गाभा:
आत्तच एक चित्र बघण्यात आले, बहुधा राजा रविवर्माचे.
या चित्रातील व्यक्ती व प्रसंग कोणता आहे, समजले नाही. काही अंदाज?
हे चित्र यंडुगुंडु भाषेतील दुव्यावर आहे:
http://picasaweb.google.com/karukamal/ZmNIrK#
आत्तच एक चित्र बघण्यात आले, बहुधा राजा रविवर्माचे.
या चित्रातील व्यक्ती व प्रसंग कोणता आहे, समजले नाही. काही अंदाज?
हे चित्र यंडुगुंडु भाषेतील दुव्यावर आहे:
http://picasaweb.google.com/karukamal/ZmNIrK#
प्रतिक्रिया
28 Jul 2011 - 2:44 pm | गणपा
राजा रवी वर्मा यांचे चित्र वाटतेय.
धरणी दुभंगुन सिता जाये
राम कुश-लव हताश पाहे.
8 Aug 2013 - 6:53 pm | विजुभाऊ
खालील सगळी चर्चा वाचल्यानंतर रामालासुद्धा " हे राम" असे म्हणावेसे वाटेल.
28 Jul 2011 - 2:36 pm | परिकथेतील राजकुमार
अरे काय चित्रगुप्त शेठ, येवढे सोपे तुम्हाल महिती नाही ?
सितेला तिची माता पृथ्वी आपल्यासोबत घेउन चालली आहे. :)
अर्थात सिता भूमीच्या उदरी गडप झाली तो प्रसंग.
28 Jul 2011 - 2:42 pm | गवि
अगदी शंभर टक्के. आधी अंधुकपणामुळे लक्षात येत नव्हतं. आता पराभाऊंनी सांगितल्यावर पुन्हा पाहिलं. एकदम पटतंय.
अर्थातच ते आसनारुढ श्रीयुत हे श्रीरामचंद्र असणार. त्यांच्या चेहर्यावरचे भाव मात्र, "हे काय झालं बुवा आता वेगळंच काहीतरी.." अशा अर्थाचे काहीसे अनपेक्षित दृश्य पहात असल्यासारखे वाटताहेत..
28 Jul 2011 - 3:02 pm | स्मिता.
जमिनीवरच्या आकृती पाहून ती सीता आणि धरणीमाता असावी हे पटतंय पण सिंहासनावर बसलेली व्यक्ती राम असावी असं वाटत नाही. म्हणजे रामाची जी प्रतिमा मनात असते ती चित्रातल्या रामशी अजिबात जुळत नाही.
(पराने सांगितलं म्हणून हा विचार तरी आला, नाहीतर एखाद्या राजाच्या दरबारात एक स्त्री न्याय मागायला आलीये आणि तिचा आवेग अनावर झाल्याने दुसरी तिला सावरत आहे असे वाटले :P )
सिंहासनावरील राजा (राम) आणि त्याच्या मागे उभा असलेला दुसरा राजपुरूष (बहुदा लक्ष्मण) यांनी केसांत माळलेली गुलाबाची फुले बघून अंमळ गंमत वाटली.
28 Jul 2011 - 3:04 pm | गवि
तसेच ऋषींच्या शेजारी एकच बालक उभा दिसतोय.
त्याच्याच मागे बघा, एक कपाळावर हात मारुन घेणारे बालक आहे तो कुश असावा, (पुढचा लव असल्यास) (कपाळावर हात का मारला असावा..)
आत्ता बघितल्यावर मला श्रीरामचंद्र हाताने खूण करुन कुठे निघालीस? असं विचारताहेत्सं वाटलं.
28 Jul 2011 - 3:07 pm | परिकथेतील राजकुमार
गवि बहुदा त्याने भावनातिरेकाने आपले डोळे हे दृष्य बघवत नसल्याने झाकल्यासारखे वाटत आहेत.
@स्मिता
एकामागे एक अशी दोन बालके उभी आहेतसे वाटते. आणि शेजारीन दोन ॠषींपैकी एक वशिष्ठ असावेत.
28 Jul 2011 - 3:09 pm | प्रियाली
राम तर राम त्याच्या शेजारचा एक ऋषीही तसंच विचारतो आहे.
मला आपलं रामभाऊ आणि ते ऋषी सीतेला "वॉ,सप?" असे विचारत असून मागे तोंड लपवणारा कुश "ऑव! शक्स!" असं म्हणतोय असं वाटलं.
28 Jul 2011 - 3:12 pm | परिकथेतील राजकुमार
=)) =))
कदाचित तो 'अहो सासुबाई दिवाळसणाचे आता काय? आणि हे काय सासरचे दागीने पण घेऊन चाललात का काय?' असे देखील विचारत असेल.
29 Jul 2011 - 5:11 pm | पल्लवी
बाबा राम : एवेढेसे काहीतरी बोललो तर लगेच माहेरी ??!! धन्य आहे !
सीतामाय : बसा आता बडवत. हूं... चल गं आई..
कार्टं १ : मम्म्म्मी , मी पण येउ ?
कार्टं २ ( डोळ्यांवर हात ठेवलेलं ) : बोंबलला... आता नाश्ता, टिफीन बोंबलला..
मागे उभे असलेले भाउजी : आयला नेहेमीचं झालय राव. ३ चा शो गेला आता चुलीत..
29 Jul 2011 - 5:29 pm | किसन शिंदे
हे काय? सासूबाईंचे आणी त्या दोन संधीसाधूंचे डॉयलॉग कुठेयत? कि त्यांना फक्त मुकाभिनय करायचाय.
28 Jul 2011 - 3:11 pm | गणपा
अरे हे काय अक्रित घडतय असा भाव आहे. अस आपलं माझ मत.
28 Jul 2011 - 5:57 pm | स्मिता.
त्याच्याच मागे बघा, एक कपाळावर हात मारुन घेणारे बालक आहे तो कुश असावा, (पुढचा लव असल्यास) (कपाळावर हात का मारला असावा..)
हो, तो मागचा डोळे झाकणारा बालक प्रतिक्रिया टाकल्यावर दिसला.
लक्ष्मणाच्या चेहर्यावरील भाव इतरांपेक्षा थोडे वेगळे आहेत. राम तसेच ऋषी आश्चर्यचकीत आहेत तर लक्ष्मण चिंतामग्न वाटतोय.
