शनिवार-रविवारी काय करायचं हा एक मोठ्ठा प्रश्न पुण्यातच चुटकीसरशी सुटतो. The King's Speech बघायचं ठरलं आणि आश्चर्य म्हणजे घराजवळच्या ई-स्क्वेअरमधे सोयीच्या वेळेत तो दाखवतही होते. पिक्चरच्या वेळेच्या वीस मिनीटं आधी जाऊन तिकीटही मिळाली. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्कूटर पार्किंगमधे नेण्याआधी त्यांनी पिलियन रायडरला उतरवला, मला हेल्मेट काढायला लावलं, अॅक्टीव्हाच्या सीटखालची डिकी उघडून पाहिली (हँडलमधली महत्त्वाची नसावी), आणि मगच पार्किंगमधे सोडलं. दीडचा शो वेळेतच, बरोब्बर एक वाजून सदतीस मिनीटांनी सुरू झाला. सगळं कसं, आलबेल! पिक्चर संपला आणि मी खुर्चीतून उठताना स्वतःच्याच खिशात हात घातला, किल्ली नाही. झोळीत टाकली असेल म्हणून झोळीत हात घातला, तिथेही नाही. अंधारात दिसणार नाही, चालता चालता चाचपडताना मी धडपडेन म्हणून खाली उतरल्यावर पाहिलं किल्ली नाही. "आता स्कूटर गेली असणार, इथून घरी जायचं तर रिक्षा कुठे मिळेल, बस मिळेल का, पुढचे दोन-तीन महिने सायकल चालवावी" वगैरे विचार आधीच करून झाला. तरी एकदा खात्री करण्यासाठी पार्किंगमधे आले. नक्की कुठे स्कूटर ठेवली होती हे आठवेना, तर तिथल्या माणसाने "हो, इथेच होती तुमची स्कूटर. नंबरप्लेट पहा," असा सूज्ञ सल्लाही न मागताच दिला. चालण्याचा थोडा व्यायाम केल्यावर स्कूटर दिसली आणि स्कूटरलाच ठेवलेली किल्लीही! जिथे जशी लावली होत्या तिथेच स्कूटर आणि किल्ल्या, दोन्ही तशाच होत्या!
असं काही घडलं की आनंदाने मन अगदी भरून जातं. आणि निव्वळ, पुढचे दोन महिने सायकल चालवावी लागणार नाही, पोलिस चौक्यांचं पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावं लागणार नाही, विसरभोळे म्हणून आपल्यावर व्यक्तीगत टीका होणार नाही इतका स्वार्थी विचारच त्यामागे नसतो. त्याही पलिकडे काहीतरी जाणवतं. हे जग सुंदर आहे असं वाटायला लागतं. माणसाच्या माणूसकीवर पुन्हा एकदा विश्वास ठेवावासा वाटतो. 'आज फिर जीने की तमन्ना है' सारखी गाणी खरोखर मनाला भिडतात. हे फक्त पुण्यातच घडू शकतं.
तुम्हालाही पुण्यात मला आलेत तसे चांगले अनुभव आले असतील.
o. तर कृपया ते चांगले अनुभवच लिहीणे.
o. आपसातल्या भांडणांसाठी कृपया या धाग्याचा वापर करू नये, हा मुंबईच्या चाळीतला नळ नव्हे.
o. पुण्याबद्दलचा धागा असला तरी पुणेरी रिक्षावाल्यांचा माजोरीपणा हा या धाग्याचा विषय आहे असं समजू नये.
o. पुणेरी पाट्याही प्रेमळ असू शकतात याची कृपया जाणीव ठेवावी.
o. 'आयपीएल'च्या पुणेरी पाट्या, आमचे रा.को. छोटा डॉन यांनीच लिहीलेल्या आहेत तेव्हा त्यांचा संदर्भ वापरताना निदान डान्रावांचा ॠणनिर्देश असावा.
प्रतिक्रिया
14 Mar 2011 - 12:53 pm | नितिन थत्ते
यात पुण्याचे कौतुक केले असल्याने धागा योग्य जागी मारण्यात आला आहे.
पूर्वीचं पुणं राहिलं नाही हेच खरं.
14 Mar 2011 - 1:14 pm | परिकथेतील राजकुमार
धागा पुण्याचे कौतुक करणारा असल्याने आनंदाचे उधाण आलेले आहे. एका पुणेद्वेष्ट्याकडुन असे लिखाण आलेले बघुन डोळे पाणावले. आमचे हितचिंतक थत्तेचाचा ह्यांना झालेली जळजळ बघुन तर आनंद द्विगुणीत झाल आहे.
ह्या आनंदाप्रित्यर्थ (पुण्याचे कौतुक झाल्याचा नव्हे, पुणे कौतुकास्पद आहेच. थत्ते चाचांना जळजळ झाल्याचा आनंद) आज आम्ही दोन पेग जास्ती मारु आणि 'काँग्रेसच्या बैलाला घो' असे ओरडु. सकाळी शाखेत सुद्धा जाउन येऊ.
14 Mar 2011 - 1:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
श्री. परिकथेतील राजकुमार यांच्या आनंदात मी पण सहभागी आहे. सदर हृदयद्रावक तरीही आनंदांत प्रसंग मी संपूर्ण मराठी आंतरजालाला सांगावा याची कल्पना देणार्या, तळ्याकाठी भेटणार्या प्रो. घासकडवी यांचे मी आभार मानते. असे छोटे छोटे आनंद वाटले पाहिजेत.
- अदिती सामंत
14 Mar 2011 - 1:39 pm | नन्दादीप
खरोखरच विक्षिप्त आहात हो...
त्या प.रा. भाऊला आनंद झाला म्हणून तो दोन पेग जास्त मारणार आणि त्यात तुम्हिपण सहभागी होणार....शिव...शिव...शिव...
होतोय खर पुण्याचा र्हास (((की विकास??????)))
