स्वप्नांचा मागोवा घेत
मी निघालोय प्रवासाला
ती सत्यात उतरवण्यासाठी.
.. मोठं व्हायचंय मला
अंधारावर मात करता येईल
विचार आहेत डोक्यात
बघू या, काय होतंय
छोटासाच कंदील हातात
योजने योजने दुरचा प्रवास
दोनच पावलं दिसतात
पण, ती पुढे टाकली कि
रस्ता येतो आवाक्यात
जवळची पुंजी थोडी
त्यावरही करीन मात
कष्ट करुन अजून मिळवीन
आहे तेवढी ताकद मनगटात
फिरताना जगाच्या बाजारात
अनुभव खूप मिळेल
काय चालते, चालंत नाही
जागेवरतीच कळेल
फुकटाच्या घबाडाचं
मला काय पडलंय
अनुभवाच्या शिदोरीतच
माझं नशीब दडलंय
प्रतिक्रिया
26 Aug 2011 - 9:28 am | दत्ता काळे
संपादक
हि कविता चुकून "जनातलं मनातलं" मध्ये टंकली गेली आहे. कृपया ती योग्य जागी- " जे न देखे रवी " मध्ये टाकावी हि विनंती.
26 Aug 2011 - 9:57 am | चेतन सुभाष गुगळे
फारच छान कविता.
<< फुकटाच्या घबाडाचं
मला काय पडलंय
अनुभवाच्या शिदोरीतच
माझं नशीब दडलंय >>
हे कडवं तर फारच छान!
26 Aug 2011 - 2:01 pm | गणेशा
दत्ता जी कविता मस्त ..
खुप दिवसानी लिहिली हो कविता ...
26 Aug 2011 - 3:04 pm | डॉ.श्रीराम दिवटे
फुकटाच्या घबाडाचं
मला काय पडलंय
अनुभवाच्या शिदोरीतच
माझं नशीब दडलंय
मस्त लिहिलंत...
26 Aug 2011 - 5:01 pm | मनीषा
सुरेख कविता .