गीर - सिंहांच्या देशात

Manish Mohile's picture
Manish Mohile in कलादालन
26 Feb 2011 - 11:36 pm

गुजरात पर्यटन विभागाची रेडीयो मिर्ची वरील अमिताभ बच्चन च्या धीर गंभीर आवाजातील गीर ची जाहीरात ऐकून माझ्या पुण्याच्या मेव्हण्याने कल्पना पुढे मांडली - गीरला जाण्याची. ताबडतोब फोनाफोनी झाली आणि संक्रांतीला जोडून आलेल्या रविवार आणि सोमवारी जाण्याचे नक्की झाले. नेटवर हॉटेल बुकिंग झालं, लायन सफारी बुकिंग झालं.

गीर पासून जवळ ४० कि,मी. वर आहे सोमनाथ - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि ६० कि. मी वर आहे दीऊ. आम्ही दीऊला आधी जाऊन आलो होतो म्हणून या वेळी फक्त गीरला जायचं ठरलं. परत जाताना सोमनाथचे दर्शन घ्यायचं नक्की केले.

अखेरीस ठरल्याप्रमाणे १६ जानेवारीला सकाळी आम्ही ११ जण टेम्पो ट्रॅव्हलर करून अहमदाबादहून सकाळी ६:१५ ला निघालो आणि दुपारी १:३० वाजताच्या सुमारास आमच्या हॉटेल वर पोचलो.

गीर - आशियाई सिंहांचे जगातील एकमेव नैसर्गिक वसतीस्थान. अहमदाबाद पासून साधारण ४००-४५० कि.मी. दूर - जुनागढ जिल्ह्यामध्ये आहे गीर अभयारण्य. १४३६ चौ. कि.मी. क्षेत्रफळाच्या या अभयारण्यात आजमितीला साधारण ४११ सिंह आहेत. आमच्या सफारी दुसर्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी होत्या - मुद्दामहून आम्ही त्या तश्या बुक केल्या होत्या कारण सकाळी लवकर आणि संध्याकाळी जंगली जनावरे दिसण्याची शक्यता जास्तं असते.

म्हणून पोचल्या दिवशी दुपारी आम्ही जवळ्च्या सासण गावात फेरफटका मारायला निघालो.

तिथे नदीकाठाजवळ काही पक्षी बघायला मिळाले.

Black Headed Ibis

एका छोट्या खारुताईचा झकास फोटो मिळाला.

दुसरा दिवस. सोमवार सकाळ - ६:१५ वाजता बर्फाळ गार वारं अंगावर घेत ओपन जिप्सी जीप्समधून आम्ही निघालो - सिंहांच्या देशात.

सुरवातीला spot झालं चितळ. ४११ सिंहाना पुरेसे भक्ष्य मिळावे म्हणून या जंगलात अंदाजे ४०००० चितळ, २०००-२५०० सांबरे आहेत.

आजूबाजूला दिसणारे विविध पक्षी बघत जंगल शोभेचा आनंद लुटत आम्ही चाललो होतो.

आणि मग तेवढ्यात आमच्या गाइडने दाखवले - pug marks - जंगलच्या राजाच्या पावलाचे ठसे.

आणि थोडे पुढे गेल्यावर दर्शन झाले जंगल च्या राजाचे. जेमतेम दहा ते पंधरा फुटांवरून जंगलामध्ये मुक्त असलेला सिंह बघणे हा एक अत्यंत रोमांचक आणि थरारक अनुभव आहे.

थोडे पुढे गेल्यावर दिसल्या महाराणी.

सिंह दिसल्याच्या आनंदात , तो थरार मनात ताजा ठेवत आम्ही होटेल वर परत आलो - सन्ध्याकाळच्या सफारी ला जाण्याच्या तयारीने.

दुपारी पुन्हा एकदा पहिल्यांदा दिसले सांबर.

आणि आमचं नशीब जोरावर असल्याचे परत एकदा सिद्ध झाले. आम्हाला परत "Lion Sighting" झाले - या वेळी दिसली एक सिंहीण तिच्या छाव्यासहीत.

तिथून थोडे पुढे गेलो आणि परत एक पूर्ण वाढलेली सिंहीण दिसली - अत्यंत जवळून.

गीर ला जाण्याचा मुख्य ऊद्देश आमच्या अपेक्षेबाहेर सफल झाला होता. आम्ही खरोखर नशीबवान होतो. आम्हाला दिसले त्याच्या आधी ४ दिवस कोणालाही सिंहांचं दर्शन झालं नव्हतं - इति आमचा गाईड.

ते खरं की खोटं ते माहीत नाही पण आम्हाला मात्र जंगलच्या राजाचं, राणीचं आअणि राजकुमाराचं एकदम जवळून झकास रोमांचक आणि थरारक दर्शन झालं.