14 Mar 2011 - 4:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो नन्दादीप, दोन पेगात आमचं काय होणार आणि पर्याचं तरी काय होणार? पण विचार करा, उद्या सकाळी मी संघाच्या शाखेवर गेले तर काय हाहा:कार माजेल?
पेगात बाटली...!!!
14 Mar 2011 - 4:50 pm | परिकथेतील राजकुमार
च्यायला दोन दोन बाटल्यात काही होत नाही ;) पेगात कधी व्हायचे ?
ह्यापुढे 'आमची कुठेही शाखा नाही' असे बोर्ड लागतील ;)
14 Mar 2011 - 4:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुझ्या इमेजचा पारच कचरा रे, दोन पेगात तुझं काही होतं असं म्हणणं!
अरे अरे अरे असं अभद्र बोलू नकोस. थत्ते चिच्चा आणि विजुभाऊ कोणाविरूद्ध लिहीणार?
14 Mar 2011 - 5:33 pm | नितिन थत्ते
लिहायला फ़क्त शाखाच असते असं काय नाय... ;)
14 Mar 2011 - 5:43 pm | श्रावण मोडक
हां... आख्खा संघ असतो. ;)
14 Mar 2011 - 5:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बरं मग आणखी काय काय असतं?
16 Mar 2011 - 3:38 pm | मालोजीराव
14 Mar 2011 - 6:34 pm | नन्दादीप
वो ताई....नीट वाचा की,
मी जास्तीचे दोन पेग बोल्लो. वो.
14 Mar 2011 - 1:21 pm | नितिन थत्ते
=))
14 Mar 2011 - 12:54 pm | sagarparadkar
आमच्या पुण्यात अशा चांगल्या गोष्टी पण घडू शकतात ?
मला तर वाटत होतं की आपण पुणेकर म्हणजे सुंदर, निर्मळ अत्यंत सज्जन अशा भारतातले दुर्जनच आहोत की काय ...
14 Mar 2011 - 12:56 pm | Nile
>>विसरभोळे म्हणून आपल्यावर व्यक्तीगत टीका होणार नाही
कीती तो विसरभोळेपणा करावा एखाद्याने!साधी गाडीची कील्ली सांभाळता येत नाही, आणि वर अभिमानाने त्यावर लेख लिहतात, काय हे! बाकी आपल्याकडे स्कुटर आहे हेच सांगायचं होतं तर खरड केली असतीत त्यासाठी लेख कशाला लिहायचा ब्वॉ? ;-)
14 Mar 2011 - 12:57 pm | कुंदन
आवडला अनुभव....
अवांतर : कधी कधी वाटते पुण्यातले काही भामटे ठाण्यात पोहोचले की काय ?
14 Mar 2011 - 12:57 pm | निखिल देशपांडे
.
14 Mar 2011 - 1:36 pm | अमोल केळकर
:) प्रतिसाद आवडला
अमोल
14 Mar 2011 - 1:00 pm | मी ऋचा
>>>असा अनुभव फक्त पुण्यातच येऊ शकतो
-१ पूर्णपणे असहमत. आमच्या नागपूरला पण असे आणि यापेक्षा अनेक चांगले अनुभव येतात.
14 Mar 2011 - 1:03 pm | Nile
पुर्णपणे सहमत!
आमच्या अमेरिकेत तर एकदा मला त्या माणसाने जाउन स्वत: गाडी आणुन दिली, आता बोला!!
16 Mar 2011 - 11:46 pm | शिल्पा ब
कुणाची गाडी आणुन दिली म्हणता?
16 Mar 2011 - 11:55 pm | विकास
एकदा परत लगेच बाहेर पडायचे म्हणून, आमच्या तत्कालीन घरासमोरील रस्त्यावर मी गाडी पार्क केली. आत गेलो आणि काम रद्द झाल्याने, एकदम संध्याकाळी बाहेर पडलो. पण किल्ली काही मिळत नव्हती. शेवटी ड्युप्लिकेट घेऊन गाडी उघडायला गेलो तर काय! पहीली किल्ली गाडीला नुसती लावलेलीच नाही तर हातातले सामान घेऊन गडबडीत उतरताना गाडी बंद देखील केलेली नव्हती. :-)
17 Mar 2011 - 1:52 am | कुंदन
असाच अनुभव तुम्हाला पुण्यात यापुर्वी आलेला आहे तर ;-)
17 Mar 2011 - 3:31 am | विकास
असाच अनुभव तुम्हाला पुण्यात यापुर्वी आलेला आहे तर
छे छे! जागेवर गाडीच होती, नारळ नाही! ;) नाईलच्या प्रतिसादाला तो उपप्रतिसाद होता... :-)
17 Mar 2011 - 2:53 am | रेवती
या धाग्यावर एकापेक्षा जास्त प्रतिसाद देताय विकाससाहेब!
माझ्या एकाही धाग्याला तुमचा अर्धाही प्रतिसाद नसतो.........बघुन घेइन!
अनेकवेळा प्रयत्न करूनही माझ्या धाग्याला २५ पेक्षा जास्त प्रतिसाद येत नाहीत.
सध्या माझ्या लेखनाचा दर्जा आहे त्यापेक्षा चांगला करणे मला जमणार नाही म्हणून एकेका सदस्यास गळ घालणे चालू आहे असे समजलात तरी हरकत नाही.;)
17 Mar 2011 - 3:30 am | विकास
आधी म्हणावेसे वाटले की माझे प्रत्येक प्रतिसाद देण्यामागे माफक शुल्क असते. पण काय आहे, प्रस्तुत धागाकर्ती (आता) पुण्यातली असल्याने असले काही तत्व म्हणून नाही पण, पैसे घालवून करेल यावर कोणी विश्वास ठेवणार नाही... . ;)
17 Mar 2011 - 10:16 am | विजुभाऊ
या धाग्यावर एकापेक्षा जास्त प्रतिसाद देताय विकाससाहेब!
माझ्या एकाही धाग्याला तुमचा अर्धाही प्रतिसाद नसतो.........बघुन घेइन!
रेवती बै ते त्यांचा कंपूची मान्यता मिळवण्याच्या करातील एक गुप्त कलम आहे.
