मेथी पापडनु शाक
साहित्य : मेथीचे दाणे ५ टी स्पून ,किंचीत आंबट दही १ वाटी , पाणी अर्धा वाटी , कच्चे पापड ५, आवडत असल्यास टोमॆटो २ , मोहोरी , हळद एक चमचा , मीठ , तीखट , तूप/ तेल फ़ोडणी साठी
साधरण एक तास अगोदर मेथीचे दाणे भिजत ठेवावे,दही घोटुन घ्यावे. एका जाड बुडाच्या पातेल्यात फ़ोडणीसाठी तूप/तेल(२/३ चमचे) तापवत ठेवावे.चांगले तापले की त्यात मोहोरी टाकावी , ही फ़ोडणी झाली की त्याच भांड्यात घोटलेले दही. थोडे पातळ करण्यासाठी त्यात थोडे पाणी टाकावे.
त्यात भिजवलेले मेथीचे दाणे टाकावे हळद , तिखट चवीपुरते घालावे. तीखट मीठ जरा कमीच टाकावे ( पापडात तीखट, खार/मीठ असते त्यामुळे)आवडत असल्यास टोमॆटो तुकडे करुन टाकावे व मेथीचे दाणे मऊ होई पर्यंत शिजु द्यावे.
चांगली उकळी आल्यावर एका पापडाचे चार तुकडे असे ५ पापड (कच्चे) तुकडे करुन टाकावे. पापड टाकल्यानंतर गॆस बंद करावा फ़ार उकळत ठेवु नये. ( अन्यथा पापडाचे तुकडे गोळा होतात).
वाढताना थोडे गरम करुन पसरट वाटीत वाढावे.
सूचना : यात कितीही इच्छा झाली तरी साखर गूळ वापरु नये./
: आळस म्हणुन पापड आख्खा टाकु नये.
प्रतिक्रिया
20 May 2008 - 5:24 pm | वरदा
आळस म्हणुन पापड आख्खा टाकु नये.
काय विजुभाऊ आम्ही सगळ्या (सुगरणी :$ ) काय तुम्हाला अशा वाटलो? इतक्या नाही काही आम्ही आळशी...
फोडणीत हिंग हळद टाकायची की नाही का?
किती वेळ आधी करुन ठेवलं तर चालेल?
20 May 2008 - 6:28 pm | आनंदयात्री
आळस म्हणुन पापड आख्खा टाकु नये.
विजुभाउ ८ दिवसांपासुन पुण्यात आलेत, वारं लागलं वाटत :)
20 May 2008 - 6:05 pm | स्वाती राजेश
मेथीच्या दाण्यामुळे कडवट होत नाही ना? कारण तुम्ही तिखट कमी घालायला सांगितले म्हणून विचारले? शिवाय साखर/गुळ नाही...:)
बाकी रेसिपी छान वाटते. मेथी पौष्टीक असल्यामुळे छान आहे मुलांसाठी सुद्धा, नक्की करून पाहीन.:)
20 May 2008 - 6:18 pm | विजुभाऊ
किंचीत कडवट आंबट तिखट अशी नेहमीच्यापेक्षा वेगळी टेस्ट आहे
फार तिखट केल्यास मेथीची चव लागत नाही. तसेच लसुण व कांदा वापरला तरीही तसेच होते.
तरीही आवडीनुसार प्रमाण बदलावे.
फोडणीत हिंग टाकुन मी पाहिले नाही. हळद चालेल.
20 May 2008 - 6:26 pm | मनस्वी
विजुभाऊ
"शाक" या शब्दाचा अर्थ काय?
उडदाचेच पापड वापरायचे का?
कच्चा पापड दातांना चिकटत नाही का?
पदार्थ जास्तीत जास्त किती वेळात संपवणे गृहित आहे?
हे रायत्यासारखे खावे का?