28 Jul 2011 - 3:04 pm | प्रियाली
रामाने स्लीवलेस ब्लाऊजसारखे काहीतरी घातले आहे हे ही पाहिलेत का? ;)
28 Jul 2011 - 5:53 pm | स्मिता.
मी पाहिलं ते स्लीवलेस ब्लाऊजसारखं काहीतरी... मला वाटलं लहानपणीचं चिलखत असावं :P
28 Jul 2011 - 5:57 pm | प्रियाली
रामबाप्पांना चिलखत घालून राजसभेत सिंहासनावर बसायची गरज ती काय?
मला तरी ते स्लीवलेस ब्लाउजसारखं.. अंमळ तोकडं... मल्लिकातै, कत्रिनातै, राखीतैंना आवडेल असं काहीतरी वाटलं.
28 Jul 2011 - 6:01 pm | स्मिता.
मला तरी ते स्लीवलेस ब्लाउजसारखं.. अंमळ तोकडं... मल्लिकातै, कत्रिनातै, राखीतैंना आवडेल असं काहीतरी वाटलं.
ते ब्लाउज तोकडं असलं तरी जरा 'विचित्रच' तोकडं आहे. पण वरच्या तिन्ही तैना नविन फॅशन म्हणून चालून जाईल.
28 Jul 2011 - 6:24 pm | मुलूखावेगळी
हो
चुक समजुन अनदेखा किया था
28 Jul 2011 - 3:24 pm | वपाडाव
पण त्या स्त्रीच्या चेहर्यावरचे भाव आवेगाचे वाटत नाहीत.. :(
28 Jul 2011 - 6:05 pm | स्मिता.
मागच्या स्त्रिच्या सावरण्यामुळे आधीचा दु:खावेग आवरला गेलाय पण राजाकडे प्रश्नार्थक कटाक्ष आहेच.
28 Jul 2011 - 5:06 pm | मनराव
>>सिंहासनावरील राजा (राम) आणि त्याच्या मागे उभा असलेला दुसरा राजपुरूष (बहुदा लक्ष्मण) यांनी केसांत माळलेली गुलाबाची फुले बघून अंमळ गंमत वाटली.<<<
कुणाचं कुठे लक्ष जाईल काही सांगता येत नाय.!!!!
8 Aug 2013 - 3:28 pm | मनिम्याऊ
28 Jul 2011 - 4:52 pm | सर्वसाक्षी
पराशेठ
रामाने धनुष्याचा त्याग करुन तलवार का बरे घेतली असवी?
की या चित्राद्वारे शिवसेनेचे समर्थन केल्याचा आरोप होऊ नये म्हणुन चित्रकाराने शस्त्र बदलले असावे?
एवढा लोचा होत असताना रामभक्त हनुमान दिसत नाही ?
28 Jul 2011 - 4:58 pm | परिकथेतील राजकुमार
अहो सर्वसाक्षी काका, ते म्हणतात ना 'लैला को देखो मजनु की नजरसे.' तसे आहे ते ;)
इस प्रसंग को देखो राजा रविवर्मा की नजरसे.
28 Jul 2011 - 2:40 pm | प्रियाली
सीतेला धरणीमाता सोबत घेऊन जाते तो प्रसंग आहे पण साफ गंडला आहे कारण सीता एकदा त्याग केल्यावर अयोध्येच्या राजसिंहासनापर्यंत पोहोचली नव्हती असे वाटते.
अर्थातच, राजा रविवर्मा चित्रकार असतील तर असे गंडलेपण चालून जाण्यासारखे आहे. नऊवारी साडी नेसणारी आणि शिवलेले फिटींगचे ब्लाऊज घालणारी सीता चालते तर अयोध्येपर्यंत पोहोचली तर काय मोठे त्यात? ;)
चित्र यंडुगुंडू भाषेतील असले तरी गूगल ट्रान्सलेटमध्ये रवि वर्मा की पेंटिंग्स असेच लिहून आले.
28 Jul 2011 - 2:42 pm | परिकथेतील राजकुमार
घ्या !
अहो ती लोकसभेपर्यंत सुद्धा पोचली कधीच ;) अयोध्येचे काय घेऊन बसला आहात ?
28 Jul 2011 - 2:45 pm | प्रियाली
हाहाहाहा! मस्त!
धरणीमाते आत घे गं - मला नाही पराला. ;)
28 Jul 2011 - 2:50 pm | परिकथेतील राजकुमार
=)) =))
तसे घडले तर मग तिथुन ऑनलाईन येईन तेंव्हा मला 'बळी' असे सदस्यनाव बदलून मिळावे.
28 Jul 2011 - 11:30 pm | अर्धवटराव
म्हणजे तुम्ही आम्हा सर्वांचे कान पिळायला मोकळे का पराशेठ???
(वामन) अर्धवटराव
29 Jul 2011 - 10:12 am | विश्वनाथ मेहेंदळे
तसे ते आत्ताही मोकळे आहेत, सर्वांचे कान पिळायला :-)
29 Jul 2011 - 1:24 pm | परिकथेतील राजकुमार
काय हे ?
माझ्या सारखा साधा सरळ माणूस कशाला उगाच कोणाचे कान वैग्रे पिळायला जाईल अर्धवटशेठ ? तुमचे एक आपले काहीतरीच बॉ.
आता पुन्हा स्वतःला वामन म्हणवताय म्हणजे आम्ही तुमच्यापासून लांबच थांबायला पाहीजे ;)
8 Aug 2013 - 4:41 pm | अनिरुद्ध प
बळि तो कान पिळी असे म्हणायचे असेल त्यान्ना.
29 Jul 2011 - 8:02 am | निवेदिता-ताई
प्रियाली.........सही ग ...........
28 Jul 2011 - 3:06 pm | कच्चा पापड पक्क...
सीता पण रामाकडे कशी रागाने बघते आहे.
28 Jul 2011 - 3:11 pm | गणपा
राग? बहुतेक व्याकुळता.
28 Jul 2011 - 3:19 pm | चिंतामणी
__/\__
28 Jul 2011 - 3:20 pm | सूड
पण धरणीमातेचा चेहरा कष्टी वाटतोय. 'चल, येतेच आहे का आता ?' अशा तर्हेचा काहीसा.
