आज १३ एप्रिल. ९२ वर्षंपूर्वी याच दिवशी जालियनवाला बाग येथे अमानुष नरसंहार घडला होता. बैसाखी मेळ्यानिमित्त जमलेल्या हजारो निरपराध नागरीकांवर मायकेल ओडवायर व डायर यांच्या अधिपत्याखालील शिपायांच्या तुकडीने गोळयांच्या १६५० हून अधिक फैरी झाडत ३७९ माणसे ठार केली तर हजाराहुन अधिक जखमी केली. मृतांचा आकडा अधिक असल्याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे. नि:शस्त्र नागरिकांना कोंडीत गाठुन असहाय्य अवस्थेत टिपुन मारण्यात आले. अनेक जण जीव वाचविण्यासाठी विहिरीकडे धावले तर अनेकांनी भिंती चढुन जाण्याचा प्रयत्न केला. पण परिणाम एकच - मरण. या नरसंहाराबद्दल कुणाला ना खेद ना खंत. डायरने तर उद्दाम पणे विधान केले की त्याला याबद्दल कसलाही खेद होत नाही, गोळ्या संपल्यामुळे त्याचा नाईलाज झाला अन्यथा आणखी माणसे मारण्याने त्याला फरक पडत नव्हता. आपल्या विरुद्ध डोके वर काढणार्याला काय शासन होते हे दाखवुन देण्यासाठी हे भयानक कृत्य इंग्रज सरकारच्या अधिकार्यांनी केले. पुढे इंग्लंडला परत गेल्यावर 'सुसंस्कृत व लोकशाहीच्या पुरस्कर्त्या' इंग्लिश नागरिकांनी ओडवायरचा सत्कार केला व २०,००० पौंडांची थैली त्याला त्याच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल दिली.
मात्र हा अमानुष नरसंहार 'हिंसा' या शब्दाच्या अधिकृत व्याख्येत बहुधा सामावला नसावा. कारण या भयानक घटनेविरुद्ध कुण्या मानवतावाद्याने व हिंसेच्या तिरस्कर्त्याने काही केल्याचे ऐकिवात नाही. (मात्र अवघ्या तीन वर्षांनंतर नव्या आंदोलनात झालेल्या हिंसेने व्यथित होउन भरात आलेले आंदोलन तडकाफडकी मागे घेतले गेले होते.) असो.
मात्र जवळपास दोन दशकांच्या प्रतिक्षेनंतर हुतात्मा उधमसिंह यांनी इंग्लंडमध्ये जाऊन नराधम ओडवायरला कंठस्नान घातले व या अत्याचाराचा प्रतिशोध घेतला. अनेकदा संधी असतानाही शस्त्र न चालविता अखेर हुतात्मा उधमसिंह यांनी ओडवायरला भरसभेत भारतमंत्री झेटलँड यांच्या उपस्थितीत यमसदनास धाडले व हिंदुस्थानातील अस्मिता व हिंदुस्थानियांच्या अंगातील रग अजुन संपली नसल्याचे दाखवुन दिले. हुतात्मा उधमसिंह अभिमानाने व कर्तव्यपूर्तीच्या समाधानात पेंटनविले तुरुंगात फाशी गेले. पुढे अनेक देशाभिमानी हिंदुस्थानियांच्या प्रयत्नांती हुतात्मा उधमसिंहांचे अवशेष १९७४ सालीहिंदुस्थानात आणले गेले व सुनाम या त्यांच्या जन्मग्रामी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यांच्या अस्थी सतलज नदीत विसर्जित करण्यात आल्या.
जालियनवाला बाग नरसंहारात बळी पडलेल्या समस्त हिंदुस्थानी नागरिकांना या घटनेच्या ९२ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली
प्रतिक्रिया
13 Apr 2011 - 3:43 pm | पियुशा
९२ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली
13 Apr 2011 - 3:47 pm | टारझन
श्रद्धांजली !!
13 Apr 2011 - 3:57 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
जालियनवाला बाग नरसंहारात बळी पडलेल्या समस्त हिंदुस्थानी नागरिकांना या घटनेच्या ९२ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली !!
13 Apr 2011 - 4:03 pm | स्पा
पुढे इंग्लंडला परत गेल्यावर 'सुसंस्कृत व लोकशाहीच्या पुरस्कर्त्या' इंग्लिश नागरिकांनी ओडवायरचा सत्कार केला व २०,००० पौंडांची थैली त्याला त्याच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल दिली.
अश्या हरामखोर लोक्काना तर दगडाने ठेचून मारायला हव होत
असो...
जालियनवाला बाग हत्याकांडाच्या ९२ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली
13 Apr 2011 - 4:06 pm | नितिन थत्ते
हत्याकांडातील बळींना आदरांजली.
गप्प रहायचे ठरवले आहे.
13 Apr 2011 - 4:14 pm | मृत्युन्जय
सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली.
***** डायर साला. नरकात पण घेतला नसेल *****ला.
13 Apr 2011 - 4:31 pm | इरसाल
डोळे भरून आले.
जालियानवाला बागेत उभे राहून ती विहीर आणि ती भिंत जिच्यावर अजूनही चालवलेल्या गोळ्यांच्या स्मृती लाकडी चौकटीत सांभाळून ठेवल्यात ते पाहून शरीरावरील यच्चयावत काटे उभे राहतात आणि डोक्यालासुद्धा शहारे येतात.
हि आपली अवस्था पण त्यावेळेस तिथे जे असतील त्यांचे काय झाले असेल........................स्तब्ध.
13 Apr 2011 - 5:07 pm | चतुरंग
धारातीर्थी पडलेल्यांना श्रद्धांजली!
या दिवसाची आठवण ताजी ठेवल्याबद्दल सर्वसाक्षींचे आभार.
-रंगा
13 Apr 2011 - 5:12 pm | पंगा
माझ्या समजुतीकरिता विचारतो. हे लिहिताना आपण तुच्छता दर्शवत आहात का? असल्यास, चालू प्रथेस अनुसरून (आणि मनापासून) निषेध नोंदवतो.
बाकी जलियांवाला बाग हत्याकांडाच्या लेखाचा असले काहीतरी घुसडण्याच्या अजेंड्यासाठी उपयोग केल्याने हिंसेच्या तिरस्कर्त्या मानवतावाद्याचा अपमान वगैरे होत नाही, पण त्या हत्याकांडात बळी पडलेल्यांचा कदाचित होऊ शकत असावा, अशी शंका आम्हाला तरी येते बॉ. कल्पना नाही. कदाचित आमची चूक असेल. कोण जाणे, कदाचित कुठेही काहीही करून हिंसेचा तिरस्कर्ता मानवतावादी घुसडणे यालाच 'आमचे संस्कार' म्हणत असतील. काय आहे, आमच्यावर कोणी कधी 'संस्कार' वगैरे केले नाहीत, त्यामुळे 'संस्कार' कशाला म्हणतात, ते आम्हाला काय कळणार?
बाकी तुमचे चालू द्या. तसाही 'जलियांवाला बाग अमानुष हत्याकांड आणि त्यात पडलेले बळी' हा या लेखाचा केंद्रीय मुद्दा (किंवा उद्देश) असल्याचे वाटत नाही, त्यामुळे 'हत्याकांडात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली' वगैरे म्हणून मृतांचा झाला त्याहून अधिक अपमान करत नाही.
लेट द शो गो ऑन.
13 Apr 2011 - 11:16 pm | आनंदयात्री
हा हा हा !!
