कुमार गोडबोल्यांची प्रेमकहानी ...

टारझन's picture
टारझन in जनातलं, मनातलं
19 Jan 2011 - 1:42 pm

कु गोडबोल्यांची प्रेम कहानी

रामदास सर काय मिष्टर गोडबोल्यांच्या प्रेमकहानीची उत्तरपुजा घालेनात म्हणुन आमच्या आसपासच्या गोडबोल्यांची प्रेम कहानी लिहु म्हंटलं :)

हं तर झालं असं हे कु. गोडबोले नुकतेच एका मल्टिनॅशनल सॉफ्टवेयर कंपनी मधे रुजु झाले होते. मी नुकताच रुजु झालो होतो आणि नविन जागेवर बसायला आल्याच्या दुसर्‍या दिवशी कु. गोडबोले क्युबिकलात बाजुच्या डेस्कावर आले होते. कु. गोडबोले तसे लाजरे बुजरे दिसत होते. घरचं वातावरण कडक असावं. कारण ते दिवसातुन जेवढे दोन चार शब्द बोलत त्याला देखील साखरेचा मुलामा लावुन गोड आवाजात बोलत. गोडबोले फार हुषार असावेत हे त्यांच्याशी झालेल्या संभाषणानंतर कळलं. मस्त पैकी सीओईपी सारख्या नामवंत आणि फक्त ओव्हर टॅलेंटेड लोकांसाठी असणार्‍या कॉलेजातुन ह्यांनी संगणक पदवी प्राप्त केली होती. उंचीला तसे अ‍ॅव्हरेजंच . पण गोरेपान आणि अति अभ्यासु किड्याला असतो तसा बर्‍यापैकी नंबरचा चष्मा. पण तो सुबक फ्रेम मुळे त्याला स्मार्ट दिसतो. गोडबोल्याच्या कंपनीत आल्या आल्या काही तरी उच्च अपेक्षा असाव्यात. आपल्याला एखाद्या लाईव्ह प्रोजेक्ट वर टाकावं , पुस्तकांत शिकल्याप्रमाणे सॉफ्टवेयर आर्किटेक्चर आणि मोडयुल डिझाइनचं एखादं टास्क मिळावं किंवा गेला बाजार एखादी कोर फंक्शणॅलिटी पार मुळासकट बदलुन टाकण्याचा आणि स्क्रॅच पासुन कोड लिहीण्याचं काही तरी काम मिळावं म्हणुन गोडबोल्याला नेहमी वाटे. त्यामुळे तो नेहमी कंपनीच्या लायब्ररी मधुन कसलीशी ब्लॅकबुकं किंवा ठोकळे रेफरंस बुकं घेउन यायचा. आणि नुसता यायचाच नाही , तर ती खोलुन पानं च्या पानं खायचा देखील. गोडबोल्याची बुद्धी तल्लख आहे हे मला जाणवलं होतं , पण त्याला योग्य दिशा मिलत नसल्याने एखाद्या रँडमली फिरणार्‍या मोलेक्युल सारखा त्यातुन तो फक्त गॅमा रे पसरवत होता आणि माझ्या बाजुलाच बसत असल्याने त्यांची झळ मला बसत होती . काही दिवसांनी तर मी एखादा उष्मारोधक सुटंच घालुन येईल की काय से वाटु लागले. अरे गोडबोल्या , कॉलेजात केला तो अभ्यास पुरे रे .. आता तरी त्या पुस्तकांतुन बाहेर नीघ , आयटी क्षेत्रातल्या तुझ्या कवीकल्पनांना लवकरंच तडा जाणार आहे तेंव्हा एम् सील घेऊन तयार बैस ! पण ऐकेल तो गोडबोल्या कसला ? आणतोय एकेक पुस्तकं .

हळु हळु सगळे स्थावरले. गोडबोलेही स्थावरले. गोडबोल्या आणि मी एकाच प्रोजेक्ट मधे आलो होतो. प्रोजेक्ट भला मोठा होता , त्यामुले भरपुर टिम पाडुन प्रत्येक टीम ला एकेक मोड्युल आणि त्यातही वेगवेगळ्या स्तरावरच्या फंक्शनॅलिटीवर टाकले होते. गोडबोल्या पुर्ण कॉलेजात कधी पुस्तकांच्या गठ्ठ्यातुन बाहेर पडला नव्हा हा माझा अंदाज खरा होता. व्हर्व असो वा कॉलेज गॅदरींग , कॉलेज आउटिंग ला सुद्धा गोडबोल्या पुस्तकांत गुरफटलेला असे. त्यामुळे गोडबोले अभ्यासात नोबेल विनर असले तरी एक्स्ट्रा करिक्युलर्स मधे मात्र झिरो होते. मग पोरगी पटवणे वगैरे गोष्टी तर लांबच राहिल्या. गोडबोले एकदम हृतिक नसला तरी अगदीच आषिश विद्यार्थी पण नव्हता. पण घरुन "अभ्यास करत जा " , " रँक आली नाही तर बघ " , " नसत्या कटकटींत गुंतु नकोस " , " अभ्यासावरुन विचलीत होईल अश्या गोष्टींत लक्ष घालता कामा नये " , " पैसे जपुन खर्च करणे " असल्या इंस्ट्रक्षण्स मिळाल्यामुळे गोडबोल्याचे कॉलेजपन अगदी बालपना सारखे गेले . गोडबोल्याला भावना नव्हत्या असं नाही. पण त्या भावना त्याने घरच्यांच्या अपेक्षा आणि पुस्तकं या खाली पार दाबुन टाकल्या होत्या. पण हळु हळु गोडबोल्या मोकळा होत होता.