28 Jul 2011 - 3:29 pm | योगप्रभू
मुलांनो,
वरील चित्र बारकाईने बघा आणि त्यातील अन्य ४ ढोबळ चुका ओळखून दाखवा बरे..
(नऊवारी साडी आणि फिटिंग्जचे ब्लाऊज त्या काळात नव्हते, ही एक चूक ग्राह्य धरण्यात आली आहे.)
-शेणकुटे गुरुजी-
28 Jul 2011 - 3:37 pm | मुलूखावेगळी
१. रामानी जोडे काढुन सैरावैरा टाकलेत
२.धरणीमाता सीतेला आत घ्यायला खुप वर आलीये धरनीच्या
28 Jul 2011 - 7:01 pm | नरेशकुमार
त्याला नविन शुज विकत घ्यायचे असतील.
लिफ्ट काम करत असेल
28 Jul 2011 - 3:40 pm | प्रियाली
धरणीमाता टाईल्स फोडून वर आली आहे. कोण रे तो कॉन्ट्रॅक्टर इतकं बेक्कार काम करणारा?
28 Jul 2011 - 3:30 pm | नितिन थत्ते
सीता भूमीत गडप होत आहे म्हणावे तर तिच्या कमरेभोवती कुणाचे हात आहेत?
मला हा द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग वाटतो. द्रौपदीच्या कमरेभोवती दु:शासनाचे हात आहेत. सिंहासनावर बसलेला दुर्योधन आहे.
राम किंवा दुर्योधन कमरेला तलवार लावत असत का?
28 Jul 2011 - 3:34 pm | गणपा
दुवा.
28 Jul 2011 - 6:02 pm | कच्चा पापड पक्क...
राम किंवा दुर्योधन कमरेला तलवार लावत असत का?
आत्तापर्यत राम नेहमी धनुष्य घेतलेलाच बघितला आहे.
धरुनी शर धनुष्य दीर्घ हस्ती सुरम्य नेसूनी पीतांबर पद्मसनी सुहास्य
28 Jul 2011 - 3:50 pm | यकु
चित्रगुप्तांनी दिलेल्या लिंकमुळे खूप मस्त चित्रे बघायला मिळाली.
त्याबद्दल त्यांना धन्यवाद.
चित्राची शैली खूपच ओळखीची वाटते कारण लहानपणापासून रविवर्म्याची छापील चित्रे अनेक वाड्यांमध्ये बैठकीत, ढाळजात लावलेली पाहिली आहेत.. आमच्याही घरी बरीच चित्रे होती...
28 Jul 2011 - 6:08 pm | वपाडाव
आपण लै हुच्चभ्रु आहात हे आम्हा सर्व मिपाकरांस कळालेले आहे....
*नंतर काय सरपण म्हणुन वापरली का ती चित्रे (घातली का चुलीत) ???*
28 Jul 2011 - 6:15 pm | यकु
गटारी अभी दूर है.
28 Jul 2011 - 5:36 pm | आनंद
राम हा तेनालीरामा सिरीयल मधल्या राजाच काम करणार्या अभिनेत्या सारखा दिसतोय
28 Jul 2011 - 5:42 pm | प्रियाली
राम मला अनंग देसाईसारखा वाटला. देसाईंचा तरुणपणीचा फोटो मिळाला नाही.
हा फोटो http://www.indianetzone.com/photos_gallery/3/anangdesai_3174.jpg येथून घेतला
28 Jul 2011 - 5:57 pm | चित्रगुप्त
रामाचे हस्तविक्षेप असे वाटतात की "अरे तिला घेऊन कुठे निघालीस? चल तू पण ये इकडे "....
आणि उडणारा पदर सीतेचा अहे की धरणीमतेचा?
रंगावरुन धरणीचा वाटतो, मग तो क्षणभरापूर्वी रामाच्या हातातुन निसटला आहे काय?
28 Jul 2011 - 5:58 pm | प्रियाली
राम परस्त्रीच्या पदराला हात घालतो असे तर सुचवत नाही ना तुम्ही?
28 Jul 2011 - 6:08 pm | चित्रगुप्त
धरणी माता म्हणजे सर्वांची माता. परस्त्री नव्हे.
परंतू हे रामाला ती धरणी माता आहे, हे कळले नसावे, त्याला ती मारीचासारखी कुणी मायावी राक्षसीण वाटलेली चेहर्याच्या अविर्भावावरून वाटते.
28 Jul 2011 - 6:13 pm | प्रियाली
माता असल्याचे कळले नसेल तर परस्त्रीच की मग!
राक्षसिणी काय स्त्रिया नसतात का? विचारा आमच्या श्रामो, घासुगुर्जी, बिका वगैरेंना.
बायदवे, रामाने आदल्या दिवशी महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरण प्रकरण वाचले असण्याची शक्यता कितपत आहे?
28 Jul 2011 - 6:22 pm | चतुरंग
रामायण हा मूवी आधी आला आणि महाभारत हा सीक्वेल आहे त्यामुळे रामाने ते बघितले असण्याची शक्यता कमी! ;)
रंगा
28 Jul 2011 - 6:23 pm | नितिन थत्ते
राम* बहुधा सासूबाईंच्या पदराला धरून "मी पण येतो" म्हणाला असावा. तेव्हा धरणीमातेने "अरे हाआआआड" असे म्हणून पदर सोडवून घेतला असेल.
*येथे रघुकुलतिलक, अहल्ल्योद्धारक भगवान श्री राम असे वाचावे.
29 Jul 2011 - 4:36 pm | अजातशत्रु
किंचित बदल "अरे हाआआआड मेल्या" असे म्हणून पदर सोडवून घेतला असेल.
बाकि प्रतिसादहि भन्नाटच :)
थत्ते साहेब आणि पंगा यांचे प्रतिसाद विशेष भावले.
28 Jul 2011 - 6:50 pm | श्रावण मोडक
माहिती नाही. पण (किमान काही) स्त्रिया या राक्षसिणी असतात हे मात्र माहिती आहे. ;) उदा:.... जाऊ द्या. ;)
29 Jul 2011 - 12:36 am | बिपिन कार्यकर्ते
पूर्ण सहमत आहे.