बुंद से जो गयी वो हौज से नही आती .. असला कायसासा पापी अकबराच्या सज्जन हिंदु मंत्र्याचा डायलॉग आठवला.
बाकी थत्तेकाका म्हणतायेत "काहीही न बोलायचे ठरवलेय", मोठ्यांचे ऐकणे हा संस्काराचाच एक भाग असल्याने मी थत्तेकाकांचे ऐकणार.
13 Apr 2011 - 5:18 pm | sagarparadkar
एखादी गोष्ट आम्हाला आणि आमच्या तथाकथित महात्म्याच्या प्रतिमेला आणि विचारधारेला गैरसोयीची असते तेव्हा आम्ही 'सोयीस्कर'पणे मौनव्रत बाळगतो ... :(
असले भंपक आणि नको तिथे व्यक्त केलेले निषेध फाट्यावर मारण्यात आले आहेत
13 Apr 2011 - 5:21 pm | नितिन थत्ते
गप्प रहायचे ठरवले आहे.
13 Apr 2011 - 6:09 pm | सर्वसाक्षी
थत्ते साहेब,
जाहिरात कशाला? हे स्थळ आपलेच आहे. बोलायचे तर बोला, गप्प राहायचे तर गप्प राहा:)
लोक सुजाण आहेत, त्यांना एकदा सांगुन समजते.
मात्र जर ही आपली नवी स्वाक्षरी असेल तर काही म्हणणे नाही, चालु द्या.
13 Apr 2011 - 11:39 pm | चिंतामणी
गप्प रहायचे ठरवले आहे.
गप्प रहायचे ठरवले आहे.
जाउ द्यात. लिहून टाका आणि मो़कळे व्हा.
13 Apr 2011 - 5:24 pm | यशोधरा
जालियनवाला बाग नरसंहारात बळी पडलेल्या समस्त हिंदुस्थानी नागरिकांना या घटनेच्या ९२ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली
13 Apr 2011 - 5:27 pm | पक्का इडियट
हुतात्म्यांना श्रद्धांजली !!
13 Apr 2011 - 5:30 pm | प्रियाली
ओह! हा मूळ अजेंडा आहे तर! बरे, बरे!
बाकी जालियांवाला बाग हत्याकांडाविषयी आणि वरील उद्धृताविषयी खेद व्यक्त करते.
13 Apr 2011 - 6:38 pm | चित्रा
कोण कुठले अनाम लोक एका माथेफिरूच्या गोळ्यांना बळी पडतात. आणि कमिशनतर्फे डायरला शिक्षा काय होते तर सेवेतून मुक्ती.
The Hunter Commission did not award any penal nor disciplinary action because Dyer's actions were condoned by various superiors (later upheld by the Army Council).[29] However, he was finally found guilty of a mistaken notion of duty and relieved of his command. स्त्रोत: http://en.wikipedia.org/wiki/Jallianwala_Bagh_massacre
असो.
हत्याकांडातील बळींना श्रद्धांजली. या दिवसांची आठवण अशासाठीच करायची की हे असे पुन्हा घडू नये याची आठवण रहावी.
बाकी काही वाक्यांमुळे मूळ आशय हरवून जातो. लक्ष भलतीकडेच जाते. मानवतावाद्यांनी काय करायला पाहिजे होते हे आता ९० वर्षांनंतर सांगता येत नाही.
ज्यांना लेखातील वाक्यांना आक्षेप घ्यायचा आहे त्यांनी तो का घेतात हेही स्पष्ट करणे जरूरीचे आहे. त्यासाठी उपहासाची गरज भासू नये. सर्वसाक्षी यांची मते पटतील न पटतील पण एवढे लक्षात ठेवावे लागेल की ते या विषयावरचे लेखन सातत्याने करतात. केवळ प्रतिसादांमधून हे लिहीत बसत नाहीत. तेवढा त्यांना तो विषय महत्त्वाचा वाटतो. ज्यांना उलटे काही एवढ्या तीव्रतेने सांगावेसे वाटते त्यांना माझे असे आवाहन आहे की त्यांनीही वेळ काढून आपली मते मांडण्यासाठी भलाबुरा काय तो एखादा लेखच लिहावा. प्रतिसादांमधून सारकॅजमखेरीज काहीच हाती लागत नाही, हे माझे मत. पटले पाहिजे असे नाही.
माझे विकीपीडिया पांडित्यः
जालियनवाला बागेच्या हत्याकाडाआधी एप्रिल १० रोजी सत्य पाल आणि सैफुद्दिन किचलू यांना ब्रिटिशांनी धरमशालेला पाठवून दिले होते. दोघेही म. गांधींचे अनुयायी होते. त्यांच्या अटकेसाठी प्रोटेस्ट करायला गेलेल्या जमावावर गोळीबार होऊन अनेक आंदोलनकर्ते लोक मरण पावले होते. त्यानंतर जमावाचा राग अनावर होऊन बँकांना आगी लागल्या, कार्यालये फोडली, आगी लावल्या गेल्या. एकंदरीत आंदोलन हिंसक झाले. पाच युरोपियन मारले गेले आणि याला प्रत्युत्तर म्हणून आठ ते वीस स्थानिक मारले गेले. १३ तारखेस अमृतसरमध्ये संचारबंदी होती. जालियनवाला बागेत अशा वेळी एवढ्या समुदायाने जमणे चुकीचे होते (ब्रिटीश कायद्याप्रमाणे). डायरने जमावबंदी इतर पद्धतींनी अंमलात आणली असती तर विशेष चूक नव्हती. पण त्याने काय जी स्टँडर्ड पद्धती असेल ती धाब्यावर बसवली. आणि जमावाला कसलीही सूचना न देता गोळीबार करण्याची आज्ञा दिली. एवढेच नाही तर बंदुकीच्या अनेक फैरी झाडल्या. हे सर्व माहिती असल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. हे सर्व सुरू झाले ते सत्या पाल आणि सैफुद्दिन यांच्यासाठी केलेल्या आंदोलनास हिंसक वळण लागले म्हणून. त्यामुळे नव्या आंदोलनातील हिंसेने केवळ व्यथित होऊन नव्हे तर हिंसेचे पर्यवसान कशात होऊ शकते हे माहिती असल्याने असे केले असावे असे वाटते. एका अर्थाने पूर्वीच्या चुकांमधून शिकण्याची पावती आहे. शोध घेतला तर अधिक माहितीही मिळेल असे वाटते.
13 Apr 2011 - 6:57 pm | प्रियाली
वरिल परिच्छेद आक्षेपार्ह आणि हास्यास्पदही आहे. मतभिन्नता आणि तिचे विविध पर्याय (इन्क्लुडींग सॅरकॅजम) चालत नाही की रूचत नाही याची कल्पना नाही. असो.
बाकी चालू द्या!
13 Apr 2011 - 10:06 pm | मराठी_माणूस
वरिल परिच्छेद आक्षेपार्ह आणि हास्यास्पदही आहे.
ह्यात हास्यास्पद काय आहे ते समजले नाही.
14 Apr 2011 - 4:47 am | चित्रा
मला चालतो. मी माझे मत पटले पाहिजे असे नाही असे म्हटले आहेच. त्यामुळे पटले नाही आणि वेळ वाचवण्यासाठी सारकॅजमचा आसरा सातत्याने घ्यावा असे केले तर त्याला मी काही करेन असे वाटत नाही.
