आंबिवली ठाकुर्ली डोंबिवली विक्रोळी
ढुंडाळली चिंचपोकळी
दातीवली कळंबोली आयरोली घणसोली
उमरोली धाव घेतली
कांदीवली खोपोली डोळावली केळावली
आंबिवली बघून झाली
घुमुन घुमुन मायला इज्जत गमावली
छोकरी हाती नाय आली
पुरब पश्चिम भेंडी पालथी घातली
लोकलची गुंतावळी
हार्बर मार्गावर कुणी नव्हतीच मुळी
आपलेवाली घरवाली
लोकल पोरगी शोधायला दरदर
भटकलो चारो ओर मरमर
भोईसर दहिसर अगदी पार खारघर
वरी देख्खानी उल्हासनगर
कोंबून लोकलमधे चिंबून खारावली
पांढरी पॅन्ट झाली काळी
आंबिवली ठाकुर्ली डोंबिवली विक्रोळी
नव्हतीच अपल्या साली भाळी
प्रतिक्रिया
7 May 2011 - 4:42 pm | अरुण मनोहर
मिपवा अजब तुझे सरकार
कविता मरते फाट्यावर
रबरास घर्षण फार
मिपवा अजब तुझे सरकार
8 May 2011 - 7:25 am | नरेशकुमार
मि आइकले कि आता आता सगळिकडे भार्तात मेट्रो चालू होनारे.
straight from bombay to calcutta & kashmir to kanyakumari.
8 May 2011 - 7:31 am | नरेशकुमार
अॅक्चुली माझ्या मते, मेट्रो, लोकल, बस, ट्रेन पेक्शा सगलीकडे विमान सर्विस चालू करावि.
मंजे खडकी वरुन दापोडिला, ठान्यावरुन मुलंडला जान्यासाठि विमान असावे.
काये airway बांधायचा खर्च काहीच नसतो. नाही का ?
11 May 2011 - 2:25 am | पाषाणभेद
मनोहर काका, मजा आली बरका लोकलवारी करून.