शनिवार-रविवारी काय करायचं हा एक मोठ्ठा प्रश्न पुण्यातच चुटकीसरशी सुटतो. The King's Speech बघायचं ठरलं आणि आश्चर्य म्हणजे घराजवळच्या ई-स्क्वेअरमधे सोयीच्या वेळेत तो दाखवतही होते. पिक्चरच्या वेळेच्या वीस मिनीटं आधी जाऊन तिकीटही मिळाली. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्कूटर पार्किंगमधे नेण्याआधी त्यांनी पिलियन रायडरला उतरवला, मला हेल्मेट काढायला लावलं, अॅक्टीव्हाच्या सीटखालची डिकी उघडून पाहिली (हँडलमधली महत्त्वाची नसावी), आणि मगच पार्किंगमधे सोडलं. दीडचा शो वेळेतच, बरोब्बर एक वाजून सदतीस मिनीटांनी सुरू झाला. सगळं कसं, आलबेल! पिक्चर संपला आणि मी खुर्चीतून उठताना स्वतःच्याच खिशात हात घातला, किल्ली नाही. झोळीत टाकली असेल म्हणून झोळीत हात घातला, तिथेही नाही. अंधारात दिसणार नाही, चालता चालता चाचपडताना मी धडपडेन म्हणून खाली उतरल्यावर पाहिलं किल्ली नाही. "आता स्कूटर गेली असणार, इथून घरी जायचं तर रिक्षा कुठे मिळेल, बस मिळेल का, पुढचे दोन-तीन महिने सायकल चालवावी" वगैरे विचार आधीच करून झाला. तरी एकदा खात्री करण्यासाठी पार्किंगमधे आले. नक्की कुठे स्कूटर ठेवली होती हे आठवेना, तर तिथल्या माणसाने "हो, इथेच होती तुमची स्कूटर. नंबरप्लेट पहा," असा सूज्ञ सल्लाही न मागताच दिला. चालण्याचा थोडा व्यायाम केल्यावर स्कूटर दिसली आणि स्कूटरलाच ठेवलेली किल्लीही! जिथे जशी लावली होत्या तिथेच स्कूटर आणि किल्ल्या, दोन्ही तशाच होत्या!
असं काही घडलं की आनंदाने मन अगदी भरून जातं. आणि निव्वळ, पुढचे दोन महिने सायकल चालवावी लागणार नाही, पोलिस चौक्यांचं पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावं लागणार नाही, विसरभोळे म्हणून आपल्यावर व्यक्तीगत टीका होणार नाही इतका स्वार्थी विचारच त्यामागे नसतो. त्याही पलिकडे काहीतरी जाणवतं. हे जग सुंदर आहे असं वाटायला लागतं. माणसाच्या माणूसकीवर पुन्हा एकदा विश्वास ठेवावासा वाटतो. 'आज फिर जीने की तमन्ना है' सारखी गाणी खरोखर मनाला भिडतात. हे फक्त पुण्यातच घडू शकतं.
तुम्हालाही पुण्यात मला आलेत तसे चांगले अनुभव आले असतील.
o. तर कृपया ते चांगले अनुभवच लिहीणे.
o. आपसातल्या भांडणांसाठी कृपया या धाग्याचा वापर करू नये, हा मुंबईच्या चाळीतला नळ नव्हे.
o. पुण्याबद्दलचा धागा असला तरी पुणेरी रिक्षावाल्यांचा माजोरीपणा हा या धाग्याचा विषय आहे असं समजू नये.
o. पुणेरी पाट्याही प्रेमळ असू शकतात याची कृपया जाणीव ठेवावी.
o. 'आयपीएल'च्या पुणेरी पाट्या, आमचे रा.को. छोटा डॉन यांनीच लिहीलेल्या आहेत तेव्हा त्यांचा संदर्भ वापरताना निदान डान्रावांचा ॠणनिर्देश असावा.
