Get happiness out of your work or you may never know what happiness is.
- Elbert Hubbard
ऑफिस मध्ये पाय टाकायच्या आपल्या डोक्यात कामाची एक यादी असते , माझा असा अनुभव आहे कि कामाची यादी खूप लाम्बलचक असेल किवा हाती आलेलं काम खूप किचकट असेल तर सुरु करायचा खूप कंटाळा येतो. किवा सुरु केल तरी आरंभ-शूर होवून मध्येच ते सोडून पण देतो.
कामाच्या ठिकाणी आजूबाजूला इतक्या गोष्टी घडत असताना लक्ष देवून काम करणे किती कठीण आहे ह्याचा अनुभव बरेच जणांना असेलच. आपली कामाची एकाग्रता कुठल्याही कारणाने विचलित होवू शकते.
जसे
१. माझ्या अगदी शेजारच्या क्यूब मध्ये प्रिंटर आहे , दुध विकायला जाण्याऱ्या गोपिकांप्रमाणे सुंदर सुंदर ललना आप-आपल्या प्रिंट घ्यायला येतात. (चित्त थार्यावर कस राहील)
२. बाजूचा जुनिअर क्रिकेट मंच चालू असताना थेट स्कोर ची साईट उघडून ठेवतो , थोड्या थोड्या वेळाने अरे विकेट गेली आता काय होणार वैगरे बोलत राहतो
३. दिवा-स्वप्न कोणाला चुकली आहेत - सतत काही न काही आपण विचार करत राहतो
४. वृत्तपत्रांची साकेंत स्थळ , मिपा , सोशल नेत वर्किंग सीट्स इत्यादी ...
त्यामुळे कामावर लक्ष कस देता येईल ह्या वर कुठे कुठे काही काही वाचतो आहे , त्यातून बोध घेवून पुढील गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो , थोडी फार प्रगती होते आहे अस वाटतंय जस हे करता येईल
मी हे केल (हे काही फार ग्रेट नाही आहे)
१. आपल मोनीटर शक्यतो क्यूब च्या उघडतो त्याच्या दिशेला / माझी पाठ क्यूबच्या ओपनिंग असेल असा बसतो - जेणे करून येणाऱ्या जाणार्या वर लक्ष राहणार नाही. त्यामुळे उगाचच गप्पा टप्पा मारणारे लोक तुम्ही कामात आहात बघून शक्यतो विचलित करत नाही
२. रोज काय कराच त्याची यादी करून पुढे ठेवतो ( संपवायच्या क्रमानुसार ) आणि एक एक झाल कि खोडून टाकायचं
३. शक्यतो एका वेळी एकच काम करायच , आपल्याला कितीही वाटत असेल आपण खुप स्मार्ट आहोत तरी आपला मेंदू एक वेळी बरीच काम करत असला तरी एकच काम परफेक्ट करतो
४. कितीही किचकट काम असल तरी चिकाटी न सोडता ते काही वेळ करत राहायच , पुढच्या एक क्षणी ते सोप्प / करता येइल अस वाटत.
