Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चित्रगुप्त on गुरुवार, 07/28/2011 - 14:29
आत्तच एक चित्र बघण्यात आले, बहुधा राजा रविवर्माचे. या चित्रातील व्यक्ती व प्रसंग कोणता आहे, समजले नाही. काही अंदाज? हे चित्र यंडुगुंडु भाषेतील दुव्यावर आहे: http://picasaweb.google.com/karukamal/ZmNIrK#
  • Log in or register to post comments
  • 52133 views

प्रतिक्रिया

Submitted by गणपा on गुरुवार, 07/28/2011 - 14:44

Permalink

राजा रवी वर्मा यांचे चित्र

राजा रवी वर्मा यांचे चित्र वाटतेय. धरणी दुभंगुन सिता जाये राम कुश-लव हताश पाहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 08/08/2013 - 18:53

In reply to राजा रवी वर्मा यांचे चित्र by गणपा

Permalink

खालील सगळी चर्चा वाचल्यानंतर

खालील सगळी चर्चा वाचल्यानंतर रामालासुद्धा " हे राम" असे म्हणावेसे वाटेल.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 07/28/2011 - 14:36

Permalink

अरे काय चित्रगुप्त शेठ, येवढे

अरे काय चित्रगुप्त शेठ, येवढे सोपे तुम्हाल महिती नाही ? सितेला तिची माता पृथ्वी आपल्यासोबत घेउन चालली आहे. :) अर्थात सिता भूमीच्या उदरी गडप झाली तो प्रसंग.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 07/28/2011 - 14:42

In reply to अरे काय चित्रगुप्त शेठ, येवढे by परिकथेतील राजकुमार

Permalink

+१००

अगदी शंभर टक्के. आधी अंधुकपणामुळे लक्षात येत नव्हतं. आता पराभाऊंनी सांगितल्यावर पुन्हा पाहिलं. एकदम पटतंय. अर्थातच ते आसनारुढ श्रीयुत हे श्रीरामचंद्र असणार. त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव मात्र, "हे काय झालं बुवा आता वेगळंच काहीतरी.." अशा अर्थाचे काहीसे अनपेक्षित दृश्य पहात असल्यासारखे वाटताहेत..
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता. on गुरुवार, 07/28/2011 - 15:02

In reply to अरे काय चित्रगुप्त शेठ, येवढे by परिकथेतील राजकुमार

Permalink

सीता

जमिनीवरच्या आकृती पाहून ती सीता आणि धरणीमाता असावी हे पटतंय पण सिंहासनावर बसलेली व्यक्ती राम असावी असं वाटत नाही. म्हणजे रामाची जी प्रतिमा मनात असते ती चित्रातल्या रामशी अजिबात जुळत नाही. (पराने सांगितलं म्हणून हा विचार तरी आला, नाहीतर एखाद्या राजाच्या दरबारात एक स्त्री न्याय मागायला आलीये आणि तिचा आवेग अनावर झाल्याने दुसरी तिला सावरत आहे असे वाटले :P ) सिंहासनावरील राजा (राम) आणि त्याच्या मागे उभा असलेला दुसरा राजपुरूष (बहुदा लक्ष्मण) यांनी केसांत माळलेली गुलाबाची फुले बघून अंमळ गंमत वाटली.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 07/28/2011 - 15:04

In reply to सीता by स्मिता.

Permalink

तसेच ऋषींच्या शेजारी एकच बालक

तसेच ऋषींच्या शेजारी एकच बालक उभा दिसतोय. त्याच्याच मागे बघा, एक कपाळावर हात मारुन घेणारे बालक आहे तो कुश असावा, (पुढचा लव असल्यास) (कपाळावर हात का मारला असावा..) आत्ता बघितल्यावर मला श्रीरामचंद्र हाताने खूण करुन कुठे निघालीस? असं विचारताहेत्सं वाटलं.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 07/28/2011 - 15:07

In reply to तसेच ऋषींच्या शेजारी एकच बालक by गवि

Permalink

कपाळावर हात का मारला

कपाळावर हात का मारला असावा
गवि बहुदा त्याने भावनातिरेकाने आपले डोळे हे दृष्य बघवत नसल्याने झाकल्यासारखे वाटत आहेत. @स्मिता एकामागे एक अशी दोन बालके उभी आहेतसे वाटते. आणि शेजारीन दोन ॠषींपैकी एक वशिष्ठ असावेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on गुरुवार, 07/28/2011 - 15:09

