रात्रीचं पांघरूण किती छान असतं
सर्व काही कसं निवांत असतं
असतं आतुन अलगद ऊबदार
मात्र, वर वर कसं गार असतं
झोपायची घाई असतेच कुणाला
ते स्वप्न पडायचं एक दार असतं
अजुनच बहरते रात्र सांगु? जेंव्हा
चंद्र तुझ्या सारखं गोरं पान असतं
तु सोडले असावे केस मोक़ळे
असाच काहिसा भास असतं
एकटेपणाची सोबत लागते गोड
तारुण्याचं बोलकं पान असतं
मारतं मग कुणी चांदण्यांशीच गप्पा
तीच समोर असा ठाम विश्वास असतं
रात्रीच्या पांघरुणात एक मात्र कमाल असतं
अंधारात तिचं यौव्वन कसं साफ दिसतं
तु कुठे दिसली, काय बोलली, हसली
सगळ्याचं रिपीट टेलिकास्ट असतं
रात्रीचं पाघरुण असंच लाजवाब असतं
सगळ्या वयाला एकसमान असतं
सडा पडतो रात्री तिच्या सुगंधा चा मनी
म्हणून तर रातराणीचं झाड असतं
रात्रीचं पांघरूण किती छान असतं
सर्व काही कसं निवांत असतं
असतं आतुन अलगद ऊबदार
मात्र, वर वर कसं गार असतं...
प्रतिक्रिया
24 Mar 2011 - 11:10 am | प्रकाश१११
निनाव - छान कविता जमलीय . आवडली..!!
24 Mar 2011 - 11:15 am | नगरीनिरंजन
>>चंद्र तुझ्या सारखं गोरं पान असतं
तुम्हाला 'चांदणं तुझ्या सारखं गोरं पान असतं' असं म्हणायचंय का? की 'चंद्र तुझ्या सारखा गोरा पान असतो' असं म्हणायचंय?
या वाक्यामुळे कविता कानडी माणसाने लिहील्याचा आभास झाला.
25 Mar 2011 - 4:01 am | निनाव
न. नि. : :)
तुम्ही मस्त पकडलंत. काल कविता अर्धवट सोडली होती, आज पुर्ण केली आहे..
- आ. निनाव.
24 Mar 2011 - 2:05 pm | ज्ञानराम
खूप छान
24 Mar 2011 - 3:48 pm | कच्ची कैरी
कविता छान लिहिली आहे पण अजुन थोडी मोठी हवी होती मजा आली असती .
25 Mar 2011 - 3:47 pm | गणेशा
खुप खुप आवडली कविता ..मनापासुन .. पुन्हा वाचाली खुपच छान वाटली ...
कालच कविता वाचली होती.. अर्धवट , निटशी वाटली नव्हती .. आवदली नव्हती म्हणुन रिप्लाय केला नव्हता.. आज सहज पाहिले तर अरेच्चा .. नविन कडवी अॅड झालेली ..
मजा आली सगळॅ वाचताना .. काही ओळी तर अप्रतिम एकदम मनात घर करणार्या आहेत ..
असेच लिहित रहा .. वाचत आहे ..
26 Mar 2011 - 1:13 am | आत्मशून्य
- वा वा!
27 Mar 2011 - 11:38 am | वैशाली .
"तु कुठे दिसली, काय बोलली, हसली
सगळ्याचं रिपीट टेलिकास्ट असतं"
बरोब्बर!! :)
27 Mar 2011 - 11:39 am | वैशाली .
"तु कुठे दिसली, काय बोलली, हसली
सगळ्याचं रिपीट टेलिकास्ट असतं"
बरोब्बर!! :)