शुद्ध मराठीत याला पाठ खाजवणे असे देखील काही लोक म्हणतात.
नाहीतरी इथे बर्याच सदस्यानी कंपुबाजानी कंपुबाजांसाठी काढलेला एक कंपूमय धागा अशा अर्थाची काही वाक्ये लिहीली आहेत.
मिपावरच्या रविकिरणमंडळात सामील व्हायला काय करावे लागते ते माहीत करून घ्यायला हवं जरा
17 Mar 2011 - 10:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
रेवतीताई, तू पण एक झक्कास धागा लिही आणि यावेळेस तू पुण्याच्या विरूद्ध बोल. आपण सर्व पाशवी शक्ती मिळून त्याला त्रिशतकी बनवू या, म्हणजे पुन्हा विजुभाऊंची रविकिरणमंडळाबद्दल तक्रार नकोच ऐकायला!
14 Mar 2011 - 1:03 pm | नि३
हम्म आम्हाला पण पुण्यात खुप काही चांगले अनुभव आले आहे.
बाकी लेखीकेने जो अनुभव व्यक्त केला ते पुण्यातच घडु शकते असे काही नाही ते कुठेही होऊ शकते...
आणी तुमची स्कूटर गेली नाही याचा अर्थ असा होत नाही की ज्याला चोरायची होती त्याने जाणुन चोरली नाही.
14 Mar 2011 - 1:04 pm | अवलिया
यावरुन तुमची गाडी किती भंगार आहे ते समजलं. चोरांनी सुद्धा हात लावला नाही.
14 Mar 2011 - 1:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
14 Mar 2011 - 1:12 pm | नि३
हा हा...हा...
न चोरण्याचे हे देखील एक कारण असु शकते...
14 Mar 2011 - 1:21 pm | निवेदिता-ताई
असे असेल तर गाडी तिथेच सोडुन यायचे..हो फुकटसुद्धा कोण घेणार नाही..
14 Mar 2011 - 2:20 pm | सुहास..
यावरुन तुमची गाडी किती भंगार आहे ते समजलं. चोरांनी सुद्धा हात लावला नाही. >>>
हेच म्हणावयास आलो होतो .
बाकी , आम्ही मल्टीप्लेक्सात जावुन ईंग्रजी चित्रपट वगैरै पहातो हे दाखविण्याचा क्षीण प्रयत्न ;)
मंगला, अलका, अपोलो आणि लिं. ना. चि. म . चा फॅन
सुहास
मुळ धाग्याविषयी : पार्किंग च्या सुरळीत पणासाठी कधी-कधी वाहने (किल्ली असो वा नसो) उचलुन हलविली जातात. म्हणुन आधी आपण लावताना नीट पार्किंगमध्येच आहे, याची खातरजमा करावी.
पुण्यातल्या पार्किंग व्यवस्थेचा फॅन.
सुहास
कल्याणीनगरच्या अॅडलॅब्स मध्ये भर दिवसा पार्किंग लॉट मध्ये मर्डर झाल्यावर सध्या सर्वच मॉल/मल्टिप्लेक्सा मध्ये सुरक्षा व्यवस्था कडक झाली आहे, काही अपवाद वगळता.
ई-स्केयर च्या सुरक्षा आणि हाऊसकिपींगचे कॉन्ट्रक्टर श्री. अविनाश राज साळवेंचा मित्र
सुहास
तुम्हालाही पुण्यात मला आलेत तसे चांगले अनुभव आले असतील. >>>
ग्रंथ (तो देखील क्रमश खंडात) लिहावा लागेल , त्यामुळे
क्षमस्व
सुहास
14 Mar 2011 - 4:41 pm | वपाडाव
मंगलाचे रेट वाढले असल्याने आम्ही आज-काल तिकडे जात नाही.
बाकी तिनही थेतरांना सप्ताहात यक भेट देणे गरजेचे.
14 Mar 2011 - 4:55 pm | सुहास..
मंगलाचे रेट वाढले असल्याने आम्ही आज-काल तिकडे जात नाही. >>>
मॉर्निंग ला गेला नव्हतात वाटते ;)
18 Mar 2011 - 4:43 pm | मृत्युन्जय
काय आहे मंगलाचा रेट आता?
18 Mar 2011 - 6:46 pm | नगरीनिरंजन
मंगलाला पुर्वीसारखा एकच न लागता एकाचवेळी दोन-तीन लागतात असे ऐकले. खरं आहे का?
18 Mar 2011 - 7:43 pm | टारझन
हो , मंगला आता तिप्पट झाली आहे .म्हणजे कँपस तेवढाच आहे. आतमधे तिप्पट झाली आहे.
18 Mar 2011 - 7:44 pm | टारझन
हो , मंगला आता तिप्पट झाली आहे .म्हणजे कँपस तेवढाच आहे. आतमधे तिप्पट झाली आहे.
अलका मात्र तशीच दुर्लक्षित राहिल्याने काळाच्या ओघात काळवंडल्यासारखी वाटते. हल्ली कोणाच्या तोंडुन " आज अलका ला चाललो " असं ऐकायला मिळत नाही.
- जी स्केयर
19 Mar 2011 - 4:41 pm | अप्पा जोगळेकर
काय आहे मंगलाचा रेट आता?
हद्द झाली. असल्या वाक्यांबाबत संपादक काही गंभीर विचार का करत नाहीत.
मगाशीच ते स्लीपिंग पार्टनर का काय वाचलं अन आता हे.
- कुणाचं काय तर कुणाचं काय
14 Mar 2011 - 1:08 pm | भीमाईचा पिपळ्या.
गुणी, हुशार विद्यार्थ्यांच्या प्रतिक्षेत.
14 Mar 2011 - 1:08 pm | नन्दादीप
मला वाटत तुमची काहीतरी चूक होत असावी. पेट्रोल चेक केल होत का???
