मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मेथी पापडनु शाक

विजुभाऊ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मेथी पापडनु शाक साहित्य : मेथीचे दाणे ५ टी स्पून ,किंचीत आंबट दही १ वाटी , पाणी अर्धा वाटी , कच्चे पापड ५, आवडत असल्यास टोमॆटो २ , मोहोरी , हळद एक चमचा , मीठ , तीखट , तूप/ तेल फ़ोडणी साठी साधरण एक तास अगोदर मेथीचे दाणे भिजत ठेवावे,दही घोटुन घ्यावे. एका जाड बुडाच्या पातेल्यात फ़ोडणीसाठी तूप/तेल(२/३ चमचे) तापवत ठेवावे.चांगले तापले की त्यात मोहोरी टाकावी , ही फ़ोडणी झाली की त्याच भांड्यात घोटलेले दही. थोडे पातळ करण्यासाठी त्यात थोडे पाणी टाकावे. त्यात भिजवलेले मेथीचे दाणे टाकावे हळद , तिखट चवीपुरते घालावे. तीखट मीठ जरा कमीच टाकावे ( पापडात तीखट, खार/मीठ असते त्यामुळे)आवडत असल्यास टोमॆटो तुकडे करुन टाकावे व मेथीचे दाणे मऊ होई पर्यंत शिजु द्यावे. चांगली उकळी आल्यावर एका पापडाचे चार तुकडे असे ५ पापड (कच्चे) तुकडे करुन टाकावे. पापड टाकल्यानंतर गॆस बंद करावा फ़ार उकळत ठेवु नये. ( अन्यथा पापडाचे तुकडे गोळा होतात). वाढताना थोडे गरम करुन पसरट वाटीत वाढावे. सूचना : यात कितीही इच्छा झाली तरी साखर गूळ वापरु नये./ : आळस म्हणुन पापड आख्खा टाकु नये.

वाचन 6902 प्रतिक्रिया 0