प्रतिक्रिया
14 Mar 2011 - 6:21 pm | आत्मशून्य
.
14 Mar 2011 - 6:48 pm | नितिन थत्ते
हा त्या पुस्तक खरेदीवरचा उतारा दिसतोय.
14 Mar 2011 - 7:51 pm | रेवती
अगदी हेच टंकायला आले होते.
15 Mar 2011 - 6:08 pm | राजेश घासकडवी
थत्तेकाका व रेवतीकाकूंसारख्या मान्यवर आयडींकडून अशी विधानं आल्याने काळजाला घरं पडली. एक वाईट अनुभव सांगितला तर लोक पुणेद्वेष्टा म्हणतात. दुसरा चांगला अनुभव सांगितला तर त्याला 'उतारा' म्हणतात...
पण मूळ प्रश्न शिल्लक रहातोच. मिपावरच्या पुणेप्रेमी मंडळींना एकही चांगला अनुभव असू नये, किंवा असला तरी 'आम्ही लिहिणारच नाही, जा!' असा हटवादीपणा करावा, किंवा तो लिहायला वेळ मिळून नये असं का? कुठे गेला पुण्याचा जाज्वल्य अभिमान वगैरे?
15 Mar 2011 - 6:53 pm | चिंतातुर जंतू
तो 'आमची कोठेंही शाखा नाही (अगदी मिपावरही)' छाप माज असेल. थोडक्यात, पुण्यात या मग दाखवतो ;-)
15 Mar 2011 - 9:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अरेरे, हा अभिमान मिपावर का मग एवढा ओसंडून वहातो?
15 Mar 2011 - 8:01 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>पण मूळ प्रश्न शिल्लक रहातोच.
उत्तर सोपे आहे.
१) पुण्याबाहेरील लोकांना पुण्यात चांगले अनुभव येत नाहीत (असेत ते म्हणतात). खरे तर ते चांगल्या अनुभवांकडे लक्ष देत नाहीत. पुण्याला चांगले म्हणायचे म्हणून पोटशूळ उठल्याने लिहित नाही लेकाचे. एक तर त्यांना कुठे जाऊन काय मागायचे याची अक्कल नसते, मग अपमान होतो, मग उठतात आणि गळे काढतात. असो, नॉन-पुणेकर ही एक अत्यंत हलकट जमत आहे. त्यांना फाट्यावर मारलेले बरे.
२) पुण्यातील लोकांना पुण्यात सर्व अनुभव चांगलेच येतात, नेहमी, १००% वेळा. तुमची ती probability का काय म्हणता न तुम्ही, ती १ असते. उगीच अपूर्णांकात जात नाही ती. तुम्हाला "मांजरीची नखे/दात..." सिद्धांत माहित दिसत नाही. माहित करून घ्यायचा असेल तर कुठे विचारायचे आहे ते माहित असेलच. नसेल तर सांगा, लगेच त्या आयडी चा मोबाईल क्रमांक व्यनिने पाठवतो ;-)
16 Mar 2011 - 4:59 pm | परिकथेतील राजकुमार
काही नॉन-पुणेकर हलकट असतात ह्याच्याशी सहमत आहे. पण बर्याचदा त्यांना हलकटपणा करणे देखील जमत नाही, आव आणण्यात देखील अयशस्वी.
अर्थात कोणी कसे वागावे हे सांगण्याचा हक्क मला नाही. मी आपले एक निरिक्षण नोंदवले.
16 Mar 2011 - 3:17 am | रेवती
राजेशजी, प्रथम मला काकू म्हटल्याबद्दल तुमचा निशेध!
तुमची पावाची रेशिपी वाचनखुणेतून काढून टाकणार आता.
थत्ते साहेब मान्यवर असतील, मी अजून त्या पदाला पोहोचले नाहिये.;)
माझ्यासारखे क्षुद्र लोक 'लेख' म्हणता येइल असे पुण्यासारख्या (अपुणेकरांनी भरलेल्या) शहराबद्दल काय लिहिणार?;)
14 Mar 2011 - 6:53 pm | रेवती
हे हे हे...