In reply to तसेच ऋषींच्या शेजारी एकच बालक by गवि

Permalink

राम तर राम

आत्ता बघितल्यावर मला श्रीरामचंद्र हाताने खूण करुन कुठे निघालीस? असं विचारताहेत्सं वाटलं.
राम तर राम त्याच्या शेजारचा एक ऋषीही तसंच विचारतो आहे. मला आपलं रामभाऊ आणि ते ऋषी सीतेला "वॉ,सप?" असे विचारत असून मागे तोंड लपवणारा कुश "ऑव! शक्स!" असं म्हणतोय असं वाटलं.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 07/28/2011 - 15:12

In reply to राम तर राम by प्रियाली

Permalink

=)) =)) कदाचित तो 'अहो

=)) =)) कदाचित तो 'अहो सासुबाई दिवाळसणाचे आता काय? आणि हे काय सासरचे दागीने पण घेऊन चाललात का काय?' असे देखील विचारत असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by पल्लवी on Fri, 07/29/2011 - 17:11

In reply to =)) =)) कदाचित तो 'अहो by परिकथेतील राजकुमार

Permalink

डायल्याग..

बाबा राम : एवेढेसे काहीतरी बोललो तर लगेच माहेरी ??!! धन्य आहे ! सीतामाय : बसा आता बडवत. हूं... चल गं आई.. कार्टं १ : मम्म्म्मी , मी पण येउ ? कार्टं २ ( डोळ्यांवर हात ठेवलेलं ) : बोंबलला... आता नाश्ता, टिफीन बोंबलला.. मागे उभे असलेले भाउजी : आयला नेहेमीचं झालय राव. ३ चा शो गेला आता चुलीत..
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Fri, 07/29/2011 - 17:29

In reply to डायल्याग.. by पल्लवी

Permalink

हे काय? सासूबाईंचे आणी त्या

हे काय? सासूबाईंचे आणी त्या दोन संधीसाधूंचे डॉयलॉग कुठेयत? कि त्यांना फक्त मुकाभिनय करायचाय.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 07/28/2011 - 15:11

In reply to तसेच ऋषींच्या शेजारी एकच बालक by गवि

Permalink

आत्ता बघितल्यावर मला

आत्ता बघितल्यावर मला श्रीरामचंद्र हाताने खूण करुन कुठे निघालीस? असं विचारताहेत्सं वाटलं.
अरे हे काय अक्रित घडतय असा भाव आहे. अस आपलं माझ मत.
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता. on गुरुवार, 07/28/2011 - 17:57

In reply to तसेच ऋषींच्या शेजारी एकच बालक by गवि

Permalink

मागचा बालक

त्याच्याच मागे बघा, एक कपाळावर हात मारुन घेणारे बालक आहे तो कुश असावा, (पुढचा लव असल्यास) (कपाळावर हात का मारला असावा..) हो, तो मागचा डोळे झाकणारा बालक प्रतिक्रिया टाकल्यावर दिसला. लक्ष्मणाच्या चेहर्‍यावरील भाव इतरांपेक्षा थोडे वेगळे आहेत. राम तसेच ऋषी आश्चर्यचकीत आहेत तर लक्ष्मण चिंतामग्न वाटतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on गुरुवार, 07/28/2011 - 15:04

In reply to सीता by स्मिता.

Permalink

स्लीवलेस ब्लाऊज

रामाने स्लीवलेस ब्लाऊजसारखे काहीतरी घातले आहे हे ही पाहिलेत का? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता. on गुरुवार, 07/28/2011 - 17:53

In reply to स्लीवलेस ब्लाऊज by प्रियाली

Permalink

मी पाहिलं

मी पाहिलं ते स्लीवलेस ब्लाऊजसारखं काहीतरी... मला वाटलं लहानपणीचं चिलखत असावं :P
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on गुरुवार, 07/28/2011 - 17:57

In reply to मी पाहिलं by स्मिता.