परिच्छेद आक्षेपार्ह का वाटला हे समजले नाही. सर्वसाक्षी सातत्याने असे लेख लिहीतात. "असे" म्हणजे क्रांतिकारकांबद्दल आणि त्यांच्या लेखातून कधीतरी त्यांची तत्कालिन काँग्रेसी नेत्यांबद्दलची "एवढे झाले, पण ते काहीच बोलले नाहीत, उलट क्रांतीकारकांना त्रासच दिला" अशी भावना दिसली आहे. एखाद्या व्यक्तीचे आपल्याला पटत नाही, म्हणून तिचा उपहास (किंवा उपमर्द) करावा अशी इच्छा कोणाला झाल्यास मी काय करणार?
फक्त माझ्या माहितीप्रमाणे http://www.misalpav.com/node/5172 हे आधीही झालेले आहे. त्यातले प्रतिसाद पाहिल्यास कळून येईल की नक्की या सारकॅजमने काय साध्य होते? माझ्या मते काही नाही. उलट कायम असे दिसत आले आहे की अनेकदा प्रतिसाद हे फार पर्सनल होतात. म्हणून ज्यांना याबाबतीत सर्वसाक्षी चुकीचे (चुकीने किंवा मुद्दाम ठरवून) करत आहेत, असे वाटते अशांनी (माहितीपूर्ण) लेख लिहा असे सुचवले तर काय हरकत आहे? यात आक्षेपार्ह किंवा हास्यास्पद काय आहे? तरी प्रतिसाद काढला म्हणून हरकत नाही. पण माझे असे खरेच मत आहे की सर्व उत्तमोत्तम लिहीणार्यांनी जरूर असे लेखन करावे.
14 Apr 2011 - 5:17 am | प्रियाली
मिपावर असे अनेक लेखक आहेत ज्यांच्या लेखांना उपहासात्मक प्रतिसाद येतात. तुम्ही स्वतः अशाप्रकारचे प्रतिसाद या पूर्वी दिले असावेतच. शोधून काढण्याचा पेशन्स मला नाही पण तुम्ही मान्य कराल ही खात्री वाटते. उपहासात्मक प्रतिसाद कधी येतात? जेव्हा लेखक एकाच प्रकारचे लेख अनेकदा टाकतो किंवा चांदीच्या आवरणातून उगीच कडू गोळीचे डोस पाजतो किंवा त्याला समजावूनसुद्धा फारसा उपयोग नसतो, तो मतभिन्नता समजावून घेण्याचा प्रयत्नही करत नाही तेव्हा उपहास येतो कारण झोपलेल्या उठवता येते, झोपेचे सोंग घेतलेल्या उठवायचे कष्ट घेण्याची गरज नसते.
फार काही नाही, उद्या उदा. युयुत्सुंच्या लेखांसाठी किंवा चर्चांसाठीही अशीच भावना ठेवा म्हणजे झाले, तेही सातत्याने स्त्रीद्वेष्टे लेख आणि चर्चा टाकतात पण तुम्ही तसे कराल असे वाटत नाही (आणि त्याबद्दल अजिबात आक्षेप नाही) किंवा तुम्ही कधी कुणा लेखाचा उपहास केलाच नाही असेही वाटत नाही किंवा मिपावर तशी प्रथा आहे किंवा धोरण आहे असेही आठवत नाही तेव्हा "लक्षात ठेवा" वगैरेंसारख्या शब्दांनी सर्वसाक्षींच्या लेखाला "पेश्शल लेवल" असावी असे वाटल्याने हसू आले आणि विशिष्ट लेखासाठी असे सुचवणे आक्षेपार्हही वाटले. :)
कधीतरी? :) शक्य आहे. मागे एका पुण्यतिथीच्या लेखात पुण्यतिथी हा पहिल्याच परिच्छेदातील ढळढळीत शब्दही काही संपादकांना दिसला नव्हता असे आठवते तेव्हा आपल्याला "कधीतरी" वाटणारे इतरांसाठी "नेहमी "असे असू शकेल.
इथे बघा कोण पर्सनल झाले ते आणि ते अपेक्षितच होते. आपण विसरल्या का? सर्वसाक्षी जुने आहेत, मीही जुनी आहे, तुम्हीही जुन्या आहात आणि त्यांना समजवण्याचे प्रयत्नही जुनेच आहेत. गेल्या किती वर्षांचा इतिहास उगाळावा? कॉलिंग मिभो.....सॅरकॅजम हा निषेधाचा चांगला प्रकार आहे, विडंबने हाही आणखी एक प्रकार. कदाचित सॅरकॅजमने पालथ्या घड्यावर पाणी ओतल्याचे समाधान मिळत असावे आणि हे फक्त सर्वसाक्षींनाच लागू नाही तर इतर आडमुठ्या लेखकांनाही लागू आहे तेव्हा कृपया लोकांना धोरणात राहून जे करायचे ते करू द्यावे.
तुम्ही चांगल्या भावनेतून सांगितले असावे हे तुम्हाला जाणून असल्याने मान्य करते.
14 Apr 2011 - 7:54 am | चित्रा
माझ्या "लक्षात ठेवा" या शब्दावरून एवढा गैरसमज होईल असे वाटले नव्हते.
लक्षात घ्या असे म्हटले तर? किंवा असे बघा, असे म्हटले तर कमी झाला असता का? आणि कसली स्पेशल लेवल? सर्वसाक्षींना मी ओळखतही नाही. आणि आमचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष संपर्कही नाही. "विशिष्ट लेख"! हे असे म्हणण्यासारखे आहे की मला त्यांच्या विचारांबद्दल सहानुभूती आहे म्हणून मी त्यांना स्पेशल लेवल दिली.
ज्यांना लेखातील वाक्यांना आक्षेप घ्यायचा आहे त्यांनी तो का घेतात हेही स्पष्ट करणे जरूरीचे आहे. त्यासाठी उपहासाची गरज भासू नये. सर्वसाक्षी यांची मते पटतील न पटतील पण एवढे लक्षात ठेवावे लागेल की ते या विषयावरचे लेखन सातत्याने करतात. केवळ प्रतिसादांमधून हे लिहीत बसत नाहीत. तेवढा त्यांना तो विषय महत्त्वाचा वाटतो. ज्यांना उलटे काही एवढ्या तीव्रतेने सांगावेसे वाटते त्यांना माझे असे आवाहन आहे की त्यांनीही वेळ काढून आपली मते मांडण्यासाठी भलाबुरा काय तो एखादा लेखच लिहावा. प्रतिसादांमधून सारकॅजमखेरीज काहीच हाती लागत नाही, हे माझे मत. पटले पाहिजे असे नाही.
ही वाक्ये मुद्दाम अधोरेखित केली. माझा सर्व मुद्दा हा यावर लोकांनी वेगळे लिहावे यासाठी आहे हे स्पष्ट व्हावे.
मी कधीही उपरोध आणलेला नाही असे म्हणत नाही. पण मला क्रांतिकारकांच्याबद्दल तत्कालिन काँग्रेस नेत्यांचे काय मत होते असे सांगणारा एकही लेख आठवत नाही. दाखवून दिल्यास मी माझे शब्द आनंदाने मागेही घेईन. म्हणूनच मी प्रतिसाद नको, लेखच या विषयावर लिहा असे म्हटले आहे.
नाडीपट्टीवर घाटपांड्यांचे लेख आहेत. स्त्रीमुक्तीवरून आपल्या सर्वांच्या चर्चा झडल्या आहेत. अजून भविष्यावरून घाटपांड्यांचे लेख आहेत, उपक्रमावर बुवाबाजीवरून लेख आहेत. गांधीजी, आणि अनेक सामान्य स्वातंत्र्यसैनिकांवरून कुठे, किती, आणि काय लिहीलेले आहे?