आपले लेखन हे एका जुन्या लेखाची आठवण करून देते.;)
आपण आत्ता आत्तापर्यंत हिरव्या देशात होता आणि एकदम मातृभुमीला पोहोचलात हे सांगण्यासाठी लेखन केल्याचे बघून ड्वले पाणावले.;)
एकाच शहरावर इतक्या विविध प्रकारे लेखन होऊ शकते आणि त्यावर आमचे ड्वले ढवळे होतील इतुके प्रतिसादही मिळू शकतात हे पाहून निर्मळ आनंदाची अनुभूती मिळाली. तरीही शंका आहे कि नक्की पुण्यातच होता काय आपण?
14 Mar 2011 - 10:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हो गं, नक्की पुण्यातच होते. हवंतर त्या पार्किंगची पावती दाखवते. तू असा संशय नको गं व्यक्त करूस, मग कोणा gamjya-tamjya ना वाटतं आपलं भांडण आहे असं!
16 Mar 2011 - 3:12 am | रेवती
अरेच्च्या खरच कि काय?
हे राम(ज्या), मी माझं म्हणणं मागं घेते.;)
14 Mar 2011 - 7:04 pm | आनंदयात्री
दुर्बिण आणि शिनेमा !!! अन तो पण थेटरात ... शिव शिव शिव.
जमणा बदळ रहा है.
14 Mar 2011 - 10:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आंद्या असं नाही हां बोलायचं! आपण जुन्या मिपावरचे जुने मित्र ना ... मग, एवढं टाकून, घालून-पाडून नाही बोलायचं!
14 Mar 2011 - 7:59 pm | पैसा
मी आजी/माजी/भावी पुणेकर नाही, त्यामुळे पुणेकरांबद्दल अधिकारवाणीने बोलू शकत नाही पण अपवादाने नियम सिद्ध होतो असं म्हणतात.
14 Mar 2011 - 8:01 pm | सूर्यपुत्र
एकदा मी पुण्यात गेलो होतो.
पण मला टिपीकल पुणेरी म्हणावा असा काहीच नुभव आला नाही. बब, असा नुभव फक्त पुण्यातच येऊ शकतो, असे म्हणायला हीही रकत नाही. ( :) / ;) )
-सूर्यपुत्र.
14 Mar 2011 - 8:09 pm | कानडाऊ योगेशु
केवळ पुण्यातच असं घडु शकत असे ज्यांना वाटते त्यांनी हा ही अनुभव वाचुन पहावा.
अगदी सहमत.(शेवटची ओळ मुद्दामच काढली आहे.)
14 Mar 2011 - 9:15 pm | मनीषा
प्र. का. टा आ.
14 Mar 2011 - 11:00 pm | अप्पा जोगळेकर
अकारण तोंडाला बांधलेली फडकी, गॉगल आणि फालतू गोष्टींचा अभिमान याव्यतिरिक्त उल्लेख करावा अस काहीच पुण्यामध्ये सापडत नाही.
15 Mar 2011 - 7:00 pm | नन्दादीप
+100000000
15 Mar 2011 - 7:17 pm | नि३
अकारण तोंडाला बांधलेली फडकी, गॉगल
म्हणजे त्यामागील कारण कळालेच नाही म्हणता तुम्हाला?? अधीक माहीतीसाठी ओव्हर टु टारझन..
15 Mar 2011 - 9:34 pm | एक
आणि अस्सल पुणेरी असणार..
त्याने विचार केला कि समजा मी गाडी चोरली तर या बाई घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या मिपा वर "पुण्यातल्या ताज्या अनुभवावर" लेख लिहिणार. मग मिपावर सगळे नामांकित येउन आपल्या पुण्याला शिव्या घालणार (आयतं कोलीत, दुसरं काय?). नकोच ते. हि गाडी सोडून देउ. दुसर्या बर्याच चांगल्या मिळतील.