Permalink

असहमत

रामबाप्पांना चिलखत घालून राजसभेत सिंहासनावर बसायची गरज ती काय? मला तरी ते स्लीवलेस ब्लाउजसारखं.. अंमळ तोकडं... मल्लिकातै, कत्रिनातै, राखीतैंना आवडेल असं काहीतरी वाटलं.
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता. on गुरुवार, 07/28/2011 - 18:01

In reply to असहमत by प्रियाली

Permalink

तरी

मला तरी ते स्लीवलेस ब्लाउजसारखं.. अंमळ तोकडं... मल्लिकातै, कत्रिनातै, राखीतैंना आवडेल असं काहीतरी वाटलं. ते ब्लाउज तोकडं असलं तरी जरा 'विचित्रच' तोकडं आहे. पण वरच्या तिन्ही तैना नविन फॅशन म्हणून चालून जाईल.
  • Log in or register to post comments

Submitted by मुलूखावेगळी on गुरुवार, 07/28/2011 - 18:24

In reply to स्लीवलेस ब्लाऊज by प्रियाली

Permalink

हो चुक समजुन अनदेखा किया था

हो चुक समजुन अनदेखा किया था
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on गुरुवार, 07/28/2011 - 15:24

In reply to सीता by स्मिता.

Permalink

काहीतरीच काय?

तिचा आवेग अनावर झाल्याने दुसरी तिला सावरत आहे असे वाटले
पण त्या स्त्रीच्या चेहर्‍यावरचे भाव आवेगाचे वाटत नाहीत.. :(
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता. on गुरुवार, 07/28/2011 - 18:05

In reply to काहीतरीच काय? by वपाडाव

Permalink

आवेग आवरलाय

मागच्या स्त्रिच्या सावरण्यामुळे आधीचा दु:खावेग आवरला गेलाय पण राजाकडे प्रश्नार्थक कटाक्ष आहेच.
  • Log in or register to post comments

Submitted by मनराव on गुरुवार, 07/28/2011 - 17:06

In reply to सीता by स्मिता.

Permalink

>>सिंहासनावरील राजा (राम) आणि

>>सिंहासनावरील राजा (राम) आणि त्याच्या मागे उभा असलेला दुसरा राजपुरूष (बहुदा लक्ष्मण) यांनी केसांत माळलेली गुलाबाची फुले बघून अंमळ गंमत वाटली.<<< कुणाचं कुठे लक्ष जाईल काही सांगता येत नाय.!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मनिम्याऊ on गुरुवार, 08/08/2013 - 15:28

In reply to सीता by स्मिता.

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on गुरुवार, 07/28/2011 - 16:52

In reply to अरे काय चित्रगुप्त शेठ, येवढे by परिकथेतील राजकुमार

Permalink

शस्त्र बदल

पराशेठ रामाने धनुष्याचा त्याग करुन तलवार का बरे घेतली असवी? की या चित्राद्वारे शिवसेनेचे समर्थन केल्याचा आरोप होऊ नये म्हणुन चित्रकाराने शस्त्र बदलले असावे? एवढा लोचा होत असताना रामभक्त हनुमान दिसत नाही ?
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 07/28/2011 - 16:58

In reply to शस्त्र बदल by सर्वसाक्षी

Permalink

हा हा हा

अहो सर्वसाक्षी काका, ते म्हणतात ना 'लैला को देखो मजनु की नजरसे.' तसे आहे ते ;) इस प्रसंग को देखो राजा रविवर्मा की नजरसे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on गुरुवार, 07/28/2011 - 14:40

Permalink

गणपा पराशी सहमत

सीतेला धरणीमाता सोबत घेऊन जाते तो प्रसंग आहे पण साफ गंडला आहे कारण सीता एकदा त्याग केल्यावर अयोध्येच्या राजसिंहासनापर्यंत पोहोचली नव्हती असे वाटते. अर्थातच, राजा रविवर्मा चित्रकार असतील तर असे गंडलेपण चालून जाण्यासारखे आहे. नऊवारी साडी नेसणारी आणि शिवलेले फिटींगचे ब्लाऊज घालणारी सीता चालते तर अयोध्येपर्यंत पोहोचली तर काय मोठे त्यात? ;) चित्र यंडुगुंडू भाषेतील असले तरी गूगल ट्रान्सलेटमध्ये रवि वर्मा की पेंटिंग्स असेच लिहून आले.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 07/28/2011 - 14:42

In reply to गणपा पराशी सहमत by प्रियाली

Permalink

तर अयोध्येपर्यंत पोहोचली तर

तर अयोध्येपर्यंत पोहोचली तर काय मोठे त्यात?
घ्या ! अहो ती लोकसभेपर्यंत सुद्धा पोचली कधीच ;) अयोध्येचे काय घेऊन बसला आहात ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on गुरुवार, 07/28/2011 - 14:45

In reply to तर अयोध्येपर्यंत पोहोचली तर by परिकथेतील राजकुमार

Permalink

हेहेहेहे!