पण गोडबोल्या माझा एवढा पचका करेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. कंपनीत स्पोर्ट्स इव्हेंट होत होते. सगळा बाजार तिकडे उलंडला होता. म्हणुन मी कंपनीतली हिरवळ दाखवण्यासाठी गोडबोल्याला ग्राउंड वर घेऊन गेलो . व्हालिबॉल चे सामने चालु होते. पोरं मस्त पैकी शॉर्ट्स आणि टिशर्ट्स वर खेळत होती. कोणी नुसतीच स्टाईल मारत होता. तर कोणाला साधा बॉल सुद्धा मारता येत नाही म्हणुन ओशाळत होता पण तरीही खेळमं काही सोडत नव्हता. तर हा गोडबोल्या मला म्हनतो कसा, " अरे तो काळ्या चड्डीतला पोरगा बघ ना , कसला स्मार्ट दिसतोय रे " , मी कपाळावर आठ्या उमटवत गोडबोल्याकडे वळुन पाहिलं , माझे भाव त्याला झेपलेच नाहीत , म्हणतो " तो पिवळ्या टिशर्ट वाला बघ ना यार , काय हाईट अन् बॉडी आहे .. वा ! " . मी कपाळाला हात मारला. म्हंटलं लेकाच्या ग्राऊंडच्या अवतीभवती एवढे अ‍ॅसेट्स नाचवत ललनांचा थवा फिरतोय , त्यातल्या एकीवरही तुझी नजर जाऊ नये ? गोडबोल्या त्यानंतर मग फक्त मुलांच्या खेळाचे आणि त्यांच्या हाईट बॉडीचे कौतुक करत राहिला.

ह्या प्रकरणानंतर गोडबोल्याने माझ्या कडे कितीही भावना प्रकट केल्या तरी मी त्याच्याशी त्या विषयावर बोलत नव्हतो. पण एक दिवस गोडबोल्या चक्क मला बार मधे घेउन गेला. अधुन मधुन कधीमधी गोडबोल्या गुपचुप बियर मारायचा. आज तो मला घेउन गेला होता. एक किंगफिशर प्रिमियम गोडबोल्याने डोळे मिटुन एका झटक्यात रिकामी केली. गोडबोल्या आता झिंगला होता. इतर वेळी एकदम सोफेस्टिकेटेड्ली बोलणारा गोडबोले एकदम पेटलाच होता. "भेंचोद टार्‍या ... " गोडबोले बियरचा ग्लास टेबलावर आपटत म्हणाला , " साला लाईफ झंड आहे राव ... २४ वर्षं फुकट घालवली राव "
मी , ".... "
" साला लहानपणा पासुन नुसता अभ्यास , नुसत्या इन्स्ट्रक्शन्स , आईचे नुस्ते डुज अँड डोन्ट्स चे तक्ते ... आय अ‍ॅम फेडप "
गोडबोल्या रडत होता. आज तो अचानक फेड अप का व्हावा ? आणि आज अचानक त्याचे डोळे का पाणवाले ? माझ्या साठी सगळंच एक "अवघड कोडं " होतं. संस्थळांवरच्या कोड्यांच्या नादी लागण्याची सवय नसल्याने ह्या ही कोड्याचं उत्तर मला मिळेल का नाही ह्यात शंका नव्हती. :) त्यानंतर गोडबोल्या अखंड रित्या त्याचं फ्रस्ट्रेशन काढत राहिला , आई वडीलांना कोसत राहिला, उरलेल्या शिव्या तो मला देत होता , पण मला त्या शिव्यांचं काही वाटत नव्हतं. कार्यक्रम संपल्यावर गोडबोल्यानं मला घट्ट मिठी मारली. आणि परत ओक्साबोक्षी रडला. मद्यपानानंतर माणुस जेंव्हा बोलायला सुरुवात करतो तेंव्हा आपण फक्त ऐकण्याचे काम करायचे असते हे मी पुनम बारच्या अनुभवांतुन शिकलो होतो.