पुरावा : http://www.misalpav.com/user/13/guestbook
और मिलॉर्ड, सदस्य क्रमांकपरभी गौर किया जाए! ;)
28 Jul 2011 - 8:26 pm | राजेश घासकडवी
मूळ चित्राविषयी थोडं - या चित्रात एक अनोखी दुर्घटना होत असताना सगळे आपापल्या खुर्च्यांत वगैरे बसून धिक्कार, दुःख वगैरे व्यक्त करत आहेत. सीतेला सोडवायला कोणी जात नाही. चित्रात कोणी कविता करताना दिसत नाहीत, कदाचित राजा रविवर्माची ही चित्रमय कविता असेल. '*र्यहीन विचारजंती कुठचे!' असं रविवर्म्याला म्हणायचं असावं. (चित्रात राम असल्यामुळे कवितेतला शब्द वापरणं मला उचित वाटत नाही)
राक्षसिणी या स्त्रियाच असतात. त्यांना स्त्रियांविषयीचे सगळे (सोयीचे) कायदे लागू होतात. उदाहरणार्थ त्यांच्या वयाची जाहीर चर्चा वगैरे केली तर त्यांना राग येतो. फक्त सामान्य स्त्रीप्रमाणे अबला नसल्यामुळे त्या दात, नखं, शस्त्रं वगैरे पाजळून अंगावर धावून येतात. कधीकधी त्या मूळ दोषी माणसाला सोडून निरपराधालाच फाडून खातात.
28 Jul 2011 - 11:27 pm | प्रियाली
साध्या सोप्या मराठीत *ढ असे म्हणा ना! शेवटी सर्व भारतभूमीची लेकरे. मी सुद्धा * वापरून प्रश्न सोडवला.
भित्यापाठी ब्रह्मराक्षस... आय मीन राक्षसीण!
8 Aug 2013 - 7:00 pm | अनिरुद्ध प
सुद्धा असतेका आत्मारामला विचारले पाहिजे.
28 Jul 2011 - 7:51 pm | पंगा
म्हणजे सीतेचीपण माता आणि रामाचीपण माताच. म्हणजे रामाची सीता कोण?
"रामाची सीता कोण - आई की बहीण" या सनातन प्रश्नाचे उत्तर (आख्खे रामायण न वाचतासुद्धा) मिळाले! रामाची सीता नि:संशय बहीणच!!!
28 Jul 2011 - 10:28 pm | नितिन थत्ते
>>"रामाची सीता कोण - आई की बहीण" या सनातन प्रश्नाचे उत्तर (आख्खे रामायण न वाचतासुद्धा) मिळाले! रामाची सीता नि:संशय बहीणच!!!
(जैन की) कुठच्यातरी रामायणात राम आणि सीता बहीण भाऊच असतात म्हणे.
28 Jul 2011 - 10:31 pm | पंगा
राजा रविवर्मा जैन असावा काय?
8 Aug 2013 - 7:10 pm | अनिरुद्ध प
योग्य उत्तर विजुभाऊ देवु शकतिल असे वाटते.
9 Aug 2013 - 2:25 pm | विजुभाऊ
राजा रवीवर्मा किंवा राम जैन असण्याशी माझा काय संबन्ध येणार,
राजरवीवर्मा किंवा राम जैन होता किंवा नाही हे भाजप सांगु शकेल जैन डायरीत त्याबाबतीत काही लिहीले असेल तर ते त्यानाच माहीत असेल
28 Jul 2011 - 11:04 pm | योगप्रभू
रामायण न वाचताही केवळ मच्छिंद्र काबळींचे 'राम तुझी सीता माऊली' हे नाटक बघून सनातन प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल :)
28 Jul 2011 - 6:01 pm | गवि
रंगावरुन धरणीचा वाटतो, मग तो क्षणभरापूर्वी रामाच्या हातातुन निसटला आहे काय?
हे राम...
8 Aug 2013 - 4:47 pm | अनिरुद्ध प
द्रुष्टिला तरि तो सितामाईचाच पदर दिसतो आहे बाकी चित्रकाराच्या नजरेला काय दिसत असेल हे 'चित्रगुप्तच' जाणे.
28 Jul 2011 - 6:04 pm | गवि
जमीन (दुभंगलेला भाग पाहता) अॅल्युमिनियम पत्र्याची म्हणजे साधारणतः एसटीच्या साध्या बिनआराम बसमधली फ्लोअर असते तशी वाटतेय.
28 Jul 2011 - 6:18 pm | सूड
सीतामाई बरेच दिवस घरी नसल्यामुळे फरशी पुसली नसावी कोणी, त्यामुळे रंग तसा दिसत असावा.
28 Jul 2011 - 6:19 pm | ज्ञानोबाचे पैजार
वरची सर्व उत्तरे चुक आहेत,
हा एका हिंदी सिनेमातील प्रसंग आहे.
ती जमीनीवर बसलेली बाई आपल्या सिनेमाच्या नायकाची बहीण आहे. आणि सिहासनावर बसलेला अमरीश पुरी किंवा शक्ती कपुर आहे. मागे अमरीश पुरीचा सज्जन भाउ परेश रावल आहे. बाजुला मुनी अनुपमखेर बसलेले आहेत.
त्या बाईच्या मागची स्त्री तीची आई आहे.
दोन लहान मुले ही आपल्या हीरोचीच भावंड आहेत ज्यांना अमरीशपुरीने बाळं असताना पळवुन आणले आहे आणि त्यांच्या कडुन तो बुरे काम करवुन घेतो. त्यांना आत्ताच समजले आहे की ह्या बायका म्हणजे आपली बहीण आणि आई आहेत.
बाई अमरीश पुरीला सांगत आहे " मुझपर दया करो मुझपे ऐसा जुलुम मत करो मै तुम्हारे बच्चेकी मा बनने वाली हु"
अमरीश पुरी म्हणतो "क्या सबुत है तुम्हारे पास ईस बात का. मुझे नही पता तुम्हारे पेट मे कीसका पाप पल रहा है"
त्यावर खवळुन ती म्हणते "कमीने मेरे भाई को ईस बात का पता चला तो वो तुम्हारा साम्राज्य नष्ट कर देगा"
त्यावर तीची आई तीला मागे ओढत आहे आणि म्हणते आहे "बेटी यहासे चलो ईस पापी को तेरी दया नही आयेगी. हम जैसे गरीबोंका कोई वाली नही होता."
आता या नंतर सनी देवल भिंत फोडुन आत येणार आहे आणि अमरीशला धु धु धुवुन काढणार आहे.
