काहीही लिहीले तरी क्रिप्टीक म्हणायची स्टाइल आहे म्हणुन शिर्षकातच खुलासा.
"हा मोबाइल चार्ज झालाच नाही"
बटन दाबलेत का? बटन दाबल्याशिवाय तो चार्ज कसा होइल? कधी जाणार तुमचा धांदरट्पणा? मो(गा) बाइल
"असु दे हां"
आता बसा चरफडत.मो(गा)बाइल
"बॅट्री जुनी आहे. चार्ज व्हायला कमीत कमी एक तास. ऑफिस मधे तसे विषेश काही नाही. पण एक तास काय करु?"
सहा महीने सांगतेय. बॅट्री बदला म्हणुन. उगाच चार्जींग मधे वेळ का घालवायचा माणसाने? मो(गा)बाइल)
"आजच बदलतो. पण आता वेळ कसा घालवु."
मनाचे श्लोक म्हणा. आणि जरा महागाची खरेदी करा. वर्षभर तरी यायला पाहीजे.मो(गा)बाइल.
"त्या पेक्षा असे करु या का? मी बेल बंद करतो. आपण "भिकार सावकार" खेळु. त्यात तु केंव्हाही जिंकतेस".
नको.मो(गा)बाइल
"अस काय करतेस? "सात आठ" तरी खेळुया."
नको.मो(गा)बाइल
"कमीत कमी "बदाम सात" तरी."
पुरे झाला हां चहाटळपणा. ही काय वेळ पत्ते खेळायची? निघा आता.मो(गा)बाइल.
आता ही वर्षभर चालणारी महागाची बॅट्री शोधायची कुठे? त्या पेक्षा चार्जींग ला थोडा वेळ लागला तर काय बिघडते.? पण हे मो(गा)बाइल ला सांगुन उपयोग नाही. सांगुन कळायचे नाही.
जाता जाता: वरील लेखन मिपा'श्रोमनी' टारझन आणि माझे परममित्र परिकथेतील राजकुमार याना समर्पित.
प्रतिक्रिया
18 Jun 2011 - 10:38 am | जय - गणेश
मो(गा) बाईल अर्थात प्रेमळ बायकोमो(गा) बाईल हे कसे ??
टायपींग येते म्हणुन काय भी लिवनार का ?
18 Jun 2011 - 11:40 am | मेघवेडा
ज्रा वीचार क्र कि लिहिन्यापुर्वि. टायपींग येते म्हणुन काय भी लिवनार का ?
18 Jun 2011 - 2:30 pm | विनायक प्रभू
मोग्=प्रेम
मोगा=प्रेमाची
18 Jun 2011 - 10:39 am | गणपा
मास्तुरे काय शाट बी कळ्ळ नाय वं. :(
18 Jun 2011 - 11:01 am | मृत्युन्जय
हुश्श. मला वाटले होते मला एकट्यालाच काही झेपलेले नाही आहे.
18 Jun 2011 - 11:16 am | नगरीनिरंजन
लेखन माझ्यासाठी दुर्बोध आहे म्हणजे काही तरी फार भारी अर्थ असणार. प्रश्नच नाही.
18 Jun 2011 - 12:24 pm | आनंद
दुसरा अर्थ लक्षात आल्या सारखा वाटतो आहे पण पहिला अर्थ काही कल्ला नाय.
18 Jun 2011 - 11:35 am | विजुभाऊ
हम्म..क्रीप्क्टीक काय कळ्ळं नाय बॉ.
सात आठ , भिकार सावकार.....हे खेळण्यापेक्षा पेशन्स खेळा ना.
यकट्याने कदीबी खेळता येते.
18 Jun 2011 - 11:41 am | विसुनाना
माजे रानी, माजे मोगा - तुजे दोल्यांत सोधता ठाव !
-हे गाणं माहिती असल्यानं मोगा म्हणजे लाडकी वगैरे असावे असे वाटत होते.
असो.
संवाद आवडला.
"पुरे झाला हां चहाटळपणा. ही काय वेळ पत्ते खेळायची? निघा आता"
मुले मोठी झाल्यावर असे घरगुती प्रेमळ संवाद व्हायचेच घरात. ;) याला 'आवरा आता' असेही म्हणतात.
18 Jun 2011 - 12:21 pm | परिकथेतील राजकुमार
येच बोल्ता है ;)
पण गुर्जी कणखर कंबरेचे असल्याने इतके दिवस बोलायचे टाळत होतो.
18 Jun 2011 - 12:14 pm | रणजित चितळे
आणि हे धोरण, प्रकटन ह्या मथळ्याखाली कसे.
18 Jun 2011 - 3:26 pm | चिरोटा
छान क्रिप्टिक. ईनायक परबू मोबाईल वेडे नाहीत एवढे कळले.
18 Jun 2011 - 4:49 pm | डॉ.श्रीराम दिवटे
मस्त मोगाबाईल...
संवाद छान आलेत.
18 Jun 2011 - 8:03 pm | भारी समर्थ
व्वाह! बहारदार लेखन.
लेखकाने लेखनाची जी उत्तुंग पातळी गाठली आहे ती पाहून मान कलली आणि पटका पडला. या क्षणी लेखनात अतिशय सहजतेने गुंफलेल्या अन्वयार्थालाही दाद दिली पाहिजे. सारे लेखन कसे अगदी खासच!
ज्या रा.रा.प.रा. व श्री.श्री.श्री.टारझन (हेमंतराव) यांना हा लेख समर्पित आहे, त्यांनी दर्शनाची वेळ जाहीर करावी, आम्हासही आपणाकडून कडकडून प्रेरणा घ्यावयची आहे.
भारी समर्थ