आर डी: ७२

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
27 Jun 2011 - 11:05 pm

पंचमदा असते तर आज ७२ वर्षांचे झाले असते. पण खरं सांगू? ७२ काय, किंवा १०० काय, मला व्यक्तिशः हा माणूस कधीच वृद्ध वाटला नसता. इतकं चिरतरूण संगीत प्रसवणारा जादुगार वयातीतच.

वो जितना जिया, सही जिया!

हा लेख खास तुमच्या आठवणींचा बांध उघडण्यासाठी, मी देतोय ती केवळ झलक आहे या किमयागाराची, तुमच्याही आवडीची गाणी येऊ द्यात प्रतिसादातः

मला चटकन आठवणार्‍या चित्रपटांमधील प्रत्येकी एक सुंदर गीत देतो आहे (एकच गीत सुंदर? कसं शक्य आहे? बाकीच्या गीतांवर अन्यायच हा, पण वेळेचं बंधन आहे, म्हणून एक...)

आधी 'अ' आणि 'ब' या अक्षरांनी सुरू होणार्‍या चित्रपटांमधील ही गाणी, बाकी चित्रपटांमधील गाणी जसा वेळ मिळेल तशी येतीलच.

रिमझिम रिमझिम: १९४२: A Love Story

वादा करो नही छोडोगे तुम मेरा साथ: आ गले लग जा

भोर भये पंछी धून ये सुनाये: आंचल

तुम आ गये हो नूर आ गया है: आंधी

चोरी चोरी चुपके चुपके: आप की कसम

मैने पूछा चांदसे: अब्दुल्ला

वादियां मेरा दामनः अभिलाषा

कोई माने या ना माने: आधिकार

हमें और जीने की चाहत ना होती: अगर तुम ना होते

हम दोनो दो प्रेमी- अजनबी

रैना बीती जाये: अमर प्रेम

बाहाँ में चले आ: अनामिका

कजरा लगा के: अपना देश

चुनरी सम्हाल गोरी उडी चली जाए रे: बहारों के सपने

बडे अच्छे लगते हैं: बालिका बधु

ए री पवन ढूंढे किसे तेरा मनः बेमिसाल

यारा हो यारा, इष्क ने मारा: बेनाम

आओ ट्विस्ट करें: भूत बंगला

देखा ना हाय रे सोचा ना: बाँबे टू गोवा

रात कली इक ख़्वाब मे आयी: बुढ्ढा मिल गया

पल दो पल का साथ हमारा: (द) बर्निंग ट्रेन

सर्वच नाही तरी बरीचशी गाणी आवडतील अशी आशा आहे.

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

27 Jun 2011 - 11:38 pm | श्रावण मोडक

इजाजत. खाली हाथ शाम आयी है... आणि मेरा कुछ सामान...

आत्मशून्य's picture

28 Jun 2011 - 12:27 am | आत्मशून्य

फक्त नावच पूरेसं आहे. किती गाणी सांगणार ?

नंदन's picture

28 Jun 2011 - 12:33 am | नंदन

वा, उत्तम उपक्रम! हीच साखळी पुढे न्यायची तर C वरून 'छोटे नबाब'मधलं लताबाईंनी गायलेलं आर.डीं.चं हे पहिलंवहिलं (ऑफिशियली) गाणं -

घर आजा घिर आये (दुवा)

बहुगुणी's picture

28 Jun 2011 - 3:34 am | बहुगुणी

(पुढचं अक्षर C घ्यावं की 'क' या संभ्रमात होतो, पण मराठीत लिहितोय म्हणून 'क' घेऊयात, आणि मग लागल्या हाती 'ख'.)

कारवां

आता या चित्रपटातलं एकच गाणं निवडणं महाकठीण! तेंव्हा ३ देतोयः

अरे हो... गोरियां कहां तेरा देश रे

कितना प्यारा वादा है इन मतवाली आंखोंका

पिया तू अब तो आ जा

ताक झूम नाचो नशे मे चूर -काला सोना

जहां तेरी ये नज़र है- कालिया

समय तू धीरे धीरे चल- कर्म

मिले जो कड़ी कड़ी- कसमे-वादे

ये जो मुहब्बत है - कटी पतंग

मीठे बोल बोले बोले पायलिया- किनारा

मास्टरजी की आ गयी चिठ्ठी- किताब


हमने तुमको देख - खेल खेल में

जीवन में तू डरना नही - खोटे सिक्के

पिया बावरी पिया बावरी- खूबसूरत

ओ माझी रे - खुशबू

आणि आता यानंतर ड किंवा द अक्षराने सुरू होणारे चित्रपट; तुम्हाला आठवतील तशी तुम्हीही द्या गाणी.