पाच सहा महिन्यातं गोडबोल्या आता पक्का रुळला होता. त्याची पुस्तकं मागं पडली होती. नेहमी फॉर्मल कपड्यांतला गोडबोलु आता फॅन्सी जिन्स आणि कुल टिशर्ट्स , गॉगल , हॅट्स , डियो न काय काय वापरु लागला होता. त्याला कोणी तरी पोरींना "कुल डुड" आवडतात म्हणुन सांगितले होते. असे वागल्या नंतर पोरी आपल्याला येऊन चिकटतील ह्या भाबड्या कल्पनेत गोडबोल्या जगत होता. गोडबोल्या कधीच कोणत्या पोरीला अ‍ॅप्रोच करत नसे. नव्हे त्याची हिम्मतंच होत नसे. गोडबोल्या एक सुंदर कविताकार आहे हे मला अपघातानेच कळलं . एक दिवस काही कामानिमित्त त्याचा ड्रॉवर उघडला असता त्यातुन कागदांचा भला मोठा गठ्ठा मिळाला . काय सुंदर शब्द बंबाळ कविता करतो गोडबोल्या वा. एवढे गोड शब्द , एवढे गोड शब्द ? " अरे गोडबोल्या , ह्यातला कोणताही एक पिस पोरीच्या हातावर किंवा कानावर टेकवला असता तरी तुझं काम झालं असतं की रे ? " एकेक पान चाळत मी त्याला म्हणालो. गोडबोल्या त्यावर फक्त " च्यक् , असं थोडी असतं ? " म्हणत काहीतरी कमांड टाइप करत राहिला. "अरे खरंच .. पोरींना बाकी काही आवडो वा न आवडो , कविता जरुर आवडतात , आणि त्यात जर त्यांची तारिफ केलेली असेल तर मग काय विचारता ? " मी आपलं ज्ञान पाजळत म्हणालो .. गोडबोल्याला आता जरा इंटरेस्ट आला होता , "ए खरंच का रे ? मला वाटायचं पोरगी चिडेल , कंप्लेंट करेल .. "
" हत लेका .. एवढं गोड बोलल्यावर तर दगड पण पाझरेल , तो कंबख्त लडकी क्या चिझ है ? " मी खांदे उडवत म्हणालो. आता गोडबोल्या साठी मी एक आदर्श गुरु होतो. मी जे सांगेल ते गोडबोल्या करणार होता. त्याला ती कोपर्‍यातल्या क्युबिकल मधली पोरगी आवडायची. पण तिचं नाव गाव पत्ता ह्याला काही ठाऊक नव्हतं , तसा काही चान्स पण नव्हता.

गोडबोल्यात हिम्मत तर नव्हतीच , किमान नाव तरी माहिती हवं म्हणुन काही तरी करायला पाहिजे पण सुचत नव्हतं तसा गोडबोले अस्वस्थ झाला. गोडबोल्या ला म्हंटलं एक आयडीया कर. लंच ब्रेक ला सगळा फ्लोर रिकामा होतो तेंव्हा तिच्या कंप्युटर पाशी जा , आणि कोणत्या युजर ने कंप्युटर लॉक केलाय बघ. गोडबोल्याला स्वर्ग २ बोटं राहिला होता. जसं भाकित केलं होतं तसंच घडलं , गोडबोल्या गेला न गपचुप कंप्युटरवर नाव बघुन आला. आणि बावळटा सारखा तिकडुनंच ओरडला " सौम्या .. .सौम्या आहे रे ही ... " त्या सरशी वारुळातुन नागोबांनी डोकं बाहेर काढावं तसं ४-५ क्युब्ज मधुन डोकी वर आली. पण त्यांना त्याचं काही वाटलं नसावं , कारण जशी ती डोकी वर आली होती तशी पुन्हा आत गायब झाली. सौम्या चं नाव कळल्याने गोडबोल्या खुशीत होता. माझ्याकडे येत म्हणाला ... "येस्स .. सौम्या .. व्हाट्स नेक्स्ट मिष्टर टारु ? ? " त्याला म्हंटलं व्हाट नेक्स्ट काय ? ती दुपारी एकदा कधीतरी त्या चहा च्या मशीन पाशी चहा आणायला जाते. तिथं शक्यतो कोणी असतं , पँट्रीवाला / वाली असेल तर त्यांना सरळ इग्नोर करायचं :) " हो हो .. बरोबर .. आणि ? " गोडबोल्या मी पार घास भरवुन देईन इतपर्यंत अपेक्षा करत होता. " आणि मग मी जातो तिकडे आणि तिच्याशी गुलुगुलु बोलतो "

