बस स्टँड
परवाच खुप कधीचा गावाकडे गेलो.
तशी आठवण यायची पण सवड नव्हती होत.
म्हणून वेळात वेळ काढून गेलो.
आठवणीतल्या आठवणी आठवीत गेलो.
तो बसस्टँड, तेथील पत्र्याच्या खाली सावलीत उभे राहणारे लोक,
ते शाळा कॉलेजला जाणारे पोरं पोरी,
माहेराला, सासरला जाणार्या नवर्या मुली,
ते फलाटावरच पाया पडणं, अन नवर्या मुलाचं अवघडून जाणं,
जागा सांभाळण्यासाठी झालेली गर्दीची लढाई,
त्या गर्दीकडे शांत प्रवृत्तीने बघत तंबाखू मळणारे कंडक्टर,
"भाऊ कुठे जाते रे गाडी", विचारणारी आजीबाई,
"ईकडे लक्ष द्या" म्हणत बसमध्ये पेनं, एखादे पुस्तक विकणारा,
लिमलेट, आवळासुपारी, पेपर विकणारा,
कंन्ट्रोलरची अनांउन्समेंट अन रिपोर्टवर सह्या घेण्याची ड्रायव्हर लोकांची अर्जवी धावपळ.
मन त्याच्याही मागे गेले,
लायनीत आधी तिकीट घ्यायचे अन मगच बसमध्ये बसायचे,
नजरेतील ती लाल पिवळी बस,
बरं पुर्वी आतासारख्या अॅल्यूमिनीयम बॉडी असणार्या बस नव्हत्या,
होत्या त्या पत्र्याच्या, खुप आवाज होणार्या,
हं.... अर्थात आजही आवाज होतोच आहे म्हणा.
मला आठवते... आमच्या गावाच्या बसस्टँडमध्ये एक दोन पंखेही होते प्रवाशांच्या डोक्यावर,
अन ते गोल गोल फिरायचेसुद्धा.
सारा गोंगाट, पळापळ,
पोर्टरची बसची पाटी घासत घेवून जाण्याची मुजोरवृत्ती,
अन बसच्या छतावरचे सामान उतरवण्यासाठीची धावपळ,
सारे काही होते तेथे.
पण काही बदल लक्षणीय होते,
सामान नेण्यासाठी चाके असणार्या बॅगा,
ग्रामीण भागातल्या नटव्या मुली अन मिथून मुले.
कंडक्टर च्या खांद्यावर तिकीटांचे मशीन,
अन पाणी पिण्यासाठी प्लाश्टीकच्या बाटल्या,
स्टँडवरचे पत्र्याचे शेड आता नव्हते,
अन कंट्रोलरचे ते गिचमीड बोलणेही नव्हते.
बसमध्ये जेवणाचे डबे पाठवणे अन तो घ्यायला येणारे विद्यार्थीही नव्हते.
पुर्वीच्या अन आताच्या स्टँडमध्ये बरेच बदल झाले होते तर!
प्रतिक्रिया
26 Apr 2011 - 1:31 am | गणेशा
जागा अधोरेखित
.
.
.
.
अवांतर :
आज कधीच्या काळात ऑफिस मध्ये थांबलोय रात्री कामास... झोप पण येते आहे ... तरी सर्व रात्री कविता टाकणार्यांचा निषेध नोंदवुन ..उद्या पर्यंत ही जागा अधोरेखित करत आहे...
उद्या संपादन करत आहे..
26 Apr 2011 - 1:38 am | निनाव
श्री गणेशा,
:) :)
मित्रा, काय करायचे आता सांग, धरणी माते चे पदर इतुके मोठे आहे कि आम्हास सुर्य लाभता तिथं रात्र होऊन जाते रे.. :)
26 Apr 2011 - 1:33 am | निनाव
पाभे,
पुन्हा भन्नाट!!
अफलातून. अगदी स्टंड ची सैर करून आणली कि तुम्ही. एका क्षणी असे वाटून गेले कि एवढ्या गरदित मला जागा मिळेल कि नाही :) . मस्त सुंदर वर्णन आणिक शेवट तर -खल्लासच केला आहे कवितेचा. एक दमच सुंदर.
- निनाव.
26 Apr 2011 - 4:16 pm | गणेशा
चित्र वर्णन आवडले ...
27 Apr 2011 - 10:44 am | स्पंदना
पुन्हा कवितेचा नवा प्रकार, नव शिल्प! काव्य चित्र!
सल्युट पाभे!
27 Apr 2011 - 11:06 am | अमोल केळकर
लाल डब्याची एस्टी आमचा सगळ्यात वीक पॉइंट
ती सर आजकालच्या शीवनेरी किंवा व्हॉल्वे गाड्यांना नाही
कविता आवडली
अमोल केळकर