पापाची भागीदारी

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जनातलं, मनातलं
16 Feb 2011 - 10:41 pm

प्रिय ग्राहक मित्रहो,
यंदा कांद्याचा भाव आणि कांद्याचे भावाचे राजकारण चांगलेच गाजले. हे आपण जाणताच.
यावर्षी अतिवृष्टीमुळे कांद्याचे उत्पादन प्रतिएकरी कमी आले मात्र प्रति एकरी उत्पादनखर्च एकतर दरवर्षीएवढाच किंवा त्यापेक्षा जास्त आला.
उत्पादनखर्च वाढीची कारणे:
१) वाढलेले डिझेलचे भाव
२) सेंद्रीय /रा. खताच्या वाढलेल्या किमती
३) दुपटी-तिपटीने अचानक वाढलेले शेतमजूरीचे दर.
४) अतिपावसामुळे वाढलेला मशागतीचा खर्च.

खर्च वाढलेत पण उत्पादन मात्र कमी आलेत, त्यामुळे कांदा उत्पादकाला यावर्षी कांदा पिकवायला प्रतिकिलो रू. ४०/- पेक्षा जास्त खर्च आला.
*
मागणीपुरवठ्याच्या सिद्धांतानुसार, मागणी आणि पुरवठा यात तफ़ावत आल्याने कांद्याचे भाव वाढून ७०-८० रू. पर्यंत प्रति किलो एवढे वाढलेत. त्यामुळे निसर्गाने शेतकर्‍यांशी न्याय करून त्याचा उत्पादनखर्च भरून निघेल अशी व्यवस्था केली.
*
पण विद्वत्ताप्रचूर विद्वान अर्थशास्त्र्यांनी कांगावा केला. त्यामुळे नेहमीप्रमाणेच केंद्रशासनाने कांदा निर्यातबंदी केली एवढेच नव्हे पाकिस्तान मधून कांद्याची आयातही केली. अनैसर्गिकरित्या कृत्रिमपणे कांद्याचे भाव पाडलेत.
*
आता प्रतिकिलो २ रू सुद्दा शेतकर्‍यांच्या हातात पडणार नाही, अशी शासनाने पुरेपूर व्यवस्था केलेली आहे.
*
प्रिय ग्राहक मित्रहो,
आता स्वस्तात कांदा खरेदी करतांना तुम्हाला आनंद होत असेल तर आनंद जरूर माना.
पण आपल्याच देशातल्या गरीब, देशोधडीस लागलेल्या, कोणत्याही क्षणी आत्महत्या करण्याची पाळी येऊ शकते अशा कांदा उत्पादक शेतकर्‍याला आपण प्रतिकिलोमागे ३८ रुपयाने लुबाडत आहोत, याचीही जाणिव असू द्या.
*
भविष्यात एखाद्या कांदा उत्पादकाने आत्महत्या केली तर त्या पापाचे सुक्ष्म/अंशता आपणही तर भागीदार नाहीत ना? याचाही शोध घ्या.
*
हे निवेदन वाचून भावनाप्रधानही होऊ नका. कारण ग्राहकासमोर शेतकर्‍याला आता प्रतिकिलोमागे ३८ रुपयाने लुबाडण्याशिवाय इलाजही उरलेला नाही. फ़क्त हे स्वत:च्या मनात ठेवा.
तुम्हाला हे जर जिवाभावातून कळले, हृदयात सहानुभूती निर्माण झाली, नेमक्या प्रश्नाची जाणिव झाली तर "बुडत्याला लुटण्याच्या" पातकातून तरी नक्कीच मुक्ती होईल.

गंगाधर मुटे
*******

जीवनमानअर्थकारणराजकारण

प्रतिक्रिया

गंगाधर मुटे's picture

16 Feb 2011 - 10:46 pm | गंगाधर मुटे

अनेकांना प्रश्न पडतो की शेती परवडत नाही मग शेती का करतात. एकेकाळी मलाही हाच प्रश्न पडला होता.
आता मात्र उत्तर गवसले. आत्महत्या करायची वेळ आली तरी चालेल पण तो शेती करायचे सोडू शकत नाही.

कारण,

शेतकरी हा उत्पादक आहे. आणि उत्पादकाला उत्पादन केल्याशिवाय चैन पडू शकत नाही.

उदा. मुलगा मोठा झाल्यावर तुला लाथा घालेल असे कितीही मातृत्वाला समजावून सांगीतले तरी मातृत्वाची प्रसवण्याची प्रेरणा जशी कमी होत नाही, तसेच परिणाम काहीही होवोत शेतकर्‍यांची उत्पादन करण्याची प्रेरणा काही कमी होत नाही.

पण "जालिम जमाना" हे काही लक्षात घेत नाही.
२ रुपयात किलोभर कांदा मिळतो म्हटल्यावर तो जाम खुष आहे.

माझीही शॅम्पेन's picture

16 Feb 2011 - 11:03 pm | माझीही शॅम्पेन

होय ! चांगला विचार मांडला आहे ,पण थेट शेतकर्यणा फायदा होणार असेल तर काहीच प्रश्न नाही , मधले दलाल गब्बर होतात आणि ग्राहक आणि शेतकरी दोघही पिडले जातात त्याच काय ?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Feb 2011 - 11:04 pm | विश्वनाथ मेहेंदळे

कांदा वाढत वाढत जेव्हा ५० च्या आसपास जाऊन टेकला होता तेव्हा लोकसत्ता मध्ये आलेल्या बातमीनुसार वाशीच्या (किंवा इतर कुठल्याशा) घाऊक बाजारात शेतकऱ्यांना अवघे ७ रु प्रती किलो मिळत होते आणि शेतकऱ्यांचा प्रवासखर्च जेमतेम सुटला होता असे त्या बातमीत लिहिले होते. तुम्ही हा जो ४० चा उत्पादनखर्च सांगत आहात, तो खरा असेल तर शेतकरी तेव्हाही कांदा ३३ रु तोट्यात विकत होता?

अजून एक प्रश्न पडला, गेल्या वर्षी कांद्याचा उत्पादन खर्च किती होता?

प्रति किलो ४० रुपये हा शेतकर्‍याचा उत्पादन खर्च खुपच फुगवलेला वाटतो. प्रति क्विंटल ४० रुपये हा भाव बरोबर वाटतो.

शेतातुन नुकताच बाजारात आलेला कांदा हा ओला असतो. त्यामुळे त्याचे वजनही जास्त असते. तो कांदा सुखल्यावर, ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत त्याचे वजन ३० ते ४०% कमी होते (कांदा सुखल्यामुळे, सडका कांदा काढुन टाकल्या मुळे, इत्यादी).

शेतकर्‍यालाही नफा व्हायला हवा, म्हणुन त्याला मिळणारा दर ३ ते ६ रुपये प्रति कीलो (ही रेंज एकरी उत्पादन, अवेळी पावसामुळे सडणारा कांदा, ईत्यादी मुळे आहे) बरोबर वाटतो. तेवढाच खर्च व्यापारी, दलाल, अडते यांना पॅकिंक, वहातुक, जकात, हमाली आणी स्टोअरेज यांचा येतो. कांदा हा नाशवंत माल आहे. वहातुक आणी साठवणुकीत तो खराब होतो. दुकानदारांनाही दुकानाचे भाडे, नोकरांचा पगार, सरकारी टॅक्स, हप्ते आणी त्यांचा नफा वसुल करायचा असतो.

या सगळ्याचा परीणाम म्हणुनच जेव्हा शेतकर्‍याला किलोमागे ३ ते ५ रुपये मीळतात तेव्हा ग्राहक त्या कांद्याला १५ ते २० रुपये मोजतो.

सहमत आहे पण मग कांदा खायचाच नाही का?
खरंतर मलाही शेती करायची भारी हौस आहे.
तसेही दलाल रोजच फसवत असतात.
शेतकर्‍याला फसवतात तसे ग्राहकालाही फसवत असतात.
मग आता काय करायचे? भाजी खायचीच नाही का?
नेमक्या प्रश्नाची जाणिव झाली तरी काय करणार?
शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या बातम्यांनी बरे वाटणारे फारसे कोणी असतील असे वाटत नाही.

कुंदन's picture

17 Feb 2011 - 5:11 am | कुंदन

>>>तसेही दलाल रोजच फसवत असतात.

+४९,९९९

हम्म!
शेतकरी दलालाशिवाय कांदा विकू शकत नाहीत का? माझा प्रश्न तुम्हाला कदाचित अगदी अडाणीपणाचा वाटेल पण शेतकरी आणि ग्राहक दोघांना लुटणारे दलाल या सगळ्या व्यवहारातून बाजूला नाही का करता येणार? बाकी शेतकरी लुबाडला जातो याचे ग्राहकालाही वाईट वाटते पण हळहळण्यापलिकडे फारसे काही त्याच्याही हातात नसते.

शेतकऱ्यांनीच शेतातून घरात असा काही उपक्रम राबवला तर जमेल....म्हणजे शेतकऱ्यांच्याच घरचे लोक , एखादी सोसायटी काढून असे करू शकतील....लोकांनाही ताज्या भाज्या, फळे इ. माफक किमतीत मिळतील. मुटेसाहेब, तुम्ही याबाबतीत विचार करून काही पुढाकार घेऊ शकता का?

गंगाधर मुटे's picture

17 Feb 2011 - 2:18 pm | गंगाधर मुटे

शेतकरी दलालाशिवाय कांदा विकू शकत नाहीत का?

डिलर नेटवर्क किंवा दलाल यांना टाळून शेतमाल विकायचा म्हटले तर दोन पर्याय आहेत.

१) शेतकर्‍याने ग्राहकाच्या घरापर्यंत जाणे
किंवा
२) ग्राहकाने शेतकर्‍याच्या घरापर्यंत जाणे

तुम्ही ग्राहक नक्कीच आहात, तेव्हा विचार करा की तुम्हाला तरी २-४ किलो कांदा घ्यायला शेतकर्‍यांच्या घरापर्यंत जाणे शक्य आहे काय? तसा प्रयत्न केलाच तर मुंबई पुण्यावरून नाशिकला जाऊन कांदा खरेदी केला तर तो तुम्हाला काय भाव पडेल.
हेच सुत्र शेतकर्‍यालाही लागू पडते. त्यामुळे ही कल्पना व्यवहार्य नाही.

सोसायटी बद्दल म्हणाल तर दलाल परवडले पण सोसायट्या/सहकार नकोरे बाबा अशी स्थिती आहे.

खाजगी दलालांना जेवढी माया जमवता आली नाही त्याच्या हजारपट माया सहकारमहर्षींनी जमविली आहे.

.........
सरकार या शब्दाची आज व्याख्याच बदलली.
प्रशासन,पुढारी,दलाल आणि व्यापार हे आज सरकार झालेत तर शेतकरी आणि असंघटीत कामगार हे प्रजा म्हणून शिल्लक उरले आहेत.

हिंदुस्थानात शेतकरी फक्त आत्महत्या करुन घेण्यासाठीच जन्माला येतो काय ? असा मला प्रश्न पडला आहे.
त्यातही महाराष्ट्र या बाबतीत आघाडीवर आहे.काय गंमत आहे ना ? प्रगतीची आघाडी घ्यायची सोडुन अधोगती आणि अधोगतीच दिसते... :(
देशातील सर्व शेतकरी मंडळी नष्ट होवुन, सर्व गोष्टी आयात करायला लावाव्या हे धोरण मंत्री-संत्री लोकांचे असेल काय ? नाही असे विचारतोय कारण आत्महत्यांचे सत्र काही थांबतच नाहीये... कोणाला त्याची फिकीर सुद्धा दिसत नाही, शेतकरी मित्र मात्र रोज आयुष्याला कंटाळुन स्वतःची प्राण ज्योत मालवुन घेण्यास बैचेन होत चालला आहे. :(

जाता जाता :---
कांदा मुळा भाजी अवघी महागाई साची,
इथे दारु होईल स्वस्त आणि दुध होते महाग...
अवघा झाला बट्याबोळ !!! :(

नवे घोष वाक्य :---
गर्व से कहो हमारे यहा किसान आत्महत्या करते है...:(

अवलिया's picture

17 Feb 2011 - 8:57 am | अवलिया

तथाकथित फक्त व्यापारावर जगणार्‍या अर्थव्यवस्थेशी संबंधित तज्ज्ञ लोकांचे विचार वाचण्यास उत्सुक.

सगळं समजतय हो लोकांना.
काय करायचं त्याबद्दल तुमची मतं सांगा की.

सातबारा's picture

17 Feb 2011 - 11:55 am | सातबारा

- मुटे साहेब, चुकीच्या लोकांसमोर मांडलेले विचार म्हणजे अरण्यरुदनच होणार.

- @ नेत्रेश, स्वतः शेती केली आहे का? रात्री १२ वाजता लाइट आल्यानंतर कांद्याची बारी दिली म्हणजे अर्थशास्त्र कळेल. एसीत बसून शेतकर्‍याच्या जखमांवर मीठ चोळणे सोपे आहे.

- जर गाड्या १५ लाखांच्या घेता, मल्टीप्लेक्स मध्ये २०० रु. ची तिकीटे काढता, हॉटेलमध्ये १००० रु. बिल करता , तर शेतकर्‍याला कधी नव्हे तर ६० रु. भाव मिळाला तर पोटात का दुखावे? परवडत नसेल तर कांदा घेवू नका ना! तसेही कित्येक लोक कांदा खात नाहीत. कांदा जीवनावश्यक वस्तू नाहीच मुळी. त्यामुळे चैनीची वस्तू महाग झाली तर बरेच झाले, शेतकर्‍याला दोन पैसे जास्त मिळतील.

