चिन्या१९८५
मयुर, हे फुस लावुन धर्मांतर घडवणे खरे आहे.त्याचे कारणही मी लिहिले आहे. जर एक अमुस्लिम धर्मांतरीत करुन मुस्लिम बनवला तर त्याचे धर्मांतर ज्याच्यामुळे झाले त्या मुस्लिमाला अल्लाकडुन स्पेशल फेव्हर मिळतो. म्हणुनच हे कारस्थान आहे यात वाद नाही. माझ्या वरील पोस्ट्स वाचा.मग ख्रिश्चनांनी केलेले कारस्थानही कळुन येइल. आपण सर्वधर्मसमभाव करत आलो. पण त्यांनी (मुस्लिम्,ख्रिश्चनांनी) तो कधीच केला नाही. त्यांच्यासाठी त्यांचा धर्मच खरा धर्म आहे व इतर धर्म सैतानाकडुन आलेले आहेत. याला काही अपवाद असतीलही.
यातुन काही वाद झाल्यास काय हा तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. अहो, यात वाद होण्यासारखे काहीच नाही. आणि तरीही तो मुस्लिमांनी अथवा ख्रिश्चनांनी घडवुन आणल्यास जबाबदारी त्यांचीच असेल.
2 Jun 2008 - 12:18 am | मयुरयेलपले
फुस लावुन धर्मांतर घडवणे खरे आहे.त्याचे कारणही मी लिहिले आहे. जर एक अमुस्लिम धर्मांतरीत करुन मुस्लिम बनवला तर त्याचे धर्मांतर ज्याच्यामुळे झाले त्या मुस्लिमाला अल्लाकडुन स्पेशल फेव्हर मिळतो.
हास्यास्पद... याला मुसलमनांचि अंधश्रध्दा म्हणता येइल नेते ति दुर करु श कत नाहित का ?? आणि आता १०% मुस्लिम सुद्धा यावर
विश्वास ठेवत नाहित...(भारतातिल तरि..)
यातुन काही वाद झाल्यास काय हा तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. अहो, यात वाद होण्यासारखे काहीच नाही. आणि तरीही तो मुस्लिमांनी अथवा ख्रिश्चनांनी घडवुन आणल्यास जबाबदारी त्यांचीच असेल.
भारतात वाद होण्या साठि कारण नाहि इच्छा लागते... विधानसभा विधानपरिशदेत हे चि त्र.. तर रस्त्याव र काय??
आज पर्यंत आसलि विधाने या धर्माच्या नेत्यांकडुन जाहिरपणे केल्याचे ऐकिवात नाहि. (तुम्हि एकले का?).... मग जबाबदारी त्यांचीच कशि?? धार्मिक भावना कोणाच्या दुखावल्या गेल्या?? तुम्हि शिळि पोळि गरम करून का खाताय... झाल ते गंगेला मिळाल.. आज हिंदु धर्म वाढवण्यासाठि हा एकच पर्याय आहे का?? नाहिना मग त्याचा उल्लेख का नहि केला महाराजांनि ??
आपला मयुर
2 Jun 2008 - 12:47 am | चिन्या१९८५
हास्यास्पद... याला मुसलमनांचि अंधश्रध्दा म्हणता येइल नेते ति दुर करु श कत नाहित का ?? आणि आता १०% मुस्लिम सुद्धा यावर
विश्वास ठेवत नाहित...(भारतातिल तरि..)
अहो मुस्लिमांमधे अंधश्रध्दा नसते हो. अंधश्रध्दा भारतात फक्त हिंदु धर्माशी संबंधित शब्द आहे. 'कुराणामधे लिहिलय ना मग ते खरच' अशीच परिस्थिती आहे. तिथे अंधश्रध्दा वगैरेचा संबंधच नाही. अहो वंदे मातरम म्हटले तर तो मनुष्य मुस्लिम राहत नाही अशी ज्यांची श्रध्दा आहे त्यांच्याबद्दल काय बोलणार्???आणि आपले उपराष्ट्रपती मोठ्या दिमाखात सांगतात 'मी वंदे मातरम म्हणनार नाही कारण ते म्हटल्याने मुस्लिम रहात नाही'. अशा वेळि अंधश्रध्दानिर्मुलनवाले वगैरे गप्प बसतात. १०%ची टक्केवारी तुम्ही कुठुन काढली???परिस्थिती नेमकी उलटी आहे. फक्त १०% लोक याला अंधश्रध्दा म्हणतील्.बाकी म्हणतील 'हे कुराणात लिहिले आहे ना मग ते सत्य आहे'.