@कारण मला पण एका मित्राने या रविवारी फिरवून आणल म्हणाला ई-स्क्वेअर जवळच्या मित्राची बाईक आहे. बोल्ला ३ च्या आत परत द्यायची आहे. रंग कोणता आहे बर तुमच्या गाडीचा...???@
14 Mar 2011 - 1:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हॅ हॅ हॅ ... परत येताना विद्यापीठ चौकातून स्कूटर ढकलावी लागणार नाही एवढंच पेट्रोल पिक्चरला जाताना होतं. आणि अॅक्टीव्हाला पुण्यात बाईक कधीपासून म्हणायला लागले?
(खडकी-दापोडीकडची) अदिती
14 Mar 2011 - 1:12 pm | नन्दादीप
अॅक्टीव्हा म्हणजे बायकांची बाईक हो.......
Why should boys have all the fun of bikes...!!!!
14 Mar 2011 - 1:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पुण्यातल्या रस्त्यांवरून जाताना डोळे उघडे ठेवलेत तर रस्त्यातल्या अर्ध्या टू-व्हीलर्स अॅक्टीव्हा दिसतात. अनेक कुटुंबवत्सल लोकं अॅक्टीव्हा चालवतात कारण ही फ्यामिली स्कूटर आहे.

14 Mar 2011 - 1:33 pm | नन्दादीप
वरील चित्र पुण्यातील आहे याला काय पुरावा...????
पण मी मात्र तुमचे एक विधान खोटे आहे असे म्हणतो. (भांडणे करायला हे काही मुंबईतील चाळ.......)
तुमच्या वागण्यावरून अस वाटतय की पुण्यात पण वरील प्रमाणे माणसे असावीत......
14 Mar 2011 - 1:58 pm | इंटरनेटस्नेही
मी पण एक बाईक ठेवावी म्हणतो!
14 Mar 2011 - 2:01 pm | स्पा
मी पण एक बाईक ठेवावी म्हणतो!
देशी कि विदेशी?
14 Mar 2011 - 2:04 pm | इंटरनेटस्नेही
शक्यतो देशी, काळसर रंगाची, कोणाकडे असल्यास कळवणे. मेंटेनन्स फ्री असायला हवी व रात्रीच्या वेळेस चालवण्यासाठी हेडलाईटस मोठे पाहिजेत! तसेच सीट वर कव्हर नको.
14 Mar 2011 - 2:07 pm | टारझन
आणि ती एवढी भंगार हवी की कुत्र बी मुतायला यायला नको तुझ्या बाईक वर ... होक्की नै ? :)
14 Mar 2011 - 2:12 pm | स्पा
:D
14 Mar 2011 - 2:08 pm | परिकथेतील राजकुमार
गाढव ठेवा :) जास्ती उपयोगी पडेल.
14 Mar 2011 - 2:13 pm | स्पा
गाढव ठेवा , जास्ती उपयोगी पडेल.
कहर....
:D
आवरा







14 Mar 2011 - 2:15 pm | इंटरनेटस्नेही
@ टारु.. कोण आहे तर सांग.. ट्रायल मारुन बघु.. आपल्याला काय काम झाल्याशी मतलब!
@ परा.. :ड
14 Mar 2011 - 1:11 pm | Nile
सर्कारी पेट्रोल असतं भौ, त्याची काळजी देवाक पण नाही!!
14 Mar 2011 - 1:12 pm | टारझन
थरारक आणि रोमहर्षक अनुभव . हसा अनुभव मला जपाण मधल्या सुनामीचा विडिओ टिव्ही वर पहाताना आल्या होता :)
छाण लिहील्या गेले आहे.
@ णाण्स : =))
14 Mar 2011 - 1:38 pm | सूड
पुण्यात फारसे चांगले अनुभव न आल्याने पास !!
14 Mar 2011 - 7:42 pm | Dhananjay Borgaonkar
पुण्यात फारसे चांगले अनुभव न आल्याने पास !!
पुणेकरांना बरोब्बर कळत हो कोणाशी कस वागायच ते..
नंतर लोक उगाच मग बोंबाबोंब करतात की आम्हाला चांगले अनुभव नाही आले.
म्हणुनच म्हणतो उगाच पुणेकरांच्या नादी लागु नका.
(बिन)बुड
14 Mar 2011 - 1:46 pm | चिंतातुर जंतू
असा अनुभव पुण्यात यायला कथेमध्ये एखादा छुपा दुवा असला पाहिजे. उदाहरणार्थ: तुमच्या गाडीवर यांच्यासारखा कुणी बोका नुकताच बसला होता का? मग समस्यापूर्ती तो एक राम(दासकाका)च जाणे.
|| नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||
टीप १: माझं मराठी फार अभिमानास्पद नाही. त्यामुळे 'उगा काहितरीच' बोका आहेत का असे काहीतरीच पुणेरी प्रश्न उगा उपस्थित करू नयेत.
टीप २: मला रामाचा किंवा 'मनाचे श्लोक'कर्ते रामदास यांचा अभिमान नाही. फक्त आमच्या रामदासकाकांचा आहे.
टीप ३: टीप २ हा कंपूबाजीचा क्षीण प्रयत्न नाही. (कारण तो ठळक प्रकार आहे!).
14 Mar 2011 - 5:27 pm | उगा काहितरीच
अहो आमच्या शेजार्यांचा बोका Exclusive आम्हाला त्रास द्यायलाच जन्माला आलेला आहे ! :) लेखाबद्दल : छान लेख ! पण शिर्षक असे असायला हवे होते : असा अनुभव पुण्यातही येउ शकतो! :)
14 Mar 2011 - 5:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
उगा काहीतरीच! अहो, सगळे बोके हे फक्त त्रास देण्यासाठीच जन्माला आलेले असतात. (सांपल साईझ < ४.)
उगा काहीतरीच! मी पुण्यात रहाते, माझी स्कूटर पुण्यात रहाते म्हटल्यानंतर हा अनुभव पुण्यातच येणार ना!