- मधले दलाल व तसेच शेतकरी का डायरेक्ट विकू शकत नाही इ. गोष्टी बोलणे ही हल्लीची लोकप्रिय फॅशन आहे. टाटा बजाज सुद्धा एवढे ताकदवान असून त्यांना डिलर नेटवर्क लागते. उत्पादक व वितरक वेगवेगळे असतात. मात्र टाटा बजाज च्या गाड्या २ रु. ला घेवून २५ रु ला ते विकू शकत नाहीत (गुणोत्तर) , मात्र शेतकर्‍याच्या माला बाबत असे केलेले चालते ही शोकांतीका आहे.

- मला तर वाटते कांदा ५०० रु. किलो व्हावा.

सुकामेवा's picture

17 Feb 2011 - 12:41 pm | सुकामेवा

सामान्य लोकांचा सुद्धा विचार केला पाहिजे कि, आय टि वाले घेतील हो जास्त पैसे देऊन कांदा, पण ज्यांचे पोट हातावर आहे ज्यांचा महिन्याचा पगार ३००० ते ४००० आहे त्यातले घराचे भाडे जाऊन ज्यांच्या हातात जेमतेम २००० ते ३००० रु राहतात त्यांचा विचार का नाही करत तुम्ही,

आय टि मध्ये जे काम करतात ते आगोदरच सगळे कर ज्यात आयकर, सेवा कर इ. कर देतातच कि, आणि जसे शेतकऱ्यांचे जसे पावसावर आवलंबून नुकसान आणि फायदा आहे तसाच आय टि वाल्यांचे मंदीच्या काळात झाले होते.

राहिला प्रश्न गाड्या फिरवायचा ज्या लोकांकडे चांगली शेती आहे व उत्पन चांगले आहे ते लोक काय गाड्या फिरवत नाहीत काय ते लोक काय बाकीचे ऐश आराम भोगत नाहीत काय?

गणपा's picture

17 Feb 2011 - 1:37 pm | गणपा

जळजळ पोहोचली.

गंगाधर मुटे's picture

17 Feb 2011 - 1:59 pm | गंगाधर मुटे

कांदा जीवनावश्यक वस्तू

या मुद्यावर एका महापंडीताने "कांदा खाल्ल्याशिवाय पुरुषाच्या शरीरात पुरूषार्थ जागविणारे हार्मोन्स तयार होत नाही" असा युक्तिवाद केला होता.

पंगा's picture

18 Feb 2011 - 10:42 am | पंगा

...आणि तुम्ही ऐकणार.

हो. माझी १० एकर शेती तसेच किराणा दुकान आहे (आजोबांच्या काळापासुन).
तसेच केंद्र् सरकारच्या सेवेत प्रथमवर्ग राजपत्रित अधिकारी (class 1 gazetted officer) म्हणुन काम केले आहे. व सध्या आय टी मध्ये काम करत आहे. त्यामुळे दोन्ही बाजु माहीत आहेत.

तुमचा नक्की काय व्यवसाय आहे?

गंगाधर मुटे's picture

18 Feb 2011 - 9:13 am | गंगाधर मुटे

हो. माझी १० एकर शेती तसेच किराणा दुकान आहे (आजोबांच्या काळापासुन).
तसेच केंद्र् सरकारच्या सेवेत प्रथमवर्ग राजपत्रित अधिकारी (class 1 gazetted officer) म्हणुन काम केले आहे. व सध्या आय टी मध्ये काम करत आहे. त्यामुळे दोन्ही बाजु माहीत आहेत.

म्हणजे प्रथम तुमच्याकडे शेती असणार, त्यात कमाई नसेल म्हणून किराणा उद्योग सुरू केला असणार.
मग त्याहीपेक्षा सोईची नोकरी वाटली असेल म्हणून राजपत्रीत अधिकारी असा प्रवास झाला असणार.

शेती होती तेव्हा मालक होता. मालकी व्यवसाय सोडून आपला कल चाकरीकडे झुकला, खरे तर यातच सर्व आले.

एखाद्या टाटा-बिर्ला समान उत्पादकाने उत्पादनाचा उद्योग सोडून "किराणा" दुकान किंवा प्रथमवर्ग राजपत्रित अधिकारी (class 1 gazetted officer) असा प्रवास केला आहे काय?

ज्याला आपण (class 1 gazetted officer) म्हणून अभिमानाने उल्लेखतो/ समजतो,
अशा अधिकार्‍यापेक्षा जास्त पगाराचे/ रुतब्याचे अधिकारी टाटा - बिर्ला नावाच्या कारखान्यात काम करतात.

टाटा - बिर्ला उत्पादक आहेत आणि या देशातला शेतकरीही उत्पादक आहे.

शेतीला प्रतिष्टा मिळवून, शेतीवरच class 1 gazetted officer समान जीवनमान जगण्याचे स्वप्न तुम्हाला आयुष्यातही पडलेले दिसत नाही.

दोन्ही बाजु माहीत आहेत, असे म्हणणे सोपे आहे.

लाथ मारा त्या class 1 gazetted officer च्या नोकरीला.

शेतीत या, कांदा पिकवा.

आणि विकून दाखवा ४० रू. प्रती क्विंटल या दराने.

निखळ शेतीच्या बळावर तुम्हाला जगताच आले नाही हे तुमचाच जीवन इतिहास सांगतो.

सातबारा's picture

18 Feb 2011 - 12:08 pm | सातबारा

हे सर्व मी म्हणणार होतोच तेव्हढ्यात मुटेजी तुमचा प्रतिसाद आला. मी ही हेच म्हणेन.
अर्थात नेत्रेश यांना जरी मी उध्द्टपणे प्रश्न विचारला तरी त्यांचा व्यक्तीगत अधीक्षेप हा हेतू नाही तर आपण ते मुद्दे मांडताना खरेच शेतीशी संबधीत आहात येवढेच जाणायचे होते. कारण शेती स्वत: न करणार्‍या लोकांना हे प्रॉब्लेम्स समजतच नाहीत असा अनुभव आहे.
माझा प्रवास आपल्या पेक्षा उलटा आहे. पुण्यात आयटी शी संबंधीत व्यवसाय करीत होतो. डॉटकॉम बस्ट नंतर (माझ्यावर परीणाम झाला नव्हता त्याचा तरी) (आणि बायकोची चांगली नोकरी पण) सर्व सोडून आम्ही दोन छोट्या मुलांसह शेतावर स्थायीक होण्याचा निर्णय घेतला व गेली १४ वर्षे , या क्षणापर्यंत रानातच आहोत.
दोन्ही बाजूंचा अनुभव व त्यातील टोकाचा विरोधाभास प्रत्यक्ष अनुभवीत असल्याने शेतकरी या विषयावर माझ्या साहजिकच थोड्या तीव्र प्रतिक्रीया आहेत.
जरतर शब्द वापरले तर, जर त्यावेळी इकडे आलो नसतो तर कदाचित आज आम्हीही उसात असतो. ही तक्रार नसून फक्त पोटेन्शियल सांगणे आहे. इथे येवून अर्थिक प्रॉब्लेम्सशी जरी झुंजलो तरी समृध्द नक्कीच झालो. आणि जो निर्णय उघड्या डोळ्यांनी घेतला त्याबद्द्ल कधीच पश्चात्ताप झाला नाही. पुन्हा ही हाच निर्णय घेईन. हल्ली तर एक रात्र पुण्यात मुक्काम करवत नाही येव्हढे इथे झोपडीत सुख आहे.

जसे गविंनी सांगीतले तसे, मला स्वतःला आयटी ची बॅकग्राउंड आहे म्हणून या अन्याय कारक सिस्टीम मध्ये स्वतः पुरते मिळवत आहे (जोडधंदा). जे शेतकरी असे काही करु शकत नाहीत त्यांना कर्जात बुडून नंतर आत्महत्येशिवाय पर्याय नाही. हे सर्व जवळून पहात अनुभवीत असल्याने हे प्रतिसाद, अन्यथा आपला आवाज ऐकला जात नाही ही शेतकर्‍याची हताशा आहेच.

नेत्रेश's picture

18 Feb 2011 - 10:52 pm | नेत्रेश

किराणा दुकान आजोबांच्या काळापासुन आहे. थोडी शेती तेव्हा होती बाकी शेती मी आय टी मध्ये सेटल झाल्यावर घेतली आहे. बाकी नातेवाईकही शेतीत आहेत. माझा पोल्ट्रीचा व्यवसायही करुन झाला आहे. अर्थात शेतीवर / पोल्ट्रीवर माझे जीवन अवलंबुन नाही. हे फक्त येवढ्यासाठीच सांगीतले की तुम्ही "@ नेत्रेश, स्वतः शेती केली आहे का?" असे विचारले आहे.

सांगायचा मुद्दा हा आहे की कांदा ५०० रुपये कीलो व्हावा या सारख्या गोष्टी बोलायला बर्‍या वाटल्या तरी व्यवहार्य नाहीत.
उलट मागणी कमी होउन शेतकर्‍याच्या हाती काहीही येणार नाही. शेतकर्‍याला चांगला पैसा मिळायला हवा यात वादच नाही. पण तो ग्राहकांना लुटुन नव्हे, तर होणारे मालाचे नुकसान वाचउन. कांदा हा ईतर शेतमालाच्या तुलनेत लवकर खराब होणारा माल आहे. शेतकर्‍यांकडे तो साठवायला काहीच सोय नसते. त्यामुळे मिळेल त्या भावात तो विकावाच लागतो.

जर कांद्याला चांगले स्टोअरेज ऑप्शन असेल, त्याचे शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी लागणार्‍या सोई (रॅडीएशन, ईत्यादी ज्यामुळे कांदा ६ महीन्यांपर्यंत सहज टीकतो) शेतकर्‍याला उपलब्ध करुन दिल्या तर कांदा सडणे वगैरे कमी होईल. नुसते व्यापारी, दलाल, अडते व ग्राहकांना शिव्या देऊन शेतकर्‍याचे काय भले होणार ? ही सा़खळी नसेल तर सध्या पर्याई वितरण व्यवस्था काय आहे?

गंगाधर मुटे's picture

18 Feb 2011 - 11:14 pm | गंगाधर मुटे

कांद्याला स्टोअरेज ऑप्शन वापरायचे,त्याचे शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी रॅडीएशन सारखा पर्याय वापरून कांदा ६ महीन्यांपर्यंत जतन करायचा.
म्हणजे स्टोअरेज करण्याचा खर्च, रॅडीएशन वरील खर्च, सहा महिने साठवणूक करण्यासाठी गोदामाचा खर्च, सहा महिने माल न विकल्यामुळे व्याजाने पैसा काढावा लागेल त्याचे व्याज, आद्रता घटल्यामुळे वजनात येणारी घट, सहा महिन्याच्या साठवणूकीमुळे मध्येमध्ये त्याची करावी लागणारी देखभाल एवढे सर्व खर्च केल्यानंतर कांदा ४० रू प्रति क्विंटल या दराने विकायचा म्हणता.

शेतकर्‍याला पार नागवेच करायचा विचार दिसतो तुमचा.

ग्राहकांना शिव्या देऊन शेतकर्‍याचे काय भले होणार ?
माझ्या वरील पोष्टमध्ये मी शेतकर्‍याच्या दुर्दशेला ग्राहकाला जबाबदार धरलेच नाही.

नेत्रेश's picture

19 Feb 2011 - 12:53 am | नेत्रेश

४० रुपये क्विंटल हा खर्च विकायचा नसुन पिकवायचा आहे. शेतकर्‍याने ४० रुपये क्वींटल ने कांदा विकावा असे मी म्हटलेले नाही.
४० रुपये कीलो हा कांदा पिकवायचा खर्च अवास्तव आहे, ४० रुपये क्विंटल असावा असे म्हटलेले आहे.

कृपया प्रतिसाद देण्याआधी नीट वाचा.

शेतकर्‍याला त्याला पाहीजे त्या दरात तेव्हाच कांदा विकता येईल जेव्हा त्याचाकडे तो त्याला पाहीजे तेव्हा विकण्याचा पर्याय असेल. कांद्याचे आयुष्य ६ महीन्यानी वाढवले म्हणजे तो विकायला ६ महीने थांबावे असे म्हटलेले नाही. जेव्हा दर योग्य मीळेल तेव्हा तो विकता येईल. कांदा सडेल या भितीने पडलेल्या दरात विकावा लागणार नाही.

स्टोअरेज साठी फक्त टेंपरेचर कंट्रोल्ड गोदामाची गरज असते. रॅडेएशन आणी स्टोअरेज यांचा सर्च फक्त एकदाच भारणीचा वेळी येतो. त्यांची ऑपतेटिंग कॉस्ट नगण्य असते. उभारणीचा खर्च सरकारने उचलला तर शेतकर्‍याना चांगला पर्याय मिळेल. पण राजकारणी लोक त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी हे होउ देणार नाहीत.

> शेतकर्‍याला पार नागवेच करायचा विचार दिसतो तुमचा
ज्या देशाचा शेतकरी बुडाला तो देश बुडाला (आखाती देश सोडुन. तीथे तेलाची शेती होते). माझे म्हणणे एवढेच आहे की ग्राहकांना न लुबाडता शेतकर्‍याचे भले करता येऊ शकते. आणी कांदा 'पिकवायला' ४० रुपये कीलो खर्च येत नाही. तेवढा खर्च द्राक्षे पिकवायला सुद्धा येत नाही.