अहो ती लोकसभेपर्यंत सुद्धा पोचली कधीच अयोध्येचे काय घेऊन बसला आहात ?
हाहाहाहा! मस्त! धरणीमाते आत घे गं - मला नाही पराला. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 07/28/2011 - 14:50

In reply to हेहेहेहे! by प्रियाली

Permalink

हा हा हा

=)) =)) तसे घडले तर मग तिथुन ऑनलाईन येईन तेंव्हा मला 'बळी' असे सदस्यनाव बदलून मिळावे.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 07/28/2011 - 23:30

In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार

Permalink

हा हा हा !!

म्हणजे तुम्ही आम्हा सर्वांचे कान पिळायला मोकळे का पराशेठ??? (वामन) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Fri, 07/29/2011 - 10:12

In reply to हा हा हा !! by अर्धवटराव

Permalink

तसे ते आत्ताही मोकळे आहेत,

तसे ते आत्ताही मोकळे आहेत, सर्वांचे कान पिळायला :-)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 07/29/2011 - 13:24

In reply to हा हा हा !! by अर्धवटराव

Permalink

ऑ ?

म्हणजे तुम्ही आम्हा सर्वांचे कान पिळायला मोकळे का पराशेठ???
काय हे ? माझ्या सारखा साधा सरळ माणूस कशाला उगाच कोणाचे कान वैग्रे पिळायला जाईल अर्धवटशेठ ? तुमचे एक आपले काहीतरीच बॉ. आता पुन्हा स्वतःला वामन म्हणवताय म्हणजे आम्ही तुमच्यापासून लांबच थांबायला पाहीजे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध प on गुरुवार, 08/08/2013 - 16:41

In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार

Permalink

अहो

बळि तो कान पिळी असे म्हणायचे असेल त्यान्ना.
  • Log in or register to post comments

Submitted by निवेदिता-ताई on Fri, 07/29/2011 - 08:02

In reply to हेहेहेहे! by प्रियाली

Permalink

हे हे हे हे

प्रियाली.........सही ग ...........
  • Log in or register to post comments

Submitted by कच्चा पापड पक्… on गुरुवार, 07/28/2011 - 15:06

Permalink

सीता

सीता पण रामाकडे कशी रागाने बघते आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 07/28/2011 - 15:11

In reply to सीता by कच्चा पापड पक्…

Permalink

राग? बहुतेक व्याकुळता.

राग? बहुतेक व्याकुळता.
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on गुरुवार, 07/28/2011 - 15:19

Permalink

वरील सर्व प्रतिक्रीया टाकणा-यांना

__/\__
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 07/28/2011 - 15:20

Permalink

पण धरणीमातेचा चेहरा कष्टी

पण धरणीमातेचा चेहरा कष्टी वाटतोय. 'चल, येतेच आहे का आता ?' अशा तर्‍हेचा काहीसा.
  • Log in or register to post comments

Submitted by योगप्रभू on गुरुवार, 07/28/2011 - 15:29

Permalink

या चित्रातील इतर ४ ढोबळ चुका ओळखून दाखवा...

मुलांनो, वरील चित्र बारकाईने बघा आणि त्यातील अन्य ४ ढोबळ चुका ओळखून दाखवा बरे.. (नऊवारी साडी आणि फिटिंग्जचे ब्लाऊज त्या काळात नव्हते, ही एक चूक ग्राह्य धरण्यात आली आहे.) -शेणकुटे गुरुजी-
  • Log in or register to post comments

Submitted by मुलूखावेगळी on गुरुवार, 07/28/2011 - 15:37

In reply to या चित्रातील इतर ४ ढोबळ चुका ओळखून दाखवा... by योगप्रभू

Permalink

१. रामानी जोडे काढुन सैरावैरा

१. रामानी जोडे काढुन सैरावैरा टाकलेत २.धरणीमाता सीतेला आत घ्यायला खुप वर आलीये धरनीच्या
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on गुरुवार, 07/28/2011 - 19:01

