भास

Primary tabs

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
15 Oct 2007 - 12:21 am
भास
*****************
चाहुल लागुनि का मी जागे?
पा‍उल नव्हते तव ते मागे -
शेजार्‍यांच्या खोल्यांमधुनी
कुणी फिरकते रात्री उठुनी
*
भिंतीवरती एक सावली
कशी उमटली, कुठे धावली
नसे आकृती तव जी आली
टाकुनि झोता गाडी गेली
*
मस्तकावरि स्पर्श कसा हा
गोंजारे मज हात तुझा का?
छे! तो अभ्रा केस हलवितो
पंखा वारा जसा फिरवितो
*
जीभ चटावे काय कारणा?
फुका शोधते तुझ्या चुंबना
जशी लागली सहज ती जरा
सुकलेल्या या बधीर अधरा
*
भास तुझे हे अवतीभवती
क्षणभंगुर तरी भ्रम हे असती
निरसे ना परि, छळे गंध हा
ओतप्रोत तव भिने मंद सा
*****************
प्रेमकाव्यकविताविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

15 Oct 2007 - 12:43 am | विसोबा खेचर

धनंजयराव,

तुम्ही ही कविता प्रेमकाव्य या सदरात घेतली आहे खरी, परंतु मला तर ही कविता प्रेमकाव्याच्याऐवजी थोडीशी रहस्यमयच वाटली! मी याला 'रहस्यमय प्रेमकाव्य' असं म्हणेन!

भिंतीवरती एक सावली
कशी उमटली, कुठे धावली
नसे आकृती तव जी आली
टाकुनि झोता गाडी गेली

हे कडवं मस्त आहे. माझ्यामते इथूनच खरी रहस्याला सुरवात होते.

मला विचाराल तर याच कवितेचा धागा पकडून सुरवातीला 'प्रेमकथा' आहे असं दाखवून पुढे याची एक उत्तमपैकी डिटेक्टीव्ह ष्टोरी बनू शकेल असं मला वाटतं!

'शेजार्‍यांच्या खोल्यांमधुनी कुणी फिरकते रात्री उठुनी',
'भिंतीवरची सावली',
'रात्रीच्या अंधारात झोत टाकून गेलेली गाडी',

इत्यादी मालमसाला या रहस्यमय कथेत मजा आणेल असं वाटतं!

असो, कविता वाचून झालेलं प्रामाणिक मत नोंदवत आहे. राग नसावा..

धन्याशेठ, तुलाही जर माझं म्हणणं पटलं असेल तर लिही पाहू याच धर्तीवर एखादी छानशी रहस्यकथा! तू ती उत्तमरित्या लिहू शकशील अशी मला खात्री आहे!

आपला,
तात्या बॉन्ड ००७!

धनंजय's picture

15 Oct 2007 - 7:20 am | धनंजय

तुमचे म्हणणे खरे आहे. कधीकधी प्रेम ही एक झपाटलेली अवस्था असते. टप्प्याटप्प्यावर प्रियव्यक्तीचा भास पाहाणारा प्रियकर आज ते भास म्हणून ओळखू शकतो, उद्या ते ओळखेलच असे काही सांगता येत नाही. कवितेत शेवटचा भास खरा की खोटा हे प्रियकराला कळत नाही. प्रियकराला वेड लागले आहे का? की जाणून बुजून एका शेवटच्या भासाचे निरसन तो करू इच्छित नाही, हे रहस्य आहे.

पण झपाटून जायच्या भीतीने जो जगतो त्याने प्रेमाच्या फंद्यात का पडावे! झपाटण्यातही सच्चे प्रेम आहे.

विसोबा खेचर's picture

15 Oct 2007 - 11:38 am | विसोबा खेचर

तुमचे म्हणणे खरे आहे. कधीकधी प्रेम ही एक झपाटलेली अवस्था असते.