तो पर्यंत मा बेटी रेल्वे रुळांवर जाउन बसणार आहेत त्यांच्या मागे दोन छोटे भाउ "मा रुक जाओ दीदी तुम्हे पिताजीकी कसम" असे म्हणत धावणार आहेत.
एकी कडे सनी दुश्मन चा खातमा करत आहे आणि दुसर्या फ्रेम मधे,
समोरुन कोळश्याचे ईंजीन लावलेली रेल्वे धडधडत येणार आणि काही कळायच्या आत सनी मधे उडी मारुन ती हातानी आडवणार. मग सगळ्या परीवाराचे मिळुन एक गाणे होणार.
" आंधी आये या तुफान ये प्यार ना होगा कम,
एक दुसरेसे जुदा कभी नही होंगे हम.
बम चीकी बम चीकी बम"
अनुपम खेरची मुलगी डिंपल कुठुन तरी धावत येउन सनीला मिठी मारते आणि मग ते सगळे मिळुन परत वरचे गाणे उच्च रवात गाउ लागतात.
तेव्हड्यात द एन्ड ची पाटी येते.
28 Jul 2011 - 6:23 pm | सूड
हा हा हा !!
:D, :D
28 Jul 2011 - 6:55 pm | नरेशकुमार
पिच्चर पायलेला आहे कदाचित. नाव काय आहे पिच्चरचे ?
कदाचित HD विथ इंग्लिश सबटायटल पाहिला आहे. ३D गॉगल घालुन.
28 Jul 2011 - 6:43 pm | चतुरंग
प्रतिभेला आलेला अनावर बहर वाचून रविवर्म्याने 'धरणीमाते पोटात घे' असं सेल्फ पोर्ट्रेट केलं असतं! ;)
-ख्वाजा रंगकर्मा
31 Jul 2011 - 2:13 pm | चिंतामणी
अगदी बरोबर.
28 Jul 2011 - 7:17 pm | धमाल मुलगा
अनुदिनी तापे, तापलो रामराया.........
-धम्या बजरंगी.
28 Jul 2011 - 7:40 pm | चित्रगुप्त
रूप संगम कडून मिळालेली पैठणी नेसून वैनी आल्या आहेत, तेवढ्यात शूटिंग साठी घाइघाइत केलेला सेट मोडून वैन्या खाली पडु लागल्या आहेत, आदेश भावजी व सिताराम सोसायटी, डोंबिवली (पूर्व) चे शेजारी आश्चर्य चकित होउन बघत आहेत... या खास एपिडोस साठी सर्वांनी ऐतिहासिक वस्त्राप्रवरणे नेसली आहेत.
28 Jul 2011 - 7:58 pm | गणपा
अच्छा हे अस उत्तर अपेक्षित आहे होय.
आम्ही फुकाचे पहिला नंबर लावत प्रामाणिक पणे प्रश्नपत्रिका सोडवायला बसलो. ;)
28 Jul 2011 - 8:41 pm | विजुभाऊ
हा प्रसंग जर सीतेला धरणीमाता पोटात घेते असा असेल तर त्यात बर्याच चुका आहेत.
पुराणात वरील प्रसंग हा रामाच्या दरबारात घडलेला नाही. तर तो ऋषींच्या आश्रमात झालेला आहे.
या प्रसंगात सीतेच्या अंगावर आश्रमातील वस्त्रे हवीत.
रामाने त्याच्या अंगात चिलखत घातले असेल तर ते पुर्ण हवे . ब्लाऊज सारखे पोट उघडे दाखवणारे नको
रामाच्या हातात तलवार आहे ती युरोपीयन बनावटीप्रमाणे सरळ आहे. रामायणात ज्या तलवारी आहेत त्या पुढे पाते रुंद असलेल्या आहेत.
रामाच्या राजवाड्याबाहेर शिवसेनेचे झेंडे का लावलेले आहेत?
दरबारात बसलेल्या रामाने पायात काहीच घातलेले नाही. पायाखालीदेखील काहीच नाही.
28 Jul 2011 - 10:57 pm | योगप्रभू
चित्रातील ढोबळ चुका सर्वाधिक ओळखल्याबद्दल विजुभाऊला मी वर्गातील हुशार मुलगा म्हणून जाहीर करतो. :)
-शेणकुटे गुरुजी-
........................
१) रामायणकाळात नऊवारी साडी व बाह्यांचे ब्लाऊज ही स्त्रियांची वेशभूषा नव्हती. छातीवर कंचुकी व त्यावर एक ओढणीसारखे वस्त्र (अधरीय) असे. कमरेखालचे वस्त्र उत्तरीय म्हणून ओळखले जाई. कमरेवर बांधायचे जे कटिवस्त्र असे त्याला अंशुक म्हणत. पुरुष कंचुकी वगळता हाच पोशाख करत.
२) प्रसंग वाल्मिकी मुनींच्या आश्रमात घडला. तेव्हा सीतेच्या अंगावर आश्रमकन्येचा पोशाख होता. राजस्त्रियांची वस्त्रे नव्हती.
३) राम व कृष्ण यांना दाढी व मिशा नव्हत्या आणि त्यांचा शरीरवर्ण गौर नसून निळा-सावळा होता.
४) राम हा कायम कोदंडधारी (धनुर्धर) होता. त्याच्या हाती तलवार नसे. चित्रात दाखवलेली तलवार युरोपिअन धाटणीची धोप (सरळ पात्याची) आहे. भारतीय योद्धे नेहमी टोकाला बाकदार तलवारी वापरत. पुढे रुंद होणार्या तलवारी राक्षस वापरत. पुन्हा या चित्रातील तलवारीच्या लांबीचे प्रपोर्शन गंडले आहे.
५) भगव्या झेंड्याबाबत कुणा राजकीय पक्षाचे नाव न घेता आपण चित्रकाराला संशयाचा फायदा देऊ. इंद्राचा ध्वज हा 'झर्झर दंड' म्हणून ओळखला जाई. त्याचा रंग भगवा होता. रामायणात इंद्राचा उल्लेख आहे. (युद्धात इंद्रानेच आपला ध्वजांकित 'जैत्ररथ' व 'मातली' हा सारथी रामाला लढण्यासाठी दिला होता.) त्यामुळे भगवा झेंडा मान्य करुया.