तसं सौम्या आणि गोडबोल्या एकदम काटकोणात बसत असल्याने दोघांनी माना वळवल्या की एकमेकांची टाळकी दिसत. आयडीइया देऊन आठवडा झाला तरी गोडबोल्याचा धीर काही होत नव्हता. पण गोडबोले हल्ली माझ्याशी वळुन बोलायचा कमी झाला होता. त्याचं सगळं लक्ष त्या कोपर्‍यातली वर होतं .. मी पण जरा प्रश्नपक्षातुन आराम मिळाल्याने मिसळपाव वर व्यवस्थित बिनारुकावट टाईमपास करत होतो. :) एकदा अचानक गोडबोल्या उठला आणि कॉफी मशीन च्या कोपर्‍यात गेला. ती तिथे कॉफी घेत होती. मी उत्कंठेने हे महाराज काय करतात ते पहात होतो . त्यांचं काहीतरी बोलनं झालं आणि गोडबोल्या हसत हसत आला. म्हंटलं काय रे काय झालं ? झालं का काही ?
"अरे हो मग ... मी तिला सांगितलं , इथंला चहा फारंच पाणचट असतो नाही ? " त्यावर ती म्हणाली सुद्धा ..
"काय ? "
" हो " ... " हो " म्हणाली गड्या ती , आणि हसली सुद्धा. प्रेमात पडलेल्या प्रेम विराला पोरगी कशीही हसली तरी ती फक्त आपल्या साठीच हसल्याचे भास होतात पण हे त्याला कोण समजावेल ? पण समजावणे जरुरी नव्हतं , ह्यामुळे गोडबोल्याचा कॉन्फिडन्स कमी होण्याची शक्यता असते. त्यानंतर रोज आठवडाभर गोडबोल्या तिला कॉफीमशीन पाशी गाठत राहिला आणि काहीतरी फालतुपणा करत राहिला. ह्याने काही यश येणार नाही हे जाणुन मी त्याला म्हणालो . .
" तीला टपरीवरचा च्या का पाजत नाहीस ? चांगला असतो ना ? "
"अरे हो यार .. " गोडबोल्या उत्साहात म्हणाला.
लगेच गडी त्याच दिवशी तिला तसं बोलला देखील . तिने ह्यावेळी मात्र गोडबोल्याला नोटिस केलं . काहीशी संकोचली ती , काही सुचलं नसावं . पण ही शाळा थोडी आहे . गोडबोल्या तिला घेउन चालला होता, आमच्या डेस्क पासुन जाता ना .. "चल रे चल च्या पिउन येऊ" म्हणाला . "येडा रे येडा ... जा लेका .. मला कामं आहेत " मी वर न बघता हसत हसत उत्तर दिले.

त्या दिवशी स्वारी जाम आनंदात होती. गोडबोल्याची भिड चेपली होती. दिसायलाही सभ्य आणि सुरक्षित वाटत असल्यामुळे सौम्या ने त्याला काही इग्नोर केलं नव्हतं . खरं तर ती देखील नविनंच आली होती , आणि कोणीही मित्र नसल्यानं हे गोडबोल्याच्या पथ्यावर पडलं होतं .
"काय मिष्टर गोडबोले , तुमची तर निकल पडी ... काय ऐकत नाय आं पप्लिक आता " मी सकाळी सकाळी हेलमेट ठेवत न जॅकेट खुर्चीला टांगत गोडबोल्याला म्हणालो. तसा गोडबोल्या एकदम लहान मुलासारखा हसला. गोडबोल्याने माझं बघुन लगेच जिम पण जॉइन केली होती. सौम्याची गाडी आता बर्‍या पैकी व्यक्तिगत पातळीवर गेली होती .गोडबोल्या नॉर्मली बोलावं तसं तिच्याशी बोलत होता. ती देखील त्याला मित्राच्या नात्यानेच वागवत असावी.
" काय रे सोंड्या ,एवढ्या छाण छाण कविता करतोस ... एखादी ऐकवलीस का तिला ? " मी.
"हो ना गड्या , केलीये तर .. एक छाण कविता केली ये ... अगदी तिच्यावरंच .. म्हणजे तिचं नाव नाही त्यात पण तिच्या सगळ्या कॅरॅक्टरिस्टिक्स आहेत त्यात " गोडबोल्या ड्रॉवर उघडुन कागद पुढे करत म्हणाला.
कविता खरोखर छाण होती . मी आपलं त्यातही नाक खुपसत त्यात २ बदल सुचवले ते त्याने विनासंकोच केले देखील
"आज ही तिला ऐकवणार ... " गोडबोल्या कौतुकाने कवितेकडे बघत म्हणाला.