नाही, झपाटलेली अवस्था वगैरे काही नाही, मला तर यात खुनाबिनाचं प्रकरण असावं असा संशय होतो आहे!

रात्रीच्या अंधारात झोत टाकून गेलेली गाडी पोलिसांची असावी का? :)

आपला,
(शि.आय.डी) तात्या.

टग्या's picture

15 Oct 2007 - 11:53 am | टग्या (not verified)

खुनाबिनाच्या प्रकरणाबद्दल माहीत नाही. असूही शकेल.

मला तर काही भागांत ही डिटेक्टिव्ह कथेपेक्षा एखादी गूढ भयकथा / भूतकथा असावी असे वाटले.

शेजार्‍यांच्या खोल्यांमधुनी
कुणी फिरकते रात्री उठुनी

या पंक्ती वाचून, मध्यरात्रीचा मिट्ट काळोख आहे, झंझावात घोंगावत आहे आणि शेजार्‍यांच्या खोलीतून अचानक 'आजा रे परदेसी' किंवा 'आयेगा आनेवाला' ऐकू येत आहे, असा 'भास' झाला बॉ!

विसोबा खेचर's picture

15 Oct 2007 - 12:05 pm | विसोबा खेचर

या पंक्ती वाचून, मध्यरात्रीचा मिट्ट काळोख आहे, झंझावात घोंगावत आहे आणि शेजार्‍यांच्या खोलीतून अचानक 'आजा रे परदेसी' किंवा 'आयेगा आनेवाला' ऐकू येत आहे, असा 'भास' झाला बॉ!

हे वाचून मला तर आता धनंजयरावांच्या चेहेरा अशोककुमारसारखा दिसू लागला आहे! :)

आपला,
तात्यामुनी!

प्रकाश घाटपांडे's picture

15 Oct 2007 - 9:18 am | प्रकाश घाटपांडे

मपल्याला अदुगर वाटलं कि धनंजयराव त्यो संकृत कवी की नाटककार 'भास' याबद्दल बोलतायत. मंग कळाल कि ह त्येंच्या मनातलेच भास हायेत. बंटा मारला कि असे भास व्हतात बरं का? येशीखालून चालनारा मानूस बी टकुर्‍याला लागनं म्हनून वाकू वाकू चाल्तोय. पावसाच्या पान्याच्या डबक्यात बुडनं म्हणुन वाकु वाकु ठाव घेतुय. यष्टी लई लांब असली तरी अंगाव येईन म्हनून अदुगरच पळत सुटतोय. यकदा रामराम दुसर्‍यान घेतला तरी धा धा यळंला रामराम करतुयं. मंग मान्स बी वळ्खून जात्यात.
ह घ्या सां न ल
प्रकाश घाटपांडे

विकास's picture

15 Oct 2007 - 11:02 pm | विकास

शेजार्‍याच्या घरी येता वरचेवरी
तुमचे लाडीक बोल येते कानावरी
आणि जागे पणी येते स्वप्नांना जाग,
का हो धरीला मजवर राग...

वळती तुमचे डोळे माझ्या खिडकीकडे
भारी हट्टी स्वभाव तुम्ही जाता पुढे
जाता चैत्रापरी माझी फुलवून बाग,
का हो धरीला मजवर राग...

जाणे येणे होते तुमचे माझ्या घरी
तुमच्या पावलांची वाट पडली परसू दारी
वाटलं फिरून याल अवचीत केंव्हा तरी
डोळे न्याहाळती, डोळे न्याहाळती, डोळे न्याहाळती
खुळ्या प्रितीचा माग
का हो धरीला मजवर राग...

(जगाच्या पाठीवर, ग.दि.मा.)
वाचण्या पेक्षा ऐकण्यासारखे..

