तुम्ही गोळी बघितलीय गोळी?

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
30 Apr 2011 - 6:17 am

तुम्ही गोळी बघितलीय गोळी?

तुम्ही गोळी बघितलीय गोळी?
साधी सुधी खाऊची, लिमलेटची गोळी नाही हो!
किंवा औषधाची कडू गोळीही नाही.
बंदूकीची गोळी? बॅरल मधून सुटलेली?

ती कधी असते तांब्याची, अ‍ॅल्यूमिनीअम किंवा मिश्र धातूची.
झाडल्यावर वेगात जाते अन वेध घेते एखाद्या मस्तकाची.
किंवा आरपार शरीतात घुसते
किंवा कधीकधी शरीरातच मुरते
अन मग चालू होतात रक्ताचे पाट
लाल लाल रक्ताचे पाट.

ती घुसवली जाते सामान्यांच्या शरीतात,
किंवा सहज मजा म्हणून शिकारी प्राण्यांच्या शरीरात.

मरणार्‍या या दोघांची जातकुळी एकच.
निष्पाप, कुणाच्याही अध्यात नसलेले.
दोघेही प्राण सोडण्याच्या वेळी भेदरलेले.
डोळे सताड उघडे ठेवून गोळी झाडणार्‍याकडे बघणारे.
किंवा क्वचितच उघड्या डोळ्याने आपल्याच शरीरात परकीय असणारी;
पण आता शरीराचाच भाग झालेल्या गोळीकडे बघत बघत मरणारे.

आता मी सहजच विचारतो तुम्हाला,
तुम्ही बंदूकीची झाडलेली गोळी बघितलीय का?
शरीरात शिरणारी गरमागरम गोळी?

मी बरीच माणसं मारली या बंदूकीनं.
लवंगी फटाक्यांसारख्या गोळ्या उडवल्या या, या बंदूकीनं
चिक्कार माणसं मारली मी होवून सैतान.
ते ही कुणाच्यातरी सांगण्यामुळं.

पण... पण...
मी आता भानावर आलोय....
शेगडीवरच्या गरम भांड्याला चुकून हात जेव्हा लागतो;
तेव्हा आपण भानावर येतो.
तसाच मी ही आता भानावर आलोय.

अरे, ओरडून सांगतोय ना आता मी तुम्हाला;
की मी आता भानावर आलोय म्हणून!!

वेदना काय असतात ते मला आता कळालेय.
असे काय बघताय तूम्ही?......

अहो, आत्ता इतक्यातच अशाच एका बंदूकीच्या गोळीने माझ्याच शरीराचा वेध घेतलाय!!

- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/०४/२०११

भयानकमांडणीकविता

प्रतिक्रिया

गोळी लागलेली दिसते आहे.
वेगळी कविता .आवडली .

राजेश घासकडवी's picture

1 May 2011 - 8:29 am | राजेश घासकडवी

वेगळी कविता. आवडली.

चिरोटा's picture

30 Apr 2011 - 1:44 pm | चिरोटा

सही. वेगळीच कविता.

पाभे काय नेमबाजी शिकायला लागलास का रे?

- (अवखळ नेमबाज) पिंगू

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 May 2011 - 11:27 am | मिसळलेला काव्यप्रेमी

पाभे!! मस्त कल्पना!!
आवडली.

प्रवास एकदम छानच हो पाभे! :)

(लिमलेटप्रेमी)रंगलेट

प्रतिक्रियांबद्दल सर्व वाचक प्रतिसादकांचे धन्यवाद.

आधी मला ती गोळी एका सामान्य माणसाला लागलेली आहे असे दाखवायचे होते. त्याच्या वेदना दाखवायच्या होत्या. पण नंतर थोडा विचार केला अन मग ती गोळी अतिरेक्याला लागते असे दाखवले.

नरेशकुमार's picture

3 May 2011 - 7:12 am | नरेशकुमार

कविता अंगावर काटा आनुन गेली.

तुम्ही गोळी बघितलीय गोळी?

हो,
अ‍ॅम्युनिशन फ्यॅक्ट्रीमध्ये एकदा गेलेलो होतो, त्यावेळेस.

वा पाभे .. आता व्हायाग्राच्या गोळीवर एक कविता येऊ द्या ... :) आणि घुसवा सामानाच्या शरीरात आणि वाहु द्या रक्ताचे सडे =)) कवितेच्या स्ट्रक्चर मधे फार काही बदल करावा लागेल असे वाटत नाही ;)

- गोळा

चिगो's picture

3 May 2011 - 11:14 am | चिगो

सह्ही कविता.. आवडली..

अमोल केळकर's picture

3 May 2011 - 11:56 am | अमोल केळकर

मस्त , कविता आवडली

अमोल केळकर

llपुण्याचे पेशवेll's picture

3 May 2011 - 12:11 pm | llपुण्याचे पेशवेll

छान कविता. आवडली.