अक्षय पात्र

ajay wankhede's picture
ajay wankhede in जे न देखे रवी...
11 Apr 2011 - 1:15 pm

तु मला अजुनहि जानलं नाहिस
कारण तुझा स्वभाव च तसा आहे
त्याला मि तरि काय करु.
मि तर भरभरुन देतो...
तुला घेता च येत नाहि ,
त्याला मि तरि काय करु.
मि देता देता थकत नाहि,
पण तु घेता घेता च थकतेस,
त्याला मि तरि काय करु.
मि तुला देतो ते हि तुला आवडत नाहि,
मि तिला देतो ते हि तुला आवडत नाहि.
कारण तुझा स्वभाव च तसा आहे..
त्याला मि तरि काय करु.
मि तुला तिला सर्वानाच देतो ...
तरि माझं पात्र रिकामं होत नाहि.
मि सदैव त्रुप्त तु सदैव अत्रुप्त .
आज मि तुला माझं अक्षयपात्र च देतो..
ते तरि तु निस्वन्शयि मनाने घे.
नि मि जसा देतो तसं तु भरभरुन दे.

शृंगारकरुणशांतरसकविता

प्रतिक्रिया

मुलूखावेगळी's picture

11 Apr 2011 - 1:33 pm | मुलूखावेगळी

वा
मि तुला देतो ते हि तुला आवडत नाहि,
मि तिला देतो ते हि तुला आवडत नाहि.

नि मि जसा देतो तसं तु भरभरुन दे.
ह्या ओळी मस्तच
कविता पेक्षा मुक्तक वाटत आहे आणि आशय चांगला आहे
आता तुम्ही बी मिपा कवि संघटनेचे सभासद झालात.
अभिनंदन

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

11 Apr 2011 - 2:19 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

खरचं आशय चांगला आहे. मांडणी सुधारलीत तर अजुन वाचनीय होईल.

निनाव's picture

12 Apr 2011 - 1:26 am | निनाव

मि का नां अनुमोदन.

कविता सुरेखच.

गणेशा's picture

12 Apr 2011 - 2:57 pm | गणेशा

येवुद्या आनखिन