आठवतात दिवस ..काही दिवसांपुर्वीचे.. नाही काही वर्षांपुर्वीचे
कीती प्रफ़ूल्लीत होते ना मी ?
अमेरीकेला जायच म्हणून..
उधान आल होत .. आनंदाला
लग्न ठरल होत ना माझ , सगळीकडे आनंद उत्सव चालू होता
मी हे बघणार, मी येथे जाणार
मी हे करणार, मी थोडीशी अजून शिकणार..
सगळी स्वप्न पदराला बांधून निघाले होते मी
जाताना मावेल तेव्हडा माझा 'भारत'
साठ्वून घेऊन चालले होते मी .. मनात.. ह्रदयात..
पाउल ठेवले ना मी त्या स्वप्नमय दूनियेत
सगळे वेगळेच दिसले मला
माणसे .. (हसून) छे मशीन म्हणायच त्यांना
भ्रमनिरास.. फ़क्त भ्रमनिरास..
मग साठवलेला 'भारत' आठवत होते मी .. हळू हळू
काही दिवसांनी ..
माझ्या लेकीला माझ्याच संस्कृतीचे पाठ पढवायचे .. ठरवले मी
पण
भारत, इंडिया, हिंदुस्थान यातल्या नक्की कुठल्या देशात तू रहायची मॉम ?
घ्या संस्कृती शिकवायला चाललेली मी
भ्रमनिरास फ़क्त भ्रमनिरास
जाउद्या नावात काय आहे म्हंटल
शिकवावे तीला जन गण मन, वंदे मातरम
सांगावेत सुभाष चंद्र भोस .. गांधी .. शिवाजी महाराज
पण मी माता होते..
कदाचीत.. शिक्षिका नाही होउ शकले
माझी मुलगी येईल कदाचीत ईतक्यात
कदाचीत .. डिस्कोबार मधील पार्टीत उशीर झाला असेन
कदाचीत ...? आश्चर्य वाटल ना..?
अहो नाही शिकवू शकले मी..माझी संस्कृती
पण सवय लाउन घेतली आहे मी
ईथल्याच वळणाची ...
-- शब्दमेघ ( स्त्री .. भावनांचा प्रवास मधुन)
प्रतिक्रिया
17 Feb 2011 - 1:53 pm | प्रकाश१११
गणेशा एकदम झकास. छान अनुभव मांडलात...
आवडली नि भिडली हृदयाला.
17 Feb 2011 - 1:55 pm | आजानुकर्ण
* हे ठिकाण
* कविता
* भयानक
सुयोग्य वर्गीकरण
17 Feb 2011 - 11:04 pm | रेवती
हे आजकाल इंडीयात्/भारतातही बघायला मिळतं.....अगदी सर्रास.
कविता आवडली.
17 Feb 2011 - 11:23 pm | विकास
अजानुकर्ण आणि रेवतीच्या प्रतिसादाशी एकदम सहमत. :-)
18 Feb 2011 - 2:39 am | भडकमकर मास्तर
दीर्घोत्तरी प्रश्न :
१.अमेरिकेत भ्रमनिरास होतो असे कवयित्रीला का वाटते?
२. कवयित्रीने आपल्या मुलीला संस्कृतीची ओळख कशी करून दिली आहे?
संदर्भासहित स्पष्टीकरण करा...
१.पाउल ठेवले ना मी त्या स्वप्नमय दूनियेत
सगळे वेगळेच दिसले मला
२.डिस्कोबार मधील पार्टीत उशीर झाला असेल
थोडक्यात उत्तरे लिहा
१. कवयित्रीच्या मते संस्कृतीचा पाठ कसा पढवतात?
२."माता होणे सोपे शिक्षिका होणे अवघड" या वचनावर आपले मत स्पष्ट करा
18 Feb 2011 - 4:35 am | Nile
ह्या आमच्या मास्तरांना पुरुषांना स्त्री बनवायची काय इपरीत हौस आहे कुणास ठावुक.. अहो मास्तर, गणेशा हे एक कवी आहेत. कवयत्री नाहीत हो!!!
18 Feb 2011 - 2:01 pm | गणपा
ए नायल्या नीट वाच की लेका
कविता करणारा जरी कवी असला तरी मनोगत एका स्त्रीच आहे. :)
18 Feb 2011 - 2:04 pm | Nile
नीट वाचलं की राव, पण कायच कळलं नाय.
बरं तुम्हीच सांगा गणपासेठ, कशाच्या मधुन काय प्रवास करुन राह्यलंय?