मागे एका पुण्यतिथीच्या लेखात पुण्यतिथी हा पहिल्याच परिच्छेदातील ढळढळीत शब्दही काही संपादकांना दिसला नव्हता असे आठवते तेव्हा आपल्याला "कधीतरी" वाटणारे इतरांसाठी "नेहमी "असे असू शकेल.
नेहमी वाटत असले तर असा या मराठी संकेतस्थळावरचा लेख दाखवा की जेथे ह्या सर्व खर्या गोष्टी प्रतिवाद म्हणून नीट लिहील्या आहेत. प्रतिसादांमध्ये लोक जरा अधिक पर्सनल, खोचक, बोचरे, तिरसट होतात हे तुम्ही बहुदा नाकारणार नाही.
तसेच तुम्ही वरीलप्रमाणे म्हणत असलात तरी माझ्या माहितीप्रमाणे अजूनही संपादकच आहात. हे सर्व झाले तेव्हाही संपादकच होता. तरीही एवढ्या दिवसांनंतरही, आणि मधल्या काळात सगळे बोलणे होऊनही, नथुरामची पुण्यतिथी सारखा एखादा शब्द मिपावर राहतो कारण संपादकांच्या जाती असतील, असे मनात येणे किंवा राहणे, असे हे सर्व दुर्दैवी जाळे आहे. ते कसे दूर करायचे हे कळत नाही. कोणी आपल्या मनातील शंका दूर सारून पाहिले तर कदाचित वेगळे दृष्य दिसेल.
कृपया लोकांना धोरणात राहून जे करायचे ते करू द्यावे.
कृपया म्हणण्याची गरज नव्हती. मी कुणाला धोरणात काही चुकले आहे असे म्हणत नाही, शिवाय माझ्या बोलण्याकडे लक्ष देणारे लोक जगात आहेत असा माझा गैरसमज अजिबात नाही. :)
तुम्ही चांगल्या भावनेतून सांगितले असावे हे तुम्हाला जाणून असल्याने मान्य करते.
धन्यवाद.
14 Apr 2011 - 3:51 pm | प्रियाली
बाकीचे सर्व खरडवहीत नेणे योग्य ठरेल पण आपण हा जो विषय जाहीर केलात त्याच्याशी तीव्र असहमती आहे. ती येथे मांडते.
संपादक असणे हा माझा नाइलाज आहे. ही घटना जेव्हा घडली त्यापूर्वीच आणि आजही मी संपादकीय कामांतून रजा मागितली/ घेतली होती/ आहे. तसे संपादक मंडळ आणि मालकांसमोर स्पष्टही केले होते. तरीही उगा संपादक म्हणून संबोधणे मला पसंत नाही हे येथेच स्पष्ट करते. असो. त्यावेळीही मी विधायकरित्या संपादक मंडळाकडे तक्रार केली होती. त्यावेळी आपण मला "त्या लेखात असे काही दिसलेच नाही" असे उत्तर दिलेत. मी आपल्याला शब्द दाखवून दिले तेव्हा आपण "ओह! मला आधी दिसले नव्हते, मी मिस केले." असे म्हणून नंतर दुर्लक्ष केलेत. मी त्यानंतर कितीवेळ पाठपुरावा किंवा मिन्नतवार्या करत बसायचे होते. मिसळपाव संपादकांना हे सर्व चालते आणि त्याला त्यांचा पाठिंबा आहे असा मी निष्कर्ष काढला.
आता तो एक शब्द राहिला असे म्हणून जाती वगैरे आहेत म्हणण्याला फारसा अर्थ नाही.
14 Apr 2011 - 4:13 pm | चित्रा
तुम्ही संपादकांबद्दलचा संशय जाहीररित्या व्यक्त केला म्हणून तसे जाहीर लिहावे लागले.
लेखातील पुण्यतिथी हा शब्द मला दिसला नाही हे मी तेव्हाही स्पष्ट लिहीले होते. बाकीचे खरडवहीतून चर्चा करणे योग्य ठरेल ह्याच्याशी सहमत आहे.
24 Apr 2011 - 10:18 am | पंगा
(शीर्षकाबद्दल पु.लं.च्या आत्म्याची आगाऊ माफी मागून.)
अमान्य असलेले मतही लोकांना मांडण्याची शक्य तितकी संधी देणे हे वस्तुतः प्रगल्भतेचे लक्षण ठरावे, परंतु त्याला काही पूर्वावश्यक बाबींची पूर्ती होणे आवश्यक आहे.
सर्वसाक्षींच्या शब्दयोजनेबद्दल लटकी नापसंती व्यक्त करणारे ("गांधी आणि नथुराम यांच्याबद्दल आपल्या भावना काहीही असोत, परंतु त्या 'गांधीवध' आणि 'नथुरामपुण्यतिथी' म्हणण्याची मुभा देतात असे वाटत नाही" अशा छापाचे) एखादे साधे विधान जरी आपण अगोदर ठेवून दिले असतेत, तरी 'गांधीवध' आणि 'नथुरामपुण्यतिथी'च काय, परंतु 'गांधी जोकर होते' अशा स्वरूपाचे एखादे विधानसुद्धा जरी त्या लेखात किंवा त्यावरील प्रतिक्रियांत आले असते, तरी त्याबद्दल आपण कोणतीही कारवाई न करणे हे कदाचित सहजी खपून जाऊ शकले असते, किंवा, कोण जाणे, कदाचित ('अमान्य असलेले मतही लोकांना मांडण्याची शक्य तितकी संधी देण्याची प्रगल्भता' म्हणून) तोंड भरभरून प्रशंसेचेही धनी होऊ शकले असते. पण या महत्त्वाच्या पूर्वअटीच्या पालनात आपल्याकडून हेळसांड झाली. दुर्दैवाने आपला अभ्यास कमी पडला, असेच आता म्हणावे लागते.
निदान आता तरी अभ्यास वाढवावा, असे या निमित्ताने (मिपाच्या परंपरेस अनुसरून) आपणांस अत्यंत विनम्रपणे सुचवू इच्छितो.
आपल्या यापुढील संपादकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
इत्यलम्|
13 Apr 2011 - 7:41 pm | sagarparadkar
>> त्यांच्या अटकेसाठी प्रोटेस्ट करायला गेलेल्या जमावावर गोळीबार होऊन अनेक आंदोलनकर्ते लोक मरण पावले होते. ....
म्हणजे हिंसेची सुरुवात नक्की कोणी केली? आंदोलकांनी की दमनचक्रप्रेमी इंग्रजांनी ? माझ्या समजुतीनुसार किमान हे आंदोलक तरी अहिंसेच्या मार्गानेच आंदोलन करत होते.
>> त्यानंतर जमावाचा राग अनावर होऊन बँकांना आगी लागल्या, कार्यालये फोडली, आगी लावल्या गेल्या. एकंदरीत आंदोलन हिंसक झाले. पाच युरोपियन मारले गेले आणि याला प्रत्युत्तर म्हणून आठ ते वीस स्थानिक मारले गेले.
स्वाभाविकच आहे ...
>> डायरने जमावबंदी इतर पद्धतींनी अंमलात आणली असती तर विशेष चूक नव्हती. पण त्याने काय जी स्टँडर्ड पद्धती असेल ती धाब्यावर बसवली. आणि जमावाला कसलीही सूचना न देता गोळीबार करण्याची आज्ञा दिली. एवढेच नाही तर बंदुकीच्या अनेक फैरी झाडल्या. हे सर्व माहिती असल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.