पंगा's picture

18 Feb 2011 - 10:37 am | पंगा

जर गाड्या १५ लाखांच्या घेता, मल्टीप्लेक्स मध्ये २०० रु. ची तिकीटे काढता, हॉटेलमध्ये १००० रु बिल करता , तर शेतकर्‍याला कधी नव्हे तर ६० रु. भाव मिळाला तर पोटात का दुखावे? परवडत नसेल तर कांदा घेवू नका ना! तसेही कित्येक लोक कांदा खात नाहीत. कांदा जीवनावश्यक वस्तू नाहीच मुळी. त्यामुळे चैनीची वस्तू महाग झाली तर बरेच झाले, शेतकर्‍याला दोन पैसे जास्त मिळतील.

खरे आहे. कांदा ही जीवनावश्यक वस्तू नाही. कांदा नाही खाल्ला तर कोणाचे काही बिघडत नाही. त्यामुळे परवडत नसल्यास विकत न घेणे हे सयुक्तिकच आहे.

पण समजा लोकांनी कांदा विकतच घेतला नाही, तर मग शेतकर्‍याला पैसा मिळणार कोठून, हे समजत नाही. अगोदरच पैसा मिळतो तो खूपच कमी असताना असे सल्ले देऊन अशी वेळ ओढवून आणणे हे आत्मघातकी नव्हे काय?

मला तर वाटते कांदा ५०० रु. किलो व्हावा.

पुन्हा तेच! कांदा ५०० रुपये किलो झाला, तर आजच्या तुलनेने खूपच कमी लोक तो विकत घेण्याची शक्यता आहे.* त्यामुळे ५०० रुपये किलोने कांदा विकून शेतकर्‍याचा काहीच फायदा नाही. उलट शहरी ग्राहकाची जी काही उरलीसुरली सहानुभूती असेल (जिचा तसाही काही उपयोग नसतो म्हणा!), तीही नष्ट होईल. (तरी 'कांदा ही जीवनावश्यक वस्तू आहे' या भ्रामक समजुतीखाली काही जण तरीही विकत घेतीलही. सांगवत नाही. पण फार जण नाही घेणार.) त्या मानाने जरा परवडण्यासारख्या किमतीला जास्त गिर्‍हाइकांना विकणे कदाचित फायद्याचे ठरू शकेल. पहा विचार करून.

(* माझ्यावर जर ५०० रुपये किलोने कांदा विकत घेण्याची वेळ आली, तर माझ्या डोक्यात "एवढे पैसे देणे एक तर मला परवडत नाही, आणि परवडले तरी पाचशेबिचशे देऊन मी काही घेणार नाही. मग शेतकरी मरेना का! अशाने मी कंगाल होईन. मी कंगाल होण्यापेक्षा शेतकरी मेलेला परवडला," असाच विचार येणार, हे साहजिक आहे. शेवटी मलाही माझ्या मर्यादित उत्पन्नात माझी आणि माझ्या बायकापोरांची पोटे भरायची असतात. दुसर्‍याबद्दल सहानुभूती वगैरे सगळे भरल्या पोटी ठीक असते. मला जर माझीच चिंता असेल, तर मी दुसर्‍याचा विचार कशाला करेन?

पण जरा मला परवडण्यासारख्या किमतीला कांदा मिळाला, तर माझ्यासारखे शंभर लोक कांदा विकत घेतील.)

बाकी,

जर गाड्या १५ लाखांच्या घेता, मल्टीप्लेक्स मध्ये २०० रु. ची तिकीटे काढता, हॉटेलमध्ये १००० रु बिल करता , ...

असे किती टक्के जण करतात / करू शकतात असे वाटते?

... तर शेतकर्‍याला कधी नव्हे तर ६० रु. भाव मिळाला तर पोटात का दुखावे?

जे पंधरा लाखाच्या गाड्या घेऊ शकतात, त्यांची ही रड नसावी बहुधा. पण असे तुलनेने फार थोडे असावेत. बहुतांश लोक साठ रुपयांना कांदा परवडण्यास कठीण जाणारेच असावेत, असे वाटते. शहरात राहणारे असले, तरीही. (चूभूद्याघ्या.)

पैसा's picture

18 Feb 2011 - 11:23 pm | पैसा

६० रुपयातले शेतकर्‍याच्या हातात फक्त ६रुपये जातात. बाकीचे दलालांच्या घशात ....

गंगाधर मुटे's picture

17 Feb 2011 - 1:22 pm | गंगाधर मुटे

ज्यांच्या हातात जेमतेम २००० ते ३००० रु राहतात त्यांचा विचार का नाही करत तुम्ही,

भिकार्‍याच्या घरी भिकारचोर गेला
कमरेचा दुपट्टा तोही सोडून नेला.

एका गरीबाला कांदा खाऊ घालण्यासाठी दुसर्‍या गरीबाचा संसार उध्वस्त करणे अपरीहार्य आहे, असे तुम्हाला म्हणायचे काय?

या बाबतीतला अनुभव नाही पण मुटेजींचे म्हणणे १०० टक्के पटते.

शेती करणे म्हणजे काय हे आजोबांसोबत लहानपणापासून बघितले.
आजोबांचे वय झाले तेव्हापासून कोणाकडूनतरी करुन घेतलेली आणि बदल्यात धान्य येऊन पडणारी असं तिचं स्वरुप झालं. माझ्या वडिलांनी चार वर्षं शेती केली आणि नंतर नोकरी धरली.

त्याचं कारण मला कळायचं नाही. एवढी मोठी शेती (म्हणजे शेतजमीन) पडलेली असताना नोकरी कशाला? कारण माझ्यामते शेती म्हणजे मस्त बैलगाडीत बसून शेतावरच्या घरात जायचे, विहीरीचे पाणी काढायचे, बैलांशी मस्ती करायची, सर्व मजुरांनी "छोटे मालक आले"म्हणून कौतुक करायचं अशी कन्सेप्ट होती.

नंतर वडीलही गेले आणि अवचित जमीन हाती लागली तेव्हा मनापासून शेती अ‍ॅज बिझनेस म्हणून वर्कआउट केलं. ते सर्व इथे देऊ शकत नाही पण इतकंच सांगतो. मुटेजींनी सांगितलंय त्याहून अधिक भयंकर आणि आतबट्याचा धंदा झालेला आहे तो.

नोकरी करुन विना रिस्क मी जे कमावतो त्याच्या एक दशांशही शेतीत (जबरी रिस्क घेऊनही) कमावू शकत नाही, त्याची खात्री नाही.

शेतीला काही फार खर्च लागत नाही अशी माझी अत्यंत गोड गैरसमजूत होती. पण प्रत्यक्ष जमिनीवर उतरून तपास केल्यावर कळलं की शेती, पोल्ट्री, प्रक्रिया असे सर्व शेतीआधारित धंदे अत्यंत व्यवस्थित मोठे भांडवल घालून करावे लागतात. आणि आउटपुट सर्वच लेव्हलवर अनिश्चित आहे. तोटा डिफॉल्ट आहे आणि मोठा फायदा हा अपघात आहे.

मी त्यामुळे सर्व जमीन (अर्थात मातीच्या भावाने) विकून टाकण्याचे ठरवले आहे. माझ्यासमोर इतर पर्याय असताना शेतीचा विचार करणे म्हणजे स्वहस्ते जीव देणे असं माझं मत झालं आहे.

मी पर्याय उपलब्ध असलेला नशीबवान आहे.. पण अशा स्थितीत परंपरागत शेतकरी खरेच किती दिवस शेती करत राहतील आणि त्यांनी का करावी हा मोठा भयानक प्रश्न माझ्यापुढे उभा राहतो. आत्ताच्या पिढीला पर्याय नसेल तरी पुढची पिढी अशीच आधीच त्यातून बाहेर पडेल..

त्यांनी पिकवायचे बंद केले तर आपली सर्वांचीच जी अन्नान्न दशा होईल ती वर्णनापलीकडली असेल. आणि हे होणे अशक्य नाही. एक कोटी रुपये प्रतिमहिना घेणारा नोकरदार अन्नासाठी रांगा लावेल.

शेतकर्‍याला प्रीमियम / सर्वोच्च स्थान आणि वागणूक दिली पाहिजे, तरच टिकाव धरता येईल..

शेतकर्‍याला सर्वोच्च स्थान द्यायला कोण नाही म्हणतोय?
सरकारने जे काही करायला हवे (मला अजिबात त्यातले काही कळत नाही) त्यासाठी सामान्य माणूस कसा जबाबदार असू शकतो? उलट दलाल किंवा सहकारी संस्था ग्राहकांना लुटताहेत. ग्राहकांना योग्य दरात भाजीपाला मिळावा तसेच शेतकर्‍यांनाही योग्य भाव मिळावा असे वाटते आहे तर त्याबद्दल माहिती असणार्‍यांनी मिपावर एखाली लेखनमाला सुरु करावी. आम्हालाही माहिती मिळेल.

ही पापाची भागीदारी होउ नये असे मनापासुन वाटते.. कांद्याचे २ रुपये ही बातमी ऐकुन शेतकर्‍याबद्दल कळकळ वाटली होती.
गावाकडची शेतावरची मआणसे जवळुन पाहिली आहेत .. त्यामुळे त्यांचे हाल पाहिले असल्याने ते जास्तच टोचले होते.

---

मला तर वाटते प्रत्येक गावात जसे सरपंच असतात.. ग्रामसेवक असतात ( हे सरकारी आहेत पण)
तसेच प्रत्येक गावात हक्काचे व्यापारी तयार करावेत ( स्वता ते गावा बद्दल सहानभुती असणारे आणि शेतकर्‍यांमधीलच असावेत.. स्त्रीया असतील तरी छान)..
या व्यापार्‍यांचे काम असे असावे की स्वताच्या गावातील शेतकर्याला योग्य भाव मिळावा ..आणि त्या भावाचेच जेव्हडा खर्च नंतर जास्त होयील तेव्हडाच फक्त ग्राहकाला अ‍ॅड करुन तो माल विकावा..
त्या व्यापार्‍यांचा खर्च हे शेतकरी आपल्या मालाला आलेल्या जास्त किंमतीमधुन ठरवुन ठेवतील कीती द्यायचे ते.

अशी साखळी प्रत्येक गावात उभी करायची.. सरकारी व्यापारी प्रथा बंद करावी .. त्याने फक्त महागाई वाढते .. ग्राहक आणि शेतकरी दोघे ही भरडले जात आहेत ...

मी जर कोणॅए अधीकारी असतो तर ही पद्धत नक्कीच आणली असती.. निदान अश्या पद्धती किंवा ह्या पेक्षा ही सोपस्कर मार्ग नक्कीच अवलंबले पाहिजेत असे वाटते ..

( आपण काहीच जास्त करु शकत नसलो तरी मार्ग तर सुचवु शकतो .. मार्ग सुचवा .. न जाणो तो उद्याच्या महामार्ग ही होउ शकतो )

सातबारा's picture

17 Feb 2011 - 2:42 pm | सातबारा

- शेतकर्‍याला कधी नव्हे तो भाव मिळाला तर सर्वांना पोटदुखी होते ती चालते का ?

- @ गणपा - आयटीचा मुद्दा माझा नाही. मला जळजळ नाही. फक्त आयटी वाल्यांसारखीच उन्नती भारतीय शेतकर्‍याची व्हावी ही शुभेच्छा तुमचीही असेलच. पण तो पर्यंत जर मधून मधून जरी थोडा चांगला बाजारभाव मिळाला तर पोटदुखी तरी होवू नये. ( बाय द वे, तुमच्या पाक्रु चे आम्ही ही फॅन आहोत. कांद्याच्या भावामुळे त्यात बाधा येणे समजू शकतो.)

- @ पंकजप - शेतकरी सामान्य माणसात मोडत नाही ( कि आधीच मोडलेला आहे म्हणून सामान्य नाही ?), तसेच तो
कर भरीतच नाही असे आपल्याला वाटते का ? ( आयकर हा आय वर असतो - आय नाही म्हणून आयकर नाही ). इतर अप्रत्यक्ष कर शेतकरी पण देतोच.
>>ज्यांचा महिन्याचा पगार ३००० ते ४००० आहे त्यातले घराचे भाडे जाऊन ज्यांच्या हातात जेमतेम २००० ते ३००० रु राहतात त्यांचा विचार का नाही करत तुम्ही
- याच न्यायाने मग महागड्या गाडयांच्या किंमती कमी व्हाव्यात (असेच इतर वस्तू व सेवांबाबत ) असे म्हणू शकता का ?
>>राहिला प्रश्न गाड्या फिरवायचा ज्या लोकांकडे चांगली शेती आहे व उत्पन चांगले आहे ते लोक काय गाड्या फिरवत नाहीत काय ते लोक काय बाकीचे ऐश आराम भोगत नाहीत काय?
- म्हणजे सुदैवाने जे थोडे शेतकरी गाड्या फिरवीतात त्यांनीही ऐश करु नये काय ? ( आणि खेड्यात गाड्या फिरविणारे कोण आहेत हे तर उघड गुपित आहे. )

>>कांदा जीवनावश्यक वस्तू
या मुद्यावर एका महापंडीताने "कांदा खाल्ल्याशिवाय पुरुषाच्या शरीरात पुरूषार्थ जागविणारे हार्मोन्स तयार होत नाही" असा युक्तिवाद केला होता.

- कांदा लसूण न खाणार्‍या जैन बांधवांचे मत ऐकण्यास उत्सुक.

म्हणूनच पुन्हा विचारतो - स्वतः शेती केली आहे का? रात्री १२ वाजता लाइट आल्यानंतर कांद्याची बारी दिली म्हणजे अर्थशास्त्र कळेल. एसीत बसून शेतकर्‍याच्या जखमांवर मीठ चोळणे सोपे आहे. ( हाच प्रश्न आयटी वाले मला विचारु शकतात, की आयटी त काम केले आहे का ? - तर त्यांच्या व माझ्या प्रश्नांचे माझ्यापुरते उत्तर - हो.)