चार च्यासुमारास गोडबोले तिला घेऊन खाली गेले. खिडकीतुन मी पाहिलं , गोडबोल्या तिला घेऊन झाडाखालच्या एका बाकडावर मस्त बसला होता. मग तिच्या समोर उभा राहुन अगदी भाषण करतात तशी काहीशी पोज घेऊन कविता म्हणत असावा. ती उगाचंच वार्‍याने उडणारे केस सावरत होती .. सगळं सुरळीत चालल्याचं पाहुन मी आपला सिट वर येऊन बसलो . थोड्यावेळानं सौम्या आली. डोळे लाल झालेले , आणि ती रुमालाने पुसत झपझप चालत माझ्या इथुन निघुन गेली. थोड्यावेळानं हताश मुद्रा घेऊन गोडबोल्या आला.
"काय झालं बे ? " खुर्ची वळवत मी त्याला म्हणालो.

( क्रमशः)

बालकथापाकक्रियाविरंगुळा

प्रतिक्रिया

चायला....
ते क्रमश: कशाला तडमडायला??????????

एकदम सोलीड्च.......
गोडबोल्या पेटलाय एकदम..
लवकर टाक रे पुढचा भाग

प्रचेतस's picture

19 Jan 2011 - 2:20 pm | प्रचेतस

एकदम झक्कास रे.

कानडाऊ योगेशु's picture

19 Jan 2011 - 1:54 pm | कानडाऊ योगेशु

ह्या कु.गोडबोलेंचाही मि.गोडबोले होऊ नये म्हणजे मिळवली!

नंदन's picture

19 Jan 2011 - 2:01 pm | नंदन

गोडबोल्यांनी केलेली कविता कशी असेल याचा विचार करतो आहे :), येऊ द्या पुढचे भाग.

>>> मद्यपानानंतर माणुस जेंव्हा बोलायला सुरुवात करतो तेंव्हा आपण फक्त ऐकण्याचे काम करायचे असते हे मी पुनम बारच्या अनुभवांतुन शिकलो होतो.
--- हाण्ण! गावकुसाबाहेरच्या व्यथांना तोंड फुटलेले पाहून अं. ह. झा. आणि ड्वा. पा. :P

अवलिया's picture

19 Jan 2011 - 2:20 pm | अवलिया

हाण्ण! गावकुसाबाहेरच्या व्यथांना तोंड फुटलेले पाहून अं. ह. झा. आणि ड्वा. पा.

हा हा हाण्ण तिच्यायला ! व्यनीच्या कथांना व्यथा म्हणावे का असा विचार करत आहे.

टारोबा ! पटकन येउद्या पुढचा भाग!!

हा हा हाण्ण तिच्यायला ! व्यनीच्या कथांना व्यथा म्हणावे का असा विचार करत आहे.

नाना कहर आहेस लेका

नरेशकुमार's picture

19 Jan 2011 - 4:51 pm | नरेशकुमार

मद्यपानानंतर माणुस जेंव्हा बोलायला सुरुवात करतो

सुरु होन्यासाठि मद्यपानाची खरंच गरज असते का ?
.
.
.
.
.
.पुढचा भाग कधी ?
प्रतिक्रिया पुर्ण लेख वाचुन झाल्यावरच.

आधा काम, नो दाम.

चित्रा's picture

20 Jan 2011 - 5:25 am | चित्रा

छान जमली आहे भट्टी.

बाकी गोष्टीत पुढे काय होणार, याचे अजून चिंतन चाललेले असावे असे वाटते आहे.

पर्नल नेने मराठे's picture

19 Jan 2011 - 2:01 pm | पर्नल नेने मराठे

ह्म्म...... इन्ट्रेस्तिन्ग आहे गोडबोले न सौम्या ............क्रमश कशाला आता मधे..उगाच उत्सुकता ताणु नकोस ;)

परिकथेतील राजकुमार's picture

19 Jan 2011 - 2:04 pm | परिकथेतील राजकुमार

झकास सुरुवात रे वाचतोय.
गोडबोल्यावर काय संक्रात आलीये म्हणे आता? उत्कंठा वाढली आहे.

बाकी सौम्या नाव वाचुन एकदम 'द अंग्रेज' मधली अ‍ॅटमबॉम्ब सौम्या डोळ्यासमोर तरळली.

sneharani's picture

19 Jan 2011 - 2:05 pm | sneharani

मस्त! मस्त झालाय हा भाग!
भाग मोठा असला तरी ओघवत्या शैलीमुळे पटापट वाचून झाला!
येऊ दे पुढचा भाग पटकन!!

:)

स्वैर परी's picture

19 Jan 2011 - 2:11 pm | स्वैर परी

वाचते आहे! लवकर पुढचा भाग येउ देत! :)

मृगनयनी's picture

19 Jan 2011 - 2:17 pm | मृगनयनी

स्टोरी मस्त आहे हो टार्या! " क्रमशः" अगदी योग्य वेळी घातल्यामुळे लेख अधिक उत्कन्ठावर्धक झालेला आहे!

