कथाकाराची कैफियत!

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
11 May 2008 - 12:31 am

अलिकडेच मिपावर 'अब्दुल खान' लिहीलं. चार भागात विखुरलेलं असूनही वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रत्येक भागाची शेकडो वाचनं झाल्याची नोंद झाली. मिपावरच्या मित्रमैत्रिणींनी अगदी हातचं काही न राखता मनापासून कौतुक केलं. खूप खूप बरं वाटलं. काही वाचकांनी 'क्रमशः' बद्द्ल गोड तक्रारीही केल्या. पण त्या पुढचं वाचायच्या उत्सुकतेपोटी असल्याने त्याचं काही वाटलं नाही. एका नवोदित ललित लेखकाला सुरवातीच्या लिखाणालाच अशी शाबासकीची थाप पाठीवर पडली की त्याला किती हुरूप येतो हे शब्दांत मांडता येण्याजोगं नाही.

एकदा असाच, मला वाटतं तिसरा की चवथा भाग लिहीत होतो. विचारांची लिंक अगदी मस्त लागली होती. झराझरा पुढची वाक्यं सुचत होती. डोक्यातल्या विचारांचा पाठलाग करतांना टाईप करत असलेली बोटं थकत होती....

आणि इतक्यात आमचे चिरंजीव जवळ आले,

"डॅडी, व्हेन कॅन वुई गो फॉर स्विमिंग?"

हे कार्टं अगदी अमेरिकन होत चाललंय. त्याला सगळं मराठीबिराठी येतं, अगदी स्तोत्र आणि श्लोकांसकट! पण आईबापांशी मराठीतून बोलेल तर शपथ!! भारतातून आजी-आजोबा किंवा इतर नातेवाईक आले, अथवा आम्ही मुंबईला गेलो तर सगळ्यांशी व्यवस्थित मराठी बोलतो, पण आईबापांशी? रामा शिवा गोविंदा!!

"ए गपरे! मी काम करतोय!" आमचा द्वैभाषिक संवाद सुरू झाला...
"बट ऑल यू आर डूईंग इस रायटींग इन मराठी" स्क्रीनकडे नजर टाकत तो म्हणाला.
"तेच! मी मराठी कथा लिहीतोय!"
"कथा मीन्स स्टोरी? व्हाय?"
"मला मिसळ-पावच्या साईटवर द्यायची आहे"

तो थोडा थांबला. काहीतरी डोक्यात चालू होतं. मग पुन्हा विचारतो कसा,

"डॅडी, कॅन आय आस्क यू अ क्वेश्चन?"
"आता नाही, मग! आता मी लिहीतोय, दिसत नाही का?"
"बट इट इज रिलेटेड टू धिस..."
"बोला.."
"प्रॉमिस मी, यू वोन्ट गेट अँग्री..."
"हं..."

"इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?"

मी त्याच्याकडे बघतच राहिलो. काय बोलावं तेच मला सुचेना. इतक्यात पाठीमागून आवाज आला...

"हा, हा, हा, हा, हा!!!'

बघतो तर माझ्याबरोबर आयुष्य घालवण्याचं वचन दिलेली ती दुष्ट स्त्री पाठीमागे उभी राहून खदाखदा हसत होती...

"वा, वा, क्या बात है!! बडे मियां तो बडे मियां, छोटे मियां सुभानल्ला!!" ती आनंदातिशयाने चीत्कारली!!

"नुसत्या मिपावर मिळणार्‍या शाबासक्यांनी फुशारून जाऊ नकोस! खरा लेखक असशील तर हाही अनुभव मिपावर लिहीशील!!" तिने खिजवलं.

फक्त तिची जिरवण्यासाठी ही गोष्ट प्रामाणिकपणे आणि अत्यंत दु:ख्खद अंतःकरणाने इथे लिहीत आहे...

सालं, पिकतं तिथे विकत नाही हेच खरं!!

देशांतरविनोदअनुभव

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

11 May 2008 - 12:56 am | केशवसुमार

डांबिसशेठ,
पिकतं तिथे विकत नाही हेच खरं.. =D>
पटलं..बोलती बंद..काय ही आज कालची पिढी... :W
(पिकवतो ?? तिथे न विकणारा)केशवसुमार
(स्वगतःपिकतं तिथे विकत नाही हे बरोबर की पेरलं तेच उगवतं हे बरोबर) :?