आणि पुन्हा म्हणतो की कांदा ५०० रु. किलो व्हावा.

सर्व मुद्दे पटत आहेत ..
परंतु कांदा ५०० रु किलो व्हावा.. हे चुकीचे आहे.
शेतकर्याला नफा व्हावा .. आणि ग्राहकाला ही अति रक्कम मोजावी लागु नये हे दोन्ही मुद्दे एकत्र गुंफले जावेत असे वाटते ..
(वरती रिप्लाय दिला आहेच )
जणतेचे राज्य यावे .. तेथे दलाल - ढोंगी- स्वार्थी राजकारण्यांना थारा नसावा ...

वरील प्रतिसाद तुम्हाला उद्देशुन नव्हताच मुळी. तो पंकजप यांना होता.
चांगली चर्चा चालु असताना विनाकारण धागा भरकटायला नको. पण तुमचा गैरसमज झाला म्हणुन हा प्रतिसाद.

माझे आजी-आजोबाही शेतीच करायचे. बाबांनी ही नोकरी सांभाळुन त्यांना हातभार लावला. पण आता आजीआजोबा गेले. शिवाय शेतमजुरी, खतांच्या-बियाण्यांच्या वाढत्या किंमती आणि वीज, पाणी टंचाई या घटकांमुळे हा व्यवसाय आतबट्याचा होऊ लागला आहे. यातुन थोड फार पीक हाताशी येत असतानाच नैसर्गिक प्रकोप झाला की हाती पडणार उत्पंन्न हे मुळ खर्चाहुन कमीच.
यासर्वांमुळे शेतकर्‍यांच्या भावना आणि व्यथा यांची पुरेपुर जाण आहे.

५०० रुपये कीलो झाल्यावर लोक कांदे खाणे सोडतील. कांदा सडु लागल्यावर त्याचे ५ रुपयेही शेतकर्‍याला मिळणार
नाहीत. कांद्याचा भाव, दलाल, अडते, व्यापारी हे शेतकर्‍याच्या प्रश्णांना जबाबदार नाहीत. त्यांच्या शीवाय लहान शेतकर्‍याला सध्या पर्याय सुद्धा नाही.

सहाकारी संघ हा पर्याय होउ शकतो. पण ५०० रुपये कीलो कांदा म्हणजे शेतकर्‍याचेच मरण आहे. (उद्या सगळे डॉक्टर म्हणतील आम्ही २० लाखाचे कर्ज काढुन डॉक्टर झालो, प्रत्येक पेशंट मागे कमीत कमी १००० रुपये घेणार. ईतर जीवनावश्यक सेवा पुरवणारे सुद्धा अशीच अडवणुक करु शकतील.)

सहकारी संघ आणि सहकारी संस्था यात काय फरक असतो? आणि शेतकरीच छोटी दुकाने काढून का नाही विकू शकत?

नेत्रेश's picture

18 Feb 2011 - 4:08 am | नेत्रेश

कांदा गावातील शेतात पिकतो, ग्राहक शहरात असतात. शेतकरी दुकान कुठे काढणार? गावात १०० शेतकरी कांदा लावत असतील तर गावात दुकान काढुन उपयोग काय? शहरात दुकानासाठी लागणाती जागा, पैसा, मनुश्यबळ लहान शेतकरी आणणार कुठुन? शेती हा फुलटाईम जॉब आहे, तसेच दुकानदारी हा सुद्धा फुलटाईम जॉब आहे.

'शेतकरीच छोटी दुकाने काढून का नाही विकू शकत' असा प्रश्न करणे म्हणजे प्रत्येक डेव्हलपर नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा कोड स्वतःच क्लायंटसना का विकत नाही असे विचारण्यासारखे आहे.

एका गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांचा माल जवळच्या आणि शक्य असेल तर थोड्या दूरच्या गावात विकायला प्रयत्न करायला काय हरकत आहे....घरात त्यांची बायका , मुले असतातच ना...कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा काहीजण ते दुकान चालवू शकतात...सगळ्याच गोष्टी अशा उडवून दिल्या तर आहे ते सोसा...दुध उत्पादकांनी नाही का सोसायट्या काढल्या!!

समजा असे केलेही,तरी फक्त ज्वारी किंवा फक्त कांदे मिळणारे दुकान शहरात काढणे परवडेल का अशी शंका येते.मुटेजींनी असे हिशोब ढोबळपणे मांडून दाखवले तर खूप उलगडा अन उपयोग होईल.मला वाटते सूचना चांगली आहे,पण तिचा विचार नक्कीच कोणीतरी केला असेल आणि त्यात काही issue , problem असेल.मुटेजी सांगा please.

शिल्पा ब's picture

18 Feb 2011 - 10:29 am | शिल्पा ब

अहो, फक्त ज्वारी किंवा कांदे नाही तर जे जे काही पिकवतात ते ते...

गवि's picture

18 Feb 2011 - 11:27 am | गवि

एकेक दोन दोन शेतकर्‍यांनी स्वतःची दुकाने काढायची ("बायको, मुले दुकानात" मॉडेलवर) तर तिथे त्या त्या वर्षी / मोसमात पिकवलेली लिमिटेड उत्पादनेच असणार हो.

दुकान "काढणे" तेव्हा परवडते जेव्हा तिथे धान्य, कडधान्य, तेल, नारळ, झाडू, टिकलीपाकिटे, साखर वगैरे अशा अनेकविध गृहोपयोगी वस्तू मिळतात.

आणि ग्राहक म्हणूनही पाहिलं तर, फक्त ज्वारी घ्यायला एका दुकानात, मग केळ्यांसाठी दूर कुठे दुसरे दुकान आणि वांग्यासाठी तिसरे, असे तिरगांव करत आपण तर फिरणार नाही बुवा, कितीही स्वस्त पडला प्रत्येक जिन्नस तरी.

शिल्पा ब's picture

18 Feb 2011 - 11:58 am | शिल्पा ब

आता काय करावं!!! एकेक दोनदोन कशाला गावातील सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून...कधी गावाकडचा आठवडी बाजार पहिला आहे का? सगळ्या प्रकारच्या भाज्या, बरीच फळे, धान्ये वगैरे असते...त्याच धर्तीवर त्यांनी एकत्र येऊन एखादं दुकान शहरात चालवावं असा माझा विचार लिहिला मी....आता यापेक्षा खुलवून सांगता येणं मलातरी अशक्य आहे.

गवि's picture

18 Feb 2011 - 12:47 pm | गवि

तीच कल्पना चांगली आहे म्हणालो आणि मुटेजींना विनंती केली की यात काय अडचणी येतात ते सांगितले तर बरे होईल. उत्सुकता आहे.

सहकारी सोसायटी पेक्षा दलाल परवडले असे ते म्हणताहेतच. म्हणजे चार जणांनी एकत्र येऊन काही करणं वाटतं तेवढं सरळ सोपं नाहीये. (आठवा गणेशोत्सव मंडळ.. ---- दोन मराठी माणसे एकत्र आली की सुरु करतात एक गणेश मंडळ आणि पुढच्या वर्षी दोन गणेशमंडळे - इति बहुधा पु.लं.)

:)

म्हणजेच सोसायटी / सामाजिक एकत्रीकरणापेक्षा इन्डिव्हिजुअल फॅमिली बिझनेस अश्याच स्वरुपात ते विश्वासार्ह ठरेल असं वाटतंय. मग त्यात हिशोब कसा तोट्यात जात असावा ते विचारलं.

गंगाधर मुटे's picture

18 Feb 2011 - 10:14 pm | गंगाधर मुटे

गगनविहारीजी,
यथावकाश लिहितो.

पैसा's picture

18 Feb 2011 - 11:39 pm | पैसा

आमच्या इथे 'बागायतदार सहकारी संस्था' आहे. ती शेतकर्‍यांकडून शेतमाल योग्य भावात घेऊन ग्राहकाना वाजवी दरात, अल्प फायदा घेऊन विकते. संस्था तरीही फायद्यात आहे. त्यांच्या दुकानांमधून इतरही सगळ्या प्रकारच्या वस्तू स्वस्त मिळतात. मधे कोणीही दलाल नाहीत. सगळीकडे कांदा भडकला होता, तेव्हाही बागायतदार बाजार कांदे २० रुपयानी विकत होते.

संस्था अतिशय उत्तम प्रकारे चालवलेली आहे. त्यात कोणत्याही मंत्र्याला प्रवेश दिला गेला नाही. खूपदा ही संस्था ताब्यात घ्यायचे प्रयत्न राजकारण्यानी केले, पण अयशस्वी झाले. गोव्यातल्या गावोगावी संस्थेच्या शाखा आहेत. संस्था निदान २५ वर्षांची तरी जुनी आहे.

सगळ्यानी मनावर घेतलं तर असंही होऊ शकतं. सहकारी संस्था सगळीकडेच चराऊ कुरणं झालेली नाहीत. गोव्यात तरी हा एक सुखद अपवाद आहे.

गंगाधर मुटे's picture

19 Feb 2011 - 11:46 pm | गंगाधर मुटे

गोव्यात तरी हा एक सुखद अपवाद आहे.

तुम्ही केलेल्या वर्णनावरून ही संस्था चालविणारी मंडळी अद्वितिय सेवाभावी व्रुत्तीची माणसे आहेत.
अशी माणसे समाजात असतात पण त्यांचे लोकसंख्येशी प्रमाण नगण्य किंवा तुरळक असे असते.

मग व्यापक प्रमाणावर हा प्रयोग राबवायचा म्हटले तर अशी निस्वार्थी सेवाभावी वृत्तीची माणसे कुठून आणायची?
अशा निस्वार्थी सेवाभावी वृत्तीच्या माणसाची आयात करणे कांद्याच्या आयातीएवढे सोपे आहे काय?

पाक मधून आयात करायला कांदा मिळाला, अशी माणसे त्या देशात तरी उपल्ब्ध आहेत काय?

चर्चा करायला असा एखादा अपवाद सोयीचा असतो. पण कांद्याच्या भावाचा प्रश्न सुटण्याऐवजी आणखी किचकट होतो.

गणेशा's picture

21 Feb 2011 - 5:04 pm | गणेशा

आपले म्हनने कळते आहे.. पण पैसा यांच्या प्रतिक्रियेनंतर ही आपल्या नजरेत आशावाद दिसला नाही.. दिसली ती खंत आणि निगेटीव्ह शेडची सावली ...

बाकी माझे मत वरती दिलेच आहे,..

भडकमकर मास्तर's picture

18 Feb 2011 - 2:50 am | भडकमकर मास्तर

१.मी कधीकधी कांदा खातो. गिल्टी वाटते..
२.आमची तर नाहीच, आमच्या दूरदूरच्या कोणत्याही नातेवाईकांची थोडीही शेती नाही.
३. मी व्यवसायाने दंतवैद्य आहे.

विषय संपला...

अविनाशकुलकर्णी's picture

18 Feb 2011 - 1:02 pm | अविनाशकुलकर्णी

सामुदायीक शेति वा कोरपोरेट शेति हा पर्याय होवु शकतो का?......
कुटुंबे विभक्त झाल्याने जमिनिचे तुकडे झाले त्या मुळे शेति फायद्याची नाहि असे वाचल्याचे आठवते....

बाजारी भिमुख व्यवस्था स्विकाराली त्या मुळे जर रोज भाव वर खाली होतअसर्तिल तर महागाई भता पण त्या प्रमाणक्म्कमी जादा करता येणे शक्य आहे का?
इंडेक्स ३ दर ३महिन्यानी बदलतो तो दर महिना बदलावा....

चिगो's picture

18 Feb 2011 - 1:04 pm | चिगो

मुटेजी, अगदी योग्य विषयाला हात घातलात... पीक भरपुर आलं तर मालाचा भाव पडतो म्हणून कमी रिटर्न्स, आणि पीकबुडी झाली तर भाव वाढल्या वाढल्या सरकारी धोरणाचा दणका, अश्या चिमट्यात पिचतोय शेतकरी... आम्हाला पण कोरडी सहानुभूती, सरकार काहीच का करत नाही गरीब शेतकर्‍यांसाठी वगैरे म्हणतांना सगळ्या गोष्टी स्वस्तातच हव्या असतात...

मला वाटत की उगाच अवाजवी किंमती देण्यापेक्षा किंवा एकदम निर्यातबंदी, भरपुर आयात करुन भाव पाडण्यापेक्षा मध्यम मार्ग चोखाळला पाहीजे (सरकार आणि जनतेनेही).. म्हणजे बघा, मला ६० रुपये किलोने कांदा परवडणार नाही समजा पण १५-१६ रुपये असला तर हरकत नाही, मग एकदम २ रुपयांवर आणून काय फायदा? शेवटी बॅलन्स तर साधायलाच लागेल ना राव... शेवटी कुठल्याही एका वर्गाला पुर्ण समाधानी करण्यासाठी टोकाचे निर्णय घेण्याऐवजी ज्यात सगळ्यांना थोडाफार फायदा होईल तेच करावं लागेल..

अविनाशकुलकर्णी's picture

18 Feb 2011 - 1:06 pm | अविनाशकुलकर्णी

मी व्यवसायाने दंतवैद्य आहे

कांदा खा व कांदा शेतकर्यांच्या दाताच्या समस्या कमी फि मधे सोडवा..

गिल्टी वाटणे कमी होईल

अविनाशकुलकर्णी's picture

18 Feb 2011 - 1:07 pm | अविनाशकुलकर्णी

सबसिडी हाच रामबाण उपाय आहे..