:)

मृत्युन्जय's picture

19 Jan 2011 - 2:14 pm | मृत्युन्जय

झक्कास जमलंय टार्झनभौ. पुढचा भाग कवकर येउ द्यात.

अनुराग's picture

19 Jan 2011 - 2:16 pm | अनुराग

छान

तृणफुल's picture

19 Jan 2011 - 2:21 pm | तृणफुल

लवकरच पुढचा भाग पण क्रमशः करा!!!! :)

स्वतन्त्र's picture

19 Jan 2011 - 2:34 pm | स्वतन्त्र

आमच्या हापिसात पण यक गोडबोले हाये.डिक्टो असाच, त्याची आठवण झाली !

प्यारे१'s picture

19 Jan 2011 - 2:37 pm | प्यारे१

चान चान...!!!

वर्णनावरुन बरेच गोडबोले आठवले.

कुसुमिता१२३'s picture

19 Jan 2011 - 2:49 pm | कुसुमिता१२३

मस्त जमलय! लवकर लिही पुढे काय घडलं ते!

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Jan 2011 - 3:05 pm | llपुण्याचे पेशवेll

छाण छाण छाण. वाचतो आहे हां टार्‍या.

टार्‍या कहर केलास... तु आणि लव्हगुरु केव्हा झालास रे टवाळकी सोडून...

- पिंगू

स्वाती दिनेश's picture

19 Jan 2011 - 3:08 pm | स्वाती दिनेश

टार्‍या, पुढचे भाग लवकर लिही रे..
स्वाती

महेश-मया's picture

19 Jan 2011 - 3:59 pm | महेश-मया

काय राव उत्सुक्ता ताण्ताय लवकर पुढील भाग लिहा.

नावातकायआहे's picture

19 Jan 2011 - 4:12 pm | नावातकायआहे

फक्कड टारु भाउ!

फुडल यैंद्या लवकर!!

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Jan 2011 - 4:19 pm | बिपिन कार्यकर्ते

उच्च! उच्च!! उच्च!!!

तुमच्या लेखानात टार्‍या‍ दिसला (तोच तो ब्वाना वाला टार्‍या). आनंद वाटला!

पुढचा भाग लिहून तयार असेल तर लगेच टाक!

मितभाषी's picture

19 Jan 2011 - 8:41 pm | मितभाषी

जबरा पुनरागमन टार्‍या. :)
आवडले.
पुढचा भाग टाक लवकर.

RUPALI POYEKAR's picture

19 Jan 2011 - 4:38 pm | RUPALI POYEKAR

पुढचा भाग लवकर येऊ दे.

आत्मशून्य's picture

19 Jan 2011 - 4:40 pm | आत्मशून्य

मी आपलं त्यातही नाक खुपसत त्यात २ बदल सुचवले ते त्याने विनासंकोच केले देखील

बहूतेक इथच पाणी मूरतय. शाप लागतील कु. गोड्बोलेचे. काय हो हा कु. गोड्बोले म्हणजे ३ इडीयट्स मधला चतूर नाहीना ?

टुकुल's picture

19 Jan 2011 - 4:54 pm | टुकुल

पुढे काय झाले ते लवकर लि रे टारु

--टुकुल

प्राजक्ता पवार's picture

19 Jan 2011 - 5:00 pm | प्राजक्ता पवार

मस्तं लिहलंय .

मुलूखावेगळी's picture

19 Jan 2011 - 5:12 pm | मुलूखावेगळी

आवडली १ नम्बर
गोडबोलेना टारबोले गाइडन्स मस्त
पन क्रमशः नको तिथे लावलास ना
बाकि गोडबोले ने टारबोले गाइडन्सने अजुन काय केले पुढे हे काय वाचायला उत्सुक

प्यारे१'s picture

19 Jan 2011 - 5:54 pm | प्यारे१

>>>For the first time in the history of mankind ‘Need’, ‘Comfort’ and ‘Luxury’ are sold at the same price in India! Onions Rs.65, Petrol Rs.65 and Beer Rs.65.>>>

Need’, ‘Comfort’, ‘Luxury’

Onions, Petrol, Beer

योग्य जोड्या जुळवा.

मुलूखावेगळी's picture

19 Jan 2011 - 9:29 pm | मुलूखावेगळी

.

योग्य जोड्या जुळवा

तुम्हीच हे सत्कर्म करा
पुन्हा सोरी टार्झना...!! म्हनत

भडकमकर मास्तर's picture

19 Jan 2011 - 5:15 pm | भडकमकर मास्तर

आज लै दिसांनी आलो.. वाचून मजा आली टार्‍या....
तो पूनम बार मधला सन्दर्भ आणि त्याला योग्य दिशा मिलत नसल्याने एखाद्या रँडमली फिरणार्‍या मोलेक्युल सारखा त्यातुन तो फक्त गॅमा रे पसरवत होता आणि माझ्या बाजुलाच बसत असल्याने त्यांची झळ मला बसत होती .
हे वाक्य बेस्ट..