14 Mar 2011 - 6:49 pm | उगा काहितरीच
मला माही तच नव्हते जगातले सर्व सज्जन , सोज्वळ मानसे पुण्यात राहतात ते ! आता म्हणे पुण्यात शनी शींगनापुरसारखे विना दरवाज्याचे घर बांधनारेत!
.
.
उगा काहीतरीच! अहो, सगळे बोके हे फक्त त्रास देण्यासाठीच जन्माला आलेले असतात. (सांपल साईझ < ४.)
तुमच्या अॅक्टीव्हाचं सिट कधी फाडलं का हो आमच्या शेजारच्या बोक्यानं ?विश्वास ठेवा हो "तो" बोका फक्त मलाच त्रास देतोय! खरंच!!
14 Mar 2011 - 1:49 pm | गणपा
५ कलमी कायद्याने मुस्कट्दाबी झाली असल्याने हा गोग्गोड प्रतिसाद. ;)
अभिनंदन अदिति लगोपाठ दुसरी शेंचुरी मारणार तु.
मनीच्या बाता : ह्या अदितीला सच्याच्या जोडीला टीम मध्ये पाठवावी का?
आंतरमनीच्या बाता : ती शेवटची ५ कलमे जोडली नसतीस तर त्रिशतक झळकवुन सेहेवागला पण मागे टाकलं असतर तु.
14 Mar 2011 - 2:21 pm | इंटरनेटस्नेही
अतिशय चांगला अनुभव. बहुतेक लेखिका-ताई ने पुर्वजन्मी काहीतरी पुण्य केले असावे!
आमच्या सारख्या पापी मंडळींना पुण्यात http://www.misalpav.com/node/13771 असे अनुभव येतात.
14 Mar 2011 - 2:22 pm | कवितानागेश
किल्ली विसरणारी व्यक्ती नंबर मात्र लक्षात ठेवेल याबद्दल माझ्या मनात शंका आहे. ;)
खरं सांग अदिती, कुणाची अॅक्टिव्हा आणलीस? ( डोळे वटारुन बोट नाचवणारी स्मायली)
14 Mar 2011 - 2:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
दुसरी किल्ली तेव्हा माझ्याकडे नसल्यामुळे नक्की कोणाची अॅक्टीव्हा आणली ते सांगता येणार नाही. पण एकूण स्कूटरवरची धूळ आणि आतलं हेल्मेट पाहून ती स्कूटर माझीच असावी असा दाट संशय मला आला. ;-)
14 Mar 2011 - 2:58 pm | सहज
शिवसेना-भाजप यांच्या शासनकालात जातीय दंगली झाल्या नाही असे म्हणल्यावर तत्कालीन विरोधी पक्ष म्हणाले की दंगल करणारेच आता शासनकर्ते झाले म्हणुन दंगली झाल्या नाहीत. त्याच चालीवर म्हणतो , खुद्द स्कूटरचोरच सिनेमे बघण्यात व्यस्त असल्याने त्यावेळात इतर कोणाच्याच गाड्यांना काही इजा झाली नाही.
तुम्हीच सांगा दाउद इब्राहीम वगैरेंची गाडी चोरीला गेल्याचे ऐकले आहे का कोणी?
म्हणूनच म्हणतो असा अनुभव फक्त पुण्यातच नाही तर कुठेही येउ शकतो फक्त चोरांनी कामावरुन सुटी / निदान थोडावेळ ब्रेक घेणे गरजेचे.
14 Mar 2011 - 3:13 pm | नितिन थत्ते
चोरांचेही काही उसूल असणारच.
14 Mar 2011 - 3:57 pm | नन्दादीप
चोरंचे उसूल पैकी काही:
१. कधीच दुसर्या चोराच्या घरी चोरी करु नये.....
ह. घ्या.
14 Mar 2011 - 3:01 pm | योगप्रभू
अध्यक्ष महोदय, गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो!
पुण्यनगरीचा रहिवासी या नात्याने आज मी तुम्हाला अलिकडचेच २ रंजक अनुभव सांगणार आहे. कृपया तुम्ही ते शांतचित्ताने ऐकून घ्यावेत, अशी नम्र विनंती...
१) काही काळापूर्वी कांदा किलोला ७०-८० रुपयांपर्यंत भडकला होता तेव्हाची ही गोष्ट. तुम्हाला माहीत असेलच, की पुण्यात काही पाट्या कायमस्वरुपी लागलेल्या असतात (उदा : ही गप्पा मारायची जागा नव्हे. गेटसमोर गाडी लावल्यास हवा सोडली जाईल. बेसिनवर खाकरे, गुळण्या काढू नयेत, फक्त हात धुवावा. सुटे पैसे देणे, आमची टांकसाळ नाही. वगैरे वगैरे) काही पाट्या हंगामी असतात. त्यातील एक म्हणजे 'जादा कांदा मिळणार नाही. ग्राहकांनी मागू नये.' तर अशीच पाटी झळकणार्या पुण्यातील एका नामवंत मिसळ केंद्रात मी गेलो. मिसळीवर चमचाभर चिरलेला कांदा होता. मी मालकांना सांगितले, 'साहेब तुमची पाटी बघितली, पण चमचाभर कांदा आमच्या घशाखाली उतरत नाही. मी फुकट मागणार नाही. तुम्ही कितीही पैसे लावा, पण मला आणखी कांदा द्या.' त्यावर मालकही नम्रपणे म्हणाले, ' माझा नाईलाज आहे. मी कांदा देणार नाही. मी हात जोडतो तुम्हाला. कांदा मागूच नका.' मी नम्रपणे म्हणालो, 'साहेब. कांद्याचे रेशनिंग सुरु झालेले नाही. ८० रुपयात किलोभर कांदा मिळतोच आहे. त्यातला एक कांदा मला चिरुन हवा आहे. पुढच्या वेळेस मी घरुनच डब्यात चिरलेला कांदा घेऊन येईन. पण आता वाटीभर कांद्याचे अगदी दहा रुपये द्यायला मी तयार आहे. माझा मिसळीचा आनंद हिरावू नका.' त्यावर मालक म्हणाले, 'एक काम करा. मिसळ पार्सल घेऊन जा आणि घरी बसून त्यावर घरचा किलोभर कांदा चिरुन घाला आणि खा. तत्त्व म्हणजे तत्त्व. कांदा देणार नाही.'
