१) आत्माराम बुवांची समाधी (काळाराम मंदीर -गिरगाव)
२) श्री दत्तात्रय (काळाराम मंदीर -गिरगाव)
३) श्री दत्तात्रय (काळाराम मंदीर -गिरगाव)
४) जय श्री राम !!! :) (काळाराम मंदीर -गिरगाव)
५) श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. :)
(समर्थांचा दास)
मदनबाण.....
कॅमेरा निकॉन पी-१००
चुचु बर्याच वेळा कांदेवाडीच्या मठात जायची असं कुठेस मिपावर वाचल्याचे स्मरते,मी अनेक वर्ष दादरच्या मठात वेळ मिळेल तसा जात आलो आहे.आता मनात इच्छा निर्माण झाली की कांदेवाडीच्या मठात सुद्धा जाउन यावे...मग गिरगाव गाठले,स्वामींचे पहिले दर्शन काळाराम मंदिरातच झाले. या मंदिरातील रामाच्या मूर्तीचे वैशिष्ठ म्हणजे सिता मैया श्री रामाच्या मांडीवर विराजमान आहेत.या मंदिरातील देवतांची स्थापना शालिवाहन शके १७५० भाद्रपद शुक्लपक्ष,द्वादशी रविवार (२० सप्टेंबर १८२०) आत्माराम बुवांनी केली.
कांदेवाडीचा स्वामींचा मठ पुढच्या भागात. :)
प्रतिक्रिया
16 Jun 2011 - 11:58 am | पाषाणभेद
छान.
फोटो काढू देतात काय?
16 Jun 2011 - 12:09 pm | पर्नल नेने मराठे
वा वा मदनबाण... इकडे घरबसल्या दर्शन झाले .. धन्य झाले मी. काळाराम व गोराराम दोन्ही मंदिरांच्या मधे असलेल्या गल्लीत जाऊन चुचु ओरडलात तरी मला ऐकायला येइल ;)
पुढचा भाग वाचण्यास अतिउत्सुक !!!
16 Jun 2011 - 12:35 pm | मदनबाण
अगं चुचे प्रसिद्ध गणेश मूर्तीकार मादुस्कर राहतात तीच गल्ली का ? ;)
16 Jun 2011 - 12:44 pm | पर्नल नेने मराठे
ह्म्म सेम बिल्डिन्ग :)
16 Jun 2011 - 12:17 pm | किसन शिंदे
शीर्षकावरुन आधी वाटलं नाशीकचं सुप्रसिध्द काळाराम मंदिर असावं.
असो..
अतिशय प्रसन्न वाटलं ऑफिसबसल्या दर्शन करुन.
16 Jun 2011 - 12:51 pm | अमोल केळकर
आजचा गुरुवार सार्थकी लागला
धन्यवाद
' दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' !!!
अमोल केळकर
16 Jun 2011 - 1:02 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
असेच म्हणतो.
गुरुवार आणि वेळ दोन्ही सार्थकी लागले.
16 Jun 2011 - 10:15 pm | निवेदिता-ताई
असेच म्हणते...सगळ्य़ा मुर्ति अतिशय मनमोहक आहेत.
16 Jun 2011 - 1:28 pm | जय - गणेश
आमच्या आय टी वाल्यांनी ऑफीस मधे व्हेब फील्टर घातलेत, त्यामुळे चित्रे दिसत नाहीत. घरी गेल्यावर चित्रांना बघुन घेईन.
16 Jun 2011 - 1:40 pm | JAGOMOHANPYARE
नमस्कार
16 Jun 2011 - 1:41 pm | ज्ञानोबाचे पैजार
मदनबाण तुमचे मनापासुन आभार.
फोटो सुरेखच आले आहेत. त्यानी माझ्या लहानपणच्या आठवणी ताज्या केल्या
मी लहान असताना बाबा मला नेहमी या देवळात न्यायचे. मी आणि माझा भाऊ खुप खुप वेळ खेळायचो इथे. फार छान वाटले फोटो पाहुन.
16 Jun 2011 - 2:14 pm | पप्पु अंकल
' दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा'
ग्रहण सुटले.......
16 Jun 2011 - 2:48 pm | जागु
अरे वा गुरुवारच्या दिवशी छान दर्शन घडवलेत.
16 Jun 2011 - 11:00 pm | रेवती
छान आहेत फोटो!
सध्या जोडी जोडीनं दर्शनाला जातोय्स वाट्टं.;)