गणपा's picture

11 May 2008 - 2:01 am | गणपा

"इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?" :O :O
मानल बॉ तुमच्या लेकाला.
आमच्या मुखातुन अस काही बाहेर पडल असत तर पिताश्रींनी श्रीमुखात हाणुन भर दिवसा तारे जमिनं पर आणले असते. @) @)
बाकी पिकतं तिथे विकत नाही हे खरंच :))
-गणपा.

मुक्तसुनीत's picture

11 May 2008 - 2:01 am | मुक्तसुनीत

तुमच्या मुलाला सलाम . तुमचा हा लेख वाचत होतो. त्याने तुम्हाला विचारलेला प्रश्न मी मला स्वतःला विचारला आणि मला जाणवले की आपल्या स्वतःच्या मिपासारख्या स्थळांवरच्या वावराची कारणे ,काही थोड्या अंशानी का होईना , पण त्याने विचारलेल्या प्रश्नामधे आहेतच. त्या सत्याचा स्वीकार मी आजवर इतक्या सहजपणे केला असेल - नसेल ; पण एखाद्या सर्जनच्या सहजतेने आणि नेमकेपणे केलेल्या कट् प्रमाणे हा प्रश्न वाटला.

प्रश्न विचारला जाण्याची सिच्युएशन प्रचंड विनोदी आहेच , पण त्यातील वर्मसुद्धा अगदी नेमके आहे !

ताक : पोट्टा आहे तरी किती वर्षांचा !! ??

पक्या's picture

11 May 2008 - 4:53 am | पक्या

"इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?"

पोराने प्रश्न अगदी बरोबर विचारला आहे.

अरुण मनोहर's picture

11 May 2008 - 6:01 am | अरुण मनोहर

पिवळ्या डांबीसा, लेखक लोकांच्या दुखत्या नसेवर हात ठेवलास की रे दुष्टा.
पण बरेही वाटले. समदु:खी लोकांची हळह्ळ वाचून आपले दु:ख थोडे सुसह्य होते.
मिपाचा प्लॅटफॉर्म हे दु:ख वाटून घेण्यास मदत करीत आहे.
आणखी लिखाण करत जा. आम्ही आवडीने वाचू.

सहज's picture

11 May 2008 - 6:39 am | सहज

माईक टायसन व फ्रँक ब्रुनो यांच्या एक सामना झाला त्यात माईक टायसन ने ९१ सेकंद मधे ब्रुनो ला नॉक आउट केले होते. लहान पणी आम्ही भावंडे कोणाचा असा पचका झाला की ब्रुनो झाला / केला म्हणायचो ते आठवले. :-)

तुमच्या मुलाने त्या पेक्षाही कमी सेकंद घेतले की ;-)

बघतो तर माझ्याबरोबर आयुष्य घालवण्याचं वचन दिलेली ती ...खदाखदा हसत होती...
बाकी तुम्ही आमचे "साडू" दिसता.

आनंदयात्री's picture

12 May 2008 - 12:29 pm | आनंदयात्री

ठिक आहे आता आपण मिपाकर पिडां झाला / केला म्हणत जाउ :))

पिडां का हलकेच घ्या पण पोरगं लै भारी, उद्या त्याने मी, माझा बाप अन त्याचे मिसळपाववरचे उद्योग असे पुस्तक लिहले तर नवल वाटायला नको :)

सन्जोप राव's picture

11 May 2008 - 6:59 am | सन्जोप राव

कोणतेही संकेतस्थळ हे एक आभासी माध्यम आहे आणि तिथे मिळणारी स्तुतीसुमने वगैरे ही अगदी तकलादू, बेगडी असतात. ती फार लावून घ्यायची नसतात, हेच अधोरेखित करणारा अनुभव. मिपा आणि मिलाक्रा - फार फरक नाही. त्यामुळे 'मनात आणिन तर बच्चमजी - पन्नास प्रतिसाद मिळवणे मला काही अवघड नाही' हे फुशारकी जितकी पोकळ, तितकेच प्रतिसाद न मिळाल्याचे वैषम्यही. छोकर्‍याने हे बरोबर ओळखले. मनात आणील तर तत्वज्ञानाचा उत्तम प्राध्यापक होईल!
अवांतरः अमेरिकेत रहाणार्‍यांना आपल्या मुलांना श्लोक आणि स्तोत्रे येतात, हे आवर्जून सांगण्याची गरज का वाटत असावी? बाटलेला मुसलमान हा जास्त कडवा असतो असे यालाच म्हणतात काय? अब्दुल खानालाच विचारले पाहिजे!