18 Feb 2011 - 2:09 pm | गणपा
ए बाबा मी काय कविते बद्दल चकार शब्द काढला का? (जे शब्द दिसले त्यावरुन ती मनोगत व्यक्त करणारी एक बाई आहे एवढ कळलं तेच माझ्यासाठी पुरेस आहे.)
काहुन नसत्या झमेल्यात अडकवतोस मला. कवितेचा नी माझा संबंध शाळेतच तुटला. ;)
18 Feb 2011 - 2:13 pm | अवलिया
बाप रे ! शाळेत असतांना सुद्धा गणपा संबंध ठेवुन होता ? ग्रेट !!
18 Feb 2011 - 9:06 pm | Nile
का? मग काय झालं संबंध ठेवले गणपानं तर?
शाळेत काय उठु नये... विचारांचे वादळ मनात?
का ठिबकु नयेत थेंब....कवितांच्या ओळींचे पुढ्यात?
18 Feb 2011 - 4:28 am | पिवळा डांबिस
जळ्ळी मेली अमेरिका ती!!!
तरी बरं अमेरिकेत गेल्या गेल्या तिथले लोकं पासपोर्ट वगैरे काढून तरी घेत नाहीत!
मग असं भरल्या घरात (आणि भरल्या पोटी!!) विव्हळावं लागत असेल तर रहायचं तरी कशाला तिथं?
रोज तिथून भारताकडे येणारी विमानं सुटतात...
भरायची बॅग, सरकवायच्या चपला, आणि सुटायचं!
चोवीस तासांत भारत, इंडिया, हिंदुस्थान!!
आहे काय त्यात!!!
:)
18 Feb 2011 - 11:38 am | गवि
X=X+1
:)
चालायचंच.. ज्यासाठी जायचं ते माहीत असलं की अशी समस्या येऊ नये.
ही मुलगी लग्न करुन "नेलेली" असल्याने भ्रम घेऊन गेली म्हणून निरास झाला असावा.
18 Feb 2011 - 9:09 am | अलख निरंजन
पिवळा डांबीस, अजानुकर्ण, नाईल, भमा असे दिग्गज आज चक्क गणेशाच्या कवितेवर प्रतिसाद द्यायला? गणेशा जिंकलास..
18 Feb 2011 - 2:34 pm | अविनाशकुलकर्णी
ने मजसी ने परत आंग्ल भुमीला
विटले मी इथल्या बजबजपुरीला
बोइंग विमाना हा प्राण तळमळला .
जणु काहि भारतातल्या मुली संध्या काळी देव दर्शनाला राऊळालाच जातात......
18 Feb 2011 - 2:38 pm | ५० फक्त
गणेशाराव , कवितेतल्या ब्लॅक बेल्ट का काय म्हणतात ना तो मिळाला तुम्हाला आता.
असो, अमेरिकन भ्रमनिरास जर असा असेल तर भारतीय भ्रमनिरास कसा असतो. हा भ्रमनिरास एका भारतीय स्त्रीचा आहे ना, यावरुन एक विचारावसं वाटतं इतर देशातुन ज्या बायका /आया अमेरिकेत जातात त्यांचा पण असा / असाच भ्रमनिरास होतो का ?
का उगाच भारतीय बायकाच असं भ्रनि भ्रनि करुन डोकं बडवुन घेतात.
काही अनुभवी मिपाकरांचे अनुभव ऐकायला आवडेल.
बाकी गणेशा, कविता छान वाटली, पण वर्गीकरणात भयानक का रे उगीचच, का आपलं टिआरपि साठी.
हर्षद.
21 Feb 2011 - 3:54 pm | गणेशा
सर्वांचे धन्यवाद ..
मी भारतीय काही स्त्रीया अश्या पाहिल्या आहेत .. म्हणुन तेच लिहिले ..
बाकी टी.आर.पी कविते साठी कदाचीत नसावाच..
जे कविता लिहितात ते ही दूसर्या कवींच्या कवितेला रिप्लाय देत नाहीत मग इतरांकडुन तर मी अपेक्षा करत नाहीच कधी.
तरीही जे कविता मन लावुन वाचतात (सर्वांच्या) त्यांचे आभार
18 Feb 2011 - 9:45 pm | नगरीनिरंजन
गणेशा, तू चुकून हिरव्या नसा दाबल्यास रे बाबा. त्यामुळेच इतक्या प्रतिक्रिया. :-)
19 Feb 2011 - 2:39 am | अडगळ
हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच की.
तरण्याताठ्या पोरीला आईनं असं एकटं बार्-बिर मध्ये सोडलंच कसं . मी म्हणतो आणखी एखादी आई असती तर पोरीबरोबर गेली असती.
(बारा चा बलुतेदार ) अडगळ