सातबारा's picture

18 Feb 2011 - 1:14 pm | सातबारा

५०० रु. किलो कांदा व्हा वा हे विधान मूर्खपणाचे आहेच या गणेश, नेत्रेश, पंगा यांच्या मताशी सहमत आहे, कारण ते मूर्खपणाचेच मत आहे. परंतू २, ३ रु किलोने शेतकर्‍याला लुबाडणार्‍या सिस्टीम ला धक्का देण्यासाठी असा स्टँड जरुरीचा आहेच. आजच इस्काळात बातमी वाचली की कांदा निर्यात पुन्हा चालू करणार व किमान भाव ६०० डॉलर प्रतीटन म्हणजे जवळ्जवळ २७ ते ३० रु. किलो. म्हणजे गेल्या काही दिवसात ज्या शेतकर्‍याचा कांदा ६,७ गेला तो मेलाच ना परत ? आता हा कांदा ६,७ या रेटने कुणी घेतला व कोण निर्यात करणार हे तर उघड गुपित आहे. शेतकरी स्वतः तर निर्यात करत नाही ना?

@ पंगा :-

>>पण समजा लोकांनी कांदा विकतच घेतला नाही, तर मग शेतकर्‍याला पैसा मिळणार कोठून, हे समजत नाही. अगोदरच पैसा मिळतो तो खूपच कमी असताना असे सल्ले देऊन अशी वेळ ओढवून आणणे हे आत्मघातकी नव्हे काय?/em>

- लोकांनी कांदा विकतच घेतला नाही तर अर्थातच शेतकरी कांदा पिकविणार नाहीत ते दुसरे काहीतरी पिकवितील ज्याने पैसे मिळतील. कांदा हे हल्लीच महत्वाचे पिक झाले आहे. माझ्या आजोबांच्या काळात एवढा कांदा पिकविण्याची पध्दत नव्हती. तेव्हा कांदा शेतात एकरोगणती न लावता फक्त पाटाच्या कडेने व थोडासा जास्त एवढाच लावीत होते. त्याला अनेक कारणांमुळे हल्ली भाव मिळू लागला आहे म्हणून अर्थातच जास्त लागवड होते.

>> पुन्हा तेच! कांदा ५०० रुपये किलो झाला, तर आजच्या तुलनेने खूपच कमी लोक तो विकत घेण्याची शक्यता आहे.* त्यामुळे ५०० रुपये किलोने कांदा विकून शेतकर्‍याचा काहीच फायदा नाही. उलट शहरी ग्राहकाची जी काही उरलीसुरली सहानुभूती असेल (जिचा तसाही काही उपयोग नसतो म्हणा!), तीही नष्ट होईल. (तरी 'कांदा ही जीवनावश्यक वस्तू आहे' या भ्रामक समजुतीखाली काही जण तरीही विकत घेतीलही. सांगवत नाही. पण फार जण नाही घेणार.) त्या मानाने जरा परवडण्यासारख्या किमतीला जास्त गिर्‍हाइकांना विकणे कदाचित फायद्याचे ठरू शकेल. पहा विचार करून.

(* माझ्यावर जर ५०० रुपये किलोने कांदा विकत घेण्याची वेळ आली, तर माझ्या डोक्यात "एवढे पैसे देणे एक तर मला परवडत नाही, आणि परवडले तरी पाचशेबिचशे देऊन मी काही घेणार नाही. मग शेतकरी मरेना का! अशाने मी कंगाल होईन. मी कंगाल होण्यापेक्षा शेतकरी मेलेला परवडला," असाच विचार येणार, हे साहजिक आहे. शेवटी मलाही माझ्या मर्यादित उत्पन्नात माझी आणि माझ्या बायकापोरांची पोटे भरायची असतात. दुसर्‍याबद्दल सहानुभूती वगैरे सगळे भरल्या पोटी ठीक असते. मला जर माझीच चिंता असेल, तर मी दुसर्‍याचा विचार कशाला करेन?

पण जरा मला परवडण्यासारख्या किमतीला कांदा मिळाला, तर माझ्यासारखे शंभर लोक कांदा विकत घेतील.)


- साधे आहे. परवडत असेल तर घ्या. तुम्ही न घेतल्याने जर भाव पडत असतील आणि शेतकर्‍याला ते परवडत नसतील तर तो ते उत्पादन करणार नाही, दुसरे काहीतरी करील. जर आपण खुला बाजार मानतो आहोत तर बाजाराच्या फोर्सेस वर वस्तु उत्पादन व त्यांचे दर ठरू द्यात. शेतकरी महा चिवट आहे. तुम्ही काही न घेतल्याने तो मरणार नाही. फक्त जणुकाही आपणच त्याचे तारणहार हा अभिनिवेश सोडा व त्याचेवर कृत्रीम नियंत्रणे घालू नका. (जसे सरकार निर्यातबंदी व परवानगी हा खेळ करते आहे तसे.)

>> बाकी,

जर गाड्या १५ लाखांच्या घेता, मल्टीप्लेक्स मध्ये २०० रु. ची तिकीटे काढता, हॉटेलमध्ये १००० रु बिल करता , ...

असे किती टक्के जण करतात / करू शकतात असे वाटते?


- असे किती शेतकरी करतात / करु शकतात असे वाटते ? - त्यामुळे शेतकर्‍याच्या द्रुष्टीने सर्वचजण करतात असे वाटते.

>> तर शेतकर्‍याला कधी नव्हे तर ६० रु. भाव मिळाला तर पोटात का दुखावे?

जे पंधरा लाखाच्या गाड्या घेऊ शकतात, त्यांची ही रड नसावी बहुधा. पण असे तुलनेने फार थोडे असावेत. बहुतांश लोक साठ रुपयांना कांदा परवडण्यास कठीण जाणारेच असावेत, असे वाटते. शहरात राहणारे असले, तरीही. (चूभूद्याघ्या.)


- पुन्हा तेच म्हणतो, ज्यांना परवडत नसेल त्यांनी घेवू नये. ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी ६० किंवा ६०० रु. द्यावेत आणि घ्यावा. शेवटी हौसेला मोल नसतेच. बिएमडब्ल्यू एक कोटीची झाली तरी घेणारे घेतातच ना ?

@ भडकमकर मास्तर - खा हो बिन्धास, अजिबात गिल्ट वाटू देवू नका. (तुम्ही नाही खाल्ला तर शेतकरी कसा जगेल ?)

नगरीनिरंजन's picture

18 Feb 2011 - 4:47 pm | नगरीनिरंजन

>> त्याचेवर कृत्रीम नियंत्रणे घालू नका. (जसे सरकार निर्यातबंदी व परवानगी हा खेळ करते आहे तसे.)
सहमत! विशेषतः हे निर्णय कधी कधी ज्या घाईने किंवा कधी ज्या विलंबाने घेतले जातात त्यावरून नक्की कोणाचा फायदा अपेक्षित आहे असा प्रश्न पडतो. शिवाय मंत्र्यांच्या सूचक घोषणा चालूच असतात. बाजाराचा खुलेपणा सर्वांसाठी सारखा नाहीय हे नक्की. शेतकर्‍यांविरुद्ध रडीचा डाव खेळला जातोय हे कळले तरी माझ्यासारखा मध्यमवर्गीय माणूस काय करणार? त्या हिशेबाने तर देशातल्या प्रत्येक अन्यायात पापाची भागीदारी आहेच.

पंगा's picture

18 Feb 2011 - 9:38 pm | पंगा

शेतकरी महा चिवट आहे. तुम्ही काही न घेतल्याने तो मरणार नाही.

उत्तम! मग 'पापाची भागीदारी' वगैरे बडबड कशाला?

फक्त जणुकाही आपणच त्याचे तारणहार हा अभिनिवेश सोडा

तारणहार नसावे अशी शंका होतीच.

पण मग त्याच न्यायाने, पापाचे भागीदार असण्याचेही काही कारण नसावे, नाही का?

सातबारा's picture

18 Feb 2011 - 9:55 pm | सातबारा

जर नियंत्रणे असतील ( आणि ती आहेतच ) आणि त्यांच्या मुळे जर काही घटकांची आलटून पालटून लाभ वा हानी होत असेल तर नक्कीच पापात भागीदारी आहे. कारण बंधने लादावयाची आणि ती शेतकर्‍याच्या भल्यासाठीच आहेत असा कांगावा सिस्टीम करते तेव्हा पापात भागीदारी येते. मार्केट फोर्सेस ना आपापले काम करू दिले तर शेतकरी जगेल, तेवढा तो चिवट आहे.
उदाहरणार्थ : वीज वेळेवर द्या, तिचे रास्त दाम घ्या. पण हे लोक (सिस्टीम,राजकारणी इ.) मोफत वीज देईल असे सांगून इतकी अनियमीत, लो व्होल्टेज वीज देतात की ती नसलेली परवडली. असेच बी बियाणे, खते, बाजार व इतर नियंत्रणांबाबत म्हणता येईल.

@ पंगा - कृपया व्यक्तीगत घेवू नका. आपण सिस्टीम च्या काही घटकांचे प्रतिनीधी म्हणून चर्चा करतो आहोत असे मला वाटते.

सूर्यपुत्र's picture

19 Feb 2011 - 10:05 am | सूर्यपुत्र

फक्त शेतकर्‍यांना त्यांनी उत्पादन केलेल्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, हे अवास्तव वाटते.

मुळात शेतकरी जे पिकते, तेच विकतो असे अजिबात नाही; तर जे विकते ते पिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. त्यामुळे स्वउत्पादित वस्तूला जास्तीत जास्त भाव मिळालाच पाहिजे, अशी अपेक्षा ठेवतो. हा एक प्रकारचा जुगारच नव्हे का? आणि जर जुगारच खेळला जात असेल, तर शेतकर्‍याला कधी जास्त भाव मिळाला किंवा कधी कमी भाव मिळाला, तर त्यात एव्हढे नाराज होण्यासारखे काय आहे?

समजा, एखाद्या उत्पादकाने बाजारात एखादी वस्तू अमुक किमतीला उभी केली, आणि त्याने असा स्टँड घेतला, की मला या वस्तूचे अमुक एवढेच मूल्य मिळाले पाहिजे. आणि ग्राहकाचा असा स्टँड असेल, की ही किंमत अवाजवी आहे. तर त्या उत्पादकासमोर दोनच पर्याय उरतात : एकतर ग्राहक मागेल त्या किमतीला वस्तू विकणे किंवा दुसरे म्हणजे त्या वस्तूची विक्री न करणे. जर इतर उत्पादकांना जर असा न्याय असेल, तर शेतकर्‍याला झुकते माप का द्यावे?
उत्पादित वस्तूला योग्य किंमत न मिळाल्याने बंद पडलेल्या कितीतरी कंपन्या आहेतच की....

अजून एक मुद्दा आहे की आयटी कंपनीचा. आता आयटीवाल्यांना एव्हढा पगार असतांना त्यांनी शेतकर्‍याला १०० रु. देण्यास काचकूच करता कामां नये असे त्यांच्यावर कंपल्शन केलेले दिसून येते आहे.
आयटीत काम करण्यार्‍या कितीतरी जणांना मनोविकार/डिप्रेशन व इतर शारिरीक व्याधी, दुखणी आहेतच की... कितीतरी आयटीतले सुद्धा आत्महत्या करतात की.....
मग फक्त शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा एवढा एकच मुद्दा का?

-सूर्यपुत्र.

नगरीनिरंजन's picture

19 Feb 2011 - 10:17 am | नगरीनिरंजन

तुमचे मुद्देही बरोबर आहेत. समजा उद्या अतोनात लोकसंख्या वाढीमुळे अन्नधान्याला सोन्याचा भाव आला आणि शेतकरी खरोखर राजा झाला तर केवळ मानवतेच्या दृष्टीकोनातून स्वस्तात धान्य विकल का?
शिवाय हजारो शेतकी पदवीधारक स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करून आधुनिक तंत्राने कमी खर्चात जास्त उत्पादन करण्याचा प्रयत्न करायचे सोडून एमपीएससीच्या परिक्षा देऊन पीएसाआय किंवा डेप्युटी कलेक्टर व्हायच्याच मागे असतात त्याचं काय?
उगाचच मध्यमवर्गीय माणसाला बडवायचं याला काही अर्थ नाही.

@ सूर्यपुत्र ,

>>फक्त शेतकर्‍यांना त्यांनी उत्पादन केलेल्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, हे अवास्तव वाटते.

- सर्वांनाच योग्य भाव मिळावा आणि इतर औद्योगिक उत्पादनांना तो मिळ्तो आहेच. आपले उत्पादन किती ला विकावे हे उत्पादक ठरवू शकतो, पण दुर्दैवाने शेतकरी ते ठरवू शकत नाही. कांद्याला २ रु ते ६० रु. भाव हे फ्लक्च्युएशन काय दाखविते असे आपणांस वाटते ?

>>मुळात शेतकरी जे पिकते, तेच विकतो असे अजिबात नाही; तर जे विकते ते पिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. त्यामुळे स्वउत्पादित वस्तूला जास्तीत जास्त भाव मिळालाच पाहिजे, अशी अपेक्षा ठेवतो. हा एक प्रकारचा जुगारच नव्हे का? आणि जर जुगारच खेळला जात असेल, तर शेतकर्‍याला कधी जास्त भाव मिळाला किंवा कधी कमी भाव मिळाला, तर त्यात एव्हढे नाराज होण्यासारखे काय आहे?


- बाजारातील मागणी पुरवठ्याच्या तत्वांप्रमाणे कोणताही उत्पादक विक्री योग्य उत्पादनच करणार, त्यात गैर काय आहे ? आणि मी ही हेच म्हणतो की शेतकर्‍यास भाव मिळाला तर एव्ह्ढे नाराज होण्यासारखे काय आहे?

