नाकाची उचकी

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
19 Jan 2011 - 6:47 am

आई आज काय आहे ते सांग तरी,
कोणासाठी बनवली ही बासुंदी पुरी?

तुझे प्रश्न ऐकून, मी त्रासलेय पुरी
बाहेर जाउन खेळ, बसू नकोस घरी

आणतील का मोठे, खाउ छान छान?
का सांगतील खोटे, बंद होते दुकान!

परवा पाहुण्यांनी उचलून घेतले थेट
गाल पिळून हा्ती दिले छोटे चॉकलेट

अवलक्षणी कार्टा लाज माझी काढतो
नसते प्रश्न विचारून भंडावून सोडतो

आजच्या काकांचे नाक जरा वाकडे
सारे सोडून कार्टे हसेल बघून तिकडे

आज गप्प बस, पचकू नको, नको तिथे
नाकाविषयी बोलू नको काही उलटेतिलथे

काकांना बघता आईलाच आले टेन्शन
मनात करी वाकड्या नाकाचे निरीक्षण

नाक जणू एकीकडे चिमट्याने खेचले
की ठोशाच्या धपाट्याने ठसकन ठेचले!

कार्टे जरी धाकाने बसून राहीले गप्प
पहात होते नाकाकडे सारखे टक्कमक्क

पाहुण्यांपेक्षा आई होती कार्ट्यामधेच दंग
डोळ्यात त्याच्या पाहीले वाकडे प्रतिबिंब

देवा ह्याला देऊ नको दुर्बुद्धी आज
पचकून काहीतरी काढेल माझी लाज

खुणावे त्याला हळूच, नाका बोट लावी
डोळे वटारूले, इशारा गप्प रहा बजावी

कार्टा तोंड फ़िरवून हसू दाबे बळेबळे
वाकडे नाक बघून मिचकावलेच डोळे

आता मेला दिवे पाजळणार नक्की,
नक्को तेच बोलून करणार नाचक्की

म्हणे बघा जरा, आंबट नाही ना नाक?
आईची घालमेल, पाहुण्याला वाढता ताक,

भुरका घेता पाहुणा, उचकी ठसकली
कार्टे म्हणे आई नको तिथे पचकली!

कथाकविताविनोद

प्रतिक्रिया

सहज's picture

19 Jan 2011 - 7:21 am | सहज

हा हा हा

ऑस्टीन पॉवर्स मधील मोल सिन आठवला

ज्ञानराम's picture

19 Jan 2011 - 1:29 pm | ज्ञानराम

हा हा. हा... मजा आली

तर्री's picture

19 Jan 2011 - 4:31 pm | तर्री

चुर्र्रचुरीत व चिकणा माल....