शिवाय चोरांच थोडं वाघा-सिंहा सारखं असेल. आयती शिकार (चावी लावून ठेवलेली) का खावी? कशावरून ही स्कुटर म्हणजे "हाकेचं बकरं " नसेल. मचाणावर लेखिकेने लेख लिहूनपण ठेवला असेल. आपण हात मारायचा अवकाश त्या तिकडे "सबमिट" चं बटण लगेच दाबतील.
प्रतिसादाचं वजन हलकं आहे. तो तेव्ढ्याच मापात घेणे..
-एक पुणेकर.
16 Mar 2011 - 2:22 pm | वपाडाव
आपल्या नावाईतुके नंबर या प्रतिसादाला.....
जब्रा....
16 Mar 2011 - 2:21 am | अडगळ
त्या पोरगीनं गाडी लावली आणि किल्ली न घेता गेली .म्हटलं की आता पंधरा दिवस रोज दारु - चिकन .दारु - चिकन.दारु - चिकन. कोण न्हाई ते बघुन गेलो , किल्ली फिरवाय गेलो तर शीटवर बोका. गाडीला हात बी लावू दिला नाही . वस्सकन अंगावर यायचा. गाडी हालवून , वाकडी करुन बघितली , कुत्र्यागत भुकून बी बघितलं . हालना बी झाल्तं. लै बाराचं बेनं. जाऊ दे च्यायला. सायकल तर सायकल .पलिकडं आणि एक यडं सायकल गेल्तं सोडून .किल्लीसकट.
16 Mar 2011 - 3:23 am | रेवती
मी तर त्याही पुढं जाऊन बोक्याच्या पाठीत काठी घातली, तरी हालेना. मग त्याला घेऊनच निघाले.......ट्रॅफिकमधून वाट काढता येइना.....मग पोलिसमामा दिसले.....माझी चूक कबूल करून गाडी पुन्हा शिनेमा संपायच्या आत जाग्यावर नेवून लावली. मामानं पोलिस ठेसनात नेऊ नै म्हणून त्याना एक शिनेमाचं तिकिट काढून दिलं नी पुन्हा म्हणून चोरी करायची नै असं ठरवलं. बरेच पैशे अक्कलखाती टाकून घरी परत्....तेही रिक्षानं.;)
16 Mar 2011 - 5:27 pm | पंगा
??????
17 Mar 2011 - 2:08 am | अडगळ
?
17 Mar 2011 - 8:18 am | पंगा
...काही नाही. जाऊ द्या.
(पुण्यात सायकल चालवून बरीच वर्षे झाली. त्यामुळे, सायकलचे कुलूप उघडल्यावर त्यात किल्ली तशीच अडकून बसते की बाहेर निघते हे या क्षणी नक्की आठवत नाही. बाहेर निघत असावी या धारणेखाली प्रतिसाद लिहिला, त्यामुळे '(एकदा कुलूप उघडल्यावर) सायकलला किल्ली कोण लावून ठेवतो, रादर कशाला लावून ठेवावी लागते' असे विचारणार होतो. पण आता विचार केला तर कदाचित माझेच चुकलेले असू शकेल असे वाटते. चूभूद्याघ्या.)
17 Mar 2011 - 11:00 am | Nile
काही कुलपं तशी असतात. कुलुप लॉक होताना एक खटका होउ कीली आपोआप (ऑलमोस्ट) फिरुन निघत असे. पण साधी खटका नसलेली कुलुपंही मिळतात.
17 Mar 2011 - 11:03 am | शिल्पा ब
तुम्हाला बरीच माहिती कुलुपान्बद्दल...आधी काय कुलूपतोडे होता का? ;) नाही पांढर्या शाईत लिहिलंय म्हणुन विचारलं!! ;)
17 Mar 2011 - 11:21 am | Nile
आमच्या कडं लै कुलपाच्या किल्ल्या असायच्या म्हणुन माहिती.