5. घड्याळात सतत बघायचं नाही - मागे आर . के लक्षमण ह्याच्या एका कार्यक्रमात ते स्वत: म्हणाले होते कि मी काम करताना घड्याळ वापरत नाही
६. मनाला एक ठराविक वेळी ब्रेक द्यायचा जास्त आता पुढला अर्धा तास मी मिपा वर दंगा करणार / सर्फिंग करणार / दिवास्वप्न पाहणार / संगीत ऐकणार / मित्रांशी बोलणार
७. प्रत्येक दिवसाचा पगार आपल्याला कमवायचा आहे हे धाय्नात ठेवायचं , जस जे काम आपण आज उरकल ते तितक्याच लायकीच होत का हे रोज जाताना लिहून ठेवायचं
अस काही सध्या करतो आहे ,
(हा धागा मी कोणालाही सल्ला देण्यासाठी नाही काढला)
......... तर तुमच्या कडे असे काही उपाय असतील कृपा करून जरूर सांगा ! :)
प्रतिक्रिया
13 Aug 2011 - 2:25 pm | माझीही शॅम्पेन
आरक्षित
13 Aug 2011 - 2:44 pm | डॉ.श्रीराम दिवटे
इतर गोष्टींकडे लक्ष वेधले जाऊन वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी आपण ती गोष्टच कटाप केलीय. त्यापेक्षा आवडत्या कामात जो विरंगुळा प्राप्त होतो त्याला तोड नाही. म्हणूनच आजची पिढी आपल्याला आवडेल त्याच क्षेत्रात पाऊल टाकते. नावडत्या कामाचा कंटाळा येतोच. त्यामुळे इतर ठिकाणी लक्ष द्यावेच लागते. तरच पुढील काम सन्मार्गी लागेल.
13 Aug 2011 - 3:13 pm | आत्मशून्य
.
13 Aug 2011 - 8:08 pm | माझीही शॅम्पेन
अहो जॉब बदलून काय होणार ? कुठेही गेलात तर स्वता:च काम प्रेरित होऊन सतत करत राहण हे नेहमीच आव्हानात्मक आहे ?
दुसर्या जॉब घेतला तर कदाचित जास्त पगार मिळून पहिले काही दिवस स्वयं-प्रेरित होऊन काम करून पण नंतर पुन्हा तेच होऊ शकत
अवांतर : ह्याच एका गोष्टी साठी सचिन एक प्रचंड महान खेळाडू आहे सतत २० वर्ष खोर्याने धावा कारण हे अदभुत आहे
13 Aug 2011 - 3:14 pm | शुचि
माझे उपाय थोडे अनवट (ऑफबीट) वाटतील पण ....
(१) कॉफी घेतल्याशिवाय माझ्या कामाला तरी फोकस येत नाही. तेव्हा माझा दिवस कॉफी ने सुरू होतो.
(२) दैनंदिन जीवनात देखील जर तुम्ही वेळेवर झोपणे, व्यायाम करणे आदि काही शिस्त पाळू शकलात तर कामात उत्साह रराहतो.
(३) "पर्फ्युम" लावणे. आपल्यालाच प्रसन्न वाटते.
13 Aug 2011 - 8:20 pm | माझीही शॅम्पेन
धन्यवाद शुचिजी ! अगदी चांगले उपाय ऑफ-बीट काहीच नाही. :)
मला पण चहा लाइफ-सेवर आहे ह्या बाबतीत ,सुदैवाने ऑफीस जवळ की आल टाकून उकळा चहा मिळतो तो घेतला की पुढचा एक तास छान काम होत
पूर्ण झोप होणे हे खरोखर महत्वाच आहे , व्यायामाने खूप प्रचंड फरक पडतो हे अनुभवानी सांगू शकतो रक्ताभीसरण व्यवस्थित असेल तर एकाग्रता नक्कीच वाढते.
तसा काही अनुभव नाही कदाचित दाढी करण , स्वच्छ आणि कडक कपद्याने बराच फरक पडतो.
13 Aug 2011 - 8:28 pm | डॉ.श्रीराम दिवटे
सेँट भसाभसा मारुन ऑफिसात गेल्यास इतर लोकही प्रेरित होतील असे वाटते.
14 Aug 2011 - 6:58 am | पंगा
सेँट भसाभसा मारून ऑफिसात गेल्यास इतर लोक धक्के मारून बाहेर काढण्यास प्रेरित होतील याबद्दल खात्री वाटते.
14 Aug 2011 - 10:22 pm | माझीही शॅम्पेन
हा......... हा........
:) :) :)
14 Aug 2011 - 6:59 am | पंगा
दोआकाटा.
