राखेमधे लोळतो मी (हजल)

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
21 Aug 2011 - 12:37 pm

राखेमधे लोळतो मी (हजल)

मलिंदा मिळावा असे भाकतो मी
जगावेगळे मागणे मागतो मी

कशाला गडे रोज येतेस स्वप्नी?
असा काय आमिर तुला वाटतो मी?

जसे गुंग व्हावे नशीले पिताना
तुला पाहताना तसा झिंगतो मी

मला नेमक्या टाळती अप्सरा त्या
बहूतेक त्यांना कवी भासतो मी!

दिलेली फुले तू जमा खूप झाली
अता गूळ, साखर, डबा शोधतो मी

करा बंद कानात आकाशवाणी
अरे मच्छरांनो बघा पेंगतो मी

समाजात चर्चेमधे राहण्याला
अभय मस्त राखेमधे लोळतो मी

                         गंगाधर मुटे
-------------------------------------
(तर ही हजल)

हास्यकवितागझल

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

21 Aug 2011 - 12:45 pm | मदनबाण

वा... सुंदर. :)

कच्ची कैरी's picture

21 Aug 2011 - 4:36 pm | कच्ची कैरी

>>दिलेली फुले तू जमा खूप झाली
अता गूळ, साखर, डबा शोधतो >><<
प्र.के.अत्रेंची प्रेमाचा गुलकंद कविता आठवली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Aug 2011 - 7:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचतोय. अजून येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे's picture

21 Aug 2011 - 8:49 pm | गंगाधर मुटे

अजून येऊ द्या. :D

युद्धपातळीवर प्रयत्नांची पराकाष्टा करण्याचे प्रयत्न चालूच आहे. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Aug 2011 - 8:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>युद्धपातळीवर प्रयत्नांची पराकाष्टा करण्याचे प्रयत्न चालूच आहे.
आपण शेतकरी संघटनेच्या कामात सतत व्यस्त असता.
आपली धावपळ आणि कामावरील प्रेम क्षणभराच्या भेटीत
आम्ही ओळखून आहोत आणि इतके असुनसुद्धा-

'तुला पाहताना तसा झिंगतो मी' आणि 'दिलेली फुले तू जमा खूप झाली'
या दोन ओळींनी अजूनही आपल्यामागील जांगडगुत्ता अजून सुटला नाही की काय असे वाटले. ;)
(हलकेच घ्या)

-दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे's picture

22 Aug 2011 - 11:12 am | गंगाधर मुटे

अहो साहेब,
"शराब और शबाब के बगैर गझलको (और गझलकारको भी) गझलियत नही आती" हा गझलेचा मुळ सिद्धांत आहे, असे म्हणतात.

म्हणून कायदेशिर बाजूची पुर्तता करण्यासाठी अशा रचना रचाव्या लागतात ;)

खूप छान मुटे जी. मस्त लिहिले आहे.

हे खुप भन्नाट लिहिले आहे तुम्ही :)

>>>मला नेमक्या टाळती अप्सरा त्या
बहूतेक त्यांना कवी भासतो मी!