मो(गा) बाईल अर्थात प्रेमळ बायको
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
काहीही लिहीले तरी क्रिप्टीक म्हणायची स्टाइल आहे म्हणुन शिर्षकातच खुलासा.
"हा मोबाइल चार्ज झालाच नाही"
बटन दाबलेत का? बटन दाबल्याशिवाय तो चार्ज कसा होइल? कधी जाणार तुमचा धांदरट्पणा? मो(गा) बाइल
"असु दे हां"
आता बसा चरफडत.मो(गा)बाइल
"बॅट्री जुनी आहे. चार्ज व्हायला कमीत कमी एक तास. ऑफिस मधे तसे विषेश काही नाही. पण एक तास काय करु?"
सहा महीने सांगतेय. बॅट्री बदला म्हणुन. उगाच चार्जींग मधे वेळ का घालवायचा माणसाने? मो(गा)बाइल)
"आजच बदलतो. पण आता वेळ कसा घालवु."
मनाचे श्लोक म्हणा. आणि जरा महागाची खरेदी करा. वर्षभर तरी यायला पाहीजे.मो(गा)बाइल.
"त्या पेक्षा असे करु या का? मी बेल बंद करतो. आपण "भिकार सावकार" खेळु. त्यात तु केंव्हाही जिंकतेस".
नको.मो(गा)बाइल
"अस काय करतेस? "सात आठ" तरी खेळुया."
नको.मो(गा)बाइल
"कमीत कमी "बदाम सात" तरी."
पुरे झाला हां चहाटळपणा. ही काय वेळ पत्ते खेळायची? निघा आता.मो(गा)बाइल.
आता ही वर्षभर चालणारी महागाची बॅट्री शोधायची कुठे? त्या पेक्षा चार्जींग ला थोडा वेळ लागला तर काय बिघडते.? पण हे मो(गा)बाइल ला सांगुन उपयोग नाही. सांगुन कळायचे नाही.
जाता जाता: वरील लेखन मिपा'श्रोमनी' टारझन आणि माझे परममित्र परिकथेतील राजकुमार याना समर्पित.
प्रतिक्रिया
मो(गा) बाईल अर्थात प्रेमळ बायकोमो(गा) बाईल
"माजे रानी माजे मोगा"
मोग
मास्तुरे काय शाट बी कळ्ळ नाय
हुश्श. मला वाटले होते मला
लेखन माझ्यासाठी दुर्बोध आहे
दुसरा अर्थ
हम्म..क्रीप्क्टीक काय कळ्ळं
माजे रानी माजे मोगा
+१
कळले नाही
छन
मस्त मोगाबाईल... संवाद छान
अत्युच्च!!!