14 Aug 2011 - 12:49 am | गणा मास्तर
>>>शक्यतो एका वेळी एकच काम करायच , आपल्याला कितीही वाटत असेल आपण खुप स्मार्ट आहोत तरी आपला मेंदू एक वेळी बरीच काम करत असला तरी एकच काम परफेक्ट कर
ही गोष्ट १००% खरी.
14 Aug 2011 - 10:01 am | शाहरुख
आम्हाला कसे प्रेरित ठेवायचे हे आमच्या सायबाला चांगलेच माहित आहे..त्यामुळे आम्हाला याची काळजी करावी लागत नाही. :)
14 Aug 2011 - 11:01 am | इंटरनेटस्नेही
.
14 Aug 2011 - 10:39 pm | आत्मशून्य
मी सध्या याच स्थितीमधे आहे, डोक्यावर किचकट कामाचा डाँगर उभा आहे आणी मी त्याखाली आडवा पडलो आहे, कोणी खरचं काही चांगले उपाय सूचवेल काय ?
14 Aug 2011 - 10:48 pm | मी-सौरभ
वरचे उपाय मस्त आहेत वापरुन बघ..
14 Aug 2011 - 11:17 pm | आत्मशून्य
मी जॉब करत नाही म्हणून तो बदलायचा प्रश्नच नाही. म्हणून कोणी सायबही नाहे त्यामूळे स्वतःला प्रेरीत ठेवण्याची जबाबदारी माझ्याच अंगावर येऊन पडते. व्हेरिएशन असावं म्हणून मी वेळेत झोपणे, ऊठणे वा ठरावीक दिवशी सूटी घेणे याच्या विरूध्द आहे. त्यापेक्शा वाटेल तेहां काम करा नाहीतर सरळ मिपावर रेंगाळा ही पध्दत अनूसरतो. परफ्यूमची मला आवड आहे व सातत्याने (ओरीजनल) आदिदासचा परफ्यूम मी फवारत असतोच. कॉफि घेण्याचा संदर्भ थोडा वेगळा असल्याने विकांताशिवाय ते शक्य होतेच असे नाही तीच गोश्ट पूर्ण झोप रक्ताभिसरण, एकाग्रता वगैरे बाबत समजून जावी. मला वाटतय वरील उपायांवर मी माझि बाजू पूरेशी सांगीतली आहे.. यापेक्षही कोणि काही जास्त चांगले इनपूट्स देऊ शकेल काय ?
15 Aug 2011 - 12:18 am | इंटरनेटस्नेही
आपल्या कामाचे साधारण स्वरुप सांगितल्यास काही अॅड्व्हाईज करु शकेन.
15 Aug 2011 - 12:18 am | इंटरनेटस्नेही
विचारप्रवर्तक धागा. पुलेशु.
15 Aug 2011 - 1:16 am | आत्मशून्य
खरं सांगायच तर स्वतःला प्रेरीत करणं पहीलं सोडून द्या. आपल्यामधे नैसर्गीक रित्याच ताण सहन करायची मर्यादा निसर्गाने घालून दीली आहे. त्याच्याशी खेळ करणे शहाणपणा न्हवेच. स्वतःला प्रेरीत करायच्या प्रयत्नात आपण मनाला केवळ उत्तेजीत करत असतो ज्यातून आपल्याला तात्पूरता भ्रम निर्माण होतो की आपण प्रेरित झालो आहोत कंटाळा गेलेला आहे वगैरे वगैरे वगैरे.......
म्हणून इछ्चा नसताना मनाला काम करायला लावून खरं तर आपण मनाची सूव्यवस्थाच मोडीत काढत आहोत, यातून सूरूवातीला चांगले अनूभव भासतीलही पण लवकरच असे मन कमकूवत, अंधश्रध्दावादी व व्यसनी, व्याभिअचारी ,वा लाचार बनून जगू लागेल. जे नक्किच योग्य न्हवे. जर अंगावर जबाबदार्या नसतील तर काम करणे खूशाल सोडून द्या.. रजा टाका अथवा कमी पगारात पण आरामदायक आयूष्याला जवळ करा... मनाला प्रेरीत करायच्या नादी लागू नका ती शक्यतो स्वतःवर उलटणारी दूधारी तलवार आहे. .....