धनंजय's picture

16 Oct 2007 - 5:13 pm | धनंजय

"लेकिन" चित्रपटात हे गीत आहे, कवी गुलजार आहेत :
+++++++++++++++++
सुरमयी शाम इस तरह आये
सांस लेते हो जिस तरह साये

कोई आहट नहीं बदन की कहीं
फिर भी लगता है तू यहीं है कहीं
वक़्त जाता है, सुनाई देता है
तेरा साया दिखाई देता है
जैसे खु़शबू नज़रसे छू जाये
सांस लेते हो जिस तरह साये

दिन का जो भी पहर गुजरता है
कोई एहसान सा उतरता है
वक़्त के पाँव देखता हूँ मैं
रोज ये छाँव देखता हूँ मैं
आये जैसे कोई ख़याल आये
सांस लेते हो जिस तरह साये
+++++++++++++++++

अर्थात या चित्रपटात भुताटकी आहे. पण या गाण्याला हृदयनाथांनी संगीत असे हळुवार दिले आहे, आणि सुरेश वाडकरांनी असे काही गायले आहे, की ती भीतीदायक भूतबाधा मुळीच वाटत नाही, सर्वत्र प्रियेची आठवण येणार्‍या, आहट-छाँव-खुशबू हे भास बघणार्‍या प्रियकराचा त्या गाण्यातून अनुभव येतो.
http://www.youtube.com/watch?v=rx6D4tNMQk0

ध्रुव's picture

17 Oct 2007 - 6:47 pm | ध्रुव

सुंदर!

ध्रुव
http://www.flickr.com/photos/dhruva

पुरणपोळी's picture

17 Oct 2007 - 10:44 pm | पुरणपोळी

गेलेली लाईट आली की सगळे भास दूर होतील.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jul 2008 - 10:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रहस्यमय कविता आहे, आवडली.

श्रीकृष्ण सामंत's picture

21 Jul 2008 - 12:55 am | श्रीकृष्ण सामंत

कविता वाचून खूप बरं वाटलं
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्राजु's picture

21 Jul 2008 - 8:41 am | प्राजु

सुरूवातीला वाचताना काहिशी गूढ कविता असे वाटले होते. पण तिसर्‍या कडव्यापासून कविता एकदम झोक्कात जाते आहे.

जीभ चटावे काय कारणा?
फुका शोधते तुझ्या चुंबना
जशी लागली सहज ती जरा
सुकलेल्या या बधीर अधरा

हम्म!!! भारीच हा विरह बुवा!! (कविता आवडली हे.सां. न. ला.)

स्वगत : के सुं चा कारखाना बंद आहे का? बे.ला काय लाडू खाऊन झोपला आहे का?? आंबोळीचं काय??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Jul 2008 - 12:03 am | llपुण्याचे पेशवेll

स्वगत : के सुं चा कारखाना बंद आहे का? बे.ला काय लाडू खाऊन झोपला आहे का?? आंबोळीचं काय?? अमोल केळकर चिकन खाऊन झोपी गेले का काय? पिडां काकांच्या 'पोरी पटवण्याचे १११ सोपान' या विषयाचा तास अजून संपला नाही काय? साला झाले काय या विडंबनकाराना?
पुण्याचे पेशवे

अनिल हटेला's picture

21 Jul 2008 - 1:54 pm | अनिल हटेला

रॉ मटेरियल रेडी आहे !!!

कुठे गेले आपले एक्सपर्ट !!!!

के सुं चा कारखाना बंद आहे का? बे.ला काय लाडू खाऊन झोपला आहे का?? आंबोळीचं काय??

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

चतुरंग's picture

22 Jul 2008 - 12:25 am | चतुरंग

सुरेख काव्य! आपल्याला जाणवलेले 'भास' आमच्यापर्यंत पोचले! ;)

(स्वगत - ह्या धनंजयशेठचा अभ्यासाच्या विषयांशिवाय इतरही 'विषयां'चा बराच अभ्यास दिसतो आहे! त्याशिवाय का असे 'भास' होतात? B) )

चतुरंग