अनेक तर्हेच्या माध्यमांतून ह्या जालियनवाला हत्याकांडाबद्दल जी माहिती मिळाली आहे त्यानुसार 'स्टँडर्ड पद्धती' मधे गोळीबार करताना जमावाच्या फक्त पायांवर किंवा त्या पातळीवर गोळ्या लागाव्यात असे नियम ब्रिटीश राज्यात देखील होते म्हणे ...
पुढे आता कुठे जाणार? एकूणच हे सर्व निरुपण 'त्यांचंही बरोबर आहे आणि तुमचंही चूक नाही' अशा पद्धतीच्या अनंतकाळासाठी निष्कर्षविरहित ठरणार्या मार्गाने जातंय असं वाटतं.
>> हे सर्व सुरू झाले ते सत्या पाल आणि सैफुद्दिन यांच्यासाठी केलेल्या आंदोलनास हिंसक वळण लागले म्हणून. त्यामुळे नव्या आंदोलनातील हिंसेने केवळ व्यथित होऊन नव्हे तर हिंसेचे पर्यवसान कशात होऊ शकते हे माहिती असल्याने असे केले असावे असे वाटते. एका अर्थाने पूर्वीच्या चुकांमधून शिकण्याची पावती आहे.
परत तोच मुद्दा: त्या आंदोलनाला हिंसक वळण कोणी लावले. आंदोलकांनी कि इंग्रजांनी. ह्यातून आपल्याला नक्की काय अभिप्रेत आहे हेच स्पष्ट होत नाहिये.
बरं ह्या सर्व प्रतिसादातून आपल्याला असं म्हणायचं होतं का की आधीच्या आंदोलनांना हिंसक वळण लागलं म्हणून डायरने भारतीयांना धडा शिकवण्यासाठी हे हत्याकांड घडवून आणलं? व म्हणून ते समर्थनीय होतं ? आणि म्हणून अहिंसेच्या पुजार्यांनी त्याला हिंसा मानलंच नाही? तसं असेल तर ठीक आहे, आम्हाला काय ते कळलंच आहे म्हणा ...
14 Apr 2011 - 4:57 am | चित्रा
अनेकदा तुमचेही बरोबर आणि आम्हीही चूक नाही असेच असते. :)
गोळीबाराने शेकडो सिविलियन मरणे हे कोणत्याही परिस्थितीत योग्य वाटणार नाही.
जालियनवाला हत्याकांड कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नव्हते हे मात्र माझे मत रेकॉर्ड करते.
सुरूवात इंग्रजांनीच केली. वर जे लिहीले आहे हे सर्व अशासाठी लिहीले होते की पुढील आंदोलन हिंसक वळण लागताच का थांबवले याची कारणे कळावीत. इंग्रजांचे समर्थन करण्यासाठी नव्हे.
14 Apr 2011 - 6:32 pm | पंगा
त्यापेक्षा, सर्वसाक्षीच का नाही 'गांधी किती वैट्ट्ट्टट्ट्ट्ट, वैट्ट्ट्टट्ट्ट्ट, वैट्ट्ट्टट्ट्ट्ट, वैट्ट्ट्टट्ट्ट्ट, वैट्ट्ट्टट्ट्ट्ट, दुष्ष्ष्ष्ट!!!!!! होते' असा वेगळा, भलाबुरा लेख लिहून टाकत एकदाचा, त्यांना तो विषय एवढाच महत्त्वाचा वाटतो, त्याबद्दल एवढे तीव्रतेने सांगावेसे वाटते तर? दर वेळी कुठल्या ना कुठल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या नाहीतर हत्याकांडाच्या लेखात असले काहीतरी घुसडून देण्याऐवजी?
किंवा, असे केले तर? सर्वसाक्षींना 'गां. किती वै., वै., वै., वै., वै., दु.!!!!!! होते' हेही सांगायचे आहे, आणि कुठल्या स्वातंत्र्यसैनिकाबद्दल किंवा हत्याकांडाबाबत त्यांनी काय केले किंवा काय नाही, याचा त्या अनुषंगाने संदर्भही द्यायचा आहे (थोडक्यात 'गां.च्या पापांचा पाढा वाचायचा' आहे), तर मग ते 'गां. किती वै., वै., वै., वै., वै., दु.!!!!!! होते' या विषयावरच स्वतंत्र लेख लिहून त्यात गां.च्या पा.चा मुद्देसूद आणि सविस्तर पा. का वाचत नाहीत? एवढ्या लेखमालिकेऐवजी एका लेखात काम भागून जाईल. उगाच त्याकरिता इतक्या स्वातंत्र्यसैनिकांना वेठीस कशासाठी धरायचे?
असा जर का त्यांनी लेख लिहिला, तर मग (१) त्या एकाच लेखाकडे पूर्ण दुर्लक्ष करता येईल, किंवा (२) त्या लेखातील गांधीविरोधी मुद्द्यांवर एकाच लेखात काय तो विचारविनिमय करता येईल. (मग हा विचारविनिमय 'ठीक आहे, आपण गांधींची समाधी उन्हात बांधू, हं!' अशा स्वरूपाचा असला तरी.)
बाकी,
'आपले वकीलपत्र कोणी घ्यावे' असे गांधींनी मृत्युपत्रात लिहिल्याचे (किंवा पोस्टह्यूमसली तसे कोणाला सांगितल्याचे) ऐकिवात नाही. सबब गांधींच्या बाजूने मते, मुद्दे वगैरे सविस्तर लिहिण्याकरिता स्वतंत्र लेख लिहिण्यात हशील किंवा तसे प्रयोजन नाही. विरोध आहे तो ओढूनताणून गांधीद्वेषाचा अजेंडा जिथेतिथे नाही नाही तिथे घुसडायला. यात गांधींचे यत्किंचितही समर्थन करण्याचा प्रयत्न नाही. (गांधींचे प्रत्येक बाबतीतले वागणे योग्य होते की अयोग्य याबाबत वैयक्तिक मते काहीही असली तरी. ती प्रत्येकाची वेगळी असू शकतात, कोणाला गांधींबद्दल आदर असू शकतो तर कोणाला द्वेष असू शकतो. तो ज्याचात्याचा मामला आहे. शिवाय, - हे या ठिकाणी अवांतर आहे, पण - गांधींबद्दल नितांत आदर असणाराससुद्धा गांधींचा प्रत्येक विचार किंवा प्रत्येक कृती पटतेच किंवा पटलीच पाहिजे, असेही काही नसते. त्या दृष्टीने खुद्द गांधी वगळल्यास कोणीही गांधीवादी नसतो. किंवा, 'शेवटचा - आणि एकमेव - ख्रिस्ती क्रूसावर मेला'च्या धर्तीवर, 'शेवटचा - आणि एकमेव - गांधीवादी छातीवर गोळ्या खाऊन मेला', असे या निमित्ताने सुचवावेसे वाटते.)
तर, सांगण्याचा मुद्दा, सर्वसाक्षींना गांधींबद्दल आदर वाटावा की द्वेष वाटावा, आणि कोणत्या कारणांकरिता वाटावा, हा पूर्णपणे त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी तो व्यक्त केला तर त्याबद्दल - किंवा त्याविरुद्ध - प्रतिक्रिया - आणि त्याही जिथे व्यक्त करतील तिथे, जिथल्यातिथे - न येण्याची अपेक्षा करता येणार नाही. हुतात्म्यांच्या किंवा हत्याकांडाच्या धाग्यात त्यांच्या गांधीविरोधाविषयी प्रतिक्रिया येणे अपेक्षित नसेल, तर हुतात्म्यांच्या किंवा हत्याकांडाच्या धाग्यात त्यांनी गांधीविरोध आणू नये - त्याकरिता स्वतंत्र लेख लिहावा. इतर कोणाची तशी अपेक्षा नसेल तर त्यांनी सर्वसाक्षींना तसे सुचवावे. पण जिथे गांधीविरोध घुसडणार, प्रतिक्रिया तिथेच येणार - हम प्रतिक्रिया वहीं लिक्खेंगे - याहून वेगळी अपेक्षा करू नये.