In reply to १. रामानी जोडे काढुन सैरावैरा by मुलूखावेगळी

Permalink

१. रामानी जोडे काढुन सैरावैरा

१. रामानी जोडे काढुन सैरावैरा टाकलेत
त्याला नविन शुज विकत घ्यायचे असतील.
२.धरणीमाता सीतेला आत घ्यायला खुप वर आलीये धरनीच्या
लिफ्ट काम करत असेल
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on गुरुवार, 07/28/2011 - 15:40

In reply to या चित्रातील इतर ४ ढोबळ चुका ओळखून दाखवा... by योगप्रभू

Permalink

टाईल्स

धरणीमाता टाईल्स फोडून वर आली आहे. कोण रे तो कॉन्ट्रॅक्टर इतकं बेक्कार काम करणारा?
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on गुरुवार, 07/28/2011 - 15:30

Permalink

सीता भूमीत गडप होत आहे

सीता भूमीत गडप होत आहे म्हणावे तर तिच्या कमरेभोवती कुणाचे हात आहेत? मला हा द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग वाटतो. द्रौपदीच्या कमरेभोवती दु:शासनाचे हात आहेत. सिंहासनावर बसलेला दुर्योधन आहे. राम किंवा दुर्योधन कमरेला तलवार लावत असत का?
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 07/28/2011 - 15:34

In reply to सीता भूमीत गडप होत आहे by नितिन थत्ते

Permalink

दुवा.

दुवा.
  • Log in or register to post comments

Submitted by कच्चा पापड पक्… on गुरुवार, 07/28/2011 - 18:02

In reply to सीता भूमीत गडप होत आहे by नितिन थत्ते

Permalink

राम किंवा दुर्योधन कमरेला

राम किंवा दुर्योधन कमरेला तलवार लावत असत का? आत्तापर्यत राम नेहमी धनुष्य घेतलेलाच बघितला आहे. धरुनी शर धनुष्य दीर्घ हस्ती सुरम्य नेसूनी पीतांबर पद्मसनी सुहास्य
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on गुरुवार, 07/28/2011 - 15:50

Permalink

धन्यवाद चित्रगुप्त!!!!!

चित्रगुप्तांनी दिलेल्या लिंकमुळे खूप मस्त चित्रे बघायला मिळाली. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. चित्राची शैली खूपच ओळखीची वाटते कारण लहानपणापासून रविवर्म्याची छापील चित्रे अनेक वाड्यांमध्ये बैठकीत, ढाळजात लावलेली पाहिली आहेत.. आमच्याही घरी बरीच चित्रे होती...
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on गुरुवार, 07/28/2011 - 18:08

In reply to धन्यवाद चित्रगुप्त!!!!! by यकु

Permalink

आमच्याही घरी बरीच चित्रे

आमच्याही घरी बरीच चित्रे होती...
आपण लै हुच्चभ्रु आहात हे आम्हा सर्व मिपाकरांस कळालेले आहे.... *नंतर काय सरपण म्हणुन वापरली का ती चित्रे (घातली का चुलीत) ???*
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on गुरुवार, 07/28/2011 - 18:15

In reply to आमच्याही घरी बरीच चित्रे by वपाडाव

Permalink

*नंतर काय सरपण म्हणुन वापरली

*नंतर काय सरपण म्हणुन वापरली का ती चित्रे (घातली का चुलीत) ???*
गटारी अभी दूर है.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंद on गुरुवार, 07/28/2011 - 17:36

Permalink

राम हा तेनालीरामा सिरीयल

राम हा तेनालीरामा सिरीयल मधल्या राजाच काम करणार्‍या अभिनेत्या सारखा दिसतोय
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on गुरुवार, 07/28/2011 - 17:42

In reply to राम हा तेनालीरामा सिरीयल by आनंद

Permalink

अनंग देसाई

Image removed. राम मला अनंग देसाईसारखा वाटला. देसाईंचा तरुणपणीचा फोटो मिळाला नाही. हा फोटो http://www.indianetzone.com/photos_gallery/3/anangdesai_3174.jpg येथून घेतला
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on गुरुवार, 07/28/2011 - 17:57

Permalink

रामाचे हस्तविक्षेप

रामाचे हस्तविक्षेप असे वाटतात की "अरे तिला घेऊन कुठे निघालीस? चल तू पण ये इकडे ".... आणि उडणारा पदर सीतेचा अहे की धरणीमतेचा? रंगावरुन धरणीचा वाटतो, मग तो क्षणभरापूर्वी रामाच्या हातातुन निसटला आहे काय?
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com