जशी मर्यादा शरिराला आहे तशीच मर्यादा मनाच्या व्यापारालाही आहे... कोणतीही गोश्ट जो पर्यंत तूम्हाला न उचकता, मनाची सहज अवस्था न ढळता भावनीक न बनता, विक्षीप्तपणा अथवा राग लोभ मोह मत्सर अहंकाराच वार न लागता करता येत आहे तो पर्यंतच ती करत राहणे योग्य होय. मूळात मनाला काही करणे करावेसे वाटणे हाच एक गून्हा आहे किम्बहूना जगातील सर्व मोठ्या/महत्वाच्या गोश्टी या काही न करताच साध्य केल्या जाऊ शकतात, मग ते भ्रश्टाचाराविरूध्द आंदोलन असो की समाधी प्राप्त करणे असो... एखादी गोश्ट कराविशी वाटने म्हणजे कमी तिव्रतेची का असेना एक प्रकारची विकृतीच होय.... मनाला असे विशयासक्त बनण्याची सवय लावणे चूकच. या जगात सर्वात कठीण गोश्ट म्हणजे काहीही न करणे हे होय.. स्व्तःला काहीही न कारायला प्रेरीत करायला अवश्य शिका.
15 Aug 2011 - 1:20 am | इंटरनेटस्नेही
एकदम पटले!
15 Aug 2011 - 1:24 am | सोत्रि
ह्या पुर्ण प्रतिसादाच्या आधि 'अवांतर:' असा डिस्क्लेमर चुकुन विसरल्या गेला आहे का ?
- (अती अवांतर) सोकाजी
15 Aug 2011 - 2:18 am | आत्मशून्य
हे तर सर्वात मूख्य आहे. अवांतर गोश्टीमधे टास्कमॅनेज्मेंट सारख्या लहान सहान अनावश्यक गोश्टी जरूर इंन्क्लूड कराव्यात असं मी म्हणेन. पण मनाला प्रेरीत करण्याचा मूद्दा वेगळा आहे. यामधे आपण मनाला अनावश्यक थकवतो. इट्स क्राइम अगेन्स्ट ह्यूमॅनीटी होय. उदा. म्हणून असं पकडू की हे जर तूम्ही उलट कराल म्हणजेच जर टास्क मॅनेजमेंटला महत्व द्याल तर तूमचे मनच तूमचे टास्क काम सोडून मिपावर रेंगाळणे वगैरे अतीअवांतर गोश्टीनी भरू लागेल, जी स्वतःच स्वतःची केलेली मोठी फसवणूक ठरेल.
काम आणी मनोरंजन हे टास्क मानून त्याला एकाच साच्यात बसवणारे मन हे मी आधीच संगीतल्यप्रमाणे परवलंबी बनू शकतेच पण ते कृत्रीम बधीर बनून मनोरंजनालाही लगेच कंटाळणारे बनू लागते त्याच्या रिफ्रेश्मेंटची अत्यावश्यक गरज ही व्यसनामधे त्वरीत बदलू शकते अशा लोकांचा विकेंडही अनूत्साही व एकसूरी जाउ लागतो. मूळात ताण आपणच निर्माण केला व तो जावा म्हणून पून्हा रिफ्रेशमेंटही आपणच करायची याचा मानसिक व आर्थीक असा दूहेरी भूर्दंड सामान्याला परवडणे शक्यच नसते. आणी यात मनाच्या उर्जेचा व वेळेचा अपव्यय होतो तो वेगळाचं. म्हणून मनाच्या सूव्यवस्थेशी कधीही छेडखानी करू नये. आपण स्वतःला/मनाला जेव्हंड फसवू तेव्हडं आपण स्वतःलाच गोत्यात न्हेतो.