14 Apr 2011 - 6:39 pm | टारझन
गप्प बसायचे ठरवले आहे .
- घेतिन पंगे
13 Apr 2011 - 6:41 pm | रामदास
अस्मितेचा विसर पडू नये म्हणून वेळोवेळी असे लेख वाचणे मला आवश्यक वाटते.
13 Apr 2011 - 11:22 pm | आनंदयात्री
परफेक्ट. लेख आवडला आणि प्रतिसाद डोळे उघडणारा.
13 Apr 2011 - 7:10 pm | पुष्करिणी
हुतात्म्यांना श्रद्धांजली !!
लेख लिहून आठवण करुन दिल्याबद्दल सर्वसाक्षींचे आभार
13 Apr 2011 - 7:36 pm | नगरीनिरंजन
मृतात्म्यांना व उधमसिंहांना पुन्हा एकदा श्रद्धांजली. आमची अहिंसा ही भेकडांची अहिंसा नाही हे सगळ्या जगासमोर अत्यंत वीरोचित पद्धतीने दाखवून दिल्याबद्दल उधमसिंग यांचे भारतीयांवर अनंत उपकार आहेत. बस्स. याउप्पर कोणी बोलो किंवा गप्प राहो काहीही फरक पडत नाही.
13 Apr 2011 - 7:43 pm | यशोधरा
+१
13 Apr 2011 - 7:49 pm | sagarparadkar
>> मृतात्म्यांना व उधमसिंहांना पुन्हा एकदा श्रद्धांजली. आमची अहिंसा ही भेकडांची अहिंसा नाही हे सगळ्या जगासमोर अत्यंत वीरोचित पद्धतीने दाखवून दिल्याबद्दल उधमसिंग यांचे भारतीयांवर अनंत उपकार आहेत. बस्स. याउप्पर कोणी बोलो किंवा गप्प राहो काहीही फरक पडत नाही.
१०००००००००००००००००००००००% सहमत
सिंहाच्या अहिंसेला किंमत असणार ... एखादं बकरीचं पिल्लु त्याच्या तावडीत सापडलं व म्हणलं कि मी अहिंसावादी आहे तर तू मला खाऊ नकोस, तर परिणाम काय होणार ?
अर्थात स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची सर्व आंदोलनं ही विधायक व अहिंसक पद्धतीनीच व्हावीत असं मला तरी वाटतं. कारण ह्या परिस्थितीत 'दोन्ही' बाजूस 'आपलीच' माणसं असणार आहेत, मालमत्ता देखील ह्या ना त्या मार्गाने आपलीच असणार आहे. ह्या बाबतींत गांधींच्या विचारांशी पूर्णपणे सहमत आहे.
14 Apr 2011 - 12:10 am | मृत्युन्जय
+१००१
14 Apr 2011 - 3:53 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे. मला अहिंसेवरून टार्याच्या झेब्रा स्पिरीट ची आठवण झाली.
13 Apr 2011 - 7:47 pm | मुक्तसुनीत
१. मृतात्म्यांना श्रद्धांजली
२. हिंसेचा निषेध.
३. दिवंगतांची स्मृती जागी ठेवल्याबद्दल धागाकर्त्याचे आभार.
४. प्रस्तुत स्मृतीपर धाग्याचा वापर विरुद्ध विचारसरणीवर दुगाण्या झाडण्याबद्दल धागाकर्त्याबद्दल तीव्र आक्षेप.
13 Apr 2011 - 7:53 pm | सुनील
चारही प्रतिक्रियांशी सहमत.
14 Apr 2011 - 12:15 pm | बिपिन कार्यकर्ते
+२
अनावश्यक मजकूरामुळे लेखनाला कमीपणा आला आहे असे वाटते.
14 Apr 2011 - 2:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत आहे.
14 Apr 2011 - 4:19 pm | धमाल मुलगा
अनुल्लेखानेच मारले पाहिजे होते. किंमत ती किती द्यायची?
14 Apr 2011 - 9:15 pm | आनंदयात्री
अगायायायाया =)) =)) =)) =))
__/\__ दंडवत रे धम्या तुला !!
15 Apr 2011 - 10:29 am | टारझन
आबॉबॉबॉबॉबॉ बॉबॉबॉबॉ बॉबॉ =)) =)) =)) =))
आंद्या भाड्या .. .कसल्या तुफान प्रतिक्रीया देतोस .. हसुन हसुन मेलो .. परत जिवंत झालो .. आणि परत मेलो ..
आरारारा ..
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
आंद्या एकदम फुल्टु फार्मात .. :)
असो , आता गप्प रहायचे ठरवले आहे :)
-संध्यानंदयात्री
13 Apr 2011 - 8:21 pm | चिगो
मृतात्म्यांना आणि शहीद उधमसिंगांना मनःपुर्वक श्रद्धांजली...
बाकी अहिंसेबद्दल म्हणाल तर शाळेत वाचलेल्या ह्या ओळी आठवतात.
"क्षमा शोभती उस भुजंग को, जिसके पास गरल हो
उसको क्या, जो दंतहीन, विषरहीत विनित, सरल हो"..
13 Apr 2011 - 8:24 pm | कलंत्री
जालियानवाला येथे जे काही घडले त्याने कोणत्याही सुसस्कृत माणसाला लाजच वाटेल.
भारतीयांच्या मध्ये या नरसंहारामूळे एकता निर्माण झाली आणि या साठी लागणारे कारण ब्रिटीशांनी सर्व भारतीयांना पुरवले.
गांधी आणि त्यांच्या सहकार्याचे मत काय होते हे समजले असते तर बरे झाले असते. कदाचित त्यांनी याचा पुरस्कार केला नसावा असे माझे मत आहे.
सर्वसाक्षीमध्ये असलेली श्रद्धा, सातत्य आणि चिकाटी याबद्दल विशेष आदर वाटतो.
13 Apr 2011 - 11:09 pm | आत्मशून्य
सहीष्णू भारताचं कीत्येक शतकांच दूर्दैव म्हणायच. आणखी काय, प्रतीशोध म्हणून तसाच एखादा प्रसंग इतरांवर लादत नाही ,तोपर्यंत जरब बसणार नाही पून्हा कोणाची डोळे वटारून बघायची.
Accidents don't happen to people who take accidents as a personal insult.” - Mario Puzo
14 Apr 2011 - 12:27 am | भडकमकर मास्तर
प्रतीशोध म्हणून तसाच एखादा प्रसंग इतरांवर लादत नाही ,तोपर्यंत जरब बसणार नाही पून्हा कोणाची डोळे वटारून बघायची.
तसाच प्रसंग लादायचा?
इतरांवर म्हणजे कोणावर ?
डोळे वटारून कोणाची बघायची जरब(?) बसणार नाही?
आपली अस्मिता दर्शवायच्या आपल्या पद्धतीने ड्वॉले पानावले. ....
ईश्वर आपणास सद्बुद्धी देवो....