सन्जोप राव

पिवळा डांबिस's picture

11 May 2008 - 9:51 am | पिवळा डांबिस

अमेरिकेत रहाणार्‍यांना आपल्या मुलांना श्लोक आणि स्तोत्रे येतात, हे आवर्जून सांगण्याची गरज का वाटत असावी?
कदाचित अशासाठी असावं की त्यांनी अमेरिकेत रहायचा निर्णय घेतल्यापासून ते कसे मराठी राहिलेले नाहीत व त्यांच्या मुलांमध्ये मराठी संस्कृती कशी नाही हे त्यांनी इतकं (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष) ऐकलेलं असतं की कदाचित ते आधीच हे सांगून मोकळे होत असावेत! त्या वेड्यांना हेही कळत नाही की श्लोक आणि स्तोत्रे येणे हे सद्यकालीन स्थानिक मराठी माणसाचे आवश्यक लक्षण राहिलेले नाही.
अंधारातच वावरतायत बेटे!!:)

राजे's picture

12 May 2008 - 5:30 pm | राजे (not verified)

कोणतेही संकेतस्थळ हे एक आभासी माध्यम आहे आणि तिथे मिळणारी स्तुतीसुमने वगैरे ही अगदी तकलादू, बेगडी असतात. ती फार लावून घ्यायची नसतात, हेच अधोरेखित करणारा अनुभव. मिपा आणि मिलाक्रा - फार फरक नाही. त्यामुळे 'मनात आणिन तर बच्चमजी - पन्नास प्रतिसाद मिळवणे मला काही अवघड नाही' हे फुशारकी जितकी पोकळ, तितकेच प्रतिसाद न मिळाल्याचे वैषम्यही. छोकर्‍याने हे बरोबर ओळखले.

सहमत १००%
=D> =D> =D>

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

भडकमकर मास्तर's picture

11 May 2008 - 7:21 am | भडकमकर मास्तर

"इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?"
हाहाहा =)) =)) =))
बाटलेला मुसलमान हा जास्त कडवा असतो असे यालाच म्हणतात काय? अब्दुल खानालाच विचारले पाहिजे!

B) B)

प्रभाकर पेठकर's picture

11 May 2008 - 8:49 am | प्रभाकर पेठकर

"इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?"
वय काय हो तुमच्या चिरंजीवांचे? नाही.... घास जरा मोठाच वाटतो आहे, म्हणून विचारले.

बघतो तर माझ्याबरोबर आयुष्य घालवण्याचं वचन दिलेली ती दुष्ट स्त्री पाठीमागे उभी राहून खदाखदा हसत होती...
ह्हा: ह्हा: ह्हा: ! हे बाकी ग्रेट.

सालं, पिकतं तिथे विकत नाही हेच खरं!!
लाख मोलाची बात. सालं! हृदय पिळवटून वगैरे जातं!

विसोबा खेचर's picture

11 May 2008 - 8:55 am | विसोबा खेचर

बघतो तर माझ्याबरोबर आयुष्य घालवण्याचं वचन दिलेली ती दुष्ट स्त्री पाठीमागे उभी राहून खदाखदा हसत होती...

हा हा हा! तरी सांगत होतो, की लग्न करू नकोस म्हणून!

बाकी अणुभव मस्त! :)

आपला,
(एकेकाळी एका बलाढ्य (एकेकाळी बलाढ्य असलेल्या! ;) ) अश्या आभासी संस्थळावर पन्नास प्रतिसाद अगदी सहज घेतलेला आणि त्यामुळे अनेकांना उगीचंच अस्वस्थ केलेला एक आभासी लेखक!) तात्या अभ्यंकर.

--
तात्या म्हणे आता उरलो शब्दकोड्यापुरता!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 May 2008 - 9:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डांबीसराव,
काय वडा केला राव तुमच्या लेकरानं तुमचा :)
बाकी मीपाच्या स्क्रीन समोर बसल्यावर कितीतरी हितशत्रु डोकावत असतात हे बाकी खरं आहे. ;)

बघतो तर माझ्याबरोबर आयुष्य घालवण्याचं वचन दिलेली ती दुष्ट स्त्री पाठीमागे उभी राहून खदाखदा हसत होती...

हाहाहाहा हे लै भारी !!!