15 Aug 2011 - 11:13 am | विलासराव
>>>>>>>>जर अंगावर जबाबदार्या नसतील तर काम करणे खूशाल सोडून द्या.. रजा टाका अथवा कमी पगारात पण आरामदायक आयूष्याला जवळ करा
सहमत. मी २००५ पासुन हेच करतो आहे.
>>>>>>... मनाला प्रेरीत करायच्या नादी लागू नका ती शक्यतो स्वतःवर उलटणारी दूधारी तलवार आहे. .....
अगदी.
15 Aug 2011 - 11:46 am | इरसाल
म्हणून इछ्चा नसताना मनाला काम करायला लावून खरं तर आपण मनाची सूव्यवस्थाच मोडीत काढत आहोत
मग तप्पुला काम करायला लावून बघा
15 Aug 2011 - 1:20 am | सोत्रि
मी दिवसाचे काम सुरु करण्याआधि पुर्ण दिवसाच्या कामाची रुपरेषा आखुन घेतो.
1. आठ तासांपैकी प्रोडक्टीव्हिटी 6 तासांची धरुन दिवस प्लान करतो
2. ऑफिस नोट्स 2007 हे एक अत्यंत इफेक्टीव्ह टुल आहे. त्यात एक टेबल करुन टास्क्स टाकतो
( मिपावर 'नवे लेखन' हा दुवा चेक करणे हे टास्कपण असते त्यात ;) )
3. त्या टास्क्सच्या प्रायोरीटीज ठरवतो
4. प्रायोरीटीज प्रमाणे कामाचा फडशा पाडतो.
5. जे काम संपत नाही (वेळेअभावी) ते पुढच्या दिवशी कॅरी फॉरवर्ड
गेले सहा महिने हे व्यवस्थित चालले आहे, प्रोडक्टीव्हिटी भयंकर वाढली आहे.
जो वेळ कुठे जातो हे कळत नव्हते तोच वेळ आता आ वासुन पुढे उभा राहतो. त्यामुळे मिपावर मनसोक्त हुंदडताही येते :lol:
- ('घंटे'का पुरा उपयोग करनेवाला) सोकाजी
15 Aug 2011 - 12:55 pm | Nile
15 Aug 2011 - 4:03 pm | माझीही शॅम्पेन
सोकजी राव अगदी बरोबर बोलतात , वेळेच व्यवस्थापन हे महत्वाचे आहे.
ह्या बाबतीत मी एक प्रयोग केला होता , अशी बरीच काम असतात जी आपण नेहमी टाळत असतो , एक दिवस बसून मी एक लिस्ट केली - फाईलच नावच ठेवल - आपण सतत टाळत असलेली ४० काम.एक्सएलएस. त्याच प्रिंट नेहमी जवळ ठेवायचो एक एक काम नेटान आणि चिकाटीने पूर्ण केल. नंतर जवळपास एक महिन्यात सर्व लिस्ट्स आटोपली. (आणि डोक्याची भजी होण पण थांबल)
15 Aug 2011 - 12:49 pm | Nile
पण ते फोकलिचं प्रेरित ब्रेरित व्हायचंच कशाला म्हणतो मी?
15 Aug 2011 - 1:14 pm | विनायक प्रभू
तुम्हाला काम करायला प्रेरित करावे लागते?
15 Aug 2011 - 4:10 pm | माझीही शॅम्पेन
गुर्जी - अगदी तुमच्याच भाषेत सांगायाच तर सगळेच जण प्रोडॅक्टिव असतात (हे आमच गृहीतक आहे निरीक्षण नाही :))
आणि हा प्रोडॅक्टिविटी वाढवण्याच्या उपायांचा धागा आहे.