(चाल : नाच नाचुनी अति मी दमले -)
वाच वाचुनी अति मी दमले -
विटले रे कवितेला !
कविता-लेखन तुज न झेपले ,
निमुटपणा ना कसला !
आजच कचरा-कुंडी-स्थानी
सफाईवाला आला !
निरुपयोगी कविता-कागद
रद्दी घातली त्याला !
विषय आज ना काही सुचेना ,
अती ताप तो झाला !
अजब तुझ्या त्या छंदापायी ,
सुसंवाद ना घडला !
रोख मानधन... नाही काही -
मजवर राग का धरला ?
स्वत: दुजांच्या घेता फिरक्या -
अंगलटी त्या आल्या !
कवितेतील मज काव्य कळेना...
कागद वाया गेला !
अंधारी ही डोळ्या पुढती -
जीव वाचना भ्याला !!
प्रतिक्रिया
10 Apr 2011 - 11:36 am | पैसा
:) जमलंय!
10 Apr 2011 - 11:48 am | प्रीत-मोहर
मस्त :)
11 Apr 2011 - 3:43 pm | ५० फक्त
विदेश, राग मानु नका, पण विडंबन जर गाण्याचं करत असाल तर ते विडंबन मुळ गाण्याच्या चालीत म्हणता यावं ही अपेक्षा. आणि तुम्ही गाणं पण एकदम जबरदस्त निवडलंय. विडंबन पण त्याच ताकदीचं आलं असतं तर अजुन मजा आली असती.