17 Mar 2011 - 12:17 pm | इंटरनेटस्नेही
हल्लीच माझी सायकल चोरीला गेली. आणि नंतर एकदा रात्री पाणवठ्यावरुन परतत असताना सोसायटीत आलो (तेव्हा साधारण २.३० ए एम वाजले होते) बघतो तर काय, एक माणुस अगदी निर्धास्तपणे आमच्या इमारतीच्या लॉबीमध्ये झोपला होता.. सरळ १०० ला फोन केला.. आणी त्याची अशी काही तक्रार केली केली पोलिस साधारण १० मिनिटांत आले त्यांच्या क्वालिस मधुन आणि त्याची बॅग उघडुन बघितली त्यांनी.. बघतात तर काय, त्यात त्यांना एक स्क्रुड्रायव्हर मिळाला.. (माझ्या महिती प्रमाणे एनी इम्प्लीमेंट ऑफ हाउसब्रेकिंग, विदाऊट ए लॉफुल एक्सयुझ सोबत बाळगल्यास, आणि पोलिस अधिकार्यांना संशयास्पद वाटल्यास ते सदर व्यक्तीस वॉरंट शिवाय अटक करु शकतात पहा: क्रि.प्रो.कोड) पोलिसांणी लै दणादण तुडवला त्याला, काठी आणि हातांनी, लै विव्हळत होता (लोकांच्या सायकली चोरताना काही वाटत नाही!) १ सहायक आयुक्त, १ पोलिस निरीक्षक, २ उपनिरीक्षक आणि ३ पोलिस हवालदार एवढी मोठी ७ जणांची पोलिस टीम आली होती.. या सर्वांनी मिळुन त्याला ५० तरी फटके लगवाले असतील.. नंतर त्याला ते घेऊन गेले. बहुतेक अजुन चोप देण्यासाठी! लै मज्जा आली.. साला, माझी सायकल यानेच चोरली असणार.. चांगली अद्दल घडली!
17 Mar 2011 - 5:21 pm | वपाडाव
इंट्या, अरे नीट पाह्यलंस ना. कदाचित ते Nile निघायचे.
असं का मार देतं कुणी आपल्या जालमित्राला.
ह. घ्या.
18 Mar 2011 - 1:05 am | इंटरनेटस्नेही
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
17 Mar 2011 - 11:04 am | पंगा
माहितीसाठी धन्यवाद.
16 Mar 2011 - 6:51 am | सहज
पुनश्च अभिनंदन!
पा.श.शु.
16 Mar 2011 - 7:11 am | Nile
पाचव्या शतकास शुभेच्छाच्या आडुन पाशवी शक्त्यांना शुभेच्छा देण्याच्या मनसुबा लपलेला नाही इतकी नोंद करतो.
16 Mar 2011 - 10:12 am | चिंतामणी
शतकाबद्दल (मिपास्टाईलने) हबीणंदन
यावरुन तुमची गाडी किती भंगार आहे ते समजलं. चोरांनी सुद्धा हात लावला नाही.
बाकी , आम्ही मल्टीप्लेक्सात जावुन ईंग्रजी चित्रपट वगैरै पहातो हे दाखविण्याचा क्षीण प्रयत्न
मला वाटत तुमची काहीतरी चूक होत असावी. पेट्रोल चेक केल होत का???
किल्ली विसरणारी व्यक्ती नंबर मात्र लक्षात ठेवेल याबद्दल माझ्या मनात शंका आहे.
चोरांचेही काही उसूल असणारच.
आपण आत्ता आत्तापर्यंत हिरव्या देशात होता आणि एकदम मातृभुमीला पोहोचलात हे सांगण्यासाठी लेखन केल्याचे बघून ड्वले पाणावले.