कांद्यापेक्षाही त्या महापुरुषाच्या तत्त्वनिष्ठेमुळे माझ्या डोळ्यात पाणी आले.
२) बागेत दहा राऊंड फिरल्यानंतर मी दमून बेंचवर शांतपणे विसावलो होतो. समोर चिमणी पाखरे खेळत होती. ते बघण्यात तल्लीन झालो होतो. तेवढ्यात माझ्या खांद्याला कुणी तरी स्पर्श केला. एक काटकुळे काका शेजारी बसले होते. त्यांनी विचारले, 'काय निवांत बसलाय?' मी म्हणालो, 'हो. छान वाटतंय.' मग काकांनी माझी चौकशी करणारे प्रश्न विचारायला सुरवात केली. मीही त्यांना सगळी उत्तरे दिली कारण त्या रिलॅक्सिंग स्टेटमध्ये मला चिडायचे नव्हतेच. काकांनी अर्धा तास खूप पिळले. मग आश्चर्यकारकरीत्या एक प्रश्न विचारला, 'काय हो! मी अर्ध्या तासापासून तुम्हाला भंडावतो आहे. तुमचे मन अस्वस्थ नाही का झाले?' त्यावर मी म्हटलो, 'नाही. मला शांततेचा आनंद घ्यायचा आहे.' त्यावर काका म्हणाले, 'इथेच चुकते तुमचे. मन शांत म्हणजे शरीर शांत. अशा शांत शरीरातच चरबी साठते आणि माणूस सुटत जातो. मी पहा कायम अस्वस्थ मनाने वावरतो. दिसेल त्याला पीडतो. कुणी अपमान केला तरी अंगाला लाऊन घेत नाही. म्हणूनच माझ्या अंगावर चरबी नाही. तुमचे शरीर सुटायला लागले आहे. म्हणून वाटले मुद्दाम तुम्हाला सांगावे.' त्या काकांच्या या परोपकारी वृत्तीबद्दल मी त्यांचे आभार मानले. उठताना काका पुन्हा म्हणाले, 'नुसते बेंचवर बसण्यापेक्षा चांगले पाच राऊंड फिरा. त्याचा फायदा होईल.' मी 'बरं' म्हणालो आणि सहज विचारले, 'तुम्ही जनगणना करण्याचे काम करता का? इतके सगळे तपशीलवार प्रश्न विचारलेत म्हणून?' त्यावर काका म्हणाले, 'नाही. प्रश्न तितके महत्त्वाचे नसतात. काल मी तुमच्यासारख्याच एकाशी (म्हणजे स्थूल) राजकारणावर वाद घातला.' त्या महात्म्याला मी नम्रपणे वंदन केले.
पु. ल. किंवा व. पुं. ना ही व्यक्तीरेखा भेटायला पाहिजे होती, असे आवर्जून वाटले.
14 Mar 2011 - 3:59 pm | sagarparadkar
>> कांद्यापेक्षाही त्या महापुरुषाच्या तत्त्वनिष्ठेमुळे माझ्या डोळ्यात पाणी आले
माफ करा पण आपल्याला तत्व (तत्त्व नव्हे) नीटसे समजलेले दिसत नाही. आपल्याला जादा दर आकारून थोडा जादा कांदा दिलाही असता. पण मग ते पाहून इतरांना पण द्यावा लागला असता. आणि मग कांदा लवकर संपून गेल्यावर नंतर येणार्या ग्राहकाला बिना कांद्याची मिसळ द्यावी लागली असती, आणि ते ग्राहक दुखावले गेले असते. जे जगात कोणत्याच व्ययसायाच्या तत्वात बसत नाही ते आम्हा पुणेकरांकडून अपेक्षिताच कसे?
एखाद्या 'स्टार बक्स' मधे जावून एकाच टॉल लॅटेमध्ये तेथे ठेवलेले मधाचे सगळेच 'सॅशे' रिकामे करता का? नसाल करत तर आता करून बघा. म्हणजे उपरोल्लेखित जागतिक तत्वाचा पुनर्परिचय कसा करून दिला जाईल ते अनुभवाला येईल :)
14 Mar 2011 - 4:04 pm | चिरोटा
प्लानिंग का काय म्हणतात ते हवे की नको? कितीही चटणी मागा,उडपी देतो ना?
14 Mar 2011 - 4:32 pm | sagarparadkar
अहो सर, त्यांनी उपलब्ध पदार्थाचे आपत्कालीन परिस्थितीत, सर्वांसाठीच मर्यादित प्रमाणात वाटप करायचे ठरवले हे उत्तम नियोजनच (पक्षी प्लानिंग) नव्हे तर काय आहे? पण आपण तर त्या उत्तम नियोजनालाच नावे ठेवत नाही आहोत का?
नारळ कोणत्याही कारणानी अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असेल तरी उडपी जादा चटणी (ओल्या खोब्र्याची, इतर कुठली देउ शकेल.) देतो का? मला स्वतःला तरी तसा अनुभव नाही. उलट जादा चटणी किंवा सांबाराचे 'अॅडिशनल चार्जेस' पडतील म्हणून आधीच सांगतात.
14 Mar 2011 - 4:40 pm | चिरोटा
हे असले आपत्कालीन विचार सर्वांसाठी करत बसला तो तर तो कधीच मोठा होणार नाही.उडपी असता तर त्याने १० ऐवजी १५ रुपये लावले असते योगप्रभूंना , मिसळीत जरा जास्त तिखट घातले असते आणि वर २५ रुपयांची मस्तानी घशात उतरवली असती .
योगप्रभू, मिसळ खाल्ल्यावर पियुष,मस्तानी पिता ना तुम्ही?