>>समजा, एखाद्या उत्पादकाने बाजारात एखादी वस्तू अमुक किमतीला उभी केली, आणि त्याने असा स्टँड घेतला, की मला या वस्तूचे अमुक एवढेच मूल्य मिळाले पाहिजे. आणि ग्राहकाचा असा स्टँड असेल, की ही किंमत अवाजवी आहे. तर त्या उत्पादकासमोर दोनच पर्याय उरतात : एकतर ग्राहक मागेल त्या किमतीला वस्तू विकणे किंवा दुसरे म्हणजे त्या वस्तूची विक्री न करणे. जर इतर उत्पादकांना जर असा न्याय असेल, तर शेतकर्‍याला झुकते माप का द्यावे?
उत्पादित वस्तूला योग्य किंमत न मिळाल्याने बंद पडलेल्या कितीतरी कंपन्या आहेतच की....

- मी तेच म्हणतो , झुकते माप देवू नकाच. पण जेव्हा त्याला भाव मिळतो त्यावेळेस कृत्रीम बंधने घालून त्याच्या तोंडाचा घास हिरावून घेवू नका (उदा. निर्यात बंदी इ.)
जर ग्राहकाला जर वस्तू नको असेल तर तो ती घेणार नाही हे मान्यच आहे. अशा वेळी दुसर्‍या वस्तूचे उत्पादन केले जाईल. तसाही ३०, ४० वर्षांपुर्वी कांदा हा मेन्स्ट्रीम प्रॉडक्ट नव्हताच मुळी.

>>अजून एक मुद्दा आहे की आयटी कंपनीचा. आता आयटीवाल्यांना एव्हढा पगार असतांना त्यांनी शेतकर्‍याला १०० रु. देण्यास काचकूच करता कामां नये असे त्यांच्यावर कंपल्शन केलेले दिसून येते आहे.
आयटीत काम करण्यार्‍या कितीतरी जणांना मनोविकार/डिप्रेशन व इतर शारिरीक व्याधी, दुखणी आहेतच की... कितीतरी आयटीतले सुद्धा आत्महत्या करतात की.....
मग फक्त शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा एवढा एकच मुद्दा का?

- कोणालाच कोणी ही काहीही कंपल्शन केलेले नाही. परवडत नसेल तर घेवू नका. पण जर इतर चैनीच्या वस्तू कितीही महाग झाल्या तरी घेण्यास तुम्ही तयार असाल तर शेतकर्‍याची नाडवणूक करु नका.
- आयटी वाल्यांच्या आत्महत्या आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची असंवेदनशील तुलना कृपया करु नका. जीव कोणाचाही मोलाचाच आहे पण दोन्ही परीस्थितींमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे हे तुम्ही देखील मान्य कराल.

@ नगरी निरंजन,

>>समजा उद्या अतोनात लोकसंख्या वाढीमुळे अन्नधान्याला सोन्याचा भाव आला आणि शेतकरी खरोखर राजा झाला तर केवळ मानवतेच्या दृष्टीकोनातून स्वस्तात धान्य विकल का?

- आपण मानवतेची चर्चा करीतच नाही आहोत. आणि सोन्याचा भाव येणे व शेतकरी राजा होणे या कविकल्पनांना वास्तवात आधार नाही. आत्ताच कांद्याचा भाव थोडा वाढताच त्यावर नियंत्रणे आली. कांदा जीवनावश्यक वस्तु नाही तरीसुध्दा. ज्या ज्या वेळी अन्नधान्य टंचाई झाली व भाव वाढले त्या त्या वेळी जिल्हाबंदी, लेव्ही इत्यादी मार्गांनी शेतकर्‍याच्याच मुसक्या आवळल्याचा इतिहास आहे.

>>शिवाय हजारो शेतकी पदवीधारक स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करून आधुनिक तंत्राने कमी खर्चात जास्त उत्पादन करण्याचा प्रयत्न करायचे सोडून एमपीएससीच्या परिक्षा देऊन पीएसाआय किंवा डेप्युटी कलेक्टर व्हायच्याच मागे असतात त्याचं काय?


- आपल्या प्रश्नातच उत्तर आहे. कारण शेती व शेतकर्‍याची पिळवणूक. गविंचा प्रतिसाद वाचा.

>>उगाचच मध्यमवर्गीय माणसाला बडवायचं याला काही अर्थ नाही.

- खरेतर कुणालाच बडवायची वेळ येवू नये अशी आदर्श परीस्थिती यावी. पण तोपर्यंत काय ?

सूर्यपुत्र's picture

19 Feb 2011 - 1:25 pm | सूर्यपुत्र

>>सर्वांनाच योग्य भाव मिळावा आणि इतर औद्योगिक उत्पादनांना तो मिळ्तो आहेच. आपले उत्पादन किती ला विकावे हे उत्पादक ठरवू शकतो, पण दुर्दैवाने शेतकरी ते ठरवू शकत नाही. कांद्याला २ रु ते ६० रु. भाव हे फ्लक्च्युएशन काय दाखविते असे आपणांस वाटते ?
नाही, असे अजिबात वाटत नाही. जसे उत्पादक करतो, म्हणजे उदा. : ही मोटारसायकल, हीची ऑन रोड प्राइस ४८,७४९।- आहे, घ्यायची तर घ्या, नाहीतर गेलात उडत. असा स्टँड शेतकरी घेवू शकतो का? आणि समजा त्याने असा स्टँड घेतला, तरी तो स्वःता त्याच्या मुद्द्यावर ठाम राहू शकेल काय?

>>बाजारातील मागणी पुरवठ्याच्या तत्वांप्रमाणे कोणताही उत्पादक विक्री योग्य उत्पादनच करणार, त्यात गैर काय आहे ? आणि मी ही हेच म्हणतो की शेतकर्‍यास भाव मिळाला तर एव्ह्ढे नाराज होण्यासारखे काय आहे?
नाही, नाराज अजिबात नाही. शेतकर्‍यांना जास्तीत जास्त भाव मिळावा असे मला मनापासून वाटते. पण समजा, काही कारणांमुळे ती किंमत खाली आली, तर त्या कारणांवर दोषारोप करण्यात काय अर्थ? (उदा. निर्यात वगैरे..)

>>मी तेच म्हणतो , झुकते माप देवू नकाच. पण जेव्हा त्याला भाव मिळतो त्यावेळेस कृत्रीम बंधने घालून त्याच्या तोंडाचा घास हिरावून घेवू नका (उदा. निर्यात बंदी इ.)
जर ग्राहकाला जर वस्तू नको असेल तर तो ती घेणार नाही हे मान्यच आहे. अशा वेळी दुसर्‍या वस्तूचे उत्पादन केले जाईल. तसाही ३०, ४० वर्षांपुर्वी कांदा हा मेन्स्ट्रीम प्रॉडक्ट नव्हताच मुळी.
हे का? जर समजा, ६० रु. किमतीची वस्तू जर काही उपाययोजनांमुळे ५ रुपयात मिळवणे शक्य असेल, तर असे मी का करु नये?

>>कोणालाच कोणी ही काहीही कंपल्शन केलेले नाही. परवडत नसेल तर घेवू नका. पण जर इतर चैनीच्या वस्तू कितीही महाग झाल्या तरी घेण्यास तुम्ही तयार असाल तर शेतकर्‍याची नाडवणूक करु नका.
हे मान्य.

>>आयटी वाल्यांच्या आत्महत्या आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची असंवेदनशील तुलना कृपया करु नका. जीव कोणाचाही मोलाचाच आहे पण दोन्ही परीस्थितींमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे हे तुम्ही देखील मान्य कराल.
काही अंशी सहमत. जीव दोघांचाही जातो. फक्त शेतकरी हाताबाहेरील परिस्थितीमुळे (उदा. दलाल, निर्यात, वगैरे) मरतो, तर आयटीवाले हातातील/ स्वनियंत्रण शक्य असतानाही न करता आल्यामुळे मरतो.

हे प्रॉब्लेम सोडवण्याचा एकच मार्ग दिसतोय. तो म्हणजे स्वःताचे अन्न स्वःता तयार करणे आणि तेसुद्धा कोणत्याही बाह्य घटकांवर अवलंबून न राहता - वनस्पतीप्रमाणे, कोई मिल गया मधील जादू सारखे.

-सूर्यपुत्र.

रमताराम's picture

19 Feb 2011 - 1:59 pm | रमताराम

समस्या आहे हे १००% मान्य. शेतकर्‍यांनीच सहकारी तत्त्वावर विक्रीचा प्रयत्न करा म्हटले तर मुटे साहेब म्हणणार 'नको रे बाबा', कुणी अन्य काही उपाय सुचवला तर म्हणणार 'एसीत बसून सल्ले देऊ नका' मग काय करा 'अपराधीपणाचे ओझे घेऊन जगा' नि ५०० रू किलो कांदा घ्या? नक्की काय करायचे ते सांगा की राव. आणि वर आधीच कोणीतरी म्हटले आहे तसे ४० रू किलोनेसुद्धा कांदा परवडत नाही लोकांना. आयटी वाले वा गाडीवाले लोक समाजात तीन ते चार टक्के आहेत. शिक्षा म्हणून आपण यांना १०० रू किलोने घ्यायला लावू हो, पण उरलेल्या ९५-९७ टक्क्यांचे काय? का शेतकर्‍यांना पैसे मिळावेत म्हणून यांनाही शिक्षा करायची?

शेतकर्‍यांच्या दुरवस्थेबद्दल कोणालाच शंका नाही. पण ते स्वतःच जर एकत्र होऊन काही करायला अंग झाडत असतील तर बाहेरचे कोण त्यांना मदत करणार. आपल्याला आवडो न आवडो, स्वार्थ हा सर्वात मोठा निकष असतो आपला. एकुणच समाज हा नेहमी एखादा त्राता वा प्रेषित येऊन आपले कल्याण करील असे तत्त्वज्ञान घेऊन जगतो. असा त्राता क्वचितच येतो नि दुसरा कोणी आपल्यासाठी निस्वार्थीपणे काही करणे ही दुर्मिळ गोष्ट आहे (असे करणार्‍यालाही त्याचा 'ड्यू रिस्पेक्ट' न देण्याचा कृतघ्नपणा सार्‍याच समाजघटकांत बहुमताने नसला तरी दखलपात्र नक्कीच आहे). तेव्हा स्वावलंबन हे अवघड नि चिकाटीचा कस पाहणारे असले तरी तेच अपरिहार्यच होते, हे दुर्दैवाने खरे आहे. हे मान्य करून पुढे जाणेच शहाणपणाचे ठरते. याचा अर्थ रमताराम स्वत:ची जबाबदारी - जी काही असेल ती - झटकून टाकताय्त असे म्हटले तरी हरकत नाही.

आपला समस्येबद्दल विचार करण्याचा दृष्टिकोनच बहुधा चुकीच्या समाजघटकाशी तुलना करण्याने होतो. याचे एक कारण म्हणजे समस्येच्या मुळापाशी जाऊन विचार करण्यापेक्षा (एवढा डोक्याला नि शरीराला ताप कोण करून घेणार) त्या समस्येचे खापर फोडायला बकरा शोधण्याचे काम आपण करतो, ते एकदा झाले की आपण पारावर बसून विड्या ओढायला मोकळे.

मुटेसाहेब, तुमच्यासारखे सुशिक्षित नि अभ्यासू लोक त्या शेतकर्‍यांच्यामधे इतके वर्ष राहून काही उपाय काढून शकत नसतील तर इथे कुणीतरी म्हटल्याप्रमाणे एसीत बसलेले लोक तुम्हाला काय मदत करू शकतील? तुम्ही शेतकरी मंडळी मिळून विचारपूर्वक उपाय तर ठरवा (आम्हा एसीत बसलेल्यांचे उपाय तुम्हाला भाबडे, अव्यवहार्य वाटतील ना) मग तो/ते अंमलात आणायला इतर समाजाने मदत करावी ही रास्त अपेक्षा धरायला हरकत नाही. चला सांगा तुम्ही शेतकरी लोक सांगा काय उपाय आहे ते नि उरलेले समाजघटक तुम्हाला मदत करतील यासाठी यथाशक्ती प्रयत्न आम्ही करू याचे आश्वासन निदान मिपाकर देतील याची खात्री आहे. अर्थात ते उपाय इतर - खास करून ३% श्रीमंत वगळून इतर - समाजाचा विचार करून द्याल ही अपेक्षा आहे. एका विहिरीतून पाणी उपसून दुसर्‍या विहिरीत टाकून पाणीटंचाई दूर करता येत नाही एवढे ध्यानात ठेवा म्हणजे झाले.

गंगाधर मुटे's picture

19 Feb 2011 - 2:36 pm | गंगाधर मुटे

कांद्याच्या भावाची चर्चा करताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, संबध मानवजातीच्या निर्मिती पासून किवा शेतीत कांदा पिकायला लागल्यापासून कांद्याला भाव म्हणून प्रती किलो रू. ४०/- पेक्षा जास्त दर शेतकर्‍यांच्या पदरात पडण्याचे केवळ दोनच प्रसंग उद्भवलेत.

पहिला प्रसंग जेव्हा अटलबिहारी बाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा. (शेवटी कांद्यापायी त्यांचे सरकार गेले म्हणतात.)
तेव्हाही कांद्याचे भाव पाडण्यासाठी बाजपेयी सरकारने प्रयत्न केले नाहीत असे नाही. पण कांद्याचा भाव थेट दोन रूपयावर घसरून शेतकर्‍याचे आयुष्य बरबाद करण्याइतपत कोडगेपणा किंवा शेतकरीविरोधीपणा त्यांना दाखवता आला नसावा.