14 Apr 2011 - 5:00 am | आत्मशून्य
कारण शतकों शतके सैतानाने दीलेल्या सदबूध्दीची आता कीव करावीशी वाटते आहे. मला म्हणायचे आहे दूसर्याच्या जमीनीवर जाऊन रक्ताची होळी खेळायची गरज आहे, आपल्याच भूमीवर न्हवे. नीशस्त्र व नीरपराध्यांना ठार कारावे असा संदेश माझ्या वीधानातून नीघत असल्यास त्यात वरील दूरूस्ती सूचवतो. पण हो कोलॅटरल डॅमेज हे होणारच फक्त ते यापूढे आपल्यादेशांच्या नागरीकांबाबत नको. आतापर्यंत झाले ते भरपूर आहे.
13 Apr 2011 - 11:37 pm | चिंतामणी
___/\___
14 Apr 2011 - 7:31 am | शिल्पा ब
बळी गेलेले निरपराध नागरीक अन उधमसिंग यांना श्रद्धांजली.
बाकी अहिंसेच्या पुजार्यांनी याबाबतीत काय प्रतिक्रिया दिली होती याची माहीती करुन घ्यायला आवडेल. नाही एवढी चर्चा चाललीचए म्हणुन विचारलं.
14 Apr 2011 - 11:04 am | टारझन
अहिंसेच्या पुजार्यांचे अनुयायी मिपावर हल्ली जास्त दिसत नाही . फक्त ठराविक लेखांना आणि प्रतिक्रीयांना त्यांचे ठराविक उपहासात्मक प्रतिसाद असतात असा आमचा अजकालचा अभ्यास ( पक्षी : निरिक्षण) सांगतो .
तेंव्हा तुमच्या ह्या मागणीवर कोणी विचार करावा असा तुमचा समज असेल तर तो काढुन टाकावा , असा एक आगाऊ कम भोचक सल्ला , मानलाच पाहिजे असे नाही ;)
बाकी प्रतिसाद वाचुन मनोरंजन झालेच : )
- (तोतला सेठ ) अहिंशा पुजाली
14 Apr 2011 - 10:48 am | मदनबाण
सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली आणि हुतात्मा उधमसिंह यांना मानाचा मुजरा...
आपल्या हिंदुस्थानात हुताम्यांना काडीची किंमत नाही हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे, आदर्श ने तर सर्वच आदर्शांचे विक्रम मोडले !
हुतात्मा उधमसिंग यांचा नातु मोल मजदुरी करुन आपले पोट भरतो हे वास्तव पाहुन, का या योद्यांनी आपले प्राण मातॄभूमीसाठी त्यागले असावे ?असा प्रश्न मनात आला.(संदर्भ :--- http://www.mid-day.com/news/2011/apr/140411-news-delhi-Freedom-fighter-U... )
उपेक्षित शहिदांच्या कुंटुंबियांवर एक अख्खे पुस्तकच निघाले आहे.
काय मिळाले शहिदांच्या कुटुंबियांना या देशात ? ज्यांच्यामुळे आज स्वतंत्र हिंदुस्थानात आपण मोकळा श्वास घेउ शकतो त्यांचा विसर आपल्या जनतेला पडला आहे, आणि राजकारण्यांनी त्यांची दरवळी चेष्टाच केली आहे... :(
(शहिदांच्या कुटुंबियांना या देशात मिळणार्या वागणुकीने व्यथित झालेला)
14 Apr 2011 - 4:25 pm | धमाल मुलगा
कौतुक वाटतं तुमचं!
ज्या नेटानं तुम्ही अशा घटना/क्रांतीकारक जे सोयीस्कररित्या आणि पध्दतशीररित्या समाजाच्या स्मृतीतून मागे ढकलले आहेत त्यांची आठवण करुन देण्याचं काम करता, त्याबद्दल आदर वाटतो.
पण अहो साहेब, कुणापुढे करताय हे? आमची पोटं तट्ट भरली आहेत, आता खरकट्या बोटांनी ताटात रेघोट्या मारायच्या आहेत.. स्फुलिंगं वगैरे शब्दही कळत नाहीत आम्हाला! नपुंसक झालो आहोत!
मेकॉलेप्रणित विचारप्रदुषणाच्या शिक्षणातून बाहेर पडणारे आम्ही कारकुनी मनोवृत्तीचे पित्तू ह्या तुमच्या प्रयत्नांना कसं बरं धडपणे चालू देऊ?
अहो, पिढ्यांन् पिढ्यांचा इतिहास आहे आमचा, जरा कुणि चांगलं काही करायला लागलं की आम्ही धावणारच त्याचे पाय ओढायला! तुम्ही कशाला कष्ट घेताय?
14 Apr 2011 - 6:56 pm | sagarparadkar
अहो ध. मु. आपल्या लेखनातून भावना पोहोचल्या, पण परिस्थिती एव्हढी पण वाईट नाहिये.
>> मेकॉलेप्रणित विचारप्रदुषणाच्या शिक्षणातून बाहेर पडणारे आम्ही कारकुनी मनोवृत्तीचे पित्तू ह्या तुमच्या प्रयत्नांना कसं बरं धडपणे चालू देऊ?
दोन उदाहरणं देतो:
१. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात भाग घेतलेले नानासाहेब पेशवे हे त्यावेळच्या 'कॉन्व्हेंट' शाळेत शिकत होते, त्यांचा सांभाळ काही मिशनर्यांनी केला होता असं मी बी.बी.सी वरील एका माहितीपटांत पाहिलं. अर्थात "तरीही ते ऐनवेळेला इंग्रजांच्या बाजूने उभे राहिले नाहीत" असा काहिसा खेदाचा सूर त्या माहितीपटात जाणवला होता. (आणि मला एक भारतीय म्हणून असुरी आनंद झाला होता :) )
२. भाजप चे जुने जाणते नेते लालकृष्ण आडवानी हे देखील कराचीत 'कॉन्व्हेंट' शाळेत शिकले होते. त्यांच्या राजकारणाबद्दल अनेकांचे विरोधी मत असू शकेल, पण मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीचं अपयश दाखवून द्यायला ही दोनच उदाहरणं पुरेशी आहेत.
शिवाय तुम्ही आणि मी पण त्याच पद्धतीत शिकलो की ! आपण कुठे कारकूनी 'होयबा' बनलो ? हा मागील २/३ पिढ्यांबद्दल म्हणाल तर काही सन्माननीय अपवाद वगळता माझं मत फारसं चांगलं नाही :)
14 Apr 2011 - 5:59 pm | सर्वसाक्षी
ज्यांनी अपले सर्वस्व देशाला अर्पण केले त्यांचे स्मरण करुन देणे, त्यांचे ध्येय, कार्य व समर्पित जीवन सर्वांसमोर मांडणे इतके तरी आपण त्यांच्या साठी नक्कीच केले पाहिजे. क्रांतिकारकांचे कार्य जर अप्रकाशित वा दुर्लक्षित ठेवले गेले असेल तर नुसती नाराजी व्यक्त करण्यापेक्षा जे आपल्याला समजले, सापडले ते इतरांपुढे मांडणे हे मी माझे कर्तव्य समजतो. कुणाला आवडते कुणाला आवडत नाही. ज्याची त्याची विचारसरणी, प्रत्येकाला आपले मत असते आणि असावेच, त्यात गैर काय?