लवकर पुढचा भाग टाका...
वाट पाहतोय

रेवती's picture

19 Jan 2011 - 6:30 pm | रेवती

मस्त!
वाचतिये.

मराठे's picture

19 Jan 2011 - 6:39 pm | मराठे

मस्त!

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

यशोधरा's picture

19 Jan 2011 - 6:41 pm | यशोधरा

=))

प्रीत-मोहर's picture

19 Jan 2011 - 7:00 pm | प्रीत-मोहर

बिकाशी शमत

रामदास's picture

19 Jan 2011 - 7:00 pm | रामदास

ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला.....
ऐन वेळी आम्हाला सलाईनच्या बाटलीसारखं उलटं टांगून ...लेखक फरार.
मस्त जमली आहे कथा .डोळ्यासमोर कुमार गोडबोले कसे दिसत आणि वागत असतील याचं हुब्बेहुब चित्रण केलं याची दाद द्यावी तेव्हढी कमीच.
लगे रहो..

श्रावण मोडक's picture

19 Jan 2011 - 9:05 pm | श्रावण मोडक

हाहाहाहाहा... सहमत!

पिवळा डांबिस's picture

20 Jan 2011 - 3:08 am | पिवळा डांबिस

टार्‍या, छान जमलाय पहिला भाग!
अजून येऊंदेत!!

ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला.....
ऐन वेळी आम्हाला सलाईनच्या बाटलीसारखं उलटं टांगून ...लेखक फरार.
हाहाहा!!
क्रमशःक्लब मध्ये टारोबांचे स्वागत!!!
;)

अजून येऊंदेत!!

सहमत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Jan 2011 - 7:23 pm | निनाद मुक्काम प...

शाळेतील अनेक गोड्बोल्यांची आठवण झाली .
त्यातले अजून अनेक जण मौकेकी तलाश मध्ये आहेत .
कारण
मौका सभीको मिळता हे

प्राजु's picture

19 Jan 2011 - 7:52 pm | प्राजु

मस्तच! पुढे लवकर लिही.

पैसा's picture

19 Jan 2011 - 9:21 pm | पैसा

छाण कथा पण ते "क्रमशः" वाचून अम्मळ हिरमोड झाला! लवकर पुढचा भाग येऊ द्या. आत्मशून्य ने म्हटल्याप्रमाणे कवितेतल्या बदलातच काही तरी ग्यानबाची मेख असावी असं वाटतंय.

अप्रतिम लेख होता ..... तिळगुळ चा असर दिसतो आहे गोडबोल्यान्वर ... पण टारु साहेब तुम्ही एवढे छान लव्ह गुरु असाल माहित नव्हत .. बाकी रिअल लाइफ मधे स्वताहाची स्थिती अगदी गोडबोल्यान्सारखीच होती .... पन का हो तुम्ही स्टोरी कम्प्लिट का नाही केली ? आता मन अस्वस्थ झलाय पुढचा भाग वाचायला ... लवकर लिहा हो ....

बाकी रिअल लाइफ मधे स्वताहाची स्थिती अगदी गोडबोल्यान्सारखीच होती ...
टार्‍याला हा खास घरचा आहेर...

नितिन थत्ते's picture

19 Jan 2011 - 10:32 pm | नितिन थत्ते

लै भारी कथा...

पुढचा भाग लवकर येऊ दे.

त्या गोडबोल्यांचा बोळा लवकर निघुद्या हो.

मुक्तसुनीत's picture

19 Jan 2011 - 11:30 pm | मुक्तसुनीत

व्यंकूची शिकवणी - पार्ट २
- लेखक टा रु मिरासदार.

पार्ट १ चा शेवट : "ती हल्ली माझ्याकडे असते !" ;-)

मितभाषी's picture

19 Jan 2011 - 11:40 pm | मितभाषी

"ती हल्ली माझ्याकडे असते !"
=)) =)) हाण्ण

असे झालेच तर टारुबाळाचे काही खरे नाही. कारण जेनचे लक्ष आहे इकडे. =))

गोडबोल्याची शिकवणी. भाग १
लेखक- टारोबा टिचर.

शिल्पा ब's picture

20 Jan 2011 - 12:03 am | शिल्पा ब

काय बे!! फुडं काय झालं?

विनायक बेलापुरे's picture

20 Jan 2011 - 4:09 am | विनायक बेलापुरे

ते क्रमशः कशाला कडमडायला ?

लवकर येउद्या पुढचा भाग.

पंगा's picture

20 Jan 2011 - 7:08 am | पंगा

'क्रमशः'पण नेमक्या ठिकाणी टाकला आहे.

उरलेला भाग कसा येतो ते बघू या.

लवकर पुढचा भाग टाकणे.