गणपा's picture

28 Jun 2011 - 4:28 am | गणपा

सुरेख संकलन.

दिवार - कह दू तुम्हें.

पुढचं एक माझ्या आवडीचं गाणं मधेच घुसवत आहे.. :) हम ना समझे थे - चित्रपट - गर्दिश ,

सहज's picture

28 Jun 2011 - 8:17 am | सहज

वाचनखूण साठवली आहे.

_/\_

नितिन थत्ते's picture

28 Jun 2011 - 8:24 am | नितिन थत्ते

मिपाची ब्याण्डविड्थ बोंबलेल म्हणून प्रतिसाद देऊ शकत नाही.

:)

बहुगुणी's picture

28 Jun 2011 - 9:32 am | बहुगुणी

ऐसे ना मिझे तुम देखो - डार्लिंग डार्लिंग

कहे दूं तुम्हे या चूप रहूं - दीवार

चांद चुरा के लाया हूं - देवता

इक दिन बिक जायेगा माटी के मोल - धरम करम

जीना क्या अजी प्यार बिना - धन दौलत

हाय रे हाय तेरा घुंगटा - ढोंगी

खान चाचा, खान चाचा - दिल दीवाना

काली पलक तेरी गोरी - दो चोर

मुत्तुकोडि कव्वाडी हडा - दो फूल

तू जहां मिले मुझे वहीं मेरे दोनो जहां - दूसरी सीता

मृत्युन्जय's picture

28 Jun 2011 - 10:17 am | मृत्युन्जय

चुनरी सम्हाल गोरी उडी चली जाए रे ची कोणाकडे एम्पी ३ फाइल आहे का?

बाकी उपक्रम स्त्युत्यच. गाणी शेकड्यात जातील.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Jun 2011 - 11:36 am | मिसळलेला काव्यप्रेमी

इतकं चिरतरूण संगीत प्रसवणारा जादुगार वयातीतच.

हेच खरं बाकी या गाण्यांना ना अंत ना पार!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Jun 2011 - 11:43 am | ज्ञानोबाचे पैजार

आर.डी. बद्दल कितीही लिहीले तरी कमीच पडेल. अफाट माणुस होता तो.

अ - वरुन सुरु होणारे अजुन काही चित्रपट

अलीबाबा ४० चोर - खतुबा

अंगुर - रोज रोज डाली डाली

अलग अगल - दील मे आग लगाए

अर्जुन - दुनिया माने बुरा तो गोली मारो

अशांती - दील दीया है मैने दील दीया है

पैजारबुवा,

नन्दादीप's picture

28 Jun 2011 - 2:49 pm | नन्दादीप

छान विषय.... वाचनखूण साठवल्या गेली आहे....

इंटरनेटस्नेही's picture

28 Jun 2011 - 9:39 pm | इंटरनेटस्नेही

सुंदर कलेक्शन!

बहुगुणी's picture

29 Jun 2011 - 4:21 am | बहुगुणी

खाली हाथ शाम आयी है - इजाज़त

वल्ला क्या नजा़रा है मौसम बडा प्यारा है - इश्क इश्क इश्क

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Jun 2011 - 12:41 pm | बिपिन कार्यकर्ते

_/\_

स्मिता.'s picture

29 Jun 2011 - 2:02 pm | स्मिता.

बहुगुणींनी तर इथे रंगोलीच सुरू करून दिलंय

इतकं चिरतरूण संगीत प्रसवणारा जादुगार वयातीतच.
वो जितना जिया, सही जिया!

शब्दा-शब्दाशी सहमत! सगळी गाणी इतकी चिरतरूण आहेत की वर्षानुवर्षे तीच गाणी ऐकूनही मन भरतच नाही.
या धाग्याला वाचनखूण लावायलाच हवी. धागा काढल्याबद्दल आभार.