अमिताभ बच्चन जाहीरातीमध्ये म्हणतो - "गीर की जंगलोंमें अपनेसे पंधरा फुट की दूरी पर जब शेर को देखा तो पैर जमींपर आ गये और अभिमान घुटनोपर". या वाक्याची सत्यता पूर्णपणे अनुभवायला मिळाली.

जमेल तेव्हा परत गीर ला यायचं असं मनाशी नक्की करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.

प्रवासछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

पैसा's picture

26 Feb 2011 - 11:48 pm | पैसा

सगळेच फोटो झक्कास!

चिंतामणी's picture

27 Feb 2011 - 12:54 am | चिंतामणी

सर्वच छान आहेत.

छोट्या खारुताईचा, चितळाचा, सिंहीण तिच्या छाव्यासहीत आणि एकटीचा हे विषेश छान आहेत.

nishant's picture

27 Feb 2011 - 2:32 am | nishant

फोटो छान आलेत.माझ्या गीरच्य Safari त मला चितळ आणि सांबरां व्यतिरिक्त काहिहि दिसल नाही.तुम्हि फारच नशिबवान ठरलात!!!

५० फक्त's picture

27 Feb 2011 - 8:47 am | ५० फक्त

मनिश, लई धमाल फोटो, तुमचे हॉटेल व सफारीचे बुकिंग डिटेल्स देउ शकाल काय, मी पणं जाईन म्हणतो. एक्दा उराउरी भेट घ्यावी सिंहाची, याचि देहि याचि डोळा.

.

प्रास's picture

27 Feb 2011 - 11:44 am | प्रास

मनिष,

मिपाच्या भाषेत म्हणायचं तर "एकदम ज ह ब ह र्‍या!"

गीरला जायचे मनात योजणारा -

मुलूखावेगळी's picture

27 Feb 2011 - 11:58 am | मुलूखावेगळी

वा १दम मस्त फोटोज
खारु ताइ आनि सिन्ह खुप्प छान

पियुशा's picture

27 Feb 2011 - 12:36 pm | पियुशा

खतरनाक १ नम्बर फोटो !

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Feb 2011 - 1:11 pm | निनाद मुक्काम प...

दरवेळी भारत भेटीत भारत दर्शन आमच्या कुटुंबाला घडवून आणायचे आहे .त्यात गीर आता पक्के झाले
.गोर्यांना जंगलाचा राजा फक्त डिस्कवरी सारख्या वाहिन्या किंवा त्यांच्या प्राणी संग्रालयात दिसतो
.
असा मुक्त संचार असणारे वन्य जीवन पहायचे तर आफ्रिका किंवा भारताला पर्याय नाही .
जिजामाता उद्यानातील पोट खपाटीला गेलेले वन्यजीव पाहून जीव गलबलतो .

आमच्या संस्थानिक व गोर्या साहेबांच्या कृपेने भारतीय चित्ते नामशेष झालायचे पाहून खूप वाईट वाटते .
बाकी आपल्या गीर दौर्याचे उत्तम सिंहावलोकन आमच्या बरोबर शेअर केल्याबद्दल आभार .

यशोधरा's picture

27 Feb 2011 - 4:42 pm | यशोधरा

मस्त आहेत फोटो! खारुताईचा फोटो झक्कास :)
निळं, निळं पाणी एकदम शांतवणारं वाटतय. सिंह कुटुंबिय तर एकदम डौलदार.

आत्मशून्य's picture

28 Feb 2011 - 1:21 am | आत्मशून्य

खारीचा फोटो झक्कास.. "आइस एज" चीत्रपटातील पात्र आठवले....

बाकी तूम्ही फटू यक्दम स्टायलीश काढता राओ......

शुचि's picture

28 Feb 2011 - 7:03 am | शुचि

रूबाबदार जनावर!!

स्पंदना's picture

1 Mar 2011 - 7:45 am | स्पंदना

कसा भाव आहे ना सिंहाच्या चएहर्‍यावर?

आले परत ! असा.

पण आवडल. पंज्याचा फोटोअ काय आहे ना? किती मोठा आहे तो पंजा.

गणेशा's picture

1 Mar 2011 - 9:05 pm | गणेशा

अप्रतिम ..

सर्वसाक्षी's picture

1 Mar 2011 - 9:39 pm | सर्वसाक्षी

प्रकाशचित्रे आवडली. खारूताई अधिक आवडली.

अप्रतिम..
सर्वच प्रचि सुंदर आली आहेत.
खारुताईचे विशेष आवडले. शेवटून चौथा (सिंहीणीचा) ही मस्तच!!

-रंगोजी

पप्पू's picture

2 Mar 2011 - 12:23 pm | पप्पू

मी तर फोटो पाहूनच घाबरलो

निवेदिता-ताई's picture

2 Mar 2011 - 10:44 pm | निवेदिता-ताई

अप्रतिम...सर्वच फ़ोटो...
खारुताई फ़ार आवडली...:)

खूपच छान
खारूताई मला पण आवडली