आज पर्यंत आसलि विधाने या धर्माच्या नेत्यांकडुन जाहिरपणे केल्याचे ऐकिवात नाहि. (तुम्हि एकले का?).... मग जबाबदारी त्यांचीच कशि?? धार्मिक भावना कोणाच्या दुखावल्या गेल्या??
नेत्यांकडुन काय धरुन बसला आहात्??भारतात अशी पुस्तके आहेत जी हिंदु धर्माबद्दल द्वेशभावना पसरवतात,जी ख्रिश्चनांनी छापली आहेत. ती भारतातच छापली जातात. ती वाचुन आमच्या भावना दुखावल्या म्हणुन आम्ही हिंदुंनी दंगली केल्या तर चालेल का तुम्हाला???
हिंदु धर्म वाढवण्याचे इतरही पर्याय आहेत ,ज्याबद्दलही हे आचार्य धर्मेंद्र बोलत असतात.
2 Jun 2008 - 9:17 am | सखाराम_गटणे™
चिन्या१९८५ - बरोबर आहे
मला चिन्या१९८५ चे मुद्दे पटत आहेत.
2 Jun 2008 - 11:50 am | मयुरयेलपले
अहो मुस्लिमांमधे अंधश्रध्दा नसते हो. अंधश्रध्दा भारतात फक्त हिंदु धर्माशी संबंधित शब्द आहे. 'कुराणामधे लिहिलय ना मग ते खरच' अशीच परिस्थिती आहे. तिथे अंधश्रध्दा वगैरेचा संबंधच नाही.
आता हि माहिति कुठुण??
नेत्यांकडुन काय धरुन बसला आहात्??भारतात अशी पुस्तके आहेत जी हिंदु धर्माबद्दल द्वेशभावना पसरवतात,जी ख्रिश्चनांनी छापली आहेत. ती भारतातच छापली जातात. ती वाचुन आमच्या भावना दुखावल्या म्हणुन आम्ही हिंदुंनी दंगली केल्या तर चालेल का तुम्हाला???
हिंदु धर्म वाढवण्याचे इतरही पर्याय आहेत ,ज्याबद्दलही हे आचार्य धर्मेंद्र बोलत असतात.
आज किती लोक मनापासुन अशि पुस्तकं वाचतात??
एक स्पष्टिकरण मला हा वाद हिंदु आणि इतर धर्म असा रंगवायचा नाहि... आपण हि तसे करु नये (विनंति)... अशि विधाने जाहिररित्या महाराजांनि करने चुक ... आपल्याला हिंदु धर्माचा आदर आहे म्हणुन ... आपण दुसर्याचा अनादर करू नये.. आपण भारतिय हा एकच धर्म...
आपला मयुर
3 Jun 2008 - 7:51 pm | llपुण्याचे पेशवेll
आता हि माहिति कुठुण??
आजुबाजूला पहा डोळे उघडे ठेऊण म्हणजे कळेल. हिंदूधर्माबद्दल अन्यधर्मियानी छापलेली पुस्तके बघा. कळेल.
एक स्पष्टिकरण मला हा वाद हिंदु आणि इतर धर्म असा रंगवायचा नाहि... आपण हि तसे करु नये (विनंति)... अशि विधाने जाहिररित्या महाराजांनि करने चुक ... आपल्याला हिंदु धर्माचा आदर आहे म्हणुन ... आपण दुसर्याचा अनादर करू नये.. आपण भारतिय हा एकच धर्म...
अशी विधाने जामा मशिदीच्या इमामाने केली तर त्याबद्दल का नाही बोंबाबोंब करत कोणी. आपण भारतीय हा धर्म सर्वानी समभावानी पाळला पाहीजे. फक्त हिंदूंनी नव्हे.
पुण्याचे पेशवे
2 Jun 2008 - 8:35 pm | चिन्या१९८५
धन्यवाद ,गटणे.