६) खिडकीतून बाहेर दिसणारा राजप्रासादाचा कडेचा भाग चक्क टॉवरसारखा वाटतोय. टॉवर ही गॉथिक इमारतशैली आहे. ती युरोपिअनांच्या वसाहतीनंतरच आपल्याकडे रुढ झाली. (पोर्तुगीजांची गोव्यातील जुनी चर्च). रामायणकाळात अशा सरळसोट इमारती नसत. प्रासादांचे सौंध, गवाक्ष यावरही शिल्पकाम आणि नक्षी असे. चितोडच्या विजयस्तंभावरुन साधारण कल्पना येते.
७) चित्रात दाखवलेला रामाचा दरबार नसून महाल असावा. कारण दरबारात चक्रवर्ती राजा इतरांपेक्षा उच्चासनावर बसत असे.
८) सीता भूमातेच्या मांडीवर बसून जमिनीखाली गेली. त्या प्रसंगात भूमाता पाटावर बसून वर आली नव्हती तर रत्नजडित सिंहासनावर बसल्याचे वर्णन आहे.
29 Jul 2011 - 2:01 pm | स्मिता.
हे एकच चित्र नाही तर चित्रगुप्तांनी दिलेल्या दुव्यावरचे सर्वच चित्रे युरोपियन शैलीतली वाटतात. बहुतेक चित्रातल्या स्त्रियांचे वस्त्र, हावभाव हे पाश्चात्य पद्धतीचे आहेत.
हे चित्र बघा:
या प्रकारची चित्रे भारतीय शैलीची नसून (नऊवारी साडी वगळता) युरोपियन आहेत.
29 Jul 2011 - 4:17 pm | योगप्रभू
या चित्रांवर युरोपिअन छाप पडण्यामागे एक कारण असेही असू शकेल की मॉडेल व्ह्यू मनात आणताना रविवर्मा पूर्णपणे प्राचीन काळात शिरले नसावेत. त्यांनी त्यांच्या हयातीतला काळच समोर ठेवला असावा.
म्हणजेच रामाचा दरबार चितारताना त्यांनी ज्या राजाच्या दरबाराचे चित्र प्रत्यक्ष पाहिले होते तो जर अठराव्या शतकातील असेल तर तपशिलाच्या अशा चुका दिसणारच...
29 Jul 2011 - 4:32 pm | नितिन थत्ते
शिवाय आत्ता जे आपण पहात आहोत ते हजारो वर्षापासून (किंवा कलियुगाच्या सुरुवातीपासून) तस्सेच्या तस्से चालत आले आहे अशी समजूतही असू शकेल.
29 Jul 2011 - 5:34 pm | चित्रगुप्त
रविवर्मा ची चित्रे:
http://www.cyberkerala.com/rajaravivarma/
बाळासाहेब पंत प्रतिनिधी (१८६८ - १९५१) यांनी असे लिहून ठेवले आहे, की रविवर्मा (१८४८ - १९०६) ची चित्रे मुख्यत्वेकरून त्याचा लहान भाउ सी. राजा राजा वर्मा हा चित्रित करत असे. रविवर्मा फक्त शेवटी चेहर्यावरील भाव वगैरेत थोडेबहुत काम करून सही करायचा.
बाळासाहेब पंत प्रतिनिधी देखील चित्रकार होते, त्यांचे एक चित्रः
दुवा:
http://www.kamat.com/kalranga/mythology/ramayan/30031.htm
पाश्चिमात्य चित्रकारांच्या मागे जशी एक समृद्ध् परंपरा होती, तशी या भावांना लाभली नव्हती.
29 Jul 2011 - 5:45 pm | स्मिता.
आपण म्हणता तसेच असावे असे वाटते. त्यातल्या त्यात खाली चित्रगुप्तांनी लिहिलंय की रवी वर्म्याची चित्रे त्याचा भाऊ काढत असे.
मला ही चित्रे एखाद्या भारतीयाने पाश्चात्य पद्धतीचा अभ्यास करून काढलेल्या चित्रापेक्षा पाश्चात्य माणसाने भारतीय राहणीमान आणि कथांचा अभ्यास करून काढलेली वाटतात.
रवी वर्म्याचा भाऊ युरोपात वाढला होता का?
31 Jul 2011 - 2:15 pm | चिंतामणी
रामाच्या राजवाड्याबाहेर शिवसेनेचे झेंडे का लावलेले आहेत?
हे हे हे. रा.स्व. संघीचे नशीब. शिवसेनेवरच थांबले विजुभौ. ;)
28 Jul 2011 - 9:57 pm | श्रीरंग
हं.. राम, सीता, वगैरे विषय टर उडवण्यासाठी, टिंगल करण्यासाठी अगदी सेफ आहेत. चालू द्या....
29 Jul 2011 - 1:21 pm | पप्पुपेजर
हेच म्हणतो .
28 Jul 2011 - 10:22 pm | ऋषिकेश
जर चित्रात दोन मुले नसती तर हे दौपदी वस्त्रहरण वाटले होते...(वस्त्रहरण करताना दोन मुले नसावीत असा अंदाज आहे असल्यास कल्पना नाही.. तसेही एकाने डोळे झाकले आहेतच :प)
बाकी राजाच्या मागे कोण उभा आहे? त्याने कानात फूल का अडकवले आहे?
28 Jul 2011 - 10:46 pm | कुळाचा_दीप
मला राहून राहून एक प्रश्न पडतो ... सत्य युगातले , त्रेता युगातले लोक दाढी कशी करत असतील? इव्हान भगवान शंकर पण दाढी करतात ... वैदिक काळात लोकांना दाढी करण्याची कला अवगत होती का ?
28 Jul 2011 - 10:51 pm | मराठे
ज्या लोकांकडे मान कापायला तलवारी आहेत त्यांच्या कडे केस कापायला वस्तरे नसतील ?
28 Jul 2011 - 10:55 pm | कुळाचा_दीप
नसावेत कदाचित !
9 Aug 2013 - 12:26 pm | बॅटमॅन
अध्यात्ममार्ग किती अवघड आहे हे सांगताना कठोपनिषदात खालील श्लोक येतो.
अर्थः क्षुर-म्हंजेच वस्तर्याच्या धारेवरून चालणे जितके अवघड तितकाच अध्यात्ममार्ग अवघड आहे.