दुसरा प्रसंग आताचा.
यावेळेस मात्र प्रतिकिलो २ रू सुद्दा शेतकर्‍यांच्या हातात पडणार नाही, अशी शासनाने पुरेपूर व्यवस्था करताना अजिबात मागेपुढे पाहिले नाही.
कारण बाजपेयी सरकारपेक्षा तुलनेने काँग्रेस जास्त अनुभवी आहे. कांद्याच्या भावाचा आणि शेतकर्‍यांची मते मिळविण्याचा काहीएक संबध नाही, हे त्यांना पक्के ठाऊक आहे. शेतकरी मते देतांना कांद्याचा भाव नव्हे तर जातपात पाहून मतदान करतात हेही त्यांना पक्के ठाऊक आहे.

मुख्य मुद्दा असा की, अतिवृष्टीमुळे कांद्याचे पिक अत्यंत कमी आले, त्यामुळे भाव वाढलेत. पुढील हंगामात नवे पिक बाजारात आले की, भाव घटणारच होते. काही काळ धीर धरणे एवढाच काय तो प्रश्न होता. त्यासाठी कपटकारस्थाने करून आयात-निर्यातीच्या कोलांटउड्या मारण्याची काहीएक गरज नव्हती.

येथे कांद्याचे वाढलेले भाव हा काही मर्यादीत काळापुरता म्हणजे नवे पीक बाजारात येईपर्यंतचा मुद्दा होता, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

ग्राहकांनीही एक किलो कांद्या ऐवजी एक पाव कांदा वापरून काटकसर केली असती तर ग्राहकांचे "कुपोषण" थोडेच झाले असते?

कारण कांद्याचा प्रती किलो रू. ४०/- हा भाव कायमस्वरूपी राहूच शकत नाही, हेही समजून घेणे आवश्यक आहे.

रमताराम's picture

19 Feb 2011 - 3:10 pm | रमताराम

हा प्रतिसाद स्वतंत्र आहे, माझ्या प्रतिसादाला उपप्रतिसाद नाही म्हणून तो संदर्भ सोडला आहे. (तसा असेल तर माझ्या मुख्य मुद्याला तुम्ही पूर्ण बगल दिली आहे असे म्हणेन)

तुम्ही भाजप नि कॉंग्रेस सरकारची तुलना केली आहे तो माझा विषय नाही यास्तव त्यावर मी बोलत नाही.

येथे कांद्याचे वाढलेले भाव हा काही मर्यादीत काळापुरता म्हणजे नवे पीक बाजारात येईपर्यंतचा मुद्दा होता, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

हे न समजण्याइतके कोणी अज्ञानी असावे असे मला वाटत नाही. पण शंका ही ही असू शकत होती की तेव्हाही काही अन्य कारणाने पीक कमी झाले तर ही महागाई कशी कमी होणार होती? आणि कोणत्याही संवेदनशील मुद्यावर सरकारला निर्णय घ्यावाच लागतो नि तो १०० कोटीच्या पूर्ण देशाच्या जनतेचा विचार करून घ्यायचा असतो. त्यामुळे 'कट करून' वगैरे त्रागा अस्थानी आहे. शेतकर्‍यांचा तोटा झाला हे कोणी अमान्य करीत नाही, पण 'कटकारस्थाने' वगैरे शब्द वापरून तुम्ही पुन्हा एकवार चुकीच्या गृहितकावर विचार करता आहात असे खेदपूर्वक नमूद करतो. विविध उत्पादक मालावर निर्यात वा आयात बंदी हे गरजेनुसार उचललेले पाऊल असते (सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असे याबाबत म्हणणारे सरकारला जितके पैलू ध्यानात घ्यावे लागतात त्याची कल्पनाही करू अशकत नाहीत). ज्यांना त्याची झळ पोचते ते त्याबद्दल आक्षेप घेतात हे ही योग्य पण त्याबाबत उपाय काय हे ही त्यांनी सांगायला हवे (वरील विहीरीचे उदाहरण ध्यानात ठेवून).

ग्राहकांनीही एक किलो कांद्या ऐवजी एक पाव कांदा वापरून काटकसर केली असती तर ग्राहकांचे "कुपोषण" थोडेच झाले असते?

आणि असे घडत नव्हते असे तुम्हाला म्हणायचे आहे का? कांद्याऐवजी कोबी व मुळा वापरून स्वैपाक करणे चालू होतेच. सुमारे दीड महिना हा कांद्याचा भडका सहन केलाच की ग्राहकाने. तुम्ही सांगा किती महिने सहन करायला हवा होता, पुढील पीक येईपर्यंत, म्हणजे किमान तीन ते चार महिने? आणि वर म्हटल्याप्रमाणे ते ही पीक काही कारणाने कमी आले असते तर? तेव्हा निर्यातबंदी करायची असे म्हणाल तर तेव्हा इंडक्शनच्या न्यायाने (तुम्ही गणिती आहात म्हणून हे उदाहरण घेतले) पुन्हा हाच तर्क देता आला असता नाही का? असो.

गंगाधर मुटे's picture

19 Feb 2011 - 7:39 pm | गंगाधर मुटे

आणि असे घडत नव्हते असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
नाही. तसे म्हणण्याचे कारणच नाही. कारण ग्राहकाच्या हातात "अंथरून पाहू पाय पसण्याच्या पलीकडे काहीच नाही."
शिवाय ग्राहकाचा दबाव होता म्हणून सरकारने "आयात-निर्यात" ह्या कोलांट उड्या घेतलेल्या नाहीत.
ग्राहकांचा आणि कांद्याचा भाव कमी-जास्त होण्याचा अर्थाअर्थी काहीही संबध नाही.
त्यामुळे मी ग्राहकांशी आवाहनात्मक हितगूज केले. ग्राहकच जबाबदार आहे असे म्हटलेले नाही.

ग्राहक किंवा ग्राहकाचा प्रतिनिधी शासकीय निर्णय प्रक्रियेत नव्हता किंवा कांद्याच्या भावावर ग्राहकांनी देशव्यापी हरताळही केला नव्हता, त्यामुळे ग्राहकांना दोष देण्याचे काहीही औचित्य नाही.

तुमच्या इतर मुद्द्यांवर यथावकाश लिहितोच.

तिमा's picture

19 Feb 2011 - 9:15 pm | तिमा

शेतकरी व ग्राहक यांना मधले दलाल लुबाडत आहेत हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असताना त्यावर उपाय शोधायचा सोडून तेच आपापसात भांडू लागले तर कोणाचा फायदा होईल ?

मिपावर पुन्हा कोणीतरी इसाप अवतरावा इसापनीतिच्या नवकथा लिहायला!

पैसा's picture

20 Feb 2011 - 9:36 am | पैसा

आपल्या देशात खरं म्हणजे कांदाच काय इतर कोणत्याही शेती उत्पादनाचे भाव 'मागणी-पुरवठा' तत्त्वानुसार ठरत नाहीत. शेतकरी आणि ग्राहक मधल्या दलालांच्या मर्जीनुसार नाचवले/नाडले जातात.

भाव वाढण्याचं दुसरं कारण म्हणजे कमॉडिटी मार्केट. निदान भारतासारख्या देशात, जिथे ७५% लोक गरीब आहेत, तिथे खाद्य-अन्नधान्य किमती नियंत्रित असाव्यात, आणि त्यात फ्युचर्स ट्रेडिंग असू नये.

मधले दलाल गब्बर होतात आणि ग्राहक आणि शेतकरी दोघही पिडले जातात त्याच काय ?
.
तसेही दलाल रोजच फसवत असतात.शेतकर्‍याला फसवतात तसे ग्राहकालाही फसवत असतात.
.
६० रुपयातले शेतकर्‍याच्या हातात फक्त ६रुपये जातात. बाकीचे दलालांच्या घशात .
.
उलट दलाल किंवा सहकारी संस्था ग्राहकांना लुटताहेत.
.
शेतकरी व ग्राहक यांना मधले दलाल लुबाडत आहेत हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ

* * * * * * * *
सर्व जनतेला व्यापारी आणि दलालच लुटतात, जनतेच्या आर्थिक शोषण करणारा मुख्य घटक व्यापारी हाच आहे, असा भारतीय जनतेचा ठाम विश्वास आहे आणि हा परंपरागत विचार आहे.
दोन पिढ्या आधी भारतीय जनता मोठ्या प्रमाणावर अशिक्षतच होती. शिवाय दळवळणाची साधने नसल्यामुळे संचार कमी होता. टीव्ही कि, रेडियो किंवा वृत्तपत्र नसल्यामुळे त्यांचे एकूनच जग काही चौरस किलोमिटर एवढेच सिमित होते.
त्यामुळे या अडाणी जनतेच्या संपर्कात येणारा मुख्य व्यक्ती म्हणजे व्यापारीच असायचा.
व्यापार हा मुळातच बाजारपेठांच्या गणीतानुसार चालणारा पण अवांतर बाजारपेठांची माहीतीच मिळत नसल्याने त्या बिचार्‍यांना प्रत्येक गोष्टीसाठी व्यापारी/दलालच आहे कारणीभूत आहे, असे मनोमन वाटायचे.
तोच विचार,संस्कार पुढील पिढीवर झालेत, आणि सर्व जनतेला व्यापारी आणि दलालच लुटतात, जनतेच्या आर्थिक शोषण करणारा मुख्य घटक व्यापारी हाच आहे, हाच समज आजतागायत सुरू आहे.

व्यापारी/दलाल ग्राहकांची लूट करीत नाहीत, असे मला म्हणावयाचे नाही,
पण
व्यापारी वर्गाला गब्बर होण्याच्या संध्या (चान्सेस) कोण उपलब्ध करून देतेय? त्यांच्यावर नियंत्रणे लादण्यासाठी किंवा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कुणाचे हात थरथरतात? का थरथरतात?
सर्व व्यापाराचे, मालाचे भाव ठरविण्याचे अधिकार कुणाकडे एकवटले आहेत?
कायदा बनविण्याची आणि त्याचा अंमल करण्याची जबाबदारी कुणाची?
शासन आणि प्रशासन यांचीच ना?

आता हेच बघा.
सरकारने कांदा आयात करून कांद्याचे भाव पाडलेत. मग व्यापार्‍यांनी २ रू किलो भावाने कांदा खरेदी करून साठवण केली असणार.
आता पुन्हा सरकार निर्यात करून कांद्याचे भाव वाढविणार, मग व्यापारी २ रू भावाने खरेदी केलेला कांदा १०-१५ रुपये भावाने विकणार.
आणि आम्ही मात्र सरकार सोडून व्यापार्‍याला बदनाम करणार.......!

आज महाराष्ट्रात कापसाला प्रती क्विंटल ६०००-७००० रूपये भाव मिळत आहेत. आणि एवढे भाव देणारा सरकार नव्हे तर व्यापारी आहे.
आजही जर महाराष्ट्रात "कापूस एकाधिकार योजना" असती तर कापसाला ३००० ते ४००० पेक्षा जास्त भाव मिळालाच नसता.
आणि 'मलिंदा' शासन आणि प्रशासन यांनी मिळून खाऊन टाकला असता.

महाराष्ट्रात "कापूस एकाधिकार योजना" असताना कापूस गंजींना का आगी लागत होत्या, याचे उत्तर आपण शोधणार की नाही?

महाराष्ट्रात "कापूस एकाधिकार योजना" असताना परराज्यातील व्यापारी कापसाला जास्त भाव देत होते, त्याची आकडेवारी उपलब्ध होऊ शकते.

तेव्हा व्यापारी, शेतकर्‍यांच्या व ग्राहकाच्या शोषणाला/लुटीला एकमेव दोषी आहे, अशी आजची परिस्थिती राहिलेली नाही.
शेतकर्‍यांच्या व ग्राहकाच्या शोषणाला/लुटीला "शासन आणि प्रशासन" हेच मुख्यत्वे जबाबदार आहेत, दुर्दैवाने हे खरे आहे.

गणेशा's picture

21 Feb 2011 - 6:37 pm | गणेशा

सरकारने कांदा आयात करून कांद्याचे भाव पाडलेत. मग व्यापार्‍यांनी २ रू किलो भावाने कांदा खरेदी करून साठवण केली असणार.

मला एक माहिती हवी आहे, फक्त व्यापारीच साठवण करु शकतात का ? शेतकरी का नाही ?
निर्यात्बंदी उठवल्यावर शेतकरी स्वता साठवण केलेला कांदा का विकु शकत नाही ?
मी जुन्नर ला माझ्या मित्राच्या घरी मोठेच्या मोठ्या जाळीदार क्षेत्रात ( नाव आता आठवत नाही) कांद्याची साठवण केलेली पाहिली आहे.

असो शेतकर्‍यांचे दु:ख माहीत आहेच... सरकार हाच फक्त घटक जर कारणीभुत आहे तर शेतकरीच सर्वत जस्त फेक किंवा आंधळी मते देतात ते पहिले सुधारलेच पाहिजे असे वाटते ... असो जसा प्रह्न किचकट आहे तसेच त्यामागची कारणे ही असे वाटते.

शेतकरी हा नक्कीच उत्पादन करणारा आहे पण त्याची विक्री तो व्यापार्‍यावर टाकतो .. इतर उत्पादन दारांचे जे उदाहरण दिले जातेय ते विक्री करण्यास सक्षम आहे, अआणि जर ६ रुपये शेतकर्‍याला आणि ५४ रुप्ये व्यापार्‍याला होत असेन, तर शेतकर्‍यांनी एकत्र येवुन स्वताच्या गावात स्वताचे व्यापारी केलेच पाहिजेत.. प्रत्येक गावात असे करुन योग्य भाव त्यांनाही आणि ग्राहकाला ही असे केलेच पाहिजे ...