मयुर,
दाखवा मला मुस्लिमांमधे अंधश्रध्दा असते असे म्हणनारा कोणीही नेता, समाजसेवक. समान नागरी कायद्याची मागणी झाली होती तेंव्हा एक महीला म्हणाली की ३ वेळा तलाक बोलण्याची प्रथा चुकिची आहे. तर दुसरी एक महीला म्हणाली की जर कुराणमधे ती गोष्ट लिहिलिय तर ती चुकिची नाहीये. सरकारनेही हीच भुमिका घेतलिय आत्तापर्यंत.
अजुन एक उदाहरण- २-३ महीन्यापुर्वी हाय कोर्टाने एक निकाल दिला होता त्यात म्हटले होते की 'मुस्लिमांनी विवाह नोंदणी करणे आवश्यक आहे' त्यावेळी सर्व मुस्लिम संघटनांनी विरोध केला. त्यांनी अशी भुमिका घेतली की 'लग्न ही आमची खासगी गोष्ट आहे. आम्हाला ती कोर्टाबरोबर शेअर करायची नाही. शरिअत हा आमच्यासाठी सर्वात महत्वाचा लॉ आहे. भारत देशाच संविधान त्यानंतर येत. शरीअतच्या आड जर भारतीय संविधान येत असेल तर आम्ही शरीअतच स्विकारणार आम्ही भारतीय संविधान स्विकारु शकत नाही.'. आता मला सांगा शरीअतमधे कुठे या सर्व गोष्टी अंधश्रध्दा आहेत असे लिहिले असेल का???
आज किती लोक मनापासुन अशि पुस्तकं वाचतात??
अशी पुस्तक तुमच्याआमच्यापर्यंत येत नाहीत्.ती जातात अर्धशिक्षित गरीबांकडे,आदीवास्यांकडे. आणि ही पुस्तके मोफत वाटली जातात. ही पुस्तके वाटणार्यांच मोठ जाळ आहे. हजारो पुस्तके वाटली जात असतात हे निरनिराळ्या आवृत्यांमधील प्रतींमुळे कळते.
आपल्याला हिंदु धर्माचा आदर आहे म्हणुन ... आपण दुसर्याचा अनादर करू नये.. आपण भारतिय हा एकच धर्म...
आम्हालाही दुसर्या धर्माचा अनादर करायचा नाहीये.पण आमच्या सतत कुरघोड्या करायच्या आणि आम्ही गप्प रहायच हे किती दिवस चालणार्???आपण भारतीय हा एकच धर्म हे आम्हीच मानतो ते कधीच मानत नाही. नाहीतर वरती जे उदाहरण दिले आहे लग्न नोंदणी संबंधी ते झालेच नसते. मला नाही धर्मेंद्र यांच्या वक्तव्यात कुठेही दुसर्या धर्माचा अनादर आहे.
5 Jun 2008 - 2:35 pm | रम्या
..शंभर टक्के सहमत.
आपलं मवाळ धोरणच सगळ्या अडचणींच्या मुळाशी आहे.
इतिहास काळापासूनच हिंदूंचं मवाळ धोरण हिंदूस्थानाला धर्मशाळा बनण्यासाठी कारणीभूत ठरले आहे.
कुणीही यावे आणि खुशाल टपली मारून जावे.
आपण सर्व भारतिय आहोत हा मवाळ आणि तथाकथित विशाल दृष्टीकोन गेला उडत. आपल्या धर्माचं रक्षण करणं हेच महत्वाचं.
(हिंदुत्ववादी) रम्या.
3 Jun 2008 - 9:09 pm | मयुरयेलपले
धन्यवाद...
चिन्या१९८५
इतक्या दिवस चाललेल्या चर्चेत एक जाणवल आता आम्हाला मवाळ धोरण सोडायला हंव... आपल्या सारख्या अभ्यासु लोकांकडुन फार शिकायला मिळाल...
आपला मयुर
4 Jun 2008 - 10:00 pm | चिन्या१९८५
बरोबर आहे पेशवे.
मयुर्,हिंदु-मुस्लिम भांडणाला एकच उपाय आहे .तो म्हणजे हिंदुंची एकजुट. ती एकदा झाली की मग दंगली वगैरे थांबतील. कारण मग हिंदुंवर अन्याय होणारच नाही.
3 Apr 2012 - 3:18 pm | मिनेश
चिन्या१९८५ शी १०० % सहमत......