करेना का कुणी खोटे आरोप, करेना का कुणी निंदा, मला काय फरक पडतो? मी नामवंत वगैरे नसल्याने मला बदनामीची भीती नाही. आणि निषेधांनी हतोत्साह होऊन जर मी लेखन थांबवेन अशी कुणाची समज असेल तर तो चुकीचा आहे. माझ्या धाग्याला फाटे फोडणे वा आरोप करणे इत्यादीं प्रकारे मला लेखनापासुन परावृत्त करायचा आणि क्रांतिकारकांना सातत्याने अंधारातच ठेवायचा जर कुणाचा मनसुबा असेल तर तो सफल होणार नाही. केवळ आम्हाला थोर वाटतात तेच नेते योग्य, त्यांचेच काय ते बरोबर, तेच महान, तेच रास्त तेच देव आणि स्वातंत्र्य मिळाले ते त्यांच्याच मुळे, आणि सत्य असले तरीही त्यांना बाधक असा कुठलाही उल्लेख कुणी करायचा नाही या मानसिकतेतुन जर टिका होत असेल तर त्याटिकेची दखल घेण्याची गरज नाही.
दुर्दैवाने इतिहास हा जेते लिहितात. सरकारी प्रचार यंत्रणेने केवळ निवडक व राज्यकारभार ताब्यात ठेवायला सोयीचे व उपयुक्त अशा नेत्यांचाच प्रचार केवळ हेच काय ते 'स्वातंत्र्याचे जनक' असा सातत्याने केला आहे. आज आम्हाला अनेक हुतात्म्यांची, क्रांतिकारकांची नावे देखिल माहित नाहीत, त्यांचे कार्य, त्यांची विचारसरणी माहित नाही. अशा परिस्थितीत जर कुणी अथक परिश्रमाने माहिती जमविली असेल व ती माझ्या वाचनात आली तर ती इतरांना देणे हे माझे कर्तव्य आहे. ज्यांना वाचायची ते वाचतील, नाही वाचायची ते नाही वाचणार. मात्र चार जणांनी जरी त्या क्रांतिकारकांविषयी काही वाचले, त्यांना ते रुचले व त्यांनी आणि चार जणांना सांगितले तर त्या महान क्रांतिकारकांसाठी ती आदरांजली ठरेल. मी संशोधक नाही, विद्वान तर अजिबात नाही, माझी भूमिका ही पाणक्याची आहे - कुठेतरी दूरवर कुण्या पुणवंताने साचविलेले पाणी सर्वांना उपलब्ध असलेल्या हौदात आणुन ओतणार्या पाणक्याची.
14 Apr 2011 - 6:08 pm | यशोधरा
सर्वसाक्षीजी, आपण लिहित रहा, वाचायला आवडते आणि वर रामदासकाकांनी का वाचायचे हे सांगितलेच आहे.
14 Apr 2011 - 6:35 pm | सहज
शाळेत असताना आमचे एक शिक्षक श्री दि. दा. जोशी आपल्या जोशपूर्ण आवाजात अतिशय प्रेरणादायी अश्या अनेक क्रांतीकारकांच्या अतुलनीय शौर्य व त्यागाच्या कथा ऐकवत. बहुतेक वेळा सरांसकट आम्हा विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी यायचे. माझ्या शालेय जीवनातील ही एक न पुसली जाणारी आठवण आहे. शाळा सुटल्यानंतर इतक्या वर्षांनी प्रथम इथे जालावर सर्वसाक्षी हे क्रांतीकारकांचे कार्य व समयोचीत स्मरण इतके छान सांगत आहेत त्याबद्दल सर्वसाक्षी यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच.
नि:शस्त्र, सशस्त्र सर्वच स्वातंत्र्यसैनीकांच्या बलीदानांमुळे व कार्यामुळे आजच्या स्वतंत्र भारतात सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले आहे (व लोकं त्याचा पुरेपूर वापर करत आहेत) त्यांनी भारताच्या सर्व स्वातंत्रसैनिकांबदल आदर ठेवावा व किमान श्रद्धांजली, जयंतीला जे धागे निघतील त्यात जरी कोणाला न पटणारे विचार असतील तरी (बायकोची मर्जी सांभाळणे / बॉसची- डेडलाईन, क्लायंटची रिडीझाईन मान्य करणे/ खुट्ट होताच जागे होणार्या लहान मुलांची नाजुक झोप मोडू नये अश्या लेव्हलचा) संयम ठेवावा इतकेच म्हणतो.
14 Apr 2011 - 8:41 pm | निनाद मुक्काम प...
सर्व प्रथम सर्व शहिदांना माझे नमन
ह्या निमित्ताने एक खुपणारी गोष्ट लिहितो .
आपल्याकडे क्रांतिकारक आजच्या पिढीत प्रादेशिक अस्मितेत अडकून पडले .
म्हणजे आज माझ्या पंजाबी मित्रांमध्ये उधम सिंह व माझ्या मनात चाफेकर आदराचे स्थान मिळवून आहेत .दुर्दैवाने चाफेकारांविषयी माहिती पंजाबात जेवढी लोकांना आहे तेवढीच माहिती महाराष्ट्रात उधम सिंह ह्यांच्या विषयी आहे .
सावकारांचे कार्य जेवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात माहिती आहे तेवढेच बोस ह्यांचे बंगाल मध्ये .
खुद्द बोस ह्यांची भूमिका साकारणारे सचिन खेडेकर ह्यांनी खुपते मध्ये प्रांजळ कबुली दिली की त्यांना बोस विषयी फारसे माहित नव्हते ( महानायक वाचण्यापूर्वी नेताजी ह्यांनी अनिवासी भारतीय जे त्यावेळी सिंगापूर व जपान व इतरत्र आहेत त्यांच्याकडून देशासाठी किती मोठा निधी मिळवला तोही त्या काळात ही माहिती मिळाली )
बाकी डायर व उधम सिंह ह्यांच्या विषयी विचार करतांना मला
मुशरफ ह्यांचे एक विधान आठवते '' एका देशाचा स्वातंत्र्य सैनिक दुसऱ्या देशात दहशतवादी असतो ''
उधम सिंहाच्या कृत्याची अनेक तत्कालीन भारतीय थोर नेत्यांनी निंदा केली .
त्यांच्या अश्याच धोरणामुळे त्यांच्या नशिबी अंदमान वारी आली नाही .
त्यांना भारतात राहू देणे इंग्रज सरकारच्या सोयीचे होते
15 Apr 2011 - 11:14 pm | पक्या
जालियनवाला बाग हत्याकांडात बळी पडलेल्या सर्व नागरिकांना या घटनेच्या ९२ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली !! शहीद उधमसिंह यांना विनम्र अभिवादन आणि श्रद्धांजली
सर्वसाक्षीजी , लेख छान झाला आहे. कुठलाही उल्लेख अनावश्यक वाटला नाही.
असेच अजून लेखन वाचायला आवडेल.
अवांतर - मध्यंतरी २०१० मध्ये आलेला आशुतोष गोवारीकरचा 'खेले हम जी जानसे' सिनेमा पाहिला. आवडला. ह्या सिनेमामुळे माहित नसलेल्या सुर्ज्या सेन या क्रातिकारकाची आणि त्यांनी केलेल्या चितगाँग लढ्याची माहिती मिळाली.
16 Apr 2011 - 10:41 am | सर्वसाक्षी
पक्याभाऊ,
'खेले हम पाहुन जर चितगांव च्या रोमहर्षक पर्वाविषयी खरेखुरे जाणुन घ्यायचे असेल तर मास्टरदांचे सहकारी श्री. अनंत सिंह यांच चितगाँग हिरोज हु फॉट फॉर फ्रिडम' वाचा. (वि.स. वाळिंबे यांनी याचा सुरेख असा मराठी अनुवाद केला आहे - 'कथा ही दिवा वादळाची'; याचे परिक्षण मी 'पुस्तकविश्व.कॉम' च्या दिवाळी अंकात दिले होते)
धन्यवाद