नाट्यगीत: अशी कशी ही पिढी नेटावली

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
11 May 2011 - 3:16 am

नाट्यगीत: अशी कशी ही पिढी नेटावली

मागे माझ्या एका नाट्यगीतास एकदम झकास चाल लावणारे येथील सदस्य"निल्या१" (Nile नव्हे. ते वेगळे.) याही नाट्यगीताला चाल लावतील काय?

अशी कशी ही पिढी नेटावली हो.....
अशी कशी ही पिढी नेटावली
इंटरनेटी जाळ्यात अडकली
अशी कशी ही पिढी नेटावली ||धृ||

पुरत नाही दिवस काही
रात्रीही तीच कथा होई
डोके राहूनी स्क्रिन समोरी
किबोर्ड सतत बडवती ||१||

खाणे नाही नाही पिणे नाही
आईबापा संगे बोलणे नाही
बंधूभगीनी संगे बोलणे नाही
हेडफोन लावूनी कानी
आ आ आ आ आ आ आ
हेडफोन लावूनी कानी
गाणे कसले गुणगुणती ||२||

फेसबुक नका म्हणू तुम्ही
अहो ट्विटर नका म्हणू तुम्ही
मिसळपाव म्हणू नका तुम्ही
या सार्‍या सोशल मेडीया सायटी
मिळोनी सारे मित्र येथे
हो..... मिळोनी सारे मित्र येथे
एकमेकासंगे चॅटती ||३||

त्यातच तो स्मार्टफोन आला
इंटरनेटला कनेक्ट झाला
हातामध्ये नवे शत्र जणू
वापरीत रस्त्याने चालती ||४||

एसेमेस ठरले लघूलीपी बोलणे
हसण्या, रूसण्या स्मायली पाठवणे
एमेन्सी, आयटीत नोकरी करणे
ऑनलाईनी सामान मागवणे
काय तर्‍हा एकेके सांगू
पाषाणाची मती गुंगली ||५||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१०/०५/२०११

संगीतनाट्यकविता

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

11 May 2011 - 11:53 am | नरेशकुमार

वाचुन गंमत वाट्ली.
चाल लाव्ल्यावर ऐकायला अजुन मज्जा ईल.