विजुभाऊ's picture

21 Feb 2011 - 4:33 pm | विजुभाऊ

टाटा बजाज हे त्यांच्या उत्पादनाची किम्मत स्वतः ठरवतात कारण त्याना त्या उत्पादनाचा एक्झॅक्ट उत्पादनखर्च माहीत असतो. ज्या दिवशी शेतकरी शेती उत्पादनाचा असा उत्पादनखर्च शास्त्रीय रीत्या ठरवू शकेल त्या दिवशी त्याला काय पिकवावे आणि ते कसे बाजारात उतरावे ते कळेल.
शेती तोट्यात जाते असे सर्वसाधारणपने म्हणण्यात काहीच अर्थ नाही. रीलायन्स फ्रेश सारखी खाजगी कंपनी शेतमाला चांगला भाव देते.
मध्यन्तरी रीलायन्स ने उस शेती आणि साखरकारखाने काढायचा विचार केला होता. पक्षापक्षातील भेदाभेद विसरुन सर्वानी त्याला विरोध केला.
शेतकर्‍याचा खरा शत्रू मिडीयाचे सामर्थ्य वळवू शकणारा शहरी मध्यमवर्ग हाच आहे.
कमोडीटी मार्केटमुळे शेतमालाच्या किमती शेतकर्‍याचा काहीही फायदा न होताच कितीतरी वाढतात पण त्याला या मध्यमवर्गाने कधीच विरोध केलेला नाही.

गंगाधर मुटे's picture

21 Feb 2011 - 5:08 pm | गंगाधर मुटे

रीलायन्स फ्रेश सारखी खाजगी कंपनी शेतमाला चांगला भाव देते.

रीलायन्स फ्रेश सारखी खाजगी कंपनी कोणता शेतमाल खरेदी करते?

कांदा, पालक, वांगी, टमाटर की

गहू, ज्वारी, मूग ?

.................................

मध्यन्तरी रीलायन्स ने उस शेती आणि साखरकारखाने काढायचा विचार केला होता.

उस कारखाने काढून सहकार गब्बर झाला कदाचित त्याची जागा रीलायन्स कंपनी घेईल.

लुटणारे बदलतील मात्र लुटला जातो तो आहे तिथेच असेच ना? ;)

गवि's picture

21 Feb 2011 - 5:17 pm | गवि

फारच निराशावादी बोलता. म्हणजे काय नो वे आउट सिच्युएशन आहे का?

गंगाधर मुटे's picture

21 Feb 2011 - 5:58 pm | गंगाधर मुटे

आशेचा किरण फक्त सरकारने आपले "शेतकरी विरोधी" धोरण बदलले तरच सापडू शकेल.

मी आशावादी बोलल्याने थोडी शेतीची दशा पालटणार आहे?

आता असे बघा की, कापसाच्या निर्यातबंदीला शासनाने काही काळ स्थगीती दिल्याबरोबर कापसाला रू. ७०००/- एवढा विक्रमी भाव मिळत आहे.

निर्यातबंदीला शासनाने काही काळ स्थगीती दिली नसती तर कापसाचे भाव कधीच रू. ३०००/- च्यावर चढलेच नसते.

प्रसन्न केसकर's picture

21 Feb 2011 - 8:48 pm | प्रसन्न केसकर

१९८० च्या दशकात काहीसे असेच विचार ऐकले होते शेतकरी संघटनेतल्या काहीजणांकडुन. (तेव्हा संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी काहीश्या अश्याच भुमिकेतुन लक्स च्या टिव्हीवरच्या जाहिरातीचे स्वागत पण केले होते.) पंचवीस वर्षांनी परत जवळपास तेच मुद्दे पण वेगळ्या पद्धतीने मांडलेले वाचुन आधी गंमत वाटली पण नंतर दु:ख पण झाले.
एकुण प्रतिसाद वाचले अन कुठेतरी वाटले की तुमची गल्ली चुकली आहे. एकतर भारत-इंडिया संघर्ष मागे टाकणे एव्हढे सोपे नाही. त्यात भारत इंडियाशिवाय असु शकत नाही. (इंडियाची भारत असण्याची गरज काळानुसार कमी होत आहे.) कदाचित इंडियाला अन भारताला एकत्र आणण्याचा तुमचा उद्देष असेलही पण तो देखील पुरेसा साध्य होत नाहीये.
समजुन घ्या मुठेसाहेब, भारत आणि इंडिया ही आज संपुर्ण ध्रुवीकरण झालेली दोन जगे आहेत. भारताला इंडियात सगळे आलबेल आहे असे वाटते तर इंडियाला भारताबाबत फारशी आस्था राहिलेली नाही. इंडियाच्या दृष्टीने भारताची प्रतिमा म्हणजे सकाळी उठून, चरवीभर दुध पिऊन, हजार्-दोन हजार जोर-बैठका मारुन, दणदणीत न्याहारी करुन, बैलं-नांगर घेऊन शेतावर जाणारा शेतकरी; त्याची डोईवर पाटीत जेवण घेऊन जाणारी कारभारीण अशी सामान्य जनता; ७०-८० च्या दशकातल्या मराठी चित्रपटात निळु फुले, राजशेखर यांनी साकारल्याप्रमाणे दिसणारे-वागणारे पुढारी; हिरवीगार शेती अन अन त्यातुन झुळुझुळु वाहणारे मोटेचे पाणी अशीच आहे.
या इंडियाला एपीएमसी अ‍ॅक्ट, कापुस एकाधिकार, उसाची झोनबंदी, पणन महामंडळ, बाजार समित्या, अडते वगैरे काही माहिती नाही. हा त्यांचा दोष नाही. जसे भारतातले लोक गांजलेले आहेत तसेच इंडियातले पण वैतागलेले आहेत. त्यामुळे इंडियातल्या बर्‍याच लोकांना इंडियाबाहेरच्या संपन्न जगात कसे कधी जायला मिळेल ही चिंता सतावते.
अश्या परिस्थितीत जर तुमचा प्रयत्न दोघांना एकत्र आणणे हा प्रयत्न करायचा असेल तर सुरुवातीपासुन सुरुवात करायला हवी. माझी सुचना अशी आहे की शेतमाल शहरापर्यंत, तिथल्या ग्राहकापर्यंत कसा पोहोचतो, त्याचा भाव कसा बदलत जातो, शेतकर्‍याचे (जिरायत आणि बागायत) अर्थशास्त्र कसे असते अशी एक समग्र लेखमाला आधी तुम्ही लिहावी. त्यात सर्व पैलु तटस्थपणे विषद करावेत आणि त्यानंतर परिस्थितीवर प्रतिसादांची अपेक्षा करावी.

गंगाधर मुटे's picture

21 Feb 2011 - 10:35 pm | गंगाधर मुटे

प्रसन्नजी, तुमच्या मुद्यांशी मी सहमत आहे.
१९८० च्या दशकात आम्ही 'भयानक' आक्रमक होतो. आमचे विचार आम्ही आक्रमकतेने मांडायचो.
पण विचार कितीही अस्सल असेल तरी ते समोरच्यावर लादून उपयोगाचे नाही.

माझा आंतरजालावरील वावर हा फक्त वर्षभरापुर्वीचा. सुरुवातीला मी मायबोली संकेत स्थळावर बरेच लेखन केले. एवढे की मायबोली प्रशासनाला शेती आणि शेतकरी असा स्वतंत्र विभाग काढावा लागला. पण एकंदरीत त्या लेखांवरून फार मोठे काही विचारमंथन झाले नाही.

मी प्रतिसादाच्या अपेक्षेने लिहित नाही, पण प्रतिसादाशिवाय चर्चाही होत नाही. आणि पुन्हापुन्हा पहिल्या पानावर येत नाही. त्यामुळे प्रतिसाद जर मिळाले नाहीत तर ते फार लोकांच्या वाचनातही येत नाही.

त्यामुळे नुसती लेखमाला लीहूनही उपयोगाची नाही, ती वाचली गेली पाहिजे.

तुमच्या सुचनेचा आदर आहे. बघुया काय होते ते.

प्रसन्न केसकर's picture

21 Feb 2011 - 10:38 pm | प्रसन्न केसकर

तुम्ही जे लिहु इच्छित आहात ते मी समजतो कारण माझा शेती, शेतकर्‍यांशी जवळचा संबंध आहे आणि कोणे एके काळी माझा संघटनेशी, किसान परिवाराशी संबंध आलेला आहे. मी स्वतःला भारत आणि इंडियाला जोडणारा एक दुवा समजतो. त्याच दृष्टीकोणातुन मी वीस वर्षे पत्रकारिता केली.
पण तुम्ही जे सांगु इच्छिता ते इथे बर्‍याच लोकांना समजणार नाही कारण त्यांना मुळ प्रश्न काय आहेत, ते कसे उभे रहातात, त्या मागची कारणे काय आहेत हेच माहिती नाही. हा त्यांचा दोष नाही कारण हा संवादाचा अभाव कायमच राहिलेला आहे. त्यांना तुमच्या दृष्टीकोणातुन वस्तुस्थिती कधी दाखवली गेलेलीच नाही. वस्तुस्थिती समजुन घेण्याएव्हढा वेळच त्यांना नाही. जसे ग्रामीण शेतकरी परिस्थितीने पिडलेले आहेत तसेच शहरी मध्यमवर्गीय लोकही पिडलेले आहेत.
पण त्यांना नीट समजावले तर समजुन घेण्यात नक्कीच रस आहे. मग तुम्हीच हे नीट समजेल असे का लिहित नाही? तुम्ही वांग्याबद्दल लिहिलेत तेव्हा प्रतिक्रिया आलीच ना?
मुळात इथे जेव्हा लोक शेतमाल आणि उत्पादने यांच्यामध्ये तुलना करतात तेव्हा बहुसंख्य लोकांना हे माहिती नसते की शेतातील उत्पादन कुणाला विकायचे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य शेतकर्‍याला नसते. शेतकर्‍याला त्यापासुन कायदे रोखतात, परिस्थितीही त्याविरोधात असते. जेव्हा ते म्हणतात की शेतकर्‍यांनी स्वतःच वितरण व्यवस्था उभारावी आणि प्रत्यक्ष ग्राहकालाच माल विकावा तेव्हा त्यांना शेतकर्‍यांचा पतपुरवठा वगैरे माहिती नसते.
ते अगदीच अज्ञ नसतात. शेतमाल निर्यातीकरता विमानसेवा सुरु केली, द्राक्षापासुन वाईन उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची शासनाने घोषणा केली, शेतमाल प्रक्रिया उद्योगांना सबसिडी जाहिर झाली, शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली हे त्यांच्यापर्यंत सतत पोहोचत असते. त्यासाठीच शासकीय यंत्रणा भरपुर पैसे खर्च करत असते. पण त्याची दुसरी बाजु त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. ती पोहोचली पाहिजे यात शंकाच नाही. ती जर पोहोचली नाही तर त्यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नाचा विचार कसा आणि किती करावा? स्वतः एका बाजुला महागाई, अन्य प्रश्नाने होरपळत असताना इतरांचे प्रश्न त्यांनीच कसे समजुन घ्यावेत?
म्हणुनच मुळ चौकट कशी शेतकर्‍याचे हातपाय बांधते ते त्यांना समजले पाहिजे. शासनांची धोरणे, कायदे आणि आता येत असलेला कॉर्पोरेट हस्तक्षेप कसा शेतकर्‍याला त्रासदायक आणि शहरी वर्गाला फसवणारा आहे हे स्पष्ट केले पाहिजे. रिलायन्स फ्रेश सारखे कॉर्पोरटायझेशन (काँट्रॅक्ट फार्मिंगच त्या रुपात येत आहे.) प्रत्यक्षात शेतकरी आणि शहरी लोकांना फसवुन पैसे लुटण्याचे प्रयत्न आहेत हे पटवुन दिले पाहिजे.
तुम्ही हे न करता जर लेखन केले तर त्यांना एकतर ते रडगाणे वाटेल किंवा अपराधीपणाची जाणीव देईल. दोन्ही परिस्थितींमधे तुमच्या लिखाणाला प्रतिसाद मिळतील पण तुम्हाला अपेक्षित प्रतिक्रिया येणार नाही.

गंगाधर मुटे's picture

22 Feb 2011 - 9:30 pm | गंगाधर मुटे

प्रसन्नजी,
शेतीतील किंवा पूर्ण देशातीलच गरीबीचे एकमेव कारण शेतीवर होणारे अक्षम्य दुर्लक्ष हेच आहे. शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून निघेल एवढी व्यवस्था झाली तर देशापुढील गरीबीच्या समस्येची सोडवणूक होऊ शकते.
हे बहूतेकांना कळतेही, पावले मात्र त्या दिशेने पडत नाही.
शेतमालाच्या उत्पादनखर्चानुसार भाव ही न्याय्य मागणी आहे, हेही बहूतेकांना कळते, पावले मात्र त्या दिशेने पडत नाही.
याचे कारण काय असावे? मला एक दिवस एक उत्तर मिळाले. पण नुसते सांगीतल्याने ते कुणालाच पटणार नाही. मग त्याविषयी सविस्तर लिहायला हवे. त्यावर लेखमाला लीहावी, असाही विचार केला. पण सुरूवात अजून व्हायचीय.
शेतीविषयावर लिहिण्यासारखे खूप आहे. यथावकाश लिहिण्याचा प्रयत्न आहेच.