'एकाक्ष' - रेखाटन.

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
16 May 2008 - 2:20 am

थोडी पार्श्वभूमी - माझी आई ड्रॉईंग काढायची त्यावेळी पेन्सिली, रंग, कागद घेऊन मी काहीतरी लुडबुड करीत बसलेला असे. त्यातूनच पुढे कधीतरी चित्रांबद्दल गोडी निर्माण झाली असावी.
मला रंगीत चित्रांपेक्षा रेखाटने अधिक भावतात (कदाचित मला तेवढीच बरी जमत असावीत ;) ). काही वर्षे रेखाटने केली. पुढे कॉलेजच्या दिवसांनंतर आपसूकच तो छंद मागे पडला. आपल्या कितीतरी गोष्टी अशा व्यापातून मागे पडत गेलेल्या मला जाणवते.
कामातून सवड काढून, उसंत मिळवून असे छंद पुन्हा एकदा जोपासायला हवेत अशी प्रबळ इच्छा मनात मूळ धरुन आहे. असो.

इनोबा आणि केशवसुमार ह्यांनी त्यांची सुंदर रेखाटने इथे टाकली ती बघून बिचकतच मी माझेही एक चित्र टाकायचे ठरवले.
१९८५ साली काढलेल्या ह्या चित्राचे, एच्.बी.पेन्सिली आणि ड्रॉईंग पेपर हे माध्यम आहे. (माझ्या सुरुवाती-सुरुवातीच्या चित्रात खोडरबर हेही एक प्रभावी माध्यम असायचे असे मला अंधुकसे आठवते! ;))

चतुरंग

कलाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

16 May 2008 - 2:39 am | मुक्तसुनीत

मिसळपाववरचे लोक खरेच एकसे बढकर एक छुपे रुस्तुम निघाले राव ! जियो भाई चतुरंगशेठ ! अजून येऊ द्या !

मन's picture

16 May 2008 - 2:54 am | मन

मस्त चित्र.

आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)

राजे's picture

16 May 2008 - 7:19 pm | राजे (not verified)

मिसळपाववरचे लोक खरेच एकसे बढकर एक छुपे रुस्तुम निघाले राव ! जियो भाई चतुरंगशेठ ! अजून येऊ द्या !

१००% सहमत.

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

भाग्यश्री's picture

16 May 2008 - 3:19 am | भाग्यश्री

बापरे.. ती डोळ्याची रिकामी खोबण डेंजर दिसतीय.. पण काय सुंदर काढलंय हो! मला माझे अपयशी प्रयत्न आठवतायत.. हे इतकं छान काढायला कसं जमतं बॉ???
बाकी, ती दाढी एका बाजूनी मोठी आहे का?

मदनबाण's picture

16 May 2008 - 4:18 am | मदनबाण

अरे व्वा मिपाकर कर तर छुपे रुस्तम आहेत.....
छान चित्र काढल आहे.....

मदनबाण.....

विसोबा खेचर's picture

16 May 2008 - 7:59 am | विसोबा खेचर

रंगा, रेखाटन छानच आहे पण कोणाचं आहे? हा मनुष्य कोण आहे?

असा कुणी एकाक्ष प्रत्यक्षात आहे, की हा तुझ्या मनातला एकाक्ष आहे?
आणि त्याची दाढी उजव्या बाजूला ट्रीम केलेली आणि डाव्या बाजूला वाढलेली, असं का? :)

तात्या.

कोलबेर's picture

16 May 2008 - 8:05 am | कोलबेर

क्या बात है! उत्कृष्ट रेखाटन!!
चित्रकले बरोबर विडंबने करण्याचा बोनस सर्वांनाच मिळतो का? :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 May 2008 - 8:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चतुर , सुंदर रेखाटन !!!

ऋचा's picture

16 May 2008 - 9:00 am | ऋचा

सुंदर!!!!!!!!

सहज's picture

16 May 2008 - 9:18 am | सहज

तुम्ही पण.

वाह मजा येतीय.

मिपाकर एकसे बढकर एक आहेत.

धमाल मुलगा's picture

16 May 2008 - 12:09 pm | धमाल मुलगा

रंगराव,
मस्तच.
गुढतेकडे झुकणारं हे चित्र एकदम झकास!

बाकी हा कुठे पाहिला होता की मनातलाच?

भयानक खोबण, अस्ताव्यस्त (एका बाजुची) दाढी, हरवलेल्या भुवया, चेहर्‍यावरचे काहीसे हिंस्त्रतेकडे झुकणारे भाव...जबरदस्त!

येऊद्या अजुनही!

अवांतरः हा एकाक्ष जर मनातला असेल, तर कोण्या काळी मनातली विषण्णता, आणि काहीश्या हतबलतेतून आलेल्या रागाच्या मनोस्थितीत असताना काढलेला आहे का हो?

