पुणेरी हायकू -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
2 Sep 2011 - 2:45 pm

रस्ते डांबरी
जाहिरात सामोरी...
... गाडी खड्ड्यात !

लाल सिग्नल
वाहतूक सुसाट -
मोक्षाची वाट !

एक ते चार
दुकानदारी गार
- बाणा मराठी !

देव आमचा
बगीचा शेजाऱ्याचा
... त्रस्त कुंपण

सख्खे शेजारी
' केरा ' तून वैरात -
' खांदा ' वांध्यात !

कवितामुक्तकमौजमजा

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

2 Sep 2011 - 2:56 pm | किसन शिंदे

खि..खि..खि :D

एक ते चार
दुकानदारी गार
- बाणा मराठी !

देव आमचा
बगीचा शेजाऱ्याचा
... त्रस्त कुंपण

हे लय भारीये राव.

नरेश_'s picture

2 Sep 2011 - 3:27 pm | नरेश_

:)

अत्रुप्त आत्मा's picture

2 Sep 2011 - 4:31 pm | अत्रुप्त आत्मा

देव आमचा
बगीचा शेजाऱ्याचा
... त्रस्त कुंपण

खिक्क :bigsmile:

अवांतरः-
कविता by विदेश
रहाता भारत देश(?)
तूम हायकू पुणेरी?.... :wink:

शुचि's picture

2 Sep 2011 - 7:18 pm | शुचि

पुणेरी हाय्कू
करताय काय्कू
बोलेगा भायकू ;)
___

सर्व हायकू मस्त :)

अन्या दातार's picture

2 Sep 2011 - 10:26 pm | अन्या दातार

भारी! आवडेश एकदम :)
पुलेशु

जाई.'s picture

2 Sep 2011 - 11:30 pm | जाई.

+१

सूड's picture

3 Sep 2011 - 9:50 am | सूड

आवडल्या गेले आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

3 Sep 2011 - 12:21 pm | परिकथेतील राजकुमार

ह्यात पुणेरी काय आहे ते कळाले नाही.

असे शिर्षक देऊन ट्यार्पी वाढवायचा प्रयत्न ?

रमताराम's picture

3 Sep 2011 - 1:21 pm | रमताराम

असाच प्रश्न पडला आहे.

श्रावण मोडक's picture

3 Sep 2011 - 1:45 pm | श्रावण मोडक

ररा, प्लीज, मला यातले हायकू काय आहेत ते समजावून सांगा ना जरा. मला हायकू कळत नाहीत. पण इथं या तीनोळीत काही तरी कमेंट केली आहे जी मला आवडली. ती हायकू कशी आहे तेवढं समजलं तर, माझा आनंद द्विगुणित होईल. तेवढं पुण्य गाठीला बांधता येईल तुम्हालाही.

परिकथेतील राजकुमार's picture

3 Sep 2011 - 2:03 pm | परिकथेतील राजकुमार

धागे टूकार
प्रतिक्रिया भिकार...
... मिपा खड्ड्यात!

हिरवा सिग्नल
जिलब्या मोकाट -
संस्थळाची वाट !

सोमवार ते रविवार
सदस्य नित्राण
- संपादक वाचनमात्र !

विडंबन आमचे
लेख दुसर्‍याचा
... पंख लागती

सारख्याच प्रेरणा
' जात्या ' तून सूपात -
' कंपूबाज ' वांध्यात !

