माझी म्हैस

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
12 Sep 2011 - 3:27 am

माझी म्हैस

एका डोळ्यानं आहे जरी थोडी तिरळी
माझी म्हैस गुणाची आहे काळी काळी ||धृ||

कात्रिना नाव तिचे फार शोभून दिसते
हाय बेबे! म्हटलं तर शेपूट हलवते
मला डाऊट हाय ती पार्लरला न्या म्हणते
जसं नटून सजून होईल ती गोरी गोरी ||१||

शिंगे तिची वाकडी घाटदार छान
दुरून बघीतले तर बदामाचे सिम्बॉल
प्रत्येक रेड्याला वाटते ते आव्हान
तिच्यासाठी गोठ्याबाहेर लावतात लाईन
योग्य वर तिला आता शोधा हो कुणीतरी ||२||

पाण्यात बसण्याची भारी तिला आवड
नदीवर जाते नेहमी ती काढून सवड
तिला रोज मी धुतो तरी रंग नाही जाणार
माहीत आहे मला पण तिला कोण सांगणार
यंदाच्या मिस इंडीयाची करा म्हणते तयारी ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१२/०९/२०११

हास्यकवितामौजमजा

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

12 Sep 2011 - 3:32 am | इंटरनेटस्नेही

अ प्र ति म!

पाभे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर व्हावा! ;)

निनाव's picture

16 Sep 2011 - 6:11 pm | निनाव

१०१% नं सहमत!! संपुर्ण पाठिंबा आहे!

प्रकाश१११'s picture

12 Sep 2011 - 3:45 am | प्रकाश१११

पाषाणभेद -मस्त ,झकास ..
पाण्यात बसण्याची भारी तिला आवड
नदीवर जाते नेहमी ती काढून सवड
तिला रोज मी धुतो तरी रंग नाही जाणार

आवडली.

निनाद's picture

12 Sep 2011 - 6:22 am | निनाद

कविता जवळपास वर्णभेदी असल्याने विषय आवडीचा नाही! पण म्हैस हा प्राणी आवडीचा आहे. सारे लहानपण म्हशीच्या दुधावर गेल्याने तसे असावे! :)

सर्वसाधारणपणे गोरेपणा हा चांगला आणि काळेपणा वाईट या तथाकथित युरोपीय गैर समजावर आधारित असल्याचे दिसून येते. (व्हिक्टोरियन विचारसरणी?) सर्वसाधारण भारतीय विचारसरणीनुसार काळा वर्ण हा उत्तम मानला गेला आहे. जसे कृष्ण हे व्यक्तिमत्त्व, विठ्ठलाचे ध्यान, साक्षात शिव शंकराचे रूप हे सर्व कृष्णवर्णीय आहेत आणि ते भारतीयांना प्रिय आहेत.

कवितेतील म्हैस ही काळी आहे, ती तिरळी आहे. हा शारिरीक वैगुण्यांवर लक्ष केंद्रित करणारा विनोद
संकुचित वाटतो.

जसे तिला रोज मी धुतो तरी रंग नाही जाणार
माहीत आहे मला पण तिला कोण सांगणार

किंवा

मला डाऊट हाय ती पार्लरला न्या म्हणते
जसं नटून सजून होईल ती गोरी गोरी

पण येथे बहुदा पाषाणभेद यांना थोडी गंमत अपेक्षित असल्याने त्यात सूट दिली जावी का? मला तसे वाटत नाही.
पाभे यांना विनंती आहे की हीच कविता शारिरीक वैगुण्यांवर लक्ष केंद्रित न करता विनोदी ढंगात वेगळ्या अंगाने लिहावी. त्या विनोदाची उंची निश्चितच वेगळी असेल.

पाषाणभेद's picture

13 Sep 2011 - 2:36 am | पाषाणभेद

अरे बापरे! आता मौजेच्या कवितांनादेखील ढिसक्लेमर द्यावं लागेल की काय? अन्यथा म्हशींचा मोर्चा माझ्या दारात आलाच म्हणून समजा.

हाहाहा...

पाभे, झक्कास कविता. मनापासून आवडली.

सारे लहानपण म्हशीच्या दुधावर गेल्याने तसे असावे!

