भगवान श्री परशुराम जयंतीच्या शुभेच्छा

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in जनातलं, मनातलं
3 May 2008 - 7:05 am

लोकहो ,

शके १९३० सालची भगवान श्री परशुराम जयंती वैशाख शुद्ध तृतीया दिनांक ०७ मे २००८ रोजी आहे. हा दिवस अक्षय्य तृतीयेचा.

समस्त मिसळपावकरांना भगवान श्री परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि भगवान परशुरामांना त्रिवार वंदन.

अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु:।
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥

आपला,
(परशुरामभक्त) धोंडोपंत

संस्कृतीशुभेच्छा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

3 May 2008 - 8:00 am | विसोबा खेचर

आमच्याही अनेक शुभेच्छा!

आपला
(परशुरामभक्त) तात्या.

अवांतर-

अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु:।
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥

म्हणजे रे काय धोंड्या! तेवढं जरा समजावून सांग पाहू...

(एक वे़ळ भुताला भिणार नाही पण संस्कृतला भिणारा) तात्या.

अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु:।
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥

म्हणजे

जिव्हाग्रे वसती वेद चार, जरी चापबाण पाठीवर
ब्राम्ह तेजे शाप शक्ती, क्षात्र तेजे सोडी शर ||

चतुरंग

निजबळावर असाध्य ते साध्य करून घेण्याचे सामर्थ्य
स्वत:हून सिद्ध करण्याचा गुरूमंत्र देणार्‍या परशुरामास सादर प्रणाम.

वाचासिद्ध वेद चार, धनुष्यबाण पाठीवर |
शापशक्तीही सर्वोच्च, क्षात्रशक्तीही परात्पर ||

आणि भगवान श्रीपरशुरामांना साष्टांग दंडवत !

व्यंकट

अवलिया's picture

7 May 2008 - 12:21 pm | अवलिया

अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु: ह्स्तयो: तुला।
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं इदं वैश्यं शापादपि शरादपि अर्थादपि

स्वाती दिनेश's picture

7 May 2008 - 12:24 pm | स्वाती दिनेश

चतुरंग आणि गोळेकाका दोघांचेही मराठीकरण आवडले,
स्वाती