मुलास पत्र.....

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
19 May 2011 - 8:20 am

बबडूस,

सद्या चि. आशिर्वाद असं लिवलं तर लई राग येतो लेकरांना म्हनूनशान हे असं लिवलय.

लई दिवसापासून तुला पत्र लिवीन लिवीन म्हनतोय, पण हिकड येळच मिळत नाही काय करनार ! साहेबांची तुरुंगातसुधा शेवा करावी लागती बाबा ! आणि साहेबबी कसं हायती.. स्वत:च्या दाढीचं केसबी कापत नाय साला. असो पण आपल्याला काय करायचं हाय ? पैसे मिळत्यात ना? मग झाल तर. ग्वाड मान्हून रहायच. पैक्यापूढ मान अपमान सगळ झूट असतय बाबा. परवाच तुझ्याआयचा फोन आला होता. (तिच्यायलाहिच्या) तिला आता भिकंच डोहाळं लागल्यालं दिसत्यात. मला सांगत व्हती की बबड्याला आता शिक्षाण पूर्न कर म्हनाव. आता शिकून (तसलं हो) काय उपयोग व्हनार हे तूच तिला समजावून सांग. मी तुला काय काय शिकवलं हाय हे तिला न्हाय समजणार.. अरं आपला-तुपला संस्कार वर्गच वायला हाये .पण म्या सांगितलं तर तिला अजाब्यात पटणारबी न्हाही, उगाचच भांडनं व्हतील. शेजार्‍याना तमाशा साला.. नाय नगच ते.

ती आता तुझ्या मागं लगीन कर लगीन कर म्हनून लई भुनभुन लावल.. पन तू तिला म्याट्रीक झाल्याबिगर नाही असं ठासून सांग म्हणजे ती गप बसंल आणि तुबी जिंदगीभर लगिन न करता पोरी उडवायला मो़कळा... हाय की नाय तुझ्या बाची आयडीया.? लग्नाचा इचारबी करू नगस. माझ्याकड बघ...

आता तूझ्यासाठी मी साहेबांच्या मदतीन एक झाक पदवी करायला टाकली हाय. ती तुझ्या आयच्या नजरस पडायच्या आत लपीव. तसा तुला त्याचा उपयोग न्हाय म्हणा पण साहेबच म्हनाले पुढच्या ’ऑलिंपीक्स भारतात भरवायच्या आहेत तवा उपयोगी येईल. एक लोन प्रकरन करून टाकू म्हनाले. ५००एक मारूतीच्या टॅक्सीच घेऊन टाकू साला... कटकट नको.. साहेबांनी आत्तापाचनच तयारी करायला सांगितली आहे म्हनजी कोणाच्या डोळ्यावर यायला नगं. लोग फार वाईट असतात रं बाबा....हे तुझ्या आयला सांगू नकोस. ती येड्यागत बोंबलत सूटेल.

तुझ्या लहानपनच्या सगळ्या विच्छा मी आता पूर्न करणार. परवाच वाघ नख्याच्या आन पट्याच्या खाली लोंबणार्‍या सोन्याच्या हे एवढाल्ल्या जाड साखळ्याची ऑर्डर येथूनच दिली हाय. ते सगळं सोने अंगावर घातल्यावरची तुझी छबी डोळ्यासमोर उभी राहून डोळ्यातून पानी आलं बघ. हे सोने लई जड असते रं बाळा. जरा व्यायाम करत जा आणि आता हातभट्टीची लावायची बंद कर. साहेबांच्या पंपावर स्कॉचचा स्टॉक ठेवला आहे तो बिनधास वापर. बहूदा सायब आता येनार न्हाईत. काळजी नाय. समजतयका मी काय म्हनतोय ते ...... शक्यता कमीच हाय... तुही साला तुझ्या आयसारखा बावळट...

परवा तू आमच्या इज्जतीचा फार फालूदा केलास म्हनं. IG चा फोन आला होता सायबांना. तू म्हणं फक्त १०० रु. च्या नोटेतून चरस ओढत होता.... मला एक सांग कुठे गावली तुला ही १००ची नोट ? आपल्या घरात ? तेही त्या बावळटीचे काम असणार. कितीवेळा सांगितले की बबडूच्या नजरंस १००० डालरहून कमीची नोट पडता कामा नये. तुझे ह्रदय परिवर्तन का काय म्हणत्यात.. ते झालं म्हंजी आम्ही काय आपल्या शेतावर परत राबायला जायाच की काय..... आज साला तुझी फारच आठवण येऊन राहिलीय... तिकडे तुला उचक्या लागल्यात कारे भाड्या ?..... लागल्या असतील तर ताबडतोब तो खंबा तोंडाला लाव नाहीतर आम्ही साले हिकडे उचकून मरायचो.....
आनि एक आठवलं.... आम्ही येथेच खपलो तर काळजी करायची नाही....साहेबांच्या सगळ्या धंद्यात आता आमचीबी पार्टनरशीप आहे हे लक्षात ठिव. आपला शिए आहे त्याच्या कडे जा. तोही साला नालायकच आहे..... त्याची ती फाईल घेऊन जा म्हणजे तो वठणीवर येईल... झेरॉक्स. वरिजनल नको...

साहेबाच्या सायबाला भेटायल जा म्हनतो मी. त्वांड आनि खिसा दोन्हिबी जरा मोकाट सोड म्हनजे कामं होतील. काय त्वांडाला दोन तीन टाकं पडत्याल पडूद्या...आरं त्या पुढच्या गल्लीतल्या पोरांचा मुडदा बसव की जरा.. आमची लईच बदनामी करत व्ह्ती अस कानावर आलय ! असं शेबूड गाळत बसला तर कस व्हनार तुझ ?

आज नको नको ते विचार मनात येऊन राहिलेत.... एकच काळजी हाय र पोरा... आमच्या नंतर तुझ्या त्या आयनं तुला परत शाळा कालिजात घातल तर कस होणार रं तुझऽऽऽऽऽऽऽऽऽऽ.

तुझाच

बाप.

विनोदविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

रेवती's picture

19 May 2011 - 11:13 am | रेवती

खी खी खी.

अन्या दातार's picture

19 May 2011 - 11:41 am | अन्या दातार

बाप दिसतोय.
पण पत्रात संस्कार, मानापमान वगैरे सेक्शन्स दिसले नाहीत त्यामुळे अंमळ वाईट वाटले. ;)
नोकरी-धंदा काहीपण असो, संस्कार वगैरे मुल्ये सगळीकडेच असतात ना (धंद्यागणिक बदलणारी )

जयंत कुलकर्णी's picture

19 May 2011 - 12:59 pm | जयंत कुलकर्णी

जरा शोधलत तर तेही सापडतील,
:-)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 May 2011 - 2:50 am | विश्वनाथ मेहेंदळे

सेक्शन्स नाहीयेत पण पत्रात ते मुद्दे आहेतच की.

गोगोल's picture

19 May 2011 - 12:53 pm | गोगोल

:)

नावातकायआहे's picture

19 May 2011 - 1:20 pm | नावातकायआहे

लै भारी!

राजेश घासकडवी's picture

19 May 2011 - 2:36 pm | राजेश घासकडवी

मजा आली...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 May 2011 - 4:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा हा हा, मस्त!

सविता००१'s picture

20 May 2011 - 5:15 am | सविता००१

मस्तच.

इंटरनेटस्नेही's picture

22 May 2011 - 3:47 am | इंटरनेटस्नेही

आवडले!