आम्हाला तर खुपच आवडली कविता. आमचे सारे लहानपण म्हशी राखण्यात गेल्याने तसे असावे! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

12 Sep 2011 - 5:13 pm | अत्रुप्त आत्मा

:-D तुमची म्हस आनी तुमी दोगांन्ना बी आमचे सिरसाष्टांग दंडवत हो पाषान भौ...
कसं सुचतं तुम्हाला..धन्य धन्य त्या परतीभेची

चित्रगुप्त's picture

13 Sep 2011 - 2:47 am | चित्रगुप्त

म्हशीवरील या सुंदर कवितेनंतर तुमच्या कडून आता म्हैस-त्री मंत्राची प्रतिक्षा आहे.
संदर्भः गाय-त्री मंत्र.

पाषाणभेद's picture

13 Sep 2011 - 5:29 am | पाषाणभेद

प्रिय चित्रगुप्त साधक,

सदरहू मंत्र म्हैस-त्री मंत्र असा नसून महिषीत्रीमंत्र असा आहे. (आपला अभ्यास वाढवा.)
संस्कृतग्रंथ "भुकंबलीतमः" वेदोपदेश (प्राकृतातः भुकबळी) या ग्रंथात तो संत पाषाणभेद (मृ. शके १६६१ किंवा ६२) यांनी लिहीलेला आहे. कलौघात पृथ्वीवरील सर्व धर्म या मंत्राची महती विसरले जरी असले तरी प्रात:काळी दुधाचे सेवन (पिवर, पाणीमिश्रीत तसेच चहाच्या माध्यमातून का होईना) करून या मंत्राचे उच्चारण आपोआप (अजाणतेपणी का होईना) करतच असतात.

येथील तमाम बंधू भगीनींच्या कल्याणाकरता हा महिषीत्रीमंत्र आम्ही पुन्हा उदधृत करीत आहोत. तथास्तू.

महिषीत्रीमंत्र

म्हss भुपरि दुग्ध स्वः
तत महिषी वरेण्यं
भर्गो देविस्य धीमहि*
धियो यो न: प्रचोदयात्

अर्थातः

म्हss = संपुर्ण विश्वात भुक शमवीणार्‍या देवतेची आठवण करणारा आदिम (प्रारंभीक) स्वर. विश्वात भुक हेच खरे सत्य स्वरूप आहे.
भुपरि = भु उपरि = भु=पृथ्वी; उपरि= च्या वर. अर्थात भुमीवर रहिवास करणारा.
दुग्ध= दुध. पातळ, पांढरे, शरीरास शक्ति प्रदान करणारे द्रव्य.
स्वः = स्वाहा= सेवन करणारा, सुख़ प्रदान करणारा
तत = ते, ती, त्या.
महिषी= एक चौपाद, शेपटीधारी सजीव प्राणी. प्राकृतात म्हैस. येथे शक्ति असणारी देवता.
वरेण्यं = सर्वात उत्तम.
भर्गो = कर्माने उद्धार करणारी/ करणारा
देविस्य = देवता, देवी
धीमहि*= धी+महि= ध्यान, चिंतन करण्यास योग्य (*महि= पुजनीय, वंदनीय महिला, म्हैस, पृथ्वी आदी.)
धियो = बुद्धि, यो = जो, नः = आमच्या, प्रचोदयात् = शक्ति दे.
धियो यो न: प्रचोदयात्: = ह्या श्लोकाची हि प्रार्थना आहे. आमच्या बुद्धीला शक्ति दे.

थोडक्यात महिषीत्रीमंत्र असा आहे:
हे म्हैस(देवी) या भुवर (पृथ्वीवर) मी दुधाचे सेवन करणारा आहे, जे सुख प्रदान करते. हे शक्तिदेवता (म्हैस), तू सर्वात उत्तम, कर्माने उद्धार करणारी असून ध्यान व चिंतन करण्यायोग्यच आहेस. तू (म्हैस) आम्हाला शक्ति प्राप्त करण्याची बुद्धी प्रदान कर.

संदर्भः संत पाषाणभेद (मृ. शके १६६१ किंवा ६२) रचीत संस्कृतग्रंथ "भुकंबलीतमः वेदोपदेश" (प्राकृतात अनुवाद दगडफोड्या यांनी केलेला ग्रंथ: "भुकबळी" (रचनाकालखंड उपलब्ध नाही.) )

शैलेन्द्र's picture

14 Sep 2011 - 12:38 pm | शैलेन्द्र

_/\_

चित्रगुप्त's picture

14 Sep 2011 - 2:45 pm | चित्रगुप्त

हे (म्हैस), तू सर्वात उत्तम, कर्माने उद्धार करणारी असून ध्यान व चिंतन करण्यायोग्यच आहेस...