ज्या अर्थी वस्तर्याची उपमा उपनिषद काळात दिली गेलीये त्याअर्थी दाढी करायला न्हाव्यांकडे वस्तरे तेव्हापासून असावेत हे स्पष्टच आहे.
12 Aug 2013 - 10:41 am | विश्वनाथ मेहेंदळे
महाभारतात कणिक नीतीत पण वस्तऱ्याच्या उल्लेख आहे
12 Aug 2013 - 12:43 pm | बॅटमॅन
रोचक! हे माहिती नव्हते. धन्यवाद माहितीकरिता!
28 Jul 2011 - 10:47 pm | मृत्युन्जय
चित्र कुठले आहे ते माहिती नाही पणा रद्दड आहे ते कळाले. चित्रातल्या सर्व व्यक्तींनी विशेषतः बायकांनी सर्व कपडे घातले आहेत. अलंकारांवरुन बायका हिंदु वाटतात. तरी पुर्ण कपडे म्हणाजे तर चित्र अजिबातच वास्तवदर्शी आणि कलात्मक नाही हे कळते. असल्या फालतु चित्रांवर कशापाई वेळ वाया घालवायचा?
29 Jul 2011 - 12:55 am | मी_ओंकार
वास्तवदर्शी चित्र . बहुदा सत्यवतीचे आहे. अर्थात ती काही देवी नाही. त्यामुळे चालून जाईल.
दुवा: त्याच अल्बम मधील चित्र ५८
https://picasaweb.google.com/karukamal/ZmNIrK#5367627736101638370
29 Jul 2011 - 1:09 am | पंगा
सत्यवती चामड्याचा पट्टा बांधून आहे?
29 Jul 2011 - 1:13 am | बिपिन कार्यकर्ते
अरसिक किती हा शेमेला
29 Jul 2011 - 1:18 am | पंगा
'तो पट्टा तिथे नसता तर नेमके काय बिघडले असते? उलट किती फायदा झाला असता!' याचा विचार करतोय.
आणि मी अरसिक???
('आंबटशौकीन' म्हणा फार तर.)
29 Jul 2011 - 1:19 am | बिपिन कार्यकर्ते
हां मग ठीक आहे.... नाही तर 'कोणाला कशाचं तर पंग्याला पट्ट्याचं' असं म्हणायची पाळी आली असती. बाकी तुम्ही तो पट्टा नजरेला आणून दिल्याबद्दल तुमचे आभार. ;)
29 Jul 2011 - 10:54 am | नितिन थत्ते
हा शंतनु असेल तर त्याचे डोळे जरा जडावलेले दिसतात.
29 Jul 2011 - 1:30 pm | परिकथेतील राजकुमार
कदाचित सदर प्रसंग गुरुवारी सकाळी घडला असावा, किंवा मग बुधवारी संध्याकाळी तो आपल्या आवडत्या स्त्री बरोबर असताना चितारला गेला असावा.
29 Jul 2011 - 6:00 pm | योगप्रभू
'पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा'
ही ओळ मनात आली :)
येताजाता सारखे धनुष्य आणि तलवार हातात बाळगत बसायची या राजेलोकांची वाईट्ट खोड.
28 Jul 2011 - 11:00 pm | शुचि
प्रकाटाआ
29 Jul 2011 - 12:33 am | बिपिन कार्यकर्ते
चित्रातला प्रसंग धरणीमाता आणि सितामाय यांचाच आहे. सीतामाय पूर्ण कपड्यात वगैरे दाखवली आहे आणि चित्रगुप्त पडले चित्रकार, म्हणून त्यांना ओळखता आली नाही.
29 Jul 2011 - 1:14 am | प्रियाली
.
चित्रगुप्त पंढरपूर निवासी आहेत असा रोख आहे का तुमचा? ;)
29 Jul 2011 - 1:18 am | बिपिन कार्यकर्ते
नाही, सध्या चित्रकारावरच भागवतो. पंढरपूर वगैरे म्हणलं की त्यात अजून काही लोकं येतील... मग उद्याच्या, आय मीन शुक्रवारच्या, बैठकीचं बिल कोण देणार असा प्रश्न निर्माण होईल. नकोच ते. मी चित्रकार नसलो तरी अंगावर उलटणार नाही एवढेच आणि तिथेच स्वातंत्र्य घ्यायची चतुराई आहे माझ्यात, चित्रकारांसारखी! ;)
29 Jul 2011 - 2:59 pm | धमाल मुलगा
हाण्ण तिच्यायला!
काय पर्फ्येक्टं उत्तर दिलं. व्वा! आमच्या कारखान्याच्या प्यानलमदे येता काय? चेरमन कर्तो तुमाला. ;)
29 Jul 2011 - 2:35 am | Nile
काय च्यायला एकेक रिकामटेकडे लोक!
असो, यापेक्षा जास्त वेळ नसल्याने आलेल्या उपप्रतिसदांना उत्तर दिले जाणार नाही.
29 Jul 2011 - 2:45 am | मीनल
चित्रगुप्तांना ह्या चित्रातली ऐवढी गुपितं आत्ताच डोळ्यासमोर आली असतील नै का ???
स्लिव्हलेस ब्लाऊज आणि चामड्याच्या पट्ट्यांनी शर्थ केली गं बाई. हसून हसून मरायची वेळ आली.
आणि काय हो?
एखाद्या प्रसिध्द चित्रकाराच्या कलाकृतीची प्रशंसा करायच्या ऐवजी त्याचे एवढे धिंडवडॆ? नक्को नक्को ती वेळ आली की त्या चित्रकारावर!
बिच्चारा!
29 Jul 2011 - 6:18 am | सहज
टिका करणे हा आमचा जन्मसिद्ध अधीकार आहे व तो आम्ही बजावणारच!
सहज टिळक
अहो मीनलताई तरी नशीब चित्रकाराचे नाव वर्मा आहे, जर दुसरे काही असते ना जसे की ... असो. तर धिंडवडेच काय लक्तरे , देशोधडीस इ सगळे केले असते. चित्रकार काही बिच्चारे नसतात कै डॉलर अन युरो मधे अभिव्यक्ती... असो.
29 Jul 2011 - 3:02 pm | धमाल मुलगा
'..आणि खपली खरवडली गेली!' चा प्रयोग लागला की काय थेटरात? ;)
29 Jul 2011 - 3:45 pm | सहज
मग कधी निघायचे उधळून लावायला!! ;-)
29 Jul 2011 - 4:36 pm | धमाल मुलगा
कशाला ते?