या सारख्या वैयक्तीक शेरेबाजी बरोबरच पुणे आणि पुणेकरद्वेष्ट्यांना धैर्याने तोंड देत केलेल्या शतकाबद्दल अभीनंदन.
16 Mar 2011 - 6:58 pm | चित्रा
या सारख्या वैयक्तीक शेरेबाजी बरोबरच पुणे आणि पुणेकरद्वेष्ट्यांना धैर्याने तोंड देत केलेल्या शतकाबद्दल अभीनंदन.
असेच म्हणते. :)
पुण्यातले अनुभव चांगले असे सांगायचे तर आठवावे लागते बुवा. पुण्याची नशा थोडी हळू हळू चढते असे वाटते.
मागे एक चांगला रिक्षावालाही भेटला होता, नवसह्याद्रीच्या भागात जाताना, रिक्षा लकडीपुलावरून घेऊ का मधून कुठूनतरी (मला वाटते पत्रकार भवन (का जे काही आहे ते?). असा प्रश्न विचारला की अनेकदा आपण फसले जाण्याच्या मार्गाला लागणार असे नक्की होऊ लागते (आपण शहरात नवीन आहोत असे दिसले की कुठच्याही रस्त्यांमधून गरागरा मीटर वाढवत फिरवणे सोपे जाते), असा प्रश्न न विचारता त्याने रिक्षा व्यवस्थित चालवली. एवढीच अपेक्षा असते ती त्याने पूर्ण केली, तेव्हा हा अनुभव चांगलाच म्हणायला पाहिजे.
16 Mar 2011 - 9:22 pm | pramanik
काय जमल नाय बा,कायतरी नवीन शोधा पुन्याच्या बढाया मारायला,
मी दोन वर्षे राहीलो पुन्यात,नंतर गुजरातमधे व आता मुंबईत्,त्यात सुरत बेस्ट हाय.
16 Mar 2011 - 11:32 pm | विकास
बहुतेक वेळेस पुण्यातल्या ५-६ रिक्षेवाल्यांना थांबवायचा प्रयत्न केला तर सातवा थांबून विचारतो आणि नववा येयला तयार होतो. पण तो दिवस वेगळाच होता...
मी आमच्या घराच्या जवळील चौकात गेलो काय आणि एक रिक्षेवाला आपणहून थांबला आणि म्हणाला ,"साहेब कुठे जायच्यं?".
म्हणलं "रिक्षा खाली आहे का?"
तो हसत म्हणाला, "अहो म्हणूनच तर विचारतोय ना!"
मी गोंधळलो, म्हणलं "जाऊंदेत कदाचीत ते तुझ्या एरीयाच्या बाहेरचे असेल".
तो उत्तरला, "अहो आम्हाला परवाना मिळतो, तेंव्हा आम्ही हे मान्यच केलेले असते की कुठेही जावे लागेल. आम्ही प्रवाशांसाठी आहोत, प्रवासी आमच्यासाठी नाही!"
माझ्या (कृतज्ञतेने) ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा लपवत मी म्हणले, "मला औंधला जायचे आहे"
तो: "मग चला की" आणि मिटर पाडला.., "साहेब कुठच्या बाजूने नेऊ? 'इकडून' का 'तिकडून' "
माझ्यातला अनुभवी जागा झाला, मनात म्हणलं आता कुठूनही म्हणले तर समजेल की आपल्याला माहीत नाही. म्हणल, "इथून ने".
"अहो साहेब, तो रस्ता लांबचा हाय. मी तिथून नेतो, तिथे सिग्नल्स पण कमी असतात आणि रस्ता पण शॉर्ट हाय. फक्त जरा दोनचार खड्डे लागतील तेव्हढे सांभाळून घ्या"
मला वास्तवीक अर्धातास लागेल असे सांगण्यात आले होते पण या पठ्ठ्याने २० मिनीटात पोचवले! मिटर बघितला, तेव्हढ्यात त्याने कार्ड काढून सांगितले, "८८.५० झाले" मी शंभराची नोट हातात ठेवत म्हणालो की काय पाच-दहा परत केलेस तरी चालतील...
