दिवेलागण.

अशोक गोडबोले's picture
अशोक गोडबोले in जे न देखे रवी...
30 Apr 2008 - 11:14 am

स्मरणाच्या काठावर झाली मंद दिवेलागण
हळुहळू उजळे आतले तुळशीचे अंगण
अज्ञाताच्या क्षितिजावरूनी येती उडुनी विहंग
आळवीत सुस्वरे सुकोमल स्वप्नरागसुमरंग
रुणझुणली पैंजणे अचानक फुलताना मोगरा
पडले पाऊल तालावरती लयविव्हळ सुंदरा
मोहरलेल्या झाडापाशी उतरे बालपण
धावा करूनी थकलेले मग विसावले मीपण!
आकाराचा हट्ट धरुनी मेघ निराकार
चातकचोचीमधे पडावी आता जलधार.

--अशोक गोडबोले, पनवेल.

कवितावाङ्मयप्रतिभा

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

30 Apr 2008 - 9:04 pm | चतुरंग

ओळ अन ओळ सुरेख!

रुणझुणली पैंजणे अचानक फुलताना मोगरा
पडले पाऊल तालावरती लयविव्हळ सुंदरा
मोहरलेल्या झाडापाशी उतरे बालपण
धावा करूनी थकलेले मग विसावले मीपण!

हे तर एकदम मनाच्या आत कुठेतरी पोचले!:)

सुमधुर, गेय आणि अर्थगर्भ रचनेसाठी अभिनंदन!

चतुरंग

वरदा's picture

30 Apr 2008 - 9:38 pm | वरदा

मोहरलेल्या झाडापाशी उतरे बालपण
धावा करूनी थकलेले मग विसावले मीपण!

किती सुंदर शब्द.....खूप आवडली.. =D>

केशवराव's picture

1 May 2008 - 8:34 am | केशवराव

बहुतेक आपण गोडबोले सरच असणार. 'स्वप्नरागसुमरंग' , 'लयविव्हळ सुन्दरा' हे शब्द आपलीच आठवण करुन देतात. खुप खुप दिवसांनी भेटल्यामुळे ' स्मरणाच्या काठावर......' सर्व उचंबळून आले. फार सुन्दर कवीता.
या की एकदा किहीमला. चान्दोरकर [ सर ]

मदनबाण's picture

1 May 2008 - 8:40 am | मदनबाण

आकाराचा हट्ट धरुनी मेघ निराकार
चातकचोचीमधे पडावी आता जलधार.

छानच !!!!!

(चातक प्रेमी)
मदनबाण

मानस's picture

1 May 2008 - 8:42 am | मानस

रुणझुणली पैंजणे अचानक फुलताना मोगरा
पडले पाऊल तालावरती लयविव्हळ सुंदरा
-- फारच सुरेख

............. सुंदर कविता

चेतन's picture

1 May 2008 - 10:28 am | चेतन

आकाराचा हट्ट धरुनी मेघ निराकार
चातकचोचीमधे पडावी आता जलधार.

अतिशय सुंदर

चेतन