बरं असतं अधून मधून असंही! :D
29 Jul 2011 - 4:43 pm | सहज
'साहेब' म्हणतील तसे!!
29 Jul 2011 - 10:28 am | इरसाल
वि चित्रवर्मानी सरळ सरळ फ्युजन करायचा प्रयत्न केलेला आहे.
तसेच त्यांनी परदेशवारीही केलेली आहे हे दाखवायचा प्रयत्न केलाय.
बाकी थांबू दे.
मी आपले परीक्षण गोंदवले !
29 Jul 2011 - 1:30 pm | JAGOMOHANPYARE
रामाच्या पायाजवळ चिरमुरे पडलेत.
राम सावळा तर लक्षुमण गोरा होता म्हणे. इथे चित्रात उलट आहे.
रामाचे सिंहासनही मंगल कार्यालयात लग्नात ठेवतात तसे आहे.
1 Aug 2011 - 3:17 pm | विजुभाऊ
रामाचे सिंहासनही मंगल कार्यालयात लग्नात ठेवतात तसे आहे.
त्याकाळी मंगलकार्यालये नसायची. राजवाड्याच्या प्रांगणातच लग्ने लागायची.
शिवाय राजा जनकाने चारही मुलींची लग्ने एकाच वेळेस एकाच मांडवात लावून सामुदायीक विवाहामुळे खर्चात बचत होते हा वस्तु पाठ मिथीला आणि अयोध्या नगरीच्या नागरीकांपुढे ठेवला. रामाने एकच बायको बरी हा सुखी संसाराचा मंत्र नागरीकाना शिकवला
( तरीही राम हा संसारात दु:ख्खीच होता म्हणे.अगोदर त्याने बायकोला टाकले नंतर बायकोने त्याला टाकले)
1 Aug 2011 - 6:39 pm | चित्रगुप्त
आमची अनुदिनी : वाचु आनंदे http://vaachuanande.blogspot.com/
....फारच सुंदर लिखाण आहे तुमच्या या अनुदिनिवर.
आणखी असे जुन्या, ऐतिहासिक काळाबद्दल लिखाण आहे का?
29 Jul 2011 - 3:19 pm | नरेशकुमार
सितेला निदान शेवटी तिचि माय उदरात घ्यायला आलि.
पन ज्या बायका आयुश्यभर कश्ट करुन करुन जगतात, तीळतीळ करुन मरतात
त्यांना बिचार्यांना घ्यायला कोनती माय येते का ?
29 Jul 2011 - 3:56 pm | किसन शिंदे
ऑ, एवढा धीरगंभीर प्रतिसाद तोही तुमच्याकडून. :shock:
29 Jul 2011 - 6:36 pm | वपाडाव
ते ताटाखालचं मांजर असेल (बायकोच्या) ;)
7 Aug 2013 - 8:09 pm | चित्रगुप्त
दोन वर्षांपूर्वीच्या या धाग्याच्या प्रतिसादात खूप गंमत जंमत धमाल घडली होती, नवीन मिपाकरांसाठी पुन्हा वर काढत आहे.
8 Aug 2013 - 4:35 pm | सामान्य वाचक
..
8 Aug 2013 - 4:55 pm | तिमा
पुन्हा एकदा त्या चित्रातील पात्रे कुठली यावर चर्चा सुरु करा.
तो राम अजिबातच वाटत नाही. त्याची तलवार म्यानांत आहे का रक्ताळलेली आहे?
नव्याने आधुनिक विचार केल्यावर, ती बिहारमधील सत्ताराणी आहे, तिला नेणारी कमळाबाई आहे आणि सिंहासनावर नितीशकुमार बसले आहेत. (लागली का काडी? का विझली?)
10 Aug 2013 - 7:10 pm | शिल्पा ब
रविवर्मा हा अत्यंत बोगस चित्रकार होता. चित्रकार दलालांनी हाईप केलेला.
10 Aug 2013 - 11:04 pm | बॅटमॅन
जनसामान्यांना कळतील अन भावतील अशी ठसठशीत चित्रे काढणे म्हंजे बोगसपणा तर कैतरी फराटे मारून टनभर विशेषणे लावून वाखाणण्यापेक्षा तसा बोगसपणा जरूर आवडतो.
12 Aug 2013 - 12:02 am | शिल्पा ब
बरं मग? तुमच्या आवडीचा अन माझा काय संबंध ?
12 Aug 2013 - 12:37 am | बॅटमॅन
स्वतःचे मत हे त्रिकालाबाधित सत्याच्या थाटात सांगितले तर प्रश्न उपस्थित होणारच. तसे नसेल तर मरूदे,
असेल तर मग स्पष्टीकरण द्या. रविवर्मा का ओव्हर हाईप्ड होता आणि दलालांनी नेमकं काय केलं इ.
फाटे फुटले तर अनंत फुटतील. न फोडता काही होत असेल तर ठीक.
12 Aug 2013 - 12:51 am | शिल्पा ब
अशा थाटात बोलायची सवय तुमची असेल.
12 Aug 2013 - 12:45 pm | बॅटमॅन
प्रतिसाद पाहिले तर जरूर कळेल सवय कुणाची आहे ते.
11 Aug 2013 - 8:58 pm | अभ्या..
च्यामारी दिग्विजय समजता काय स्वतःला?
जरा कसा बोगस ते समजावून सांगाल काय? किंवा हाईप कसा केला दलालांनी हे तरी निदान.
एलिमेंटरी ग्रेड चित्रकला परिक्षेची ग्रेड सांगितली तरी कळेल म्हणा.
12 Aug 2013 - 12:08 am | शिल्पा ब
मी स्वत:ला काय समजते ते मी बघेन, काळजी नसावी. एवढं मनाला लागलंय तर चित्र का चांगली ते सांगा.
12 Aug 2013 - 10:39 am | विश्वनाथ मेहेंदळे
पुणेमनपा-उंदीर-अमेरिका सिद्धांत लक्षात असू द्या :-)
13 Aug 2013 - 10:13 am | पिशी अबोली
हे द्रौपदी वस्त्रहरण व सीतेची अखेर यांचं फ़्युजन वाटतंय…