वाहवा, या "भुकंबलीतमः" वेदोपदेश ग्रंथात आणखी कोणकोणत्या देवता व मंत्र आहेत ? वाचण्यास उत्सुक.

पाषाणभेद's picture

15 Sep 2011 - 7:10 am | पाषाणभेद

"भुकंबलीतमः वेदोपदेश" हा ग्रंथ फार प्राचीन काळी लिहीला गेला. संत पाषाणभेद (मृ. शके १६६१ किंवा ६२) हे सर्वसामान्य नव्हते तर ते सर्वमान्य होते. त्यांचे वडिल तत्कालीन राजाकडे फार मोठे अंमलदार होते. असल्या ऐशोआरामाची सवय लागू नये व भुकबळींची सेवा करण्यासाठी संत पाषाणभेद (मृ. शके १६६१ किंवा ६२) हे घराबाहेर पडले. नंतर त्यांनी बरेच ग्रंथ लिहीले. कवने केलीत. त्यातील बहूतेक ग्रंथ यवनी हल्यात जाळले गेले आहेत.

"भुकंबलीतमः" हा एकमेव ग्रंथ त्या हल्यांतून वाचलेला आहे. तत्राप आपला समाज ऐतीहासीक वास्तूंची किती काळजी
हे आपणास ठावूक आहे. पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या अभ्यासकेंद्रावर झालेला हल्ला आपणास आठवत असेलच.
विषयांतर होते आहे. असो.

तर संत पाषाणभेद (मृ. शके १६६१ किंवा ६२) रचीत संस्कृतग्रंथ "भुकंबलीतमः वेदोपदेश" ग्रंथाची काही पानेच आमच्या हाती लागलेली आहे. त्यातही ती पाने जीर्ण झालेली असल्याने वाचनीय नाहीत.

प्राकृतात अनुवाद दगडफोड्या (यांचा जीवनकाल उपलब्ध नाही पण ते संत पाषाणभेद यांचे समकालीनच आहेत. तसे ऐतिहासीक पुरावे उपलब्ध आहेत.) यांनी केलेला ग्रंथ: "भुकबळी" ह्या ग्रंथाच्या प्रती मध्यदेशात (सध्याचा मध्यप्रदेश)
इंदूर इलाख्याच्या आसपास आहेत अशी ऐकीव माहीती आम्हास आहे.

कृपया आपण सदर ग्रंथाचा शोध घेणार का? तसे झाले व तो ग्रंथ सापडला तर येणार्‍या पिढ्यांस आपण एक खजीनाच शोधून दिल्यासारखे होईल.

नगरीनिरंजन's picture

15 Sep 2011 - 11:49 am | नगरीनिरंजन

काय योगायोग पाहा! त्या ग्रंथातली आणखी काही पाने मला नुकतीच अहमदनगरच्या जराजीर्णवस्तुसंग्रहालयात सापडली. त्या संग्रहालयाचे व्यवस्थापक श्री. ज. रा. जर्जर यांनी स्वतः चाकाच्या खुर्चीतून पायपीट करून मध्यप्रदेशातून ती मिळवली असे ते सांगत होते.
मला मिळालेल्या पानांमध्ये मर्कटोपनिषद, कुक्कुरमिलाप आणि तुरंगसंभव अशी तीन प्रकरणे आहेत. त्यावरही पाभेंनी लिहावे अशी त्यांना नम्र विनंती.

ऋषिकेश's picture

15 Sep 2011 - 9:57 am | ऋषिकेश

म्हैशीवर काय गानं आसल म्हून पघाय आल्तो त्ये लय ब्येस झालं!
गानं आवल्ड.
माझ्या करीनाची आटवन आली.. तुमच्या कत्रिनावानीच तीलाबी नटायची लय आवड..

दिपक's picture

15 Sep 2011 - 12:26 pm | दिपक

वाह दफोराव.. आवडली ब्वॉ तुमची म्ह्स.. :-)

फोटो - http://malavikacolours.blogspot.com/2010/05/mhais.html