14 Mar 2011 - 5:07 pm | योगप्रभू
सागरजी,
गंमतीशीर अनुभवाची गंभीर चिरफाड करायचीच झाली तर..
मी पुण्यातीलच रहिवासी आणि व्यावसायिक आहे. व्यवसायाची तत्त्वे मलाही थोडीबहुत कळतात, असा माझा गैरसमज आहे. त्यानुसार कोणताही हुशार व्यावसायिक नंतरच्या चार ग्राहकांचा विचार करण्यापेक्षा सध्या समोर असलेला ग्राहक दुखावून जाऊ नये याचा जास्त विचार करेल (उडत्या ससाण्यापेक्षा हातातले कबूतर केव्हाही चांगले, असे चाणक्य म्हणतो.) त्यातून माझ्या ऑफरमध्ये त्याला फायदाच होता. कांदा बाजारात ८० रुपये किलोने असला तरी जेथे मोठ्या प्रमाणात कन्झ्युम होतो ते लोक घाऊक दराने मार्केटयार्डमधून पोते आणतात. इफेक्टिव्ह रेट किलोला ३५ ते ४० रुपये पडतो. एक किलो कांद्याच्या किती वाट्या होतात? (मिसळीबरोबर जी वाटी दिली जाते तिचा आकार लक्षात घ्या) त्यापैकी एका वाटीसाठी मी १० रुपये द्यायला तयार होतो. बरं कांदा बाजारात शिल्लक नाहीच, अशा स्थितीत त्याचा हेका समजू शकतो.
असो. त्याचे तत्त्व मला खरोखर समजले नसावे, हे तुमचे म्हणणे बरोबर आहे.
धंदा हा फायदा मिळवण्यासाठीच करायचा असतो, हे आपले आमचे जुने तत्त्व आहे.
(बरं झालं. यावरुन एक जुनी आठवण झाली. मागे एकदा मी हैदराबादला गेलो होतो. तेथे एका मारवाड्याच्या खानावळीत गेलो. मेनू कार्डवरच मूळ जेवणाची किंमत आणि जादा पदार्थांची किंमत लिहिली होती. एक चमचा साखर - ५० पैसे, एक वाटी दही -पाच रुपये असा तपशील होता. त्यामुळे फायदा असा झाला, की मला कुणाशी हुज्जत न घालता शांतपणे जेवता आले आणि जादा पदार्थांची किंमत चुकती करुन मी बाहेर पडलो.)
14 Mar 2011 - 5:24 pm | sagarparadkar
>> मी पुण्यातीलच रहिवासी आणि व्यावसायिक आहे.
बास , बास यातच सर्व काही आले :) :) :)
अहो साहेब हे आधीच सांगितले असतेत तर मी पण तुमचे किस्से ऐकून 'एन्जॉय' केले असते . पुण्यातील रहिवासी आहात हे वाचले होते, पण मूळ रहिवासी की काही काळापूर्वीच स्थलांतरीत ह्याबद्दल थोडा संभ्रम वाटत होता :) :)
पण कोणी परनगरी (परदेशी प्रमाणे) स्थित नागरीक ह्या पुण्यनगरीच्या पुण्यप्रद नागरीकांची टवाळी करू लागले की मग आम्हा सामान्य पुणेकरांची 'अस्मिता' उफाळून येते ... असो.
14 Mar 2011 - 5:37 pm | विश्वनाथ मेहेंदळे
थोडक्यात म्हणजे, मुद्दा काय आहे या पेक्षा कुणी मांडला हे महत्त्वाचे.
सदर प्रतिसादक पुणेकर आहे हे कळल्यावर "उत्तम नियोजन", "सर्वांसाठीच मर्यादित प्रमाणात वाटप करण्याची निरपेक्ष वृत्ती" वगैरे वगैरे गेले का तेल लावत ??
14 Mar 2011 - 5:50 pm | sagarparadkar
जे नवस्थलांतरीत पुणेकर असतात ते बहुतेक वेळेस 'अभिजननिवासक्षेत्रवंचित' असतात (म्हणजे काय ते आपल्या लक्षात नक्कीच आले असणार, म्हणून अधिक स्पष्टीकरण देणे न लगे :) ). म्हणून मग ते पण आम्हा भूमिपुत्र पुणेकरांवर खार खात, जमेल तिथे जमेल तेव्हा वार करायची संधी शोधत असतात.
सदरहू प्रतिसादक त्यांपैकी असावा अशी शंका आल्याने तसा प्रतिसाद टाकावा लागला.
14 Mar 2011 - 5:53 pm | परिकथेतील राजकुमार
अगदी अगदी.
मात्र प्रभु पुण्याचे आहेत हे माहित असल्याने गप्प होतो ;)
बादवे तसेही नदीच्या पलिकडे आपल्यासाठी पुण्याची हद्द संपते.
14 Mar 2011 - 5:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हो, आणि आपणच कसे अलिकडच्या बाजूचे हे सांगण्यासाठी पुण्यात जागतिक महायुद्ध घडतात.
14 Mar 2011 - 6:36 pm | योगप्रभू
मणिरत्नमच्या 'बॉम्बे' चित्रपटात एक दृश्य आहे.
एक जमाव बेफाम होऊन मारायला धावत असतो. एक हातगाडीवाला गाडा ओढत चाललेला असतो. त्याला विचारतात, 'बोल तू हिंदू है या मुसलमान' त्यावर तो म्हणतो, 'अगर आप हिंदू हो तो मुसलमान समझकर मुझे काट डालो और अगर मुसलमान हो तो हिंदू समझकर मारो.'
त्याप्रमाणे पुण्यावर चवताळून असणार्यांसाठी मी पुणेकर आहे
आणि पुण्याचा अभिमान मिरवणार्यांसाठी मी 'नदीपल्याड'चा मानूस हाय. :)
14 Mar 2011 - 6:21 pm | वपाडाव
येक क्रमांकाचे कंपुबाज उत्तर...
झाकीर णिषेद....
14 Mar 2011 - 4:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी खूप प्रयत्न केला हे अनुभव शांतचित्ताने ऐकून घेण्याचा, पण दुर्दैवाने हे जमलं नाही याची आधीच कबुली देते.
