संथ पाडते गझला बाई ....

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
23 Jun 2011 - 10:28 pm

(चाल : संथ वाहते कृष्णामाई ....)

संथ पाडते गझला बाई -
गझलेवरच्या प्रतिसादांची जाणिव तिजला नाही |धृ | संथ पाडते ....

कधी न कामें करी लौकर ती ,
कूर्मगतीने सदा करी ती ;
बॉसगिरीची काही पर्वा नाही तिज ठायी |१| संथ पाडते ....

कुणी पुरे ना म्हणती गझला ,
कुणी वर्णिती उच्च गेयता ;
मात्रागणाची करून जंत्री - मोजित कुणी राही |२| संथ पाडते ....

सतत चालते काव्य-टंकणी ,
होई न व्यनितुनी बाई शहाणी ;
वाचकास ही व्हावी कैशी , सांगा सुखदायी |३| संथ पाडते ....

भयानकविडंबनमौजमजा

प्रतिक्रिया

पप्पु अंकल's picture

24 Jun 2011 - 11:21 am | पप्पु अंकल

तुमच्या आधिच्या कवितांप्रमाणे सुंदर
विडंबन काव्य प्रकारात तुम्ही दगड आहात........................मैलाचा.
शाब्बास...............लगे रहो.