(मंडळी: मी आर डी ने संगीतबद्ध केलेले हिंदी चित्रपट शोधतांना ज्या काही संस्थळांची मदत घेतली तिथे अशी यादी इंग्रजी alphabetic क्रमाने होती, त्याचं मराठीकरण करण्याच्या नादात मी शाळेतल्या तुकड्यांप्रमाणे अ, ब, क, ड, इ करत गेलो, आणि मग मी केलेली गोची माझ्या लक्षात आली! मी मूळाक्षरांचा क्रम भलताच लावला होता :D. (आणि हे करतांना अ आणि इ/ई हे स्वर तर वापरलेच, पण ब/भ, क/ख, द/ध/ड/ढ ही व्यंजनांची रुपेही वापरली! क्षमस्व! तेंव्हा आता गाडी परत रूळावर आणायचा प्रयत्न करतो! आता यापुढची गाणी चित्रपटांच्या उर्वरित व्यंजनांच्या क्रमाने असतील. ग/घ, च/छ, ज/झ, ट, त/थ, न, प/फ, म, य, र, ल, व, श/ष/स, आणि ह.)


ग/घ

यार मिल गया तो, खुदा मिल गया - गंगा मेरी मां
(ही १९८२ सालच्या चित्रपटातली आर डी ची कव्वाली माझ्या याआधीच्या कव्वालीच्या धाग्यात निसटून गेली होती. आज संधी मिळाली आहे तर देतो आहे.)

मुझको बचा ले मेरी मां - गरम मसाला

हम ना समझे थे - गर्दिश: हे गाणं वरती याच धाग्यात प्रभो यांनी दिलंय.

चांद सा चेहेरा: गहेरा ज़ख्म

आने वाला पाल जानेवाला है - गोलमाल

तुमको कितना प्यार है -गूंज

दो लब्जो की है- ग्रेट गँबलर

जयपूर से निकाली गाडी - गुरुदेव

तेरे बिना जिया जाये ना - घर

निगाहों ने छेडा है - घातक

आंखियों का कजरा - घुंगरू की आवाज

विकास's picture

1 Jul 2011 - 5:08 am | विकास

मस्त धागा आणि आठवणी...

वर आलेल्याव्यतिरीक्त काही विशेष आठवणारी:

त्यातलेच अजून एक

अजून खूप आहेत! :-)

चतुरंग's picture

1 Jul 2011 - 5:26 am | चतुरंग

अजून एक 'बहुगुणी' धागा! :) __/\__
वाचनखूण साठवल्या गेली आहे.

-रंगा

रेवती's picture

1 Jul 2011 - 7:07 am | रेवती

खूपच सुरेल धागा!
माझ्या आवडीची गाणी आधीच दिलेली असल्याने पुन्हा देत नाही.
हा धागा वाचनखूण म्हणून साठवणार आहे.

अजून एक आवडतं गाणं जवानी दिवानी मधलं
जाने जां ढुंढ्ता फिर रहा हूं

बहुगुणी's picture

2 Jul 2011 - 3:24 am | बहुगुणी

कुछ तुम करो कुछ हमे करें - हमारे तुम्हारे

कांची रे कांची रे - हरे रामा हरे कृष्णा

पन्ना की तमन्ना है - हिरा पन्ना

कहिये कहां से आना हुआ - हिरालाल पन्नालाल

कोई परदेसी आया परदेस में - हम हैं लाजवाब

चांद मेरा दिल / आ, दिल क्या महेफील है तेरी / तुम क्या जानो - हम किसी से काम नहीं

हम तुम गुमसुम रात मिलन की - हमशक्ल

वाह रे किस्मत तेरी जय जय, आखिर तेरी मर्जी क्या है, हमें कहां लाके मारा रे - हंगामा

बहुगुणी's picture

2 Jul 2011 - 11:31 pm | बहुगुणी

च / छ

निर ता ता - चंदन का पलना

इक शोख हसीना से अरमान भरी शादी - चांदी सोना

दिल से दिल मिलने का कोई कारन होगा - चरित्रहीन

अय जाने वफा - छलिया

मतवाली आंखोवाले ओ अलबेले दिलवाले - छोटे नवाब [याच चित्रपटातील "घर आजा घिर आये" हे गाणं वर या आधी नंदन यांनी दिलं होतं.]

अटकन बटकन - चोर पोलीस

*******************

या आधीच्या '' पासून च्या चित्रपटांच्या यादी मधून हे एक चांगलं गाणं राहून गेलं:

कधी बेकसी ने मारा - अलग अलग