तुमचे हे दोन अनुभव वाचून साक्षात पराब्रह्म मिळण्याचा आनंद झाला. माझ्या अनुभवामुळे मला 'आज फिर जीने की तमन्ना है' गाणं आठवलं तर तुमच्या अनुभव वाचनामुळे मला 'कभी कभी अदिती जिंदगी मे..' हे गाणं आठवलं. अशी महान सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि अनुभविक परंपरा असणार्या शहरात मला काही काळासाठी का होईना नोकरी मिळाली, नोकरीच्या निमित्ताने मला स्कूटरवर प्रवास करण्याची संधी मिळाली, प्रवास करताना अनेक ठिकाणी गर्दी झाल्यामुळे मानवी भावनांचे कंगोरे अनुभवता आले आणि माझं अनुभवविश्व फारच समृद्ध आणि प्रगल्भ झालं याचा विचार करून, माझ्या अंतःकरणात विविध कृतज्ञ भावनांचा कल्लोळ उठून अतिशय हृद्य वाटलं हे मी मुद्दाम नमूद करू इच्छिते.
योगप्रभू, तुमच्या प्रतिसादाबद्दल तुमचे विशेष आभार.
14 Mar 2011 - 3:24 pm | विजुभाऊ
पुण्याची काही गुणवैशिष्ठ्ये
१) तुमच्या अंगातला माजोरीपणा घालवून तुमच्या अंगी नम्रपणा आणण्यात मदत करणे.
(कोण रे तो म्हणाला की पुण्यात कमीत कमे शब्दात अपमान करून मिळतो म्हणून...)
२) अगदी अपवादात्मक पहायला मिळणार्या छोट्याशा का होईना पण पुण्यात अनुभवलेल्या चांगल्या प्रसंगाचे कौतूक करण्याची संधी मिळते.
३) पौड रस्त्यावर एकाच वेळेस आगबोट ,सायकल ,विमान चालवण्याचा अनुभव मिळ॑तो.
( औंध च्या रहिवाशाना हे सूख मिळत नाही)
४) तुम्ही गाडी चालवताना अत्यंत चौकस रहायची प्रॅक्टीस घेतली जाते.
५) गाडी चालवताना / पीएम टीत बसताना "एक ना एक दिवस सर्वानाच जायचे आहे" हा अनुभ्व प्रत्यक्षात मिळून घाऊक प्रमाणात विरक्तता अंगी बानवली जाते.
15 Mar 2011 - 11:59 pm | किशोरअहिरे
गाडी चालवताना / पीएम टीत बसताना "एक ना एक दिवस सर्वानाच जायचे आहे" हा अनुभ्व प्रत्यक्षात मिळून घाऊक प्रमाणात विरक्तता अंगी बानवली जाते >>>
ही पंचलाईन तर सगळ्यात बेस्ट..
लैच भारी ऊत्तर आहे विजुभाऊ :)
14 Mar 2011 - 4:25 pm | अमोल केळकर
या धाग्यानिमित्याने - काल स्टार प्रवाह वरचा - मुंबई-पुणे सिनेमा आठवला :)
अमोल
14 Mar 2011 - 4:40 pm | वपाडाव
बाकी कायबी म्हणा...
पन फुडच्या येळी सिनेमाला कदी अन कुटं जाणार हा त्ये मातर सांगा.
ह्या टैमाला झाली गल्ती परिक आता न्हाइ व्हउ देणार...
14 Mar 2011 - 5:33 pm | इरसाल
हे प्रकरण पुणेरी पुण्यात, मुंबेरी पुण्यात कि नागपुरी पुण्यात घडले?
एक धडक धडक भाबडा प्रश्न ?????????????
14 Mar 2011 - 6:01 pm | राजेश घासकडवी
एकही चांगला अनुभव कोणी सांगितला नाही हे पाहून वाईट वाटलं. 'तुमची गाडी चोरीला गेली नाही म्हणजे ती भंगार असणार' वगैरेसारखे प्रतिसाद बघून तर फारच वाईट वाटलं. पुण्यातल्या लोकांच्या चांगुलपणाविषयी इतकी खात्री? मिपावर सगळे पुणेद्वेष्टेच भरलेले आहेत का?
मी मला आलेला एक चांगला अनुभव सांगतो. तोही पुण्यातल्या रिक्षावाल्याकडून.
एकदा मी रिक्षा पकडली तेव्हा तो रिक्षावाला त्याच्या मीटरशी काहीतरी खाटखूट करत होता. ते पाहून मला संशय आला. वाकडेवाडीहून आयडीयल कॉलनीमध्ये जाण्यासाठी रिक्षाचे ५२ - ५६ रुपये होत असत. दर वेळी रिक्षावाले आपल्याला मीटर कळतच नाही अशा थाटात ६०, ६५ असे काहीही आकडे सांगत. मग त्यांच्यासमोर गणित करून दाखवायचं आणि मोजके पैसे द्यायचे अशी माझी पद्धत होती. आता या माणसाशी काय वाद घालायचा हेच मी पोचेपर्यंत मनाशी ठरवत होतो.
उतरण्याची वेळ आली तेव्हा त्याने मीटरकडे बघून सांगितलं. '३२ रुपये झाले'. ते ऐकून मी उडालोच. त्याच्या मीटरमध्ये खरोखरच खूपच कमी आकडा होता. मग मी त्याला म्हटलं 'अहो, तुमचं मीटर स्लो आहे, नेहेमी पन्नासपेक्षा थोडे जास्त होतात' असं म्हणून मी त्याला खिशात मोजून ठेवलेले ५४ रुपये दिले.
पण आपलं मीटर बिघडलेलं असलं तरी प्रामाणिकपणे मीटरबरहुकुम इतके कमी पैसे मागितले याचं मला बरं वाटलं. आत्तापर्यंत मला दुसऱ्या कुठच्या शहरात इतका चांगला अनुभव आलेला नाही.