प्रचेतस's picture

3 Sep 2011 - 2:15 pm | प्रचेतस

_/\_

सूड's picture

3 Sep 2011 - 4:22 pm | सूड

__/\__

:D

अत्रुप्त आत्मा's picture

3 Sep 2011 - 5:29 pm | अत्रुप्त आत्मा

एकाचं लग्न
दुसय्राची वरात
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फॉर्मात ;-) ह्ही ह्ही ह्ही :bigsmile:

अन्या दातार's picture

4 Sep 2011 - 1:23 am | अन्या दातार

जमतंय हो पराभाऊ

मूकवाचक's picture

5 Sep 2011 - 2:24 pm | मूकवाचक

(१)
'बाबा' पेटले
रात्रीच निसटले
... 'योग' मायेने

(२)
चेले तरूण
वृध्दा का उपोषण?
... ठाकरी बाणा

(३)
येता गोत्यात
पाळतो मौनव्रत
...जाणता राजा

(४)
काव्यप्रसवू
हौसेला मोल नाही
... हायकू पाडा

मृत्युन्जय's picture

6 Sep 2011 - 11:51 am | मृत्युन्जय

----------_/\__/\_

_/\__/\_---------- _/\__/\_

----------_/\__/\_
----------_/\__/\_
----------_/\__/\_
----------_/\__/\_
----------_/\__/\_

रमताराम's picture

3 Sep 2011 - 10:06 pm | रमताराम

दोआप्रकाटाआ

रमताराम's picture

3 Sep 2011 - 4:15 pm | रमताराम

आता मी काय डोंबलं समजावणार तुम्हाला. हे म्हणजे 'ना*ड्याशेजारी उघडं गेलं आणि...' तसं व्हायचं. जालावरच्या कविता वाचून आपली कविता वाचण्याची इच्छाच संपली आहे. मुळात कविता कशाला म्हणायचं याबाबतच डोस्क्यात लै गोंधळ निर्माण झालाय आता. बुद्धिभेद का काय म्हणतात तो झालाय म्हणाना.
आणि 'हायकू' हा शब्द 'बायकू' शब्दाच्या समोच्चारी असल्याने धसक्याने आपण लांबच आहोत त्यापासून. तसेही अन्य भाषेतून, भौगोलिक स्थितीतून मराठीत आले की त्या काव्यप्रकारांची 'कोंबडीचं भरीत*' अशी अवस्था होते. गजलेचे तेच नि हायकूचेही तेच. असो. आज एवढी शिकवणी पुरे. घरचा अभ्यास म्हणून शिरीष पैंच्या हायकू वाचून त्यांचे रसग्रहण लिहून आणा उद्या.

(*प्रताधिकार आमच्या नावे रेजिस्टर्ड आहे.)

श्रावण मोडक's picture

3 Sep 2011 - 5:53 pm | श्रावण मोडक

घरचा अभ्यास पाहून ठरवून टाकलं, की बास्स.
स्वगत: हायकू कायकू? वो न समझनेसे तेरा कुछ बिगडता तो नै ना... तो छोड दे.

विदेश यांच्या हायकूमध्ये आणि जपानी (तसेच बहुतेक इंग्रजी) हायकूंमध्ये हे साम्य आहे :
५ अक्षरे
७ अक्षरे
५ अक्षरे
(जपानीमध्ये "अक्षरे" नसून "मात्रा" असतात.)

विदेश यांच्या हायकूंमध्ये तीनपैकी दोन ओळींमध्ये बहुतेक अंत्ययमक असते. हे त्यांचे शैलीवैशिष्ट्य आहे. (अन्य हायकूंमध्ये असा काही नियम नाही.)

विदेश यांच्या हायकूत पहिल्या दोन ओळींत एक कथानक असते, आणि तिसर्‍या ओळीत त्यावर भाष्य असते. (अन्य हायकूंमध्ये असा काही नियम नाही.)

विदेश यांना हायकूमध्ये सूचकतेपेक्षा शब्दांनी थेट अर्थच सांगणे आवडते. पारंपरिक हायकूंपेक्षा ही विपरित रीत आहे. विदेश यांचा नाविन्याचा आविष्कार आहे.

एक ते चार
दुकानदारी गार
- बाणा मराठी !

क्या बात है

सुनील's picture

6 Sep 2011 - 11:43 am | सुनील

शीर्षक सार्थ करणारा एकमेव हायकू!!