आनंदयात्री's picture

16 May 2008 - 2:07 pm | आनंदयात्री

भयानक खोबण, अस्ताव्यस्त (एका बाजुची) दाढी, हरवलेल्या भुवया, चेहर्‍यावरचे काहीसे हिंस्त्रतेकडे झुकणारे भाव...जबरदस्त!

खुपच भारी रेखाचित्र आहे, लै भारी भारी चित्रकार आहेत आपल्या मिपावर, सुंदर.
कवितेचे अंग (पहिला अर्थ घ्या) असणार्‍या लोकांना चित्रकला अवगत असतेच बहुदा ! (एक पे एक फ्री)
आपला ओंकार पण गझला करता करता रेखाचित्रेही सुरेख काढतो बरं.

स्वाती दिनेश's picture

16 May 2008 - 12:41 pm | स्वाती दिनेश

मजा तर येते आहेच,एकापेक्षा एक चित्रांची मेजवानी ! आणि एकापेक्षा एक सवाई चित्रकारही दिसताहेत..
तात्या,बहुदा अजून एक विभाग करायला लागणार..:)
स्वाती

विसोबा खेचर's picture

16 May 2008 - 12:54 pm | विसोबा खेचर

तात्या,बहुदा अजून एक विभाग करायला लागणार..

हम्म! स्वाती तुझं खरं आहे! :)

ठीक आहे, काढूया की चित्रकला विभाग! आम्हाला त्यात खुशीच आहे! :)

आपला,
(चित्रकलाप्रेमी) तात्या.

आनंदयात्री's picture

16 May 2008 - 2:12 pm | आनंदयात्री

त्या येउ घातलेल्या विभागाचे नाव 'आर्ट गॅलरी' ठेवले तर काय बहार होईल !
पुढे मागे खर्‍या खर्‍या मिपा कट्ट्यांसारखी खरी खरी 'आर्ट गॅलरी' पण भरवता येइल :)

मनस्वी's picture

16 May 2008 - 2:19 pm | मनस्वी

ठीक आहे, काढूया की चित्रकला विभाग! आम्हाला त्यात खुशीच आहे!

धतर ततर धतर ततर...

त्या येउ घातलेल्या विभागाचे नाव 'आर्ट गॅलरी' ठेवले तर काय बहार होईल !

मराठमोळे आणि जरा वेगळे नाव असावे, असे मला वाटते.

ऋचा's picture

16 May 2008 - 2:21 pm | ऋचा

हे नाव छान आहे

प्रभाकर पेठकर's picture

16 May 2008 - 2:26 pm | प्रभाकर पेठकर

डेडली.... ह्याहून वेगळी प्रतिक्रिया सुचत नाही. (घसाही कोरडा पडला जणू....)

गणपा's picture

16 May 2008 - 3:55 pm | गणपा

अगदी हेच म्हणतो.

चित्रकला विभागाला आमचही अनुमोदन.
या विभागाला कलादालन किंवा नुसत दालन हे नाव कस वाटतय.

भडकमकर मास्तर's picture

16 May 2008 - 3:07 pm | भडकमकर मास्तर

च्यायला हा एकाक्ष बाबा स्वप्नात येऊन आम्हाला घाबरवणार.... >:)
मस्त चित्र...

शितल's picture

16 May 2008 - 5:03 pm | शितल

रेखाटनाट इतके गुढ, हिस्त्र॑क भाव उतरलेत की मी ते पाहुन रात्रीची मला थोडी भिती वाटायली लागली. :S

चित्रातल्या व्यक्तीबद्दल थोडे - हे चित्र जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका अट्टल गुन्हेगाराचे आहे. आधी मुद्दामच हे सांगितले नव्हते नाहीतर चित्रावरुन मत तयार होण्याऐवजी मतावरुन चित्र मनात तयार होण्याचा संभव :). व्यक्तिचित्रांच्या एका पुस्तकातल्या ह्या चित्राने बघताक्षणी मनाचा कबजा घेतला आणि मी लगेच चित्र काढायला बसल्याचे आठवते.
दाढी एका बाजूला कातरल्यासारखी दिसते असे काही रसिकांचे मत आहे. ते मूळ चित्रात होते की माझ्याकडून शेडिंग करताना अर्धवट राहून गेले हे आता आठवत नाही, २३ वर्षे झाली त्याला!
पुढील चित्र लवकरच टाकेन.

चतुरंग

मदनबाण's picture

17 May 2008 - 4:42 am | मदनबाण

मला हे चित्र कुठेतरी पाहिल्या सारखे वाटते आहे.....
दोन वेगळ्या चेहर्‍यांचा मिळुन एक चेहेरा बनवला आहे असे मला तरी वाटले,,म्हणजे चेहेर्‍याचा डावा भाग एका व्यक्तीचा आणि उजवा भाग मात्र दुसर्‍या व्यक्तीचा.....
म्हणुनच बहुतेक डाव्या डोळ्यावर भुवई नाही तर उजव्या चेहेर्‍याची दाढी वाढली आहे......

मदनबाण.....