आजानुकर्ण's picture

20 Jan 2011 - 10:22 am | आजानुकर्ण

मस्तच रे टारू. पुढचा भाग लवकर येऊ द्या.

आमोद शिंदे's picture

20 Jan 2011 - 7:18 pm | आमोद शिंदे

पहिला भाग तरी भारी झाला आहे! पुढचा भाग लवकर येऊ द्या.

प्रदीप's picture

20 Jan 2011 - 10:37 am | प्रदीप

प्रेम-पोपट-महर्षी टारझन ह्यांच्याकडून धडे शिकल्याने कुमार गोडबोल्यांचे ह्या कथेत पुढे काय होणार आहे, हे दिसते आहे :)

चालू द्या. वाचतो आहे.

कृपया पुढचा(चे) भाग कुमार म्हातारा झाल्यानंतर टाकू नका.

अतुलजी's picture

20 Jan 2011 - 11:12 am | अतुलजी

मस्त!
पुढचा भाग लवकर येऊ द्या.

दिपक's picture

20 Jan 2011 - 11:22 am | दिपक

भन्नाट झालाय हा भाग. कसं सुचतं रे तुला?

स्मिता.'s picture

20 Jan 2011 - 11:37 am | स्मिता.

एकदम मस्त लिहिलं आहेस... कोणीतरी समोर बसून किस्सा सांगत आहे असं वाटत होतं वाचताना, अर्थातच नेहमीप्रमाणे.
लव्हगुरू होऊन भरपूर पुण्य कमावशील बरं का! (आणि शिव्या सुद्धा खात असशील ;) )
पण तुलाही हा 'क्रमशः' रोग लागला का रे टार्‍या? पुढचे भाग पटापट येऊ दे.

बाकी ही गोष्ट बालकथा, पाकक्रिया या लेबलांसहीत का आहे?

मी-सौरभ's picture

20 Jan 2011 - 7:59 pm | मी-सौरभ

बरं गोडबोले आडनाव निवडलत :)
>>गोडबोले एकदम हृतिक नसला तरी अगदीच आषिश विद्यार्थी पण नव्हता.
आषिश विद्यार्थी पेक्षा 'विजय राज' चाल्ला असता की राव

ज्ञानेश...'s picture

20 Jan 2011 - 8:19 pm | ज्ञानेश...

जुणा टार्‍या परत दिसल्याने आणंद वाटला.
पुढे वाचण्यास उत्सुक.

वपाडाव's picture

14 Feb 2011 - 3:39 pm | वपाडाव

१ महिन्याचा अवधी उलटुन गेला
आता तरी पुढचा अन्क येउ द्या.
प्रेमकहाणीत व्यत्यय णको.

टारु, पुढचा अंक टाका की लवकर, आयला लई ताणुन धरु नका, गोडबोल्याला नाहीतर तो सगळं सोडुन शेती करायला लागेल दागक्तारांप्रमाणे.

टारु, पुढचा अंक टाका की लवकर, आयला लई ताणुन धरु नका, गोडबोल्याला नाहीतर तो सगळं सोडुन शेती करायला लागेल दागक्तारांप्रमाणे.

हे चक्क नजरेतुन सुटल होतं. :)

घाटावरचे भट's picture

15 Feb 2011 - 12:00 am | घाटावरचे भट

असेच म्हणतो.

मनिष's picture

15 Feb 2011 - 10:39 am | मनिष

सही जमलाय हा भाग, आता लवकर पुढचा भाग येऊ दे! :-)

पुढचा भाग लिहीण्याचे मनावर घेत आहोत . पण सर्वांना एक कळकळीची विणंती आहे .. त्या रामदास सरांना "मिष्टर गोडबोल्याची प्रेमकहानी .. " पुर्ण करायला उद्युक्त करा. रोज खरडी करुन विट आणा त्यांना :) मी तर बोलुन बोलुन थकलो .. त्यांचे हे अपुर्ण सॉफ्टवेयर जिव्हारी लागणारे आहे . ; )

ही कहाणी आता कोण पूर्ण कर्णार?

महासंग्राम's picture

27 Apr 2016 - 5:04 pm | महासंग्राम

याचा पुढचा भाग कोणी वाचायला देईल काय access denied म्हणून येतय प्रोफाईल वर गेल कि

मराठी कथालेखक's picture

27 Apr 2016 - 5:52 pm | मराठी कथालेखक

अरेरे...या क्रमश: वर बंदी आणली पाहिजे :)

पुंबा's picture

27 Apr 2016 - 6:23 pm | पुंबा

ही कथा पुर्ण करा राव..

मराठी कथालेखक's picture

27 Apr 2016 - 6:53 pm | मराठी कथालेखक

पाहिल्या अवतारात अपुर राहिलेलं काम डू आय डी घेवून पूर्ण करा