"नाही साहेब, तसे नाही, हे घ्या साडे अकरा रुपये".
"अरे दोन-चार रुपये ठेव तुझ्याकडे" असे माझ्या तोंडातून आपसूक पडले...
"नाही साहेब, ते माझ्या तत्वात बसत नाही!"
मनात म्हणलं, चला! किमान अशा तत्वामुळे का होईना हा पुणेकर आहे याची खात्री पटली!
तेव्हढ्यात "धन्यवाद" म्हणत, त्याने रिक्षा परत चालू केली होती आणि डोळ्यासमोर निघूनही गेला.
त्या रिक्षेच्या मागून येणार्या धुराकडे बघत माझे विचारही हवेत तरंगत होते आणि कधी एकदा हे घरच्यांना सांगतो की सगळेच काही "तसे" नसतात, असे झाले होते. तितक्यात, "विकास, ए विकास" ऐकायला आले. म्हणून उत्साहाने बायकोस सांगायला गेलो, पण तितक्यात तिच्याकडूनच ऐकावे लागले, "उठ, आपल्याला नऊ पर्यंत औंधला पोचायचे आहे. रिक्षा मिळायला किमान अर्धा तास तरी लागतो हे लक्षात असुंदेत!" :(
असाही अनुभव पुण्यात येऊ शकतो!
16 Mar 2011 - 11:42 pm | शिल्पा ब
हॅ हॅ हॅ...हा प्रतिसाद लै भारी!!!
16 Mar 2011 - 11:52 pm | रेवती
मला असलं स्वप्न पडलं असतं तर दचकून जाग आली असती.;)
एखादा खरच चांगला रिक्षावाला भेटला तरी अविश्वासानं त्याला चार शिव्या घालून "कसले नाटकी असतात मेले!" म्हणून आम्ही घरी येतो.
तुम्हाला इतकी सकारात्मक स्वप्नं पडतात म्हणजे तुम्ही मुळचे पुणेकर नसणार असे वाटते.
आपल्या पत्नी तरी पुणेकर आहेत काय? असतील तर त्यांना विचारा सग्गळं सांगतील.;)
17 Mar 2011 - 6:50 am | चित्रा
पुणेकर एवढे आत्मपरिक्षण करणारे असतात हे माहिती नव्हते. :)
17 Mar 2011 - 6:22 pm | रेवती
कळ्ळं हो कळ्ळ!;)
17 Mar 2011 - 2:54 am | Nile
विकासभौंना असं स्वप्न पडलं म्हणजे ते नक्कीच पुण्याच्या बाहेरचे असले पाहिजेत! ;-)
17 Mar 2011 - 1:14 am | निनाद मुक्काम प...
मागे एकदा पुण्यात आलो होतो तेव्हा
स्टेशन वरून चिंतामणी ह्यांना फोन केला व'' रिक्षावाल्याला किती पैसे ..
अनु का द्यायचे'' हे रिक्षावाल्या समोर विचारले
.
आता अस्सल पुणेकराकडून मी हा सल्ला घेतला . आणी त्यांच्याच घरी चाललो आहे .असे समजून रिक्षावाल्याने माझ्या कडून मी देईन तेवढेच म्हणजे आधी ठरले तेवढे पैसे पेठेत जाण्यासाठी घेतले .
व त्याचं संध्याकाळी घरी जातांना पुणेकरांनी आपल्या गाडीतून मला मुंबईची बस पकडण्या साठी इच्छित स्थळी सोडले .
.इतके नव्हे तर बस सुटली पाहून तिचा आम्ही पाठलाग गेला व तिला थांबवून मला बस मध्ये चढवले .
थोडक्यात पुणेकरांचा इतक्याच आलेला हा चांगला अनुभव येथे नमूद करत आहे .
