चतुर सरदार.

utkarsh shah's picture
utkarsh shah in जनातलं, मनातलं
18 Mar 2011 - 2:42 pm

एक सरदार रोज भारत पाक सिमा ओलांडुन स्मगलिंग (तस्करी)करत असल्याची खबर पाकिस्तानी पोलिसाला कळते.सरदार रोज आपल्या मोटारसायकलवरुन १ पोते भरुन माती घेउन जात असतो.पोलिसाला दाट संशय येतो कि त्या पोत्यातच काहीतरी गडबड असणार, तो खुश होतो.मग पोलिस सरदारच्या मागावार राहुन त्याला चेकनाक्यावर अडवतो.

सरदारची पुर्ण झडती घेण्यात येते, पण त्याच्याकडे माती सोडून काहीच सापडत नाही.

आणि माती घेउन जाण्यात काही गैर नसल्याने त्याला सोडण्यात येते.

हाच क्रम बरेच दिवस चालतो.पण तो सरदार काही पोलिसांना ताकास तुर लागु देत नाही.नंतर तो पोलिस निव्रुत्त (Retire) होतो.

एक दिवस मग त्या पोलिसाला सरदार भेटतो, आणि विचारतो, "सच बता दोस्त, मुझे पक्का मालुम है, तु smuggling करता है. लेकिन कैसे ये अभि तक मै भी नही जान सका.मुझे सिर्फ इतना बता दे मै किसी से नहि कहूंगा..."

सरदार,- "ओये, मै तो सरदार हू लेकीन तुम तो पुलिसवाले होके भी मुझे पकड नही सके. बेवकुफो, मै रोज पाकिस्तान से मिट्टी लाता था. लेकीन जिस मोटरसायकल पे लाता था, वो चोरी की हुआ करती थी."

आपण पण बरेच वेळा असेच करतो. छोट्याछोट्या गोष्टींसाठी मोठ्या गोंष्टीकडे डोळेझाक करतो. आणि त्या पोलिसासारखे पुर्ण आयुष्य मुर्खासारखे शोधत राहतो.कधी सुख शोधत राहतो, कधी पैसा, कधी मित्र-मैत्रिण, कधी प्रमोशन आणि कधी अजुन इतर काही.

बर्‍याच वेळेला आपल्याला कळत नाही , की आपण किती सुखी आहोत. कधी भिकार्‍यांकडे पाहिल्यावर आपल्याला कळते,

अरेच्चा आपण खरच किती सुखी आहोत. Cancer ग्रस्त लोकांकडे पाहिल्यावर आपण नकळत सुखावतो की मी नाहिये त्यांच्यातला एक. आणि तेवढ्यापुरते देवाचे आभार मानुन मोकळे.

आणि परत आपल्या रहाट गाडग्याला जुंपुन मोकळे.

कधी आपल्या स्वतासाठी एक सुट्टी काढलिय? फक्त फिरायला जायचय म्हणुन नव्हे तर आज मला माझ्यासाठि वेळ हवाय म्हणुन्.स्वतासाठी म्हणजे फक्त मी आणि मी.स्वताशीच बोलण्यासाठी.स्वतासोबत हसण्यासाठी, जुन्या आठवणी परत उकरुन काढण्यासाठी. हा अनुभव शब्दात व्यक्त नाही करता येत्.आणि ज्यांना असे अनुभव कधीच येत नाहीत त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना उरते ती फक्त न भरून येणारी पोकळी.

विनोदमुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

एकदम बरोबर बोललात भाऊ .. मस्त विचार .. पटलेत.

आयला सही आहे. एकदम मन मोकळे झाले. आणि सरदार पण अक्कलवंत असतात हे दाखवून दिले.

- पिंगू

धुमकेतू's picture

18 Mar 2011 - 5:55 pm | धुमकेतू

खूप छान रूपक कथा !
एकदम आवडली आपल्याला :) धन्यवाद

टारझन's picture

18 Mar 2011 - 6:28 pm | टारझन

लाइक

नरेशकुमार's picture

19 Mar 2011 - 5:03 am | नरेशकुमार

गुड

शिल्पा ब's picture

19 Mar 2011 - 5:14 am | शिल्पा ब

छान किस्सा. बाकी स्वत:शी बोलायचं म्हणजे नेमकं काय ? आणि कशाबद्द्ल? जुन्या आठवणी चांगल्या असतील तर उकरण्यात मजा!!! नाहीतर सुट्टी घेउन डोक्याला शीण व्हायचा ;)

पर्नल नेने मराठे's picture

20 Mar 2011 - 6:07 pm | पर्नल नेने मराठे

हे करा ;) मन्सोक्त हिण्दा फिरा !!!

chuchu

टारझन's picture

20 Mar 2011 - 8:32 pm | टारझन

सावली थोडी विचित्र नाही वाटत ?

-(सावली अभ्यासक) पावली

धमाल मुलगा's picture

21 Mar 2011 - 4:51 pm | धमाल मुलगा

हल्लीच्या तापत्या उन्हामुळं 'सनबर्न' झालं तर?

शिल्पा ब's picture

21 Mar 2011 - 11:03 pm | शिल्पा ब

काय पुण्यात असं फिरणार का सनबर्न व्हायला?

श्री गावसेना प्रमुख's picture

19 Mar 2011 - 10:21 am | श्री गावसेना प्रमुख

छान(सुखी मानसाचा सदरा माझ्या कडे आहे पण मी तो कुणालाच देणार नाही)

VINODBANKHELE's picture

20 Mar 2011 - 7:48 pm | VINODBANKHELE

ओय सरदार

लय भारी.....

जागु's picture

21 Mar 2011 - 3:40 pm | जागु

छान लिहिल आहेस.

RUPALI POYEKAR's picture

21 Mar 2011 - 4:37 pm | RUPALI POYEKAR

छान छान