यशोधरा's picture

11 May 2008 - 10:47 am | यशोधरा

>>> "इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?"
:D

>>> ती दुष्ट स्त्री पाठीमागे उभी राहून खदाखदा हसत होती...
:))

डांबिसकाका, तुमचा मुलगा आणि त्याची आई मला तर लैच आवडले की!! :D

मन's picture

11 May 2008 - 3:10 pm | मन

आपले चिरंजीव अगदिच (आपल्याहुनही)भन्नाट दिसताहेत.!
:-) :-)) :-))
यापुढे आपल्या हरेक लिखाणाबरोबरच त्याचं कारट्यानं केलेलं परिक्षण ही प्रसिद्ध करावं.
(त्यो हरेक लेखाची त्याच्या ष्टायलित झडति घेनार आनि)सगळ्यांची ह. ह. पु. वा. होणार आनि ह. ह. मु .व.

काय?
मग कधी बनवताय त्याला मिपाकर?

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

चतुरंग's picture

11 May 2008 - 5:33 pm | चतुरंग

मुलं आपल्या आई-बापाची खरी परीक्षक असतात! बर्‍याच वेळा आई-बापांनी कितीही आणि कसंही चित्र उभं केलं तरी त्याचित्राला बिनदिक्कतपणे नख लावून, त्यावरचा रंग खरवडून, आतला खरा कॅनव्हास कसा आहे हे ती अत्यंत थेट आणि कोणताही मुलाहिजा न ठेवता तुमच्या-आमच्या समोर टाकतात! ते पचवायचं धैर्य असेल तर आपण त्यांच्या नजरेत वरचं स्थान मिळवतो आणि ती आपल्या अधिक जवळ येतात.

आपल्या चिरंजीवांनी हेच केले. ह्या प्रसंगात त्याचं वय मला महत्त्वाचं वाटत नाही कारण कोणत्याही वयात मुलं वेगवेगळ्या प्रकारे पडदाफाश करु शकतात! ;)

फक्त तिची जिरवण्यासाठी ही गोष्ट प्रामाणिकपणे आणि अत्यंत दु:ख्खद अंतःकरणाने इथे लिहीत आहे...
सालं, पिकतं तिथे विकत नाही हेच खरं!!

हे मात्र मला पटले नाही. हे दु:खद अंतःकरणाने नाही तर एका वेगळ्या आनंदाने लिहिले जायला हवे! ह्यात पिकते तेथे न विकण्याचा संबंध नाहीच उलट परखडपणा आहे. वास्तवाची इतकी थेट जाणीव आपल्याला कोण देऊ शकते? हे माझं मत.

चतुरंग

देवदत्त's picture

11 May 2008 - 6:09 pm | देवदत्त

"इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?"
किती वर्षांचा आहे तो? माझ्या लेखात असलेही प्रकार टाकावे म्हणतो ;)

फक्त तिची जिरवण्यासाठी ही गोष्ट प्रामाणिकपणे आणि अत्यंत दु:ख्खद अंतःकरणाने इथे लिहीत आहे...
सालं, पिकतं तिथे विकत नाही हेच खरं!!

खरं आहे, पण त्याचा फायदाही होतोच की हो. :) पिकलं तिथेच विकले गेले तर भाव जास्त वाढणार नाही ना.

विजुभाऊ's picture

11 May 2008 - 6:59 pm | विजुभाऊ

बघतो तर माझ्याबरोबर आयुष्य घालवण्याचं वचन दिलेली ती दुष्ट स्त्री पाठीमागे उभी राहून खदाखदा हसत होती...

बर्रोब्बर .....मला शन्का होती ती बरोबरच आहे.
बरेच दिवस वाटत होते की तुम्ही सगळे प्रतिसाद कोणाच्या तरी नजरेच्या धारेखाली लिहिता :)
::::तुमच्याच सारखा एक दु:ख्खी खी खी खी खी ( हे दु:खाचे एको आहेत) विजुभाऊ

वेदश्री's picture

12 May 2008 - 3:43 pm | वेदश्री

व्हेन कॅन 'कथाकार' गो फॉर स्विमिंग ( विथ हिज सन )?

विजुभाऊ's picture

12 May 2008 - 5:27 pm | विजुभाऊ

व्हेन कॅन 'कथाकार' गो फॉर स्विमिंग
ऍन्ड डू समथिंग फॉर हिज गरमी !

पिवळा डांबिस's picture

12 May 2008 - 7:48 pm | पिवळा डांबिस

ओ डागतर इजुभाऊ,
"उकाडा" म्हना, "उष्मा" म्हना!!
उगाच "गरमी" शबूद वापरून पब्लिकला भलतेच डाउट घ्यायचा चानेस कशाला द्येताय राव?
(स्वगतः तुमच्यासारक्या जंटलमेन लोकान्ला आमी मराटी शिकिवायचं म्हनजे काय!):)