((भविष्यात युरो च्या जीवावर पुण्यनगरीत घरकुल एक गुंतवणूक म्हणून घेण्याच्या विचारात असलेला भविष्यातील नव अनिवासी पुणेकर
मुक्काम पोस्ट........ )
17 Mar 2011 - 1:59 am | कुंदन
असं म्हणताय...
ठाणे मार्गे जाउ नका फक्त....
17 Mar 2011 - 2:50 am | रेवती
पुणेकरांना चांगलं म्हणताय.
किती चांगले आहात हो निनाद मु. पो. ज. ;)
17 Mar 2011 - 11:33 am | अभिज्ञ
आदितीतै,
यापुढे गाडीवर पत्ता लिहून ठेवत चला,म्हणजे गाडि थेट घरच्या पत्त्यावरच पोहोचवलि जाईल.
:)
(पुणेकर) अभिज्ञ.
17 Mar 2011 - 4:40 pm | प्रकाश घाटपांडे
आम्हाला ल्हानपनी खालील गोष्टींसाठी पुने आवडायचे
१) चहात पाव बुडवुन खायला भेटतो
२) केक क्रिमरोल खायला भेटतो; आईस्क्रिम खायला भेटते.
३) पुन्यात डांबरी रस्ते आहेत
४) पुन्यात शिमिंट ची घरे आहेत
५) वेगवेगळ्या रंगाच्या ट्युबलाईटीच्या पाट्या आहेत
६) पुन्यात नळाला लई जोरात पानी येते
७) पुन्यात भरजारी पोषाखाचे ब्यांडवाले आहेत
८) पुन्यात रहरदारी हाकायला पोलिस असतो.
९) पुन्यात रिक्षा आहेत
.
.
.
( आता पुनेरी)
17 Mar 2011 - 9:27 pm | इरसाल
पुने तिथे काय उने
18 Mar 2011 - 11:36 am | वपाडाव
पुन्याला पन लै उन ए...
-(काही दिसात हुनाळ्यामुळे त्रस्त होणारा)
वपाडाव
17 Mar 2011 - 10:31 pm | रमताराम
काय गडबड आहे रे पोरांनो. मला जरा सुखाने जगू द्याल की नाही.
17 Mar 2011 - 10:34 pm | शिल्पा ब
अजुन चालुच ए का?
17 Mar 2011 - 11:26 pm | भवानी तीर्थंकर
चांगला लिहिला आहे हा अनुभव. मला तरी आवडला बाई. इतरांना काय म्हणायचं असेल ते म्हणोत.
17 Mar 2011 - 11:35 pm | पैसा
आलात का तुम्ही? तुमच्या डायरीतली पानं नोव्हेंबरपासून वाचतोय आम्ही!!!
18 Mar 2011 - 12:16 am | भवानी तीर्थंकर
हो ना. अहो, झालं काय की, मागे एकदा काही कामानिमित्त युनिकोडमधून गुगल सर्च कसं होतं हे पाहण्यासाठी माझंच नाव देवनागरीत टाकलं आणि सर्च केला. तर तिथं बऱ्याच पानांमागं हे लेखन दिसलं. मग मी मिसळपाववर आले. 'माझ्या'च डायरीतलं पान पाहून हरखूनच गेले अगदी. मग ठरवलं आपणही इथं सदस्य व्हायचं. त्यानुसार सदस्य झाले. पण नंतर पुन्हा इथं येण्यास वेळच मिळत नव्हता. आज वेळ मिळाला आणि 'माझ्या' डायरीतलं पान लिहिणाऱ्या अदिती यांचाच लेख समोर दिसला. त्यात तो पुण्यावरचा. म्हणून तो वाचून काढला. तसंच नंदन यांची एक कविताही वाचली. खूप आवडली.
मीही असंच काही लिहीन म्हणते. पाहू, कसा वेळ मिळतो ते.
बरं, त्या स्मायली कशा टाकतात? आणि ती हायपरलिंकही कशी देतात?