रेसिपी छान वाटतीये. तसंही साखर-गूळ कमीच वापरते मी स्वयंपाकात. लसूण नाही पण कांदा नक्की टाकेन मी.
20 May 2008 - 7:00 pm | विजुभाऊ
पापड टाकल्यानन्तर फार वेळ उकळु नये. पापड दाताना चिकटत नाही
गुजरातीमध्ये शाक म्हणजे भाजी. पालेभाजी नव्हे त्याला फक्त भाजी म्हणतात.
उडदाचेच पापड वापरायचे का?
हो मी इतर पापड वापरुन पाहीले नाहित.
पदार्थ जास्तीत जास्त किती वेळात संपवणे गृहित आहे?
एका जेवणात. हा पदार्थ शिल्लक रहात नाही. दही व उडीद एकत्र फारवेळ ठेवत नाहीत.
हे रायत्यासारखे खावे का?
याबद्दल काय सांगु...........
20 May 2008 - 7:04 pm | प्राजु
वेगळी रेसिपि.
नक्क्की करून बघेन..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 May 2008 - 9:36 pm | स्वाती दिनेश
वेगळा प्रकार दिसतो आहे,करुन पाहिला पाहिजे.
अवांतर-विजुभाऊ मेथीचं शाक पाकक्रिया विभागात का नाही लिहिलंत?
स्वाती
20 May 2008 - 11:03 pm | प्रभाकर पेठकर
मेथी पापडनु शाक बहु सारू लागे छे! आवता रविवारे करीश. चोक्कस! एक विचारवू हतु, पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? डाळ ढोकळी जेवा?
21 May 2008 - 12:40 pm | विजुभाऊ
पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के?
घणा नाना नै करशो . नै तो एनी स्पागेटी बनी जशे. दाळ ढोकळी मा ढोकळी माटे जे रोटली वणो छो एना कटका जाडा होय छे ते माटे नाना होय छे. पापड तो पातळो होय छे. एटले घणा नाना कटका न चाले.
21 May 2008 - 1:31 pm | प्रभाकर पेठकर
भले. मुद्दो सांभळ्यो. हवे जाणी-जोईने शाक बनाविश. धन्यवाद विजुभाऊ.
पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के?
एक नानकडी टायपिंग मिश्टेक थई. आ शब्द वधारे एवो वाचजो. सोरी.
21 May 2008 - 12:50 am | वरदा
सह्ही गुजराथी बोलता तुम्ही एकदम...
पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के?
म्हणजे काय?
21 May 2008 - 1:34 pm | प्रभाकर पेठकर
पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के?
टंकलेखनात जरा चूक झाली. वधाने नाही, वधारे असे वाचावे.
वाक्याचा अर्थ, 'पापडाचे तुकडे जास्त लहान केले तर चालतील का?' असा आहे.
21 May 2008 - 10:16 pm | वरदा
आता कळ्ळं..गुजराथी शिकावं म्हणते...मला शिकवाल का पेठकर काका आणि विजुभाऊ तुम्ही?
21 May 2008 - 1:15 am | llपुण्याचे पेशवेll
वाचून तरी ही पाककृती फार मस्त लागत असेल असे वाटते.
स्वगतः कोणीतरी पाककृतीमधे इंटरेस्टेड माणूस शोधून त्याला ही पाककृती द्यावी आणि आपण स्वतः फुकट चापायला जावे.
पुण्याचे पेशवे
21 May 2008 - 1:06 pm | मनिष
आमची आई अशीच "पापडाची भाजी" म्हणऊन करते; फक्त ती दही टाकत नाही. आता दही टाकून प्रयत्न करुया!
- (खवैया) मनिष
अवांतर : त्या कच्च्या पापडांमधल्या सोड्यामुळे मला चव फारशी आवडली नव्हती असे आठवते.
21 May 2008 - 10:15 pm | वरदा
पापडात सोडा कुठे असतो? पापडखार म्हणायचय का तुम्हाला?