कोंबडा आरवतो -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
3 Jul 2011 - 9:48 am

कोंबडा आरवतो
कुकूऽऽच कूऽक
ऊठ बाळा आता
झोप झाली खूऽप |१|

कावळा करतो
काव काव काव
हास बाळा आता
आईला बोलाव |२|

चिमणीची चाले
चिव चिव चिव
सरकत बाळा आता
बाबांना शिव |३|

मोत्या भुंकतो
भो भो भो
बाळ आलं रांगत
बाजूला हो |४|

पोपट बोलतो
मिट्टूऽऽमिया
दुडुदुडु बाळ चाले
बघायला या |५|

मनीमाऊ म्हणते
म्याऊ म्याऊ
बाळाच्या गंमती
बघायला जाऊ |६|

बालगीतमुक्तकमौजमजा

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

3 Jul 2011 - 11:00 am | चिरोटा

विदेश, मस्तच.

पाषाणभेद's picture

3 Jul 2011 - 11:59 am | पाषाणभेद

आपण मिपाचे बालकवी आहात!

(लो. टिळकांनी नारायण श्रीपाद राजहंस यांना "बालगंधर्व" म्हटले या चालीवर वाचावे.)

मितभाषी's picture

3 Jul 2011 - 2:09 pm | मितभाषी

छान :)

योगी९००'s picture

4 Jul 2011 - 4:35 pm | योगी९००

मस्त मस्त...

आमच्या छोट्या बाळाला पण ही कविता आवडली...

:)